पिंपरी : पिंपरी चिंचवडमध्ये आज पुन्हा 5 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कोरोनाशी यशस्वी सामना केल्याबद्दल भोसरी रुग्णालयातील स्टाफने टाळ्या वाजवून त्यांचे आभार मानले. दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज केलेले तीन आणि आजचे पाच असे एकूण 8 कोरोनामुक्त रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले. शहरात एकूण 12 रुग्ण होते. त्यापैकी 4 रुग्णांवर आता उपचार सुरु आहेत. त्यापैकी 15 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे. दुसरे नमुने आज पाठवले असून ते ही निगेटिव्ह आले तर त्या कोरोनाबाधितास उद्या डिस्चार्ज दिला जाईल.
भारतात आतापर्यंत कोरोना बाधितांचा आकडा एक हजारांवर पोहोचला आहे. तर देशात कोरोनामुळे 25 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोना बाधित महाराष्ट्रात असून महाराष्ट्रापाठोपाठ केरळमध्ये कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. देशातील 27 राज्यांमध्ये कोरोना हैदोस घालत आहे.
जगभरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव
जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस हैदोस घालत आहे. जगभरातील 170 पेक्षा जास्त देशांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. आतापर्यंत जगभरात साडेसहा हजारांपेक्षा जास्त रूग्ण आढळून आले आहेत. आतापर्यंत 31 हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एक लाख 42 हजार लोक कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुळए सर्वाधिक मृत्यू इटलीमध्ये झाले आहेत. इटलीमधील मृतांचा आकडा दहा हजारांवर पोहोचला आहे. तर कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या 92 हजार 472 आहे. स्पेनमध्ये आतापर्यंत 5 हजार 992 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण संसर्ग झालेल्यांचा आकडा 73 हजार 235 वर पोहोचला आहे.
दिलासादायक... पिंपरी चिंचवडमध्ये 5 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज, एकूण 8 जण कोरोनामुक्त
नाजिम मुल्ला, एबीपी माझा
Updated at:
29 Mar 2020 11:47 AM (IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात सुरु झाल्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती.
आता पिंपरी चिंचवडमधील रुग्णांना डिस्चार्ज दिला जात आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -