Coronavirus LIVE UPDATE | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे बंद

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील चौदा हजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 19 Apr 2020 11:00 PM
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आज मध्यरात्रीपासून संपूर्ण पुणे शहर पूर्णपणे बंद राहणार. पुढील सात दिवसात शहरात कर्फ्यू लागू. जीवणावश्यक वस्तूची दुकाने फक्त सकाळी 10 ते 12 उघडी राहणार. पुण्यात कर्फ्यूची कडक अंमलबजावणी केली जाणार असून जे उल्लंघन करतील त्यांच्यावर कडक कारवाई. नागरिकांनी गरजेशिवाय कुठल्याच कारणासाठी बाहेर पडू नये पोलिसांच आवाहन.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्रीपासून पुणे शहरात सात दिवसांसाठी कर्फ्यू लागू, जीवनावश्यक वस्तूची दुकानं सकाळी 10 ते 12 खुली राहणार, आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार, नागरिकांनी बाहेर न पडण्याचं पोलिसांचं आवाहन
शिवसेना संजय राऊत यांच्या टीकेला खासदार नारायण राणे यांच उत्तर
मेहुणीच्या पोटातील मूल जन्माला येण्यापूर्वीच ते दत्तक देण्याच्या नावाखाली त्याची ऑनलाइन विक्री करण्याचा प्रस्ताव पुढे करून पैशांची मागणी करणारे एक धक्कादायक प्रकरण औरंगाबाद पोलिसांनी उघडकीस आणले आहे. या प्रकरणी निकिता खडसे आणि शिवशंकर तांगडे या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोलापूर शहरात कोरोनाचा वाढता प्रभाव पाहता शहरात संपूर्ण संचारबंदी, उद्या दुपारी 2 वाजेपासून 23 एप्रिलच्या रात्री 12 वाजेपर्यंत शहरात संपूर्ण संचारबंदी, या कालावधीत शहराच्या सर्व सीमा पूर्णपणे बंद राहणार
नाशिक : मालेगावात आज 8 नविन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण, यामध्ये 4 महिला आणि 4 पुरूषांचा समावेश, मालेगावमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 85 वर
कोरोनाच्या संकटात प्रसार माध्यमंदेखील चोख भूमिका निभावत आहेत, त्यामुळे माध्यम प्रतिनिधींना 25 लाखाचे विमा संरक्षण मिळण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याची पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती
राज्यात आज दिवसभरातील सर्वाधिक 552 कोरोना बाधितांची नोंद. राज्यातील आकडा 4200 वर. तर, दिवसभरात 12 जणांचा आज मृत्यू. एक दिवसात 552 रुग्ण हे पहिल्यांदा झालं आहे.
सांगलीत कोरोनाचा पहिला बळी. आज सापडलेल्या विजयनगर येथील कोरोना बाधित व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 47 वर्षीय बँक कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली होती. सायंकाळी त्याच मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांनी दिली.
ठाणे शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. काल ठाण्यात 15 रुग्ण सापडले असताना आज पुन्हा नवे 14 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे ठाणे शहरातील रुग्णांचा एकूण आकडा 144 झाला आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये सर्वाधिक कौसा येथे 6 रुग्ण सापडले असून यात 3 महिला व 3 पुरुषांचा समावेश आहे. तर राबोडी क्रांतीनगर येथे 5 रुग्ण सापडले असून याठिकाणी 3 महिला व 2 पुरुषांचा समावेश आहे. तसेच मुंब्रा येथे 1 पुरुष, पडवळनगर येथे 1 महिला आणि लोकमान्य नगर येथील झंजे नगर येथे 1 पुरुष असे एकूण 14 नवे करोना बाधित रुग्ण सापडले आहेत.
मुंबईतील धारावी येथे आज 20 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, धारावीतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 138 वर, आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू
अडकून पडलेल्या स्थलांतरित मजुरांना 20 एप्रिलपासून म्हणजे उद्यापासून राज्यातल्या राज्यात कामासाठी परवानगी. कोरोना तपासणी करून या कामगारांना कामावर घेण्याचे गृहमंत्रालयाचे आदेश. सरकारने उद्यापासून शेती मनरेगा बांधकाम आणि औद्योगिक क्षेत्रातल्या काही उपक्रमांना परवानगी दिली आहे. या कामांमध्ये या मजुरांना सहभागी करून घेता येणार.पण एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कामगारांची ने आण करण्यास मात्र मनाई.
गोवा राज्यात शेवटचा रुग्णही कोरोनामुक्त झाल्याने संपूर्ण राज्यात आता एकही कोरोना पॉझिटिव्ह नाही. त्याशिवाय तीन एप्रिलपासून एकही नवीन रुग्ण गोव्यात आढळला नसल्याची माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली आहे.
महाराष्ट्र राज्यातील राज्य महामार्गाच्या टोल नाक्यांवर माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर आज मध्यरात्रीपासून टोलवसुली सुरू होणार, 30 मार्चपासून टोल वसुली बंद होती, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिसूचना
साताऱ्यात आणखी दोन रुग्ण कोरोना पाॕझिटीव्ह रुग्ण आढळले, साताऱ्यात कोरोनाबाधितांची संख्या 13 वर

नागपूरमध्ये आतापर्यंत 72 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, यापैकी एका रुग्णाच्या संपर्कात येऊन तब्बल 37 लोक कोरोना पॉझिटिव्ह झाल्याची नागपूर महापालिकेची धक्कादायक माहिती

केसरी रेशनकार्ड धारक अन्नधान्य मिळणार, तीन कोटी लोकांना मे आणि जून या दोन महिन्यासाठी राज्य सरकार गहू आणि तांदूळ देणार, गहू 8 रुपये किलो तांदूळ 12 रुपये, यासाठी 450 कोटी दोन महिन्यासाठी द्यावे लागणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिंगोली येथील राज्य राखीव दलामधील एसआरपी जवानांच्या दोन तुकड्या बंदोबस्तासाठी मालेगाव आणि मुंबई या ठिकाणी गेल्या होत्या. आज हे जवान बंदोबस्त करून जिल्ह्यात परतले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून आज मालेगाव येथील 107 जवानांना क्वॉरंटाईन करण्यात आले आहे. तर मुंबई येथील एक 94 दलाची तुकडी आज रात्री मुंबईतील बंदोबस्त आटोपून हिंगोली येथे दाखल होणार आहे. त्या तुकडीला देखील क्वॉरंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती हिंगोली येथील राज्य राखीव दलाचे समादेशक मंचक इप्पर यांनी दिली आहे. दोन्ही हॉटस्पॉट ठिकाणावरून शेजवान ड्युटी करून आले आहेतं. त्यामुळे यांना खबरदारीचा उपाय म्हणून क्वॉरंटाईन करण्यात येत आहे.
श्रीवर्धन आणि पोलादपूर येथे एक एक कोरोना पॉसिटीव्ह रुग्ण आढळल्याने तेथील नागरिकांचा गावाकडे पायी प्रवास.
राजभवन हे फालतू राजकारणाचा अड्डा बनू नये, शिवसेना खासदार संजय राऊत यांचं ट्वीट
मालेगाव सामान्य रुग्णालयात एका मृत झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना घडली. एका क्वॉरंटाईन केलेल्या रुग्णास त्रास होऊ लागल्याने त्याला सामान्य रुग्णालयात तातडीने आणण्यात आले. मात्र, त्याच्यावर वेळेवर उपचार झाले नाही आणि तेथेच तो दगावल्याचा आरोप मृताच्या नातेवाइकांनी करत गोंधळ घालत तोडफोड केल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
लातूर येथील गांधी चौकातील मेडिकल स्टोरच्या लाईन मधील दुकानात काम करणाऱ्या कर्मचाऱ्याला ओळखपत्र दाखवल्यानंतर ही पोलिसांनी मारहाण केल्यामुळे मेडिकल दुकानदार संतप्त झाले होते. या घटनेचा निषेध नोंदवत या भागातील मेडिकल दुकान केवळ पंधरा मिनिटासाठी बंद ठेवत आपला रोष व्यक्त केला आहे. पोलिसांनी केलेल्या मारहाणीत त्या कर्मचाऱ्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. राष्ट्रावरील आपत्तीमुळे आम्ही हे प्रकरण पुढे वाढवणार नाहीत मात्र आमचा निषेध आम्ही नोंदवत आहोत. लातूर शहरातील मेडिकल दुकानदार आणि कामगारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत. ती दाखवल्यानंतर ही अशी मारहाण होत असेल तर आम्ही न्याय कुठे मागावा असे संतप्त मत यावेळी कर्मचारी आणि दुकानदारांनी व्यक्त केले आहे.

20 एप्रिलपासून ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये माफक उद्योगधंद्याला परवानगी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील 6 जेल आजपासून पूर्ण बंद, कुणी आत आणि कुणी बाहेर होऊ शकणार नाही, कर्मचारी जेलमध्येच राहणार, कैद्यांची संख्या अधिक असलेल्या जेलमध्ये हा निर्णय तात्काळ लागू होणार, गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
सोलापूर : सोलापूरात कोरोनाचा आणखी एक बळी, कोरोनामुळे 69 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू, आजच या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आढळला होता
,
सोलापूरात कोरोना बाधितांची एकूण संख्या 15

यापैकी आतापर्यंत दोघांचा मृत्यू, 13 जणांवर उपचार सुरू
,
महिला राहत असलेला इंदिरा नगर परिसर सील
महाराष्ट्रात 66 हजार 796 टेस्ट केल्या आहेत त्यात 95% लोक निगेटिव्ह आल्या आहेत. राज्यात 3600 जण कोरोना बाधित आहेत त्यातील 350 लोकांना बरं करून घरी सोडले आहेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
पंढरपूर तालुक्यातील भोसे गावात बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन मुलींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.
आपण संयम, धैर्य, जिद्दीने लढत आहे. पण न दिसणाऱ्या शत्रूशी आपला लढा सुरू आहे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यपालांनी कटुता, सुडबुद्धी न बाळगता मुख्यमंत्री शिफारस मंजूर करावी, माजी खासदार संजय काकडे यांची भावना, देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी क्षत्रिय व्हावं, विरोधक होऊ नये. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांकडे जाऊन उद्धव ठाकरेंसाठी परवानगी आणावी. राज्यपालांनी राजकारण करू नये, अन्यथा जनता माफ करणार नाही.

सांगलीतील विजयनगर येथे एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने सदरचा परिसर सील करण्यात आला आहे.

यामध्ये मिरजकडून येताना भारती हॉस्पिटल, विश्रामबाग चौक, विजय नगर रेल्वे ब्रिज, मराठा समाज कृष्णाली वसाहत, जिल्हा सत्र न्यायालय या ठिकाणचे सर्व रस्ते बंद करण्यात आले आहेत.

विजयनगर पर्ल हॉटेलच्या मागील बाजूला रुग्ण राहयला असल्याने विजय नगर परिसरातील प्रत्येक गल्ली बॅरिकेड्स लावून सील करण्यात आली आहे. परिसरातील 51 ठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत.

सांगलीतून मिरजकडे जाण्यासाठी कुपवाडमार्गे वाहतूक वळविण्यात आली आहे.

विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये.

या संपूर्ण परिसरामध्ये 3 शिफ्टमध्ये पोलिस बंदोबस्त 24तास तैनात ठेवण्यात आला आहे.

जो परिसर सील केला आहे त्या परिसरातील सर्व आस्थापणा बंद करण्यात आल्या आहेत. या

परिसरामध्ये महानगरपालिका आरोग्य विभागाच्या विविध पथकांमार्फत सर्व्हे सुरू करण्यात आला आहे .

संपूर्ण सांगली शहर, मिरज येथील लोकांनी विनाकारण घरा बाहेर पडू नये, आपला आणि आपल्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालू नये, असे आवाहनही करण्यात आले आहे.

नागपूर : नागपुरात नव्याने 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, सर्व आमदार निवासात होते क्वारंटाईन, नागपुरातील कोरोना बाधितांची संख्या 72 वर
विदर्भ दारू विक्रेता संघटनेची राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांकडे मागणी केली आहे. कोरोनाचे संकट दूर होईपर्यंत ग्रीन आणि ऑरेंज झोन मधील सर्व प्रकारचे दारू विक्रेत्यांना पार्सल पद्धतीने दारू विक्रीची परवानगी दिल्यास ग्राहकांची गर्दी होणार नाही आणि सोशल डिस्टनसिंगचे पालन होईल अशी मागणी केली. 20 एप्रिल नंतर बरेच उद्योग व्यवसाय सुरू होण्याची शक्यता आहे.अशा परिस्थीतीत ग्रीन, ऑरेंज झोन मधील मद्य विक्री व्यवसाय सहज चालू करता येऊ शकते. लॉकडाऊन मध्ये अवैध दारू व्यवसायाचा महापूर आला आहे. दररोज दारू दुकान आणि बारमध्ये मोठ्या प्रमाणात चोऱ्या होत आहे.

दारू व्यवसाय आणि त्यांच्या कामगारांवर बेकारीचा प्रसंग आला असून आर्थिक संकट सुद्धा निर्माण झाले आहे.सोबतच राज्य सरकारचा कोट्यवधी रुपयाचे महसूल बुडत आहे.
औरंगाबाद | औरंगाबादमधील 'त्या' नवजात बालिकेची कोरोना चाचणी निगेटिव्ह., काल कोरोना पॉझिटिव्ह महिलेनं दिला होता गोंडस मुलीला जन्म, शल्य चिकित्सक सुंदरराव कुलकर्णी यांची माहिती
कोरोनामुळे सध्या सर्वत्र लॉकडाऊन सुरु असल्याने त्याचा फटका शेती व्यवसायाला बसला आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांच्या शेतमालाचे नुकसान झाले आहे. मालेगाव तालुक्यातील वडेल येथिल समाधान हिरे या शेतकऱ्याने दीड एकरात टोमॅटो आणि एक एकरात मिरचीची लागवड केली होती. मात्र तोडणीसाठी मजूर नाही आणि माल विक्रीची अडचण येत असल्याने अखेर त्यांनी मिरची आणि टोमॅटो उपटून फेकून देण्याची वेळ आली आहे.
कोल्हापूर : कोल्हापुरात पुन्हा एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, कंटेनरमधून कोल्हापूरला आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण, संबंधित व्यक्ती मुंबईहून कोल्हापुरात आली होती, पेठवडगाव याठिकाणी कंटेनरमधून येताना ताब्यात घेतलं होतं
जालना: बिलोली तालुक्यातील चितमोगरात काल सायंकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह पडल्या गारा, गारांमुळे शेतातील पिके उध्वस्त, कलिंगड, भुईमूग, ज्वारी, हळद पिकांचे मोठे नुकसान
चंद्रपूर : चंद्रपूर शहरात रात्री फक्त एका तासात तब्बल 56 मिलिमीटर पाऊस, शहरात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात, रात्री उशिरा प्रचंड वादळ, गारपिटीसह पावसाने शहर-जिल्ह्याला झोडपले
सांगली महापालिका क्षेत्रात कोरोनाचा शिरकाव झाला आहे. आतापर्यंत फक्त इस्लामपूर शहरामध्ये 26 रुग्ण आढळून आले होते. मात्र आता शहरातील विजयनगर भागातील एका बँकेत काम करणाऱ्या 47 वर्षीय व्यक्तीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने संपूर्ण सांगली, मिरज, कुपवाड महापालिका क्षेत्र सील होण्याच्या मार्गावर आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मागील महिन्याभरात या व्यक्तीचा बाहेर कुठेही प्रवास झालेला नाही अशी माहिती त्या व्यक्तीच्या कुटुंबाने प्रशासनाला दिलीय.त्यामुळे या व्यक्तीस कुणापासून कोरोनाची लागण झाली हे तपासण्याचे आरोग्य यंत्रणेपुढे मोठे आव्हान आहे. या व्यक्तीची प्रकृती सध्या गंभीर असून त्या रुग्णास व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.
या कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीच्या कुटूंबातील 5 जणांचे स्वॅब तातडीने तपासणीसाठी घेतले गेले आहेत. या व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले आणि महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील यांनी तात्काळ पोलीस आणि डॉक्टराचा फौजफाटा घेवून त्या व्यक्तीच्या कुटुंबांना हॉस्पिटलमध्ये नेण्याबरोबरच पोलिसांनी संपूर्ण विजयनगर परिसर , सांगली-मिरज रोड रात्रीच सील करण्यास सुरुवात केली.
पालघर ग्रामीण साठी दिलासादायक बातमी, सफाळे, काटाळे, उसरणी भागातील त्या 30 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह
चंद्रपूर शहरात विजांच्या कडकडाटासह पुन्हा पावसाला सुरुवात
चंद्रपुरात पहाटे जोरदार वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपीट
देशांतर्गत विमान वाहतूक सुरु करण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याचं स्पष्टीकरण भारत सरकारकडून देण्यात आलंय, देशात 3 मे नंतरच्या ठराविक डोमेस्टिक फ्लाईटसाठी बुकिंग सुरू केल्याचं एअर इंडियाच्या वेबसाईटवर म्हटलं होतं #AirIndia
औरंगाबाद : मुलीला इंजेक्शन देऊन परिचारिकेची गळफास घेऊन आत्महत्या, तोरणागड नगर भागातील घटनेनं खळबळ, ऋतुजा गायकवाड आणि आशा गायकवाड अशी मृत मायलेकीची नावं, आत्महत्येचे कारण अस्पष्ट

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात आज 328 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली. यात सर्वाधिक मुंबईत 118 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडलेत. त्याखालोखाल पुण्यात 78 जणांना कोरोनाची लागण झाली. परिणामी राज्यातील आकडा 3648 झाला आहे. वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. एफएन वॉर्डमध्ये आतापर्यंत 118 रुग्ण झाले आहेत. यातील सत्तरच्या आसपास रुग्ण हे वडाळा येथील झोपडपट्टीमध्ये आढळून आले आहेत. संगम नगर, हिंमत नगर, कोरबा मिठागर या परिसरातील हे रुग्ण आहेत. मुंबई, पुण्यातील वाढते रुग्ण सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 3648

मुंबई महानगरपालिका - 2268 (मृत्यू 126)

ठाणे - 18 (मृत्यू 2)

ठाणे महानगरपालिका- 116 (मृत्यू 2)

नवी मुंबई मनपा - 65 (मृत्यू 3)

कल्याण डोंबिवली - 73 (मृत्यू 2)

उल्हासनगर - 1

भिवंडी, निजामपूर - 4
मिरा-भाईंदर - 64 (मृत्यू 2)
पालघर - 21 (मृत्यू 1 )
वसई- विरार - 62 (मृत्यू 3)
रायगड - 13
पनवेल - 29 (मृत्यू 1)

देशातील 29 टक्के कोरोना बाधित दिल्लीतील निझामुद्दीन मर्कजशी संबंधित : आरोग्य मंत्रालय
नाशिक - 3
नाशिक मनपा - 5
मालेगाव मनपा - 45 (मृत्यू 2)
अहमदनगर - 19 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 9
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव - 0
जळगाव मनपा - 2 (मृत्यू 1)
पुणे - 18 (मृत्यू 1)
पुणे मनपा - 528 (मृत्यू 49)
पिंपरी-चिंचवड मनपा - 45 (मृत्यू 1)
सातारा - 11 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा - 14 (मृत्यू 1)
कोल्हापूर - 2
कोल्हापूर मनपा - 3
सांगली - 26

'आमची टेस्ट करा पण आम्हाला मुंबईत येऊ द्या', समुद्रात अडकलेल्या कर्मचाऱ्यांची व्यथा 

सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा - 29 (मृत्यू 3)
जालना - 2
हिंगोली - 1
परभणी मनपा - 1
लातूर मनपा - 8
उस्मानाबाद - 3
बीड - 1
अकोला - 7 (मृत्यू 1)
अकोला मनपा - 7
अमरावती मनपा - 6 (मृत्यू 1)
यवतमाळ- 13
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर - 2
नागपूर मनपा - 58 (मृत्यू 1)
चंद्रपूर मनपा - 2
गोंदिया - 1

आज राज्यात 11 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्ंयूपैकी मुंबई येथील 5 आणि पुणे येथील 4 तर 1 मृत्यू औरंगाबाद मनपा आणि 1 मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. आजपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 67,468 नमुन्यांपैकी 63,476 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3648 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 344 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 5994 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केलं आहे. आजपर्यंत 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात82,299 लोक होम क्वॉरंटाईन असून 6999 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.