coronavirus LIVE UPDATES | पुण्यात कोरोनाचे आणखी दोन बळी, एकूण संख्या 33
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
13 Apr 2020 09:22 PM
Corona Update | महाराष्ट्राचा मृत्यूदर अधिक का आहे याचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचनेनंतर समितीची स्थापना, मृत्यूदर कमी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणी खाजगी तज्ज्ञ डॉक्टरांची मदत घेणार
मुंबई-पुणेसारखे रेड झोन वगळून अन्य जिल्ह्यात उद्योगांना उत्पादनाची परवानगी देण्याबाबत प्रस्ताव करण्याच्या सूचना दिल्या आहेत, उद्योगमंत्री सुभाष देसाईंची माहिती
पुण्यात कोरोनाचे आणखी दोन बळी गेले आहे. कोंढव्यातील रहिवाशी असलेल्या 50 वर्षीय महिलेचा आज दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. 9 एप्रिलला त्याला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याला आधीपासूनच वेगवेगळे आजार होते. त्यात कोरोनाचीही लागण झाली होती. या शिवाय रविवारी मृत्यू झालेल्या एका व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे पुण्यात कोरोनामुळे मृत्युमुखी झालेल्यांची संख्या 33 वर पोहोचलीय.
कोरोना साथरोग नियंत्रणासाठी लागू केलेल्या लॉकडाऊन कालावधीत राज्यात रेशनिंगसाठी हेल्पलाईन कार्यरत करण्यात आली आहे. जनतेने रेशनिंग संदर्भातील तक्रारी आणि माहिती मिळविण्यासाठी 1800224950 किंवा 1967 या नि:शुल्क हेल्पलाईन क्रमांकाचा वापर करावा, असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागाने केले आहे.
नवी मुंबईत आज एकाच दिवसात 11 कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण
एकाच दिवसात आढळले. नवी मुंबईची संख्या 50 वर पोहचली आहे. एकाच दिवशी 11 ने पहिल्यांदाच शहराची कोरोना पॉझिटीव्ह संख्या वाढली आहे.
बेलापूर गावात एकाच कुटूंबात 6 पॉझिटीव्ह रूग्ण ,वाशीत 2,नेरूळ 2, कोपरखैरणे 1
नवी मुंबईत आज एकाच दिवशी 11 कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण, नवी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 50 वर, बेलापूर गावात एकाच कुटुंबात सहा पाॅझिटिव्ह रूग्ण, वाशीमध्ये दोन, नेरुळमध्ये दोन, कोपरखैरणे येथे एक कोरोनाचा रुग्ण आढळला
मालेगावची परिस्थिती ही चिंता करण्यासारखीच आहे. मालेगावमध्ये लॉकडाऊनच पालन नीट होत नाही. मालेगावात आरोग्य तपासणीसाठी कर्मचारी गेल्यानंतर कोणीतरी अफवा उठवतं की सीएएच्यातपासणी साठी आले, त्यामुळे तेथे पोलीस बळही कमी पडतंय, छगन भुजबळ यांनी माहिती
कोल्हापूर काँग्रेस कमिटीची इमारत विलगीकरणासाठी देण्यात येणार, कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी पक्षाचे कार्यालय देण्याची पहिलीच घटना, 100 बाय 60 फुटाचा भव्य हॉल जिल्हा प्रशासनाकडे सोपवला
कोरोना संकटावर मात करण्यासाठी चंद्रपुरात 87 वर्षांच्या आजींनी 25 हजाराची पेन्शन दान केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे धनादेश दिल्यानंतर जिल्हाधिकारी भावूक झाले. याआधीही प्रत्येक संकटात आजींनी सढळ हस्ते मदत केली आहे. हे दान नव्हे तर आशीर्वाद असल्याची भावनात्मक प्रतिक्रिया जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
खारघर सेक्टर 15 मधील घरकूल सोसायटीमध्ये 3 कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाली आहे. यातील रिक्षा चालकाचा मृत्यू झाला आहे. 8 हजारापर्यंत लोकवस्ती असलेल्या या भल्या मोठ्या सोसायटीत कोरोना पसरू नये म्हणून पनवेल मनपा प्रशासनाने ही सोसायटी कंन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केली. एकाच सोसायटीमध्ये तीन कोरोना रूग्ण आढळल्याने आणि त्यांच्या संपर्कात आलेल्या इतर लोकांना धोका असल्याने घरकूल सोसायटी ही काळ्या यादीत समाविष्ट करण्यात आली. पनवेल मनपाने कागदोपत्री घोडे दामटवले असले तरी प्रत्यक्षात मात्र ही सोसायटी राम भरोसे आहे. कंन्टेनमेंट झोन जाहीर केल्यानंतर सोसायटी मध्ये येणारे सर्व रस्ते सिल करणे गरजेचे आहे. या ठिकाणी बॅरेकेट्स लावून लोकांची कडक तपासणी करूनच आत किंवा बाहेर सोडले पाहिजे. सुचनांचा फलक गेटवर लावला पाहिजे. मात्र यातील कोणताच नियम पाळला नसून कॅन्टेनमेंट झोन असलेल्या सोसायटीमध्ये कोणीही आत बाहेर करत आहेत. फेरीवाले बिनधास्त मध्ये भाज्या विकण्यासाठी सोसायटीमध्ये घुसत आहेत. सोसायटी सिल करण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा मागणी करूनही पनवेल मनपा प्रशासन आणि पोलीस यंत्रणा दुर्लक्ष करीत आहेत.
कोरोनाच्या लढ्यात सध्या पोलिसांचं काम हे महत्त्वाचं आहे. तहान-भूक विसरून उन्हातानत पोलीस आपलं काम चोख बजावताना दिसत आहेत. पोलिसांच्या या कार्याचे कौतुक केले होत आहे. दरम्यान, पोलिसांसाठी राजापुरातील बचत गटाने मदतीचा हात सामाजिक बांधिलकी जपत पुढे केला आहे. राजापूर जवळच्या बचत गटाच्या महिलांनी एकत्र येईल पोलिसांसाठी अन्नदानाचा कार्यक्रम केला. यावेळी सर्वच महिलांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेत मास्क देखिल बांधले होते. राजापूर येथे ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांनाही जेवण देण्यात आलं. त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
कोरोना या महामारीसोबत सर्वजण मुकाबला करत असतानाच कोरोना संबंधित अनेक खोट्या बातम्या आणि अफवा देखील मोठ्या प्रमाणात पसरत आहे किंवा पसरविल्या जात आहे. कोरोना संबंधित अशीच एक चर्चा सध्या चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे. या चर्चेमुळे लोकांमध्ये मोठं चिंतेचं वातावरण आहे. ही चर्चा आहे कूलर संबंधित जर तुम्ही घरी कूलर लावला तर महानगरपालिका तुम्हाला 5000 रुपयांचा दंड करेल आणि कूलर जप्त करेल अशी चर्चा चंद्रपुरात जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे चंद्रपूर हे राज्यातच नाही तर देशातील सर्वात जास्त तापमान असलेलं शहर आहे आणि साहजिकच त्यामुळे लोकं मोठ्या चिंतेत पडले आहे. मात्र चंद्रपूर महानगरपालिकेने या चर्चेत तथ्थ नसल्याचे स्पष्ट केले आहे.
कोकणातल्या आंबा उत्पादकासमोर सध्या कोरोनाचं संकट आहे. काही प्रमाणात आंबा हा विकला जात असला तरी त्याला भाव नाही. शिवाय निर्यातीवर देखील बंधन येत असल्यामुळे परदेशात जाणाऱ्या मालाला देखील अपेक्षित असा भाव मिळत नाही. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडलं असून आम्ही किमान 5 वर्षे मागे गेल्याची भावना आता बागायतदार व्यक्त करत आहेत. दरम्यान, या साऱ्या परिस्थितीमध्ये किमान सरकारनं आम्हाला मदतीचा हात द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कोरोनामुळे सध्या आंबा मोठ्या प्रमाणावर बागांमध्येच असल्याचं चित्र आहे. मागील 10 दिवसामध्ये जवळपास 5 हजार पेट्या या रत्नागिरी जिल्ह्यातून रवाना झाल्या खऱ्या पण, त्याला अपेक्षित दर असा मिळालेला नाही.
राज्यात आज नवीन 82 रुग्ण वाढले, राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा दोन हजार पार
औरंगाबाद आज पुन्हा 4 कोरोनाचे पॉझिटिव्ह. औरंगाबाद पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 24 वर, 4 नवे रुग्ण पूर्वीच्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील
केंद्रीय मंत्री आणि अधिकार्यांचा लॉकडाऊन आज संपला, आजपासून थेट मंत्रालयातून काम करणं सुरू झालं, मोजके वरिष्ठ अधिकारी आणि 50 टक्के स्टाफ, अशा स्थितीत आता मंत्रालयातून काम करण्याच्या सूचना, गेल्या जवळपास वीस दिवसांपासून सगळे मंत्री घरातूनच काम करत होते, महाराष्ट्रातले अनेक मंत्री मात्र अजूनही राज्यातच अडकले आहेत
राज्य सरकारने जिल्हाधिकाऱ्यांकडून रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनबाबत अहवाल मागवला आहे.
हा अहवाल आज येणार आहे. यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गृह, उद्योग आणि आरोग्यमंत्री चर्चा करतील. यानंतर ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये काय सुरु ठेवता येईल, याबाबत निर्णय घेतला जाईल. तर रेड झोनमध्ये लॉकडाऊन कायम राहिल. शिवाय केंद्र सरकारलाही याबाबत माहिती द्यावी लागेल.
धुळे जिल्ह्यातील साक्री इथल्या कोरोनाबाधित 53 वर्षीय व्यक्तीचा 10 एप्रिलच्या रात्री मृत्यू झाला. मात्र हा व्यक्ती शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यापूर्वी, शहरातील सेवा या खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता, अशी माहिती महापालिकेच्या आरोग्य विभागाला मिळाली. त्यानुसार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी या खाजगी रुग्णालयाची नियमानुसार स्वच्छता करुन, ज्या वॉर्डमध्ये संबंधित रुग्ण होता, तो सील केला. तसंच वॉर्डमधील 12 कर्मचाऱ्यांना क्वॉरन्टाईन केल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कोरोनाच्या रुग्णांची संख्या दररोज वाढत असताना अनेक भागात आजही गांभीर्य दिसत नाहीत. काहीसा असाच प्रकार लातूर जिल्ह्यातील उदगीर शहरात पाहावायस मिळत आहे.
उदगीर शहरात लॉकडाऊन आहे याची कोणतीही माहिती अनेक लोकांना नाही अशी परिस्थिती आहे. सर्रास सर्व दुकाने सुरु आहेत. सर्वत्र लोकांची गर्दी आहे अनेक दैनंदिन व्यवहार सुरु आहेत. उदगीरपासून काहीच किलोमीटर नंतर कर्नाटक आणि आंध्रप्रदेशच्या सीमाभाग सुरु होतो. उदगीर मोठी बाजारपेठ आहे. यामुळे बाजारपेठेत गर्दी होत आहे. शहरातील काही भागात सर्व दुकाने सुरु आहेत. मात्र याकडे प्रशासनाचे लक्षच नाही अशी स्थिती आहे.
नागपूर : नागपुरात कोरोनाचे 3 रुग्ण आणखी वाढले, सतरंजीपुरा येथील 68 वर्षीय मृत कोरोनाग्रस्त व्यक्तीच्या संपर्कातील अजून 3 जण कोरोना संक्रमित, गेल्या 24 तासात नागपुरात 17 कोरोना रुग्ण वाढले, नागपुरात आतापर्यंत 44 कोरोना बाधित
धारावीत आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून चार नवीन रूग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे धावारीत एकूण 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
धारावीत आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला असून चार नवीन रूग्ण सापडले आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे धावारीत एकूण 5 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली-कोल्हापूर रोडवरील विष्णूअण्णा फळ मार्केटमध्ये आंब्याची मोठ्या प्रमाणावर आवक आल्याने मोठी गर्दी उसळली आहे. सोशल डिस्टन्स न पाळता व्यापाऱ्यांकडून आंब्याची खरेदी-विक्री होत आहे. सूचना देऊनही गर्दी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्यास सांगली पोलिसांनी सुरुवात केली. यावेळी काही व्यापाऱ्यांनी पोलिसासोबत वादही घातला.
नाशिक शहरात मास्कचा वापर न करणाऱ्या 17 नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथीचे रोग अधिनियम कायद्यानुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुदैवाने वाढ झालेली नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागरिकांनी घाबरु नये, सहकार्य करावं अशी जनजागृती जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. 9 ते 11 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या 103 स्वॅबचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 302 जण क्वॉरन्टाईन असून तर होम क्वॉरन्टाईनची संख्या 1053 आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये सुदैवाने वाढ झालेली नाही. कोरोनाग्रस्त रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहे. नागरिकांनी घाबरु नये, सहकार्य करावं अशी जनजागृती जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. 9 ते 11 एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या 103 स्वॅबचा अहवाल अद्याप प्रतीक्षेत आहे. जिल्ह्यातील विविध रुग्णालयांमध्ये 302 जण क्वॉरन्टाईन असून तर होम क्वॉरन्टाईनची संख्या 1053 आहे.
दुधाच्या टँकरमधून प्रवासी वाहतूक सुरुच असल्याचं पुन्हा एकदा समोर आलं आहे. गोकुळच्या टँकरमधून प्रवासी वाहतूक असून मुंबईहून तीन प्रवासी कोल्हापुरात आणले. तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गडहिंग्लज पोलिसांनी तीन प्रवाशांसह चालकाला ताब्यात घेतलं आहे. चालकावर प्रवासी वाहतूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. मुंबईतील एन एम जोशी मार्ग इथले हे तीन प्रवासी आहे. क्लिनर आणि गोकुळचे कर्मचारी असल्याचे सांगून टँकर गडहिंग्लजपर्यंत पोहोचला. या चारही जणांची वैद्यकीय तपासणी होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले असताना सोलापुरात कालपर्यंत एक ही रुग्ण नव्हता. त्यामुळे नेहमी 'निवांत' राहणारे सोलापूरकर आता मात्र दहशतीत दिसतायत. 11 तारखेला झालेल्या एका व्यक्तीचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची माहिती काल जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. ज्या परिसरात हा रुग्ण राहत होता त्याच्या आसपासचा परिसर पोलिसांनी तात्काळ सील केला. ही बातमी रात्री वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर खबरदारी म्हणून नागरिकांनी स्वतः देखील आपला परिसर मिळेल ते साहित्य वापरून बंद केला आहे.
पार्श्वभूमी
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण
रविवारी दिवसभरात राज्यात 221 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 झाली आहे. आज राज्यात 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. याबरोबर कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 149 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यातील 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. आज झालेल्या 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर १५ रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.
आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 41 हजार 109 नमुन्यांपैकी 37 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 1982 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 217 कोरोना बाधित रुग्णांना ते बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 61 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून 5064 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील कोरोना बाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी
ठाणे मंडळ एकूण
मुंबई महानगरपालिका - 1298 ( मृत्यू - 92)
ठाणे - 6
ठाणे मनपा - 44 (मृत्यू - 3)
नवी मुंबई मनपा - 45 (मृत्यू - 3)
कल्याण डोंबवली मनपा - 46 (मृत्यू - 2)
उल्हासनगर मनपा - 1
भिवंडी निजामपूर मनपा - 1
मीरा भाईंदर मनपा 42 (मृत्यू - 1)
पालघर - 4 (मृत्यू - 1)
वसई विरार मनपा - 21 (मृत्यू - 3)
रायगड - 4
पनवेल मनपा - 8 (मृत्यू - 1)
नाशिक मंडळ
नाशिक - 2
नाशिक मनपा - 1
मालेगाव मनपा - 15 (मृत्यू - 2)
अहमदनगर 10
अहमदनगर मनपा -16
धुळे - 1 (मृत्यू - 1)
जळगाव - 1
जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1)
पुणे मंडळ
पुणे - 7
पुणे मनपा -233 (मृत्यू - 30)
पिंपरी चिंचवड मनप - 23
सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1)
सातारा - 6 (मृत्यू - 2)
कोल्हापूर मंडळ
कोल्हापूर - 1
कोल्हापूर मनपा - 5
सांगली - 26
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1)
औरंगाबाद मंडळ
औरंगाबाद - 3
औरंगाबाद मनपा - 16 (मृत्यू - 1)
जालना - 1
हिंगोली - 1
लातूर मंडळ
लातूर मनपा- 8
उस्मानाबाद - 4
बीड - 1
अकोला मंडळ
अकोला मनपा - 12
अमरावती मनपा -5 (मृत्यू - 1)
यवतमाळ - 4
बुलढाणा - 13 (मृत्यू - 1)
वाशिम - 1
नागपूर मंडळ
नागपूर - 1
नागपूर मनपा - 27 (मृत्यू - 1)
गोंदिया -1
इतर राज्ये / परदेश - 9 (मृत्यू - 1)
निजामुद्दीन मरकजहून परतलेले 37 जण कोरोनाबाधित
निजामुद्दीन येथील बंगलेवाली मशिदीत मार्च महिन्याच्या सुरुवातीच्या काळात झालेल्या धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता, त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर कसून शोध घेण्यात येत आहे. यातील 755 रुग्णांची प्रयोगशाळा तपासणी करण्यात आली असून राज्यात या व्यक्तींपैकी 37 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, यवतमाळ येथे 7, बुलढाणा जिल्ह्यात 6, मुंबईत 3 तर प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत. तर प्रत्येकी एक जण रत्नागिरी, नागपूर मनपा ,हिंगोली, जळगाव, उस्मानाबाद, कोल्हापूर आणि वाशीम मधील आहेत. याशिवाय या व्यक्तींच्या निकट संपर्कातील 6 जण अहमदनगर येथे तर एक जण पिंपरी चिंचवड येथे कोरोना बाधित आढळले आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्याठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण 4846 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17.46 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील एकाच घरातील त्यांच्या सहवासातील 26 जण कोरोनाबाधित आढळले होते. यातील 24 जणांना आतापर्यंत घरी सोडण्यात आलं आहे. इस्लामपुरातील या भागात 31 सर्वेक्षण पथकांनी मागील 2 आठवडे साडेसात हजाराहून अधिक लोकसंख्येचे नियमित सर्वेक्षण केले आहे.