coronavirus LIVE UPDATES | मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात; तीनजण ठार, एक गंभीर जखमी
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील सोळा हजारांच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
20 Apr 2020 10:12 PM
बुधवार, गुरुवार, शुक्रवार तीन दिवस पंढरपूर 100 टक्के बंद राहणार, फक्त हॉस्पिटल आणि मेडिकल स्टोर्स उघडी ठेवण्यास परवानगी
लक्षणं नसलेल्या रुग्णांची संख्या जास्त आहे, लक्षणं असलेल्यांना तात्काळ डॉक्टरांना दाखवावे : राजेश टोपे
मुंबई-आग्रा महामार्गावर अपघात, रुग्णवाहिका आणि ट्रॅक्टरमध्ये समोर समोर धडक. अपघातात रुग्णवाहिका मधील 3 जण ठार, एक गंभीर जखमी. पिंपळगाव जवळील शिरवाडे फाटा येथे घडली घटना. मृतामध्ये दोन महिला एक पुरूषाचा समावेश. जळगावच्या भडगाव इथले रहिवासी. पाचोरा येथुन नाशिककडे जात असताना अपघात.
कोल्हापूर जिल्ह्यातून ऊस तोडणी मजूर लालपरीतून निघाले आपल्या मूळ गावी. 11 हजार 500 मजूर दोन दिवसात आप-आपल्या जिल्ह्यात पोहचणार. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. दहा एसटीमधून शरद कारखान्याचे 225 मजूर रवाना. एसटीतून गावी जाताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 4666 वर पोहचला, दिलासादायक बाब म्हणजे 572 जणांना डिस्चार्ज देण्यात आला : राजेश टोपे
पुण्यातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेलं केंद्रीय पथक आणखी दोन दिवस पुण्यातच मुक्कामी राहणार असल्याच जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. या दोन दिवसांच्या कालावधीत हे पथक पुण्यातील काही ठिकाणांची पाहणी करणार आहे आणि आणखी काही बैठकाही घेणार आहे. नैसर्गिक संकट ओढवल्यावर केंद्र सरकारकडून परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी नेहमीच पथक पाठवण्यात येतं आणि या पथकाने काही सुचना केल्यास त्याच स्वागत असेल असं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलय.
मृत्यूदर आटोक्यात ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय, येत्या काही दिवसात 75 हजार रॅपिट टेस्ट करणार : राजेश टोपे
नंदुरबारमधील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व दुकाने व पेट्रोल पंप 25 एप्रिलपर्यंत बंद, केवळ किराणा, दूध आणि भाजीपाला विक्री सकाळी 8 ते दुपारी 12 या वेळेत सुरू राहणार, रुग्णालये, औषधांची दुकाने, बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीतील व्यवहार सुरू राहतील, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांचे निर्देश
राज्यात आज दिवसभरात 466 रुग्णांची नोंद; एकूण आकडा 4666 वर.
सोलापुरातील नामवंत खासगी डॉक्टरांची सेवा शासकीय रुग्णालयात वर्ग करण्याचे आदेश. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश. विविध विषयातील तज्ञ खासगी डॉक्टर शासकीय रुग्णालयात बजावणार सेवा.
नंदूरबारमध्ये आणखी 3 रुग्णांचे कोरोना रिपोर्ट्स पॉझिटिव्ह, पहिल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या कुटुंबातील 3 सदस्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह, नंदुरबारमधील कोरोनाबाधितांचा आकडा 4 वर
मुंबई महापालिकेच्या आपात्कालीन विभागातील दोन जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा आपात्कालीन विभागात तात्काळ निर्जंतुकीकरण व आवश्यक खबरदारी घेऊन कक्षाचं काम सुरळीत सुरु ठेवण्यात आलं आहे. नियंत्रण कक्षाच्या कामकाजात कोणतीही बाधा नसल्याची माहिती आपात्कालीन विभाग संचालक महेश नार्वेकर यांनी दिली आहे.
सांगलीतील विजयनगर येथील रूग्णाच्या कुटूंबातील सर्वांचे अहवाल निगेटिव्ह, सद्यस्थितीत जिल्ह्यात 26 रुग्ण कोरोनामुक्त, इस्लामपूर येथील कोरोनाबाधित कुटुंबाशी संबंधित महिलेचा दुसरा अहवाल निगेटीव्ह, जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती
दिलासादायक : पिंपरी चिंचवडमध्ये सलग चौथ्या दिवशी रुग्ण कोरोनामुक्त. आज एक रुग्ण ठणठणीत बरा झालाय. गेल्या चार दिवसातील हा सहावा रुग्ण कोरोनामुक्त झाला. शहरातील 61 रुग्णांपैकी 18 रुग्णांनी कोरोनाशी यशस्वी मुकाबला केलाय. तर एका रुग्णाचा मात्र मृत्यू झालाय.
सोलापूरकरांची चिंता वाढली. सोलापूर शहरात आणखी 4 रुग्ण कोरोना बाधित. एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 25 वर. दुपारी 6 रुग्ण आढळले होते. आता पुन्हा 4 रुग्ण आढळल्याने एकाच दिवसात 10 रुग्णांची वाढ. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती.
अहमदनगर जिल्ह्यात आणखी दोनजण कोरोना बाधीत. जामखेड येथील काही दिवसांपूर्वी मृत्यू पावलेल्या बाधीत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या 29 आणि 36 वर्षीय मुलांना कोरोनाची लागण. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 31 वर. या व्यतिरिक्त 6 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले असून त्यांना दिला डिस्चार्ज दिला. अहमदनगर जिल्ह्यात एकूण 31 रुग्ण कोरोनाबधित झाल्याची नोंद. पैकी तिघांचा मृत्यू. तर १८ जणांना डिस्चार्ज.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यपाल कोट्यातून आमदारकी देण्याविरोधात हायकोर्टात याचिका. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णयच बेकायदेशीर असल्याचा दावा करत कोर्टात याचिका. राज्यपालांच्या अधिकारातील निर्णयात हस्तक्षेप करण्यास नकार देत हायकोर्टाचा याचिकाकर्त्यांना दिलासा देण्यास नकार.
औरंगाबाद शहरात आणखी एक कोरोनाचा रुग्ण वाढला. आसिफ कॉलनी येथील 65 वर्षीय महिलेला कोरोणाची लागण. शहरात आता कोरोना बाधित रुग्णांची संख्या 32 वर. आतापर्यंत 15 जणांना डिस्चार्ज तर तिघांचा मृत्यू झाला.
अंबरनाथच्या नगराध्यक्षा मनीषा वाळेकर यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याचं आवाहन शहरवासीयांना केलं होतं. त्याला प्रतिसाद देत अंबरनाथकरांनी तब्बल १५ लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिला आहे. अंबरनाथमधील दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योजक, राजकारणी अनेकांनी यात हातभार लावला. आज सकाळी तहसीलदार जयराज देशमुख यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.
नाशिक : मालेगावात आज कोरोना संशयित आणि एक पॉझिटिव्ह दोघांचा मृत्यू, कोरोना संशयिताचा अहवाल येणे बाकी, मनपा उपायुक्त नितीन कापडणीस यांची माहिती, मालेगावमध्ये मृत्यूंचा आकडा 8 वर
लॉकडाऊननंतर कोरोना संसर्गाचा वेग कमी झाला आहे : आरोग्य मंत्रालय
घोटाळेबाज विजय मल्ल्या याला ब्रिटन हायकोर्टाचा मोठा झटका; भारत प्रत्यार्पणाच्या आदेशाविरोधातील याचिका नाकारली.
पालघर पालघर मनोर रोडवरील नेटाळी येथील कंपनीला भीषण आग. आगीचे कारण अस्पष्ट. अग्निशमन दल घटनास्थळी दाखल.
केंद्र सरकारने inter ministerial टीम बनवल्या आहेत. ही टीम महाराष्ट्रात येऊन मुंबई आणि पुणे शहरांचा आढावा घेणार आहेत. लॉकडाऊनच्या दिलेल्या गाईडलाईन्स, नियम पाळले नाही ह्याची तक्रारी असल्याने महाराष्ट्रात ही टीम येणार आहे.
बीड : परळीतील सोनाली फर्निचर गोडाऊनला भीषण आग. आगीत गोडाऊन जळुन खाक. लाखो रुपयांचे फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी. अग्निशामक दल घटनास्थळी दाखल. मात्र, आगीचे कारण अद्याप अस्पष्ट.
कऱ्हाडमधील स्वस्त धान्याच्या दुकानात महत्वाची अडचण आली. रेशन घ्यायला जाणाऱ्या लोकांचे अंगठ्याचे ठसे जुळत नाही. ठसे मॅच होत नाही त्यामुळे कार्ड असूनही स्वस्त धान्य मिळत नाही. सरकारला विनंती फिरती मशीन घेऊन नव्याने ठसे गोळा करावेत आणि रेशन मिळेल याची व्यवस्था करावी. परप्रांतीय कामकाj जे आहेत त्यांना इमर्जन्सी रेशनकार्ड दिले पाहिजे. त्यांना दोन महिन्यासाठी धान्य पुरवठा होईल याची व्यवस्था केली पाहिजे. काही स्वयंसेवी संस्था मदत करत आहे. ही मदत अपुरी आहे, शासनाने मदत केली पाहिजे. स्वस्त धान्याच्या दुकानात लोकांचे ठसे मॅच होत नसल्यामुळे लोकांना धान्य मिळत नसल्याची तक्रार आहे. याबाबत उपाययोजना करण्याची सूचना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
पालघरमध्ये घडला तो प्रकार निंदनीय आहे. परंतु त्यावरून सरकारवर आरोप- प्रत्यारोप करणे अयोग्य आहे. पालघर प्रकरणातील मुख्य आरोपी आज तुरूंगात आहे. पोलिसांसमोर हे हत्याकांड झाले हे खरं आहे. गैरसमजुतीने त्यांच्यावर हल्ला झाला आणि दुर्दैवाने त्यांची हत्या झाली. या प्रकरणाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
औरंगाबादने कोरोना संकटाची अर्धी लढाई जिंकली आहे. औरंगाबादेत आजही सहा जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यांना मिनी घाटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. औरंगाबादेत आत्तापर्यंत 14 जण पूर्ण कोरोना मुक्त झाले आहेत. या प्रसंगी औरंगाबादचे प्रथम नागरिक महापौर नंदकुमार घोडीले, डॉक्टर आणि नर्स यांनी टाळ्या वाजून त्यांचं अभिनंदन केलं.
आज सकाळी 11 वाजेपर्यंत राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 4483 वर पोहोचली आहे. यामध्ये भिवंडीमध्ये एक, कल्याण-डोंबिवलीमध्ये 16, मिरा-भाईंदरमद्ये 7, मुंबईमध्ये 187, नागपूर 1, नवी मुंबई 9, पनवेलमध्ये 6, पिपंरी-चिंचवडमध्ये 9, रायगड 2, सातारा 1, सोलापूर 1, ठाणे 21, वसई विरार 22 अशी 283 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे.
शहापूर नगरपंचायत हद्दीत एक 67 वर्षीय व्याक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना भिवंडी येथे टाटा आमंत्रण अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 11 व्यक्तींपैकी 4 जणांचे अहवाल आले असून यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर केलेल्या टीकेला भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उत्तर दिलं आहे. राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील...दबाव कशाला आणताय? लोकशाहीच्या नावाने गळा काढता ना,मग आता लोकशाहीने वागा... असं आशिष शेलार म्हणाले.
यवतमाळ जिल्ह्यामध्ये सर्वाधिक शेतकरी कापूस पिकांची लागवाड करतो आणि त्यावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यवतमाळ जिल्ह्यात मध्यंतरी कोरोना चा संसर्ग कुणालाही होऊ नये म्हणून 1 महिन्यांपूर्वी पणन महासंघाने कापूस खरेदी बंद केली होती.
आज मात्र ही कापूस खरेदी पणन महासंघाने पुन्हा सुरू केली आहे. आता शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यात आर्णी, यवतमाळ आणि कळंब या तीन ठिकाणी टप्प्याटप्याने रोज 10 शेतकरी बोलावून त्यांचा कापूस खरेदी करण्यास सुरूवात केली आहे .
यवतमाळ मध्ये ही पणन च्या एका केंद्रावर ही कापूस खरेदी सुरू झाली आहे
शहापूर नगरपंचायत हद्दीत एक 67 वर्षीय व्याक्तीला कोरोना ची लागण झाली आहे. या रूग्णाच्या संपर्कात आलेल्या 11 जणांना भिवंडी येथे टाटा आमंत्रण अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. 11 व्यक्तींन पैकी 4 जणांचे अहवाल आले असून यांना कोरोनाची लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आता 7 जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
रत्नागिरीमधील कळंबणी येथील 6 आणि
दापोली येथील 6, तसेच
जिल्हा सामान्य रुग्णालय येथील 15 अशा एकूण 27 रूग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
आज दुपारी 2 वाजल्यापासून सोलपूर शहरात संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काल हे आदेश जाहीर केले आहेत. त्यामुळे आज सकाळपासून खरेदीसाठी काही ठिकाणी मोठी गर्दी देखील दिसून येत आहे. 23 एप्रिल पर्यंत ही संचारबंदी लागू राहणार असल्याने भाजी, किराणा इत्यादी जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी लोकानी गर्दी केलेली पाहायला मिळाली. दूध, औषध वगळता सर्व प्रकारचे आस्थापना देखील आज पासून बंद असतील. वैद्यकीय सेवा आणि कायदेशीर कर्तव्य बजवणारे अधिकारी, कर्मचारी यांनाच या संचारबंदीतून सूट असणार आहे. या संचारबंदीचे नागरिकांमधून देखील स्वागत होताना दिसतंय मात्र कोणत्याही प्रकारची गर्दी कुठेही करू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. मूळच्या कर्नाटकातील असलेल्या महिलेला देखील कोरोना लागण झाली आहे. यामुळे कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. मुंबईहून हसन येथे जाताना पकडलेल्या कंटेनरमध्ये असलेली ही महिला कोरोनामुळे संक्रमित झाली आहे. पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच पेठवडगाव इथे हा कंटेनर पकडला होता.
कोल्हापूर जिल्ह्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. मूळच्या कर्नाटकातील असलेल्या महिलेला देखील कोरोना लागण झाली आहे. यामुळे कोल्हापुरातील कोरोना रुग्णांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. मुंबईहून हसन येथे जाताना पकडलेल्या कंटेनरमध्ये असलेली ही महिला कोरोनामुळे संक्रमित झाली आहे. पोलिसांनी चार दिवसांपूर्वीच पेठवडगाव इथे हा कंटेनर पकडला होता.
भाजपचे अनेक नेते सध्या कोरोनाच्या या संकटात पीएम केअर्स फंडला मदत करुन एकमेकांना चॅलेंज देत आहे. पण काही नेत्यांनी मदतीसाठी दिलेली लिंकच खोटी असल्याची चर्चा नेटकऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी सुद्धा याबाबत ट्वीट करुन भाजप नेत्यांनी आपण काय करत आहोत याचे भान सोडू नये, असं म्हटलं आहे. शिवाय मदतीत सुद्धा फ्रॉड? म्हणत पक्षाच्या नेत्यांना आणि माजी मंत्र्यांनाच पीएम केअर्स फंड कोणता आहे माहित नाही का असा सवाल केला आहे. एवढंच नाही तर या फ्रॉड लिंकची तपासणी करु, असंही त्यांनी सांगितलं.
कोकणातील पारंपरिक दशवातार लोककलेला 800 वर्षाच्या कालखंडात पहिल्यांदाच कोरोनामुळे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. दशावतार कलाकारांवर कोरोना आणि लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आली आहे. 1000 ते 1200 नाट्य प्रयोग रद्द झाल्याने ही परिस्थिती ओढावली आहे. दशावतार नाट्य प्रयोग रद्द झाल्याने वर्षभर घर खर्च कुठून आणायचा आणि घर कसं चालवायचं, असा प्रश्न दशावतार कलाकारांना पडला आहे. तसेच अशीच परिस्थिती राहिल्यास दशावतार लोककला जपायची कशी असाही प्रश्न या कलाकारांना पडला आहे.
औरंगाबाद रात्री उशिरा एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 31 वर पोहोचली आहे. सकाळी आठच्या माहितीनुसार एकाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असून एकूण 31 कोरोनाचे रुग्ण आहे. आतापर्यंत आठ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर जिल्ह्यात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद रात्री उशिरा एका रुग्णाची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. एका 55 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे औरंगाबादमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 31 वर पोहोचली आहे. सकाळी आठच्या माहितीनुसार एकाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे असून एकूण 31 कोरोनाचे रुग्ण आहे. आतापर्यंत आठ जणांना डिस्चार्ज दिला आहे. तर जिल्ह्यात एकूण तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
औरंगाबाद शहरात आज आणि उद्या दुपारी दीड ते रात्री अकरा वाजेपर्यंत मेडिकल दुकान वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचा आदेश औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी दिला आहे.
विरारमध्ये मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांवर विरार पोलिसांनी कारवाई केली आहे. विरार पश्चिम म्हाडा कॉलनी मधील इमारतीत क्वॉरन्टाईन नागरिक ठेवण्यात आले आहेत. याच म्हाडा कॉलनीत संचारबंदीचे नियम पायदळी तुडवून लोक मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडत आहेत. अशा मॉर्निंग वॉक करणाऱ्या 70 लोकांना पकडून आज विरार पोलिसांनी त्यांच्याववर गुन्हे दाखल केले आहेत. या 70 ही जणांना पोलिसांनी 1 तास रस्त्यावर बसवून ठेवले होते. या 70 जणांत 57 पुरुष आणि 13 महिलांचा ही समावेश आहे.
पालघरमधील उपजिल्हा रुग्णालय कासा येथील दोन कोरोनाबधित डॉक्टरांच्या संपर्कात आलेल्यापैकी 150 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 149 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत तर सारणी येथील एका महिलेला कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे. उपजिल्हा रुग्णलाय कासा येथून 187 जणांचे स्वॅबचे नमुने पाठविले होते. त्यापैकी 150 जणांचे कोरोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून उर्वरित नमुना 37 जणांचे अहवाल प्राप्त होणे बाकी आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 4200 वर पोहोचली आहे. काल दिवसभरातील राज्यात 552 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत 132 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. त्याखालोखाल पुण्यात 49 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून दिवसभरात 12 कोरोना संक्रमितांचा मृत्यू झाला. यातील सहा मृत्यू हे मुंबईत, चार मालेगाव आणि प्रत्येकी एक सोलापूर मनपा आणि अहमदनगर येथील जामखेडमधील आहे. दरम्यान एकाच दिवशी साडे पाचशे जणांना कोरोनाची लागणी होणं, ही राज्यासाठी काळजीचा विषय ठरला आहे.
महाराष्ट्रातील एकूण रुग्ण – 4200
मुंबई महानगरपालिका - 2724 (मृत्यू 132)
ठाणे - 20 (मृत्यू 2)
ठाणे महानगरपालिका- 110 (मृत्यू 2)
नवी मुंबई मनपा - 72 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली - 69 (मृत्यू 2)
उल्हासनगर - 1
भिवंडी, निजामपूर - 5
मिरा-भाईंदर - 71 (मृत्यू 2)
पालघर - 17 (मृत्यू 1 )
वसई- विरार - 85 (मृत्यू 3)
रायगड - 13
पनवेल - 27 (मृत्यू 1)
नाशिक - 4
नाशिक मनपा - 5
मालेगाव मनपा - 78 (मृत्यू 6)
अहमदनगर - 21 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 8
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव - 1
जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)
पुणे - 17 (मृत्यू 1)
पुणे मनपा - 546 (मृत्यू 49)
पिंपरी-चिंचवड मनपा - 48 (मृत्यू 1)
सातारा - 11 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा - 15 (मृत्यू 2)
कोल्हापूर - 3
कोल्हापूर मनपा - 3
सांगली - 26
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा - 30 (मृत्यू 3)
जालना - 1
हिंगोली - 1
परभणी मनपा - 1
लातूर - 8
उस्मानाबाद - 3
बीड - 1
अकोला - 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा - 9
अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)
यवतमाळ - 14
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर - 2
नागपूर मनपा - 67 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1
इतर राज्ये 13 (मृत्यू 2)
राज्यात काल 12 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. यापैकी मुंबई येथील 6 आणि मालेगाव 4 तर 1 मृत्यू सोलापूर मनपा आणि 1 मृत्यू अहमदनगर जामखेड येथील आहेत. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 72,023 नमुन्यांपैकी 67,673 जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 4200 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 368 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 6359 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23.97 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 507 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 87,254 लोक होम क्वॉरंटाईन असून 6743 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.