Coronavirus LIVE UPDATES | मालेगावात आज 15 रुग्णांची नोंद; एकूण रुग्णसंख्या 77 वर

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Apr 2020 09:47 PM
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. पैकी चार एकाच कुटुंबातील आहेत. कुटुंबातील सदस्याच्या संपर्कात आल्याने या चौघांना लागण झालेली आहे. तर इतर दोघांवर पुण्यात उपचार सुरू आहेत. शहरातील एकूण आकडा हा 60 वर जाऊन पोहचलाय. पैकी 15 रुग्ण कोरोनामुक्त तर एकाचा मृत्यू झालाय.
कोल्हापुरात सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस, कसबा बावडा येथील राजाराम कारखान्याचे धुरांडे कोसळले, कारखाना बंद असल्याने अनर्थ टळला
मालेगावकरांसाठी मोठा धक्का! संध्याकाळी 5 तर आता आणखी 10 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह. मालेगावमध्ये रुग्णांची संख्या 77 वर.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रमुख वृत्तपत्र मालक आणि संपादक यांच्याशी संवाद साधून भूमिका सविस्तर सांगितली, वृत्तपत्र मालक, संपादक यांचं पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन


औरंगाबादेत एका सात वर्षाच्या चिमुकलीने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, आज ही सात वर्षांची चिमुकली कोरोनामुक्त झाली, औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये 3 एप्रिल रोजी ही चिमुकली कोरोनाची लक्षणे आढळून ग्णालयात दाखल झाली होती, तिच्यासोबत तिची आई रात्रंदिवस तिथेच राहून तिची काळजी घेत होती

औरंगाबादेत एका सात वर्षाच्या चिमुकलीने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, आज ही सात वर्षांची चिमुकली कोरोनामुक्त झाली, औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये 3 एप्रिल रोजी ही चिमुकली कोरोनाची लक्षणे आढळून ग्णालयात दाखल झाली होती, तिच्यासोबत तिची आई रात्रंदिवस तिथेच राहून तिची काळजी घेत होती
मालेगावकरांसाठी धक्कादायक बातमी आहे. आज नव्याने 5 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. एकट्या मालेगावमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या गेली 67 वर गेली आहे.
राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधितांची नोंद, राज्यात एकूण 3 हजार 648 जणांना कोरोनाची लागण. मुंबईत सर्वाधिक 184 नव्या रुग्णांची नोंद.
वरळी, धारावीनंतर आता वडाळामध्ये कोरोना रुग्णांची संख्या जास्त. एफएन वॉर्डमध्ये आतापर्यंत 118 रुग्णांची नोंद. ह्यातील सत्तरच्या आसपास रुग्ण हे वडाळा येथील झोपडपट्टीमध्ये आढळून आले आहेत. संगम नगर, हिंमत नगर, कोरबा मिठागर या परिसरात अनेक रुग्ण.

औरंगाबादेत एका सात वर्षाच्या चिमुकलीने कोरोना विरुद्धची लढाई जिंकली, आज ही सात वर्षांची चिमुकली कोरोनामुक्त झाली, औरंगाबाद येथील सेठ नंदलाल धूत हॉस्पिटलमध्ये 3 एप्रिल रोजी ही चिमुकली कोरोनाची लक्षणे आढळून ग्णालयात दाखल झाली होती, तिच्यासोबत तिची आई रात्रंदिवस तिथेच राहून तिची काळजी घेत होती

मुंबईतील वांद्रे येथील गर्दी प्रकरण, एबीपी माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्या अटकेचा मुंबई प्रेस क्लबकडून निषेध, राहुल कुलकर्णी यांच्यावरील सर्व गुन्हे मागे घेण्याची मागणी
तेलंगाणा सीमेवर तैनात असलेल्या 15 पोलिसांची खबरदारी म्हणून तपासणी, तेलंगाणा राज्यातील भाजीपाला घेऊन विदर्भातील खामगाव इथं जाऊन आलेला ट्रक ड्रायव्हर तेलंगाणामध्ये गेल्यावर निघाला पॉझिटीव्ह, नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यात असलेल्या राहटी सीमा तपासणी नाक्यावरील प्रकार.
कोरोनाच्यामुळे धास्तावलेल्या बेळगावकर जनतेला एक दिलासा देणारी घटना शनिवारी घडली आहे. गळ्यात पहिल्यांदा सापडलेल्या तीन कोरोनाग्रस्त रुग्णापैकी बेळगुंदीचा रुग्ण पूर्णपणे बरा झाला असून शनिवारी त्याला डिस्चार्ज देण्यात आला असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांनी दिली आहे.
अमरावती शहरात आज पुन्हा एक नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. आता कोरोना बाधितांची संख्या सहा झाली आहे. या सहाही लोकांना कोणाच्या संपर्कात आल्याने कोरोनाची लागण झाली, या साखळीचा शोध न लागणे ही तमाम अमरावती जिल्ह्यासाठी चिंताजनक बाब असून या सहा जणांना कोरोनाची लागण करणारे कोरोनाबाधित व्यक्ती अजूनही जिल्हा प्रशासनाच्या दृष्टिपथात न येणे सगळ्यात धोकादायक आहे. अमरावतीची संभाव्य दुरवस्था थांबण्यासाठी तात्काळ भिलवाडा पॅटर्न लागू करा, अशी मागणी भाजपचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली आहे. आजपर्यंत आढळलेले सहाही लोक मरकजला गेले नव्हते. त्यांनी विदेशात प्रवासही केला नव्हता. किंवा ते अशा संशयितांच्या संपर्कात आले असल्याची माहिती देखील समोर आलेली नाही. मग हे सहा जण कसे व कोणामुळे पॉझिटिव्ह झाले, हा यक्षप्रश्न कायम आहे.
देशांतर्गत फ्लाईट साठी 3 मेपर्यंत ची बुकिंग बंद तर आंतरराष्ट्रीय फ्लाईटसाठी 31 मे पर्यंत बुकिंग बंद, 4 मे पासूनच्या प्रवासासाठी काही ठराविक देशांतर्गत फ्लाईट बुकिंग मात्र सुरू, आंतरराष्ट्रीय फ्लाइट्स बुकिंग 1 जून नंतरच्या प्रवासासाठी सुरू, वेळोवेळी आढावा घेऊन अंतिम निर्णय
गोंदियाच्या सालेकसा तालुक्यात लॉकडाऊनचा फायदा उचलत जगंलातुन सागावन वृक्षाची कत्तल करत लाकुड चोरुन आणणाऱ्या पाच आरोपीना वन विभाने अटक केली. दोन घटनांमध्ये आठ लाख रुपयांचा मुदेमाल जप्त करण्यात आलाय.
जालना : औरंगाबाद जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल गीते यांच्या गाडीत 6 लाख 70 हजाराची रोकड आढळून आली. बदनापूर येथे जालन्याकडे जाताना पोलिसांनी चेक पोस्टवर तपासणी केली असता त्यांच्या गाडीत हे पैसे आढळले. दरम्यान एवढी रक्कम ते जालन्याला कुठे आणि कुणाकडे घेऊन जात होते याची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रोसेस सुरू आहे.
पुण्यात राहणाऱ्या बहरीन देशातील 125 नागरिकांना विशेष विमानाने त्यांच्या देशात पाठवण्यात आले.
नाशिक शहरात चार जणांना कोरोनाची बाधा. नाशिकच्या अंबड परिसरातील रुग्ण. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यानं कोरोनाची लागण झाल्याचे उघड. शहरातील बधितांची संख्या 9 वर. तर जिल्ह्याची संख्या 74.
अहमदनगर : मरकजमध्ये सहभागी 24 परदेशी आणि 5 परराज्यातील नागरिकांना अटक, 24 विदेशी नागरिकांना व्हिसा गैरवापर प्रकरणी 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी, विदेशी नागरिकांना मदत करणाऱ्या 5 जणांपैकी 2 जणांना देखील 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी तर 3 जणांना न्यायालयीन कोठडी, अहमदनगर सत्र न्यायालयाचा निर्णय
भिवंडी : भिवंडी ग्रामीण भागात कोरोनाचा अजून 1 रुग्ण पॉझिटिव्ह, केवणी गावातील 57 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित,
सोलापूर शहरात कोरोनाचा धोका वाढू लागल्याने आता पंढरपूर शहरात प्रवेश करणाऱ्या नवीन पूल आणि जुना दगडी पुलावर लोकांनी मोठे सिमेंट पाईप लावून रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद केली आहे . सोलापूर , मराठवाडा या भागातून पंढरपूर मध्ये प्रवेश करावयाचा असल्यास या पुलावरूनच यावे लागते . चंद्रभागेवर एकूण तीन पूल असून सोलापूरकडून होणारी मुख्य वाहतूक जुना दगडी पूल आणि नवीन पुलावरून होत असते . आज सोलापुरात कोरोना रुग्णांची संख्या १४ झाल्याने परिसरातील नागरिकांनी एकत्र येत ३ पैकी दोन पुलावर अडथळे लावून वाहतूक बंद केली आहे . उरलेल्या एका पुलावर पोलिसांची नाकेबंदी असल्याने आता सोलापूरकडून अथवा मराठवाड्याकडून पंढरपूर मध्ये येण्याचे मार्ग बंद झाले आहेत . नागरिकांनी भीतीने हे पाऊल उचलले असले तरी यामुळे पोलीस प्रशासनावरील नाकेबंदीचा ताण कमी झाला आहे .
रायगड : पोलादपूर 62 वर्षीय महिला कोरोना पॉझिटिव्ह, डॉ महामणकर हॉस्पिटलमध्ये सदर महिला तपासणीसाठी आली होती, मात्र नंतर त्या महिलेला मुंबई कस्तुरबा रुग्णालयात पाठविण्यात आले. आज तिचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला. डॉ महामणकर हॉस्पिटल सील
सोलापूर : सोलापुरात आज आणखी 1 रुग्ण कोरोनाबाधित,
रुग्ण पाच्छा पेठ भागातील रहिवासी असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती , सोलापुरात आजपर्यंत एकूण 14 बाधित, यातील 13 जणांवर उपचार सुरू, एकाचा आधीच मृत्यू झालेला आहे

अकोल्यात आणखी एका 17 वर्षीय युवतीला कोरोनाची बाधा, पॉझिटिव्ह निघालेली युवती 13 एप्रिलला मरण पावलेल्या कोरोना रूग्णाची मुलगी, जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या आता 15 वर, यातील 11 रूग्ण दुसऱ्या चाचणीत आढळले निगेटिव्ह
मुंबई : कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थिती एका सामान्य टॅक्सी चालकाचा हकनाक बळी, सुदर्शन रसाळ असे टॅक्सी चालकाचे नाव, अचानक उलट्या सुरू झालेल्या सुदर्शन रसाळ या टॅक्सी ड्रायव्हर वर मुंबईतील आठ हॉस्पिटलने उपचार करण्यासाठी दिला नकार, हॉस्पिटल्समध्ये कोरोना रुग्ण असून नवीन पेशंटसाठी जागा उपलब्ध नसल्याचे कारण देत उपचार करण्यास दिला नकार, रात्री 11 ते सकाळी 7 वाजेपर्यंत मुंबईतील 8 हॉस्पिटल्समध्ये डॉक्टरांच्या केल्या विनवण्या
नंदुरबार : शहादा शहरात भाजीपाला मार्केटमध्ये मास्क न लावता फिरणाऱ्या तरुणींना हटकले असता नगरपालिका कर्मचाऱ्यांशी घातली हुज्जत, नातेवाईकांना बोलवून मुख्यधिकरी आणि कर्मचारी यांच्या सोबत अरेरावी, काल सायंकाळची घटना असल्याची माहिती, हुज्जत घालणाऱ्या तरुणींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
मुंबईत 20 पासून वाहतूक व्यवस्था वाढवण्यासाठीच्या एसटी महामंडळाच्या हालचाली, मुंबईत काम करण्यासाठी सातारा जिल्ह्यातून 35 वाहक चालक मागवले

पालघर : पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही चोर आल्याच्या अफवांचे पेव कायम असून डहाणू तालुक्यातील पाच दिवसापासूनच्या दोन धक्कादायक घटनांनंतर रात्री पुन्हा डहाणू तालुक्यातील घोलवड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झाई दुबलपाडा येथे पायी जाणाऱ्या एका भिकाऱ्याला चोर समजून बेदम मारहाण केली. घोलवड पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी रात्री 11 वाजता तात्काळ घटनास्थळी धाव घेत भिकाऱ्याला वाचविले. यावेळी जवळपास 40 जणांचा जमाव घटनास्थळी होता. अशी माहिती घोळवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रकाश सोनवणे यांनी दिली. पालघर जिल्ह्यात पसरत असलेल्या अफवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे आज दुपारी 2 वाजता जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरंसद्वारे संपर्क साधणार आहेत. डहाणू तालुक्यातील गडचिंचले येर्हे अफवा पसरवून तीन लोकांची व्यक्तीची हत्या करण्यात आली होती.
बेळगाव | लॉकडाऊनच्या बंदोबस्तासाठी दुचाकीवरून जात असताना कुत्रे रस्त्यात आडवे आल्याने दुचाकीवरून खाली पडून पीएसआयचा जागीच मृत्यू, येळ्ळूर रोडवरची घटना
वाडिया रुग्णालयाच्या परिचारिकेविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल, कोरोनासंदर्भात अफवा पसरविल्याचा परिचारिकेवर आरोप, वाडिया रुग्णालयानंच केली परिचारिकेची तक्रार,कोरोनाच्या काळात भक्कमपणे उभं न राहता कर्मचाऱ्यांमध्ये अफवा आणि भीती निर्माण केल्याचा आरोप, परिचारिकेनं रुग्णालयाविरोधात व्हायरल केला होता व्हिडीओ, दोन्ही बाजू समजून घेऊन पोलिस तातडीनं दाखल करणार गुन्हा
पुण्यात काल रात्रीत आणखी 15 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, पुण्यातील कोरोना प्रादुर्भावाचा पालकमंत्री अजित पवार आज घेणार आढावा
औरंगाबाद कोरोनाचा तिसरा बळी. घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू. गेल्या दोन दिवसांपासून महिलेची प्रकृती गंभीर, घाटी रूग्णालयाचे डीन कानन येळीकर यांची महिती
औरंगाबाद कोरोनाचा तिसरा बळी, घाटी रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या 65 वर्षीय महिलेचा मृत्यू
मुंबईतील नौसेनेतील 21 जवानांना कोरोनाची लागण, मुंबई डॉकयार्डवर तैनात होते जवान, नौसेनेच्या आयएसएचएन अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु
मुंबईतील नौसेनेतील 21 जवानांना कोरोनाची लागण, मुंबई डॉकयार्डवर तैनात होते जवान, नौसेनेच्या आयएसएचएन अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु
मुंबईतील नौसेनेतील 21 जवानांना कोरोनाची लागण, नौसेनेच्या आयएसएचएन अश्विनी रुग्णालयात उपचार सुरु
नंदुरबार जिल्ह्यात आढळला पहिला पॉझिटिव्ह रुग्ण,

नंदुरबार शहरात आढळला 48वर्षीय रुग्ण,

त्रास होत असल्याने होतं जिल्हा सामान्य रुग्णालयात काल दाखल
,
उद्या पासून संचारबंदी अधिक कडक करण्यात येणार प्रशासनाची माहिती
20 एप्रिलपासून टोल वसुली चालू होणार, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून आदेश जारी, 17 एप्रिल रोजी प्राधिकणाने हे आदेश जारी केले असुन या आदेशानुसार आता देशभरातील टोलनाक्यांवर खासगी तसेच व्यावसायिक वाहनांकडून टोलवसुली सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अमरावती शहरात पुन्हा एक कोरोना पॉझीटिव्ह आढळल्याने शहरात खळबळ उडाली आहे.

शुक्रवारी रात्री या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझीटिव्ह आला आहे. शहरातील नुराणी चौक या परिसरात हा रुग्ण असून त्याच्यावर सध्या कोविड-19 रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दोन दिवसांआधी या परिसरातील एका ऑटोचालक असलेल्या संशयित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्याच व्यक्तीचा हा मुलगा आहे..
या कुटुंबातील अजून तिघांना कोरोना तपासणीसाठी या रुग्णालयात आणण्यात आले आहे.

शहरात आता कोरोना रुग्णांची संख्या ही 6 झाली असून त्यापैकी एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर : गडमुडशिंगी जवळ एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी केला अवैध मद्यसाठा जप्त, पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री केली आणि टाकला छापा,

500 रुपयांना एक बिअर विकली जायची,

गांधीनगर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा नोंद
,
पोलिसांनी बिअरचे बॉक्स केले जप्त
पुण्यातील फरासखाना पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचारी आणि त्याच्या पत्नीचे करोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आले आहेत. दोघांवर सध्या पिंपरी चिंचवड मधील वाय सी एम हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत
दहिसर चेक नाक्या जवळच्या आक्ट्रॉय मैदानात भाजी खरेदीसाठी सकाळी नागरीकांनी तुडुंब गर्दी केली होती. मुंबईवर कोरोनाच संकट दिवसेगणिक वाढत आहे. प्रशासन प्रत्येकवेळी सोशल डिस्टन्सिंग ठेवण्याचं सांगत आहे. मात्र मुंबईकर याला मुठमाती देताना आढळून येत आहे. भाजी खरेदी करण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग न ठेवता मुंबईकर भाजी खरेदी करत होते. वास्तविक या सकाळच्या मार्केटमध्ये गल्लोगल्ली भाजी विकणारे किरकोळ भाजी विक्रेत येणं अपेक्षीत असतं. मात्र येथे सामान्य नागरिक ही स्वस्त भाजीपाला मिळत असल्याने येत आहेत.
पालघर : पालघर जिल्हा ग्रामीणमध्ये चिंता वाढविणारी बातमी,वीटभट्टीवर काम करणारे डहाणूमधील 4 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, त्या 3 वर्षीय मुलीच्या संपर्कात आले होते हे चार जण, डहाणूत कोरोना रुग्णाचा आकडा आता 7 वर
नागपुरात दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरात 59 पेक्षा कोरोना संक्रमित रुग्ण झाले असतानाही अनेक नागपूरकर घरी थांबायला तयार नाहीत. त्यामुळे नागपूर पोलिसांनी आता नागरिकांना कोरोनारुपी राक्षसाच्या प्रतिमेच्या मदतीने समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. टेलिफोन एक्सचेंज चौकावर पोलीस प्रशासनाच्या वतीने कोरोनाचा एक राक्षसरूपी पुतळा उभारण्यात आलेला आहे. पुतळ्यावर stay home असे लिहीत नागरिकांनी बाहेर न निघता घरी रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, दुर्दैव म्हणजे पुतळा लावल्यानंतर ही अनेक वाहनचालक तिथूनच लॉकडाऊन पायदळी तुडवत बिनधास्त फिरताना दिसत आहेत.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...





सकारात्मक बातमी! राज्यात कोरोना बाधितांच्या संख्येत घट


 


सर्वांना दिलासा देणारी बातमी आली आहे. कोरोना बाधितांच्या संक्रमणाचा वेग राज्याती कमी झाला आहे. आज राज्यात कोरोनाबाधीत 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. आज दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3320 जण पॉझिटिव्ह आले आहेत.


 


सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे पाच, पुण्यातील दोन जण आहेत. त्यापैकी पाच पुरुष तर दोन महिला आहेत. आज झालेल्या सात मृत्यूपैकी सहाजण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांपैकी सात रुग्णांमध्ये (71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.


 


राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)
मुंबई महानगरपालिका : 2085 (122)
ठाणे : 26 (2)
ठाणे मनपा : 96 (1)
नवी मुंबई मनपा : 63 (3)
कल्याण डोंबवली मनपा : 68 (2)
उल्हासनगर मनपा : 1
भिवंडी निजामपूर मनपा : 1
मीरा भाईंदर मनपा : 53 (2)
पालघर : 14 (1)
वसई विरार मनपा : 61 (3)
रायगड : 8
पनवेल मनपा : 28 (1)
ठाणे मंडळ एकूण : 2507 (137)
नाशिक : 3
नाशिक मनपा : 5
मालेगाव मनपा : 45 (2)
अहमदनगर : 19 (1)
अहमदनगर मनपा : 9
धुळे : 1 (1)
धुळे मनपा : ०
जळगाव : ०
जळगाव मनपा : 2 (1)
नंदूरबार : ०
नाशिक मंडळ एकूण : 84 (5)
पुणे : 17
पुणे मनपा : 450 (46)
पिंपरी चिंचवड मनपा : 37 (1)
सोलापूर : 0
सोलापूर मनपा : 12 (1)
सातारा : 7 (2)
पुणे मंडळ एकूण : 523 (50)
कोल्हापूर : 2
कोल्हापूर मनपा : 3
सांगली : 26
सांगली मिरज कुपवाड मनपा:०
सिंधुदुर्ग : 1
रत्नागिरी : 6 (1)
कोल्हापूर मंडळ एकूण : 38 (1)
औरंगाबाद : 0
औरंगाबाद मनपा : 28 (2)
जालना : 2
हिंगोली : 1
परभणी : 0
परभणी मनपा : 1
औरंगाबाद मंडळ एकूण : 32 (2)
लातूर : 8
लातूर मनपा : 0
उस्मानाबाद : 3
बीड : 1
नांदेड : 0
नांदेड मनपा : 0
लातूर मंडळ एकूण : 12
अकोला: 7 (1)
अकोला मनपा : 7
अमरावती : ०
अमरावती मनपा : 5 (1)
यवतमाळ : 13
बुलढाणा : 21 (1)
वाशिम : 1
अकोला मंडळ एकूण : 54 (3)
नागपूर : 2
नागपूर मनपा : 55 (1)
वर्धा : 0
भंडारा : 0
गोंदिया : 1
चंद्रपूर : 0
चंद्रपूर मनपा : 2
गडचिरोली : 0
नागपूर मंडळ एकूण : 60 (1)
इतर राज्ये : 11 (2)
एकूण : 3320 (201)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.