Omicron Variant in Maharashtra:  राज्यासह देशभरात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंट बाधितांची संख्या वाढत आहे. देशात ओमायक्रॉन बाधितांच्या संख्येने एक हजारांचा टप्पा ओलांडला आहे. कोरोनाची तिसरी लाट ही ओमायक्रॉनमुळे येऊ शकते असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने प्रशासनाने निर्बंध पुन्हा कठोर करण्यास सुरुवात केली आहे. 


ओमायक्रॉन व्हेरियंटबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढल्यास सरकारने योग्य तयारी केली आहे का, असेही प्रश्न अनेकांनी उपस्थित केले आहेत. याबाबत राज्य सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिलेली उत्तरे...


>> ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव वाढल्यास लोकांमधे हर्ड इम्युनिटी येण्यास खरच मदत होईल का  ?
> हर्ड इम्युनिटी येण्यास मदत होईल. परंतु आपण आवश्यक ती काळजी घ्यायला हवी.  कारण आपल्या लोकसंख्येचे प्रमाण पाहता ओमायक्रॉनमुळे गंभीर होण्याची शक्यता असलेल्यांची संख्या बरीच आहे. 


>> ओमायक्रॉनमुळे कोरोना रुग्णांची त्सुनामी येणार आहे का  ?
>  हो.  इतर देशातील अनुभव तोच सांगतो आहे.  पण त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही कारण रुग्णालयात भरती कराव्या लागणार्यांचे प्रमाण कमी आहे.


>> आफ्रिका आणि युरोपात ओमायक्रॉनचा ग्राफ जितक्या वेगाने वरती गेला तितक्याच वेगाने खाली कसा आला  ? 
>  कारण बहुतांश लोकसंख्येला त्याची बाधा होऊन गेली 


>> महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था  ओमायक्रॉनसाठी कितपत सज्ज ?
>  500 ऑक्सीजन प्लांट महाराष्ट्रात कार्यान्वित आहेत.  पुरेसे बेड आहेत. 


>> ओमायक्रॉनमुळे  रुग्णालयात भरती कराव्या लागणाऱ्या रुग्णांचे प्रमाण किती?
 > अगदीच कमी


दरम्यान, कोरोनाला बळी पडलेल्या 18 वर्षांखालील मुलांचे प्रमाण मे 2021 मध्ये सुमारे 0.07 टक्के इतके आहे. यावरून लहान मुलांमध्ये या आजाराचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले आहे. राष्ट्रीय पातळीवरील सल्लागारांनी तिसऱ्या लाटेत बालकांना मोठ्या प्रमाणावर संसर्ग होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे राज्य शासनाने राज्यस्तरीय बालरोगतज्ञांचा टास्क फोर्स स्थापन केला आहे. त्याचबरोबर राज्य सरकार बालकांवरील उपचारांच्या दृष्टीने रुग्णालयस्तरावर पायाभूत सुविधा, यंत्रणा उभारण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करीत असल्याचे आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.


इतर महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha