Coronavirus LIVE UPDATES | भिवंडीत कोरोनाचा दुसरा रुग्ण आढळल्याने खळबळ

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 14 Apr 2020 11:37 PM
पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील सारणी गावात पोलिसांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. कासा पोलिस ठाण्याचे एपीआय काळे यांच्यासह दोन अधिकारी आणि दोन कर्मचारी दगड लागल्याने जखमी झाले आहे. काही सामाजिक कार्यकर्ते गरीब कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यासाठी आले असताना त्यांची गाडीही सारणी गावातील काही ग्रामस्थांनी अडवली. त्यानंतर ओळख देऊनही त्यांना मारहाण करून त्याच्या गाडीच्या काचा फोडल्या. या भागात चोर आल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या आहेत.

कोल्हापूर : लॉकडाऊनमध्ये वाढ होताच कोल्हापुरात तळीरामांनी बार फोडला, सुमारे 31 हजारांची दारू चोरली, ड्रीमलॅन्ड बार आणि परमिट रुम चोरट्यांनी फोडले, राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जगभर थैमान घातलेल्या कोरोनाचा शिरकाव आता भिवंडीतही झाला आहे. भिवंडी शहरात 70 वर्षीय इसमाचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने शहरात एकच खळबळ उडाली होती . मात्र आज भिवंडी तालुक्यातील ग्रामीण भागातील पडघालगत असलेलया बोरिवली गावातील एका 70 वर्षीय महिलेला कोरोना झाल्याचे निष्पन्न झाले आहे. महिलेला ठाणे येथील सिव्हील रुग्णालयात दाखल केले असून तिच्या घरातील चार जणांना कॉरेन्टाइन करून राजाणोली येथील टाटा आमंत्रण येथे ठेवण्यात आले आहे. तसेच तिच्या घराचा परिसर सील करण्यात आला आहे

पिंपरी चिंचवडमध्ये आणखी सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. यात तीन महिला आणि तीन पुरुषांचा समावेश आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने त्यांना कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे शहराचा आकडा 43 वर जाऊन पोहचलाय.
पुणे : ससुन रुग्णालयात आज सकाळपासून तीन कोरोना रुग्णांचा मृत्यू, सकाळपासून चार पॉझिटीव्ह रुग्ण आ
आढळले, यात ससुन रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सचाही समावेश
.
शहरी नक्षलवाद प्रकरणी प्राध्यापक आनंद तेलतुंबडे यांना एनआयएकडून अटक, थोड्याच वेळात मुंबई सत्र न्यायालयातील एनआयए कोर्टात हजर करणार
आयनॉक्ससाठी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आलं आहे. आयनॉक्सला कर्मचारी पुरवणाऱ्या एसॉर्ट आणि इनोव्ह या कंपन्यांनी आपआपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून तत्काळ कमी केलं आहे. 31 मार्चला तशी लेखी पत्रं, मेसेज कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आले आहेत.
जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे पोलिसांनी काळ्या बाजारात जाणारा 18 क्विंटल तांदूळ जप्त केला आहे, या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून तांदूळ आणि चार चाकी गाडी सह पोलिसांनी 4 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. बदनापूर येथे रात्री गस्ती दरम्यान एका छोट्या हत्ती मध्ये जाणारा तांदूळ पोलिसांना आढळून आला अधिक चौकशी केली असता हा तांदूळ औरंगबाद मध्ये काळ्या बाजारात जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ,या प्रकरणी दोन आरोपींना अटक करून त्यांच्यावर बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मालेगावमध्ये प्रशासनाने आता कठोर पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. कामात हलगर्जीपणा केल्याने दोन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच महत्वाचं म्हणजे मालेगावातील पेट्रोल पंप आता सामान्य नागरिकांसाठी बंद करण्याचे आदेश नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिले असून फक्त अत्यावश्यक सेवांसाठी हे पंप सुरू राहणार आहेत यासोबतच सिन्नर तालुक्यात देखील पहिला रुग्ण सापडल्याने प्रशासन अधिक सतर्क झालं आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात अद्याप एकही कोरोना बाधित रूग्ण नाही, मात्र जिल्ह्यात इतर भागातील लोकांचा प्रवेश होऊ नये यासाठी प्रशासन विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्ह्यातील सीमावर्ती भागात त्यासाठी कडेकोट निगराणी ठेवण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुका हा नागपूर जिल्ह्याला लागून आहे आणि नागपूर जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या पाहता या भागात लॉक डाऊन चे काटेकोर पालन करण्यात येत आहे.
लॉक डाऊनच्या काळात कर्तव्यावर असलेल्या धुळे महानगर पालिकेच्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना दोन कबुतर जमिनीवर पडलेले दिसले . उच्च दाबाच्या वीज वाहिनीच्या पोलवरून हे दोन कबुतर विजेचा शॉक लागल्यानं जमिनीवर कोसळल्याचे निदर्शनास येताच ड्युटीवर असलेल्या या कर्मचाऱ्यांनी त्या कबुतरांना वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला . त्या कबुतरांना पाणी पाजलं मात्र अखेरीस यात दोन पैकी एक कबुतराचा जीव वाचला , मात्र एका कबुतराचा मृत्यू झाल्यानं ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तसेच त्याठिकाणी उपस्थित असलेल्या पक्षी प्रेमींनी हळहळ व्यक्त केली . ही घटना धुळे शहरातील शिवतीर्थ चौकात मंगळवारी सकाळी 8 ते 11 वाजेच्या दरम्यान घडली.

राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा 2455 झाला आहे. काल दिवसभरात 121 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मुंबई 92, नवी मुंबई 13, रायगड 1, ठाणे 10 आणि वसई-विरारमध्ये 5 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.
कोरोना तपासणीसाठी लागणारे साहित्य पुरवठादाराने परत नेले. पाठपुरावा करुनही सीपीआर प्रशासनाने बिले दिली नाहीत. त्यामुळे पुरवठादाराने 12 लाखांचे साहित्य परत नेले. स्वॅब घेण्यासाठी किटच नाही, असे चित्र सध्या सीपीआरमध्ये आहे.

सांगली-कोल्हापूर रोडवरील विष्णूअण्णा फळ मार्केटमधील गर्दी आज पूर्णपणे कमी झाली आहे. काल एबीपी माझाने मार्केटमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक आल्याने सोशल डिस्टन्स न पाळता व्यापाऱ्याकडून आंब्याची खरेदी-विक्री होत
असल्याची बातमी एबीपी माझाने पाठवली होती. या बातमीची जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस दलाने दखल घेत गर्दी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याचा इशारा
दिला होता. आज गर्दी न करता आणि सोशल डिस्टन्स पाळून फळ मार्केटमधील खरेदी विक्री सुरु आहे.
नागपुरातील कोरोनाबधितांची संख्या आता 48 झाली आहे. वाडी परिसरातील आंबेडकरनगर भागात एक 58 वर्षीय रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. हा इसम काही दिवसांपूर्वी अजमेर आणि जवळपासच्या परिसरात गेला होती. तिथून परतल्यानंतर त्याला इन्स्टिट्यूशनल क्वॉरन्टाईन करण्यात आलं होतं. आज त्याच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
बीड : गेवराई तालुक्यातील एका 40 वर्षीय इसमास कोरोनाची काही लक्षणे जाणवू लागल्यामुळे तपासणीसाठी स्वतःहून पुढे आला होता. त्याची कोरोना तपासणी केल्यानंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. मध्यरात्री जिल्हा रुग्णालयातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू
मालेगाव : कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची महत्त्वाची जबाबदारी असतांना कर्तव्यात हलगर्जीपणा केल्या प्रकरणी मालेगावातील दोन पोलीस उपविभागीय अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटिस, संचारबंदी लागू असूनही मालेगावातील काही भागात गर्दी अद्यापही का दिसते याबाबत विचारणा
वाशिम :कोरोनाविरुद्धच्या लढ्यात महत्वाची भूमिका पार पाडत आहेत ते डॉक्टर आणि पोलीस, मात्र पोलीस आता माणसा बरोबर मुक्या जनावरांची देखील काळजी घेताना दिसत आहेत. लॉकडाऊनच्या काळात मुक्या जनावरांची गैरसोय होत आहे. अशा वेळी वाशिम पोलीस खात्यात कार्यरत असलेल्या राजकुमार चौबे या कर्मचाऱ्याने भूकलेल्या माकडांना दररोज खाण्याची सोय करत आहेत. चौबे यांच्या एका इशाऱ्यावर माकड खाण्यासाठी धावत येतात.

पालघर : डहाणूत 3 वर्षाच्या मुलीचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, पुन्हा एकदा सॅम्पल स्वॅब टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले असून, मुलगी राहत असलेला डहाणू तालुक्यातील भाग सील करण्यात आला आहे, तर तिच्या आई वडिलांचे ही नमुने तपासणी साठी पाठविण्यात आले आहेत
परभणीकरांचे डॉ बाबासाहेब आंबडेकरांना घरूनच अभिवादन, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मेणबत्ती लावून कोरोनामुळे मृत पावलेल्याना आदरांजली वाहण्यात आली. परभणीच्या आंबेडकर नगर येथील रहिवाशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती घरुनच साजरी करत कोरोनाच्या युद्धात आपलं मोठे योगदान दिलं
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि खबरदारी म्हणून सांगली जिल्ह्यात काही कडक नियम उचलण्यात आले आहेत. यामध्ये सांगली जिल्ह्यात आता प्रत्येक व्यक्तीला मास्क हे अनिवार्य करण्यात आलं आहे. मास्क न घालता आणि विनाकारण रस्त्यावर येणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच्या झालेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सनंतर हे निर्णय जाहीर केले आहेत. मास्क अनिवार्य करण्याबरोबरच आंतरजिल्हा आणि आंतरराज्य सीमांवर आणखी कडक निर्बंध घालण्यात येणार आहेत. वारंवार विनाकारण येणाऱ्या वाहनांवर जप्ती केली जाणार आहे. सांगली जिल्ह्यात 90 टक्के लोक हे होम क्वॉरंन्टाईनचं पालन करत आहेत. मात्र दहा टक्के लोक हे होम क्वॉरंन्टाईनचं पालन करत नाहीत, होम क्वॉरंन्टाईन लोकांचं जिओ टॅगिंग केल गेलं आहे, त्यांच्या हालचालीवर पोलिसांचं लक्ष आहे, जे लोक क्वॉरंन्टाईनच पालन करणार नाहीत, अशांवर कडक कारवाई केली जाणार आहे. याशिवाय बँकांच्या बाहेर गर्दी होऊ नये यासाठी प्रत्येक बँकेने एक सोशल डिस्टन्सिंग मॅनेजर आणि दोन कर्मचारी नेमावेत,तशा लेखी सूचना बँकांना देण्यात आले आहेत.
जगभरात कोरोनाने थैमान घातले असून यामुळे लाखो लोकांचा मृत्यू झालेला आहे. हीच बाब लक्षात घेऊन परभणीच्या आंबेडकरनगर येथील रहिवाशांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रात्री बारा वाजता सर्व कॉलनीमध्ये मेणबत्ती लावून या मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे आणि जयंती घरातच साजरी करण्याचे आवाहन केले. महत्त्वाचे म्हणजे नेहमी जयंतीनिमित्त परभणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर जो आंबेडकरी अनुयायांनी फुलून गेलेला असतो, त्याच ठिकाणी आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला. प्रत्येक नागरिकाने आंबेडकरांची जयंती घरातच साजरी करण्याचं ठरवत कोरोनाच्या युद्धात आपले मोठे योगदान दिले आहे. त्याचं एक बोलकं चित्र या परभणीत पाहायला मिळाले आणि याच एकजुटीमुळे परभणी जिल्ह्यात आजपर्यंत एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही हे विशेष..
कोरोनाचे संकटात असताना आता कोकणातले शेतकऱ्यांसमोर नव संकट उभं राहत आहे. ते म्हणजे अवकाळी पावसाच. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गतील काही भागात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यावेळी ते 40 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपासून रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील अनेक भागात आवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आंबा बागायतदार शेतकरी आणि काजू उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. अवकाळी पावसामुळे फळगळ होण्याची शक्यता आहे. आणि सध्याची परिस्थिती पाहता एकंदरीत अवकाळी पाऊस हा कोकणातल्या शेतकऱ्यांची चिंता वाढवणारा आहे.

पार्श्वभूमी

देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...





पंतप्रधान मोदी आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार!


 


देशात जीवघेणा कोरोना व्हायरस फोफावत आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती. आज या लॉकडाऊनचा आज शेवटचा दिवस असून याच प्राश्वभूमीवर पंतप्रधान आज सकाळी 10 वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पीएमओने ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली आहे.


 


दोन आठवड्यांनी वाढू शकतो लॉकडाऊन


 


सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील जनतेला संबोधित करताना देशातील लॉकडाऊन दोन आठवड्यांसाठी वाढवू शकतात. असंदेखील सांगितलं जात आहे की, यंदा लॉकडाऊनमध्ये काही क्षेत्रांना सुटही मिळू शकते.


 


महाराष्ट्रात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढणार; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा निर्णय


 


मुंबईसह काही शहरात परिस्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने महाराष्ट्रात तरी 14 एप्रिलनंतरही लॉकडाऊन वाढवणार असल्याचा निर्णय घेतल्याचं यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्राने नेहमीच देशाचे नेतृत्व केलं आहे. या कोरोना संकटातही महाराष्ट्र ठाम उभा राहून जगाचं नेतृत्व करेल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. त्यामुळे किमान 30 एप्रिलपर्यंत राज्यात लॉकडाऊन वाढवत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितल आहे. या संकटामध्ये सर्व राज्ये देशाच्या पाठीशी उभा आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील सर्व राज्यांना योग्य त्या सूचना देत आहेत. यात राजकारण आणू नये ही विनंती आहे. राजकारण आपण आयुष्यभर करत आलो. मात्र, राजकारण करण्याची ही वेळ नसल्याचंही मुख्यमंत्री म्हणाले.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.