CORONAVIRUS UPDATES | बाजार समिती बंद ठेवू नका, पणन संचालनालयाचे परिपत्रक, शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Mar 2020 10:05 PM
कोरोनाच्या धर्तीवर लोकांना दोन महिन्याचं धान्य पुरवणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा, कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण, लोकांना धान्य कमी पडू नये म्हणून निर्णय
PM MODI LIVE | कंपन्यांनी या दरम्यान घरून काम करणार्‍यांचे वेतन कापू नये, घरातील आवश्यक सामानाची साठेबाजी करू नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
बाजार समिती बंद ठेवू नका, पणन संचालनालयाचे परिपत्रक
बाजार समिती सुरू ठेवा, बाजार समिती बंद ठेवणे उचित नाही, शेतकरी आणि ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी निर्णय
,
बाजार समितीच्या आवारात स्वच्छता ठेवण्याचे निर्देश
PM MODI LIVE | 'जनता कर्फू' पाळा, 22 मार्च, रविवारी जनता कर्फू पाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
PM MODI LIVE | संयम राखला पाहिजे, गर्दी टाळणे, घराबाहेर न पडणे, या संकल्प आणि संयमाने या महामारीवर नियंत्रण आणू शकतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
PM MODI LIVE | ही महामारी थांबवण्यासाठी नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडू, सरकारने घेतलेल्या निर्णयाचे पालन करु : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
PM MODI LIVE | सरकारच्या सूचनांचं पालन करा, सोशल डिस्टन्ससिंग गरजेचं: पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
PM MODI LIVE | आपल्या देशावर कोरोनाचे हे संकट सामान्य नाही : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
PM MODI LIVE | कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी संकल्प आणि संयम या दोन गोष्टींची नितांत गरज : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
PM MODI LIVE | सुरु आहे | मी जनतेकडे काही मागायला आलोय, मला तुमचा काही वेळ हवाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk @narendramodi
#IndiaFightsCorona
कोरोनाच्या धर्तीवर लोकांना दोन महिन्याचं धान्य पुरवणार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची घोषणा, कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण, लोकांना धान्य कमी पडू नये म्हणून घेतला निर्णय ,

रेशन दुकानाद्वारे पुरवणार लोकांना धान्य, 2 कोटी लोकांना धान्य पुरवठा केला जाणार ,

रेशन दुकानावर धान्य घेताना अंगठा लावण्याची गरज नाही, ओळखपत्राचे करणार धान्य पुरवठा
नाशिक : उद्यापासून सराफ बाजार बंद राहणार, पोलिसांच्या विनंतीला मान देत सराफ असोसिएशनने घेतला निर्णय, शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत बंद
LIVE | सुरु आहे | गेल्या दोन महिन्यात भारतीयांनी कोरोनाचा सामना चांगल्या पद्धतीनं केलाय : पंतप्रधान नरेंद्र मोदी #Corona https://youtube.com/watch?v=1ZaxDvWm2Rk
आंतरराष्ट्रीय फ्लाईट्स 22 मार्चपासून बंद, एका आठवड्यासाठी आंतरराष्ट्रीय उड्डाणं बंद करण्याचा केंद्राचा निर्णय
कोरोना व्हायरसचा भारतात चौथा बळी, पंजाबमधील 70 वर्षीय वृद्ध नागरिकाचा मृत्यू, काही दिवसांपूर्वी ते जर्मनीहून इटलीमार्गे भारतात परतले होते
सीईटीच्या परीक्षा पुढे ढकलणार, उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा महत्त्वाचा निर्णय, परीक्षा पुढे ढकलण्यानं विद्यार्थ्याचं नुकसान होणार नाही, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत याचं आश्वासन, 29 मार्चला होणार होती सीईटीची परीक्षा, आता कोरानामुळे ही परिक्षा आता 30 एप्रिलला
होेणार
सिंगापूरच्या विद्यार्थ्यांचा महाराष्ट्रात यायचा मार्ग मोकळा,

संध्याकाळच्या विमानानं 50 विद्यार्थी मुंबईत दाखल होणार ,

सर्व विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात येणार ,

पालकांनी विमानतळावर गर्दी न करण्याचं आवाहन
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील आठवड्यात हायकोर्ट केवळ दोन दिवस कार्यरत. 23 आणि 26 मार्च रोजी केवळ ईमेलद्वारे सादर केलेल्या याचिकांवर आवश्यकतेनुसार सुनावणी. हे निर्देश मुंबईसह नागपूर, औरंगाबाद आणि गोवा हायकोर्टलाही लागू
उदगीर येथील दंत विशारद डॉ. विजय करपे हे काही दिवसांपूर्वी सहकुटुंब विदेशात गेले होते. त्यांची भारतात आल्यावर तपासणी करण्यात आली होती. भारतात आल्यावर त्यांनी उदगीर येथील घरात स्वतःहून संपूर्ण कुटुंबातील लोकांसह विलगिकरन करून राहत आहेत. त्यांना कोणतीही बाधा झालेली नाही. मात्र, स्वतःची आणि समाजाची काळजी म्हणून त्यांनी हे पाऊल उचलले आहे. याच बाबीची सोशल मीडियात उलटी चर्चा सुरू झाली की करपे कुटुंबियांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणावर डॉक्टरांना फोन केले जात आहेत. प्रत्येकाला उत्तर देताना डॉक्टर करपे यांना जमले नाही. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन त्यांनी एक व्हिडिओ बनवला आहे. तो आता सोशल मीडियावर वाहयरल होत आहे.
सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुटका होणार आहे. सर्व विद्यार्थ्यांना बोर्डिंग पास देण्यात आले आहेत. थोड्याच वेळात सिंगापूर इथून मुंबईसाठी विमान रवाना होणार आहे. कालपासून सिंगापूर एअरपोर्टवर 60 विद्यार्थी अडकलेले होते. उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे, राजन विचारे यांच्या प्रयत्नांना यश.
रस्त्यावर थुंकून घाण पसरविणाऱ्या आणि इतरांच्या आरोग्याला धोका पोहोचवणाऱ्या विरोधात नागपूर महापालिकेने कारवाई सुरु केली आहे. विशेष म्हणजे आज सकाळपासून नागपुरात पान टपऱ्या बंद करण्यात आल्या असताना ही अनेक नागपूरकर कोरोनाच्या या संकटकाळात सुधारायला तयार नाहीत.
वारंवार कोरोना विलगीकरण केंद्रातून रूग्ण पळून जाण्याचे वृत्त येत आहेत. हे त्यांच्याच नव्हे तर इतर नागरिकांच्या दृष्टीनेही धोकादायक आहे. पोलीस दलाला 'साथीचे रोग अधिनियमान्वये' अशा लोकांवर कारवाई करण्याचे निर्देश गृहमंत्रालय देत आहे.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पानठेले, तंबाकू विक्री केंद्रासोबत आधार केंद्र ही 31 मार्चपर्यत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
आता ग्रामपंचायतीत ही कोरोनाला रोखण्यासाठी उपाययोजना राबवल्या जातायेत. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी लगतच्या मारुंजी गावात येणाऱ्या सर्व वाहनांवर विशेष औषध फवारणी करण्यात आली. याच गावात बहुतांश आयटीयन्स राहतात जे परदेशातून ही आलेले असतात. त्यांच्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असल्याने, ग्रामपंचायत ही खबरदारी घेत आहे.
अहमदनगरमध्ये आणखी एक कोरानाबाधित रूग्ण आढळला आहे. अहमदनगर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दोन झाली आहे. दुसरा रूग्ण दुबईवरून तीन मार्चला अहमदनगरमध्ये आला होता. त्याचा अहवाल पॉजिटीव्ह आला असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
लोकल ट्रेन, बसेसची गर्दी आणखी कमी होण्याची गरज : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपल्यासोबत आपल्या कुटुंबाचीही काळजी घ्या : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, बाहेरुन येणारे प्रवासी आपलेत आहेच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
नागरिकांनी राज्य सरकारच्या सूचनांचे पालन करावे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याला संबोधित करत आहे.
भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 166, देशात एका दिवसात 20 रुग्णांची नोंद
सिंगापूरमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मुंबईत सुखरूप आणण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः सिंगापूर मधील भारतीय दूतावासाशी संपर्कात. सिंगापूरमधील विद्यार्थ्यांची दूतावास काळजी घेणार. विद्यार्थिनी बोडस हिच्याशी मुख्यमंत्र्यांनी बोलून दिला धीर
युकेवरुन आलेली 22 वर्षीय तरुणी कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. तर, उल्हासनगर येथील 49 वर्षीय व्यक्तीलाही कोरोनाची लागण झालेली आहे. तो नुकताच दुबईहून आला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून शासकीय यंत्रणा सतर्क झाली आहे. दुबई येथून आल्यानंतर या रुग्णाला कोरोना संशयित म्हणून मंगळवारी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. जिल्हा शासकीय रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याच्या स्वाबचे नमुने प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. तो अहवाल बुधवारी रात्री जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला. त्यामध्ये दुबईतून आलेला पन्नास वर्षीय इसम कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यामुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून यंत्रणा सतर्क झाली आहे.
कोरोनामुळं जगभरात झालेल्या मृत्यूंची आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांचा आकडा 2 लाखांच्या पुढे गेला आहे. वर्ल्ड मीटर्सच्या आकेडावारीनुसार काल दुपारपर्यंत 2 लाख 4 हजार 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या 8 हजार 246 च्या घरात पोहोचली आहे. भारताला चिंतेत टाकणारी बाब म्हणजे परदेशात असणाऱ्या एकूण 276 भारतीयांना कोरोनाची लागण झाली आहे.
CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CBSE बोर्डाने हा निर्णय घेतला आहे. बोर्डाने 19 ते 31 मार्च दरम्यान होणारे सर्व पेपर आता 31 मार्चनंतर घेणार असल्याचे जाहीर केले आहे.
सध्या कोरोनामुळे भीतीपोटी आणि अफवांमुळे मांसाहारी खवय्यांनी चिकनकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे अनेक शेतकरी,ज्यांचा शेतीला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन आहे, अशा शेतकऱ्यांचे आणि पोल्ट्री उद्योगाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याबाबत लोकांचा गैरसमज दूर व्हावा आणि चिकन अंडी खाण्यात कुठलाही धोका नाही. हे सांगणारं गाणं निर्माता दिग्दर्शक महेश टिळेकर ह्यांनी तयार केले आहे. प्रसिद्ध संगीतकार अशोक पत्की ह्यांनी संगीत दिलेले हे गीत महेश टिळेकर यांनीच लिहिले आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने थैमान घातलं आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांकडूनही अनेक प्रयत्न सुरु आहेत. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधणार आहेत. रात्री आठ वाजता पंतप्रधान मोदी राष्ट्राला उद्देशून काही संदेश देण्याची, तसेच एखादी मोठी घोषणा करण्याची शक्यताही नाकारता येत नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदी काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
मुंबई लॉकडाऊनच्या दिशेनं वाटचाल करत आहे. कोरोनाचा ससंर्ग टाळण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशामुळे आजपासून मुंबई अंशतः लॉक-डाऊन होणार आहे, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण आजपासून मुंबईतली 50 टक्के दुकानं बंद राहणार आहेत. एवढच नव्हे तर लोकल, मेट्रो, बसेस 50 टक्के प्रवासी क्षमतेनं चालवण्याला प्राधान्य देण्यात येईल तसंच बसमध्ये प्रवाशांना उभं तर राहताच येणार नाही.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...


 


मुंबई, पिंपरी-चिंचवड आणि रत्नागिरीमध्ये प्रत्येक एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 45 वर पोहोचली आहे. एकट्या पिंपरी-चिंचवडमध्ये एकूण 11 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत, तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 8 वर पोहोचला आहे.


 


पिंपरी चिंचवडमधील 21 वर्षीय तरुणाने गेल्या काही दिवसात फिलिपाईन्स, सिंगापूर आणि कोलंबो असा प्रवास केला होता. रत्नागिरीतील 50 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे, या व्यक्तीने दुबई प्रवास केला होता. तर अमेरिकेहून आलेल्या कोरोनाबाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या मुंबईतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे.


 


राज्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती








    • पुणे - 8



 




    • पिंपरी-चिंचवड - 11



 




    • मुंबई - 8



 




    • नागपूर - 4



 




    • यवतमाळ - 3



 




    • कल्याण - 3



 




    • नवी मुंबई - 3



 




    • रायगड - 1



 




    • ठाणे - 1



 




    • अहमदनगर - 1



 




    • औरंगाबाद - 1



 




    • रत्नागिरी- 1






राज्यात कोरोना व्हायरस संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या 15 दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तसेच उद्यापासून  तीन ठिकाणी कोरोना व्हायरसची तपासणी सुविधा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली. या नव्या लॅबसाठी एनआयव्हीकडून उपकरण मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. सध्या मुंबईतील कस्तुरबा आणि केईम रुग्णालयात कोरोना व्हायरसच्या चाचण्याची सुविधा उपलब्ध आहे. लवकरच जे.जे. रुग्णालयात लवकरच चाचणी केंद्र सुरु करण्याचा प्रयत्न आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.


 


राज्यातील शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज निम्मे कर्मचारी येतील, या हिशोबाने सुरु ठेवण्यात येतील. तसेच रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालवण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.