Coronavirus in Maharashtra Live Updates | राज्यात आज 2127 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 37136 वर

Coronavirus in Maharashtra Live : राज्यात सोमवारी (18 मे) 2033 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मुंबई 1185 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 749 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 8 हजार 437 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. काल 51 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 249 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 35 हजार 058 झाला आहे. पैकी 25 हजार 392 रुग्णांवर सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 May 2020 07:10 AM
पुणे महापालिकेचा कोणताही कर्मचारी किंवा अधिकारी कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्युमुखी पडल्यास त्याच्या कुटुंबियांना सुरक्षा कवच म्हणून एक कोटी रुपये देण्याचा निर्णय, त्याचबरोबर महापालिकेच्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या वेतनातून एक टक्के रक्कम कापण्यात येणार नाही, अंशदायी वैद्यकीय सेवेच्या नावाखाली सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनातून ही रक्कम कापली जाते, पण आता ही रक्कम महापालिका भरणार
मंत्रालयातील अजून एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे.

एका विभागाचे प्रधान सचिव असलेले IAS अधिकारी कोरोनाबाधित
असून याआधी पण एक अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती.
मुंबई : मंत्रालयातील आणखी एक उच्च पदस्थ अधिकाऱ्याला कोरोनाचा प्रादुर्भाव, एका विभागाचे प्रधान सचिव असलेले IAS अधिकारी कोरोनाबाधित, याआधी पण एक अधिकारी झाले होते कोरोनाबाधित
राज्यात आज 2127 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची नोंद, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 37136 वर, 26 164 रुग्णांवर उपचार सुरु, आज एका दिवसात 76 कोरोनाबाधितांचा मृत्यू
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 193 कोरोना रुग्णांची नोंद तर 10 कोरोनाबाधीतांचा मृत्यू, पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4370
रेल्वे मंत्र्यांची मोठी घोषणा, 1 जूनपासून 200 नॉन एसी ट्रेन चालू होणार, ऑनलाईन बुकिंग लवकरच सुरू होणार, वेळापत्रकानुसार ट्रेन चालवल्या जाणार, श्रमिक स्पेशल ट्रेनशिवाय या अतिरिक्त ट्रेन संपूर्ण भारतात चालू केल्या जाणार, रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती
सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 21 जणांची भर, तर एका 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू,
सोलापुरतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 456 वर तर आतापर्यंत 30 जणांचा कोरोनामुळे मृत्यू


भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत कार्यरत असलेल्या180 कर्मचाऱ्यांना मनपा आयुक्तांचा दणका. कोरोनाच्या भीतीपोटी विविध कारण सांगून हे कर्मचारी लॉकडाऊनपासून सतत गैरहजर आहेत. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांना आता नोटीस बजावली आहे. चोवीस तासात कर्मचारी हजर झाले नाही तर त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले आहे.
लॉकडाऊन मध्ये जमावबंदी आदेश असताना रस्त्यावर दुचाकी लावत तलवारीने केक कापनाऱ्या अतिउत्साही युवकाला जालना जिल्ह्यातील बदनापूर पोलिसांनी अटक केलय ,त्याच्या सोबत त्याच्यासह 20 जणांवर पोलिसांनी आपत्कालीन कायद्या अंतर्गत आणि अवैध शस्त्र बाळगल्या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय, पोलिसांनी आरोपी कडील एक तलवार आणि दुचाकी देखील जप्त केलीय दरम्यान कोरोनाच्या गँभीर पार्श्वभूमीवर लॉकडाऊन काळात हे उद्योग केल्याने या युवकाला ऐन वाढदिवसाच्या दिवशी जेल ची हवा खावी लागलीय,


ग्रीन झोनमध्ये असलेल्या गोंदिया जिल्ह्यात तब्बल 38 दिवसानंतर 24 तासात 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने एकच खळबळ उडाली असून जिल्ह्यातील कोरोना रुग्णाची संख्या 3 वर गेली आहे. आज जिल्ह्यात आमगांव व मोरगांव अर्जुनी तालुक्यात प्रत्येकी एक एक रुग्ण आढळले आहेत.
पालघर जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 404 वर पोहचला असून पैकी 17 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आज दिवसभरात 15 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर समाधानकारक म्हणजे आत्ता पर्यंत 219 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे
. यामध्ये वसई विरार महानगरपालिका क्षेत्रात रुग्णांची वाढ झपाट्याने होत आहे.

तर बोईसरमधील त्या कोरोना बाधित 35 वर्षीय महिलेचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून तिच्या संपर्कातील पाच नातेवाईकांचेही अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कोल्हपुरात दिवसभरात 39 कोरोना पॉझिटिव्ह, कालपासून कोल्हापुरात कोरोनाग्रस्त रुग्णांची मोठ्या वाढ, कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 122 वर
मुंबई उच्च न्यायालय तूर्तास मर्यादित स्वरुपातच कार्यरत राहणार, कोर्टाचं नियमित कामकाज सुरू करण्याची ज्येष्ठ वकिलांची मागणी मुख्य न्यायमूर्तींनी नाकारली, हायकोर्टात पार पडलेल्या बैठकीत काही वकिल संघटनांचा मागणीला विरोध
औरंगाबाद : लासुर रोड खोजेवाडी फाट्याजवळ प्रवाशी टेम्पोला अपघात, 17 प्रवाशी जखमी, जखमींवर घाटी रुग्णलयात उपचार सुरू
बीड - कन्टेन्मेंट भागात प्रवेश केल्याच्या कारणामुळे भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून त्यांना बीडच्या एलसीबीने चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे.
राज्य राखीव दलाचे 67 जवान कोरोना मुक्त झाले आहेत. मालेगावहून कर्तव्य बजावून आलेल्या 74 जवानांना कोरोनाची लागण झाली होती. त्यापैकी 67 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
औरंगाबादमध्ये 21 तारखेपासून रोज सकाळी सात ते दुपारी एक वाजेपर्यंत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरु ठेवता येणार. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग बंधनकारक. मेडिकल आणि दवाखाने दिवसभर खुली राहणार. मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांचा निर्णय
पालघर जिल्ह्याची कोरोना बाधितांची संख्या 390 वर पोहोचली असून त्यापैकी 16 जणांचा मृत्यू झाला आहे तर समाधानाची बाब म्हणजे 195 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
वांद्रे रेल्वे स्थानक परिसरात आज सकाळी 9 वाजता मजुरांची मोठी गर्दी झाली होती. आपल्या गावी जाण्यासाठी परप्रांतिय मजुरांची रेल्वेसाठी गर्दी जमा झाली होती. पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर ही बाजारपेठ पुढील 5 दिवस बंद असणार आहे. सोमवार अर्थात 18 मे ते 22 मे पर्यंत राजापूर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय राजापूर तालुका व्यापारी संघाने घेतला आहे. शासनाने मुंबई व पुण्यातील चाकरमान्यांना कोकणात येण्यास परवानगी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात चाकरमानी राजापूर तालुक्यात दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रशासनाची देखील धावपळ उडाली आहे. मोठ्या संख्येने तालुक्यात दाखल होणाऱ्या चाकरमान्यांना संस्थात्मक विलिनीकरण करण्याची सुविधा नसल्याने अखेर प्रशासनाने त्याना होम क्वॉरंटाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. काही चाकरमान्यांचा बाजारपेठेत वावर वाढू लागला आहे. त्यांचा वावर पाहता नुकतीच उघडू पाहणारी बाजारपेठ कोरोनाच्या संक्रमणाला आमंत्रण ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यामुळे व्यापारी संघाने 18 मे पासून शुक्रवार 22 मे पर्यंत राजापूर बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मेडिकल वगळता संपूर्ण बाजारपेठ पुढील पाच दिवस बंद ठेवण्यात येणार असून सकाळच्या दोन तीन तासाच्या वेळात फक्त दुध विक्री सुरू ठेवण्यात येणार आहे.
वर्धा : आज आणखी एका रुग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 7 वर पोहोचली आहे. नवा रुग्ण उत्तरप्रदेशच्या गोरखपूरचा असल्याची माहिती मिळत आहे. सध्या वर्ध्यात 6 रुग्ण अॅक्टिव्ह असून जिल्ह्यातील 4 पैकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तीन रुग्ण इतर जिल्ह्यांतील आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रमजानच्या पवित्र महिन्यात गोरगरीब लोकांना मुस्लिम वेल्फेर सोसायटीच्या वतीने धान्य वाटप करण्यात आले. यामध्ये तांदूळ, पीठ, साखर, सर्व कडधान्य, तेल, बटाटे कांदे, सरबत, साहित्य गरजूंना मोफत दिले गेले. जवळपास 300 लोकपर्यंत ही मदत पोहोचवली गेली. कोरोनाच्या काळात अनेकांचे हाल होत आहेत.काम बंद असल्यामुळे रोज पोट पाण्याचा प्रश्न निर्माण होतोय. त्यामुळे अशा प्रकारे मदत केली गेल्याचे यावेळी मुस्लिम वेल्फेर सोसायटीने सांगितलं.
बेळगाव : लॉकडाऊनमुळे बंद असलेली जिल्ह्यातील बस सेवा मंगळवारपासून सुरू करण्यात आली. सोशल डिस्टंन्सिंग प्रवाशांनी पाळणे बंधनकारक असून बस स्थानकावर चौकोन आखण्यात आलेले आहेत. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांना मास्क, सॅनिटायझर देण्यात आले आहेत. सगळ्या बसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. एका बसमधून तीस प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. बस स्थानकावर येण्यासाठी आणि जाण्यासाठी एकच प्रवेशद्वार ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात एकूण 252 बस धावणार आहेत. प्रवाशांची थर्मल तपासणी करूनच त्यांना प्रवेश देण्यात येत होता.पोलीस बंदोबस्त देखील बस स्थानकावर ठेवण्यात आला आहे.
गडचिरोली : आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार 34 प्रलंबित अहवालांमधून 22 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने दिलासा मिळाला आहे. उर्वरित 12 जणांचे अहवाल प्रलंबित असल्याची माहिती जिल्हा आरोग्य विभागाने दिली आहे.
वाशिम : ग्रीन झोनमध्ये वाशिममध्ये मुंबई वरून वाशिम मालेगाव इथं आलेल्या कोरोना बाधित महिलेच्या संपर्कात असलेल्या 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. आज 5 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत.
एक व्यक्ती मालाडहून बारामतीत आला होती. ती कोरोना पॉझिटिव्ह पोहोचल्याने बारामती तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या बारावर पोहचली आहे. तालुक्यातील वडगाव निंबाळकर गावात हा रुग्ण आढळला आहे. तो मालाडवरुन गावी आला होता. ही व्यक्ती आपल्या बारामतीत राहणाऱ्या मुलीला भेटण्यासाठी आली होती. एक दिवस या रुग्णाने बारामतीतील वडगाव निंबाळकर या गावात मुक्काम केल्याचीही माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ. खोमणे यांनी दिली आहे. आतापर्यंत बारामती तालुक्यात सहा रुग्ण बरे झाले असून आता चौघांवर उपचार सुरू आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात एकूण 1328 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामध्ये 136 अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मागील 24 तासात 55 कोरोना पॉझिटिव्ह पोलीस आढळले आहेत. कोरोनामुळे महाराष्ट्रात 12 पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 324 पोलीस बरे होऊन घरी परतले आहेत. तर 992 पोलिसावर उपचार सुरु आहे.
भाजपचं शिष्टमंडळ आज सकाळी 11 वाजता राज्यपालांची भेट घेणार आहे. देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आशिष शेलार, विनोद तावडे, मंगलप्रभात लोढा यांचा समावेश आहे. कोरोना संदर्भातील उपाययोजना करण्यात सरकारला येत असलेल्या अपयशाबाबत राज्यपालांना निवेदन देणार आहेत.
सोलापूरमध्ये आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात आणखी आठ कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण संख्या 443 वर पोहोचली आहे. सोलापुरात आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसंदर्भात मुंबई महापालिकेने नवा नियम जारी केला आहे. आता एखाद्या इमारतीमध्ये कोरोनाबाधित रुग्ण सापडला तर पूर्ण इमारत सील करण्याऐवजी तेवढा मजलाच सील केला जाणार आहे.
औरंगाबादमध्ये एका 65 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामुळे औरंगाबादमधील मृतांचा आकडा 35 वर पोहोचला आहे.
सातारा जिल्ह्यात आज आठ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आहेत आहेत. हे रुग्ण कराड, खंडाळा आणि खटावा इथले आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अमोद गडीकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 146 वर पोहोचला आहे. त्यापैकी 73 जण उपचार घेऊन घरी गेले आहेत. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईमध्ये लॉकडाऊन 4.0 सुरु झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जरी पोलिसांची नाकाबंदी असली तरी अनेक वाहने रस्त्यावर आलेली दिसत आहे.
मुंबईमध्ये लॉकडाऊन 4.0 सुरु झाल्यानंतर आज दुसऱ्या दिवशी वेस्टर्न एक्स्प्रेस हायवे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी जरी पोलिसांची नाकाबंदी असली तरी अनेक वाहने रस्त्यावर आलेली दिसत आहे.
स्थलांतरित मजुरांच्या तिकीटाचा 85 टक्के भाग तर मोदी सरकारने दिला नाहीच पण 50 रुपयांचा (कोरोना) अधिभार लावला. कोरोनाच्या आधी तिकीट स्वस्त होती, असा आरोप काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी केला आहे. यासाठी त्यांनी रेल्वेच्या एका पत्राचा आधार दिला आहे.
पुण्यात रात्रभरात 52 नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 4229 वर पोहोचली. पुण्यात आतापर्यंत 211 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यातील 2069 कोरोनाबाधित रुग्णांचे रिपोर्ट आयसोलेशन पीरियडनंतर निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
मालेगावमध्ये नव्याने 24 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. मालेगावातील एकूण कोरोनाच्या रुग्णांची संख्या 643 आहे. तर नाशिक जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 824 वर पोहोचली आहे. तर एकूण 591 कोरोना मुक्त झाले आहेत.
परभणी जिल्ह्यात सलग 3 दिवसात 3 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. पुण्याहून आलेल्या 20 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाली असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसंच तो राहत असलेला साखला प्लॉट परिसरात प्रशासनाने सील केला आहे. याशिवाय तरुणाच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु आहे. आता परभणी जिल्ह्यातील रुग्ण संख्या 6 वर पोहोचली आहे.
औरंगाबादमध्ये रात्रीतून पुन्हा 51 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 17 महिला व 34 पुरुषांचा समावेश आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 1073 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 330 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
पालघरमधून दिलासादायक माहिती समोर आली आहे. वाडा तालुक्यात 15 मे रोजी आढळलेल्या तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील 16 पैकी 14 संशयितांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहे. वाड्याचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांनी ही माहिती दिली आहे.
नांदेड : सोलापूर येथून बिहारमध्ये प्रवाशी घेऊन जाणाऱ्या खाजगी बसला अपघात, लोहा तालुक्यातील मालाकोली शिवारात बस उलटून अपघात, रेस्क्यू ऑपरेशन सुरू, पोलीस घटनास्थळी दाखल
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. पन्हाळा, हातकणंगले, शाहूवाडी, करवीर तालुक्यातीलं प्रत्येकी एक तर कोल्हापूर शहरातील एकाला कोरोनाची लागण. जिल्ह्याची आकडेवारी पोहोचली 73 वर.
सोलापुरातील 28 खासगी नर्सिंग होम आणि हॉस्पिटलला आरोग्य विभागाची नोटीस. लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णालय दोन दिवसात सुरू करून खुलासा सादर करण्याचा सूचना. मुदतीत खुलासा सादर न केल्यास नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद गृहीत धरून कारवाई करण्यात येणार. लॉकडाऊनच्या कालावधीत नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या येत होत्या तक्रारी. नागरिकांच्या तक्रारीनंतर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र शुश्रुषागृह अधिनियम 1949 अंर्तगत नियमांचा भंग केल्याचा ठपका.

सोलापुरातील 28 खासगी नर्सिंग होम आणि हॉस्पिटलला आरोग्य विभागाची नोटीस, लॉकडाऊनच्या कालावधीत नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद असल्याच्या येत होत्या तक्रारी, लॉकडाऊनच्या कालावधीत रुग्णालय दोन दिवसात सुरू करून खुलासा सादर करण्याच्या सूचना, मुदतीत खुलासा सादर न केल्यास नर्सिंग होम/हॉस्पिटल बंद गृहीत धरून कारवाई करण्यात येणार, नागरिकांच्या तक्रारीनंतर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, साथरोग नियंत्रण अधिनियम 1897 व महाराष्ट्र शुश्रुषागृह अधिनियम 1949 अंर्तगत नियमांचा भंग केल्याचा ठपका
राज्यात आज दिवसभरात 2033 कोरोनाचे रुग्ण वाढले, एकट्या मुंबईत 1185 रुग्णांची भर, सलग दुसऱ्या दिवशी दोन हजारहून अधिक रुग्ण, राज्यातील एकूण आकडा 35,058 वर, तर आज 51 जणांचा मृत्यू
घरी जाण्यासाठी कोणीही घाई करू नका : मुख्यमंत्री
पावसाळ्यापूर्वी कोरोनाला संपवायचं आहे : मुख्यमंत्री
राज्यात 40 हजार एकर जमीन नव्या उद्योगांसाठी राखीव ठेवत आहोत. नव्या उद्योजकांना महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यासाठी आवाहन: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
परप्रांतीय त्यांच्या राज्यात परतल्याने भूमिपुत्रांना संधी आहे. मराठी तरुणांनी याचा लाभ घ्या : मुख्यमंत्री
नाशिक जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णसंख्या 800 वर. यापैकी 591 कोरोनामुक्त झालेत. आतापर्यंत 42 जणांचा मृत्यू झाला असून सध्या 167 रुगणांवर सध्या उपचार सुरु आहेत.
रेड झोनमध्ये शिथिलता आणणे सध्या परवडणारे नाही : मुख्यमंत्री
अहमदनगर : संगमनेर तालुक्यातील धंदारफळ येथील 7 जण कोरोनामुक्त, जिल्ह्यात आतापर्यंत 63 पैकी 49 रुग्ण कोरोनामुक्त, 10 रुग्णांवर उपचार सुरु, 4 जणांचा मृत्यू
बीड जिल्ह्यामध्ये आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याच कुटुंबातील अन्य सहा जणांनी पुढील उपचार पुण्यात मिळावे, अशी मागणी केली. त्यामुळे त्या कुटुंबातील सहा जणांना सगळी प्रक्रिया पूर्ण करून उपचारासाठी पुण्याला पाठवण्यात आले आहे.
“अ” आणि “ब” वर्गातील अधिकाऱ्यांचा दोन दिवसांचा पगार तर “क” आणि “ड” गटातील कर्मचारी एका दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार. अधिकारी संघानं पुढाकार घेऊन शासनाला कोरोनासाठी मदत करण्यासाठी केली होती विनंती. या सरकारी कर्मचाऱ्यांच्या या निधीमुळे 300 कोटींपेक्षा जास्त रक्कम सहाय्यता निधीत जमा होणार असल्याची “कुलथे” यांनी माहिती दिली.
नंदुरबार जिल्हा कोरोनामुक्त, कोरोनाबाधित दोन रुग्णांना डिस्चार्ज, नंदुरबारमध्ये आतापर्यंत 21 रुग्ण आढळले, त्यापैकी 19 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला तर दोघांचा मुत्यू
पुण्याच्या ग्रामीण भागातही 1408 बेड्सचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागात कोरोनाचा धोका बळावत आहे. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद आधीच सज्ज झाली आहे. यासाठी चाकण येथील म्हाडाच्या इमारती ताब्यात घेत, तिथे सुसज्ज कोविड सेंटर उभारलं आहे.
गडचिरोली : जिल्ह्यात अजून दोन जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
गडचिरोली जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 5 वर पोहोचली आहे. नव्याने आढळल्या दोन रुग्णांना कुरखेडा येथे संस्थात्मक क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले होते. यापूर्वी सापडलेल्या दोन रुग्णांबरोबर नव्याने सापडलेल्या रुग्णांनी प्रवास केल्याचं आरोग्य विभागाने कळवलं आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात ही 1408 बेड्सचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा धोका बळावतोय. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदं आधीच सज्ज झाली आहे. यासाठी चाकण येथील म्हाडाच्या इमारती ताब्यात घेऊन तिथं सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
पुण्याच्या ग्रामीण भागात ही 1408 बेड्सचं कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. वाढत्या स्थलांतरामुळे ग्रामीण भागाला कोरोनाचा धोका बळावतोय. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषदं आधीच सज्ज झाली आहे. यासाठी चाकण येथील म्हाडाच्या इमारती ताब्यात घेऊन तिथं सुसज्ज कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे.
राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केरळच्या आरोग्यमंत्री के.शैलजा यांच्याशी चर्चा केली. केरळ राज्याला कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. केरळमध्ये केलेल्या उपाययोजना, राबवलेला लॉकडाऊन याबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
नालासोपारा पूर्वेला मुंबईच्या बेस्ट बसमधून पोलिसांनी दारुच्या 327 बाटल्या जप्त केल्या आहेत. नालासोपारा पूर्वेकडील तुळींज पोलिसांनी रात्री आठच्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी बसचालकाच्या केबिनमध्ये, बसच्या शेवटच्या सीटखाली आणि बसच्या डिक्कीत दारु सापडली आहे. त्याची किंमत 12 लाख 30 हजार 550 एवढी आहे. मुंबई परिसरात सध्या दारु विक्रीला मनाई आहे. त्यामुळे मुंबईतील काही टोळी आपल्या माणसांकरवी वसई विरार परिसरातील दुकानातून दारु विकत घेवून मुंबईत विकत असल्याची माहिती समोर आली आहे.
सिंधुदुर्ग

जिल्ह्यात एकूण 8 रूग्णांपैकी 4 जण पूर्णपणे बरे झाले आहेत, तर 4 जणांना जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 92 वर पोहोचला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात सद्यस्थितीत जिल्ह्यात 15 जण कोरोनामुक्त झाले असून 74 जणांवर उपचार सुरु आहेत, तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे.
पंढरपूर मध्ये आजपासून ABCD प्रमाणे दुकाने होणार सुरू होणार आहे.

सकाळी 9 ते दुपारी 3 पर्यंत दुकाने सुरू राहणार आहे. Aआणि Cची दुकाने एक दिवस तर B आणि Dची दुकाने एक दिवस उघडणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 8 रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी 4 जण पूर्णपणे बरे झाले तर 4 जणांवर जिल्हा रुग्णालयात अलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांची संख्या 279 वर पोहोचली आहे. भडगाव, जळगाव, चोपडा, भुसावळ, अमळनेर, धरणगाव, जामनेर येथील स्वॅब घेतलेल्या 48 कोरोना संशयित व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहे. यापैकी 35 तपासणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
अकोल्यात आणखी 4 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे रूग्णांची संख्या 261 वर पोहोचली आहे. तर, मृतांचा आकडा 18 वर पोहोचला आहे. आतापर्यंत रोगमुक्त झालेल्या 117 रूग्णांना रूग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नंदुरबार जिल्ह्यात एकूण 21 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर आतापर्यंत 2 रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला असून 2 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
जालना जिल्ह्यात एकूण 35 कोरोना रुग्ण आहेत, रविवारी दहा नव्या रुग्णांची भर पडली. 35 कोरोना रुगणांपैकी 7 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील उद्योगधंदे उद्या सुरू होणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 55 दिवस या कंपन्या ठप्प होत्या. शहरात 11 हजार लघुउद्योग कंपन्या आहेत, त्यापैकी 5 हजार कंपन्यांना परवानगी मिळालेली आहे. उद्या पर्यंत यात आणखी वाढ होणार आहे. कंटेन्मेंट झोन मधील काही कंपन्यांना मात्र मुभा देण्यात आलेली नाही. 33 टक्के कर्मचाऱ्यांच्या जीवावर या कंपन्या कामाला सुरुवात करत आहेत. बिघडलेली आर्थिक घडी सुधरवण्यासाठी सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.
बारामती तालुक्यातील मुर्टी गावात कोरोना बाधित रुग्ण आढळला.
मुंबईहून आपल्या राहत्या घरी आलेल्या व्यक्तीला कोरोना झाला. मुर्टी गावाची सीमा प्रशासनाकडून सील करण्यात आल्याची
माहिती प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिला. बारामतीत कोरोना बाधितांची संख्या 11 गेली असून यातील दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
सहा जण बरे होऊन घरी परतले तर सध्या तिघांवर उपचार सुरू आहे.
दोन दिवसांपूर्वी नागपूर शहर पोलीस दलातील दोन आणि एसआरपीएफचा एक असे तीन पोलिस कर्मचारी पॉझिटिव्ह आले होते.

तेव्हापासून आतापर्यंत त्यांच्या संपर्कातील 62 पोलिस कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आहे.
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या निवासस्थानी केंद्रीय मंत्र्यांची दुपारी 12 वाजता बैठक होणार आहे. आर्थिक सुधारणा धोरणांवर चर्चा करण्यासाठी ही बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीला आज गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारमण, रेल्वेमंत्री पियुष गोयल, वस्त्रोद्योग मंत्री स्मृती इराणी उपस्थित राहणार आहेत.
वर्ध्यातील जामखुटा तालुका आर्वी येथील तीन व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या तीन व्यक्ती 11 मे रोजी नवी मुंबईवरून आल्या होत्या.
त्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. तिघांनाही रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वर्ध्यात कोरोनाबाधितांचा आकडा पाचवर गेला आहे. एका महिलेचा मृत्यूनंतरचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर वाशीम येथील एकावर उपचार सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 55 वर गेला आहे.

आज सकाळी आलेल्या अहवालात नवीन पाच रुग्ण कोरोनाबाधित आढळले.

आजरा 2 आणि भुदरगड तालुक्यातील 2 रुग्णांचा समावेश

तर सीपीआर रुग्णालयातील एकाचा समावेश आहे.
साताऱ्यात आज पाच रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह
आले आहे. संबंधित रुग्ण कराड आणि सातारा तालूक्यातील आहे.
सातारा जिल्ह्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा 138 वर गेला आहे.

आज पर्यंत 66 रूग्णांना उपचार करून घरी सोडले
तर उपचार घेताना आजपर्यंत दोघांचा मृत्यू झाला आहे.
राज्यातील शेवटच्या ग्रीन झोन गडचिरोली जिल्ह्यातही कोरोनाचे तीन रुग्ण आढळले. या रुग्णांना वेगवेगळ्या दोन ठिकाणी क्वारंटाईन करण्यात आले होते. कुरखेडा येथील क्वारंटाईन केंद्रातील दोन तर चामोर्शी येथील एका व्यक्तीचा समावेश आहे. तीनही रुग्ण मुंबई येथे छोट्या उद्योगात कामगार म्हणून होते कार्यरत होते. पलायन करून गावी पोहचल्यावर यंत्रणेने त्यांना क्वारंटाईन केले होते. 16 मे ला त्यांचे स्वॅब घेतले होते. रात्री उशिरा या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. कुरखेडा-चामोर्शी शहरात प्रतिबंधित क्षेत्राचे नियम लागू होण्याची शक्यता आहे. जिल्हाधिकारी सिंगला यांनी सर्वच तहसीलदारांना बाहेरुन आलेल्या व्यक्तींबाबत विशेष काळजी घेण्याचे निर्देश दिले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. जिल्ह्यात दाखल झालेल्या नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मूळचे नगर जिल्ह्यातील हे कुटुंब मुंबईमध्ये वास्तव्यास होते. या एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाच्या लागण झाली होती. त्यातील 65 वर्षीय महिलेचा आज पहाटे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
बीड जिल्ह्यात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाला. जिल्ह्यात दाखल झालेल्या नऊ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. मूळचे नगर जिल्ह्यातील हे कुटुंब मुंबईमध्ये वास्तव्यास होते. या एकाच कुटुंबातील सात जणांना कोरोनाच्या लागण झाली होती. त्यातील 65 वर्षीय महिलेचा आज पहाटे जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
मालेगाव बंदोबस्तादरम्यान कोरोनाबाधित झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा दुसरा अहवालही निगेटिव्ह आल्याने, त्याला आज सामान्य रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. या पोलीस कर्मचाऱ्याचे मनोधैर्य वाढवण्यासाठी पोलीस अधीक्षकांसह पोलीस दलातील सारेच बडे अधिकारी त्याच्या स्वागतासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल होते. यावेळी त्याला पुष्पहार घालत त्याच्यावर पुष्पवर्षाव करुन त्याचे स्वागत करण्यात आले. विशेष म्हणजे त्याच्या घरी पोलीस दलाने त्याचे वाजतगाजत स्वागत करत त्याला प्रोत्साहित केलं. यावेळी नंदुरबार पोलीस दलाच्या बँड पथकाच्या देशभक्ती पर गीतावर त्याचे घरी स्वागत करण्यात आले. त्याच्या स्वागतासाठी परिसरातील नागरिकांनी देखील टाळ्या वाजवत त्याचे जोरदार स्वागत केले. पोलीस स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकरक्षणाचे काम करत आहे. त्यामुळे नागरिकांनी घरात राहून त्यांना सहकार्य करावे. अत्यंत महत्त्वाच्या कामाखेरीज घराबाहेर पडू नये असे आवाहन यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी केले. तर कोरोनामुक्त झालेल्या पोलीस कर्मचाऱ्यावर उपचार करणाऱ्या सर्व डॉक्टर्स, नर्सचे आभार मानले.
आज दिवसभरात नाशिक जिल्ह्यात 13 नव्या कोरोना रुग्णांची भर. यात मालेगाव 8, नाशिक ग्रामीण 5 असा समावेश आहे. तर, आज मालेगावात 6 मृत्यूची नोंद झाली. काही दिवसांपूर्वी मृत पावलेल्या 3 महिला आणि 3 पुरुषांचे अहवाल पॉझिटीव्ह आलेत. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्ताची संख्या 797 वर गेलीय.
सोलापुरात कोरोना बधितांची संख्या वाढत असताना डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण देखील चांगले आहे. आज सोलापुरातील अवघ्या 22 दिवसाच्या एका चिमुकलीने कोरोनवर मात केली आहे. 26 एप्रिल रोजी या मुलीचा सोलापुरातील शासकीय रुग्णालयात जन्म झाला होता.
नाशिक जिल्ह्यात आज 13 नव्या रुग्णांची भर, मालेगाव 8, नाशिक ग्रामीण 5 रुग्ण आढळले, आज मालेगावात 6 मृत्यूची नोंद, काही दिवसांपूर्वी मृत पावलेल्या 3 महिला आणि 3 पुरुषांचे अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यातिल कोरोनाग्रस्ताची संख्या 797, मालेगावातील रुग्णसंख्या 618 वर, जिल्ह्यात एकूण 42 मृत्यू तर 548 जण बरे झाले
औरंगाबादेत दिवसभरात 61 नवे कोरोनाबाधीत रुग्ण, औरंगाबादेत कोरोनाबाधितांची संख्या 962 वर, 31 रुग्णांचा मृत्यू तर 321 रुग्ण कोरोनामुक्त
सोलापुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत आज दिवसभरात 21 जणांची भर, तर दोघांचा मृत्यू

सोलापुरतील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 385 वर तर आतापर्यंत 26 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

आज दिवसभरात 8 जणांनी कोरोनावर केली मात, आतापर्यंत 108 रुग्ण कोरोनातुन मुक्त, उर्वरित 201 रुग्णांवर उपचार सुरू
वरळी गांधीनगर येथील लोखंडवाला काॅम्प्लेक्सच्या खालील दुकानाला आग
औरंगाबादमध्ये गेल्या 24 तासात 4 कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू. औरंगाबाद कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 31 वर.
पंढरपूरहून 21 मे रोजी रांची, झारखंडसाठी विशेष रेल्वे, 1323 लोकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे रवाना होणार, 16 तारखेला सोलापूर प्रशासनाने रेल्वेसाठी प्रस्ताव दिला होता
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोना बाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या 4 वर्षाच्या मोठ्या भावास 14 दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पॉझिटीव्ह होते. ते संभाजीनगर, चिंचवडचे रहिवाशी आहेत.
गडचिरोलीच्या भामरागडमध्ये नक्षली-पोलिसांमध्ये चकमक, पोलीस उपनिरीक्षकासह 2 जण शहीद तर 4 जण गंभीर जखमी
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील कसर येथे लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करत एका जोडप्याचा विवाह पार पडला. यावेळी नवदाम्पत्यांनी लग्नाला होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
परभणीच्या जिंतुर तालुक्यातील कसर येथे लॉकडाऊनमध्ये सोशल डिस्टनसिंगचे तंतोतंत पालन करत एका जोडप्याचा विवाह पार पडला. यावेळी नवदाम्पत्यांनी लग्नाला होणारा खर्च हा मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देऊन वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
महाराष्ट्रात लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवला, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता राज्य सरकारचा निर्णय, 31 मे च्या रात्रीपर्यंत लॉकडाऊन लागू
उदगीर उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका 65 वर्षीय पुरुष रुग्णाचा आज दुपारी 12 वाजून 45 मिनिटांनी मृत्यू झालेला आहे. या रुग्णास हायपरटेन्शन व मधुमेह हे आजार होते, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर संजय ढगे यांनी दिली आहे .

जिल्ह्यात एकूण रुग्ण 49
बाधित रुग्ण असून 18 जणांवर उपचार सुरु आहे. तर 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

अतिदुर्गम भामरागड तालुक्यात 2 वेगवेगळ्या जागी नक्षल-पोलीस यांच्यात चकमक झाली. कोठी- कोपशीं आणि होडरी येथील जंगलात चकमक झाली आहे. एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक जवान असे दोघे जण शहीद झाल्याची माहिती आहे. कोंबिंग ऑपरेशन, कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर भामरागड येथे तैनात करण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी झाले आहे. गडचिरोली C-60 दलाच्या त्वरित कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे आणि पोलीस जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले. राजू पुसाली, गोंगलु ओकसा आणि दासरू कुरसामी हे जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अतिदुर्गम भामरागड तालुक्यात 2 वेगवेगळ्या जागी नक्षल-पोलीस यांच्यात चकमक झाली. कोठी- कोपशीं आणि होडरी येथील जंगलात चकमक झाली आहे. एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक जवान असे दोघे जण शहीद झाल्याची माहिती आहे. कोंबिंग ऑपरेशन, कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर भामरागड येथे तैनात करण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी झाले आहे. गडचिरोली C-60 दलाच्या त्वरित कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे आणि पोलीस जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले. राजू पुसाली, गोंगलु ओकसा आणि दासरू कुरसामी हे जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अतिदुर्गम भामरागड तालुक्यात 2 वेगवेगळ्या जागी नक्षल-पोलीस यांच्यात चकमक झाली. कोठी- कोपशीं आणि होडरी येथील जंगलात चकमक झाली आहे. एक पोलिस उपनिरीक्षक आणि एक जवान असे दोघे जण शहीद झाल्याची माहिती आहे. कोंबिंग ऑपरेशन, कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी हेलिकॉप्टर भामरागड येथे तैनात करण्यात आले आहे.पोलिस अधीक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी झाले आहे. गडचिरोली C-60 दलाच्या त्वरित कृती दलाचे पोलीस उपनिरीक्षक धनाजी होनमाणे आणि पोलीस जवान किशोर आत्राम यांना वीरमरण आले. राजू पुसाली, गोंगलु ओकसा आणि दासरू कुरसामी हे जवान गंभीर जखमी झाले आहेत.
मुंबई आणि ठाण्यातून महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या तीन बसेस दीडशेपेक्षा जास्त लोकांना घेऊन महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर पोहोचल्या आणि दीडशे लोकांना सोडून दोन बस परत निघाल्या. आपल्याला वेगळ्याच बॉर्डरवर सोडत आहे हे लक्षात आल्यानंतर तेलंगणातील नागरिकांनी दोन पैकी एक बस अडवून ठेवलेली आहे आणि आता लोकांपुढे प्रश्न आहे तेलंगणामध्ये जायचं कसं? ही बस सध्या उमरगा जवळ आहे. दीडशे लोक आपली मुलं आणि बायकांसह अडकून पडले आहेत. एकूण तीन बस मधून या प्रवाशांना तीन राज्याच्या सीमेवर सोडले होते. सर्व प्रवाशी तेलंगणाचे आहेत. जिथे सोडले तिथून 40 किमी अंतरावर तेलंगणाची सीमा आहे. कर्नाटकच्या सीमेवर सोडल्याचे लक्षात येताच प्रवाशांसाठी एक बस अडवून ठेवली आहे. प्रवाश्यांमध्ये लहान मुले, गरोदर महिला आहेत. एक मुलगा कर्नाटकातील बेळगावचा आहे. त्याचा ह्या सीमेशी कांहीही संबंध नाही. त्यालाही इकडे सोडले असल्याची माहिती आहे.
राज्यात अडकलेले मजूर, विद्यार्थी, पर्य़टक इत्यादी परराज्यातील नागरिकांना घेऊन श्रमिक विशेष रेल्वे धावत आहेत. सोलापुर जिल्ह्यातील आणि आसपासच्या परिसरात ग्वाल्हेर येथील नागरिकांना घेऊन आज विशेष रेल्वे धावणार आहे. सोलापुर रेल्वे स्थानकातून दुपारी 2 वाजता ही रेल्वे सुटणार आहे. त्यासाठी प्रशासन, रेल्वे विभाग, पोलिस यंत्रणामार्फत उत्तम अशी व्यवस्था करण्यात आली आहे. जवळपास 1314 नागरिकांना घेऊन सोलापुरातून ग्वाल्हेरसाठी ही रेल्वे रवाना होईल. प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांची वैद्यकीय चाचणी आधीच करण्यात आली होती.
खासगी डीटीएच ऑपरेटरचीही ऑनलाईन वर्गासाठी मदत घेतली. मनरेगासाठी अतिरिक्त 40 हजार कोटींची तरतूद :अर्थमंत्री

जे जे रुग्णालयाच्या परिसरात 500 बेडचं रुग्णालय तयार करणार, कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकार आणि पालिकेचा निर्णय,

एनएससीआय आणि नेस्कोप्रमाणे जेजे रुग्णालयाच्या परिसरात कोरोनाबाधितांसाठी व्यवस्था,

500 बेड्स पैकी 100 आयसीयू बेड्स उपलब्ध असणार
नांदेडमधील काही दुकाने उद्यापासून सुरू होणार आहे. अॉटोमोबाईल्स कॉम्पुटर /इलेक्ट्रॉनिक्स/इलेक्ट्रीकल्स टायर्स, बॅटरी, मोबाइल शॉप, वॉच स्टोअर्स, स्टेशनरी / बुक स्टोअर्स (पुस्तकालय), सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, बिल्डींग मटेरीयल याच दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. किराणा दुकान रविवार वगळता अन्य दिवशी सकाळी 7 ते दुपारी 2 या वेळेत सुरू राहणार. एका वेळी पाच पेक्षा अधिक ग्राहकांना दुकानात परवानगी नाही. नियमाचे उल्लंघन केल्यास पाच हजाराचा दंड
आकरण्यात येणार आहे. कापड, रेडिमेड, चप्पल, बूट, मिठाई दुकाने, फर्निचर दुकाने बंदच राहणार आहेत.
उज्ज्वला योजनेअंतर्गत लोकांना मोफत गॅस सिलेंडर दिले गेले, तर घरी परतणाऱ्या मजुरांना रेल्वेत जेवणाची सोयही करण्यात आली : अर्थमंत्री निर्मला सितारमण
जनधन खात्यात 10 हजार 225 कोटी जमा तर 16 हजार 394 कोटी थेट गरजूंच्या खात्यात जमा : अर्थमंत्री
गरीबांना जेवण दिलं जात आहे. तसंच कॅम्पमध्ये राहणाऱ्या लोकांनाही मदत केली जात आहे. गरीबांना आर्थिक मदत दिली जात आहे : अर्थमंत्री निर्मला सीतारमण
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची पत्रकार परिषद लाईव्ह, सलग पाचव्या दिवशी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांची पत्रकार परिषद
हिंगोली - हिंगोलीपासून जवळच असलेल्या कलगाव फाट्यावर एका भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिली. यामध्ये एकजण जागीच ठार झाला असून गाडीवर पाठीमागे बसलेले दोघे जण गंभीर जखमी झालेत. शिवशंकर पुरी असं मयत झालेल्या व्यक्तीच नाव आहे. या अपघातानंतर ट्रक चालकाने ट्रक जागेवर सोडून पळ काढला. मयत हा हिंगोली तालुक्यातील भिरडा गावचा रहिवाशी आहे. हिंगोलीहुन गावाकडे जाताना ही घटना आज सकाळी 8 वाजताच्या सुमारास हिंगोली -वाशीम रोडवर घडली.
कोरोनाच्या संकटात भारताला चक्रीवादळचा धोका, भारताच्या पूर्व किनारपट्टीवर चक्रीवादळाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. पश्चिम बंगालच्या खाडीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतात ‘अम्फान’ नावाचे चक्रीवादळ धडकणार आहे. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे.
वानखडे स्टेडियमकडे कोविड रुग्ण ठेवण्याला विरोध, मरीन ड्राईव्ह सिटीझन असोसिएशनने मुख्य सचिव अजोय मेहता आणि मुंबई महापालिका आयुक्त यांना लिहिले पत्र



वानखडे स्टेडियम आसपास लोक राहतात,अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना धोका होऊ शकतो असं पत्रात म्हटलंय
कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा कोरोनाचे 4 रुग्ण, मुंबईहून आलेल्या तिघांचा तर सोलापुरातून आलेल्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह, कोल्हापूर रुग्णाची संख्या 40 वर जाऊन पोहोचली

सिंधुदुर्गच्या

जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांची पोलीस आयुक्त व राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परतण्यासाठी पास देऊ नयेत

, अशी विनंती केली आहे. जिल्ह्याच्या विलगीकरण कक्षाचीही क्षमता संपली आहे.

आरोग्याच्या सुविधा मर्यादित असूनही चाकरमानी मोठ्या संख्येने गावी परतल्याने प्रशासन हतबल

झाले आहे. दिवसाला 60 स्वॅबची तपासणी मर्यादित असतानाही जिल्ह्यात आतापर्यंत 12800 चाकरमानी दाखल

झाले आहे. कंटेन्मेट झोन, रेड झोन मधून चाकरमान्याना गावी परण्यासाठी पास देऊ नये अशी विनंती सिंधुदुर्ग जिल्हाधिकारीनी पोलीस आयुक्त तसेच इतर जिल्हाधिकारी यांना केली.
नागपूर : लॉकडाऊनच्या काळात विविध संस्थांच्या माध्यमातून वाटल्या जाणाऱ्या जेवणाच्या पाकिटावरुन वाद होऊन एकाची हत्या तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.

नागपूरच्या लकडगंज पोलीस स्टेशन मधील मेहता पेट्रोल पंप जवळची आज पहाटे ची घटना.

मेहता पेट्रोल पंप जवळ काल रात्री काही लोकांनी रस्त्यावरील भिक्षेकरी आणि मजुरांना जेवणाचे पेकेट्स वाटले होते.

त्यात एका सिक्युरिटी गार्डला दिलेल्या पेकेटमध्ये सर्व अन्न ( पुरी ) नसल्याने त्याने सहकारी मजुरांकडे सांगितले होते.

2 सहकारी मजुरांनी त्यांची टिंगल उडवत त्याला भिकारी असे संबोधून आपल्या पेकेट मधून अन्न काढून दिले.

तेव्हा ही तिघांमध्ये वाद झाला. त्यानंतर सर्व जण तिथेच फुटपाथवर झोपी गेले.

पहाटे 3 वाजता आरोपी सिक्युरिटी गार्डने लोखंडी रॉड ने त्याला भिकारी संबोधणाऱ्या इतर दोन मजुरांच्या डोक्यावर वार करून एकाची हत्या केली.या घटनेनंतर आरोपी सिक्युरिटी गार्ड ने स्वतः पोलीस स्टेशन मध्ये येऊन स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले..
सोलापूर : दिल्लीतून 68 प्रवाशी आज सोलापूरला येणार आहेत. विशेष रेल्वेने हे प्रवाशी पुण्यात येतील. त्यानंतर त्यांना सोलापूरला आणण्यात येणार आहे.

सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील कोरोनाची लागण झालेल्या 13 कर्मचाऱ्यांपैकी 9 कर्मचारी आता उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. आता 4 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी सांगितले आहे. काल रात्री यातील 3 कर्मचाऱ्यांना सोलापूर सिव्हिल रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी सोलापूरचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील, सिव्हिल सर्जन व इतर अधिकारी उपस्थित होते.

सांगोल्यात मुंबई येथून 3 लक्झरी बसभरुन प्रवासी आले आहेत. मात्र यातील 127 जण बेकायदेशीर पासेस शिवाय आल्याने सांगोला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये निमलष्करी जवानांचं एक दल आलं आहे. 120 जवानांचं हे पथक आहे. त्यांची 20 वाहन आहेत. त्यांना अजून तैनात करण्यात आलं नाही. त्यांचं पंथसंचलन काही भागात आज सकाळी करण्यात आलं
कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनचा परिणाम गाव पातळीवर असलेल्या अगदी छोट्या - छोट्या व्यवसायावर झाला आहे. बांगड्याची विक्री करून आपली उपजिवीका भागविणारा कासार व्यवसाय देखील कोरोनाच्या कचाट्यात सापडला आहे. बांगड्यांचा सीझन हा लग्नसराईत असतो. परंतु लग्नसराईतच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि या व्यवसायाला टाळे लागलं. विक्री अभावी स्टॉक करून ठेवलेल्या बांगड्या विक्री अभावी सध्या धूळ खात पडून आहेत.
अमरावतीत आणखी दोन जणांचा अहवाल आला पॉझिटिव्ह आला आहे. SRPF कॅम्पमधील दोन जवानांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

अमरावतीने कोरोनाचा शंभरचा आकडा पार केला असून कोरोनाबाधितांचा आकडा 103 वर गेला आहे. अमरावतीत 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 62 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोलापूरात पुन्हा 14 रुग्णांची वाढ, काल संध्याकाळनंतर आज सकाळी आलेल्या अहवालात या रुग्णांची भर,

काल पर्यंत एकूण बधितांची संख्या 364 इतकी होती,

आता ती 378 वर पोहोचली आहे,

मागील 24 तासांत आलेल्या अहवालात मृत्यूची नोंद नाही
औरंगाबादमध्ये रात्रीतून 58 नवे कोरोना पॉझिटिव्ह, औरंगाबाद कोरोना बाधितांचा आकडा 959 वर, आतापर्यंत 255 कोरोनामुक्त, 12 तासात 3 रुग्णांचा मृत्यू, कोरोनामुळे एकूण मृतांची संख्या 29 वर
औरंगाबाद शहाबाजार येथे पोलिसांच्या गाडीवर दगडफेक, शहरात लॉकडाऊन असताना शहाबाजार येथे लोक जमा असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस पोहोचले होते. घरी जाण्याचं आवाहन करत असताना 3 लोकांनी पोलिसांच्या गाडीवर दगडफेक केली. सिटीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कालच्या संध्याकाळची घटना
औरंगाबाद : कच्चीघाटी गावातील लोकांनी शहरातील सफाई कामगारांस मारहाण, 'तुझ्यामुळे गावात कोरोना होईल' म्हणत मारहाण केल्याचा आरोप, चिकलठाणा पोलिसात गुन्हा दाखल
तब्बल 24 दिवसांनंतर बीड जिल्ह्यात दोघांना कोरोनाची लागण, गेवराई तालुक्यातील ईटकूर येथील एक कुटुंब मुंबईतील हॉटस्पॉट भागातून आले होते, यापैकी तिघांचे निगेटिव्ह, तर १२ वर्षी मुलगी पॉझिटिव्ह आढळली, तर माजलगाव तालुक्यातील हिवरा येथील 29 वर्षीय व्यक्ती पत्नीसह मुंबईहून आला होता. त्या दोघांचेही स्वॅब घेण्यात आले. त्यात पत्नीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला, तर पतीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.
लातूर शहर आणि परिसरात पावसाला सुरुवात, जोरदार वारा, विजेच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात
हिंगोलीच्या काही भागात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाला सुरुवात, मुसळधार पावसाची दाट शक्यता
अमरावतीत आज आणखी दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह, अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 100 पार
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 228 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची वाढ. तर, जिल्ह्यात आज दिवसभरात 11 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 197 झाला आहे. कोरोना बाधित रुग्णांची एकुण संख्या 3795 इतकी झाली.
औरंगाबाद कोरोनामुळे आणखी एक मृत्यू. औरंगाबाद कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाची संख्या 26 वर.

राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला 500 पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी, कोरोनाचे आज 1606 नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण 30 हजार 706

पालघर जिल्ह्यात आज नवीन 18 कोरोना रुग्ण वाढले, पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 346 वर पोहोचली असून त्यापैकी 16 जणांचा मृत्यू, दिलासादायक म्हणजे आत्तापर्यंत 184 रुग्ण बरे झाले
राज्यात सलग तिसऱ्यांदा दिवसाला 500 पेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी. कोरोनाचे आज 1606 नवीन रुग्ण; राज्यात एकूण रुग्ण 30 हजार 706
UPSC च्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल ट्रेन थोड्याच वेळात निघणार. चौदाशे विद्यार्थ्यांना घेऊन दिल्लीतून ही ट्रेन निघते आहे. महाराष्ट्र सरकार या विद्यार्थ्यांचा सर्व खर्च उचलत आहे. भुसावळ, कल्याण, नाशिक ते तीन स्टॉप घेत दिल्ली ते पुणे असा प्रवास करणार आहे. खासदार सुप्रिया सुळे, खासदार श्रीकांत शिंदे यांनी यांनी स्पेशल ट्रेनसाठी पुढाकार घेतला. 50 दिवसांपासून विद्यार्थी दिल्लीत अडकले होते. 30 मे रोजी पूर्व परीक्षा होणार होती. आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे. त्यामुळे बरेचसे विद्यार्थी दिल्लीत होते. मात्र, आता ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
भंडारा शहरात आढळले 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. पुणे येथून भंडारा येथे आलेल्या पती-पत्नीला कोरोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न
नवी मुंबई : सोमवारपासून एपीएमसी मधील तीन मार्केट सुरू होणार. यात भाजी, मसाला आणि धान्य मार्केट सुरू होणार आहे. तर, फळ आणि कांदा बटाटा मार्केट गुरूवारपासून सुरू होणार. कोकण आयुक्त, एपीएमसी सचिव, माथाडी कामगार नेते, व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत निर्णय. कोरोना व्हायरसचा मोठा संसर्ग एपीएमसीमुळे पसरू लागल्याने काटेकोर नियमांचे पालन करण्याची सक्ती.
मुंबईतील सर्वात मोठे प्रदर्शन केंद्र असणाऱ्या गोरेगाव येथील नेस्को मैदानावर उभ्या राहत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या 2600 खाटांच्या कोरोना काळजी केंद्र 2 ची राज्याचे वस्त्रोद्योग, मत्स्यव्यवसाय, बंदरे तथा मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख व मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी पाहणी केली.
ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसेनानी व संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातील अग्रणी दिनू रणदिवे यांच्या पत्नी सविता रणदिवे यांचे शनिवारी दुपारी दादर येथील राहत्या घरी निधन झाले. त्या 89 वर्षांच्या होत्या. घरात पाय घसरून पडल्याने त्यांच्या डोक्याला जखम झाली होती. रक्तस्राव होऊन त्यात त्यांचे निधन झाले.
औरंगाबाद जिल्ह्यात 900 कोरोनाबाधित. शहरात आज दुपारी 28 कोरोनाबाधितांची वाढ झाली. दिवसभरात 58 कोरोना बाधीतांची वाढ. तर, 25 रुग्णाचा मृत्यू.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज आठ क्षेत्रासाठी मदतीची घोषणा करणार. गुंतवणूक वाढवणं, रोजगार निर्माण करायचे आहेत. आपल्याला कठीण परिस्थितीचा सामना करायचा आहे. आत्मनिर्भर पॅकेजमध्ये भारताला सक्षम बनवायचं आहे : अर्थमंत्री
लॉकडाऊनच्या काळात बंद पडलेली नोटांची छपाई पुन्हा सुरू होणार, करन्सी नोट प्रेस आणि इंडिया सिक्युरिटी प्रेसच्या प्रत्यक्ष कामाला सोमवार पासून सुरुवात होणार, नाशिकच्या प्रेस मध्ये 10 ते 500 रुपयांच्या नोटांची छपाई केली जाते

, 20 ते 30 टक्के कामगारांच्या सहाय्याने प्राध्यान्य क्रमानुसार काम सुरू होणार

, इंडिया सिक्युरिटी प्रेसमध्ये पासपोर्ट, इलेक्शन कार्ड, ही काम प्राधान्याने सुरू होणार , करन्सी, प्रेस मधील देखभाल दुरुस्तीला सुरुवात, मात्र प्रत्यक्ष छापाई सोमवार पासून होणार
, इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही प्रेस दीड महिन्यापासून बंद होत्या,नोटा छापाईचे उद्दिष्टे आधीच पूर्ण केल्यानं लॉकडाऊन काळात अर्थव्यवस्थेवर कुठलाही ताण पडला नसल्याचं मजदूर संघाचे स्पष्टीकरण
उत्तर प्रदेशमधील औरैयामधून गावी परतणाऱ्या मजुरांच्या ट्रकला भीषण अपघात होऊन 23 मजुरांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता दुसरा एक भीषण अपघात मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात घडला आहे.  मध्यप्रदेशमधील सागर जिल्हा मुख्यालयापासून 70 किलोमीटर अंतरावर सागर-कानपूर राष्ट्रीय महामार्गावर मजुरांना घेऊन चाललेला एक ट्रक पलटी होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत पाच मजुरांचा मृत्यू झाला तर 19 मजूर जखमी झाले आहेत.  महाराष्ट्रातून उत्तरप्रदेशात मजुरांना घेऊन हा ट्रक निघाला होता. 
चेंबूर पोलिस स्टेशन येथून आज ओरिसासाठी एक ट्रॅव्हल्स सकाळी रवाना झाली. एकूण 30 प्रवाशांना घेऊन ही बस ओरिसातील बद्रक जिल्ह्यात जाणार आहे. यासाठी चेंबूर पोलिसांकडून विशेष प्रयत्न करण्यात आले. यावेळी स्थानिक सुनील मंडा आणि पोलीस प्रशासनाकडून प्रवाशांना पूर्णपणे सॅनिटाईझ करून तसेच त्यांना जेवणाची पाकिटे आणि पाण्याच्या बाटल्या देऊन पाठवण्यात आलं आहे. याआधी देखील एक ट्रॅव्हल्स बद्रक जिल्ह्यात चेंबूर पोलिस स्टेशन येथून रवाना झाली होती. आत्तापर्यंत एकूण 60 प्रवाशांना बसच्या माध्यमातून ओरिसाला पाठवण्यात आले असल्याची माहिती चेंबूर पोलिस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जयप्रकाश भोसले यांनी दिली आहे.
पुण्याजवळच्या बालेवाडी क्रिडा संकुलात कोविड केअर सेंटर उभारण्यात आलं आहे. पुणे महापालिका आणि पिंपरी चिंचवड माहापालिकेकडून हे कोविड केअर सेंटर उभारण्यात येणार होतं. क्रिडा संकुलातील बॅडमिंटन हाॅलमध्ये पुणे पालिकेतर्फे कोविड केअर सेंटर उभारण्याचं काम जवळपास पुर्ण झालं आहे. पुणे पालिकेतर्फे क्रिडा संकुलात 1500 खाटांचं कोविड आयसोलेशन आणि हाॅस्पिटल उभारण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं.
अंतिम वर्षाची परिक्षा कशी घ्यायची याची रुपरेषा ठरवण्यासाठी विविध समित्या नेमल्या आहेत. त्यांचा अहवाल येणं सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण परिक्षा ही ऑनलाईन न होता, लेखी स्वरुपात घ्यायची हे ठरवण्यात आलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या एक्सेसचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे परिक्षा ही पारंपारिक पद्धतीने लेखी स्वरुपात घ्यावी असं तुर्तास ठरलं आहे. सोशल डिस्टंन्सिंगचं पालन करुन परिक्षा होईल. तसंच प्रश्नपत्रिका ही नेहमीप्रमाणे विद्यापीठच सेट करेल असा विचार सुरु आहे. प्रश्नपत्रिका किती मार्कांची असावी यावर विचार सुरु आहे. परिक्षा ही नेहमी महाविद्यालयंच कंडक्ट करतात. सगळ्या समित्यांचे अहवाल आले की त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती सावित्रीबाई पुणे फुले विद्यापीठाचे परिक्षा संचालक डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी दिली आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा कशी घ्यायची याची रुपरेषा ठरवण्यासाठी विविध समित्या नेमल्या आहेत. त्यांचा अहवाल येणं सुरु आहे. त्यामुळे यासंदर्भात अजून अंतिम निर्णय झालेला नाही. पण परिक्षा ही आॅनलाईन न होता लेखी स्वरुपात घ्यायची हे ठरवण्यात आलं आहे. अनेक विद्यार्थ्यांना इंटरनेटच्या एक्सेसचा प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे परिक्षा ही पारंपारिक पद्धतीने लेखी स्वरुपात घ्यावी असं तुर्तास ठरलं आहे. सोशल डिस्टंसिंगचं पालन करुन परिक्षा होईल. तसंच प्रश्नपत्रिका ही नेहमीप्रमाणे विद्यापीठच सेट करेल असा विचार सुरु आहे. प्रश्नपत्रिका किती मार्कांची असावी यावर विचार सुरु आहे. परिक्षा ही नेहमी महाविद्यालयंच कंडक्ट करतात. सगळ्या समित्यांचे अहवाल आले की त्याप्रमाणे निर्णय घेण्यात येईल, असं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा संचालक डाॅ अरविंद शाळिग्राम यांनी सांगितलं आहे.
अंबरनाथ पश्चिमेच्या शास्त्रीनगर भागात टोळक्याने तलवारी घेऊन धुडगूस घातल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. याप्रकरणात अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी आठ जणांना अटक केली होती. या आरोपींची पोलिसांनी बुधवारी शास्त्रीनगर आणि हाऊसिंग बोर्ड परिसरात उठाबशा काढायला लावत धिंड काढली. मात्र गुरुवारी त्याच आरोपींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले. यावेळी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते. या प्रकारामुळे आता अनेक पोलीस आणि स्थानिकांना कोरोनाची लागण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी केलेल्या या आत्मघातकी प्रकारावर शहरातून प्रचंड टीका होतेय. गुन्हेगारीला लगाम घालणं गरजेचं असलं, तरी आरोपींची कोरोना चाचणी केलेली असताना अहवाल येण्यापूर्वी असं कृत्य करणं शहराला आता घातक ठरण्याची चिन्हं आहेत.
नांदेड : कोरोनाचे नव्याने 18 रुग्ण आढळले, आता एकूण रुग्णसंख्या पोहोचली 84 वर पोहोचली आहे. आज आढळलेल्या 18 पैकी 13 जण प्रवासी आहेत. चार रुग्ण करबला आणि एक रुग्ण कुंभार गल्लीतील आहे. सर्व रुग्णांवर उपचार सुरु असून आजवर पाच जणांचा झालाय मृत्यू झाला आहे.
बेस्ट उपक्रमातील कोरोनाची लागण झालेल्या कर्मचाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आणखी 10 जणांना संसर्ग झाला.

त्यामुळे बेस्ट उपक्रमातील बाधितांची संख्या 108 झाली आहे. बेस्टच्या 60 कर्मचाऱ्यांवर उपचार सुरू असून आतापर्यंत 43 कर्मचाऱ्यांनी करोनावर मात केली आहे. सहा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
जालना जिल्ह्यात कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या वाढली आहे. 12 तासांत 7 रुग्णांची भर पडली असून मालेगाव बंदोबस्तावरून आलेले राज्य राखीव दलाचे 4 जवान, एक खाजगी डॉक्टर आणि एक कर्मचारी तसेच मंठा तालुक्यातील एका महिलेचा समावेश या रुग्णांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात आता कोरोनाचे एकूण 25 रुग्ण आहेत, तर आजवर 7 जणं कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
कोरोनाच्या लढाईत पोलीस, आरोग्यसेवक योध्याची भूमिका बजावत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी आहे. तिथेच उभं राहण्याच आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत येवल्यातील काही कार्यकर्त्यांनी आपल्या शेतातील घराबाहेर येत, हातात अवजार घेऊन मी योध्दा शेतकरी म्हणत प्रतिसाद दिला आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ, एकाच वेळी कोरोनाचे 7 रुग्ण आढळले,

कोल्हापूर जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 36 वर पोहचली,

पुणे-मुंबई कडून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात धोका वाढला
पुण्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे.त्या पार्श्वभूमीवर अनेक भाग पत्रे, बॅरिकेड लावून सील केलेत. नाना पेठेत केवळ 108 रुग्णवाहिका पोहचू न शकल्याने 57 वर्षीय व्यक्तीला प्राण गमवावे लागल्याची घटना  काल पहाटे घडली.येशूदास मोती फ्रान्सिस असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. फ्रान्सिस यांना पोटाचा आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होता. शुक्रवारी मध्यरात्री बारा-साडेबाराच्या सुमारास त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना त्यांच्या घरच्यांनी तातडीने घराबाहेर आणून खुर्चीवर बसवले. 108 नंबरवर ॲम्बुलन्ससाठी फोन केले. मात्र दोन तास होऊन गेले तरीसुद्धा ॲम्बुलन्स आली नाही. आणि त्या ठिकाणी खुर्चीवर  फ्रान्सिस यांचा मृत्यू झाला.
पुणे : पुण्यात कोरोनाचे रुग्ण कमी होण्याचे नाव नाही. रात्रभरात 62 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद. पुण्यातील रुग्णांची संख्या 3629 वर पोहोचली आहे. एकूण 186 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाल्याची माहिती
शनिवारी पहाटे रत्नागिरी शहरातील मिरकरवाडा येथे झोपड्यांना आग लागली. पहाटे तीनच्या दरम्यान ही आग लागली होती. या आगीत बोटीचं साहित्य ठेवण्यासाठी असलेल्या दोन झोपड्या आणि टेम्पो खाक झाला. दरम्यान, आगीचं नेमकं कारण मात्र समजू शकलेले नाही. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवले असून आगीमुळे लाखोंचं नुकसान झाले आहे. शहरापासून जवळपास दोन ते तीन किमी अंतरावर मिरकरवाडा आहे. याठिकणी मोठ्या प्रमाणात माशांची कोट्यवधी रूपयांची उलाढाल देखील होते. शिवाय, बोटी देखील येथेच नांगर टाकून बंदरात उभ्या केलेल्या असतात.
औरंगाबाद 23 नव्या रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 865वर .
एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1)
मालेगाव येथील रहवाशी महिला कोरोना बाधित आढळून आली आहे. कामानिमित्त मुंबईला गेलेल्या महिलेला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आलं आहे. मुंबई येथे चाचणी केल्यानंतर काल रात्री मोबाईलवर अहवाल प्राप्त झाला असून महिला मुंबईवरून मालेगाव येथे परत येताच त्या बाधित महिला आणि तिच्या संपर्कातील इतर 6 जणांना क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. महिलेला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलं आहे.
औरंगाबाद :औरंगाबादमध्ये रात्रीतून 2 कोरोना बाधितांचा मृत्यू, जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत 25 रुग्णाचा मृत्यू, , कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 842 वर तर दोनशेपेक्षा अधिक रुग्ण बरे
कोरोनाच्या सावटामुळे यंदा एकीकडे राज्यातल्या गणेश मूर्तिकारांचं मोठं नुकसान झालेलं असताना गणेशमूर्तींची निर्यात करणाऱ्या निर्यातदारांनाही मोठा फटका बसलाय. कारण परदेशातील सर्व ऑर्डर्स कोरोनामुळे रद्द झाल्या आहेत.
तो आमदार कोरोनाला हरवून घरी परतला !
-
गेल्या काही दिवसांपासून कोविड १९ विरोधात लढणारे ठाण्यामधील दूसरे आमदार काल रात्री अखेर ठाण्यातील त्यांच्या घरी परतले आहेत. कोरोनावर यशस्वीपणे मात करत त्या आमदाराने आज घर वापसी केली आहे. मुंबई मधील खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते, अखेर शुक्रवारी उशिरा त्यांनी कोरोना वर मात करत घर वापसी झाली आहे. पुढील 14 दिवस ते आता घरीच असणार आहेत.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात सोमवारी (18 मे) 2033 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर मुंबई 1185 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे दिवसभरात 749 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत 8 हजार 437 जणांनी यशस्वीरित्या कोरोनाला हरवलं आहे. काल 51 कोरोना संक्रमित रुग्णांचा मृत्यू झाला. परिणामी कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1 हजार 249 इतकी झाली आहे. राज्यात कोरोना पॉझिटिव्ह असेलेल्या रुग्णांचा आकडा आता 35 हजार 058 झाला आहे. पैकी 25 हजार 392 रुग्णांवर सुरु असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.


राज्यात 51 करोना बाधितांच्या मृ्त्यूची आज नोंद झाली आहे. काल मुंबईमध्ये 23, नवी मुंबईमध्ये 8, पुण्यात 8, जळगावमध्ये 3, औरंगाबाद शहरात 2, अहमदनगर जिल्हात 2, नागपूर शहरात 2, भिवंडीत 1 तर पालघरमध्ये 1 मृत्यू झाला आहे. याशिवाय बिहार राज्यातील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईत झाला आहे.


मृत्यूंबाबतची अधिकची माहिती


काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 35 पुरुष तर 16 महिला आहेत. काल झालेल्या 51 मृत्यूंपैकी 60 वर्ष किंवा त्यावरील 21 जण आहेत. तर 19 जण हे वय वर्ष 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 11 जण 40 वर्षाखालील आहे. या 51 जणांपैकी 35 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब हृदयरोग असे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 1249 झाली आहे.


आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 82 हजार 194 नमुन्यांपैकी 2 लाख 47 हजार 103 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 35 हजार 58 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 3 लाख 66 हजार 242 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 18 हजार 678 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.