Coronavirus LIVE UPDATE | जगभरात कोरोनाचे मृत्यूतांडव : इटलीत आज 431 नागरिकांचा मृत्यू
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील साडेसातहजाराच्या वर हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
12 Apr 2020 11:20 PM
पिंपरी चिंचवडमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना कोरोनाची लागण झाली. शनिवारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती, त्याच्याच कुटुंबातील या चार महिला आहेत. शहरात आज एकूण पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले . तर एकाचा मृत्यू झाला. शहरात एकूण 35 कोरोनाचे रुग्ण झाले आहेत.
जगभरात कोरोनाचे मृत्यूतांडव : इटलीत आज 431 नागरिकांचा मृत्यू. गेल्या तीन आठवड्यात सर्वात कमी बळी. अमेरिका आणि इंग्लंडचा वेग वाढलेलाच. तर, इंग्लंड 10 हजार पार. अमेरिका 21 हजार पार.
मीरा भाईंदरमध्ये कोरोनाचा संख्येत आज पुन्हा वाढ झाली आहे. आज चार नवे रुग्ण वाढले आहेत. यामध्ये 15 वर्षाची मुलगी तर 19 वर्षाचा मुलगा आहे. यांना कोरोनाची लागण झाली आहे. एकाच कुटुंबातील चारही सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर डॉ. पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एकूण मीरा भाईंदरचा कोरोनाचा आकडा आता 36 वर पोहचला आहे. यामध्ये 2 मृत्यू, तर 2 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 32 रुग्ण रुग्णालयात अजून उपचार घेत आहेत.
पुण्याच्या मार्केटयार्ड मधील भुसार मालाची बाजारपेठ उद्यापासून बंद होणार आहे. भाजीपाला आणि फळांची बाजारपेठे याआधीच बंद करण्यात आलीय. भुसार बाजारपेठ मात्र सुरू होती. मात्र, त्यामुळे मार्केटयार्डमधे गर्दी होत होती. लॉकडाऊनमुळे व्यापारी, वाहतूकदार आणि हमाल यांना पोलिसांकडून त्रास होत असल्याचं व्यापार्यांच म्हणनय. त्यामुळे भुसार मालाची बाजारपेठ बंद ठेवण्यात येणार आहे. काही दिवस भुसार बाजारपेठ बंद ठेवल्याने शहरातील कीराणा मालाच्या पुरवठ्यावर फारसा परिणाम होणार नाही असा व्यापार्यांचा दावा आहे.
राज्यात आज 221 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान, 22 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू, राज्यातील एकूण रुग्ण संख्या 1982 वर
लॉकडाऊन संपल्यानंतर महाविद्यालयीन परिक्षा होणार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची माहिती. परिक्षा कशा स्वरूपात घ्यायच्या, सोशल डिस्टन्स ठेऊन घ्यायच्या, ऑनलाईन घ्यायच्या यावर समितीचं गठन केलं गेलं आहे. येत्या आठवड्यात समितीचा निर्णय येणार आहे. पुढच्या 15 दिवसांसाठी लॉकडाऊन वाढल्यानं विद्यार्थी चिंतेत, सरकार विद्यार्थ्यांच्या सोबत असल्याचं सामंत यांची प्रतिक्रिया.
नवी मुंबई आणि पनवेलमध्ये आज एकाच दिवशी 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, नवी मुंबईकरांची चिंता वाढली
पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा पहिला बळी, 42 वर्षीय इसमाला चार दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. फिट आणि ताप आल्याने तो खाजगी रुग्णालयात दाखल झाला होता. नंतर चार दिवसांपूर्वी त्याला महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं
दोन आठवड्यांच्या आत प्रत्येक जिल्ह्यात टेस्टींग लॅब सुरू होणार. रूग्ण बाहेर जावू नये म्हणून प्रत्येक जिल्ह्यात मोबाईल टेस्टींग लॅब. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात पाच हजार 600 ते 8 हजार पेशंट येतील असा सरकारचा अंदाज. इतर देशांशी तुलना, विविध रेफरन्स वापरून अंदाज. लोकांना सगळे नियम पाळले तर हे आकडे येणार नाही. सध्याच्या रेड झोनच्या जिल्ह्या शिवायचा हा अंदाज आहे. प्रासंगी धर्मशाळा, सरकारी इमारती लॉज ताब्यात घ्या. कमी लक्षणे असलेले पेशंट घरीच ट्रीटमेंट होणार. प्रत्येक जिल्ह्यात 700 बेडची अलगीकरणाची तयारी सूरू आहे. हा अंदाज शास्त्रीय अभ्यासावर आधारीत आहे. मॉडरेट पेशंट खासगी रुग्णालयातून तपासणी होईल असा प्रयत्न करण्याचे प्रयत्न.
कोरोना विरोधात लढणाऱ्या आरोग्य आणि पोलीस कर्मचारी यांच्याप्रमाणेच देशातील बळीराजाला देखील विमा संरक्षण देण्याची मागणी स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.
औरंगाबाद : सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावता फिरणाऱ्यांवर कारवाई, 46 हजार दंड वसूल, मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय यांच्या आदेशानुसार शहरात कारवाई, 92 लोकांना प्रत्येकी 500 रुपय दंड असे एकूण 46,000 रुपयांची दंड वसुली
पुणे महानगरपालिका कर्मचारी व स्वच्छता कर्मचारी यांचा गणवेश घालून दोन तोतया कर्मचाऱ्यांकडून खडकवासला येथे गांजा खरेदी. हवेली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके व खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांनी संशय आल्याने दोघांची झडती घेतली असता ही बाब उघड झाली. गांजाची ने-आण करण्यासाठी या दोघांनी पुणे महानगरपालिकेचा गणवेश शिवून घेतला असल्याचे सांगितले. दोघांवर इ हवेली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांनी सांगितले.
सोलापुरात कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहरातील पाच्छा पेठ परिसरातील एका रुग्णास 10 तारखेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 11 तारखेला या रुग्णाचा मृत्यू झाला. या 56 वर्षीय रुग्णांचे नमुने तपासणीसाठी पाठवले असताना आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास कोरोना असल्याचे अहवालसमोर आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींचे अहवाल घेऊन तपासणी करण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहेत. तर रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसर आता सील करण्यात आलेला आहे. रुग्णाला कोरोनाची लागण कशी झाली त्याच्या संपर्कात कोण कोण आलं आहे याबाबत माहिती घेतली जात आहे.
दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द, सोबत नववी आणि अकरावी परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय; शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
नागरिकांना घरपोच धान्य पुरवठा व्हावा : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
बार्शी-तुळजापूर रस्त्यावरील बावी गावातील निर्मानाधीन कमान कोसळून तिघांचा मृत्यू. महेश डोळज (रा. वैराग), विकास वाळके (रा. माणेगाव) आणि दीपक घोलप (रा. दडशिंगे) अशी मृतांची नावे. लॉकडाऊनच्या काळात खासगी कमानचे काम सुरू असल्याची माहिती. चौकशी करून गुन्हा दाखल करणार असल्याची पोलिसांची माहिती आहे.
विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्यांवर वचक बसलाच पाहिजे : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
पिंपरी-चिंचवडमध्ये कासारवाडी भागात राहणारी आणि पुण्यातील रुबी हॉल या नामवंत हॉस्पीटलमध्ये ‘नर्स इन चार्ज’ म्हणून काम करणारी एक 45 वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. तिच्या संपर्कात आलेल्या 25 नर्सेसला क्वारंटाईन करण्यात आलं आहे. पॉझिटिव्ह आलेली नर्स आठ दिवस सुट्टीवर होती. त्यानंतर ती ज्या दिवशी कामावर परत रुजू झाली त्या दिवशी तिला सर्दी, खोकला होता. प्रिकॉशन म्हणून तिची टेस्ट करण्यात आली आणि ती पॉझीटीव्ह निघाली. हॉस्पिटलमधूल इतर रुग्णांशी तिचा संपर्क आला नसल्याचा दावा रुबी हॉल प्रशासनाकडून करण्यात आला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे, असंही सांगण्यात आलं आहे.
बेळगावच्या कोरोना रुग्णाच्या संख्येत आणखी चारची भर पडली आहे.आरोग्य खात्याच्या रिपोर्ट नुसार हिरेबागेवाडी येथील एक व्यक्ती आणि रायबाग येथील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे.हिरेबागेवाडी येथे आणखी एक रुग्ण वाढल्यामुळे जनतेत भीती निर्माण झाली आहे.यापूर्वी जिल्ह्यातील रुग्णांची संख्या दहा होती आता ही संख्या 14 झाली आहे.
पुणे : पुण्यात आज कोरोनाचा दुसरा बळी, सोमवार पेठेतील 56 वर्षीय महिलेचा कोरोनामुळे मृत्यू, या महिलेला कोरोनाबरोबर मधुमेह आणि हायपर टेन्शनची व्याधी, ससून रुग्णालयात उपचार सुरू होते, 12 वाजेच्या सुमारास मृत्यू, पुण्यात एकूण मृतांचा आकडा 31 वर
नाशिकच्या मालेगावमध्ये आणखी 13 नवीन रुग्ण आढळले, गेल्या 12 तासात 18 रुग्ण, काल रात्री 12 वाजता 5 रुग्णाचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते,
त्यानंतर पुन्हा 13 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत, मालेगावमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू
वर्धा : वर्ध्यात चोरट्यांची अजब शक्कल, उत्पादन शुल्क विभागाच्या गोदामातूनच दारूची चोरी, गोदामाचा पत्रा वाकवून चोरट्यांनी केली दारू लंपास, सुरक्षा रक्षकाला संशयित हालचाली दिसल्यानंतर घटना उघडकीस , चार जणांना अटक ,
एक लाख 30 हजारांचा दारूसाठा जप्त
पुणे : कोरोनाव्हायरसचा आणखी एक बळी, 58 वर्षीय महिलेचा कोरोना आणि इतर व्याधींमुळे ससून रुग्णालयात मृत्यू, महिलेचा निमोनिया आणि किडनीचाही विकार होता
आज मुंबईसह उपनगरात 134 नवे रुग्ण, एकट्या BMC परिसरात 119 कोरोना पॉझिटिव्ह, राज्यातला आकडा 1895 वर
वडाळा संगम नगरमध्ये 15 लोकांना कोरोनाची लागण, वरळी, धारावी नंतर वडाळा झोपडपट्टी भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडण्यास सुरुवात
वसईविरार आणि मिरा भाईंदर शहराचा कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढताच, शनिवारी वसई-विरार क्षेञात पाच तर मीर भाईंदर शहरात दोन नव्या रुग्णांची भर वसई विरारमधील कोरोनाबाधितांची संख्या 35वर तर मिरा भाईंदरमधील रुगणांची संख्या 32वर
कोविड 19ची तपासणी वाढविण्यासाठी राज्य सरकारचं महत्वाचं पाऊल, चाचणीची क्षमता 10 पट वाढवण्यासाठी 'पूल टेस्टिंग'चा केंद्र सरकारकडे प्रस्ताव,
राज्य सरकारने केंद्र आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) कडून पूल तपासणीस परवानगी घेण्यास परवानगी मागितली.
पूल टेस्टिंगमधे एकाच वेळी दहा नमुन्यांची तपासणी होऊ शकते, महाराष्ट्रात पूल टेस्टिंगमुळे तपासणीचा वेग दहा पट वाढेल,
सध्या राज्यात रोज ४ ते ५ हजार तपासण्या करण्यात येतात,
इस्त्राईल आणि यूएसच्या काही भागात पूल टेस्टींगचा वापर करण्यात आला आहे
पंढरपूर येथे 200 नागरिकांना सर्दी खोकला आणि तापाच्या तक्रारी , नगरपालिका सर्वेत आले समोर
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी दोन भाग सील करण्यात आले आहेत. दापोडी आणि कासारवाडी भागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाने ही तातडीची पावलं उचलली आहेत. सुरुवातीला थेरगाव, खराळवाडी, घरकुल, दिघी येथील भाग तर नंतर भोसरी गावठाण, थेरगाव, डांगे चौक ते आदित्य बिर्ला हॉस्पिटल ते काळेवाडी फाटा आणि दिघीतील आणखी एक भाग असा परिसर सील करण्यात आला आहे.
: कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी सांगली महापालिका युद्धपातळीवर प्रयत्न करीत आहेत. तिन्ही शहरे निर्जंतुक कारण्याबाबरोबर आता सांगली महापालिका मुख्यालयात विषाणूचा प्रदुभाव होऊ नये यासाठी सांगली महापालिका कार्यालयात आता स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेट सुरू करण्यात आले आहे. सांगलीत महापालिकेत येणाऱ्यांना आता या सांगली महापालिका कार्यालयात आता स्वयंचलीत सॅनिटायझिंग गेटमधून निर्जंतुक होऊनच प्रवेश दिला जात आहे.. यामध्ये व्यक्ती प्रवेश करताच स्वयंचलीत सॅनिटायझिंग स्प्रे आपोआप सुरू होतो. या स्वयंचलीत सॅनिटायझिंग टनेलमध्ये प्रवेश केल्यावर 12 सेकंद निर्जंतुक औषधांचा फवारा केला जातो आणि त्यानंतर हे स्प्रे आपोआप बंद होतो.
नाशिक : राज्य उत्पादन शुल्क विभागाचे गोडाऊन चोरट्यांनी फोडले, 3 लाख 24 हजार रूपयांची दारू लांबवली, 68 बॉक्स मधून 3284 ड्राय जिनच्या बाटल्यांची चोरी, दोन आरोपी पंचवटी पोलिसांच्या ताब्यात , यातील एक आरोपी नुकताच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जेलमधून पॅरोलवर सुटून आलाय, मंगल शिंदे या 19 वर्षीय आरोपीने जेलमधून बाहेर येताच केली चोरी
वाधवान कुटुंबियांना सध्या पाचगणी येथील सेंड झेविएस येथील क्वॉरंटाईन सेंटरमध्ये ठेवण्यात आहे आहे. या ठिकाणी सध्या पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. सीबीआयने यासंदर्भात सातारा एसपींना पत्र दिले आहे.
लॉकडाऊन वाढवल्यानंतर वरळीतील रहिवाशांनी वाखाणण्याजोगी सतर्कता दाखवली आहे. देशात सर्वाधिक कोरोनाबधितांचं हॉटस्पॉट बनलेल्या वरळी परिसरातील बीडीडी चाळीतले रहिवाशी आता चाळीचे प्रवेशदार सील करत आहेत. तसेच प्रत्येक चाळीच्या प्रवेशद्वारावर हात पाय स्वच्छ करण्यासाठी पाण्याच्या टाक्या, डेटॉल आणि हॅन्ड सॅनिटायझर ठेवले गेलेत.
अवकाळी पाऊसासह चक्री वादळाचा तडाखा तळकोकणाला, तिलारी खोऱ्यात केळीच्या हजारो झाडांसह मांगर जमीनदोस्त, लाखोंचे नुकसान
दादरमध्ये कोरोनाचे अजून दोन रुग्ण, एकूण संख्या 13 वर
मालेगावमध्ये 5 नवे पॉझिटिव्ह रुग्ण
धारावीत कोरोनाचे नवीन 15 रुग्ण, एकूण संख्या 43 वर
नाशिक : शिवसेना नगरसेवक तथा प्रभाग सभापतीनेच केले संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन, अंबड प्रभागातील नगरसेवक दिलीप दातीर मित्रांसमवेत खेळत होते क्रिकेट, पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, या परिसरातील एका महिलेने व्हिडीओ काढत दातीर यांना विचारला होता जाब, व्हिडीओ व्हायरल झाल्यानं पोलिसांनी घेतली दखल
गेवराई - बंद काळात पेट्रोलपंप कर्मचाऱ्यांवर पेट्रोल साठी दबाव टाकणाऱ्या भाजप शहराध्यक्षावर गुन्हा दाखल,
, आपत्ती काळात नियमांचा भंग केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील पाच स्वस्त दुकानदारांचा परवाना निलंबित
नाशिक जिल्ह्यातील 53 संशयितांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 48 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 5 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. धक्कादायक म्हणजे हे पाचही रुग्ण मालेगावचे आहेत, यात 3 महिला असून 2 पुरुष आहेत.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत 20 जणांना कोरोनाची लागण झाली आहे त्यातील 15 रुग्ण हे मालेगावचे असून एकाचा मृत्यूही झाला आहे. मालेगावात कोरोनाचा फैलाव दिवसेंदिवस वेगाने होत असून ही नक्कीच चिंताजनक बाब म्हणावी लागणार आहे.
चंद्रपूर : लॉक डाऊन दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी चंद्रपूर पोलिसांची अनोखी शक्कल... बाहेर फिरणाऱ्या लोकांची आरती ओवाळून, फुल-हार वाहून आणि टाळ्या वाजवून केला सत्कार, कोरोना तुमचं काहीच बिघडवू शकत नाही असं तुम्हाला वाटत असल्यामुळे आम्ही तुमचा हा सत्कार करत आहोत अशा शब्दात वाहिली मंत्रपुष्पांजली
नंदुरबार: शहादा येथील भाजीपाला मार्केट राहणार आजपासून तीन दिवस बंद, होणारी गर्दी टाळण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचा निर्णय
चंद्रपूर : चंद्रपूर शहरालगत मूल मार्गावर अजयपूर येथे अन्नातून विषबाधा, एका घरी तेरवीच्या जेवणाचे गावाला होते निमंत्रण, सकाळी झालेल्या जेवणानंतर सुमारे 40 व्यक्तींना मळमळ- उलट्या, जवळच्या चिचपल्ली येथील प्रा. आ. केंद्रात आणले गेले बाधित लोक, काहींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात केले जात आहे रवाना,
तेरवीचा हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पोलिस पाटील मोरेश्वर शेरकी यांच्यावर संचारबंदीचं उल्लंघन, संसर्गजन्य बिमारी पसरविण्यास मदत करणे या कलम अंतर्गत आज पहाटे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भिवंडी : भिवंडी शहरातील मुख्य बाजारपेठ तीनबत्ती येथील भाजी मार्केट बंद करण्यात आले असताना भंडारी कंपाऊंड इथं भाजीपाला मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा वाजले आहेत. याकडे मनपा प्रशासनाच दुर्लक्ष होत आहे. प्रशासनाने केलेल्या आदेशाला केराच्या टोपली दाखवत भिवंडी शहरातील भंडारी कंपाऊंड येथील रस्त्यावर निघत मोठी गर्दी होते आहे.
पार्श्वभूमी
मुंबई : राज्यात आज कोरोनाच्या 187 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 1761 वर पोहोचली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 17 करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 12 जण मुंबईत, 2 पुण्यात तर प्रत्येकी 1 जण सातारा, धुळे, मालेगाव येथील आहे. राज्यात आतापर्यंत127 जणांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 36 हजार 761 नमुन्यांपैकी 34 हजार 94 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 1761 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 38 हजार 800 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 4964 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 208 कोरोना बाधित रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे.
आज झालेल्या मृत्यूंपैकी ११ पुरूष तर ६ महिला आहेत. त्यातील 6 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 8 रुग्ण हे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर तिघेजण 40 वर्षांखालील आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 17 रुग्णांपैकी 16 रूग्णांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग आहे.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात एकूण 4641 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी 17 लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
महाराष्ट्र एकूण रूग्ण – 1761
मृत्यू - 127
मुंबई महानगरपालिका- 1146 (मृत्यू 76)
ठाणे- 6
ठाणे महानगरपालिका- 29 (मृत्यू 3)
नवी मुंबई मनपा- 36 (मृत्यू 2)
कल्याण डोंबिवली- 35 (2)
उल्हासनगर- 1
मिरा-भाईंदर- 36 (मृत्यू 1)
पालघर- 4 (मृत्यू 1 )
वसई- विरार- 14 (मृत्यू 3)
पनवेल- 7 (मृत्यू 1)
नाशिक - 2
नाशिक मनपा- 1
मालेगाव मनपा - 11 (मृत्यू 2)
अहमदनगर- 10
अहमदनगर मनपा - 16
धुळे -1 (मृत्यू 1)
जळगाव- 1
जळगाव मनपा- 1 (मृत्यू 1)
पुणे- 7
पुणे मनपा- 228 (मृत्यू 27)
पिंपरी-चिंचवड मनपा- 22
सातारा- 6 (मृत्यू 2)
कोल्हापूर- 1
कोल्हापूर मनपा- 5
सांगली- 26
सिंधुदुर्ग- 1
रत्नागिरी- 5 (मृत्यू 1)
औरंगाबाद- 3
औरंगाबाद मनपा- 16 (मृत्यू 1)
जालना- 1
हिंगोली- 1
लातूर मनपा-8
उस्मानाबाद-4
बीड - 1
अकोला मनपा - 12
अमरावती मनपा- 4 (मृत्यू 1)
यवतमाळ- 4
बुलढाणा - 13 (मृत्यू 1)
वाशिम - 1
नागपूर मनपा - 25 (मृत्यू 1)
गोंदिया - 1