coronavirus LIVE UPDATES | वरळीतील कोळीवाड्यात कोरोनाचा बळी, कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलगाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील हजाराच्या वर आकडा गाठला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Apr 2020 01:35 AM
सोलापुरातील कामती पोलीस ठाण्याच्या हद्दीत शिवारात सुरू असलेल्या वाढदिवसाच्या पार्टीवर पोलिसांचा छापा. शिवारात जुगार खेळताना तसेच दारू पिताना 11 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. यावेळी 10 लाख 5 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सदर ठिकाणाहून 13 दुचाकी एक ऑटोरिक्षा तसेच दारूचे बॉटल देखील जप्त केले. या अकरा आरोपींविरोधात भादवि 269, 270, 188, 34 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
वरळीतील कोळीवाड्यात कोरोनाचा बळी, कोळी समाजाचे नेते मोरेश्वर कोळी यांचा मृत्यू, पत्नी आणि मुलगाही कस्तुरबा रुग्णालयात दाखल
राज्यात आज कोरोना बाधित 81 नवीन रुग्णांची नोंद झाली. यातील 57 रुग्ण मुंबई, 6 पुणे, 3 पिंपरी चिंचवड, 9 अहमदनगर, 5 ठाणे, 1 बुलढाण्यातील रुग्णाचा समावेश आहे. यामुळे राज्यातील एकुण बाधित रुग्णांची संख्या 416 झाली आहे. आतापर्यंत 42 रुग्णांना डिस्चार्ज करण्यात आले आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात पहिल्या कोरोना बाधित रुग्णाची नोंद. पानिपत दिल्लीहून आलेल्या 30 वर्षांचा तरुण कोरोना पॉझिटिव्ह. बुधवारी उमरगा उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. पत्नीचे अहवाल मात्र निगेटिव्ह.
उद्यापासून मिरजेतील कोरोना हॉस्पिटलममधील कोरोना लॅबमध्ये कोरोना टेस्ट सुरू होणार आहे.

2 दिवसापासून प्रायोगिक तत्वावर लॅब मध्ये काम सुरू होते

. उद्यापासून चार ते सहा तासात कोरोना टेस्ट रिपोर्ट मिळणार असल्याची माहिती

अधिष्ठाता पल्लवी सापळे यांनी दिली.

गोकुळच्या गायीच्या खरेदी दारात 2 रुपयांनी कपात

करण्यात आली आहे. विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या

29 रुपयांना खरेदी होणारं दूध आता 27 रुपयांना विकत घेणार आहे.

पालघर

जिल्हात कोरोना बाधित 11 रुग्णांची नोंद झाली असून या मध्ये वसई -विरार महानगर पालिका क्षेत्रात 9 तर पालघर तालुक्यात 2 कोरोना बाधित रुग्णाची नोंद झाली आहे. या पैकी एक रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे उपचार घेत आहे असे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले
406 परदेशी प्रवाशांचा देखरेख कालावधी संपुष्टात आला आहे. विविध देशातून प्रवास करून आलेले परदेशी प्रवासी, बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्ती व तीव्र श्वसन विकार असलेले 995 रुग्ण देखरेखीखाली ठेवण्यात आले असून 59 जणांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. तर 72 जणांचे घशातील नमुने तपासणीसाठी कस्तुरबा गांधी रुग्णालय येथे पाठविण्यात आले असून त्यांचा तपासणी अहवाल प्राप्त आहे. 11 पॉझिटिव्ह रुग्णांपैकी 7 पॉझिटिव्ह रुग्ण कस्तुरबा गांधी रुग्णालय, मुंबई येथे दाखल करण्यात आले असून 2 रुग्ण खाजगी रुग्णालयात दाखल आहेत. 1 रुग्ण ग्रामीण रुग्णालय, पालघर येथे दाखल करण्यात आला तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णाचा परदेश प्रवासाचा इतिहास नाही

पुण्यात कोरोनाचा आणखी एक बळी, 46 वर्षीय महिलेचा ससून रुग्णालयात मृत्यू. या महिलेचा आज पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 9 पॉझिटीव्ह रुग्ण आढळलेत. त्यापैकी दोन पुणे आणि दोन पिंपरी चिंचवडमधील असे चार तबलीग मरकजशी संबंधित आहेत. तर उरलेले पाच जणांना स्थानिक व्यक्तीपासून लागण झालीय. ससुन रुग्णालात मृत्यू झालेल्या 50 वर्षीय महिलेला आधीपासून फुफ्फुसांचा आजार होता. काही दिवसांपूर्वी श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने तिला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आलं होतं.
जगभरात कोरोनाचे 50 हजारांवर बळी; आज इटलीत 670 गेले. एकूण 13 हजारल 915 जणांचा मृत्यू
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी नऊ वाजता देशातील नागरिकांना संबोधित करणार; पंतप्रधान मोदी यांनी या संदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.
नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई; टिकटॉक व्हिडिओ बनविणाऱ्या चौघांना मालेगावमधून अटक. टिकटॉकमध्ये आक्षेपार्ह असल्याने कारवाई.
पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुण्यातील मरकजशी संबंधित दोन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहे. त्यानंतर प्रशासनाकडून या दोन व्यक्ती ज्या भागात रहात होत्या त्या भागात तपासणी करण्यात येत आहे. पुण्यात मरकजशी संबंधित 35 व्यक्तींच्या टेस्ट करण्यात आल्या. त्याचबरोबर ते ज्यांच्या जवळून संपर्कात आले. अशा आणखी 11 व्यक्तींच्या देखील टेस्ट करण्यात आल्या. या 46 पैकी दोघांचे नमुने पॉझिटीव्ह आलेत.
वडाळा बीपीटीमधील चारजण कोरोना बाधित आढळले; वडील पॅरलिसीस झाल्यामुळे रुग्णालयात दाखल होते. त्याचा बाजूच्या बेडवर कोरोना बाधित रुग्ण होता. त्यांच्यामुळे वडिलांना कोरोना झाला. मुलगा दररोज वडिलांना रुग्णालयात डबा द्यायला जायचा. आता मुलगा, आई आणि बहीण ह्यांनापण कोरोना झाल्याचे समजते.
औरंगाबादेत दोन जणांना करोनाची लागण. औरंगाबादच्या मिनी घाटी रुग्णालयात उपचार सुरू. एक रुग्ण दिल्लीहून आलेला प्रवाशी तर दुसरा पुण्यातून. दोघांचीही प्रकृती स्थिर असल्याचा डॉक्टरांचा दावा. जिल्हाधिकारी उदय चौधरी यांची माहिती.
राज्यातले 1400 लोक मरकजला गेले होते...1300 लोक सापडलेत - राजेश टोपे
हिंगोलीमध्ये आज कोरोना पॉझिटिव्हचा पहिला रुग्ण आढळला आहे. रुग्ण हा पुरुष असून त्याचे वय 49 वर्ष आहे. या व्यक्तीला 31 मार्चला सकाळी दोन वाजता आयसोलेशन वार्डमध्ये भरती करण्यात आले होते. सदरील रुग्ण कोरोणा ग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कातील असल्यामुळे त्याला हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. या व्यक्तीचा आज अहवाल हा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.
अहमदनगरमध्ये आणखी सहा 6 रुग्ण कोरोनाबधित असल्याची माहिती समोर आली आहे. 51 रुग्णांचे अहवाल प्राप्त झाले असून सहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे नगरमध्ये कोरोनाबधितांची संख्या आता 14 झाली आहे.
सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वाढली , जवळपास 450 ट्रक कांद्याची आवक झाल्याची माहिती, भाजीपाला आणि कांद्याचा लिलाव वेळी गोंधळ होऊ नये म्हणून कांद्याचा लिलाव उशिरा होणार
पिंपरी : निजामुद्दीन मरकजला गेलेल्या पैकी दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. एकूण 23 रुग्णांवर उपचार सुरू आहे. यापैकी काल अकरा निगेटिव्ह आले होते, तर आज दोन पॉझिटिव्ह आढळले आहेत.
सोलापूर : सोलापूर मार्केट यार्डातील आडत आणि किरकोळ व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल, किरकोळ 29 विक्रेते आणि 6 आडत व्यापाऱ्यांवर गुन्हे दाखल, सोलापुरातील जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी दाखल केले गुन्हे, तर काल देखील 5 आडत व्यापाऱ्यावर गुन्हे दाखल
अमरावती : अमरावती जिल्ह्यामधून दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमधील कार्यक्रमातून 7 जण परतले होते. हा आकडा आता 23 वर पोहचला आहे. या सर्वांशी जिल्हा प्रशासनाचा संपर्क झाला असून तपासणी कार्य सुरू केले आहे.
मरकजहून औरंगाबादमध्ये परतलेल्या 20 जणांची तपासणी. 6 जणांचे स्वॅब घेतले. अद्याप रिपोर्ट आलेले नाही. आणखी 9 जणांचा शोध सुरू
धुळे : दिल्ली मरकज येथे धार्मिक कार्यक्रमात धुळ्यातील तीन जणांचा सहभाग, तिघांना तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.
बुलडाण्यात नवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडला आहे. यामुळे बुलडाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे. धक्कादायक म्हणजे कोरोनाची लागण झालेल्या या रुग्णाचं वय अवघं 10 वर्ष आहे. बुलडाण्यातील 8 पैकी सात जणांचा अहवाल निगेटिव्ह आला, परंतु मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.

लातूर शहरात लॉक डाऊन नंतर अचानकपणे मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्याची संख्या अचानकपणे वाढली. सकाळी 'मॉर्निंग वॉक' च्या नावाखाली अनेक लोक बाहेर पडण्याचा मार्ग शोधतात. यात अंबाजोगाई रोड,बार्शी रोड,औसा रोड आणि रिंग रोड भागातील नागरिकाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर आज सकाळी पोलिसांनी धडक मोहीम राबवत या लोकांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सकाळ पासून जो माणूस रस्त्यावर आला त्यास ठाण्यात आणण्यात येत आहे.
सोलापूर : निजामुद्दीन येथे गेलेल्या 17 आणि त्यांच्या संपर्कात असलेल्यासह इतर सर्व संशयितांचा अहवाल निगेटिव्ह, सोलापुरातील लॅबमध्ये झालेल्या 32 जणांची चाचणीचा अहवाल निगेटिव्ह, सोलापूरकरांना मोठा दिलासा

पार्श्वभूमी

मुंबई : निजामुद्दीनसारखे प्रकरण राज्यात खपवून घेणार नाही. कोणत्याही जाती धर्माचे सण, उत्सव, मेळावे होणार नाही याची खबरदारी घ्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगानं वाढत असताना दिल्लीतल्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या 'मरकज' कार्यक्रमातून अनेकांना संसर्ग झाल्याची घटना समोर आली आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना उपाययोजनांचा आढावा मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्यावेळी मरकजमधील सहभागी व्यक्तींनी तातडीने पुढे येऊन आपल्या तपासणीसाठी सहकार्य करावे असे आवाहनही केले.

या घटनेनंतर निजामुद्दीनमधील धार्मिक कार्यक्रम 'मरकज' बंद करण्यात आला आहे. कार्यक्रम बंद केल्यानंतर या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आली असून परिसर सील करण्यात आला आहे. काल रात्री उशीरापर्यंत हा परिसर रिकामा करण्याचं काम सुरु होतं. आता या ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. हे ठिकाण दिल्लीतल्या कोरोना प्रादुर्भावाचं सगळ्यात मोठं केंद्र बनलाय आणि महाराष्ट्रातील विविध भागातील अनेकजण या कार्यक्रमाला उपस्थित असल्याचं समोर येतंय. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

तबलिगी जमातच्या लोकांनी माफी मागावी; काँग्रेस नेते हुसेन दलवाई यांची मागणी

बाजारांमध्ये गर्दी दिसता कामा नये
मुख्यमंत्री म्हणाले की, कोणत्याही परिस्थितीत गर्दी दिसली नाही पाहिजे यासाठी जे जे तुमच्या अधिकारांत आहे ते करा. आपण नागरिकांच्या सुविधेसाठी 24 तास दुकाने उघडी ठेवली आहेत. मात्र, काही ठिकाणी लोक त्याचा गैरफायदा घेत आहेत, असे दिसते. भाजीबाजारांमध्ये सुद्धा सुसूत्रता आणणे आवश्यक आहे. तिथे शिस्त लावा. अनेक ठिकाणी चिंचोळ्या गल्ल्या आहेत ,त्यामुळे देखील गर्दी वाढते. एकतर तेथील बाजाराला दुसरीकडे मोकळ्या जागेवर हलवा किंवा वेळा ठरवून द्या.

दिल्लीतील निजामुद्दीन कोरोनासाठी हॉटस्पॉट घोषित, 'मरकज' चा संपूर्ण परिसर सील

मरकज म्हणजे काय?
दिल्लीतील निजामुद्दीन येथे जे 'मरकज' (उर्दू शब्द) सुरु होतं त्याला तब्लिक जमातीत 'संस्थान' असं म्हणतात. प्रत्येक शहरात तब्लिक जमातीच्या मशिदी असतात. त्या मशिदींपैकी एक मुख्य मशीद ही मरकज असते अर्थात त्याला संस्थान म्हणतात. (उदा- पिंपरी चिंचवड शहरात एकूण 80 तब्लिक जमातीच्या मशिदी आहेत, त्यांची एका मुख्य मशिदीमध्ये सर्वांना माहिती जमा करावी लागते. कोण-कुठं-कधी आणि किती दिवस बाहेरच्या शहरात-राज्यात जमातीसाठी जातात, अशी माहिती तिथं द्यावी लागते) देशातील या सर्व मरकजची शिखर संस्था ही दिल्लीतील निजामुद्दीन येथे आहे. इथे परदेशात जमातीला गेलेल्या आणि तिथून परतलेल्या प्रत्येक मुस्लिम तब्लिकी बांधवांना माहिती द्यावी लागते. परदेशातून निजामुद्दीन मरकजमध्ये रिपोर्ट केल्यानंतर तिथून प्रत्येकाला विविध राज्यातील शहरात प्रबोधनासाठी पाठवले जाते. पण कोरोनामुळं प्रत्येकाला आपापल्या गावी पाठवण्यात आलं. मरकजमध्ये देशव्यापी कॉन्फरन्सही होत असतात. या जमातीला जाण्याचा कार्यकाळ हा 3 दिवस ते 4 महिन्यांइतका असतो, या जमातीमध्ये प्रबोधन केले जाते. (ही माहिती पिंपरी चिंचवडमधील मुस्लिम समाजातील अभ्यासू व्यक्तीकडून घेतलेली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.