Coronavirus LIVE UPDATE | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टेनिसची विम्बल्डन स्पर्धा रद्द
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील हजाराच्या वर आकडा गाठला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
01 Apr 2020 11:05 PM
Corona Effect | कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर टेनिसची विम्बल्डन स्पर्धा रद्द
नवी मुंबई : पनवेल आणि नवी मुंबईत आज कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांची संख्या सातने वाढली, कळंबोली येथे राहणारे सीआयएसएफचे 5 जवान कोरोना पाॅझिटिव्ह, मुंबई विमानतळावर होते कार्यरत, तर नेरूळ आणि कोपरखैरणे येथे दोघांना कोरोनाची लागण
कोरोना विषाणू प्रतिबंधासाठी बालाजी अमाईन्सकडून 85 लाखाची मदत. 50 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधी, 25 लाख रुपये प्रधानमंत्री सहाय्यता निधी तर 10 लाख रुपये तेलंगाना मुख्यमंत्री सहायता निधीसाठी. तर प्रसिद्ध उद्योजक यतीन शाह यांच्या प्रिसीजनकडून ही एक कोटी रुपयांची मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 50 लाख रुपये तर पंतप्रधान सहाय्यता निधीसाठी 50 लाख रुपयांचा धनादेश.
निजामु्ददीन सारखे प्रकरण खपवून घेणार नाही. निजामुद्दीन सारखे प्रकरण झाले तर महाराष्ट्रात काय होईल. धर्म कोणताही असो एकही धार्मिक कार्यक्रम होवू देवू नका. झाला तर संबंधीत अधिकारावर कडक कारवाई. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
जळगावात अजून एक रूग्ण कोरोना पाॅझिटिव्ह; जिल्हावासियांनो गांभीर्य लक्षात घेऊन लाॅकडाऊनचे तंतोतंत पालन करा; जिल्हाधिकारी डाॅ. अविनाश ढाकणे यांचे आवाहन
वरळी पाठोपाठ आता लालबागमध्ये सुद्धा आढळला कोरनाचा रुग्ण
कोरोनाविरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आणि नियम मोडणाऱ्यांची खैर नाही, उपमुख्यमंत्री अजित पवारांचा इशारा
औरंगाबाद इम्तियाज जलील यांच्या कडून 1 कोटींचा खासदार फंड. जिल्हाधिकारी यांना दिला खासदार फंड. कोरोनाच्या प्रादुर्भाव लक्षात घेता दिला खासदार
नांदेड : सांगलीहून टेम्पोतून निघालेल्या 52 उसतोड कामगाराना पकडले, सांगलीहून यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस येथे जात होते, कामगारांमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश, एका 9 महिन्याच्या गर्भवती महिलेचाही समावेश, सर्वांना होम क्वॉरंटाईनचे शिक्के मारून मंगल कार्यालयात पाठवण्यात आलं
राज्यातील अंत्योदय व प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदुळ वाटप केले जाणार - अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ
कोल्हापूर : दिल्लीतल्या धार्मिक कार्यक्रमात 21 पैकी 19 जणांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी 9 जण अजूनही इतर राज्यातच आहेत, कोल्हापूर जिल्ह्यात आले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या 10 लोकांचा शोध लागलाय. त्यांना क्वारन्टाईन केलंय. त्यांची तपासणी करून स्वब पाठवलं जाणार आहे, कुणीही घाबरून जाऊ नये, असं आाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.
नवी मुंबई महानगर पालिका क्षेत्रात तबलीकी जमातीचे 15 जण दिल्लीला गेले होते.
त्यातील 12 जण अजून दिल्ली मध्ये आहेत .
नवी मुंबई मध्ये आलेल्या तीन जणांना होम कॉरेंटाईन पालिकेकडून करण्यात आले आहे.
आनंदाची बातमी :
पिंपरी चिंचवडमधील आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. आता त्याचे दुसरे नमुने आजच पाठवले जातायेत. हा रुग्ण फिलिपिन्स येथून आलेला असून 18 मार्चला त्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. शहरातील एकूण 12 रुग्णांपैकी 10 रुग्ण आधीच कोरोनामुक्त होऊन घरी परतलेत. उद्या या रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आल्यास त्याला ही डिस्चार्ज दिला जाईल. उर्वरित एका रुग्णाची प्रकृती ही स्थिर आहे. तसेच 19 मार्च पासून शहरात एक ही रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला नाही
कोल्हापूर : कोरोना कक्षातील मृत पावलेल्या दोघांचेही अहवाल निगेटिव्ह, काल एकाच दिवशी 37 वर्षीय तरुण आणि 85 वर्षीय वृद्धेचा झाला होता मृत्यू, दोघांचेही कोरोना अहवाल निगेटिव्ह
नवी मुंबई : अॅंटी कोव्हिड - 19 आर्मीची मनपा आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून स्थापना, कोरोना विरोधातील लढ्यात सहभागी होण्यासाठी लोकांना आवाहन, शहरातील डाॅक्टर, नर्स , वाॅर्ड बाॅय यांना आर्मी टीममध्ये भर्ती होण्याने आवाहन, ट्रेसिंग, ट्रॅकिंग, टेस्टींग , ट्रीटमेंन्ट करण्यासाठी मोठ्या संख्येने वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांची गरज लक्षात घेवून टीमची स्थापना
अमरावती शहराच्या वलगाव मार्गावरील देशी दारूचे गोदाम चोरट्यांनी फोडले. गोदामाच्या पाठीमागून भिंतीला छिद्र करून चोरट्यांनी दारूच्या 250 पेट्या लांबवल्या. तब्बल साडे पाच लाखांची देशी दारू चोरट्यांनी लंपास केली. ही घटना काल सायंकाळी उघडकीस आली
पंढरपूर शहरातील खाजगी दवाखाने निर्जंतुक करण्याचे काम पालिका प्रशासनाने केले सुरू
पालघर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पालघर जिल्ह्यातील फुल शेती बागायतदारांना मोठा फटका बसला असून फुल मार्केट बंद असल्याने फुलांना उठाव नसल्याने शेवटी फुलशेतीवर ट्रॅक्टर फिरविण्याची वेळ आली आहे
31 मार्च 2020 पर्यंत ज्यातल्या 18 लाख 89 हजार 528 शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 11 हजार 966 कोटी 21 लाख रुपयांची कर्जमाफी जमा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्यातील सर्व महिला पुरुष कर्मचाऱ्यांची आणि शहरात तैनात असलेल्या होमगार्डची तपासणी करण्याचे काम करण्यात येत आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि या सर्व पार्श्वभूमीवर नाकाबंदी आणि अन्य गोष्टींसाठी पोलिसांची 24 तास ड्युटी सुरू आहे . नागरिकांनी घरावर पडू नये यासाठी ठिकाणी पोलिसांकडून नाकाबंदी केली जाते अशा परिस्थितीत पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अशावेळी पोलीस सुरक्षित राहावेत आणि त्यांना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून जिल्हा पोलिस दलाने पोलिस कर्मचाऱ्यांची तपासणी करण्याचे काम आजपासून सुरू केलेय.
औरंगाबाद शहरात आजपासून 14 तारखेपर्यंत विनाकारण घराबाहेर पडला तर आपलं वाहन जप्त करण्यात येणार आहे. औरंगाबाद पोलिसांनी कठोर पावले उचलली आहेत. चौकाचौकात पोलिस बंदोबस्त लावलाय. याशिवाय शहरावर ड्रोन कॅमेराची देखील नजर आहे. विनाकारण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होत आहेत
कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचे विशेष रुग्णालयात रुपांतर करण्यासंदर्भात चर्चा सुरु झाली आहे. जिल्हा प्रशासनाने शिवाजी विद्यापीठाकडे एक हजार बेडची मागणी केली आहे. इथल्या वसतिगृहात आयसोलेशन रुग्णालय करण्याची प्रशासनाची तयारी आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यापीठाच्या वसतिगृहात हे रुग्णालय उभारण्याचा मानस असून आगामी काळात होणाऱ्या परीक्षा लक्षात घेऊन कोणत्या इमारतीमध्ये हे रुग्णालय उभा करायचं यावर चर्चा सुरु आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढवल्या जात आहेत. बीड जिल्ह्यातल्या टाकळी गावातल्या गावकऱ्यांनी तर नामी शक्कल लढवली आहे. यापुढे जो विनाकारण घरातून बाहेर निघेल त्याची आता थेट गाढवावरून धिंड निघणार आहे असा निर्णय गावकऱ्यांनी घेतलाय.
एक वेळ विनाकारण बाहेर आढळून आल्यास पाचशे रुपये दंड तीन वेळा आढळून आला तर थेट गाढवावरुन धिंड असा निर्णय घेतल्यामुळे या गावाची चर्चा जिल्हाभर सुरू आहे, थेट गावात दवंडी देऊन या निर्णयाची सर्वांना माहिती देखील दिली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून हा निर्णय घेतला असून गाव स्वच्छ ही केले आहे त्यामुळे या नियमाचे उल्लंघन करणार नाही असा विश्वासही गावच्या सरपंचांनी व्यक्त केलाय
दिल्लीतील निजामुद्दीन मरकज कार्यक्रमाला बेळगावहून दहा जण गेले होते. तिथून परत आल्यावर त्यांना चौदा दिवस होम क्वॉरन्टाईन करण्यात आले होते. त्यांच्यात कोरोनाची कोणतीही लक्षणे दिसून आली नाहीत. तरीही त्यांचे नमुने घेऊन बंगळूरू येथे पाठवण्यात येणार आहेत, असे जिल्हाधिकारी डॉ.एस.बी.बोमनहळ्ळी यांनी सांगितले.
महाराष्ट्रात कोरोनाने आणखी एक बळी घेतला असून आता कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांचा आकडा 11 वर पोहोचला आहे. पालघरमधील एका 50 वर्षीय कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे.
परभणीत दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमासाठी गेलेले 3 जण परतले असून त्यांना तात्काळ जिल्हा रुग्णालयात कोरोना आयसोलेशन वार्डात दाखल करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांचा आकडा 320 वर पोहोचला आहे. काल रात्रभरात कोरोनाचे 18 नवे रुग्ण सापडले आहे. यामध्ये मुंबईतील 16 आणि पुण्यातील दोघांचा समावेश आहे.
दिल्लीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमासाठी अमरावती जिल्ह्यामधून 7 जण गेले होते. 6 मार्चला गेले आणि 11 मार्च रोजी परत आले होते. या सर्वांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून तपासणी कार्य सुरू केले आहे. तसेच हे 7 जण कोणा-कोणाच्या संपर्कात आले याची सुद्धा माहिती घेणं सुरू आहे.
मरकज प्रकरणात नांदेड जिल्ह्यातील 13 जणांचे मोबाईल नंबर पोलिसांना दिल्ली पोलिसांनी दिले आहेत. त्यातील 1 जण सापडला आहे. हिमायतनगर तालुक्यातील असून सध्या त्याला हिमायतनगर शासकीय रुग्णालयात ठेवले आहे. उद्या सकाळी नांदेडला आणले जाणार असून तो असलेल्या खोलीबाहेर पोलीस उभे केले आहेत. त्याने मरकजला गेलो होतो असे कबूल केले आहे. उर्वरित 12 जणांचा शोध गोपनीय पद्धतीने सुरू आहे.
बीड शहरामध्ये भाजीपाला घेण्यासाठी लोकांची गर्दी होते म्हणून प्रशासनाकडून शहरातील भाजी मंडई काही काळ बंद करण्यात आली. यात फळे आणि पालेभाज्या यांचा वेगवेगळे नियोजन केल्यानंतर ही लोक मात्र ऐकायला तयार नाहीत. आज बीड शहरातील मल्टीपर्पज ग्राउंड वरच्या बाजारात लोकांनी गर्दी केली आहे.
विशेष म्हणजे, या ठिकाणी लोकांना पालेभाज्या घेण्यासाठी मार्किंग करून देण्यात आली होती. सोशल डिस्टन्स पाळूनच भाजीविक्रेते आणि ग्राहकांची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र लोकांनी भाज्या घेण्यासाठी एकच झुंबड केली आणि सोशल डिस्टन्सिंगची ऐशीतैशी केल्याचं पाहायला मिळत आहे. पोलीस वेळोवेळी लोकांना गर्दी न करण्याचे आवाहन करत आहेत.
दिल्लीतील हजरत निजामुद्दिन येथे तब्लीगी जमातसाठी गेलेल्यांमध्ये अकोला जिल्ह्यातील 10 जणांची नावे उघड झाली आहेत. यामध्ये अकोल्यातील चार, बार्शि टाकळी आणि पातूर तालूक्यातील प्रत्येकी 3 जणांचा समावेश आहे. हे सर्वजण 7 मार्चला दिल्ली येथे गेले होते. तर 11 मार्चला हे सर्वजण अकोल्यात परतले होते. यातील चौघांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला आहे. बार्शिटाकळीतील दोन जण गावातून गायब आहेत. दोघेजण अद्यापही दिल्लीतच असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तर दोघांशी अद्याप कोणताच संपर्क प्रस्थापित झालेला नाही. दरम्यान, अकोला जिल्ह्यात या कार्यक्रमासाठी गेलेल्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. बाळापूर तालुक्यातील वाडेगावातील 18 संशयित रूग्णांची तपासणी झाली आहे. यातील काहीजण या कार्यक्रमाला उपस्थित असण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस एमआयडीसीकडून
११ कोटी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एकूण ११ कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द.
दिल्लीतल्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील 3 जण गेल्याची माहिती समोर येत आहे. 3 जणांना तातडीने क्वॉरन्टाईन करण्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी आदेश दिले आहेत.
येरवडा कारागृहातील 867 कैदी उपोषणाला बसण्याच्या तयारीत
,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश स्पष्ट असतानाही प्रशासनाची अंमलबजाणीसाठी टाळाटाळ
,राज्य सरकार आणि जेल प्रशासनाला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश
दिल्लीतील हजरत निजामुद्दिन येथे तब्लीगी जमातसाठी गेलेल्यांमध्ये वाशिम जिल्ह्यातील एका व्यक्तीचा समावेश असल्याचं जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक यांच्याकडून सांगण्यात आलं आहे. मात्र त्या व्यक्तीने स्वतः तपासणी करून क्वॉरन्टाईन करून घेतलं असून इतर लोकांची सदर प्रकरणी माहिती घेणं सुरू आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा 302 वर गेला आहे. कोरोनाशी आपली लढाई सुरूचं आहे. आज दिवसभरात कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याच्या बातम्या कानावर येत आहे. मात्र कुणाच्याही पगारात कपात केली जाणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, सरकारी कर्मचाऱ्यांची वेतन कपात केली नाही. फक्त कर्मचाऱ्यांच्या पगाराची टप्प्यात विभागणी केली आहे. कोरोनानंतर आर्थिक संकटालाही तोंड द्यायचं आहे. वेतन कपात केली आहे, असा गैरसमज करू नका फक्त आपल्याला आर्थिक घडी नीट बसवण्यासाठी ही मांडणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कुणाचाही पगार कापला जाणार नाही.
सध्या उन्हाळा सुरु आहे. गरमी वाढली म्हणून एसी लावू नका, थंड पेय टाळा, थंड पाणी किंवा सरबत पिऊ नका. हे कोरोनाचा उपाय म्हणून मी सांगत नाही. मात्र यामुळे सर्दी किंवा खोकला झाला तर चिंता वाढू शकते. घरात एसी असेल तर तो देखील लावू नका. त्यापेक्षा दारं खिडक्या उघडा, मोकळी हवा घरात येऊ द्या, असंही आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं.