coronavirus LIVE UPDATES | पुण्यात आज दिवसभरात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
08 Apr 2020 10:09 PM
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर पुणे मनपानो महत्त्वाचा निर्णय घेतला आला आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अहोरात्र राबणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षाकवच जाहीर करण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखताना दुर्दैवानं कर्मचार्याचा मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना एक कोटी रुपये आर्थिक मदत किंवा वारसाला मनपा नोकरी देऊन 75 लाख आर्थिक मदत करण्यात येणार आहे. पुणे मनपात सध्या साधारण दहा हजार कर्मचारी आणि अधिकारी काम करतात.
पुण्यात आज दिवसभरात 10 कोरोनाबाधितांचा मृत्यू, संध्याकाळनंतर आणखी दोन कोरोनाग्रतांचा मृत्यू, एक नोबेल हॉस्पिटलमध्ये तर दुसरा रुग्ण कर्वे रस्त्यांवरील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये मृत्युमुखी, पुण्यातील मृतांचा आकडा 18 वर
रत्नागिरीत कोरोनाचा पहिला बळी गेलाय. खेडमधील कळंबणी येते उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालंय. आजच या व्यक्तीचे कोरोना रिपोर्ट पॉसिटीव्ह आले होते. 18 मार्च रोजी ही व्यक्ती दुबईहुन आली होती.
कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृतदेहावरील अंत्यविधीबाबत पालिकेच्या परिपत्रकाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत सुनावणी 24 एप्रिलपर्यंत तहकूब
कोरोनाग्रस्त रूग्णांच्या मृतदेहावरील अंत्यविधीबाबत पालिकेच्या परिपत्रकाला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार, याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार देत सुनावणी 24 एप्रिलपर्यंत तहकूब
शब ए बारात निमित्त मुस्लिम समाजातील लोक हे स्मशानभूमीत जातात. उद्या कोणीही बाहेर जाऊ नये, घरीच थांबवं आणि स्मशानभूमी देखील बंद ठेवण्याचे नसीम खान याचे आवाहन.
कोरोनाच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, सरकारी पाठोपाठ खाजगी प्रयोगशाळांमध्येही मोफतच टेस्ट, याआधी सरकारने 4500 रुपये घेण्यास परवानगी दिली होती, सरकार खाजगी प्रयोगशाळांना नंतर भरपाई देणार का हे अजून स्पष्ट नाही
सोलापुरातून ग्वाल्हेरला प्रवास करणारा द्राक्ष नेटिंग मजूर कोरोना पॉजिटीव्ह. सोलापुरातील मंद्रुप तालुक्यातील एका गावात द्राक्ष नेटिंगसाठी हा मजूर आला होता. गावात संपर्कात आलेल्या सर्व ग्रामस्थांची आरोग्य विभागाकडून तपासणी सुरू. एक एप्रिल रोजी सोलापुरातुन हा मजूर ग्वाल्हेरला गेला होता. गावी परतल्यावर तपासणीकेल्यानंतर कोरोना पोजिटीव्ह असल्याचा अहवाल आला आहे. विशेष म्हणजे या रुग्णात कोणत्याही प्रकारची लक्षणे नाहीत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची एबीपी माझाला फोनवरुन माहिती.
परभणी जिल्हा रुग्णालयातील क्वारेन्टाइन कक्षातील 40 वर्षीय महिला रूग्णाचा मृत्यू झाला आहे.
श्वसनाचा त्रास होत असल्याने काल रूग्णालयाच दाखल केले होते.
महिलेचा स्वाब तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवल्याची माहिती
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग आता वेगाने होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या पार गेला. तर, आज तब्बल एकाच दिवसात 117 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1135 झाला आहे. दरम्यान, पुण्यात आज पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला.
नवी मुंबईतील आणखी दोन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण, कोपरखैरणे येथे आढळले दोन कोरोना पाॅझिटिव्ह, नवी मुंबईतील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 30 वर
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चितळे उद्योग समुहाकडून
एक कोटी पन्नास लाखाची मदत करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी एक कोटी तर पीएम केअर्स फंडासाठी 50 लाख रूपये देण्यात आहे. सदर निधीचे धनादेश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
कोरोनामुळे पुण्यात तीन जणांचा मृत्यू; मागील 24 तासात पुण्यात आठ जणांचा मृत्यू. पुण्यात एकूण मृतांचा आकडा 16 वर.
देशात 14 एप्रिलला एकाच वेळी लॉकडाऊन काढले जाणार नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर पिनाकी मिश्रा यांची पीटीआयला माहिती.
देशात लॉकडाऊन वाढवायचा की नाही? 11 एप्रिलाल निर्णय होणार. 11 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार.
संयुक्त अरब येथील दुबईतील शारजाह शहरात नोकरी करणाऱ्या भिवंडीतील एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या तरुणासोबत त्यांची आठ महिन्यांची गरोदर पत्नीही आहे. या पार्श्वभूमीवर भाजपाचे खासदार कपिल पाटील यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे लक्ष वेधले. तसेच या तरुणाला योग्य उपचार करण्यासाठी साकडे घातले.
नवी मुंबईततील
कोपरखैरणे येथे दोन कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळले आहे.
नवी मुंबईतील एकूण कोरोना पॉझिटीव्ह संख्या 30 वर गेली आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. प्रामुख्याने रेशन धान्य, आरोग्य सुविधांची तातडीने उपलब्धता, पीपीई किटची गरज, तब्लिकी संशयितांवर कारवाई या मागण्यांचे एक निवेदन देण्यात आले. अन्य एका निवेदनातून जितेंद्र आव्हाड यांना तरुणाला मारहाण प्रकरणी मंत्री पदावरून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
केंद्राने खासदारांचा दोन वर्षांचा निधी तसेच राष्ट्रपती आणि केंद्रीय मंत्र्यांचे; खासदारांचे वेतन 30 टक्के कपात करून कोरोनासाठी वर्ग केले आहे. त्यानुसार राज्यसरकारने सर्व आमदारांचा दोन वर्षांचा निधी आणि 30 टक्के वेतन कपात करून तो निधी कोरोनाच्या निर्मूलनासाठी वर्ग करावा, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची मागणी.
रत्नागिरीजवळच्या साखरतर या गावातील 52 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर आता प्रशासनानं कठोर पावलं उचलायला सुरूवात केलीय. शिरगाव, साखरतर ही गावं आता सील करण्यात आली आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरता ही काळजी घेण्यात आली आहे. महत्त्वाचं म्हणजे या गावांमधून गणपतीपुळे या ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. मंगळवारी या गावातील महिवला कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. त्यानंतर आता साखरतर या गावामध्ये पोलिसांकडून देखील जनजागृती करत नागरिकांनी सहकार्य करण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन केले जात आहे. सध्या या महिलेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, या महिलेच्या कुटुंबातील व्यक्ती शिवाय ही महिला कुणाच्या संपर्कात आली याचा देखील पोलीस आता शोध घेत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे जिल्हयात सापडलेल्या इतर दोन रूग्णांप्रमाणे या महिलेची कोणतीही ट्रव्हल हिस्ट्री दिसून येत नाहीय.
सैन्यामध्ये आरोग्य विभागात काम केलेले निवृत्त कर्मचारी, अधिकारी, निवृत्त नर्स, वॉर्ड बॉय, ज्यांनी आरोग्य सेवेचं प्रशिक्षण घेतलंय कोरोनाशी सुरु असलेल्या युद्धात सहभागी व्हावं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
घराबाहेर पडत असाल तर मास्क कायम वापरा, दुसऱ्याचा मास्क वापरा, वापरलेला मास्क कुठेही फेकू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
एन 95, पीपीई किट्सचा जगभरात तुटवडा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
घराबाहेर पडत असाल तर मास्क कायम वापरा, दुसऱ्याचा मास्क वापरा, वापरलेला मास्क कुठेही फेकू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी बाहेर पडताना मास्क वापरा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
माणुसकीच्या नात्यातून गरजूंसाठी अन्नछत्राची सोय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
साडेपाच-सहा लाख लोकांना सरकार अन्न पुरवतंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
व्यायाम केलात तर मानसिक युद्ध लढायला बळ मिळेल : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
तीन वेळच्या खाण्याची सोय सरकारने केली आहे. माणुसकीच्या नात्याने गरजूंना अन्नछत्राची व्यवस्था केली आहे. साडेपाच-सहा लाख लोकांना जेवण मिळतंय : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
हे युद्ध आपण जिंकणार आहोतच, पण कोरोनानंतर आपल्याला अर्थव्यवस्थेशी युद्ध लढायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनानंतर अर्थव्यवस्थेशी लढायचं आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई पोलिसांनी मला माझ्या मुलुंडमधील निवासस्थानावरुन अटक केली असून मुलुंड पश्चिममधील नवघर पोलीस स्टेशनमध्ये नेलं आहे, असा दावा भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर याची माहिती दिली आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेल्या पीडित अनंत करमुसे याला भेटण्यासाठी जात असताना, पोलिसांनी मला घरातच स्थानबद्ध केलं. त्यानंतर अटक करुन नवघर पोलीस स्टेशनला नेलं, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.
पुण्यातील ससून रुग्णालयात आणखी एक रुग्णाचा मृत्यू , मृतांची संख्या पुण्यात आता 10 वर पोहोचली
सांगलीत हनुमान जयंतीनिमित्त गावातून पालखी काढल्याने 17 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सांगलीच्या मिरज तालुक्यातील शिपूर गावात हा प्रकार घडला. लॉकडाऊन आणि संचारबंदी असताना एकत्र येऊ नये असा नियम असतानाही पालकी काढल्याने मिरज ग्रामीण पोलिसांनी 17 जणांवर कारवाई केली आहे.
मुंबईतील धारावी येथे दोन रूग्ण आढळले असून त्यातील एका रूग्णाला आधीच क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. धनवाडा चाळ येथे नवीन रूग्ण आढळला आहे. त्यामुळे धारावीतील कोरोना बाधितांचा आकडा 9 वर पोहोचला आहे.
गर्दी टाळण्यासाठी पनवेल पोलिसांचा आदेश जारी केला आहे. संध्याकाळी पाचनंतर सर्व दुकाने, रिलायन्स मार्ट, बिग बाजार, फळ-भाजीपाला मार्केट, फिश मार्केट बंद राहणार आहे. फक्त हॉस्पिटल, केमिस्ट आणि एपीएमसी सुरु राहणार आहे. संध्याकाळी पाचनंतर रस्त्यावर येणाऱ्या सर्व व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार आहे.
वसई : वसई विरार शहर महानगरपालिका हद्दीत आज नव्याने एका कोरोना रुग्णाची वाढ झाली आहे. वसई विरार शहर महानगरपालिकेत आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या २२ वर झाली आहे. वसई पश्चिमेच्या कोरोना बाधित रुगणाच्या संपर्कात रुग्ण आला होता.
पालघर जिल्हयात आता कोरोना बाधित रुग्णाची संख्या २७ झाली आहे.
अकोल्यात काल आढळलेल्या पहिल्या रूग्णाच्या घरी चोरी, शहरातील बैदपुरा भागात आहे रूग्णाचे घर, चोरी झाल्याचं सकाळी उघड, रूग्णाचे सर्व कुटुंबिय जिल्हा रूग्णालयात असताना चोरट्यांनी साधला डाव
मुंबईतील माहिममध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. एका 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वरळी जिजामाता नगर इथे त्याचं मटणाचं दुकान आहे. तसंच, माहिमच्या नर्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या, ब्रीच कँन्डी हॉस्पिटलच्या नर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर हॉस्टेल पूर्णत: सील करण्यात आलं आहे.
मुंबईतील माहिममध्ये कोरोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. एका 43 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. वरळी जिजामाता नगर इथे त्याचं मटणाचं दुकान आहे. तसंच, माहिमच्या नर्स हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या, ब्रीच कँन्डी हॉस्पिटलच्या नर्सलाही कोरोनाची लागण झाली आहे. यानंतर हॉस्टेल पूर्णत: सील करण्यात आलं आहे.
मुंबईतील हाय प्रोफाइल परिसर म्हणून ओळख असलेल्या वरळी, बांद्रा, मलबारहिल या परिसरात कोरोना बाधित रुग्ण आढळल्यामुळे या ठिकाणचे परिसर महापालिका प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहेत. तसेच पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आले आहेत. या परिसरातील लागण रोखण्यासाठी आता पालिकेने विशेष प्लानची आखणी केली आहे. आता या परिसरात सकाळी दोन तास आणि संध्याकाळी दोन तास औषधं फवारणी करण्यात येतीय. या सोबतच या ठिकाणी केवळ औषधं दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त अत्यावश्यक सेवेतील इतर दुकाने देखील बंद करण्यात आली आहेत. सध्या या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी असणाऱ्यांना बाहेर सोडण्यात येतं आहे. या व्यतिरिक्त जर कोणी फिरताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येतीय. सध्या आरोग्य विभागाचे कर्मचारी प्रत्येक घरात जाऊन नागरिकांची तपासणी करत आहेत. ज्या नागरिकांमध्ये लक्षणं आढळतील त्यांना तत्काळ दवाखान्यात घेऊन जात आहेत.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणाऱ्या कोल्हापूरकरांना पोलिसांचा दणका,
स्वतःच्या आरोग्याची काळजी करता मग समाजाच्या आरोग्याची काळजी नाही का?
,
DYSP प्रेरणा कट्टे यांच्या प्रश्नांना उत्तर देताना मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची उडाली धांदल
,
खोटी उत्तर देऊन वेळ मारून नेण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला कॅमेऱ्यात कैद
रत्नागिरीतील राजीवडा येथे कोरोनाचा रूग्ण आढळून आल्यानंतर परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. शिवाय, दीड किमी पर्यंतचा परिसर देखील सील करण्यात आला आहे. पण, त्यानंतर देखील आदेश डावलणाऱ्यां 200 जणांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉकडाऊन असलेल्या राजीवडा भागातून हॉस्पिटलमध्ये जाणाऱ्या महिलेकडे पोलिसांनी कागदपत्रे मागीतल्याच्या शुल्लक कारणातून राजीवडा भागात तणाव निर्माण झाला. त्यानंतर बघता बघता संपूर्ण राजीवडा मोहल्ला जमा झाला. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढेंसह वरिष्ठ अधिकारी शिघ्र कृती दलासह घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी जमावाला पुन्हा आपल्या घरी जाण्याची विनंती केली. त्यांनतर काहिंना पोलिसी खाक्या दाखविल्यानंतर जमाव पांगला.
पुण्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यू, पुण्यात कोरोनामुळे बळींची संख्या नऊवर, 44 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. श्वसनाच्या त्रासामुळे त्याला रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु रात्री त्याचा मृत्यू झाला..
अकोल्यात आढळलेल्या पहिल्या कोरोनाग्रस्त रूग्णाच्या घरी चोरी, शहरातील बैदपुरा भागात आहे रूग्णाचे घर, चोरी झाल्याचं सकाळी उघड, रूग्णाचे सर्व कुटुंबिय जिल्हा रूग्णालयात असतांना चोरट्यांनी साधला डाव.
पुण्यातील पाच पोलीस स्थानकांच्या हद्दीत कर्फ्यू लावला असला तरी त्याचं पालन होताना दिसत नाही. खडकमाळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील मीठगंज पोलिस चौकीजवळच्या परिसरात कर्फ्यूचा पुरता फज्जा उडालेला दिसत आहे. लॉकडाऊन, सील, कर्फ्यु वगैरे फक्त कागदावर आहे. नागरिक घराबाहेर पडले असून रस्त्यावर बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत.
पुण्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यु झाला आहे, कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या 9 वर पोहोचली आहे. पुण्यात कोरोनामुळे आणखी एकाचा मृत्यु झाला असून त्या व्यक्तीचं वय 44 होतं. श्वसनाच्या त्रासामुळे त्याला रात्री व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. परंतु रात्री त्याचा मृत्यू झाला.
औरंगाबादमधील घाटी रुग्णलयासाठी सकारात्मक बातमी आहे. रुग्णालयातील पॉझिटिव्ह ब्रदर्सच्या संपर्कात आलेल्या सात जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. महत्त्वाचं म्हणजे पुरुष परिचारकाची पत्नीची कोरोना चाचणीही निगेटिव्ह आली आहे.
अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांची बोटला यांचा कोरोनामुळे मृत्यु
अमेरिकेतील भारतीय वंशाचे पत्रकार ब्रह्म कांचीबोटला यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर नऊ दिवसांपासून उपचार सुरु होते. मात्र 6 एप्रिलला सकाळी रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. कांचीबोटला हे अमेरिकेत युनायटेड न्यूज ऑफ इंडियाचे प्रतिनिधी होते. 66 वर्षीय ब्रह्म कांचीबोटला यांनी अमेरिकेत 26 वर्ष काम केलं होतं.
बुलडाण्याच्या चिंतेत भर टाकणारी बातमी समोर आली आहे. बुलडाण्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 12 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला. हा रुग्ण दिल्लीच्या मरकज इथून परतलेल्या व्यक्तींच्या संपर्कात आला होता.
बीडमध्ये पहिला कोरोना रुग्ण आढळला,
नगरच्या तब्लिगी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेला हा रूग्ण पॉझिटिव्ह आढळला
, या रुग्णाचा संचार हा नगर जिल्ह्यात राहिला आहे. लॉकडाऊनच्या काळात हा बीड जिल्ह्यात त्याच्या मूळ गावी आला
होता, कोरोना बाधिताला नगरला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
पार्श्वभूमी
देशविदेशातील कोरोना व्हायरसशी संबंधित घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...
राज्यात आज 150 नवे कोरोना बाधित, रुग्णांची संख्या वाढून 1018 वर
राज्यात आज कोरोनाच्या 150 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1018 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 12 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 6 जण मुंबईत, 3 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण नागपूर, सातारा, भाईंदर येथील आहेत. राज्यात आतापर्यंत 64 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 20 हजार 877 नमुन्यांपैकी 19 हजार 290 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1018 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 34 हजार 695 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4008 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
निजामुद्दीन येथील धार्मिक कार्यक्रमात राज्यातील ज्या नागरिकांनी भाग घेतला होता त्यांचा सर्व जिल्हा आणि महानगरपालिका स्तरावर शोध घेण्यात येत आहे. आतापर्यंत राज्यात या व्यक्तींपैकी 23 जण कोरोनाबाधित आढळले आहेत. यापैकी लातूरमध्ये 8, बुलढाणा 6, प्रत्येकी 2 जण पुणे, पिंपरी- चिंचवड आणि अहमदनगर भागातील आहेत; तर प्रत्येकी एक जण हिंगोली, जळगाव आणि वाशिममधील आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. मुंबई परिसरातील इतर महापालिका क्षेत्रातही क्लस्टर कंटेनमेंट योजना राबवण्यात येत आहे. सध्या सातारा जिल्ह्यात 214 सर्वेक्षण पथके काम करत आहेत. तर हिंगोलीत 14, सांगलीत 31, रत्नागिरी 39 आणि जळगावमध्ये 48 सर्वेक्षण पथके कार्यरत आहेत. तर राज्यात या प्रकारे एकूण 3492 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 12 लाखांहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1018
मृत्यू - 64
मुंबई – 642 (मृत्यू 40)
पुणे – 130 (मृत्यू 8)
पिंपरी-चिंचवड – 17
पुणे ग्रामीण - 4
सांगली – 26
नागपूर – 19 (मृत्यू 1)
वसई विरार - 10 (मृत्यू 2)
पनवेल - 6
मीरा भाईंदर - 3 (मृत्यू 1)
कल्य़ाण-डोंबिवली – 25 (मृत्यू 1)
नवीमुंबई – 28 (मृत्यू 2)
ठाणे – 21 (मृत्यू 3)
ठाणे ग्रामीण, पालघर ग्रामीण, रत्नागिरी, यवतमाळ- 3 (मृत्यू 1 पालघर)
बुलढाणा, अहमदनगर ग्रामीण - प्रत्येकी 7 (मृत्यू 1 बुलढाणा)
अहमदनगर – 18
सातारा – 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद – 12 (मृत्यू 1)
लातूर - 8
उस्मानाबाद - 4
कोल्हापूर – 2
उल्हासनगर, नाशिक ग्रामीण, जळगाव ग्रामीण, औरंगाबाद ग्रामीण, जालना, हिंगोली, वाशिम, अमरावती, गोंदिया - 1 (मृत्यू 2 जळगाव आणि अमरावती)
गोंदिया – 1