Coronavirus Maharashtra Live Updates | आषाढी वारीबाबतचा निर्णय 30 मे नंतर घेणार

Coronavirus in Maharashtra Live : राज्यात गुरुवारी (14 मे) कोरोनाच्या तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 27,524 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 25 जण मुंबई, 10 जण नवी मुंबई तर पुण्यातील 5, औरंगाबाद 2, पनवेल, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1019 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 512 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 May 2020 10:45 PM
ठाण्यात ऑनलाईन दारू विक्रीला जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी, आजपर्यंत संपूर्ण ठाणे जिल्हा, महानगरपालिका क्षेत्र, नगरपालिका आणि ठाणे ग्रामीणमध्ये दारूविक्री बंद होती
नाशिक जिल्ह्यात आज दिवसभरात 17 नवे पॉझिटिव्ह रुग्ण, एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 775 वर, मालेगावमध्ये 602, नाशिक ग्रामीण 98, नाशिक शहर 45 तर जिल्ह्याबाहेरील 30 रुग्ण, आतापर्यंत एकूण 33 जणांचा मृत्यू तर 534 रुग्ण कोरोनामु्क्त
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तहसील कार्यालयातील लिपिक यांनी तहसीलदारांना कारणे दाखवा नोटीसला दिलेले उत्तर सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. परिणामी लिपिक अरूणकुमार खैरे यांना जिल्हा प्रशासनाने तडकाफडकी निलंबित केले आहे. उमरखेडचे उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस यांनी केली उर्मट लिपिकावर कारवाही.
ऑनलाईन दारू विक्री आजपासून सुरू, 5434 लोकांनी नोंदणी केली, नागपूर आणि लातूरमध्ये सर्वाधिक नोंदणी
आज जाहीर झालेल्या आत्मनिर्भर कृषी पॅकेजमुळे निराश झालो. लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान लक्षात घेऊन हे पॅकेज जाहीर केले पाहिजे होते. कृषी कर्जाची पुनर्रचना, कृषी कर्जांवर स्थगिती आणि शेतकर्‍यांच्या व्याजदरावरील कपात यावर कोणताही शब्द नाही : शरद पवार
पालघर जिल्ह्यात एका दिवसात कोरोना संक्रमित 15 रुग्ण वाढले. तर एका मृत्यू झालाय. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 328 झाली आहे. पैकी 16 जणांचा मृत्यू झाला. तर समाधानाची बाब म्हणजे बाधितांपैकी 173 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
पुणे जिल्ह्यात काल रात्री 9 वाजेपासून आज दुपारी 4 वाजेपर्यंत 108 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, आज 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 185, पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 3534 वर
नवी मुंबईने पार केला 1000 कोरोना रूग्णांचा टप्पा. आज 74 रूग्णांची भर. एकूण कोरोना रूग्णांची संख्या 1048 वर. एपीएमसीमुळे कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण संख्येत 370 ची भर.
पुणे जिल्ह्यात काल रात्री 9 वाजेपासून आज दुपारी 4 वाजेपर्यंत 108 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, आज 4 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 185, पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या 3534 वर
LIVE Update | औरंगाबादमध्ये आणखी 4 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, आज दिवसभरात 91 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, औरंगाबाद कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 839 वर, आतापर्यंत 21 रुग्णांचा मृत्यू, तर 221 रुग्ण कोरोनामुक्त
पिंपरी चिंचवड शहरात आणखी 7 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. तर शहराबाहेरील तीन रुग्णांचा मृत्यू. आज शहरातील 3 तर शहराबाहेरील 4 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. आत्तापर्यंत शहरातील 186 रुग्णांना कोरोनाची लागण. आत्तापर्यंत शहराबाहेरील उपचारासाठी दाखल 27 रुग्णांना कोरोनाची लागण. आत्तापर्यंत शहरातील एकूण 116 रुग्ण कोरोनामुक्त. तर शहराबाहेरील एकूण 8 रुग्ण कोरोनामुक्त. आत्तापर्यंत शहरातील 4 कोरोना रुग्णांचा मृत्यू. तर शहराबाहेरील 8 कोरोना रुग्णांचा मृत्यू.
शेततळ्यात बुडून दोन भावांचा मृत्यू; माळशिरस तालुक्यातील उघडेवाडी येथील घटना.
आषाढी वारीबाबतचा निर्णय 30 मे नंतर घेणार. कोरोनाची एकूण परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येणार आहे. 30 मे नंतर उपमुख्यमंत्री अजित पवार, साताऱ्याचे पालकमंत्री आणि सोलापूरच्या पालकमंत्र्यांची पुण्यात एकत्रित बैठक होणार आहे. आज मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ औसेकर हे देखील बैठकीला उपस्थित होते. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात 29 रुग्ण कोरोना बाधित झाले होते. यात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. काही दिवसांपूर्वी अकरा रुग्ण बरे झाले. त्यानंतर चार आणि आज सहा रुग्ण बरे झाले आहेत. या 6 रुग्णांचे फुलाच्या वर्षावात स्वागत करून त्याना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यावेळी राज्यमंत्री आणि उदगिरचे आमदार संजय बनसोडे हे स्वतः हजर होते.
नांदेड जिल्ह्यात उद्या शनिवारपासून ऑनलाइन मद्यविक्रीस परवानगी देण्यात आली आहे. केवळ परवानाधारकास मद्य खरेदी करता येणार आहे. मद्य विक्रेत्यांना घरपोच द्यावी लागणार सेवा. ग्रामीण भागातील सर्व व शहरातील कंटेन्मेंट झोन वगळता अन्य मद्यविक्रेत्यांना परवानगी.
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण, अर्थमंत्री आज 20 लाख कोटीच्या पॅकेजच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा करणार आहेत.
16 मे रोजी सकाळी 9 वाजता शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी शेतात, जमेल तिथे उभे राहण्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांना आवाहन, हातात कृषी अवजारे घेऊन किंवा संघटनेचा झेंडा घेऊन उभे राहा, आरोग्य कर्मचाऱ्यांप्रमाणेच शेतकरीही योद्धा आहे, शेतकऱ्यांना अन्नदाता योद्धा म्हणण्याचे आवाहन, केंद्र सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांसाठी तुटपुंजी असल्याची टीका
सोलापूर : सोलापुरात आज सकाळी प्राप्त अहवालात 7 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, काल संध्याकाळी एकूण कोरोनाबधितांची 330 इतकी होती, आता ती 337 वर पोहोचली आहे.
उद्योगांना चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ तयार करा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चीनच्या मालावर बहिष्कार टाकत असताना, नव्या उद्योगांना आणि उद्योजकांना “महाराष्ट्रात हब” तयार करावा, सरनाईक यांचा प्रस्ताव
उद्योगांना चालना देण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय किंवा महामंडळ तयार करा, शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी, चीनच्या मालावर बहिष्कार टाकत असताना, नव्या उद्योगांना आणि उद्योजकांना “महाराष्ट्रात हब” तयार करावा, सरनाईक यांचा प्रस्ताव
लॉकडाऊनमुळे उत्पादक कंपन्या बंद आहेत. येत्या पावसाळ्यात आवश्यक असणाऱ्या छत्री-रेनकोटच्या कंपन्याही बंद आहेत. त्यामुळे यंदा बाजारात केवळ 30 टक्के छत्र्या उपलब्ध आहेत. छत्रीचा वापर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठीही मोठ्या प्रमाणावर होतोय. त्यामुळे छत्री उत्पादन करणाऱ्या व्यापारी संघटनेनं राज्य सरकारला येणाऱ्या पावसाळ्यासाठी तसंच सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात महत्वाच्या ठरणाऱ्या छत्री उत्पादनास सॅनिटायझर आणि मास्क प्रमाणेच अत्यावश्यक उत्पादन म्हणून मान्यता द्यावी अशी विनंती केलीय. शासनानंही या विनंतीला आता मान्यता दिलीय. आणि मान्सूनच्या धर्तीवर रेनकेट, छत्री तसंच प्लास्टिक शीट यांचा समावेश अत्यावश्यक वस्तुंमध्ये केला जाण्याबाबत निर्देश दिलेत.
तब्बल पन्नास दिवसानंतर पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक कंपन्या सुरू करण्याची अखेर परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लघुउद्योजक आता तयारीला लागलेत. शहरात अकरा हजार कंपन्या आहेत, त्यापैकी कंटेन्मेंट झोन मधील कंपन्या वगळण्यात आल्यात. याबाबतची नियमावली आज तयार केली जात आहे
तब्बल पन्नास दिवसानंतर पिंपरी चिंचवडमधील औद्योगिक कंपन्या सुरू करण्याची अखेर परवानगी मिळाली आहे. त्यानुसार लघुउद्योजक आता तयारीला लागलेत. शहरात अकरा हजार कंपन्या आहेत, त्यापैकी कंटेन्मेंट झोन मधील कंपन्या वगळण्यात आल्यात. याबाबतची नियमावली आज तयार केली जात आहे
शरद पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी बाळासाहेब स्मारकात पोहचले, कोविड परिस्थिती, लॉकडाऊन वाढवताना काय काय करावे, काय टाळता यावे यासाठी ही महत्वाची भेट
विजेचे दर वाढण्याची शक्यता कारण केंद्राचे पॅकेज हे 'मुंगेरीलाल के हसीन सपने!' व्याजावर पैसा देणार असं दिसतंय, असं ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी म्हटलंय. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते. तसेच सध्या अॅव्हरेज बिलिंगमुळे महाराष्ट्रात स्टाफचे पगार करणे कठीण झाले आहे, असंही ते म्हणाले.
- नितीन राऊत का झाले भावूक? (सविस्तर वृत्त लवकरच)
अकोल्यात कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळला आहे. अकोल्याची रूग्ण संख्या 208 वर पोहोचली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 28 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त झालेल्या एकूण रूग्णांची संख्या 100 वर पोहोचली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक वाजता शरद पवार यांना भेटणार, लॉकडाऊन वाढवण्याआधी केंद्राला राज्याकडून अहवाल देण्याचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये ठरले होते. त्याआधी ही भेट, कोविड परिस्थिती, लॉकडाऊन वाढवताना काय काय करावे, काय टाळता यावे यासाठी ही महत्वाची भेट 
पुण्यातील ससून रुग्णालय आणि बी. जे. मेडिकल कॉलेजची प्रशासकीय जबाबदारी आता जमाबंदी आयुक्त एस.चोकलिंगम यांच्याकडे सोपवण्यात आलीय.  राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने हा निर्णय घेतलाय. ससून रुग्णालयाचे  आधीचे अधिष्ठाता डॉक्टर अजय चंदनवाले यांची काही दिवसांपूर्वी बदली करण्यात आल्यानंतर ससूनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी पुण्याचे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांच्याकडे सोपविण्यात आली होती. म्हैसेकर यांच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील पाच जिल्ह्यांची मोठी जबाबदारी असताना त्यांच्यावर ससूनची अतिरिक्त जबाबदारी टाकण्यात आली होती.  आता ही जबाबदारी एस. चोकलिंगम यांच्याकडे सोपविण्यात आलीय.  चोकलिंगम यांनी देखील पुण्याचे विभागीय आयुक्त म्हणून कामं केलं आहे. 
पुणे : पुण्यात रात्रभरात 29 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 3455 वर तर सातारा जिल्हा कारागृहातील आणखी एका कैदी पॉझिटीव्ह, सातारा जिल्ह्यातील कोरोना पॉझिटीव्ह आकडा 125 वर
लासलगाव परिसरात कोरोना बाधीत 2 रुग्ण सापडल्याने गेल्या आठवडाभरापासून लासलगाव बाजार समिती मधील कांद्याचे लिलाव बंद होते, काल व्यापारी, बाजार समितीचे पदाधिकारी यांच्या बेठकीत निर्णय होऊन आज पासून पुन्हा बाजार समिती मधील कांदा लिलाव सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आज सकाळी लिलाव सुरू होताच कांद्याला सरासरी 600 ते 650 रुपये भाव मिळाला.तर कांदा लिलाव सकाळी साडे आठ ते दुपारी साडेबारा वाजे पर्यंत सुरू राहणार आहे.
मालेगावात सात नवे रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत. आताच हाती आलेल्या 101 अहवालापैकी 7 पॉजिटिव्ह तर 94 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. अहवालात पाच पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या घटत आहे तर निगेटिव्ह रुग्णसंख्या वाढल्याने मालेगावकरांना तूर्त दिलासा मिळालेला आहे. मालेगावातील एकूण रुग्णसंख्या 600 पार पोहोचली आहे.
नाशिक : सकाळी प्राप्त झालेल्या अहवालात नाशिक जिल्ह्यात 11 नवे पॉझिटिव्ह, मालेगावात 7 तर नाशिकच्या ग्रामीण भागातील चौघांना लागण, हॉटस्पॉट मालेगावातील रुग्णाचा आकडा आता 600 वर , नाशिक जिल्ह्यात एकूण 769 कोरोना बाधित
बीड : सहा वर्षाच्या चिमुरडीचा निर्दयी पित्याने केली हत्या. वडवणी पोलीस ठाण्यात एक सहा वर्षीय चिमुकली बेपत्ता असल्याची मिसिंग असल्याची तक्रार दाखल होती. नंतर या चिमुकलीचा मृतदेह नदीपात्रामध्ये आढळून आला. शवविच्छेदनाच्या अहवालामध्ये चिमुकलीचा गळा दाबून खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी वडवणी पोलीसात अज्ञाता विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी काही तासातच या प्रकरणाचा उलगडा केला. यामध्ये फिर्याद देणारा बापच मुलीचा खुनी निघाल्याचे समोर आले आहे.
अहमदनगर : नगरमध्ये आणखी एक कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. मुंबईतील घाटकोपर इथून आलेल्या महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. प्रवासात या महिलेला त्रास होऊ लागल्याने तिला नगरच्या शासकीय रुग्णालयात तपासणीसाठी थांबवलं आणि चाचणीतून कोरोना असल्याचं समोर आलं.
कोरोनाच्या महासंकटामुळे यंदा आषाढी होणार का? हा सर्वात मोठा प्रश्न सध्या वारकरी संप्रदाय व महाराष्ट्रातील जनतेसमोर असताना आज उपमुख्यमंत्री अजित पवार प्रशासन आणि पालखी सोहळ्याचे मानकरी यांची दुपारी 4 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्स वर बैठक घेणार आहेत .

औरंगाबादमध्ये रात्रीतून 74 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह, कोरोना बाधितांचा आकडा आठशे पार. जिल्ह्यात तब्बल 823 रुग्ण, आतापर्यंत 21 रुग्णांचा मृत्यू तर 229 रुग्णांची कोरोनावर मात
परभणी : जिंतुरच्या शेवडी इथे तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. हे तिघे जण मुंबईच्या आर्थर रोड कारागृहातील पोलीस कर्मचाऱ्याची पत्नी आणि मुलं आहेत. पाच दिवसांपूर्वी ते जिंतुरमध्ये दाखल झाले होते. शेवडी गाव कन्टेन्मेंट झोन घोषित करण्यात आला असून जिंतुर शहर आणि तीन किलोमीटर परिसरात संचारबंदी लागू केली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी परभणी जिल्हा कोरोनामुक्त
झाला होता.
मुंबईतून कॅन्सरवर उपचार घेऊन आलेल्या दोघांना कोरोना,

राधानगरी इथल्या 11 वर्षांच्या मुलीला आणि तिच्या वडिलांना कोरोना,

त्यांच्यासोबत आलेल्या दोघांचीही होणार तपासणी,

कोल्हापुरातील कोरोना रुग्णांचा आकडा 27 वर,
औरंगाबाद दिवसंदिवस कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. त्यामुळे औरंगाबादेत आजपासून ते 17 तारखेच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत अत्यावश्यक सेवा आणि वैद्यकीय सेवा वगळता औरंगाबाद शहरातील सर्व आस्थापना, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले आहेत. तसेच याची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही संबंधित यंत्रणांना दिले आहेत.विनाकारण फिरणाऱ्यावर थेट गुन्हे दाखल करणार असल्याचे ही सांगण्यात आलं आहे
पुण्यात कोरोना संशयित रुग्णाने हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या केली. बोपोडी येथील एका खासगी रुग्णालयात सायंकाळी सातच्या सुमारास घडली घटना घडली. आत्महत्या केलेल्या तरुणाला श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दुपारी तपासणीसाठी त्याचा स्वॅब घेतला होता. त्यानंतर तो तणावग्रस्त होता. सायंकाळी सातच्या सुमारास बाथरुमला जायचे असे सांगून बाहेर पडला आणि तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक तपास सुरू आहे.
पिंपरी चिंचवड शहरातील एमआयडीसी सुरू करण्यास हिरवा कंदील. राज्य सरकारने तसा अध्यादेश काढलेत. कंटेन्मेंट झोन वगळून इतर कंपन्यांचा यात समावेश असेल. त्यानुसार महापालिका प्रशासन उद्या नियमावली तयार करेल आणि त्यानंतर पुढील दोन दिवसात प्रत्यक्षात कंपन्यांमध्ये कामाचा श्रीगणेशा होईल.
नाशिक जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास जिल्ह्यातील अनेक भागात जोरदार वाऱ्यासह काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. येवला तालुक्यातील पुरणगाव येथील माजी सरपंच पुंडलिक वरे यांच्या शेतातील घरासमोर असल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याने झाडाला आग लागली. झाडाला आग लागल्याने त्याच्या ज्वाला खाली पडू लागल्या. झाडा खाली कांद्याच्या गोण्या ठेवण्यात आल्या होत्या. त्या वेळीच बाजुला करण्यात आल्याने वरे यांचे होणारे नुकसान त्यामुळे टाळले. तर, पुरणगाव येथे वीज पडल्याने एका महिलेचा मृत्यू झाला.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1602 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 27,524 आहे. तर दिवसभरात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 512 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृतांचा आकडा एक हजार पार गेला आहे.
जुन्नर तालुक्यात गारांसह अवकाळी पावसाची हजेरी. शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता.
पुण्यात वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस
३१ मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता. महाविकास आघाडीच्या बैठकीत चर्चा. पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या भाषणात काय निर्णय होतील त्याकडे लक्ष आहे. त्यानंतर महाराष्ट्रात काही बदल केले जाणार आहे. पण सध्या लॉकडाऊन वाढवण्यावर सरकारचा भर असल्याची माहिती आहे.
पालघर ग्रामीणमध्ये आज नवीन चार कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. वाडा तालुक्यात तीन रुग्णांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह तर वसई ग्रामीणमध्ये एक रुग्ण पॉझिटिव्ह. पालघर ग्रामीणची कोरोना बाधितांची संख्या 38 वर. संपूर्ण वाडा शहर व गोऱ्हे गाव लॉकडाऊन.
मुंबईत ज्या भागात कोरोनाची रुग्णसंख्या अधिक आहे. त्या भागातील स्थिती आटोक्यात आणण्यासाठी मंत्र्यांना जबाबदारी देणार
आहे. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
संबंधित विभागात अन्नधान्य देणे, रुग्णांची व्यवस्था, क्वारंटाईन व्यवस्था,आरोग्य सुविधा यांचा समन्वय करण्याची जबाबदारी संबंधित मंत्री पार पाडणार आहे. जबाबदारी दिली जाणार्‍या मंत्र्यांमध्ये नवाब मलिक, वर्षा गायकवाड, अनिल परब, अस्लम शेख यांचा समावेश आहे.
उन्हाळ्याची दाहकता आता कोरोनापेक्षा जास्त जाणण्यास सुरुवात झाली असून करमाळा तालुक्याच्या अनेक गावात पाणी टंचाईचे भीषण चित्र दिसू लागले आहे. दहिगाव आवर्तनात टेल टू हेड पाणी वाटपाचा फज्जा उडाला आहे. घोटी गाव टेलला असताना व टेलला पाणी आधी देण्याचा नियम असताना घोटी गावाला पाणी न मिळताच भोवताली गावांना दिले जात आहे. त्यामुळे हक्काचे पाणी न मिळाल्याने घोटी गावाततीव्र पाणी टंचाई निर्माण झाली असुन पाण्यासाठी ग्रामस्थांची पायपीट होऊ लागली आहे. आता ग्रामस्थांनी एकत्र येऊन दहिगावचे पाणी मिळावे यासाठी जलसंपदा मंत्री यांच्याकडे निवेदन दिले आहे. यामध्ये 29 गावची जेऊर प्रादेशिक योजना चालू करावी तसेच दहिगाव योजनेचे प्राधान्याने पाणी टेलला असलेल्या घोटी गावाला देण्याची सोय करावी अशी मागणी केली आहे. घोटी गावची लोकसंख्या 5 हजार एवढी असुन गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सदराचे गाव उजनी जलाशयापासून अवघ्या 18 किलोमीटर अंतरावर आहे .तरी ही गावात पिण्याच्या पाण्यासाठी दररोज नागरिकांना 3-4 किलोमीटर भटकावे लागत आहे.
हिंगोलीत पावसाच्या 10 मिनिटे हलक्या सरी. जिल्ह्यातील काही भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता. मेघगर्जना व विजांचा कडकडाट सुरू.
पुणे-नाशिक महामार्गावरून घराची वाट धरलेल्या मजुरांना रिफ्लेक्टर जॅकेट आणि टॉर्चचे वाटप करण्यात आलं. रात्रीच्या काळोखात वाहन चालकांना हे मजूर काहीवेळा दिसत नाहीत, अशात अपघात होण्याची दाट शक्यता आहे. हाच विचार करून पुण्याच्या मंचरमध्ये पायी चालणारे, सायकलस्वार आणि दुचाकीस्वारांना रिफ्लेक्टर जॅकेट आणि टॉर्चचे वाटप करण्यात आले. 
गोवा व सिंधुदुर्गातून ट्रक मधून परजिल्ह्यात जाणाऱ्या 70 हून अधिक परप्रांतीय कामगारांना मुंबई गोवा महामार्गावर झाराप येथे पोलिसांनी ताब्यात घेतले. हा ट्रक जप्त करून सर्व कामगारांसह सावंतवाडी पोलीस ठाण्यात आणण्यात आला. त्यानंतर त्यांना सावंतवाडी तहसील कार्यालयात पाठविण्यात आले असून तेथे पुढील कारवाई सुरू आहे.
31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉकडाऊन वाढण्याची शक्यता, महाविकास आघाडीच्या बैठकीत झाली चर्चा, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणात काय काय निर्णय होतात याकडे लक्ष, त्यानंतर महाराष्ट्रात होतील काही बदल , पण सध्या लाॅकडाऊन वाढवण्यावर सरकारचा भर
रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यात दोन कोरोनाचे रूग्ण आढळून आले. त्यानंतर व्यापारी संघटनांनी पुढील 8 दिवस लांजा बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सकाळपासून लांजा बाजारपेठेतील दुकानांसमोर गर्दी दिसून येत आहे. दुकानांसमोर लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसून येत आहे. महत्त्वाचं म्हणजे यावेळी नागरिकांनी मास्क घालत सोशल डिस्टन्सिंगचे देखील पालन केल्याचे दिसून आले. पुढील आठ दिवस बाजारपेठ बंद असल्याने घरगुती सामानाची चणचण भासू नये याकरता नागरिक खबरदारी घेताना दिसत आहेत.
राज्यभरात अडकलेले परप्रांतीय मजूर, विद्यार्थी इत्यादींना रीतसर अर्ज करून आपल्या गावी परत जाण्याची परवानगी सरकारतर्फे देण्यात आली आहे. जे परप्रांतिय नागरिक निवारा केंद्रात अडकले होते. त्यांच्यासाठी एसटी मार्फत संबंधित राज्याच्या सीमेपर्यंत सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे सीमेवर मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय. कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या सोलापुरातील वागदरी गावाजवळ देखील अशाच प्रकारे गर्दी पाहयाला मिळत आहे. आळंद, कलबुर्गी मार्गे कर्नाटकात जाणाऱ्या लोकांच्या वाहनांची मोठी रांग या ठिकाणी दिसून येत आहे. लॉकडाऊनमुळे कामधंदे बंद असल्याचे हाल होत होते. त्यामुळे आपल्या मूळगावी जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे अनेकांनी सांगितलं. मात्र याचा परिणाम सीमा भागात दिसून येतोय. मोठ्याप्रमाणात लोक येत असल्याने यंत्रणांवर ताण दिसून येत आहे. गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंग राखताना ही पोलीस आणि प्रशासनाची दमछाक होताना पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडी मंत्र्यांची बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, जयंत पाटील, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई उपस्थित, बाळासाहेब ठाकरे स्मारक इथे बैठक सुरू
कोल्हापूर : शिरोली midc मधील मजूर उतरले महामार्गावर,

,कोणत्याही परिस्थितीमध्ये मूळगावी सोडण्याची मागणी,

15 दिवसांपासून खाण्यास काही मिळालं नसल्याचं म्हणणं,

मालकांनी काही पगार देऊन वाऱ्यावर सोडल्याचा आरोप
चंद्रपूर : कोरपना-वणी मार्गावर रेतीचा ट्रॅक्टर पलटून अपघात झाला आहे. अपघातात 2 मजुरांचा मृत्यू झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. अनिल परचाके आणि देवराव नैताम यांचा मृत्यू तर रामदास फुसनाके आणि शंभू मडावी हे जखमी झाले आहेत. पैनगंगा नदीतून रेतीची अवैध तस्करी होत असल्याचा माजी आमदार संजय धोटे यांनी आरोप केला आहे.

अकोल्यात 11 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. रूग्णांची संख्या 197 वर पोहोचली असून आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 60 रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
काम नाही तर वेतन नाही हे धोरण सद्यस्थितीत लागू करता येणार नाही असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वेतन धोरणाविरोधात एक याचिका दाखल झाली होती. सध्या कोरोना विषाण आणि लाॅक डाऊनमुळे सध्या मंदिर परिसर बंद आहे. अशा स्थितीत कंत्राटी कामगारांचे वेतन कपात मंदिर संस्थानवर केली होती. त्या विरोधामध्ये एक याचिका राष्ट्रीय श्रमिक आघाडीने दाखल केली होती. मंदिर व्यवस्थापन ड्युटी करण्यास, इतर सेवा बजावण्यात मनाई करत असल्याचा दावा होता. व्यवस्थापनाच्या धोरणाविरोधात ही याचिका दाखल झाली होती. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यातील वेतनापेक्षा मार्च आणि एप्रिल महिन्यात कमी वेतन देण्यात आले असा याचिकेत दावा केला होता. जिल्हाधिकारी उस्मानाबाद तुळजाभवानी मंदिर संस्थानचे व्यवस्थापन समितीच्या पदसिद्ध अध्यक्ष आहेत तर तहसीलदार व्यवस्थापक आहे. न्यायालयाने काम नाही तर वेतन नाही हे धोरण सद्यस्थितीत लागू करता येणार नाही असे आदेश मंदिर संस्थांना दिले आहेत. पुढची सुनावणी ९ जून ला होणार आहे आणि या काळामध्ये कंत्राटी कामगारांना 2020 मे पर्यंत संपूर्ण वेतन देण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले
कोरोना लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थ्यांसाठी धावणारी एकमेव स्पेशल ट्रेनची तयारी आता पूर्ण झालीय. महाराष्ट्र सरकारच या विद्यार्थ्यांचा प्रवासाचा खर्च उचलणार असल्याचं स्पष्ट झालंय. दिल्लीतल्या राजेंद्रनगर परिसरात जवळपास १४०० विद्यार्थ्यांना घेऊन ही ट्रेन १६ मे रोजी महाराष्ट्रात दाखल होणार आहे. या स्पेशल ट्रेनच्या प्रवासासाठीची लगबग सुरु झाली असून जवळपास ५० दिवस अडकलेले विद्यार्थी आता घरी जाणार या भावनेनं सुखावले आहेत. या विद्यार्थ्यांना शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनकडून मास्क, हँडग्लोव्हज, पाणी बॉटल आणि एकवेळचं जेवण पुरवलं जाणार आहे. आधी या ट्रेनसाठी दिल्ली-भुसावळ या मार्गाला परवानगी मिळाली होती. पण आता ही ट्रेन दिल्ली ते पुणे व्हाया भुसावळ, नाशिक, कल्याण अशी धावणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागात प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ते सोयीचं होणार आहे. यूपीएससीची परीक्षा आधीच्या वेळापत्रकाप्रमाणे 31 मे रोजी होणार होती. त्यामुळे 24 मार्चला लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतरही हे विद्यार्थी दिल्लीतच तयारीसाठी थांबले होते. त्यातल्या अनेकांचं परीक्षा केंद्रही दिल्लीच होतं. पण नंतर परीक्षेचं भवितव्य अधांतरी असल्यानं आणि लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्यांच्या खाण्यापिण्याचेही हाल होत असल्यानं त्यांनी महाराष्ट्र सरकारकडे याबाबत गाऱ्हाणं मांडलं होतं. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे, शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे, काँग्रेसकडून खासदार राजीव सातव, युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी या स्पेशल ट्रेनसाठी पाठपुरावा केला होता. शिवाय राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केद्रीय रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांच्याकडे परराज्यांत अडकलेल्या मराठी लोकांसाठी स्पेशल ट्रेन सोडण्याची मागणी केली होती. कोटामध्ये आयआयटी जेईईची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांपाठोपाठ आता या विद्यार्थ्यांनाही महाराष्ट्र सरकार राज्यात परत आणणार आहे. या लॉकडाऊनच्या काळात दिल्लीत घरमालकांनी घरभाड्यात कुठलीच सूट दिली नसल्यानंही या विद्यार्थ्यांचे अधिक हाल होत होते.
बहुचर्चित गुलाबो सिताबो अमेझॉन प्राईम वर 12 जून ला रिलीज होणार. चित्रपट शुजित सरकार यांनी दिग्दर्शित केला असून अमिताभ बच्चन , आयुष्यमान खुराना यांच्या यात भूमिका आहेत. अमिताभ यांची रंगभूषा आणि वेशभूषा हा यातला यूएसपी ठरणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात चाकरमान्यांना गावी आणण्यावरून सध्या विरोध वाढत चालला आहे. कुडाळ शहरातील सर्व पक्षीय नेत्यांनी प्रांताधिकारी वंदना करमाळे यांची भेट घेऊन चाकरमान्यांना यायला विरोध दर्शवला आहे. रेडझोनमधून आलेल्या चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश दिल्यास जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल आणि जिल्हा रेडझोनमध्ये जाईल. येथील आरोग्य यंत्रणा सक्षम नसताना चाकरमान्यांना जिल्ह्यात प्रवेश देवू नये. जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झाल्यास प्रशासन जबाबदार राहील, असा इशाराही सर्व पक्षीय नेत्यांनी प्रांताधिकाऱ्यांना दिला आहे.
जालन्यात आणखी दोन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. जालन्यातील राज्य राखीव दलाच्या जवनासाहित, परतूरमधील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. एकूण कोरनाची रुग्णसंख्या 17 वर पोहोचली असून यातील एक महिला कोरोनामुक्त होऊन घरी परतली आहे.
औरंगाबादमध्ये 55 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. कोरोना बाधितांचा आकडा सातशे पार. जिल्ह्यात 743 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 210 रुग्ण बरे तर 19 रुग्णांचा मृत्यू
शेतीच्या वादातून तिघांची हत्या, केज तालुक्यातील मांगवडगाव इथली घटना, शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांसह अन्य एका व्यक्तीवर गावातील काही व्यक्तींनी सामूहिक हल्ला केला. यात तिघांचा घटनास्थळी मृत्यू झाला आहे. केज पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तिघांचे मृतदेह रुग्णालयात पाठविले.

याप्रकरणी १२ संशयितांना ताब्यात घेतले आहे
नाशिक :
बुधवारी झालेल्या गारपीटीमुळे शेतकऱ्यांसमोर मोठ संकट,
सर्व नुकसानीचा तात्काळ पंचनामा करण्यात येऊन शेतकऱ्यांना सरकारने जास्तीत जास्त मदतीचा हात द्यावा, दिंडोरीच्या खासदार भारती पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोरोना आणि लॉकडाऊन पाठोपाठ आता अवकाळी पावसामुळे बळीराजा हैराण झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने बारामतीला झोडपलं आहे. तब्बल एकतासाहून अधिका काळ बारामती शहर आणि तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. काही ठिकाणी गारांचा पाऊस सुरु आहे. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसाने दिलासा मिळाला असला तरी उन्हाळी पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात गुरुवारी (14 मे) कोरोनाच्या तब्बल 1602 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 27,524 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 44 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 25 जण मुंबई, 10 जण नवी मुंबई तर पुण्यातील 5, औरंगाबाद 2, पनवेल, कल्याण, डोंबिवलीमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1019 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 512 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 40 हजार 145 नमुन्यांपैकी 2 लाख 12 हजार 621 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 27, 524 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 15 हजार 686 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 15 हजार 465 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 6059 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.


काल झालेल्या मृत्यूंपैकी 31 पुरुष तर 13 महिला आहेत. त्यातील 21 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 20 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 3 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 44 रुग्णांपैकी 34 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.