सातारा: जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona)वाढत्या प्रार्दूभावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आता सातारा जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, रूग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरानाचे रूग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी सांगितले की, कोराना रूग्णांची ( Corona Patient) संख्या वाढत आहे. पण हा सौम्य प्रकारातील कोरोना असून त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तरीही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. 


सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13-14 एप्रिल रोजी राज्यात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली. "केंद्र सरकारने सूचना दिल्यानुसार, आम्ही 13-14 एप्रिल रोजी राज्यात आपल्या कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. 


महाराष्ट्रातील सर्व कोराना रूग्णालयांकडून (Corona hospitals)माहिती घेतली जात असून वेंटिलेटरच्या सपोर्टची अजून तरी गरज पडलेली नाही. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे 48-72 तासांमध्ये कोरोना रूग्ण बरे होत आहेत. त्यामुळे जास्त घाबरण्याचे कारण नाही. याचे कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील डेल्टा व्हेरियंटसारखा सध्याचा कोराना प्राणघातक स्वरूपाचा नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे. 


आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, सध्या तरी कोरोनाच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याची आवश्यकता वाटत नाही पण यासंर्दभात आम्हाला केंद्र सरकारकडून तशा प्रकारच्या सूचना आल्या तर तशी खबरदारी नक्कीच घेतली जाईल. तसेच कोरोनाच्या दोन्ही लसी (booster dose) टोचून घेतल्यानंतर बूस्टर डोस देण्यासंदर्भात केंद्राच्या निर्देशानुसार त्याचे पालन केले जाणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यानी सांगितलं.


लोकसंख्येची घनता ( Population density)अधिक असलेल्या जिल्ह्यात रूग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्याचा समावेश आहे. ज्या भागात रूग्णसंख्येचे प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता अधिक आहे. यामध्ये पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असून येथिल दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत (corona positive patient) वाढ पाहायला मिळत आहे.


सणवारांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळायला हवी


सध्याच्या चैत्र महिना सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने सण  (several festivals) साजरे केले जातात आणि सुट्टीनिमित्त लोक एकत्र जमा होतअसतात. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आनंद घ्यावा, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.


या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णालयांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून आमच्याकडे रूग्णांसाठी लागणारे आवश्यक ते आरोग्य साहित्यासह ऑक्सिजन किटची (oxygen kit) उपलब्धता आहे, असा दावाही आरोग्यामंत्र्यांनी केला आहे.