Coronavirus UPDATES | मुंबई लोकल आणि बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
17 Mar 2020 09:54 PM
कोरोनाच्यासंदर्भातील राज्य सरकारच्या आदेशाला झुगारून महाराष्ट्र लोकसेवा आयोग 22 मार्चला शारीरिक चाचणी घेणार, आजच्या तारखेचे घोषणापत्र एबीपी माझाचा हाती
यवतमाळ जिल्ह्यातील केळापूर येथील प्रसिद्ध जगदंबा मंदिर येथे आज पासून दर्शन बंद, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि महाराष्ट्र येथील भक्त मोठयासंख्येने येथे गर्दी करतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घेतला मंदिर प्रशासनाने निर्णय
कोकणातील पारंपरिक लोककला असलेल्या दशावतार लोककलेला आता कोरोनाचा फटका बसला आहे. ८०० वर्षां पेक्षा जास्त काळापासुन सुरु असलेल्या दशावतार लोककलेला कोरोना व्हायरसचा फटका बसला आहे. आतापर्यंतच्या इतिहासात दशावतार ही लोककला बंद झाली न होती. मात्र कोरोना व्हायरस मुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यासह राज्यातील कानाकोपर्यात केला जाणाऱ्या दशावतारचे प्रयोग रद्द करण्यात आले. त्यामुळे दशावतार कलाकारांचे मोठे नुकसान होणार आहे. गोवा, मुंबई, दिल्ली, नागपूर, तामिळनाडू आणि केरळ येथील दशावतारचे प्रयोग रद्द करण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या ७५ दशावतार नाट्य मंडळ आहेत. सध्या एप्रिल, मे महिन्यापर्यंतचे नाट्य प्रयोग सुध्दा रद्द करण्यात आले आहेत.
मुंबई शहर आणि उपनगरांतील सर्व पब, डिस्को, डीजे, लाईव्ह ओर्केस्ट्रा बार, डान्स बार31 मार्चपर्यंत बंद करण्याचे मुंबई पोलिसांचे आदेश
कल्याण डोंबिवली मनपा हद्दीतून वगळलेल्या 18 गावांची नगर परिषद
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील वगळलेल्या 18 गावांची स्वतंत्र नगरपरिषद करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
वगळण्यात आलेली गावे पुढील प्रमाणे- घेसर, हेदूटणे, उंब्रोली, भाल, द्धारली, माणेरे, वसार, आशेळे, नांदिवली तर्फे अंबरनाथ, आडिवली-ढोकली, दावडी, चिंचपाडा, पिसवली, गोळीवली, माणगाव, निळजे, सोनारपाडा व कोळे.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील उर्वरित 9 गावे पुढील प्रमाणे- आजदे, सागाव, नांदिवली पंचानंद, धारिवली, संदप, उसरघर, काटई, भोपर व देसलेपाडा.
कोकण विभागीय आयुक्त यांनी दिलेल्या अभिप्रायावरुन वरीलप्रमाणे स्वतंत्र नगरपरिषदेचा निर्णय घेण्यात आला.
कोरोनामुळे पब, डीजे, आॅर्केस्ट्रा, डान्सबार,
लाईव्ह बॅन्ड 31 मार्चपर्यंत बंद राहणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव दंगलीची चौकशी करणा-या आयोगाची पुण्यातील सुनावणी रद्द
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणार होती सुनावणी
पुण्याऐवजी आता मुंबईत 30 मार्च ते 4 एप्रिल दरम्यान होणार सुनावणी
मुंबईत लोकल बंद होणार नाही, लोकांनी चिंता करू नये, सर्वांनी नियमांचं पालन करावं, गर्दी करू नये, मंत्री अस्लम शेख यांची माहिती
31 मार्च पर्यंत नवीन लायसेन्स आणि आधार कार्ड दिली जाणार नाही, कार्यालयात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गर्दीमुळे सर्व कार्यालये आम्ही बंद करणार : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
कोरोनाचा आज एक रुग्ण आढळला, आतापर्यंत एकूण रुग्णसंख्या 40, मुंबई येथे आज एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळला, US प्रवासाचा इतिहास
दख्खनचा राजा जोतिबाची चैत्र यात्रा रद्द
,
कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी परिसरातील दहा गावांचा निर्णय
,
7 एप्रिलला होणार होती जोतिबा देवाची यात्रा
,
मंदिराचे चार दरवाजे बंद राहणार
पुन्हा एकदा 27लाखांचं बनावट सॅनीटायझर जप्त, पुणे गुन्हे शाखेची कारवाई, याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल, तर सहा आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
आज मध्यरात्रीपासून अंबाबाई मंदिर दर्शनासाठी बंद राहणार
,
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या बैठकीत निर्णय
,
धार्मिक विधी मात्र परंपरेनुसार होणार- जिल्हाधिकारी
सर्व सरकारी कार्यालये बंद राहणार तरी अत्यावश्यक सुविधा असलेली कार्यालये सुरु राहतील : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
मध्य रेल्वेचा मोठा निर्णय,
मुंबई, पुणे, नागपूर, भुसावळ अश्या शहरांना जोडणाऱ्या अश्या एकूण 23 गाड्या केल्या रद्द,
यात राजधानी एक्सप्रेसचा देखील समावेश, सोबत डेक्कन एक्सप्रेस, प्रगती एक्सप्रेस, हावडा दुरांतो, नंदीग्राम एक्सप्रेस केली रद्द,
परदेशातुन येणाऱ्या प्रत्येकाला 24 तास कॉरंटाइन केले जाईल, गरज असल्यास रुग्णालयात भरती केलं जाईल किंवा होम कॉरंटाइन केले जाईल : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
पुणे : पुन्हा एकदा सत्तावीस लाखांचं बनावट सॅनिटायझर जप्त, पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली, याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, सहा आरोपींना चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, कोणताही परवाना नसताना बनावट सॅनिटायझर बनवलं जात होतं. स्थानिक बाजारपेठेत विक्री केली जात होती. मेड इन नेपाळ आणि मेड इन तैवान लेबल लावून विक्री
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची 100 पथकं घरोघरी जाऊन तपासणी करतील : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कोरोनासंदर्भातील आढावा बैठक संपली, कॅबिनेट बैठकीला सुरुवात
अत्यावश्यक सेवा सोडून राज्यातील सरकारी कार्यालयं 7 दिवसासाठी बंद, कॅबिनेट बैठकीत निर्णय, अजून बैठक सुरू
नवी मुंबई : कोरोनो व्हायरसपासून वाचण्यासाठी आठवड्यातील दोन दिवस एपीएमसी बंद राहणार, गर्दी कमी करण्यासाठी फोन वरून ऑर्डर स्वीकारली जाणार
केंद्रीय राज्यमंत्री व्ही मुरलीधरन विलगीकरण कक्षात, केरळ दौऱ्यात कोरोनाबाधिताच्या संपर्कात आल्याने मुरलीधरन विलगीकरण कक्षात, मुरलीधरन यांची कोरोनाची चाचणी, अद्याप अहवाल आलेला नाही.
शिर्डी पाठोपाठ शनी शिंगणापूर देवस्थानचा बंदचा निर्णय, कोरोनाचा संसर्गजन्य रोग असल्याने गर्दी टाळण्यासाठी घेणार निर्णय, आज सायंकाळी 7 नंतर करणार दर्शन बंद
पुण्यातील नामांकित वैशाली, रुपाली, गुडलक बंद ठेवण्याचा निर्णय, पोलिसांच्या तोंडी आदेशानंतर निर्णय
टिटवाळ्याचं प्रसिद्ध महागणपती मंदिर दर्शनासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढील सूचना मिळेपर्यंत मंदिर बंद राहणार असल्याची विश्वस्तांची माहिती
मंत्रालयासह राज्यातील सर्व शासकीय कार्यालये काही दिवस बंद ठेवण्याचा सरकारचा विचार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता, शासकीय कार्यालयातील लोकांची गर्दी टाळण्यासाठी सरकारचा विचार
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी
कोरोना व्हायरसचा महाराष्ट्रात पहिला बळी, मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात उपचारादरम्यान 65 वर्षीय वृद्धाचा मृत्यू, दुबईवरून प्रवास करून भारतात आलेल्या रुग्णाचा मृत्यू
साईमंदिर दुपारी तीन वाजेपासून दर्शनासाठी अनिश्चित काळासाठी बंद
शिर्डी : साईमंदिर दुपारी तीन वाजेपासून दर्शनासाठी अनिश्चित काळासाठी बंद, शिर्डीच्या साईसंस्थानचा निर्णय, दैनंदिन पूजा आरती राहणार सुरु, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी मंदिर प्रशासनाचा निर्णय
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यासह संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणात वाढण्यास सुरुवात झाली आहे. त्याचा फटका आता दादरच्या फुलमार्केटला देखील बसला आहे. आता एका आठवड्यावर गुढीडीपाडवा येऊन ठेपला आहे. परंतु ग्राहकांनी मात्र फूल खरेदीकडे पाठ केली आहे. दरवर्षी साधारणपणे गुडीपाढव्याच्या आसपास 100 ट्रक माल विकला जातो. परंतु यंदा मात्र 10 ते 15 ट्रक देखील माल विकला जाऊ शकणार नाही अशी शक्यता व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे. तसेच झेंडूचं पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांना देखील कोरोनाचा चांगलाचं फटका बसणार आहे. मागच्या दिवाळी आणि दसऱ्याला अतिवृष्टीचं संकट आणि आता गुढीपाडव्याला कोरोना व्हायरसचं संकट आल्यामुळे शेतकरी चांगलाच अडचणीत येण्याची शक्यता आहे.
शिर्डी साई मंदिर दर्शनासाठी बंदचा निर्णय आज होण्याची शक्यता
शिर्डी साई मंदिर दर्शनासाठी बंद करण्याचा निर्णय आज होण्याची शक्यता, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साई मंदिर भाविकांसाठी बंद करण्याचा निर्णय होण्याची दाट शक्यता, मंदिरातील दैनंदिन पूजा विधी मात्र सुरूच राहणार, निर्णयाबाबत आज स.10.30 वा. मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण डोंगरे यांची पत्रकार परिषद
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर मध्यरात्रीपासून दर्शनासाठी बंद राहण्याची शक्यता
कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर मध्यरात्रीपासून दर्शनासाठी बंद राहण्याची शक्यता, कोरोना व्हायरसचा पार्श्वभूमीवर आज होणार निर्णय, जिल्हाधिकारी आणि देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्यात होणार आज बैठक, राज्यातील इतर देवस्थानप्रमाणे अंबाबाई मंदिर देखील आजपासून बंद ठेवण्याचा होणार निर्णय
नागपूरसह राज्यभरात पोलिसांच्या ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह कारवाई रद्द करण्याचा सूचना, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महासंचालक कार्यालयाकडून सूचना, ब्रेथ अॅनालायझरचा वापर बंद करण्याच्या सूचना
नवी मुंबई, वसई-विरार आणि औरंगाबाद महापालिका निवडणूक, जिल्हा परिषद आणि नगरपालिका पोटनिवडणुक स्थगित
वर्धा : कोरोनाबाधित देशातून जिल्ह्यात आलेल्या 45 व्यक्तींची यादी प्रशासनाला प्राप्त, नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने पाठवली यादी, 45 व्यक्तींना त्यांच्या घरीच 14 दिवस देखरेखीत ठेवणार, याशिवाय कुलबुर्गी येथून आलेल्या सहा विद्यार्थ्यांनाही घरीच निरीक्षनात ठेवण्यात येत आहे, विलगीकरण केलेल्याच्या हातावर वेगळे राहावे लागण्याच्या तारखेचा शिक्का मारणार
करोनाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये जमावबंदी लागू
31 मार्चच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड महापालिकेत नागरिकांची मोठी गर्दी होते. पण आता करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी लागू केल्याने नागरिकांनी महापालिकेची सर्व कामं ऑनलाईन करावीत अथवा अपॉइंटमेंट घेऊनच पालिकेत यावं असं आवाहन पालिका आयुक्तांनी केलं आहे. तसेच शहरात शंभर रॅपिड फोर्स तैनात करण्यात आल्या आहेत. यावेतिरिक्त शहरातील बगीचे बंद करण्यात आलेत तसेच सोसायटीमधील बगीचे आणि व्यायामशाळा बंद करण्याच्या सूचना ही देण्यात आल्या आहेत.
जेजुरी खंडेरायाचे मंदिर दर्शनासाठी बंद
आज मध्यरात्रीपासून जेजुरीच्या खंडेरायाचे मंदिर दर्शनासाठी बंद, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टी, ग्रामस्थ मंडळ, मनकारी यांच्या बैठकीत निर्णय, 31 मार्च 2020 पर्यत देवदर्शन बंद राहणार
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून संशयित रुग्णांची माहिती मिळवली जात आहे. पुणे शहरात काही ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे वतीने पुणे शहरात घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करुन संशयित रुग्णांची माहिती मिळवली जात आहे. पुण्यातील मंगलदास रोड येथील काही घरांमध्ये जाऊन सर्व्हे करण्यात आला. यामध्ये नागरिकांचे घर क्रमांक, वय, कुटुंब सदस्य, परदेश प्रवास आणि सर्दी- खोकला - ताप - श्वास घेण्यास त्रास अशी काही लक्षणे आहेत का याची माहिती गोळा केली जाणार आहे. त्याचप्रमाणे मागील 28 दिवसात कुटुंबातील कोणी सदस्य परदेश प्रवास करुन आले का आणि किती व्यक्तींच्या संर्पकात होता याची माहिती घेतली जाणार आहे. मनपातील विविध अधिकारी आणि कर्मचारी यांचा यात समावेश असून 30 कर्मचाऱ्यांचे एक पथक अशी एकूण 125 पथके तयार करण्यात आली आहेत. संपूर्ण पुणे शहरात विशेषत: ज्या भागात कोरोना रुग्ण प्रार्दुभाव असलेले रुग्ण मिळून आले तेथील सर्व्हेक्षण करुन नागरिकांना उपाययोजनेची माहिती देऊन जनजागृती केली जाणार असल्याचे मनपाचे आरोग्य प्रमुख यांनी सांगितले आहे.
पार्श्वभूमी
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
मुंबई : राज्यात यवतमाळ येथे एक आणि नवी मुंबई येथे एक असे दोन करोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 39 झाली आहे. राज्यात 108 लोक विलगीकरण कक्षात दाखल असून 1063 होम क्वारंटाईन असून त्यापैकी 442 जणांचा 14 दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली. दरम्यान मुंबईत एका तीन वर्षाच्या मुलीला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. मुंबई महापालिकेने याबाबत अधिकृत माहिती दिली आहे. कल्याण येथील कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं निदान झालेल्या व्यक्तीची 33 वर्षीय पत्नी आणि तीन वर्षीय मुलीचे नमुने कोरोना पॉजिटिव्ह आल्याचा तपशील महापालिकेने दिला आहे.
यवतमाळ येथे कोरोना बाधित आढळलेली 51 वर्षाची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आय टी तज्ञाची आई आहे. ती स्वतः ही दुबई सहलीमध्ये सहभागी झाली होती. यामुळे यवतमाळ येथे आढळेल्या रुग्णांची संख्या 3 झाली आहे. दुबईला गेलेल्या 40 जणांच्या चमूतील एकून 15 जण कोरोना बाधित आढळले असून 22 जण निगेटिव्ह आढळले आहेत. या चमूतील बेळगाव येथील 3 जणांना कोणतीही लक्षणे नसल्याने त्यांना घरात विलग करण्यात आले आहे.
आज कोरोना बाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. आजपर्यंत फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या या 10 जणांच्या चमूतील 3 जण कोरोना बाधित आढळले असून इतर 7 जण कोरोना निगेटिव्ह आढळले आहेत.
राज्यात अशी आहे पॉझिटिव्ह रुग्णांची स्थिती
पिंपरी चिंचवड मनपा- 9,
पुणे मनपा- 7,
मुंबई -6, नागपूर-4,
यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण-प्रत्येकी 3,
रायगड, ठाणे, ,अहमदनगर, औरंगाबाद- प्रत्येकी 1 असे एकूण 39 रुग्ण आढळून आले आहेत.