CORONAVIRUS UPDATES | गोव्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 29 Mar 2020 09:07 PM

सांगली : कोरोना प्रसार करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी इस्लामपुरातील एका रुग्णासह अन्य दोघांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल, जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला
कोरोनाबाबत सोशल मीडियावर चुकीची माहिती पोस्ट करणाऱ्यांविरोधात सायबर सेलची कारवाई, 36 जनांवर गुन्हे दाखल
गोवा : गोव्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा वाढला आहे. काल शनिवारी तपासणीसाठी पाठवलेल्यापैकी उत्तर गोव्यातील शिपवर काम केलेल्या आणखी दोघांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आली असल्याची सूत्रांची माहिती. यापूर्वी तिघे कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले असल्याने कोरोना विषय गंभीर बनत चालला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कोरोनाचे संकट वाढू लागले असताना आता विठूराया मदतीसाठी पुढे आला आहे. मंदिराकडून 1 कोटी रुपयाची मदत मुख्यमंत्री सहायता निधीस घोषित करण्यात आली आहे. मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी सुनील जोशी यांनी ही माहिती दिली. मंदिर समितीशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. दरम्यान 4 एप्रिल रोजी होणारी चैत्री यात्रा देखील रद्द केल्याची घोषणा मंदिराकडून करण्यात आली असून वारकरी संप्रदायाने यापूर्वीच यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला आहे.
मिरजमधील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय हे कोरोना रुग्णालय करण्यात आलं आहे. सध्या या रुग्णालयात इस्लामपुरच्या 25 कोरोना बाधित रुग्णावर उपचार चालू आहेत. या रुग्णालयातील अन्य रोगावर उपचार सुरू असलेल्या जवळपास 19 रुग्णना सांगलीच्या शासकीय हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे या रुग्णालय परिसरात पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे.
बुलडाण्यात कोरोनाचा पहिला बळी, बुलडाण्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये काल सकाळी ठेवण्यात आलेल्या एका व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 193 वर, पुण्यात 5, मुंबई 4, जळगाव, सांगली,नागपुरात प्रत्येकी 1 नवा रुग्ण
नागपूर : नागपुरात तीन कोरोना पॉझिटिव्ह, आता 14 पॉझिटिव्ह रुग्ण, 4 जणांना डिस्चार्ज, 10 जणांवर उपचार सुरु
कोरोनामुळे राज्यात पाचवा बळी, काल भरती केलेल्या 40 वर्षीय महिलेचा मृत्यू
मंगळवेढा येथे आज जवळपास 460 नागरिकांनी रक्तदान करून मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाला सकारात्मक प्रतिसाद दिला . गेले काही दिवसांपासून रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने रक्तदानाचे आवाहन वारंवार प्रशासनाकडून आणि शासनाकडून केले जात होते यासाठी मंगळवेढ्यातील नगरसेवक अजित जगताप यांनी विविध संघटनांना एकत्र करत आज पहिल्या टप्प्यात 460 बाटल्या रक्त संकलित केले
सांगली जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा 25 वर गेला आहे.यात कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगावच्या महिलेचा देखील समावेश असून ती मिरज वैद्यकीय महाविद्यालय मध्ये दाखल आहे.
काल तिघांचे रिपोर्ट चाचणीसाठी पाठवले होते या तिघांपैकी दोघांचे निगेटिव्ह तर एकाच रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेला हा 2 वर्षांचा त्याच्या घरातीलच मुलगा असून यापूर्वी देखील या घरातील 2 लहान मुलांचे रिपोर्ट पाठवण्यात आले होते, मात्र त्यावेळी ते निगेटिव्ह होते..काल दोघांचे रिपोर्ट पाठवले त्यात एका मुलाचा पॉझिटिव्ह रिपोर्ट आला आहे...
कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर राज्याअंतर्गत सिमाही बंद केल्या आहेत. अशातच गोव्यातून राजस्थानला जाणाऱ्या रिकाम्या कंटेनरमधून प्रवासी वाहतूक केली जात होती. रात्रीच्या वेळी ही प्रवासी वाहतुक कंटेनर मधून केली जात होती. गोवा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची पत्रादेवी आणि बांदा अशा सिमा पार करुन आल्यानंचर रात्री या कंटेनरची फोंडाघाट येथील तपासणी नाक्यावर तपासणी केली. त्यावेळी रिकामा असलेल्या कंटेनरमध्ये चालकासह अन्य 13 प्रवासी प्रवास करताना सापडले. मात्र गोवा पत्रादेवी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या बांदा तपासणी नाक्यावरुन हा कंटेनर प्रवासी वाहतुक करत फोंडाघाट मध्ये पोहोचला कसा? असे अनेक प्रश्न पडले आहेत. कणकवली पोलीस स्थानकात हा कंटेनर आणला असून पुढील तपास कणकवली पोलीस करत आहेत.
दादर परिसरात पहाटे 4 ते 9 पर्यंत घाऊक व्यापाऱ्यांची होणारी गर्दी टाळण्यासाठी आता महापालिकेने दादरच्या मार्केटचे विकेंद्रीकरण करण्याचे ठरवले आहे. त्यानुसार आता बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथील एमएमआरडीएचे मैदान, सोमय्या मैदान, मुलुंड चेकनाका, दहिसर चेकनाका, सेनापती बापट मार्ग येथे मार्केट हलवण्यात आले आहे. सध्या याबाबत अजूनही व्यापाऱ्यांना माहिती नसल्यामुळे पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी याबाबत व्यापाऱ्यांना माहिती देत आहेत.

पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज या पाच पॉझिटिव्ह रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली, असून त्यांना उद्या डिस्चार्ज दिला जाणार आहे. यातील चार रुग्ण हे कोरोना बाधिताच्या संपर्कातील असून पाचवा हा थायलंडहून परतला होता. 14 मार्चला यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. याआधी पुण्यातील तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 12 पैकी 8 रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. तर जपान आणि दुबईहून आलेल्या आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.
सांगलीच्या इस्लामंपूरमध्ये कोरोनाचे 24 रुग्ण आढळल्यानंतर तेथील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे या घाबरलेल्या नागरिकांसाठी इस्लामपूरच्या गांधी चौकात ज्या ठिकाणी कोरोना रूग्ण आढळले त्या ठिकाणी लोकांना प्रेरणा यावी म्हणून स्पिकरवरुन भजन वाजवले जात आहे. यामध्ये अनेक प्रसिद्ध भजने आणि देव देवतांची प्रेरणा गीते वाजवून नागरिकाच्यात असणारी भीती कमी केली जात आहे.
घाटी रुग्णालयात कोरोनाच्या तपासणीला सुरुवात झाली आहे. काल तपासला पहिला स्वॅब तपासण्यात आला. व्ही. आर. डी. एल मशीनची इंस्टॉलेशन प्रक्रिया पूर्ण झाली. व्हायरसवर रिसर्च करणाऱ्या 30 डायग्नोस्टिक लॅबरोटरी सुरू झाल्याने मराठवाड्याला दिलासा मिळाला आहे. आता कोरोनाच्या तपासणीसाठी पुण्याला स्वॅब पाठवणं बंद होणार आहे.
कोरोना व्हायरसच्या दहशतीखाली संपूर्ण जग आहे. अशातच भारतातही कोरोना व्हायरस फोफावत जात आहे. देशातील कोरोना बाधितांचा आकडा एक हजार पार गेला आहे. देशात एकूण 1029 कोरोनाग्रस्त आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे 19 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सर्वाधिक कोरोनाचे रूग्ण महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्रात एकूण 186 कोरोना बाधित आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 63व्या मन की बात मार्फत जनतेला संबोधित करणार आहेत. यामुळे नव्या वर्षातील पंतप्रधानांचं हे तिसरं संबोधन असणार आहे. यंदाच्या मन की बातमध्ये जगभरासह देशात फोफावत असलेल्या कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावाबाबत नरेंद्र मोदी चर्चा करणार आहेत. नेहमीप्रमाणे मन की बातचा कार्यक्रम सकाळी 11 वाजता आकाशवाणी, दूरदर्शन आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅपमार्फत प्रसारित करणात येणार आहे.
राज्य सरकारने घोषित केलेली मिरजेतील कोरोना तपासणी लॅब आठ दिवसात सुरू होणार आहे. सांगलीतील जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती दिली. या लॅबमुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाच्या तपासण्या करण्यासाठी मदत होणार आहे. याचबरोबर इस्लामपूरच्या त्या 24 पॉझिटिव्ह रुग्णांची प्रकृतीची स्थिर असून नागरिकांनी घाबरून जाऊ नये तसेचआपली काळजी घ्यावी असे आवाहनही सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं आहे. ही लॅब सुरू झाल्यामुळे सांगली, कोल्हापूर, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या परिसरातील संशयित रुग्णांच्या सॅम्पल्स तपासणीला गती मिळणार आहे. सध्या या संपूर्ण परिसरातील संशयितांचे संपल्स पुण्याला पाठवावे लागतात, त्याचे रिपोर्ट यायला किमान दोन दिवस लागतात त्यामुळे संशयित रुग्णांना विनाकारण ऍडमिट करून घ्यावे लागते, ही लॅब सुरू झाल्यामुळे संशयित दाखल रुग्णाची तातडीने तपासणी होऊन त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले तर त्यांना सोडून देता येणार आहे.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


 


राज्यासह देशभरात कोरोना व्हायरसने गुणाकार करण्यास सुरुवात केली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 186 वर पोहोचली आहे. गुरुवारी (26 मार्च) दिवसभरात  मुंबईचे 22 जण , पुण्याचे 4, नागपूरचे 2, जळगावचा 1 आहे. तर 4 रूग्ण पालघर, वसई, विरार आणि नवी मुंबई परिसरतील आहे. तर नागपूर, सांगली जिलह्यातील इस्लामपूरमधील रुग्णांना समूह संसर्गातून कोरोना झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे इस्लामपूर शहर सील करण्यात आले आहे.

देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत 935 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 24 तासात 149 नवे रूग्ण आढळले असून आतापर्यंत 19 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाबाधितांची संख्या सर्वात जास्त केरळमध्ये आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. भारत सध्या दुसऱ्या स्टेजला आहे.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 186

मुंबई – 73

पुणे – 23

पिंपरी-चिंचवड – 12

सांगली – 24

नागपूर – 11

कल्य़ाण-डोंबिवली – 7

नवीमुंबई – 6

ठाणे – 5

यवतमाळ – 4

अहमदनगर – 3

पनवेल – 2

सातारा – 2

उल्हासनगर – 1

वसई-विरार – 1

पालघऱ – 1

सिंधुदुर्ग – 1

औरंगाबाद – 1

रत्नागिरी – 1

कोल्हापूर – 1

गोंदिया – 1

देशातील कोरोना संक्रमणाचा ग्राफ वाढत आहे. वाढता ग्राफ पाहता आरोग्य मंत्रालयाने 40 हजार व्हेंटीलेटरची ऑर्डर दिली आहे. यापैकी 30 हजार व्हेंटीलेटर हे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड कंपनीकडून घेण्यात येणार आहे. तर HLL कडून 10 हजार व्हेंटीलेटर घेण्यात येणार आहे.

कोणत्या राज्यात किती मृत्यू?

सर्वाधिक पाच मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. तर गुजरात 3, कर्नाटकमध्ये 2 बळी गेले आहेत. याशिवाय दिल्ली, पंजाब, तामिळनाडू, मध्यप्रदेश, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, बिहार, हिमाचल प्रदेशमध्ये प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात लॉकडाऊनची घोषणा केली आहे. सरकारकडून जागरुकतेसाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये असा सल्ला वारंवार दिला जात आहेत.



 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.