Coronavirus LIVE UPDATES | LIVE UPDATE | कोरोनाचा देशातला दुसरा बळी, दिल्लीत 68 वर्षीय महिलेचा मृत्यू

कोरोना आजाराने देशातील पहिला मृत्यू कर्नाटकात झाला आहे. तर, राज्यातही कोरोनाग्रस्तांची संख्या 14 वर गेली आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Mar 2020 11:08 PM

पार्श्वभूमी

राज्यातील कोरोनाग्रस्तांपैकी एका वृद्धाची प्रकृती चिंताजनक असली तरी, अन्य रुग्णांची प्रकृती उत्तम असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. शिवाय, नागरिकांनी सरसकट कोरोना चाचणीचा आग्रह करु नये, असंही...More

कोरोनामुळे नुकसान करावं लागत असल्याच्या उद्विगनेतून पोल्ट्री व्यावसायिकाने जीवंत कोंबड्या खड्ड्यात पुरल्या आहेत. सोलापुरातल्या डोणगाव येथील फिरोज मनियार असे या लघु पोल्ट्री उद्योजकाचे नाव आहे. फिरोज गेल्या काही वर्षांपासून पोल्ट्रीचा व्यवसाय करतात. जवळपास 1 हजार कोंबड्याच्या माध्यमातून दर 45 दिवसाला साधारण 20 हजार रुपये इतका त्यांना नफा मिळतो. मात्र कोरोनाच्या भितीमुळे चिकन व्यावसायावर मोठा फटका बसतोय. त्यामुळे उत्पन्न न होता मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे जवळपास 750 कोंबड्या फिरोज मनियार यांनी खड्यात पुरल्या. कोरोना व्हायरसच्या भितीमुळे अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत आहे. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना ही कोरोनामुळे मोठा फटका सहन करावा लागत आहे. चिकन खाल्याने कोरानाची लागण होत नसल्याचे वारंवार सांगितल्यानंतर देखील चिकनचे दर अद्याप ही खाली उतरलेलेच आहेत. सोलापुरातील पोल्ट्रीफार्म उद्योजकांनाही दररोज लाखोंचं नुकसान सहन करावं लागत आहे. त्यामुळे शासनातर्फे आता या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी कुक्कुटपालक करत आहेत. रोज पसरणाऱ्या अफवामुळे उद्योगात मोठा फटका बसत आहे. त्यामुळे ही मानवनिर्मित आपत्ती समजून शासनाने मदत करावी यासाठी कुकुटपालकांनी सोलापुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देखील दिलं आहे.