- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
coronavirus LIVE UPDATES | राहुल कुलकर्णी यांच्याविरुद्धचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी
coronavirus LIVE UPDATES | राहुल कुलकर्णी यांच्याविरुद्धचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा; विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांची मागणी
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील बारा हजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
16 Apr 2020 10:26 PM
एबीपी माझा चे पत्रकार राहुल कुलकर्णी यांच्याविरुध्दचा गुन्हा ही माध्यमांची मुस्कटदाबी. सरकारने त्यांच्याविरुध्दचा गुन्हा तात्काळ मागे घ्यावा- विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांची मागणी
मालेगावमध्ये आणखी सात रुग्णांचे रिपोर्ट पॉझेटिव्ह. तर नामपूर येथील ग्रामीण रुग्णालयातील 28 स्टाफचे रिपोर्ट निघेटिव्ही. मालेगाव मधील आलेले रिपोर्ट हे अगोदरच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचे आहेत. मालेगावमधील कोरोना बाधित रुग्णाची संख्या 46वर पोहचली.
पुण्यातील ससून रुग्णालयाचे डीन डॉक्टर अजय चंदनवाले यांची तडकाफडकी बदली झाली आहे. ससून रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या मृत्यूचं प्रमाण जास्त असल्याने ससूनच्या व्यवस्थापनावर टीका होऊ लागली होती. त्यानंतर राज्य सरकारने डॉक्टर चंदनवाले यांची मुंबईत बदली केली आहे. ससून रुग्णालयाचा कार्यभार डॉक्टर तांबे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे तर ससूनच्या व्यवस्थापनाची जबाबदारी ही जिल्हाधिकाऱ्यांकडे दिली आहे. डॉक्टर अजय चंदनवाले हे गेली अनेक वर्षं ससूनच्या डीन पदावर ठाण मांडून होते. मध्यंतरी त्यांची मुंबईत बदली करण्यात आली होती. परंतु पुन्हा ते ससूनचे डीन म्हणून पुण्यात परतले होते.
बेळगाव जिल्ह्यातून सीमा भागातील गावात होणारी जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक बंद
करण्याचे आदेश उपविभागीय दंडाधिकारी विजया पांगारकर यांनी दिले आहेत.
बेळगाव जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सीमाभागातील नागरिक दैनंदिन कामासाठी संकेश्वर, बेळगावला मोठ्या संख्येने जात असतात.
नामपुर रुग्णालयातील कोरोनाग्रस्त डॉक्टरच्या संपर्कात आलेल्या रुग्णांची यादी समाज माध्यमांवर व्हायरल. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी जायखेडा पोलीस स्थानकात चार व्हॉट्सग्रुप वर गुन्हा दाखल झाला आहे.
वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्डात दाखल असलेल्या 118 लोकांचे रिपोर्ट्स नेगेटिव्ह आले असून 26 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील 14 दिवस त्यांना गृह विलगीकरणात आरोग्य विभागाच्या निगराणीखाली ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली.
गेल्या 24 तासात 3 जण आयसोलेशन वार्डमध्ये भरती झाले आहेत. सध्या स्थितीत एकूण 75 जण भरती आहेत.
तसेच वैद्यकीय महाविद्यालयाला एकूण 118 नेगेटिव्ह रिपोर्ट प्राप्त झाले, तर 13 रिपोर्टचे निश्चित काही सांगता येत नसल्यामुळे हे 13 नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे.
आयसोलेशन वार्डमध्ये पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या 10 आहे.
औरंगाबादेत उद्यापासून 19 तारखेपर्यंत संध्याकाळी पाच वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय. मेडिकल वगळता सर्व दुकान बंद ठेवण्याचा निर्णय पोलीस आयुक्तांनी घेतला. औरंगाबाद पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी परिपत्रक काढले.
सांताक्रूझ आणि बांद्रा परिसरातील मजुरांना कर्नाटक राज्यात घेऊन जाण्याचा बेत फसला.
टेम्पोतून 30 मजुरांना घेऊन हा टेम्पो कर्नाटक राज्यात चालला होता. कोल्हापूर पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत कर्नाटकातील 30 मजूर मुंबईहून पुन्हा कर्नाटकात जात असल्याचं निदर्शनास आले.
सर्व मजुरांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात केलं दाखल
सांताक्रूझ आणि बांद्रा परिसरातील मजुरांना कर्नाटक राज्यात घेऊन जाण्याचा बेत फसला.
टेम्पोतून 30 मजुरांना घेऊन हा टेम्पो कर्नाटक राज्यात चालला होता. कोल्हापूर पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत कर्नाटकातील 30 मजूर मुंबईहून पुन्हा कर्नाटकात जात असल्याचं निदर्शनास आले.
सर्व मजुरांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात केलं दाखल
कोरोनाचे विरोधात नागरिकांसाठी 24 तास रस्त्यावर असणाऱ्या पोलिसांचे वेळापूर येथे फुलांच्या पायघड्या घालून स्वागत करण्यात आले. आज सायंकाळी पोलिसांनी वेळापूर गावातून मार्च काढला असता ग्रामस्थांनी उस्फूर्तपणे रस्त्याच्या कडेला उभारत पोलिसांच्या मार्गावर व त्यांच्या अंगावर फुले उधळली. रस्त्याच्या दोन्ही बाजूला सुरक्षित अंतरावर उभारून फुले उधळत व टाळ्या वाजवत ग्रामस्थांनी पोलिसांचे स्वागत केले.
सांताक्रूझ आणि बांद्रा परिसरातील मजुरांना कर्नाटक राज्यात घेऊन जाण्याचा बेत फसला.
टेम्पोतून 30 मजुरांना घेऊन हा टेम्पो कर्नाटक राज्यात चालला होता. कोल्हापूर पोलिसांनी हा टेम्पो ताब्यात घेतला. टेम्पोत कर्नाटकातील 30 मजूर मुंबईहून पुन्हा कर्नाटकात जात असल्याचं निदर्शनास आले.
सर्व मजुरांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणीसाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात केलं दाखल
कोरोनामुळे दोशात लॉकडाऊन आणि संचारबंदी सुरु असतानाही अनेक मजूर वेगवेगळ्या मार्गाने आपल्या गावाकडे जात आहेत. सोलापूर, पुणे येथे कंपन्यांमध्ये काम करणारे 47 मजूर एका कंटेनरमधून जात असताना सकाळच्या सुमारास मनमाड चौफुलीवर नाका बंदी दरम्यान कंटेनरची तपासणी केली असता त्यात मजूर आढळून आले. मालेगाव पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेत शहर पोलिस स्थानकांत आणले. या सर्वांची अन्यत्र सोय करावी असे सांगूनही प्रशासनाने त्यांची सोय निवारा केंद्रात केलेली नसल्याने हे सर्व मजूर अद्याप शहर पोलीस स्थानकातच बसून आहे.
ससून रुग्णालयातील आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 54 वर्षीय पुरुष आणि 47 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील मृतांचा आकडा 45 वर गेला आहे.
देशात गेल्या 24 तासांत 37 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 414 वर पोहोचली आहे. भारतातील कोरोना बाधितांचा एकूण आकडा 12,380वर पोहोचला आहे.
राज्यातील उद्योग सुरु करण्याबाबत उद्योग विभागाची महत्त्वाची बैठक होणार आहे. ज्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे किंवा अजिबात नाही अशा ग्रीन आणि ऑरेंज झोनमधील उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकारने कृती गट स्थापन केला होता. या कृती गटाचा अहवाल आज उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना सादर केला जाणार आहे. या कृती गटात उद्योग सचिव, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव, एमआयडीसीचे सीईओ, उद्योग विभागाचे विकास आयुक्त यांचा समावेश आहे.
अकोला जिल्ह्यातील पातूरमध्ये क्वारंटाईन सेंटरमधून 30 मजूर आणि विद्यार्थी पळाले. बुधवारी सकाळी उघड झाला होता प्रकार. पातूरातील मौलाना आझाद सांस्कृतिक भवनात क्वॉरंटाईन करून ठेवलं होतं. सर्व विद्यार्थी आणि मजूर तेलंगाणातील असून 30 मार्चपासून पातूरात थांबलेले होते. प्रशासनाकडून फरार लोकांचा शोध सुरू आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी चौघांना कोरोनाची लागण झालेली आहे. यात चार वर्षीय चिमुरडी, तिची आई, अन्य एक महिला आणि पुरुष अशा चौघांचा समावेश आहे. हे सर्व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेले आहेत. त्यामुळे शहराचा आकडा हा 48 वर जाऊन पोहचला आहे, त्यापैकी 12 रूग्ण कोरोनामुक्त झाले असून एकाचा मुत्यू झाला आहे.
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील 14 कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. किटशिवाय कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 18 कर्मचाऱ्यांना अॅडमिट केलं. या 18 ही कर्मचाऱ्यांचं स्वॅब रात्री उशिरा घेतले आणि त्यांना वेगळ्या विभागात ठेवण्यात आलं.
ससून रुग्णालयातील आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 54 वर्षीय पुरुष आणि 47 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पुण्यातील मृतांचा आकडा 45 वर गेला आहे.
यवतमाळमध्ये काल प्रतिबंधित क्षेत्रातील एका नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पवार पुरा भागातून रात्री 130 लोकांना सात रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर या सगळ्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
यवतमाळमध्ये काल प्रतिबंधित क्षेत्रातील एका नागरिकाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला. त्यानंतर पवार पुरा भागातून रात्री 130 लोकांना सात रुग्णवाहिकेतून तपासणीसाठी नेण्यात आले. तपासणीनंतर या सगळ्यांना दोन वेगवेगळ्या ठिकाणी क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात सांगली पोलिसांनी विनाकारण बाहेर पडणाऱ्यांना आणि मास्क न घालणाऱ्यांना शिक्षेचा पॅटर्न बदलला आहे. उठाबशांऐवजी आता कोलांटउडीची शिक्षा देण्यास सुरुवात केली आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याकडून आरग गावातील विनाकारण बाहेर पडणाऱ्या आणि मास्क न घालणाऱ्यांना ही शिक्षा दिली.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात काल कोरोनाच्या 232 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2916 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, काल राज्यात 9 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 2 जण मुंबईत, 6 पुण्यात तर तर अकोला मनपा येथील एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 187 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या हजार नमुन्यांपैकी 48 हजार 198 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2916 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 69 हजार 738 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5617 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी 6 पुरूष तर 3 महिला आहेत. त्यातील 4 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 3 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 9 रुग्णांपैकी 6 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 2684
मृत्यू - 187
मुंबई महानगरपालिका- 1896 (मृत्यू 114)
ठाणे- 12
ठाणे महानगरपालिका- 97 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 68 (मृत्यू 3)
कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)
उल्हासनगर- 1
भिवंडी, निजामपूर - 1
मिरा-भाईंदर- 51 (मृत्यू 2)
पालघर- 5 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 32 (मृत्यू 3)
रायगड- 5
पनवेल- 10 (मृत्यू 1)
नाशिक - 2
नाशिक मनपा- 2
मालेगाव मनपा - 48 (मृत्यू 2)
अहमदनगर- 10 (मृत्यू 1)
अहमदनगर मनपा - 17
धुळे -2 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)
पुणे- 10
पुणे मनपा- 362 (मृत्यू 40)
पिंपरी-चिंचवड मनपा- 35 (मृत्यू 1)
सातारा- 6 (मृत्यू 2)
सोलापूर मनपा- 1 (मृत्यू 1)
कोल्हापूर- 1
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)
औरंगाबाद मनपा- 23 (मृत्यू 2)
जालना- 1
हिंगोली- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-4
बीड - 1
अकोला मनपा - 13 (मृत्यू 1)
अमरावती मनपा- 6 (मृत्यू 1)
यवतमाळ- 5
बुलढाणा - 21 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर- 5
नागपूर मनपा - 50 (मृत्यू 1)
गोंदिया - 1
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5394 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 20 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.