Coronavirus LIVE UPDATES | कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ, कोरोनाग्रस्तांची संख्या 26 हून 31 वर

कोरोना विषाणूमुळे देशात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत महिलेचा मृत्यू झालाय. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर गेली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Mar 2020 10:19 PM
अहमदनगरमधील कोरोना व्हायरसचे संशयित तीन रुग्ण फरार, जिल्हा रुग्णालयातील प्रशासनाची धावपळ, जिल्हा रुग्णालयाकडून तोफखाना पोलीस ठाण्यात तक्रार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीतील साई परिक्रमा कार्यक्रम रद्द, उप जिल्हाधिकाऱ्यांनी नाकारली परवानगी, शेकडो भाविक व ग्रामस्थ एकत्र येऊन काढणार होते परिक्रमा
महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील मॉल्स बंद राहणार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या 26 वर, आरोग्य विभागाची माहिती, पुण्यात- 10, मुंबई- 5, पनवेल- 1, कल्याण- 1, नवी मुंबई- 1, नागपूर- 4, ठाणे- 1, यवतमाळ- 2, अहमदनगर- 1 रुग्ण
महाराष्ट्रात कोरोना रुग्णाची संख्या २६ वर,
आरोग्य विभागाची माहिती
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उच्च न्यायालय आठवड्याभरासाठी केवळ तातडीच्याच प्रकरणांवर घेणार सुनावणी.

विनाकारण गर्दी करू नये, हायकोर्टाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींकडनं शनिवारी आदेश जारी.

मुंबईसोबत नागपूर आणि औरंगाबाद खंडपीठासह गोवा हायकोर्टावरही हे निर्देश लागू
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये बंद राहणार, दहावीची परीक्षा सुरु राहणार, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी रद्द, चित्रपटगृह,नाट्यगृह, स्विमिंग पूल, व्यायामशाळा 31 मार्चपर्यंत बंद राहणार
कोरोनामुळे मनसेचा गुढीपाडवा मेळावा रद्द, कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मनसेचा निर्णय
आठ मार्चपासून कोरोनाची लागण झालेल्या महिलेनं बंगळुरु ते दिल्ली आणि दिल्ली ते आग्रा प्रवास केल्यानं तिथल्या यंत्रणांची झोप उडाली आहे. गुगलसाठी काम करणारा कर्मचारी हनीमूनसाठी पत्नीला घेऊन इटलीला गेला होता. मात्र इटलीहून परतल्यानंतर गुगल कर्मचाऱ्याच्या पत्नीला कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं होतं. तिला बंगळुरुमध्ये एकांतवासात ठेवलं होतं. मात्र पालकांच्या घरी जाण्यासाठी तिनं बंगळुरुमधून पळ काढला आणि बंगळुरु ते दिल्ली विमानानं प्रवास केला. मग दिल्ली ते आग्रा रेल्वेनं प्रवास करत घर गाठलं.

लवकरच कोरोनावर कुठलं औषध काम करेल, हे कळू शकतं अशी माहिती पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांनी एबीपी माझाला दिली आहे. भारत हा जगातील पाचव्य़ा क्रमांकाचा देश आहे, जिथे हा विषाणू मानवाच्या शरीराबाहेर ठेवण्यात यश आलं असून त्यावर लस शोधण्याचा प्रयत्न केला जातोय, असंही गंगाखेडकर यांनी माझाला सांगितलं.
मुंबई : लोकलमध्ये प्रवाश्यांना कोरोनापासून सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक उपयोजना सध्या करण्यात येत आहेत. मध्य रेल्वे तर लोकलचे सर्व डब्बे निर्जंतुक करत आहे. त्यासाठी स्पेशल केमिकल आणून लोकलमधले हँडल, स्टीलचे रॉड, खिडक्यांना असलेल्या काचा, हात ठेवण्याची जागा, उभे राहण्याची जागा, लोकलच्या आतले आणि बाहेरचे पृष्ठभाग साफ केले जात आहेत. कोरोना विषाणू हा हवेपेक्षा पृष्ठभागावरून जास्त पसरतोय. त्यामुळे लोकलची साफसफाई करणे अत्यंत आवश्यक आहे. तसंच अतिशय दाटीवाटीच्या मुंबई लोकलमधून प्रवास करण्याशिवाय प्रवाश्यांकडे दुसरा पर्याय देखील नाहीये. म्हणून देखील हे निर्जंतुकीकरण आवश्यक आहे.
बीडमधल्या त्या तिघांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह. पुण्यातील ज्या दाम्पत्याला कोरोनाची लागण झालेली आहे. त्यांच्यासोबत एकाच विमानामध्ये या तिघांनी प्रवास केला होता.
कोरोनाचे सावट देवस्थानांपर्यंत पोहचले आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या त्रंबकेश्वरमध्ये भाविक पर्यटकांची गर्दी कमी झालीय. त्यामुळे कोरोना वाढू नये म्हणून प्रार्थना करायलाही भाविक देवाच्या दारी जात नाहीये. त्यामुळे कुंभनगरीच्या अर्थकारणाला फटका बसतोय.
कोरोनाबाबत आता दिवसेंदिवस अधिक चर्चा होताना दिसत आहे. राज्य सरकार देखील याबाबत काळजी घेताना दिसून येत आहे. कोरोनामुळे आता कोकणातील पर्यटनावर देखील परिणाम होताना दिसत आहे. गणपतीपुळे सारख्या मंदिरात येणाऱ्या भाविकांची संख्या देखील कमीलीची घटली आहे. शिवाय, हापूसच्या निर्यातीवर परिणाम झाल्यानं आंबा बागायतदार आणि शेतकरी देखील चिंतेत आहे.
कोरोना व्हायरसमुळे आता राज्यातील देवस्थान मधील भाविकांची संख्या कमी होऊ लागलीय. कोल्हापूर जिल्ह्यातील नरसोबावाडीमधील दत्त मंदिरात भाविकांची दर्शन घेण्यासाठी संख्या कमी झालीय. यामुळे मंदिर परिसरात काही प्रमाणात शुकशुकाट पाहायला मिळाततोय. जे भाविक दर्शन घेण्यासाठी येतायत ते सांगली, कोल्हापूर भागातील आहेत. मुंबई, पुणे किंवा अन्य भागातुन येणाऱ्या भाविकांची संख्या कमी झालीय. या व्हायरसच्या पार्श्वभूमीवर नरसोबावाडी देवस्थान देखील काळजी घेतली असून गरज पडली तर भाविकांना मास्क वाटप केले जातंय.
पश्चिम उपनगरातील बोरवली कोर्टात रोज नागरिक व पोलीस कर्मचारी वेगवेगळ्या कामासाठी येत असतात. त्यामुळे या व्हायरसचा वाढता प्रभाव पाहता कोर्ट आणि बार असोसिएशन अध्यक्ष राजेश मोरे आणि सदस्य फिरोज खान यांच्याकडून शेकडो महिला-पुरुष वकिलांना मास्क देण्यात आले.
सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक कोरोना संशयित निगराणीखाली आहे. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर कोरोना आजार आहे की नाही हे स्पष्ट होणार आहे. दोन महिन्यांपूर्वी दुबई येथुन सोलापुरात हा रुग्ण आल्याची माहिती आहे. सर्दी खोकल्याच्या त्रास जाणवू लागल्यामुळे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याआधी हा रुग्ण दाखल होता. मात्र, कोणतेही विशेष लक्षणं न दिसल्याने प्राथमिक तपासणी करून रुग्णाला घरी सोडलं होतं. शुक्रवारी पुन्हा त्रास वाढल्याने रुग्णाला ऍडमिट करण्यात आलंय.
नागपुरातील चार कोरोना संशयित रुग्णालयातून घरी निघून गेलेत. नागपुरात कोरोनाची लागण झालेल्या पहिल्या रुग्णाच्या संपर्कात आलेले हे चार संशयित शासकीय मेयो रुग्णालयात दाखल होते. या चारही संशयितांचा अहवाल आज येणार आहे, त्यापूर्वीच हे चारही जण शुक्रवारी मध्यरात्री रुग्णालयातून बेपत्ता झाले. ते सर्व आपापल्या घरी गेले असून आज त्यांना परत रुग्णालयात आणले जाणार आहे. रुग्णालय प्रशासनाकडून पोलिसांना माहिती देण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक उपक्रम, धार्मिक यात्रा, जत्रा, उत्सव 31 मार्चपर्यंत रद्द करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पालघर : कोरोनाच्या भीतीमुळे चिकन खाण्याकडे ग्राहक वर्गाने पाठ फिरवल्याने बकऱ्याचे मटण विकणाऱ्यांचे भलतेच फावले असून त्यांच्याकडून ग्राहकांची लूट होताना दिसत आहे. ज्या मटणाचे भाव 400 ते 450 रुपये होते. तेच भाव आता 550 ते 600 पर्यंत गेल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे.
Coronavirus LIVE UPDATES | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात सार्वजनिक उपक्रम, जत्रा, यात्रा, उरूस, स्पर्धा आदींवर बंदी; कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांचे आदेश, आजपासून 31 मार्चपर्यंत सर्व कार्यक्रमांवर बंदी

पार्श्वभूमी

कोरोना विषाणूमुळे देशात दुसरा बळी गेला आहे. दिल्लीत महिलेचा मृत्यू झालाय. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या 19 वर गेली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.

1. भारतात कोरोनाचा दुसरा बळी, दिल्लीत महिलेचा मृत्यू, देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 82 वर

2. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क, सॅनिटायझर अत्यावश्यक वस्तू, केंद्र सरकारकडून घोषणा, काळाबाजार करणाऱ्यांना 7 वर्षांची शिक्षा

3. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नागपूरातल्या व्यायामशाळा, जलतरण तलाव आणि सिनेमा-नाट्यगृह बंद राहणार, मख्यमंत्र्यांचे आदेश, राज्यात 1९ कोरोनाग्रस्त

4. घरी बसूनच काम करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आवाहन, वर्क फ्रॉम होमसाठी हायकोर्टातही याचिका, पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये शाळा-कॉलेजसना सुट्टी

5. अमेरिकेत राष्ट्रीय आणीबाणी जाहीर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय, कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी ट्रम्प यांच्याकडून 50 अब्ज डॉलरची तरतूद

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.