Coronavirus UPDATES | खासगी कार्यालयांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' बंधनकारक, राज्य सरकारचे आदेश
देश-विदेशातील कोरोना व्हायरसचे सर्व अपडेट संक्षिप्त स्वरुपात
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
16 Mar 2020 10:51 PM
पुण्याच घरोघरी जाऊन माहिती गोळा करण्याचे काम
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिका आरोग्य विभागाच्या वतीने घरोघरी जाऊन नागरिकांची माहिती गोळा करून संशयित रुग्णांची माहिती मिळवली जात आहे..
कोरोनावर उपाय म्हणून गोळ्या विकणाऱ्या आयुर्वेदिक भांडारवर धाड
एकीकडे कोरोना व्हायरस ने धुमाकूळ घातलेल्या असताना याचा फायदा घेत अनेकांनी स्वतःचे खिसे भरण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे मुलुंडच्या आरआरटी रोड वर असलेल्या शीतल आयुर्वेदिक भांडारमध्ये चक्क कोरोना वर उपाय म्हणून गोळ्या मिळत असल्याची जाहिरात करण्यात आली होती. माती सारखी चव असणाऱ्या या गोळ्या दीडशे रुपयांना पाकीट अशा विकल्या जात होत्या.कोरोना झालेल्या व्यक्तीने दर दहा मिनिटाला गरम पाण्यासह एक गोळी घ्यावी यामुळे कोरोना बरा होतो असा दावा या आयुर्वेदिक भांडार तर्फे करण्यात येत होता.याची जाहिरात पॉप्लेट, भिंतीपत्रकाद्वारे करण्यात आली होती.या बाबत अन्न व औषध प्रशासनाला माहिती मिळताच त्यांनी मुलुंड पोलिसांच्या मदतीने या दुकानावर छापा मारली.या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणत अश्या प्रकारच्या गोळ्यांचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.रात्री उशिरापर्यंत याबाबतची कारवाई सुरू आहे.
भाजपच्या बैठकांवर कोरोनाचं सावट
भाजपच्या या आठवड्यातील दोन बैठका रद्द,
भाजपची विस्तारित कोअर कमिटीची बैठक रद्द,
उद्या 5 वाजता होती बैठक, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर उद्या शासकीय निवासस्थानी होती बैठक
,
दुसरी, 18 तारखेला नियोजित असलेली भाजप आमदार आणि खासदारांची बैठकही रद्द
,
आमदार आणि खासदारांसाठी सोशल मिडियाचं वर्कशॉप ठेवण्यात आलं होतं
,
दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होते वर्कशॉपचे आयोजन
भाजपच्या या आठवड्यातील दोन बैठका रद्द,
भाजपची विस्तारित कोअर कमिटीची बैठक रद्द,
उद्या 5 वाजता होती बैठक, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर उद्या शासकीय निवासस्थानी होती बैठक
,
दुसरी, 18 तारखेला नियोजित असलेली भाजप आमदार आणि खासदारांची बैठकही रद्द
,
आमदार आणि खासदारांसाठी सोशल मिडियाचं वर्कशॉप ठेवण्यात आलं होतं
,
दादरच्या वसंत स्मृती कार्यालयात होते वर्कशॉपचे आयोजन
कोरोना पोहोचला मंत्रालयापर्यंत
मंत्रालयातील सार्वजनिक बांधकाम विभागातील एक अधिकारी कोरोनाच्या टेस्टसाठी कस्तुरबा रुग्णालयात दाखल, सदर अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी कोरोना बाधित असल्याचे रिपोर्ट आल्याने अधिकारी कस्तुरबा रुग्णालयात, मंत्रालयातील अधिकाऱ्याचा भाऊ आणि वहिनी नुकतंच अमेरिकेला जाऊन आले आहेत. त्यानंतर त्यांना खोकला आणि ताप झाल्याने कोरोनाची टेस्ट करण्यात आली.
त्यांच्या कोरोनाचे टेस्ट पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही भाऊ एकाच इमारतीत राहतात, एकमेकांना भेटत राहतात. भावाचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्याने तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले आणि आज कस्तुरबा मध्ये या अधिकाऱ्याच्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट्स अजून आलेले नाहीत.
त्यांच्या कोरोनाचे टेस्ट पॉझिटिव्ह आले. हे दोन्ही भाऊ एकाच इमारतीत राहतात, एकमेकांना भेटत राहतात. भावाचे टेस्ट रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मंत्रालयातील अधिकाऱ्याने तात्काळ आपल्या वरिष्ठांना कळवले आणि आज कस्तुरबा मध्ये या अधिकाऱ्याच्या टेस्ट झाल्या. रिपोर्ट्स अजून आलेले नाहीत.
खासगी कार्यालयांमध्ये 'वर्क फ्रॉम होम' बंधनकारक, तर 50टक्क्यांपेक्षा जास्त उपस्थिती नसावी, राज्य सरकारचे आदेश
चंद्रपूर :ताडोबासह राज्यातील सर्व व्याघ्र प्रकल्प, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये, किनारी आणि सागरी जैव विविधता केंद्र पर्यटकांसाठी बंद, 31 मार्चपर्यंत पर्यटनास बंदी, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) नितीन काकोडकर यांनी जारी केले आदेश
मुंबईतील सर्व धार्मिक सार्वजनिक कार्यक्रम 31 मार्चपर्यंत रद्द करावेत, गर्दी होणारे कोणतेही समारंभ आयोजन करू नये, गर्दी होणारी सर्व मंदिरं दर्शनासाठी बंद करावी, मुंबई जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी पुणे शहरातील किरकोळ व घाऊक व्यापाऱ्यांचा तीन दिवस ( 17,18,19 मार्च) स्वयंस्फूर्तीने बंद, पुणे व्यापारी महासंघाच्या बैठकीत एकमताने निर्णय, बंदमधून जीवनावश्यक वस्तू व औषधे वगळली
LIVE UPDATES : दगडूशेठ गणपती मंदिर उद्यापासून दर्शनासाठी बंद, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
जग मंदीच्या फेऱ्यात असताना हे संकट आलेलं आहे, आर्थिक फटका बसणार असेल तर काय उपाययोजना करता येईल हे पाहण्याचे आदेश सचिवांना दिले आहेत, रेलवे अधिकारी, एसटी अधिकाऱ्यांना बोलावून साफसफाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत, पुढचे 15 ते 20 दिवस कसोटीचे आहेत
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका,अनावश्यक प्रवास टाळा
- स्वतःहून जी बंधन पाळू, त्याने मदत होईल, पुण्यात काही स्वयंसेवी संघटना पुढे आल्या, ते स्वतःहून मास्क देत आहेत, इतर शहरात कोणी स्वयंसेवी पुढे आले तर स्वागत असेल
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका,अनावश्यक प्रवास टाळा
- स्वतःहून जी बंधन पाळू, त्याने मदत होईल, पुण्यात काही स्वयंसेवी संघटना पुढे आल्या, ते स्वतःहून मास्क देत आहेत, इतर शहरात कोणी स्वयंसेवी पुढे आले तर स्वागत असेल
उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद
- राज्यातील 15 ते 20 दिवस महत्वाचे आहेत
- पहिला रुग्ण आढळला त्याला 10 दिवस झाले
- आता काळजी घ्यायची गरज
- आता ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
- हॉटेल्स, रेल्वे,बस बंद नाही
- जनता स्वतःहून शिस्त पाळेलं
- स्वतःची स्वत: काळजी घ्या
- पुढचं संकट टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद ,चर्च गर्दी होऊ देऊ नका
- पहिला रुग्ण आढळला त्याला 10 दिवस झाले
- आता काळजी घ्यायची गरज
- आता ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालय बंद करण्याचा निर्णय घेतला आहे
- हॉटेल्स, रेल्वे,बस बंद नाही
- जनता स्वतःहून शिस्त पाळेलं
- स्वतःची स्वत: काळजी घ्या
- पुढचं संकट टाळण्यासाठी मंदिर, मस्जिद ,चर्च गर्दी होऊ देऊ नका
सोलापूर : 45 दिवसपासून सुरू असलेल शाहीन बाग आंदोलन स्थगित, कोरोनामुळे 31 मार्चपर्यंत आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय, सोलापूरचे शहर काझी अमजदअली यांनी केली घोषणा
#CoronaUpdate | राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 39 वर पोहोचला
राज्यातील स्थिती :-
पिंपरी चिंचवड - 9
पुणे- 7
मुंबई - 6
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड, ठाणे, अहमदनगर,औरंगाबाद - प्रत्येकी 1
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 39
राज्यातील स्थिती :-
पिंपरी चिंचवड - 9
पुणे- 7
मुंबई - 6
नागपूर - 4
यवतमाळ - 3
कल्याण - 3
नवी मुंबई - 3
रायगड, ठाणे, अहमदनगर,औरंगाबाद - प्रत्येकी 1
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण - 39
पुणे विभागाला सरकारकडून 15 कोटीॆचा निधी : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
कोल्हापूर : महापालिकेची सर्व उद्याने 31 मार्च पर्यंत बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा निर्णय, महापालिकेतील आपत्कालीन बैठकीत निर्णय
कोल्हापूर : महापालिकेची सर्व उद्याने 31 मार्च पर्यंत बंद राहणार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्तांचा निर्णय, महापालिकेतील आपत्कालीन बैठकीत निर्णय
पुणे महापालिकेच्या 125 तर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 50 टीम घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत,
15803 घरांमध्ये आतापर्यंत सर्वे करण्यात आला आहे : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
15803 घरांमध्ये आतापर्यंत सर्वे करण्यात आला आहे : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
पुण्यातील पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या 16 वर : पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर
मंत्रालयामध्ये सामान्यांना आता प्रवेश मिळणार नाही : आरोग्यमंत्री राजेश टोपे
सर्व निवडणुकांना पुढील तीन महिने स्थगिती
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे लाईव्ह
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत, आरोग्यमंत्री राजेश टोपे लाईव्ह
कोरोंटाईन केलेल्यांवर निळ्या शाईचे शिक्के मारणार!
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेन्टमध्ये जमावबंदी लागू करण्याचा निर्णय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीनंतर निर्णय
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राधानगरी अभयारण्य 31 मार्चपर्यंत बंद राहणार, वनविभागाचा निर्णय
राज्यातील सर्व विद्यापीठांच्या निवडणुका पुढे ढकला, आरोग्यमंत्री राजेश टोपे लाईव्ह
उस्मानाबाद : तुळजाभवानी मंदिरातले दर्शन 31 मार्चपर्यंत पूर्ण बंद, पुढील आदेश येईपर्यंत मंदिर बंद, मंदिर प्रशासनाचा निर्णय, मंदिरातले सगळे विधीही बंद होणार
राज्यातील कार्यालयांमध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी बायोमेट्रिक पद्धतीने हजेरी बंद, या कालावधीत कर्मचारी,अधिकारी यांची उपस्थिती हजेरीपटवर नोंदवण्यात येणार,
संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंद
संपूर्ण महाराष्ट्रात शासकीय कार्यालयात बायोमेट्रिक हजेरी बंद
राज्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा 37 वर, मुंबईत तीन जणांना तर नवी मुंबईत एकाला कोरोनाची लागण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि कॅन्टोनमेन्टमधे जमावबंदी लागू करण्याचा निर्णय, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी , महापालिका अधिकारी आणि पोलिस अधिकारी यांच्या एकत्रित बैठकीनंतर निर्णय
रायगड जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळे 31 मार्चपर्यंत बंद
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्ह्यातील प्रमुख प्रेक्षणीय स्थळं बंद ठेवण्याचा निर्णय घेतलाय. तसेच या ठिकाणी प्रवेशास बंदी घातली आहे. पाली मधील बल्लाळेश्वर देवस्थान, खालापूर मधील महड देवस्थान, खोपोली मधील इमॅजिका वॉटरपार्क, उरण मधील घारापुरी ही सर्व ठिकाणे 31 मार्च पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश रायगडच्या जिल्हाधिकारी यांनी दिलेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये बंद, केवळ ज्या महाविद्यालयात परीक्षा सुरु आहेत तेच विद्यार्थी महाविद्यालयात येत आहेत, इतर शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, शिक्षक हजर आहेत, आलेल्या पालक-विद्यार्थ्यांना शाळा बंद असल्याची सूचना देत आहेत
बीडमधील मच्छिंद्रनाथ गडावरील यात्रा उत्सव रद्द
बीड जिल्ह्यातील मायंबा येथे नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथ यांचा संजीवनी समाधी सोहळा दरवर्षी होतो. पण यावर्षी कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे ही यात्रा रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली. संजीवनी समाधी सोहळा नाथ संप्रदायाचे आद्य मच्छिंद्रनाथांच्या संजीवनी समाधी सोहळा मायंबा (ता.आष्टी) येथे दरवर्षी गुढी पाडव्याच्या एक दिवस आगोदर मोठी यात्रा होते, लाखो भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात. परंतु यावर्षी कोरोना व्हायरसमुळे हा यात्रात्सोव होणार नाही, असे सांगण्यात आलं आहे.
कोल्हापूरमध्ये दगावलेला रूग्ण हा कोरोना संशयित नाही
कोल्हापूरमध्ये दगावलेला रूग्ण हा कोरोना संशयित नसल्याची माहिती राज्य साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.
कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू
कोल्हापुरात कोरोना व्हायरस संशयिताचा मृत्यू, संबधित व्यक्ती 15 तारखेला कोरोना संशयित म्हणून सीपीआरमध्ये झाली होती दाखल, मृत व्यक्तीचे स्वॅब टेस्टिंगसाठी पुण्याला पाठवले, आज येणार अहवाल, 8 मार्च ते 15 मार्च त्यांनी हरियाणा, दिल्ली, मुंबई, पुणे आणि कोल्हापूर असा टॅक्सीने प्रवास केला होता, मृत व्यक्ती मूळची हरियाणामधील असून कामानिमित्त हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे राहत होती.
कोरोनोमुळे सांगली एसटी महामंडळ विभागाला मोठा फटका
कोरोनामुळे कालच्या एका दिवसात सांगली जिल्ह्यातील एसटीच्या तब्बल 432 फेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. गेल्या 2 दिवसात तब्बल 22 लाखाचे नुकसान एस टी महामंडळाचे झाले आहे. प्रवासी संख्या कमी झाल्याने हा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.
राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढवणार
राज्यातील प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यात येणार आहे. कस्तुरबा गांधी रूग्णालयासह के.ई.एम. रूग्णालयातही कोरोना तपासणीची प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार आहे. या दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दररोज 250 नमुने तपासण्याची क्षमता असलेली यंत्रणा उभारण्यात येणार आहे. बुधवारपासून या दोन्ही प्रयोगशाळा पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होतील अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबईतील पब्स, डिस्को बंद होणार,
सरकारने दिले आदेश
सरकारने दिले आदेश
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिझनेस आणि पर्यटन टूर 31 मार्चपर्यंत बंद
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिझनेस आणि पर्यटन टूर 31 मार्चपर्यंत बंद करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांनी दिले आहेत. मुंबई दर्शन सारख्या टूरही यामुळे बंद राहणार आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सरकारी पातळीवर हालचालींना आणखी वेग आल्याचं दिसत आहे.
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर
पुण्यात कोरोनाबाधित नवा रुग्ण सापडल्यानं आता पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहचली आहे. त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी पुणेकरांना केलं आहे. याशिवाय मॉलमध्ये फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकानंच सुरू राहणार आहेत. मॉलमधील कपड्यांची आणि इतर दुकानं मात्र बंद राहणार आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात निर्बंध
महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 33 वर पोहचला आहे. दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई आणि पुण्यात लागू असलेले निर्बंध आता राज्यभरात लागू होणार आहेत. राज्यभरातली चित्रपटगृहं, नाट्यगृहं, जलतरण तलाव, व्यायामशाळा आणि म्युझियम आता 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. तर, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे.
पार्श्वभूमी
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी एकाला कोरोना व्हायरसची लागण झाली आहे. त्यामुळे एकट्या पुणे जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 16 वर पोहोचली आहे, तर राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांंचा आकडा 33 वर पोहोचला आहे. देशभरात कोरोनाबाधितांचा आकडा 107 वर पोहोचला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईप्रमाणेच पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी लागू करण्याबाबत हालचाली सुरू झाल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवड दोन्ही पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव दिल्याची जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी माहिती दिली आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 36 वर
- पुणे - 16
- मुंबई - 5
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 1
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद - 1
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
- महाराष्ट्र -33
- केरळ - 22
- पंजाब - 1
- दिल्ली - 7
- जम्मू कश्मीर - 2
- लडाख - 3
- राजस्थान - 4
- उत्तरप्रदेश - 11
- कर्नाटक - 6
- तामिळनाडू - 1
- तेलंगाना - 3
- हरयाणा - 14
- आंध्रप्रदेश - 1
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -