Coronavirus Maharashtra Live Updates | पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 202 जण कोरोनामुक्त

Coronavirus in Maharashtra Live : राज्यात शुक्रवारी (8 मे) कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 May 2020 12:00 AM
यवतमाळ : जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता शहरी व ग्रामीण भागातील बाजारातील दुकाने सकाळी 8 ते दुपारी 2 या वेळेत आळीपाळीने सुरु राहणार आहेत. रविवार, सोमवार आणि मंगळवार रोजी काही दुकाने, बुधवार, गुरुवार रोजी काही दुकाने आणि शुक्रवार, शनिवार रोजी काही दुकाने सुरु राहणार आहेत.
Live Updates | पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात तब्बल 202 जण कोरोनामुक्त. पुणे जिल्ह्यात आत्तापर्यंत 1139 जणांची कोरोनावर यशस्वी मात.
माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना कार्डिओ-थोरॅसिक वॉर्डमध्ये निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
महाराष्ट्रात सलग पाचव्या दिवशी हजाराच्या पटीत कोरोना बाधित रुग्णांची वाढ. दिवसभरात 1278 रुग्णांची नोंद. राज्यात एकूण 22 हजार 171 रुग्णसंख्या. तर आज सगळ्यात जास्त पन्नासहून अधिक रुग्णांचा म्रुत्यू.

पिंपरी चिंचवड शहरात एकूण 30 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला तर 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, आत्तापर्यंत शहरातील 169 तर शहराबाहेरील उपचारासाठी दाखल 15 असे एकूण 184 रुग्णांना कोरोनाची लागण
12 मे पासून प्रवासी सेवा टप्प्याटप्प्याने सुरु होणार. प्रारंभी 15 जोडीच्या गाड्यांसह 12 मे 2020 पासून प्रवासी रेल्वेचे काम हळूहळू पुन्हा सुरू करण्याची भारतीय रेल्वेची योजना आहे.
वर्ध्यात जोरदार वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह विजांचा कडकडाट, काही भागात पावसाच्या सरी, शहरातील वीज पुरवठा खंडीत
ससून रुग्णालयातील तेरा महिन्याच्या कोरोनाबाधित चिमुरडीचा मृत्यू. पुण्यातील ससून रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या तीन कोरोनाबाधित रुग्णांचा आज दिवसभरात मृत्यू झालाय. यामध्ये तेरा महिन्याच्या चिमुरडीचा समावेश आहे. पुण्याच्या वारजे येथील या चिमुरडीला 4 मे रोजी कोरोनाची बाधा झाल्यामुळे ससून रुग्णालयात भरती करण्यात आले होते. तिला इतरही आजार होते. उपचार सुरू असताना आज सकाळी 7:30 वाजता तिची प्राणज्योत मालवली.
धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी 14 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश, अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, नागरिकांनी घाबरू नये, घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, जिल्हाधिकाऱ्यांचा आवाहन
धुळे महानगरपालिका क्षेत्रासाठी 14 मेपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित, जिल्हाधिकारी संजय यादव यांचे निर्देश, अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार, नागरिकांनी घाबरू नये, घरीच थांबून प्रशासनाला सहकार्य करावे, जिल्हाधिकाऱ्यांचा आवाहन
महाविकासआघाडी विधान परिषदेच्या पाच जागा लढणार असल्याची घोषणा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. परिणामी ही निवडणूक आता बिनविरोध होणार आहे. महाविकासआघाडीतील नेत्यांच्या बैठकीनंतर निर्णय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या दुपारी तीन वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत, देशात तिसऱ्यांदा लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधानांचा हा मुख्यमंत्र्यांशी पहिलाच संवाद असणार आहे
जालना शहर आणि बदनापूर तालुक्यात पावसाची जोरदार हजेरी, वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस, बदनापूर तालुक्यातील अकोला निकळक, पाडळी, धोपटेश्वर, रामखेडा इत्यादी ठिकाणी वादळी वाऱ्यांसह गरपीट
विधानपरिषदेचा तिढा सोडवण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक. शिवसेनेकडून संजय राऊत, एकनाथ शिंदे, अनिल परब, मिलिंद नार्वेकर, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार, जयंत पाटील आणि काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण उपस्थित राहणार.

अकोल्यात कोरोनाचा आणखी एक रूग्ण आढळला. दिवसभरात 7 नवे रूग्ण. रूग्णांची संख्या 154 वर. आतापर्यंत 12 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू, तर 14 रूग्ण बरे होऊन घरी परतले, सध्या उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची संख्या 127
वाधवान बंधूंना जेलमध्ये पसरणाऱ्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता जामीन देण्यास कोर्टाचा नकार. मेरीटवर दाखल केलेल्या जामीन अर्जावर 13 मे रोजी सुनावणी होणार. सीबीआय कोठडी संपल्यामुळे कपील आणि धीरज वाधवानला मुंबई सत्र न्यायालयानं सुनावली न्यायालयीन कोठडी
जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी आज धुळ्यात परप्रांतीय मजुरांची करण्यात आलेल्या व्यवस्थेची पाहणी केली .मेधा पाटकर यांनी परप्रांतीय मजुरांसाठी केलेल्या भोजनाचा आस्वाद यावेळी मजुरांसोबत घेतला .ट्रक चालक या मुजुरांकडून अवाच्या सव्वा पैसे घेत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली . घराकडे पायी जाणाऱ्या काही मुजुरांच्या झालेल्या मृत्यू बाबत त्यांनी दुःख व्यक्त केलं .सरकारच्या वतीनं सुरू असलेल्या उपाययोजना, सुरू असलेल्या प्रयत्नांबद्दल मेधा पाटकर यांनी समाधान व्यक्त केलंय . मेधा पाटकर यांनी ठिकठिकाणी जाऊन परप्रांतीय मजुरांची विचारपूस केली .
औरंगाबादमध्ये पुन्हा 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण. आजच्या दिवसभरात 49 नवे रुग्ण. औरंगाबाद कोरोना बाधितांची एकूण संख्या 557 वर. 73 रुग्ण बरे झाले तर 13 रुग्णाचा मृत्यू.
भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचे 7 नवे रुग्ण आढळले, डुंगे गावात एकाच कुटुंबातील 7 जणांना कोरोनाची लागण, बीएमसी मध्ये अयोग्य विभागात वार्ड बॉय म्हणून काम करीत असलेली व्यक्ती पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या कुटुंबातील बायको, दोन मुलं, आई-वडील, भाऊ आणि भावाची बायको असे 7 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
कोल्हापूर - पाण्यासाठी ग्रामस्थांमध्ये दगडफेक, कोल्हापूर जिल्ह्यातल्या चंदगड तालुक्यातील प्रकार , पाटणे आणि जेलूगडे गावच्या ग्रामस्थांमध्ये वाद , जिल्हा प्रशासन लक्ष देणार का ?, पाण्याच्या एकाच स्त्रोतामुळे दोन गावांमध्ये वाद
कोरोनाचा शिरकाव महिला कैद्यांच्या तुरुंगात, भायखळा जेलमधील 54 वर्षीय महिला आरोपीला कोरोनाची लागण, श्वास घेण्यास त्रास होत असल्याने महिलेला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे या महिलेची पहिली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली मात्र 9 मे ला दुसरी चाचणी पॉझिटिव्ह आली, सध्या महिलेला सेंट जॉर्ज मध्ये दाखल करण्यात आलंय
...तर मी निवडणूक लढवणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा बाळासाहेब थोरातांना निरोप, सूत्रांची माहिती, उद्धव ठाकरे काँग्रेसवर संतापले, सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीत तणाव , सहाव्या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद, कॉंग्रेसच्या भूमिकेकडे लक्ष
शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी उमेदवारी, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्वीट करुन दिली माहिती
मंत्री जितेंद्र आव्हाड यांना आज हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, 'गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे' अशी माहिती त्यांनी स्वतः ट्वीट करून दिली आहे.
लोणावळ्यातील सर्व दुकानं खुली करण्यास परवानगी मिळाली आहे. मात्र पर्यटनाला अद्याप बंदीच आहे. त्यामुळे फक्त चिक्कीची विक्री करणारी दुकानं खुली न करण्याचा निर्णय झालाय. पर्यटक येणार नसतील तर चिक्की बनवून आणि दुकानं खुली ठेवून काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे चिक्कीचा स्वाद घेण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
अमरावती : कोविड रुग्णालयातून उपचार घेऊन बरे झालेल्या सुमारे 15 नागरिकांना आज घरी सोडण्यात येणार आहे. आज दुपारी 2 वाजता त्यांना मेडिकल स्टाफकडून निरोप देण्यात येईल. अमरावती जिल्ह्यात एकूण रुग्ण संख्या ही 78 एवढी आहे. त्यापैकी 12 मृत्यू तर 5 बरे होऊन घरी गेलेले आहेत.
कोविड रुग्णांना डिस्चार्ज देण्याबाबत नवी नियमावली जारी करण्यात आली आहे. अतिसौम्य किंवा लक्षणे नसलेल्या कोविड रूग्णासाठी ७व्या, ८व्या आणि ९ व्या दिवशीही ताप नसल्यास त्याला १०व्या दिवशी डिस्चार्ज देण्यात यावा, असं यात सांगितलं आहे.
औरंगाबाद पुन्हा 16 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची वाढ, दुपारपर्यंत 54 रुग्ण वाढले, कोरोना बाधितांची एकूण संख्या 562 वर, 52 रुग्ण बरे होऊन घरी तर 13 रुग्णांचा मृत्यू, जिल्हा शल्यचिकित्सक सुंदरराव कुलकर्णी यांची माहिती
पालघर जिल्ह्यातील गडचिंचले येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणानंतर आज राज्याचे विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी गडचिंचले येथील घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी प्रकरणाची विचारपूस करून सदर घटना ही दुर्दवी असल्याच म्हटलं. तसेच या प्रकरणाचा तपास सीआयडी कडून काढून सीबीआयकडे सोपवावा अशी मागणी देखील केली.
पुणे : पुणे शहरातील स्पर्धा परीक्षार्थी थोड्याच वेळात गावाकडे रवाना होणार, 44 विद्यार्थ्यांची जाण्याची सोय मनसेनं केली, जळगावला विद्यार्थ्यांची एक बस रवाना होणार, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने बस पाठवली जाणार, जाणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी, कंटेन्मेंट झोन व्यतिरिक्त विद्यार्थ्यांना बाहेर जाण्यास परवानगी
अकोल्यात 6 कोरोनाचे नवे रूग्ण आढळले. रूग्णांची संख्या 153 वर. आतापर्यंत 11 रूग्णांचा कोरोनाने म्रूत्यू. तर 14 रूग्ण बरे होऊन घरी परतलेत. सध्या उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची संख्या 127.
पुणे : कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर स्थलांतरित मजुरांसाठी जिल्हा प्रशासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय, वेगवेगळ्या महामार्गांवर स्थलांतरितांसाठी विश्रामगृहाची व्यवस्था करण्याचे निर्देश, विश्रामगृहात नाष्टा, जेवण आणि शौचालयाची सुविधा करण्याचे आदेश, पुणे जिल्ह्यातील पुणे-बंगळुरु, पुणे-सोलापूर, पुणे-अहमदनगर ,पुणे-मुंबई आणि पुणे-नाशिक या महामार्गांवर या सुविधा देण्याच्या सूचना
युवा अभिनेता साईप्रसाद गुंडेवारचं निधन, गेली दोन वर्षापासून होता ब्रेन कॅन्सरने त्रस्त, 22 फेब्रुवारी 2019 रोजी त्याचे ब्रेन कॅन्सरचे ऑपरेशन अमेरिकेत झाले होते. त्याने 'रॉक ऑन', 'पप्पू कान्ट डान्स साला', 'लव्ह ब्रेकअप जिंदगी', 'डेव्हिड', 'आय मी और मैं', 'पीके', 'बाजार' अशा विविध हिंदी चित्रपटांसह अनेक मालिकांमध्ये भूमिका केल्या होत्या
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ मध्ये अवकाळी पाऊस, ढगांच्या गडगडाटासह सुमारे अर्धा तास पाऊस, आबा, काजूच्या फळांची पडझड
आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी सहाय्यक आयुक्तांना आणखी काही महत्वाच्या सूचना दिल्या आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम आणखी प्रभावीपणे आणि नियोजनपूर्वक होणे गरजेचे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग हे प्रमाण एका बाधीत रूग्णाच्या मागे 3 असे दिसते. हे प्रमाण किमान एकाच्या मागे 6 असे करण्याचे लक्ष्य. यात अति धोकादायक संपर्कांचा कसून शोध घेतला जायला हवा. 'कंटेनमेंट झोन' विषयक कार्यवाही अधिक प्रभावी व्हावी, यासाठी प्रत्येक 'कंटेनमेंट झोन' साठी समन्वयक म्हणून कोविड योद्ध्यांची नेमणूक तात्पुरत्या स्वरूपात होणार, अॅम्ब्युलन्सची कमतरता असल्याचा प्रश्न सोडवण्यासाठी महापालिका क्षेत्रातील 100 कोविड केंद्रांवर प्रत्येकी दोन; याप्रमाणे 200 रुग्णवाहिकांचे नियोजन करण्याचे आयुक्तांचे निर्देश
विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु, कॉंग्रेसनं दोन उमेदवार दिल्यानं महाविकास आघाडीमध्ये चिंतेचं वातावरण, काँग्रेसची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु, शिवसेना, राष्ट्रवादीची काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवर चर्चा, काँग्रेस 2 जागा लढवण्यावर ठाम
सिंधुदुर्ग : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेड झोनमधील व्यक्तींना गावात प्रवेश नाही, जोपर्यत रेड झोनमधील व्यक्तींची कोरोना टेस्ट निगेटिव्ह असल्याचा अहवाल प्राप्त होत नाही, तोपर्यत त्यांना गावात प्रवेश दिला जाणार नाही असा पवित्रा दोडामार्ग सरपंच संघटनेची मागणी घेतला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या रोशन गेट येथील 50 वर्षीय व्यक्तीचा घाटीच्या कोव्हिड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला, अशी माहिती घाटीचे माध्यम समन्वयक डाॅ. अरविंद गायकवाड यांनी दिली.

जिल्हा रुग्णालयात 2 मे रोजी या रुग्णाला भरती करण्यात आले होते.
परभणी तालुक्यातील टाकळी बोबडे आणि परिसरात पहाटेच्या सुमारास प्रचंड गारपीट झालीय. शिवाय वादळी वाऱ्यामुळं गावातील अनेक घरावरील पत्रे उडून गेले. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांही मोठे नुकसान झाले आहे. अगोदरच भाव नसल्याने शेतकरी आपला माल अत्यंत कमी किमतीत देत आहेत. त्यातच शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झाले आहे
हिंगोली : शेतात झाडाला गळफास घेऊन एकाची आत्महत्या, औंढा तालुक्यातील हिवरा गावातील घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट, पोलिस घटनास्थळी दाखल
औरंगाबाद : नव्याने 38 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, यात रामनगर -19, सिल्क मिल्क-8, चंपा चौक -5,
दत्त नगर-1,
रोहिदास नगर-2,
संजय नगर-1,
वसुंधरा कॉ. N7-1,
एमआयटी कॉलेज बीड बायपास-1 असे रुग्ण सापडले,

जिल्ह्यातील कोरोना बधितांचा आकडा 546 वर
लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिकहून काल मध्यरात्रिपासूनच एसटीची मोफत सेवा सुरु करण्यात आली. ही सेवा सोमवारपासून सुरु होणार होती मात्र नाशिकमध्ये कालपासूनच सुरु करण्यात आली. रात्री नागपूरसाठी एक, जिंतूरसाठी एक तर 38 बसेस मध्य प्रदेशच्या सीमेकडे रवाना झाल्या. नाशिक शहरातून 36 तर इगतपुरीहून 4 बस सुटल्या आहेत. मुंबई- आग्रा महामार्ग वरून पायी जाणाऱ्या नागरिकांची पोलिसांच्या मदतीने परिवहन महामंडळाने तात्काळ व्यवस्था केली असल्याची देखील माहिती आहे.
लातूर : शहिद गणपत लांडगे अनंतात विलीन, सियाचीन येथे कर्तव्य बजावत असताना अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले आहेत. आज सकाळी संपूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. सकाळपासून पाऊस असतानाही अनेक लोकांनी अंत्यसंस्काराला हजेरी लावली
UPDATE | कांदिवली येथील दिपज्योती चाळीत एक दुमजली घर पहाटे पाच वाजताच्या दरम्यान कोसळले. यात 14 जण अडकले होते. त्यांना अग्निशमन दल, एनडीआरएफच्या जवानांनी बाहेर काढले. यात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांचवर जवळील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी अजूनही अग्निशमन दल आणि एनडीआरएफचे जवान शोधकार्य करत आहेत.
चंद्रपूर : चंद्रपुर शहरात सकाळपासून विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी, जिल्ह्याच्या इतर भागातही गारपीटीसह मुसळधार पाऊस, पुढे पाच दिवस राज्यामध्ये अवकाळी पावसाचा अंदाज, चंद्रपूरचा वाढता उकाडा नकोसा होत असताना पावसाने आणला गारवा

कोल्हापूर : भराव विहिरीत ढासळल्याने ढिगाऱ्याखाली दबून तिघांचा मृत्यू, कोडोली-काखे मार्गावर असलेल्या विहिरीचं दुरुस्तीचे काम होते सुरु, दोघांना बाहेर काढून उपचार सुरु, पण दबल्या गेलेल्या अन्य तिघांचा मृत्यू, महेश वारकरी, सिकंदर जमादार, अमोल सदाकळे अशी मृतांची नावं
सांगली : इस्लामपुरातील महिला मुख्याधिकाऱ्यांला जीवे मारण्याची धमकी देणारा राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधवला अखेर अटक, इस्लामपूर पोलिसांची भल्या पहाटे कारवाई, मागील 8-10दिवसांपासून होता फरार
सांगली : इस्लामपुरातील महिला मुख्याधिकाऱ्यांला जीवे मारण्याची धमकी देणारा राष्ट्रवादीचा स्वीकृत नगरसेवक खंडेराव जाधवला अखेर अटक, इस्लामपूर पोलिसांची भल्या पहाटे कारवाई, मागील 8-10दिवसांपासून होता फरार
औरंगाबाद :औरंगाबादमध्ये रात्रीतून 21 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, औरंगाबाद कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 528 वर, 52 रुग्ण कोरोना मुक्त तर 12 जणांचा मृत्यू
नाशिक : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिकहून काल मध्यरात्रिपासूनच एसटीची मोफत सेवा सुरु, 1 नागपूर, 1 जिंतूर तर 38 बसेस मध्य प्रदेशच्या सीमेकडे रात्रीतून रवाना , नाशिक शहरातून 36 तर इगतपुरीहून 4 बस सुटल्या, मुंबई- आग्रा महामार्ग वरून पायी जाणाऱ्या नागरिकांची पोलिसांच्या मदतीने परिवहन महामंडळाने केली तात्काळ व्यवस्था
नाशिक : लॉकडाऊनमुळे अडकलेल्या नागरिकांसाठी नाशिकहून काल मध्यरात्रिपासूनच एसटीची मोफत सेवा सुरु, 1 नागपूर, 1 जिंतूर तर 38 बसेस मध्य प्रदेशच्या सीमेकडे रात्रीतून रवाना , नाशिक शहरातून 36 तर इगतपुरीहून 4 बस सुटल्या, मुंबई- आग्रा महामार्ग वरून पायी जाणाऱ्या नागरिकांची पोलिसांच्या मदतीने परिवहन महामंडळाने केली तात्काळ व्यवस्था
मुंबई : कांदिवलीतील दिपज्योती चाळीतील दोनमजली घराचा काही भाग कोसळला. 5 ते 6 जण अडकल्याची भीती, सात जणांना सुखरुप बाहेर काढलं, अग्निशामक दल घटनास्थळी, मदतकार्य सुरु
नंदुरबार जिल्हावासियांसाठी दिलासादायक बातमी. जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांपैकी 4 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. याआधी 5 कोरोनाबाधित कोरोना मुक्त झाले आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील 9 जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यातील 21 कोरोनाबधितांपैकी 2 जणांचाा मृत्यू झाला असून 9 जण बरे झाले आहेत. आता जिल्हा रुग्णालयात 10 बाधितांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
जगभरात कोरोनाने थैमान घातल्याने अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे अनेक भारतीय कामानिमित्त, शिक्षणासाठी परदेशी गेले आहेत. ते लोक त्या त्या देशात अडकून पडले आहेत. या भारतीयांना पुन्हा भारतात आणण्यास भारताकडून सुरवात झाली आहे. आज पहाटे लंडनहून विशेष विमानाने 329 भारतीय भारतात परतले आहेत. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर काही भारतीय दाखल झाले. यातील मुंबईत राहात असलेल्यांना विमानतळजवळील विविध हॉटेलमध्ये काही दिवस क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर इतर जिल्ह्यातील लोकांना त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात नेण्यात आले. यासाठी बेस्ट आणि एसटीची मदत घेण्यात आली होती.
औरंगाबाद ग्रामीण भागातील 10 वर्षाच्या एका मुलांना कोरोनावर मात केली.त्याला जिल्हा रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.ग्रामीन भागातील लोकांनी या मुलाचं फुलांच्या वर्षावात त्याचं स्वागत केलं.खुलताबाद गावकऱ्यांनी त्याच हे स्वागत केले.
जालना येथे जिल्हाधिकाऱ्यांकडून आज सकाळी 10 ते 6 पर्यंत संचारबंदी आदेश, जालन्यात अडकलेल्या 1200 उत्तरप्रदेश मधील कामगारांना उद्या स्पेशल श्रमिक ट्रेनने उन्नावला पाठवणार
नाशिक : पहाटे 6 वाजता नाशिक शहरात तूफान वाहतूक कोंडी, मुंबईसह ठाणे, पालघरहून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशकडे जाणाऱ्या परप्रांतीयांच्या वाहनांमुळे कोंडी, धक्कादायक म्हणजे अनेक वाहनांवर महाराष्ट्र शासन, अत्यावश्यक सेवा, भाजीपाला असे स्टीकर्स, सर्रास अवैध वाहतूक सुरु
चार दिवसापासून हिंगोलीमध्ये रुग्ण संख्या स्थिर. गेल्या 96 तासांपासून एकही नवा रुग्ण नाही. याऊलट एकूण 91 पॉझिटिव्ह रुग्णाच्या आकड्यात हळूहळू घट होत आहे. आतापर्यंत तीन जणांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
महाराष्ट्राने कोरोना बाधित रुग्णांचा 20 हजाराचा टप्पा ओलांडला. आज 1165 नवीन रुग्णांची नोंद. एकूण रुग्ण 20 हजार 228 कोरोना संक्रमित रुग्ण संख्या. पहिल्यांदा सगळ्यात मोठा मृतांचा आकडा. आज एक दिवसात 48 जणांचा मृत्यू.

काँग्रेस पक्ष विधानपरिषदेच्या दोन जागा लढविणार असून राजेश धोंडीराम राठोड आणि राजकिशोर उर्फ पापा मोदी यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे. पापा मोदी हे बीड जिल्ह्यातील अंबेजोगाईचे मोठे आणि जुने काँग्रेस नेते आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी उमेदवारी अर्ज भरणार आहे.

विधानपरिषदेसाठी शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंसह निलम गोह्रे अर्ज दाखल करणार आहे. यावेळी शिवसेनेचे महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहे. तर महाविकास आघाडीचे सगळे उमेदवार देखील सोमवारी अर्ज भरणार

आहे. सोमवार हा अर्ज भरायचा शेवटचा दिवस आहे.

ठाण्यात विधान परिषदेच्या एका आमदाराला कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीला लागण झाली होती. त्यानंतर या आमदारांचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आला आहे.
पालघर जिल्ह्यातून अनेक मजूर आपल्या गावाकडे मिळेल त्या वाहनाने रवाना व्हायला लागलेत. प्रत्येकी 3500 रुपये भाडं देऊन ते ट्रकमधून पालघर ते गोरखपूर महाराजगंज येथे निघाले आहेत. विशेष म्हणजे पालघर तालुक्यातील गोवाडे येथील भुलानी स्टील कंपनीत काम करणारे हे 52 कामगार आहेत. कामगारांच्या म्हणण्याप्रमाणे मालक फक्त रोजच्या आहाराची व्यवस्था करणार होते. पगार देत नाहीत मग आम्ही आमची कुटुंब कशी सांभाळायची. म्हणून नाईलाजास्तव आम्ही गावाकडे जात आहोत.
बीसीजी लसीचा कोरोनावर प्रयोग करण्यास मंजुरी, पुण्यातील ससून रुग्णालयात होणार बीसीजी लसीचा प्रयोग
विधानपरिषदेसाठी काँग्रेसचं सरप्राईज पॅकेज, दिग्गजांना बाजूला सारत युवा राजेश राठोड यांना संधी
विधानपरिषदेसाठी काँग्रेसचं सरप्राईज पॅकेज, दिग्गजांना बाजूला सारत युवा राजेश राठोड यांना संधी
"लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेले नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी परत जाण्यासाठी काही अटींवर एसटीतर्फे येत्या सोमवारपासून मोफत बस सेवा सुरु होणार आहे
कुरळप पोलीस ठाणे हद्दीत ढगेवाडी येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने सुरू असलेल्या लॉकडाऊनबद्दल पोलिसांप्रती असलेल्या काळजी बद्दल आणि स्वतःच्या कर्तव्याबद्दल पत्र देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.
कुरळप पोलीस ठाणे हद्दीत ढगेवाडी येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने सुरू असलेल्या लॉकडाऊनबद्दल पोलिसांप्रती असलेल्या काळजी बद्दल आणि स्वतःच्या कर्तव्याबद्दल पत्र देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.
कुरळप पोलीस ठाणे हद्दीत ढगेवाडी येथील इयत्ता दुसरी मध्ये शिकणाऱ्या चिमुकलीने सुरू असलेल्या लॉकडाऊनबद्दल पोलिसांप्रती असलेल्या काळजी बद्दल आणि स्वतःच्या कर्तव्याबद्दल पत्र देऊन भावना व्यक्त केल्या आहेत.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या राज्यात जाता यावे यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्राला जास्तीत जास्त ट्रेन मिळाव्यात यासाठी पवार रेल्वेमंत्र्यांच्या संपर्कात असून त्यांनी आज रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली. त्याचप्रमाणे गुजरात, बिहारसारख्या राज्यात मजुरांना राज्य सरकार घेण्यास तयार नाही, म्हणून शरद पवार बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या संपर्कात आहेत.
गडचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात अखेर दुकानं उघडली, जिल्हाधिकारी दीपक सिंघला यांनी अटीशर्थीच्या अधिन राहण्याच्या अटींवर जिल्ह्यातील संपूर्ण दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली, सकाळी 7 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दुकाने खुली राहणार
सध्या देशात राज्यात लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु आहे. यामध्ये सरकारने काही अटी शिथिल केल्या आहेत. जे परराज्यातील कामगार आपल्या राज्यात अडकून राहिले आहेत, त्यांना सोडवण्यासाठी प्रशासन काम करत आहे. काही जणांना रेल्वेने तर काहींना ट्रॅव्हल्सने पाठवले जात आहे. त्यामुळे परराज्यातील अनेक कामगारांची घरी जाण्यासाठी धावपळ होत आहे. काही जण तर पायी चालत निघाले आहेत. मात्र आता पुणे पोलिस ही ट्रॅव्हल्स कंपनीच्या मदतीने परराज्यातील कामगारांना त्याच्या गावी पोहोचण्यास मदत करत आहेत. वाघोली परिसरातील कामगारांना त्यांच्या गावी पोहोचवत आहेत. या कामगारांनी गावी जाणासाठी वाहनांची व्यवस्था करुन देण्यात आली आहे. त्यांना घरी पोहोचेपर्यत त्यांना सर्व सेवा सुविधा देण्यात आल्या आहेत.
सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खोटी माहिती प्रसारित करणाऱ्यांना पोलिसांचा दणका, कोरोना बाधित रुग्णांची खोटी आकडेवारी प्रसारित केल्याप्रकरणी युट्यूब चॅनेलवर गुन्हा दाखल,

भादंवि 188, 505, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 (ब) प्रमाणे गुन्हा दाखल,

युट्युब चॅनेल चालकास पोलिसांनी घेतलं ताब्यात, सोशल मीडियावर स्टेटस किंवा माहिती टाकलेल्यांचा पोलिसांकडून शोध सुरू
प्रविण परदेशी जाणार दोन आठवड्यांच्या सुट्टीवर,

प्रविण परदेशी यांनी मागितली दोन आठवड्यासाठी रजा,

खाजगी कारण देत दिला रजेचा अर्ज,

प्रविण परदेशी यांनी कालच पालिका आयुक्त पदावरून काढलं,

त्यानंतर लगेच परदेशींनी दिला रजेचा अर्ज
पिंपरी चिंचवड : सरकारने लाखो मजुरांना त्यांच्या राज्यात पाठवण्याचा निर्णय घेतला. अशातच औद्योगिक कंपन्या सुरू झाल्या आणि काही मजुरांना आशेचा किरण दिसला. म्हणूनच अनेक कुटुंबीयांनी महाराष्ट्रातच थांबण्याचा निर्णय घेतलाय. कारण त्यांच्या राज्यात या मजुरांना रोजगार मिळणार नाही. मुलांचं मराठी भाषेवर प्रभुत्व असल्याने त्यांच्या शाळांचा प्रश्न भेडसावेल. अशात ते त्यांच्या राज्यात गेले तर महाराष्ट्राची दारं पुन्हा लवकर उघडण्याची शक्यता नाही. म्हणून त्यांनी इथंच सुखी आयुष्य जगण्याचा निर्णय घेतलाय.
अहमदनगर :
अहमदनगरला आमदार रोहित पवारांनी केली निर्जंतुक औषध फवारणी, मतदारसंघातील खर्डा गावात केली औषध फवारणी, विशेष म्हणजे स्वतः ट्रॅक्टर चालवून केली औषध फवारणी
अहमदनगर :
अहमदनगरला आमदार रोहित पवारांनी केली निर्जंतुक औषध फवारणी, मतदारसंघातील खर्डा गावात केली औषध फवारणी, विशेष म्हणजे स्वतः ट्रॅक्टर चालवून केली औषध फवारणी
मुंबईतील सात अतिरिक्त आयुक्तांकडे सात झोनची जबाबदारी देण्यात आली आहे. येत्या 17 मे पर्यंत मुंबईतील रुग्णसंख्या दुपटीचा दर (डबलिंग रेट) 10 दिवसांवरुन 20 दिवसांवर नेण्याचे लक्ष्य आहे. प्रत्येक झोनची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त दुपारी दोन वाजेपर्यंत झोनमध्येच थांबून काम करणार आहेत.

अकोल्यात कोरोनाचे दोन नवे रूग्ण आढळले, रूग्णांची संख्या 139 वर, आतापर्यंत 11 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू, तर 14 रूग्ण बरे होऊन घरी परतलेत, सध्या उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची संख्या 113 इतकी आहे

अकोल्यात कोरोनाचे दोन नवे रूग्ण आढळले, रूग्णांची संख्या 139 वर, आतापर्यंत 11 रूग्णांचा कोरोनाने मृत्यू, तर 14 रूग्ण बरे होऊन घरी परतलेत, सध्या उपचार सुरू असणाऱ्या रूग्णांची संख्या 113 इतकी आहे
जादा फीस आकारणाऱ्या शाळांवर कारवाई करू, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा इशारा, याही वर्षी 15 जूनला शाळा सुरू करण्याचा मानस, मात्र पुढील परिस्थिती पाहून निर्णय घेऊ
मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त इक्बाल चहल पाहणीसाठी नायर रुग्णालयात पोहोचले. आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर इक्बाल चहल यांचा हा पहिलाच पाहणी दौरा आहे. नायर रुग्णालयात केवळ कोविड रुग्णांवर उपचार केले जात आहेत.
कोरोना विषाणूपासून जनतेचे रक्षण व्हावे म्हणून नांदेड जिल्ह्यात थेट सत्र न्यायाधीश रस्त्यावर उतरले आहेत. भोकर न्यायालयाचे सत्र न्यायाधीश मुजीब शेख यांनी लोकांच्या काळजीपोटी थेट रस्त्यावर उतरत ऑटोरिक्षामध्ये बसून लाऊडस्पीकर वरून लोकांनी घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. संपूर्ण भोकर शहरात फिरत ते जनजागृती करीत आहेत.
मीरा भाईंदर शहर महानगरपालिका क्षेत्रात काल रात्री 11 वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार काल एकाच दिवशी 33 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. तर काल एकही रुग्ण बरा होवून डिस्चार्ज झालेला नाही. नवे 33 रुग्ण धरुन मीरा भाईंदर क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या आता 235 एवढी झाली आहे. यातील आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 127 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
डॉ. रमेश भारमल यांची सायन हॉस्पिटलच्या संचालक आणि अधिष्ठातापदी नेमणूक करण्यात आली आहे. डॉ. रमेश भारमल हे 24X7 सायन हॉस्पिटल मध्येच राहणार आहे. रमेश भारमल यांच्यावर कुपर हॉस्पिटल आणि एचबीटी मेडिकल कॉलेज यांच्यावर लक्ष ठेवण्याची देखील जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील अनेक भागातील बॅरेकेडिंग हटवायला सुरुवात, सोमवारपासून जिल्हातील लॉकडाऊन हटविण्याची पालकमंत्र्यांनी केली होती घोषणा, अजून जिल्हाधिकारी यांनी लॉकडाऊन हटविण्या संदर्भात आदेश काढले नसले तरी त्याची तयारी सुरू झाली आहे असं म्हणता येईल.
केंद्रीय आरोग्य पथक पुणे महापालिकेकडून चालवल्या जाणाऱ्या कंट्रोल रुममध्ये दाखल. या पथकाला महापालिकेकडून कोरोनाला अटकाव करण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातायत यांच सादरीकरण केलं जातंय. त्यानंतर हे पथक पुण्याच्या भवानी पेठेतील कंटेन्मेंट झोनमधे जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. पुण्याबरोबर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील हॉस्पिटल्सनाही हे पथक भेट देणार आहे.
मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त इक्बाल चहल आज नायर हॉस्पिटल इथे पाहणीसाठी जाणार आहेत. त्यानंतर ते धारावीत जाण्याची शक्यता आहे. चहल यांनी काल (8 मे) रात्रीच आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली.
जळगाव जिल्ह्यात आणखी बत्तीस कोरोना बाधित रूग्ण आढळले
,
कोरोना बाधित रूग्णांची संख्या झाली 157
पनवेलमधील कामोठेमध्ये 56 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण, पनवेल आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडून कामोठे कंटेन्मेंट झोन जाहीर
पंढरपूर :दुपारी 2 वाजता तामिळनाडूसाठी ट्रेन सुटणार, 22 मार्चपासून तामिळनाडूचे 800 मजूर, विद्यार्थी पंढरपूरमध्ये अडकले होते
कोरोनाच्या काळात अंखडपणे काम करणाऱ्या पोलिस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातील गिर्हारोहक पुढं सरसावलेत. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून पंधराशे गिर्यारोहकांची टास्क फोर्स तयार करण्यात आली आहे. मुख्यमंत्री कार्यालय आणि ठिकठिकाणचे प्रशासकीय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून गिर्यारोहकांची टीम कोरोना विरुद्धच्या लढाईत रस्त्यावर उतरण्यास सज्ज झालीय.
नांदेडमध्ये आणखी 2 रुग्णांची वाढ, एकूण संख्या 40 वर, यापैकी 4 जणांचा मृत्यू
सांगली :

सिगारेट का दिली नाही या कारणातून चिडून 8 जणांनी एक दुकान, स्विफ्ट कार पेटवली, तर 3 दुचाकीचे केले नुकसान
नालासोपारा : नालासोपाऱ्यातून मध्यरात्रीच्या सुमारास शेकडो मजूर, कामगार नागरिकांचे उत्तर प्रदेश च्या दिशेने स्थलांतर सुरू, पायी, सायकल, टेम्पो, रिक्षाच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद महामार्गावरून नागरिक स्थलांतर करीत आहेत
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात पुन्हा एका कोरोनाबाधित रुग्णाची भर पडली असून रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे तर 17 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. मुंबई महापालिकेत वाहन चालक म्हणून कार्यरत असलेल्या सफाळे भागात ५२ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सर्वेक्षणात SARI/ILI ची लक्षणे आढळल्याने सदर रुग्णाची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. त्यामध्ये तो कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. शुक्रवारी (8 मे) रात्री उशिरा त्याचा कोरोना रिपोर्ट प्राप्त झाला असल्याचे समजते.
नाशिक जिल्ह्यात 50 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यापैकी 49 जण मालेगावातील आहेत. तर नाशिक शहरातील एकाला कोरोनाची लागण झाली आहे. नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 622 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी
497 हे मालेगावात तर 45 जण नाशिक शहरात आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला असून 45 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
औरंगाबादमध्ये रात्रीतून कोरोनाचे 17 रुग्ण वाढले आहेत. यामध्ये संजयनगर 6, बाबर कॉलनी 4, कटकट गेट 2, भवानीनगर 2, रामनगर सिल्कमिल आणि असेंफियाबमधील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. या 17 रुग्णांमध्ये 10 स्त्रिया आणि सात पुरुष आहे. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या 495 वर पोहोचली आहे. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून 29 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
अमरावतीमध्ये दोन जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये 53 वर्षीय पुरुष 36 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा आता 78 वर पोहोचला आहे. त्यापैकी 11 जणांचा मृत्यू झाला असून पाच जण उपचारानंतर बरे होऊन घरी गेले आहेत. तर सध्या 62 जणांवर उपचार सुरु आहेत.

नाशिक जिल्ह्यात 50 नव्याने कोरोना पॉझिटिव्ह, मालेगावमधील 49 जणांना तर नाशिक शहरातील एकाला लागण, जिल्ह्यात आतापर्यंत 622 कोरोनाबाधित यापैकी एकट्या मालेगावात 497 जणांना कोरोना, जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनामुळं19 जणांचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहे. आजरामधील एक पुरुष आणि महिला, तर चंदगडमधील पुरुष कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. सीपीआरकडे रात्री उशिरा त्यांचे अहवाल प्राप्त झाले. एकाच वेळी तीन रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोल्हापुरात खळबळ उडाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आता 17 वर पोहोचली आहे.
परराज्यातून आलेल्या नागरिकांचं क्वॉरंटाईन होतं नसल्याने खिद्रापूर गावातील दक्षता समितीने दिले राजीनामे. कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर इथला प्रकार. महिलांचा ग्रामपंचायतीमध्ये ठिय्या. दक्षता समिती अध्यक्ष, सचिव आणि ग्रामसेवक मनमानी कारभार करत असल्याचा गावकऱ्यांचा आरोप. तर आजपासून परराज्यातून आलेल्या नागरिकांचे क्वॉरंटाईन केलं जाईल असं समितीचे आश्वासन.
वरळी कोळीवाड्यातील काही भाग डिकंटेंट करण्याबाबत उद्या निर्णय होण्याची शक्यता आहे. वरळी कोळीवाड्यातील 70% भागात गेल्या 15 दिवसांपासून एकही नवा रुग्ण नाही. मात्र, 30% भागात अजूनही काही रुग्ण सापडतायेत. त्यामुळे हा 30% भाग निरीक्षणाखाली ठेवण्याची आवश्यकता आहे. पोलीस आणि पालिका प्रशासनाच्या समन्वयानं वरळी कोळीवाड्यात अॅक्शन प्लान राबवला जाणार आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1089 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 19,063आहे. तर दिवसभरात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 169 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या बारा हजारावर गेली आहे.
मुंबईमध्ये सर्व प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी मुंबई पोलीस यंत्रणा ही कार्यक्षम व सक्षम आहे. याठिकाणी आर्मीची नियुक्ती होणार ही निव्वळ अफवा आहे, असे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंडच्या राज्य राखीव दलातील आणखी 15 जवानांचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटीव्ह आला. दौंड तालुक्यात आता एकूण 25 कोरोनाग्रस्त आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

राज्य राखीव दलातील जवानांची काल कोरोना टेस्ट करण्यात आली.


SRPF गट 7 चे 100 पोलीस कर्मचारी मुंबईत बंदोबस्तावर गेले होते. मुंबईत रेड झोन परिसरात त्यांनी बंदोबस्त केला होता. बंदोबस्त नंतर 6 मे रोजी दौंड मुख्यालयात दाखल झाल होते.
साताऱ्यातील भनंग येथे गरीबीला कंटाळून युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. वैभव जाधव असे 19 वर्षीय आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. घरात अपंग आई-वडील आणि भाऊ आहेत. मेढा पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनचे आदेश असतांना ही बुलडाण्याच्या खांमगाव येथील मुख्य बाजारातील छुप्या पद्धतीने सुरू असलेल्या पंचरत्न रेडिमेड कापड दुकानावर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी आपल्या पथकासह आज दुपारी छापा मारला. यावेळी दुकान बंद असल्याचे भासवून दुकानाच्या आत मध्ये कापडांची विक्री सुरू होती. या प्रकरणी दुकानमालक पवन किशनचंद वर्मा यांच्या विरुद्ध खांमगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादच्या रेल्वे अपघाताच्या घटनेने व्यथित झालो : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांची बदली. मुंबईत रुग्णसंख्या आवरत नसल्याने कारवाई केल्याची माहिती. नगरविकासमध्ये अति. मुख्य सचिवपदी बदली करण्यात आली आहे. तर, इक्बाल चहल मुंबई मनपाचे नवे आयुक्त. चहल हे सध्या नगरविकासमध्ये प्रधान सचिव होते.
सायन व्हिडिओ प्रकरणानंतर बीएमसीने मुंबईतील दोन महत्त्वाच्या रुग्णालयावर नियंत्रण ठेवण्यासाठी आयएस अधिकाऱ्याची केली नेमणूक

केली आहे. प्राजक्ता लवंगरे यांच्यावर सायन आणि कूपर रुग्णालयाची जबाबदारी सोपवली आहे.

दोन्ही रुग्णालय मृतदेहांची विल्हेवाट लावण्यात अपयशी ठरत असल्याचे दिसून आले होते.

सायन रुग्णालय प्रशासनानं व्हिडीओ प्रकरणी चौकशीसाठी आणखी 24 तास वाढवून मागितले असून अहवाल उद्या येणार आहे.
नवी मुंबई : शहरातील एपीएमसी मार्केट 11 मे ते 17 मे पर्यंत बंद राहणार आहे. कोरोना रूग्ण वाढीचे प्रमाण वाढल्याने मार्केट बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोकण आयुक्त, नवी मुंबई आयुक्त, पोलीस, माथाडी नेते, व्यापारी वर्ग यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. एक आठवडा मार्केट बंद राहणार आहे. या वेळेत माथाडी, व्यापारी वर्गाची पुर्ण तपासणी होणार आहे. येणाऱ्या गाड्यांना पास देण्यात येणार आहे. किरकोळ व्यापार पुर्णपणे बंद होणार असून एपीएमसी मधील भाजीपाला, फळ, कांदा, बटाटा, मसाला, दाना, पाचही मार्केट बंद राहणार.
अकोल्यात आज एका कोरोनाबाधित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.अकोल्यातील मृतांचा आकडा 11 वर गेला आहे. आतापर्यंत 14 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून अकोल्याची रुग्णसंख्या 129 वर गेली आहे.
मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना दिलेले 100% उपस्थितीचे आदेश महापालिकेकडून रद्द; आता कर्मचाऱ्यांची 75% उपस्थिती अनिवार्य.
पुणे अग्निशमन दलातील पन्नास वर्षांचा एक कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह. त्यानंतर या कर्मचाऱ्याला नोबेल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं असुन या कर्मचार्याची पत्नी आणि मुलीचीही कोरोना टेस्ट करण्यात येतीय. हा कर्मचारी नायडू हॉस्पिटल शेजारी असलेल्या अग्निशमन दलाच्या केंद्रात काम करत होता.
आज रात्री 8 वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करतणार आहेत.
विधानपरिषद निवडणुकीत 5 उमेदवार उतरवायचे की 6 यावर निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. निवडणूक बिनविरोध करायची असेल तर महाविकास आघाडीला 5 उमेदवारांचे अर्ज भरावे लागतील. महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले तर प्रत्यक्ष निवडणूक होईल.
विधानपरिषद निवडणुकीत 5 उमेदवार उतरवायचे की 6 यावर निर्णय घेण्यासाठी महाविकास आघाडीची बैठक सुरू आहे. निवडणूक बिनविरोध करायची असेल तर महाविकास आघाडीला 5 उमेदवारांचे अर्ज भरावे लागतील. महाविकास आघाडीने सहा उमेदवार रिंगणात उतरवले तर प्रत्यक्ष निवडणूक होईल.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राची परीक्षा सोडून इतर परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना आतापर्यंतच्या आधीच्या गुणांच्या परफॉर्मन्सवर पुढच्या वर्गात प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पूर्वीच्या वर्षाचा परफॉर्मन्स 50 टक्के गृहीत धरलं जाईल आणि सध्याचा परफॉर्मन्स 50 टक्के ग्राह्य धरला जाईल. त्यानुसार ग्रेड दिले जातील आणि पुढच्या वर्गात पाठवलं जाईल. ज्याला परफॉर्मन्सवर दिलेले ग्रेड कमी वाटत असतील त्याला पुढल्या वर्गात गेल्यावर ऐच्छिक परीक्षा देत येणार आहे. त्याचं वेळापत्रक विद्यापीठ ठरवेल, अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.
विधानपरिषदेसाठी भाजपकडून डॉ. अजित गोपचडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. आज दुपारी दोन वाजता चारही उमेदवार उमेदवारी अर्ज भरणार आहेत.
भाजपकडून विधानपरिषदेसाठी डॉ. अजित गोपछेडे, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर आणि रणजितसिंह मोहिते यांच्या नावावर शिक्कामोर्तब, आज चारही उमेदवार दुपारी 2 वाजता भरणार उमेदवारी अर्ज
मुंबईतील वाढती रुग्णसंख्या पाहता केंद्राची टीम आता मुंबईत दर आठवड्याला येणार, केंद्राची टीम येऊन करणार पाहणी, एक टीम आज मुंबईत, धारावी, वरळी सारख्या ठिकाणी भेट देऊन राज्याला सूचना देत आहेत, राज्यानेच केली केंद्राला दर आठवड्याला टीम पाठवण्याबाबत विनंती केल्याची आरोग्यमंत्री टोपे यांची माहिती
औरंगाबादमध्ये 16 पायी जाणाऱ्या लोकांचा अपघातामध्ये मृत्यू झाला आहे. ही चीड आणणारी गोष्ट आहे. आपापल्या राज्यांमध्ये जाणारे हे लोक काही पाकिस्तानचे नाहीत. ते आपल्या देशाचे आहेत. मग त्यांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सरकार का घेत नाही? असा सवाल भाजपाचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.

यासोबतच कोरोनामुळे किती लोक मरतील हा संशोधनाचा विषय असला तरी, राज्यातील धोरणाच्या अभावाचे किती बळी ठरणार आहेत? असा संतप्त सवाल सुरेश धस यांनी उपस्थित केला आहे.
येत्या दहा दिवसात सार्वजनिक वाहतूक सुरु होणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती
बर्लिन फिल्म फेस्टिवलने जाहीर केलेल्या टॉप 10 दिग्दर्शकात मराठमोळ्या अक्षय इंडिकरचा समावेश. अक्षयचा स्थलपुराण हा चित्रपट बर्लिनमध्ये याच वर्षी दाखवला गेला होता. अनेक मातब्बर दिग्दर्शकांच्या यादीत अक्षय. अक्षय मूळ सोलापूरचा. त्याने यापूर्वी उदाहरणार्थ नेमाडे, त्रिज्या असे सिनेमे केले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्याकरता दिलासादायक बातमी आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातील तब्बल 344 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. मागील 6 दिवसामध्ये 11 जणांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने चिंतेत भर पडली होती. हे सर्व जण मुंबईहून परत आले होते. पण आता मात्र 344 रिपोर्ट निगेटिव्ह आल्यानं जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे.
करमाड येथील रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख
मुख्यमंत्री सहायता निधीतून देणार- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचे चार नवे रुग्ण सापडले आहेत. काल्हेर गावात 3 आणि डुंगे गावात 1 कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. भिवंडी ग्रामीणमधील रुग्णांचा आकडा 14 वर पोहोचला असून शहरात 19 कोरोना रुग्ण आहे. अशाप्रकारने भिवंडीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण 33 आहे. त्यापैकी भिवंडी शहरातून तीन आणि ग्रामीण भागातील तीन रुग्ण बरे झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापैकी 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रूग्ण हे अमळनेर शहरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 114 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्यातील अमळनेर इथे स्वॅब घेतलेल्या 78 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल नुकतेच प्राप्त झाले आहेत. यापैकी 64 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून चौदा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेले सर्व रूग्ण हे अमळनेर शहरातील आहे. जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 114 इतकी झाली असून त्यापैकी चौदा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.
हिंगोलीत राज्य राखीव पोलिस दलातील कोरोनाबाधित जवान सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि नर्स यांना शिवीगाळ करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जवानांवर कारवाई करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने राज्य राखीव पोलीस दलाचे समादेशक यांना पत्र लिहलं आहे. तर जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी जवानांना सक्त ताकीद देत वर्तवणूक न सुधारल्यास कारवाई करण्याचा इशारा आहे.
औरंगाबाद कोरोनाचे 18 रुग्ण वाढले. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णाची संख्या 396 वर पोहोचसी. आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला असून 29 बरे होऊन त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
स्वच्छ झालेली पंचगंगा पुन्हा प्रदूषित कराल तर कारवाई होणार, निर्माल्य टाकणाऱ्या व्यक्तीला नदीत उतरुन निर्माल्य बाहेर काढण्यास भाग पाडले, पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी दाखवली सतर्कता, संबधित व्यक्तीचे प्रबोधन करुन दंडात्मक कारवाई केली
नाशिकमधील मद्याची दुकाने सकाळी 9 वाजता सुरु होणार आहेत. सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत दारु विक्रीला परवानगी आहे. याआधी 10 ते 4 ही वेळ निश्चित करण्यात आली होती.
पालघर हत्याकांड प्रकरणी पोलीस अधीक्षक गौरव सिंह सक्तीच्या रजेवर, गृहमंत्री अनिल देशमुख यांची कारवाई
नागपुरात आणखी 10 कोरोना रुग्ण वाढले. आता एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 265 वर.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1216 ने वाढला असून आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 17,974 आहे. तर दिवसभरात 43 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 207 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या अकरा हजाराच्यावर गेली आहे.

एबीपी माझाच्या मजुरांच्या स्थलांतर बातमीची राज्यमंत्री बच्चू कडू यांच्याकडून दखल, अमरावतीहून प्रहारचे कार्यकर्ते वाहनं घेऊन नाशिक-पुणे-मुंबईकडे निघणार, सगळ्या मजुरांना पोटभर जेवण देणार त्यानंतर त्यांना तेथून मोठ्या वाहनाने वाशिम-अकोला-अमरावती जिल्ह्यात घेऊन येणार, राज्यमंत्री बच्चू कडू यांची एबीपी माझाला माहिती
सोलापूरात आज एका दिवसात तब्बल 29 जणांचे कोरोना अहवाल पॉजिटिव्ह, तर एकाचा मृत्यू. आतापर्यंत एका दिवसात आढळलेले सर्वात जास्त पॉजिटिव्ह रुग्ण. 29 रुग्णांच्या वाढीमुळे सोलापुरात कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 182 झाली आहे. आज मृत्यू झालेली 48 वर्षीय महिला 6 तारखेला पहाटे उपचारासाठी दाखल झाली होती. उपचार सुरू असताना 6 तारखेला दुपारी 3 वाजता महिलेचा मृत्यू झाला. आज या महिलेचा अहवाल पॉजिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.
राष्ट्रवादी कडून शशिकांत शिंदे आणि अमोल मिटकरी यांना मिळणार उमेदवारी, लवकरच होणार घोषणा
गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (8 मे) लग्नगाठ बांधणार आहेत. 29 मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र, लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत. मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. या लग्नाला अरुण गवळी सुद्धा उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील. सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जाणार आहेत.
सोलापूरात आज एका दिवसात तब्बल 29 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून एकाचा मृत्यू झाला आहे,

आतापर्यंत एका दिवसात आढळलेले सर्वात जास्त पॉझिटिव्ह रुग्ण आहे. सोलापूरात कोरोना बाधितांची एकूण संख्या आता 182 वर गेली आहे.

आज मृत्यू झालेली 48 वर्षीय महिला 6 मे ला पहाटे उपचारासाठी दाखल झाली होती.

उपचार सुरू असताना 6 मे ला दुपारी 3 वाजता महिलेचा मृत्यू झाला. आज या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आतापर्यंत सोलापूरात कोरोनामुळे 11 जणांनी गमावले आहेत.
ठाण्यात एका दिवसात 64 रुग्णांची नोंद, आजपर्यंतचा सर्वात जास्त आकडा. एकूण रुग्णसंख्या 560. सर्वाधिक रुग्ण लोकमान्य नगर - सावरकर नगर प्रभाग समितीत. तब्बल 35 रुग्ण एकाच प्रभाग समितीत आढळल्याने खळबळ.
देड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी, देगलूर तालुक्यातील खानापूर इथं गारांचा पाऊस
कुलगुरुंच्या समितीचा परीक्षांबाबतचा अहवाल शासनाकडे सादर, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची मुख्यमंत्र्यांशी बातचीत, उद्या दुपारी 1 वाजता परीक्षांबाबत निर्णय जाहीर करणार, उदय सामंत यांची माहिती
वाशी येथील सिडको एग्झिबिशन सेंटरमध्ये करोना विरुद्धच्या लढ्यासाठी तात्पुरते काव्हिड रुग्णालय उभारण्याचा निर्णय नगरविकास मंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
अहमदनगर : संगमनेरात 68 वर्षीय कोरोनाबाधिताचा मृत्यू, धांदरफळ गावातील व्यक्तीचा मृत्यू, तीन दिवसापूर्वी संगमनेर येथील खाजगी हास्पिटलमध्ये उपचार, मुंबईला पाठवलेले स्वॅबचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, रिपोर्ट येण्यापूर्वीच वृद्धाचा मृत्यू
हिंगोली जिल्ह्यातील कृषी केंद्र व कृषी विषयक सर्व दुकाने पूर्ण वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत उद्यापासून सुरू ठेवण्यास परवानगी
सांगली शहरातील व्यापारी संघटना आक्रमक, तीन दिवसात दुकाने उघडण्यास परवानगी द्या ,अन्यथा स्वत:हून सुरक्षितततेचे उपाय शोधून दुकाने उघडणार, व्यापारी एकता असोसिएशनचा जिल्हा प्रशासनाला इशारा
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये दारूच्या दुकानावर चक्क प्राध्यापकांची ड्युटी लावली. संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या 9 प्राध्यापकांची दारू दुकानांवर ड्युटी लावली आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने हा अफलातून निर्णय घेतला आहे.
अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूरमध्ये दारूच्या दुकानावर चक्क प्राध्यापकांची ड्युटी लावली. संत गाडगेबाबा महाविद्यालयाच्या 9 प्राध्यापकांची दारू दुकानांवर ड्युटी लावली आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगवर लक्ष ठेवण्याची त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे. जिल्हा प्रशासनाने हा अफलातून निर्णय घेतला आहे.
देड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलक्या पावसाची हजेरी, देगलूर तालुक्यातील खानापूर इथं गारांचा पाऊस
औरंगाबादेत 19 दिवस कोरोनाशी संघर्ष केल्यानंतर बरं झालेल्या रुग्णाने घाटी रुग्णलयातील डॉक्टरांचे पाय धरले. या रुग्णाचा दहा एप्रिलला माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. जिल्हा रुग्णालयात भरती होतो. रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने अत्यवस्थ परिस्थितीत घाटीत भरती करण्यात आलं होतं. 19 दिवसांच्या उपचाराने मी कोरोनामुक्त होऊन जीवदान मिळाले. लढण्याची जिद्द ठेवली तर या आजारातून बाहेर पडता येतं. मी लढलो, डॉक्टरांवर विश्वास ठेवला. त्यांचे ऐकले म्हणून जिंकलो. घाटीचे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही, अशा शब्दात त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या आणि डॉक्टरांचे पाय धरले.
पालखी सोहळा परंपरा खंडित न करण्याची भूमिका सर्वच मानाच्या पालखी सोहळ्याचे मानकऱ्यांनी मांडली असताना आता संत ज्ञानेश्वर व संत तुकारामांच्या पादुका शासनाने हेलिकॉप्टरमधून पंढरपूरला नेण्याचा प्रस्ताव देहू संस्थानचे विश्वस्त व विठ्ठल मंदिर समिती सदस्य शिवाजीराव मोरे महाराज यांनी मांडला आहे
सातारा : सातारा जिल्ह्यात आणखी 18 कोरोना पॉझिटिव्ह, सकाळपासून जिल्ह्यात 21 रूग्णांची वाढ, सातारा जल्ह्यात एकूण 113 रुग्ण कोरोना बाधित
पुण्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड (वय 48) यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. चार पाच महिन्यांपूर्वीच त्यांची पुण्यात अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून नेमणूक झाली होती. ते नुकतेच कामावर रुजू झाले होते.
दरम्यान आज सकाळी त्यांना घरी असतानाच हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर तातडीने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु त्यांचा मृत्यू झाला
मंत्रालयातील एका विभागाचे प्रधान सचिव आले कोविड पॉझिटिव्ह, संबंधित अधिकारी हे परराज्यातील मजूर आणि राज्यातील अडकलेल्या नागरिकांसाठी व्यवस्था करण्याचे काम करत होते. या संदर्भात काम करण्याची जबाबदारी सचिवांच्या विशेष गटाला दिली होती. त्या गटात हे अधिकारी काम करत होते. या अधिकाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर सचिव क्वॉरंटाईनमध्ये गेले आहेत. मंत्रालयात या आधी चार जण कोरोना बाधित झाले होते. त्यानंतर दोन दिवस मंत्रालय बंद करण्याची वेळ सरकारवर आली होती
मालेगावात 4 नवे कोरोना बाधित
रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये 3 पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे.
मालेगावातील कोरोना बाधितांचा आकडा आता 417 वर पोहोचला आहे. तर नाशिक जिल्ह्यात एकूण 511 रुग्ण आहेत.
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटवरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची माफी मागावी, अन्यथा कोल्हापुरात प्रवेश दिला जाणार नाही. असा इशारा कोल्हापूर शिवसेनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना देण्यात आला आहे. तसेच कोल्हापुरातील राजर्षी शाहू समाधी स्थळी निदर्शनंही करण्यात आली आहेत.
चंद्रपूर : नांदेड इथून कोरोनाबधित रुग्ण पळाल्यानंतर त्यातील तीन जण चंद्रपूर जिल्ह्यात आले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शोध घेऊन दोन दिवसांपूर्वी गडचांदूर शहरात पोलिसांनी तीन लोकांना पकडलं आणि क्वॉरन्टाईन केलं. आज त्यांना नांदेड प्रशासनाकडे सोपवण्यात आलं. मात्र पकडले गेलेले हे तिन्ही व्यक्ती नांदेडमधून पळालेलेच होते काय, याची माहिती चंद्रपूर पोलिसांना नाही. ती ओळख आता नांदेड पोलीस पटवणार आहेत. त्यामुळे आज या तिन्ही लोकांना नांदेडहून आलेल्या रुग्णवाहिकेत परत पाठवण्यात आलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेरबंद बिबट्याची ही तपासणी केली जाती. हा बिबट्या पुण्याच्या आंबेगाव तालुक्यात आज सकाळी जेरबंद झाला. शिरामळासह बहुतांश गावात या बिबट्याचा वावर होता. त्यामुळे नागरिक भयभीत झाले होते. म्हणूनच बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाने सापळा रचला होता, आज या सापळ्यात हा बिबट्या फसला. वनविभागाला हे यश मिळाल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. या बिबट्याची रवानगी जुन्नर बिबट्या निवारा केंद्रात करण्यात आली आहे. पण कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात हा बिबट्या जेरबंद झाल्याने आता खबरदारी घेण्यात येती. या बिबट्याला इतर बिबट्यांपासून दूर ठेवण्यात आलं आहे. अर्थात क्वॉरंटाईन करण्यात आलं आहे. तसेच या बिबट्याला कोरोनाची लक्षणं आहेत का याची ही तपासणी केली जाणार आहे. अशी माहिती माणिकडोह बिबट्या निवारा केंद्राने दिली आहे.
जालना : जालन्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह जवानांवर गुन्हा दाखल झाला आहे. मालेगाव बंदोबस्तावरुन पळून आल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. 29 एप्रिल रोजी हे जवान कुठलेही कारण न देता, वरिष्ठांना न सांगता जालन्यात आले. त्यानंतर ते स्वतःच दवाखन्यात दाखल झाले.
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून भादंवि कलम 188 अंतर्गत 96,231 गुन्हे दाखल केले असून 18,858 जणांना अटक केली आहे. तर 53,330 वाहनं जप्त करण्यात आली आहे. दंड म्हणून आतापर्यंत 3,56,81,994 रुपये जमा झाले आहेत. पोलिसांवरील हल्ल्याच्या 189 घटना घडल्या आहेत. तर 487 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

राज्यात आत्तापर्यंत 531 पोलिसांना कोरोनाची लागण, 51 अधिकारी आणि 480 कर्मचारी, 39 जणांना डिस्चार्ज, 43 अधिकारी, 444 कर्मचारी सद्य स्थितीत कोरोनाबाधित तर 5 जणांचा मृत्यू
औरंगाबाद | औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांच्या आणाभाऊ साठे चौकातील कार्यालयासमोर गर्दी जमा झाली आहे. जलील यांच्या कार्यालयात परप्रांतीय मजुरांना अर्ज भरून दिले जातील असे आवाहन करण्यात आलं होतं. आज सकाळीच परप्रांतीय मजुरांनी त्याच्या कार्यालयाबाहेर गर्दी केली. शेवटी पोलिसांना घेऊन हस्तक्षेप करावा लागला. कुठल्याही प्रकारे सोशल डिस्टन्स इथं पाळला गेला नाही.
गृहमंत्री अनिल देशमुख आज पालघर दौऱ्यावर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
गडचिंचले साधू हत्याप्रकरणाबाबत सर्व देशात खळबळ माजली होती. या प्रकरणात कासा पोलिस ठाण्यातील 5 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झाली तर 35 कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. याच साधू हत्या प्रकरणाबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आज कासा पोलिस ठाणे इथे आज येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
सातारा शहरासोबत कराडमध्ये नव्या दोन रुग्णांची भर पडली आहे.
सकाळपासून जिल्ह्यात तीन रूग्णांची वाढ झाली आहे.
सातारा जिल्ह्यात एकूण 95 रुग्ण कोरोना बाधित आहेत.
रत्नागिरी तालुक्यातील नेवरे येथे आंबा बागेला आग लागून जवळपास अडीच कोटींचं नुकसान झालं आहे. घेवरचंद खेतमल जैन यांची ही बाग आहे. या बागेत 2 हजार 300 आंबा झाडे, 785 काजू झाडे जळून खाक झाली आहेत. विजवाहिनीमध्ये स्पार्किंग झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आंबा बागेतून जाणाऱ्या वीज वाहिनीमध्ये स्पार्किंग झाल्याने त्याच्या ठिणग्या गवतावर पडल्या. त्यानंतर गवताने पेट घेतल्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले. त्यानंतर अग्निशामक दलाला बोलविण्यात आले. मात्र तोपर्यंत आंबा बाग जळून खाक झाली होती.
स्वारगेट डेपो मधून पहिल्यांदा 43 विद्यार्थी यांना घेऊन 2 बस आज सोडण्यात येणार आहे. पुणे : स्वारगेटमधील एसटी डेपो इथून सकाळी अकरा वाजता 43 स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांना नगरला सोडण्यात येणार आहे. नगर जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून तशी परवानगी मिळाली आहे. सृजन फाऊंडेशन आणि MPSC STUDENTS RIGHTS यांच्या पुढाकाराने हा उपक्रम सुरु केला आहे. त्यावर पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाने देखील सकारात्मक निर्णय घेतला. त्यामुळे आज पहिली बस रवाना होत आहे.
जालना | जालन्यातील दोन कोरोना पॉझिटिव्ह जवानांवर गुन्हा, मालेगाव बंदोबस्तावरून पळून आल्याचे सिद्ध, सदर बाजार बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, 29 एप्रिल रोजी हे जवान कुठलेही कारण न देता, वरिष्ठांना न सांगता जालन्यात दाखल झाले
औरंगाबाद : जिल्ह्यात 17 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहे. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 373 वर पोहोचली आहे. यापैकी 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 28 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.
सिंधुदुर्ग : कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे अडकलेले आंध्रप्रदेश येथून भूगर्भ सर्वेक्षणासाठी आलेल्या भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेच्या 11 जणांना आज आंध्रप्रदेश येथे रवाना करण्यात आले. यामध्ये सर्वांची आरोग्य तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात अडकलेल्या परराज्यांतील मजूर, विद्यार्थी तसेच कामगार वर्गाला त्यांच्या मूळगावी जाण्यासाठी शासनाने परवानगी दिली आहे. भारतीय भूगर्भ सर्वेक्षण संस्थेचे ११ कर्मचारी फेब्रुवारी महिन्यात भूगर्भ सर्वेक्षणासाठी देवगडमध्ये आले होते. त्यांचे पडेल ते तिर्लोट या किनारपट्टी भागात भूगर्भ सर्वेक्षण सुरु होते. लॉकडाऊनमुळे सर्व कर्मचारी देवगड येथे अडकले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना देवगड येथून त्यांच्या आंध्रप्रदेश येथील मूळगावी रवाना करण्यात आले. यावेळी सर्वांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्यासह प्रशासनाचे आभार व्यक्त केले.
नागपूर : पार्वती नगरात काल (6 मे) 22 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सात पोलीस कर्मचाऱ्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. या मृत तरुणाचा काका पोलीस दलात कार्यरत असून तो त्याच्या घराच्या शेजारीच राहत होता. तसंच त्याने या तरुणाला रुग्णालयात नेण्यास मदत केली होती. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत काका आणि त्याची नियुक्ती असलेल्या पोलीस स्टेशनचे इतर सहा कर्मचारी अशा एकूण सात पोलिसांना क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. सध्या या सातही पोलिसांना रवीभवन येथील क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
नागपूर : पार्वती नगरात काल (6 मे) 22 वर्षीय तरुणाचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर सात पोलीस कर्मचाऱ्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. या मृत तरुणाचा काका पोलीस दलात कार्यरत असून तो त्याच्या घराच्या शेजारीच राहत होता. तसंच त्याने या तरुणाला रुग्णालयात नेण्यास मदत केली होती. त्यामुळे पोलीस दलात कार्यरत काका आणि त्याची नियुक्ती असलेल्या पोलीस स्टेशनचे इतर सहा कर्मचारी अशा एकूण सात पोलिसांना क्वॉरन्टाईन करण्यात आले आहे. सध्या या सातही पोलिसांना रवीभवन येथील क्वॉरन्टाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी लॉकडाऊनदरम्यान मुंबईतील शिथिलता रद्द करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अत्यावश्यक सेवा- किराणा व मेडिकल दुकाने वगळता इतर सर्व सेवा बंद ठेवण्याचे आदेश होते. मात्र, या निर्देशात बदल करुन आता इलेक्ट्रिक आणि हार्डवेअरची दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. कारण, जीवरक्षक वैद्यकीय उपकरणे, वैद्यकीय सुविधांसाठी आवश्यक आयटी सिस्टिम यांच्या बिघाडानंतर त्यांची दुरुस्ती होणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक, हार्डवेअरची दुकाने बंद असल्याने त्यात अडचणी येत आहेत. म्हणून प्रत्येक वॉर्डमध्ये तेथील सहाय्यक आयुक्तांना एका रस्त्यावरील एकच इलेक्ट्रिक आणि हार्डवेअरचे दुकान खुले ठेवण्यास परवानगी देण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 99 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ. तर, आज दिवसभरात 7 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 127 इतका झाला आहे. तर, जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2300 झाली आहे.
पुण्यात आज दिवसभरात 7 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 127 वर

अकोल्यात आज दिवसभरात कोरोनामुळे चार जणांचा मृत्यू, दिवसभरात पाच नवीन रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या 82 वर, आतापर्यंत 14 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 1233 ने वाढला असून आतापर्यंतचा सर्वाधिक आकडा आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्या 16,758 आहे. तर दिवसभरात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 275 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईतील रुग्णसंख्या दहा हजाराच्या वर आहे.
सोलापुरात आज पुन्हा 8 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह आले तर एका व्यक्तीचा मृत्यू झाला. आजपर्यंत एकूण 153 जणांचे अहवाल पॉसिटिव्ह आले असून कोरोनामुळे आतापर्यंत एकूण 10 जणांचा मृत्यू झाला आहे. 57 वर्षीय पुरुष 4 एप्रिल रोजी संध्याकाळी गंभीर अवस्थेत शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. काल सकाळी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आज त्यांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. आज आढळलेले सर्व रुग्ण सोलापूर शहर परिसरातील आहेत.
पुण्यात प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील भागांत अत्यावश्यक सेवा बजावणारी तसेच प्रशासनाने मंजुरी दिलेली पाच दुकानांच्या वेळांमध्ये पुन्हा बदल करत ही दुकाने आता सकाळी सात ते सांयकाळी सात या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.
औरंगाबादमध्ये आणखी सात कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी एकूण रुग्णसंख्या 356 वर पोहचली आहे. दिवसभरात 35 रुग्ण वाढले. आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 26 रुग्ण बरे होऊन घरी पोहचले आहे.
खासगी रुग्णालय अवाजवी दर लावत होते त्यावर चाप लावण्याचे काम केले आहे : राजेश टोपे
वैद्यकीय क्षेत्रातील सर्व रिक्त जागा भरणार : आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबईमुळे नवी मुंबईत कोरोना बाधितांची संख्या 140-150 च्या घरात गेली आहे. शहराची एकूण पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या 395 वर पोहोचली आहे. 50 टक्के रूग्ण मुंबईमुळे नवी मुंबईत वाढले आहेत. दर

रोज मुंबईत अत्यावश्यक सेवेत कामाला जाणाऱ्यांची संख्या 1600 आहे.

सध्या तरी सरसकट सर्वांना नवी मुंबईच्या सिमा बंद केलेल्या नाहीत.

फक्त डॉक्टर , नर्स, वॉर्ड बॉय, बेस्ट ड्रायव्हर, कंडक्टर यांची मुंबईत राहण्याची सोय करावी अशी मागणी नवी मुंबईच्या आयुक्तांनी केली आहे.

सातारा : वाधवान बंधूंना घेऊन सीबाआयचं पथक महाबळेश्वरमध्ये, दिवाण बंगल्याची झाडाझडती सुरू, धीरज वाधवान आणि कपिल वाधवान या दोघांना घेऊन सीबाआयचं पथक बंगल्यात, महाबळेश्वर पोलिसही दाखल

परभणी जिल्ह्यात दारूचे दुकान बंद आहेत याचाच फायदा घेत ग्रामीण भागात अनेक प्रकारचे रसायन टाकून गावठी हातभट्टीची दारू तयार करून विक्री केली जात आहे. अशाच प्रकारे दारू विक्री करणाऱ्या परभणीच्या मानवत तालुक्यातील मानोली शिवारात पोलिसांच्या विशेष पथकाने कारवाई करून तब्बल 800 लिटर गावठी हातभट्टी दारू नष्ट करत एका महिलेवर कारवाई केली आहे. पाण्याच्या टाक्यांमध्ये ही दारू भरून दाट झाडाझुडपांमध्ये या टाक्या लपवण्यात आल्या होत्या. मात्र विशेष पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांनी या सर्व टाक्या शोधून यातील दारू नष्ट केली आहे.
पालघर मॉब लिचिंग प्रकरणी 22 आरोपींना वाडा पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले होते.
यातील एका आरोपीला करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाल्यानंतर

आरोपी आणि वाडा पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच इतर काही अधिकारी अशा 84 जणांचे रिपोट तपासणीसाठी पाठविण्यात आले होते.
त्यापैकी 82 रिपोट निगेटिव्ह आले असून दोन रिपोट अजून येणं बाकी आहे, अशी माहिती वाडा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक प्रदीप जाधव यांनी दिली आहे.
अकोल्यात कोरोनाचा सातवा मृत्यू झाला आहे. खंगणपुरा येथील 65 वर्षीय वृद्धाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 2 मे रोजी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अकोल्यात कोरोनाचे एकूण 77 रूग्ण आहेत. त्यातील 13 रूग्ण रोगमुक्त होऊन घरी परतले आहेत.
आषाढी यात्रेला संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा निघण्याबाबत मानकरी, विश्वस्त आणि इतर महत्वाच्या 9 जणांची व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. पालखी सोहळ्याची परंपरा न मोडण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे, मात्र शासनाने सुचवलेल्या पद्धतीने पालखी सोहळ्याचं स्वरूप ठेवण्यावर एकमत झालं आहे.
नागपूरात आज 7 कोरोना पॉसिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हे 7 नवे रुग्ण चीचभुवन येथील क्वॉरंटाईन सेंटरवर आधीच क्वारंटाईन आहेत.

7 पैकी 6 जण मोमीनपुरा परिसरातील तर 1 जण सतरंजीपुरा परिसरातील असल्याची माहिती मिळत आहे.

नागपुरात एकूण कोरोना रुग्ण संख्या 169 वर पोहोचली आहे.
यवतमाळमध्ये आजपासून नगर परिषद हद्द वगळता
ग्रामीण भागातील दारूची दुकाने उघडणार आहेत.
जिल्हाधिकारी एम. देवेंद्र सिंग यांनी आदेश दिला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ताटकळत असलेल्या तळीरामाना दिलासा मिळणार आहे.
यवतमाळ शहरात मात्र बंदी कायम ठेवण्यात आली आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अत्यंत गंभीर आरोप केला आहे. कुठेही मजुरांना 85% सूट रेल्वे भाड्यात मिळत नाही, प्रत्येकाला 100 टक्के पैसे देऊन तिकीट घ्यावे लागते आहे, असं ते म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी काँग्रेसशासित मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हा संवाद होईल. गोरगरिबांची व्यवस्था, उद्योग-व्यापारासंदर्भात या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
आज संध्याकाळी चार वाजता मंत्रिमंडळाची बैठक, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार बैठक
जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यात सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसाची गोळी झाडून घेऊन आत्महत्या.प्रकाश गुरण्णवर(३२) असे पोलिसाचे नाव आहे.सकाळी सात वाजता घडली घटना.
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे यंदा प्रस्थान करायचे का? याबाबत आज सकाळी 9 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे बैठक पार पडणार आहे. आळंदी देवस्थानचे सर्व विश्वस्त, माऊलींच्या अश्वचे मानकरी शितोळे सरकार हे कर्नाटकहुन, चोबदार, हैबत बाबांचे वंशज बाळासाहेब अरफळकर हे आळंदीहून तसेच इतर प्रमुख असे 15 सदस्य या बैठकीत असतील. या बैठकीत होणाऱ्या निर्णयावर आषाढी वारीतील इतर मुख्य सात पालखी सोहळा देवस्थान सोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगवर चर्चा होईल.
नंदुरबार जिल्ह्यातील कोरोनाचे चार रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाला पराभूत करणाऱ्या रुग्णांना आज घरी सोडण्यात येणार आहे.


चारही शहरातील रुग्ण

जिल्ह्याधिकाऱ्यांच्या उपस्थतीतीत रुग्णांना घरी सोडण्यात येणार आहे.
औरंगाबादमध्ये 28 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले.औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 349 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11लोकांचा मृत्यू झाला असून 26 जण बरे होऊन घरी पोहोचले आहेत.
औरंगाबादमध्ये 28 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले.औरंगाबादमधील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 349 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 11लोकांचा मृत्यू झाला असून 26 जण बरे होऊन घरी पोहोचले आहेत.
लॉकडाऊनमुळे रायगड जिल्ह्यातील नवी मुंबई, पनवेल तालुक्यात अडकलेल्या मध्यप्रदेश राज्यातील 1200 कामगारांना विशेष रेल्वेने मध्यप्रदेशमधील भोपाळ इथे पाठवण्यात आले. रेल्वेत बसण्यापूर्वी या सर्व व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून मध्यप्रदेश येथे जाण्यासाठी त्यांचे आवश्यक प्रमाणपत्र तयार करण्यात आले आहे. या सर्वांना नवी मुंबई, पनवेल तालुक्यातील विविध भागामधून पनवेल रेल्वे स्टेशन येथे बसने आणण्याची व्यवस्था विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी केली होती. मध्यप्रदेश शासनाने या कामगारांची रेल्वेने जाण्याचा सर्व खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. रेल्वेने जाणाऱ्या या सर्वांसोबत जेवणाचे पार्सलही देण्यात आले आहेत. सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोर पालन करत अत्यंत शिस्तबद्ध पध्दतीने या प्रवाशांना रेल्वेत बसवण्यात आले.
- नाशिक जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा चारशेपार गेला आहे. जिल्ह्यात मंगळवारी (5 मे) एकाच दिवसात 92 नवे रुग्ण आढळले. 92 पैकी सर्वाधिक 54 रुग्ण मालेगावात आहेत. तर येवल्यात 17 आणि देवळाली 7 रुग्ण सापडले आहे. 92 रुग्णांमध्ये पोलीस कर्मचारी, डॉक्टर, नर्स, लष्करी जवानाचाही समावेश आहे. नाशिक जिल्ह्यात एकूण कोरोनाग्रस्त- 470, मालेगाव - 384, नाशिक शहर - 21, नाशिक ग्रामीण - 50, इतर - 14. जिल्ह्यात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू (14 मालेगाव आणि 1 नाशिक शहर) झाला असून 33 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात शुक्रवारी (8 मे) कोरोनाच्या तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 19,063 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 37 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 25 जण मुंबईचे तर पुण्यातील 10, जळगाव आणि अमरवती शहरामध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 731 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 169 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 2 लाख 12 हजार 350 नमुन्यांपैकी 1 लाख 92 हजार 197 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 19,063 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 2 लाख 39 हजार 531 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 13 हजार 494 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 3301 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.


काल झालेल्या मृत्यूंपैकी 19 पुरुष तर 18 महिला आहेत. त्यातील 17 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 16 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 37 रुग्णांपैकी 27 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.