घडले असे की, पुण्यातील एक प्रेमी युगुल कोणाला आपण दिसू नये म्हणून स्वत:च्या गाडीने महाबळेश्वरात आले. दिवसभर महाबळेश्वर फिरुन झाल्यावर दोघही परतीच्या मार्गावर जाण्यासाठी 8 वाजता घरी निघाले. परतीच्या मार्गावर असताना "तशी" गाडी सुसाट होती. त्याचं कारणही तसंच होतं. घरी लवकर पोहचायच होतं. वेण्णालेक परिसरातून खालच्या वळणावरुन गाडीने वेग धरला आणि घात झाला. त्या चालक प्रियकराचा गाडीवरचा ताबा सुटला आणि गाडी थेट जेवी गार्डन हॉटेलमध्ये कठडा तोडून घुसली.
प्रियकर प्रेयसीसोबत गाडी हॉटेलमध्ये घुसून पलटी झाल्याने मोठा आवाज झाला. शिवाय वाचवा-वाचवा म्हणून प्रेयसीनेही किंकाळी ठोकली. सगळे पळत गाडी जवळ आले. मोठा अनर्थ घडला असं वाटू लागलं. सर्वांनी त्या उलट्या गाडीतून त्या प्रियकर प्रेयसीला बाहेर काढलं. पण कशाचं काय दोघही ठणठणीत, थोडेफार कपडे खराब झाले असतील एवढच. आता विषय होता हॉटेलच्या झालेल्या नुकसानीचा. जीव वाचला होता, आता पोलिसांच नस्टर मागं लागल तर आपल प्रेमप्रकरण घरापर्यंत जाऊ शकतं, मंग काय? हॉटेल मालक शंकर ढेबे आणि त्यांची सेटलमेंट झाली. नाव गाव पत्ता गोपणीयच ठेवायचं आणि झालेली नुकसान भरपाई देऊन टाकायची. अलिखीत कबुली झाल्यावर मालकाने त्यांच्या प्रेमाला साद घालत त्यांना मदत केली. क्रेन बोलावून गाडी बाहेर काढून ती मोडलेली तोडलेली गाडी सुखरूप पुण्याकडे पोचवायची जबाबदारी घेऊन पोचवलीही. मालकाला एका बाजूला त्यांच्या प्रेमाचं हसायलाही येत होत, तर दुसरीकडं त्यांच्या त्या प्रेमान हॉटेलच झालेल नुकसान बघूनही रडायला येत होतं.
संबंधिता बातम्या :
प्रेमसंबंध मान्य नसल्याने वडिलांकडून मुलीची हत्या, नराधम पित्याला अटक
अमरावतीत एकतर्फी प्रेमातून भर दिवसा युवतीची गळा चिरुन हत्या, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
Car Accident | महाबळेश्वरमध्ये प्रेमीयुगुलाची कार थेट हॉटेलमध्ये घुसली | ABP Majha