coronavirus LIVE UPDATES | वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजार उद्यापासून सुरु होणार

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील दहा हजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 15 Apr 2020 09:11 PM
वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील धान्य बाजार उद्यापासून सुरु होणार असल्याची माहिती पालकमंत्री एकनाथ शिंदेनी माहिती दिली आहे. आज सर्व संबंधितांची बैठक घेऊन अडचणी, तसेच व्यापाऱ्यांच्या तक्रारी जाणून घेतल्या

धान्य बाजारपेठेत बाहेरच्या कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही. सरकारचं महत्वाचं पाऊल

किरकोळ व्यापाऱ्यांनी आपली मागणी आगाऊ नोंदवावी त्यानुसार त्यांचा माल थेट टेम्पोत चढवण्यात येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
नाशिक - त्र्यंबकेश्वर शहर उद्यापासून 19 तारखेपर्यंत 4 दिवस संपूर्ण लॉकडाऊन, वैद्यकीय सेवा आणि दूध वगळता सर्व सेवा राहणार बंद, भाजीपाला आणि किराणा दुकानेही राहणार बंद
वांद्रे स्थानकातील गर्दी रेल्वेच्या पत्राच्या बातमीमुळे झाल्याचा आरोप चुकीचा : राजीव खांडेकर
जालना : गरजू लोकांना अन्नधान्य, जेवण वाटप करताना फोटो, व्हिडिओ चित्रीकरण करण्यास जिल्हाधिकाऱ्यांची मनाई. आदेशाचे उल्लंघन केल्यास सक्त कारवाई करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश.
यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी तालुक्यातील सेलू येथिल दोन सख्ख्या भावंडांचा शेतातल्या विहिरीत पडून मृत्यू झाला आहे. आर्णीच्या सेलू गावात राहणाऱ्या या दोन्ही भावंडांचा घरच्या मंडळींनी काल दुपारपासून त्यांचा शोध घेतला. मात्र, काल रात्रीपर्यंत शोधूनही काही माहिती मिळाली नव्हती. आज मात्र दोन भावंडांपैकी एकाचा मृतदेह विहिरीत पाण्यावर तरंगत असल्याचा गावकऱ्यांना आढळून आले. त्यानंतर ही घटना उघडकीस आली. मृत ईश्वर देवकर वय 15 आणि किशोर देवकर वय 13 अशी दोघांची नावे आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकाच दिवशी 4 ठिकाणी जिल्हाबंदी असताना भिवंडी परिसरातून बेकायदा कामगार वाहतूक, 329 कामगारांना घेतले ताब्यात.
पुण्यात आज दिवसभरात 4 जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 41 वर पोहचला आहे.
पुण्यात मागील 12 तासात कोरोनामुळे तिघांचा बळी. मृतांचा आकडा 40 वर.
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणखीन एका 73 वर्षीय रुग्णाचा मृत्यू.
आज नवे 117 कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत 66 तर पुण्यात 44 नवे रुग्ण, राज्यातील आकडा 2801 वर
पुण्यातील ससून रुग्णालयामध्ये आणखीन एक 34 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. पुण्यात मागील 12 तासात 3जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 40 वर जाऊन पोहोचला आहे.
सोलापुरातील ग्रामीण पेट्रोल पंपावर सॅनिटायझर कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. या कक्षात निर्जंतुक झाल्याशिवाय ग्राहकांना पेट्रोल देण्यात येणार नाही. सोलापुरात अत्यावश्यक सेवेतील लोकांनाच पेट्रोल देण्यात येत आहे. आता त्यांनाही निर्जंतुकीकरण केल्याशिवाय पेट्रोल मिळणार नाही. सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या वतीने असे कक्ष सर्व पोलिस स्थानकात बसवण्यात आले होते. आता पेट्रोल पंपावरही असे कक्ष पाहायला मिळत आहेत.
पुणे : ससून रुग्णालयातील आणखी एका कोरोनाबाधित तरुणाचा मृत्यू, पर्वती येथील 35 वर्षीय तरुणावर 6 एप्रिलपासून उपचार सुरू होते, काल सायंकाळी त्याचा मृत्यू झाला, तर ससून रुग्णालयातील आणखी एका नर्सला कोरोनाची बाधा, पुण्यात एकूण मृतांचा आकडा 38
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी मुख्यमंत्री निधी संकलित करुन महापुरात महाराष्ट्राने केलेल्या मदतीची परतफेड करण्याचा निर्धार कोल्हापूरच्या चिखली ग्रामस्थांनी केला आहे. आतापर्यंत दीड लाखांचा निधी संकलित करण्यात आला असून नागरिकांकडून जमा होणारी रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिली जाणार आहे. अवघ्या चोवीस तासात मुख्यमंत्री निधीसाठी दीड लाखांपेक्षा जास्त रक्कम जमा झाली आहे. महापुराच्या संकटकाळात चिखलीकरांना संपूर्ण महाराष्ट्रातून मदतीचा हात मिळाला होता. त्यामुळे या संकटात आपण आपल्या राज्यातील बांधवांना काही ना काही मदत करावी, आणि राज्यातून आलेल्या मदतीतून काही अंशी उत्तराई होण्याची सुरुवात करावी, अशी भावना ग्रामस्थात निर्माण झाली. याला गावकऱ्यांकडून मोठा पाठिंबा मिळत आहे.
कोल्हापुरात आणखीन एक कोरोना पॉझिटिव्ह, 24 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण,

शाहूवाडी तालुक्यातील उचत मधील तबलिगीच्या संपर्कात आला होता हा तरुण,

शाहुवाडीतील 'त्या' पहिल्या रुग्णाचा 24 वर्षीय नातेवाईक सुद्धा कोरोना पॉझिटिव्ह
,
आत्तापर्यंतची कोल्हापुरातील रुग्णांची संख्या 7 वर
मुंबईच्या दादरमधील शुश्रूषा रुग्णालयाचा हलगर्जीपणा समोर आला आहे. डायलिसिसला जाणाऱ्या दोन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. योग्य काळजी न घेतल्याने रुग्णांना फटका बसला आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या प्रत्येकाने आपलं एक दिवसाचं मानधन गरजू गरिबांसाठी दिलं आहे. ही रक्कम 2 लाख 95 हजार होते. चित्रपट महामंडळाकडे त्यांनी ही मदत सुपूर्द केली आहे.
'तुझ्यात जीव रंगला' मालिकेच्या प्रत्येकाने आपलं एक दिवसाचं मानधन गरजू गरिबांसाठी दिलं आहे. ही रक्कम 2 लाख 95 हजार होते. चित्रपट महामंडळाकडे त्यांनी ही मदत सुपूर्द केली आहे.
पिंपरी चिंचवड लगतच्या चाकणमधील अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. 81 दुकानांमधील 181 जणांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात आले आहेत. नानेकरवाडी आणि खराबवाडीत काल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडली तर आज मेदनकरवाडी आणि कराचीवाडी येथील आणखी अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्याचं काम सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका अंडी विक्रेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने चाकणमध्ये वरील चार परिसरात अंडी सप्लाय केली होती. ही बाब प्रशासनाला समजताच खबरदारी म्हणून चार ही परिसरातील अंडी विक्री बंद करण्यात आली. मालक, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अशा सर्वांना होम क्वॉरन्टाईन करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु आहे.
पिंपरी चिंचवड लगतच्या चाकणमधील अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. 81 दुकानांमधील 181 जणांच्या हातावर तसे शिक्केही मारण्यात आले आहेत. नानेकरवाडी आणि खराबवाडीत काल प्रशासनाने ही प्रक्रिया पार पाडली तर आज मेदनकरवाडी आणि कराचीवाडी येथील आणखी अंडी विक्रेत्यांना होम क्वॉरन्टाईन करण्याचं काम सुरु आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका अंडी विक्रेत्यास कोरोनाची लागण झाली आहे. या व्यक्तीने चाकणमध्ये वरील चार परिसरात अंडी सप्लाय केली होती. ही बाब प्रशासनाला समजताच खबरदारी म्हणून चार ही परिसरातील अंडी विक्री बंद करण्यात आली. मालक, कामगार आणि त्यांचे कुटुंबीय अशा सर्वांना होम क्वॉरन्टाईन करण्याची प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरु आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गोंडपीपरी तालुक्यातील उंदिरगाव इथे पोलिसांनी हातभट्टीवर धाड टाकली असता त्यांना आश्चर्यकारक चित्र दिसलं. सोशल डिस्टन्सिंग पाळत इथे दारु गाळण्यात येत होती. पोलिसांनी तस्करांना अटक करुन 62 हजारांची दारु जप्त केली आहे.
मी फिट अँड फाईन आहे. रस्त्यावर उतरुन काम करत आहे, असं ट्वीट करत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आल्याचं सांगितलं. या ट्वीटसोबत त्यांनी चाचणीच्या अहवालाचा फोटोही पोस्ट केला आहे.


लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने मार्गदर्शकतत्वं जारी केली आहेत. 3 मेपर्यंत देशात हवाई, रेल्वे आणि आंतरराज्य प्रवास होणार नाही असे गृहमंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

लॉकडाऊनमुळे संपूर्ण राज्यातील विविध नशा मुक्ती केंद्र, बाल सुधार गृह तसेच महिला सुधार ग्रहांमध्ये अडकून पडलेले तीन हजाराहून अधिक लोक, कोरोनामुळे अडकून पडलेल्या सर्व नागरिकांची मुक्तता करण्याची मागणी, संपूर्ण राज्यात 23 हून अधिक केंद्रांमध्ये अडकलेली आहेत तीन हजारांहून अधिक नागरिक
कोल्हापूर : धान्य वितरणात गोंधळ घालणाऱ्या पाच रेशन दुकानाचे परवाना रद्द,

जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांची कारवाई,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धान्य वाटप करत असताना काही लाभार्थ्यांना धान्य देण्यास नकार देण्याऱ्या रेशन दुकानदारावर कारवाई

कोल्हापूर शहरातील 3 तर ग्रामीण भागातील 2 रेशन दुकानाचे परवाने रद्द
कोरोनाचा हॉटस्पॉट झालेल्या मालेगाव शहरात कर्फ्यू आदेश जारी

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 350 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 2684 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 18 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 11 जण मुंबईत, 4 पुण्यात तर तर अहमदनगर आणि औरंगाबाद मनपा येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे. राज्यात आतापर्यंत 178 जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 46 हजार 588 नमुन्यांपैकी 42 हजार 808 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 2684 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 67 हजार 701 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 5647 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 259 कोरोना बाधित रूग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

आज झालेल्या मृत्यूंपैकी 11 पुरूष तर 7 महिला आहेत. त्यातील 5 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 11 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर दोघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 18 रुग्णांपैकी 13 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग असे आजार होते. तर रुग्णांपैकी एकाला कर्करोग तर एकाला क्षयरोग होता.

महाराष्ट्र एकूण रूग्ण – 2684

मृत्यू - 178

मुंबई महानगरपालिका- 1756 (मृत्यू 112)

ठाणे- 10

ठाणे महानगरपालिका- 96 (मृत्यू 3)

नवी मुंबई मनपा- 63 (मृत्यू 3)

कल्याण डोंबिवली- 50 (मृत्यू 2)

उल्हासनगर- 1

भिवंडी, निजामपूर - 1

मिरा-भाईंदर- 49 (मृत्यू 2)

पालघर- 5 (मृत्यू 1 )

वसई- विरार- 29 (मृत्यू 3)

रायगड- 5

पनवेल- 10 (मृत्यू 1)

नाशिक - 2

नाशिक मनपा- 2

मालेगाव मनपा - 42 (मृत्यू 2)

अहमदनगर- 10 (मृत्यू 1)

अहमदनगर मनपा - 17

धुळे -2 (मृत्यू 1)

जळगाव- 1

जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)

पुणे- 10

पुणे मनपा- 310 (मृत्यू 34)

पिंपरी-चिंचवड मनपा- 31 (मृत्यू 1)

सातारा- 6 (मृत्यू 2)

सोलापूर मनपा- 1 (मृत्यू 1)

कोल्हापूर- 1

कोल्हापूर मनपा- 5

सांगली- 26

सिंधुदुर्ग- 1

रत्नागिरी- 6 (मृत्यू 1)

औरंगाबाद मनपा- 23 (मृत्यू 2)

जालना- 1

हिंगोली- 1

लातूर मनपा-8

उस्मानाबाद-4

बीड - 1

अकोला मनपा - 12

अमरावती मनपा- 6 (मृत्यू 1)

यवतमाळ- 5

बुलढाणा - 17 (मृत्यू 1)

वाशिम - 1

नागपूर- 5

नागपूर मनपा - 39 (मृत्यू 1)

गोंदिया - 1

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 5059 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 18.37 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.