Coronavirus LIVE UPDATE | पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त

राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. आज घडीला राज्यात 156 देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Mar 2020 10:34 PM
पालघर जिल्ह्यासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील वसई भागातील एकूण 10 हॉटेल बुक करण्यात आली आहेत. या मध्ये बाहेरील होम कॉरंटाईन आणि इतर संशयितांना राहण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडमधील आणखी पाच रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आज या पाच पॉझिटिव्ह रुग्णांची दुसरी चाचणी निगेटिव्ह आली, असून त्यांना उद्या डिस्चार्ज दिलं जाणार आहे. यातील चार रुग्ण हे संपर्कातील असून पाचवा हा थायलंडहुन आलाय. 14 मार्चला यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झाले होते. याआधी तीन रुग्ण कोरोनामुक्त झालेत त्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातील एकूण 12 पैकी 8 रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत. तर जपान आणि दुबईहून आलेल्या आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली चाचणी निगेटिव्ह आलेली आहे.
इस्लामपूर शहरातील कोरोनाबाधित कुटुंबियांच्या संपर्कात शहरातील 337 नागरिक आल्याची धक्कादायक माहिती सर्वेक्षणातून पुढे आली आहे. त्यामुळे कोरोना विषाणुचा फैलाव रोखण्यासाठी इस्लामपूर शहर उद्या पासून 31 मार्च अखेर लॉकडाउन करण्याचा निर्णय आज नगरपालिका सभागृह झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या कालावधीत फक्त मेडिकल स्टोअर्स एक दिवसाआड सुरू राहणार असून दुध, भाजीपाला, किराणा दुकानही बंद राहणार आहेत. शहरातील बँका, पतसंस्थांनीही लॉकडाऊनमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे. शहरातील साडेतीन किलोमीटर अंतरावर सील करण्यात आला आहे.11 हजार लोकसंख्या बंदिस्त केली आहे. 27 इन्स्टिट्यूट क्वारंटाईन केले आहेत.
पुण्यात आणखी तिघांना कोरोनाची लागण. कोरोना पॉझिटीव्ह ठरलेले हे तीनही रुग्ण काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटीव्ह ठरलेल्या रुग्णाचे नातेवाईक आहेत. पुण्यातील कोथरुडमधील सह्याद्री हॉस्पिटल मधे उपचारासाठी भरती करण्यात आलेल्या 40 वर्षांच्या व्यक्तीला कोरोना झाल्याचं उघड झालं होतं. त्यानंतर त्याच्या कुटुंबियांच्या टेस्ट करण्यात आल्या असता या व्यक्तीचे आई वडील आणि पत्नी कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. या तिघांवर नायडू हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असुन तिघांची प्रकृती स्थिर आहे.
मुंबई विमानतळावर तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलला कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याच्यावर मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरू आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने ही माहिती दिलीय.
राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता यांना तीन महिन्यांची मुदतवाढ
जीवनावश्यक वस्तुंची साठेबाजी करणाऱ्यांविरोधात पुरवठा विभागाची धडक मोहीम; विशेष तपासणी पथकाचे नाशिक जिल्ह्यातील 37 दुकानावर छापे, 2 दुकाने केली सील; किराणा दुकानदार, होलसेल आणि रिटेल दुकानदार यांनी साठेबाजी किंवा जादा किमतीस वस्तुची विक्री केल्यास त्यांच्याविरुध्द कठोर कारवाई केली जाईल, जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचा इशारा

'कोरोना' प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मजूर, कामगार यांनी कामाचे ठिकाण सोडून जाऊ नये, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
या मजुरांच्या आरोग्याची काळजी, जेवणाची व राहण्याची व्यवस्था करण्यासाठी शासन सक्षम आहे, असे त्यांनी सांगितले.

कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या खासदार निधीतून दिला दीड कोटीचा निधी . कोल्हापूर आणि सांगली परिसरातील कोरोना रुग्णांना पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर अत्याधुनिक उपचार सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांचा पुढाकार
महाराष्ट्रातला अनेक साखर कारखान्यांबाबतचा हँड सॅनिटायझर बनवण्याची परवानगी मिळाली. एक मोठा प्रश्न सहजपणे मार्गी लागला.
मुंबई : सैफी रुग्णालयातील सर्जन जो कोरोना बाधित आढळला. त्याने त्याआधी रुग्णालयात रुग्णांवर उपचार केले होते. याची गंभीर दखल पालिकेने घेतली असून ज्या रुग्णांवर सर्जनने उपचार केले अशा रुग्णांना निरिक्षणाखाली ठेवण्याचे आदेश दिलेत.
राज्यात कोरोना बाधितांचा आकडा 167; आजच्या दिवसात मुंबईत आतापर्यंत 12 जणांची नोंद; एक नागपूर, 3 पुरुष आणि चार महिला मुंबई. मुंबईतील संख्या 7 ने वाढली
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या पहाटेपासून सुरू होणार. उद्या पहाटे साडे चार वाजता भाजीपाला घेऊन ट्रक बाजार समितीत येणार. त्यानंतर आडते, हमाल आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्याकडचा परवाना पाहून आतमधे सोडलं जाणार. उद्या फक्त भाजीपाल्याची विक्री होणार. फळे आणि कांदे-बटाटे परवा विक्रीसाठी बाजार समितीत येणार
पुणे : कृषी उत्पन्न बाजार समिती उद्या पहाटेपासून सुरू होणार. उद्या पहाटे साडे चार वाजता भाजीपाला घेऊन ट्रक बाजार समितीत येणार. त्यानंतर आडते, हमाल आणि घाऊक विक्रेत्यांना त्यांच्याकडचा परवाना पाहून आतमधे सोडलं जाणार. उद्या फक्त भाजीपाल्याची विक्री होणार. फळे आणि कांदे-बटाटे परवा विक्रीसाठी बाजार समितीत येणार
केंद्र सरकरने लॉकडाऊन घोषित केल्यावर मुंबईतील रस्त्यावरील बेघर, हातावर पोट असणारे यांचे हाल झाले आहेत. काम नसल्यामुळे पैसे मिळत नाही आणि जेवणही मिळत नाही. समाजातील विविध स्तरातून अशा गरजूंना मदत देण्यात आहेत. मुलुंडमध्ये कारपुल ग्रुपने या सगळ्यांना मदत करण्यासाठी 80 हजार रुपये जमवले.आणि गेल्या चार दिवसात 400 अन्नाची पाकिटं मुलुंडमध्ये वाटण्यात आली. कारपुल ग्रुपमधील लोकही जेवणाची पाकिटं तयार करुन गरजू लोकांपर्यंत पोहोचवत आहेत.
कोरोनामुळे सुरू असलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर ज्युनिअर वकिलांवर उपासमारीची वेळ
,
पुढील तीन महिन्यांसाठी दरमहा किमान 5 हजार रूपयांचा भत्ता आर्थिक सहाय्यता निधीतून उपलब्ध करून द्या,

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाकडून राज्य सरकारला साकडं
आमदार निधीतून 50 लाख रुपये खर्च करण्याची परवानगी, राज्य सरकारने सर्व आमदारांना कोरोनासाठी निधी खर्च करायला परवानगी दिली, सॅनिटायजर, मास्क खरेदी आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी निधीचा होणार वापर, भाजप आमदार देवयानी फरांदे यांची माहिती
नागपुरात दोन कोरोना पॉझिटिव्ह, नागपुरात एकूण रुग्णसंख्या 11 वर, जो दिल्लीहून आलेला खामला परिसरातील रुग्ण होता, त्याच्याबरोबर असलेला जरीपटका भागातील मित्र आणि त्याच्या दुकानातील नोकराची मुलगी बाधित
नागपुरात दोन कोरोना पॉझिटिव्ह, नागपुरात एकूण रुग्णसंख्या 11 वर, जो दिल्लीहून आलेला खामला परिसरातील रुग्ण होता, त्याच्याबरोबर असलेला जरीपटका भागातील मित्र आणि त्याच्या दुकानातील नोकराची मुलगी बाधित
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आणि अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ या शिक्षकांच्या संघटनांनी आपले एक दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे जाहीर केले आहे. याबाबतचे पत्र देखील दोन्ही संघटनेच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात आले आहे. राज्यात संघटनेचे जवळपास 2 लाख सदस्य आहेत. सध्याच्या परिस्थितीचे भान राखत समितीच्या वतीने एक दिवसांचे शिक्षकांचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती प्राथमिक शिक्षक समितीचे अध्यक्ष उदय शिंदे यांनी दिली आहे.
महाराष्ट्र सीमा गुजरातने सील केल्याने तणाव; हजारो कामगार अडकले
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 159 वर, आज मुंबईत पाच तर नागपूरमध्ये एक पॉझिटिव्ह

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देश लॉकडाऊन आहे. सर्वच प्रवासी साधने बंद असल्याने लोकांनी पायी घरी जाण्यास सुरुवात केली आहे. अशाच पायी घरी जाणाऱ्या 7 प्रवाशांचा मुंबई अहमदाबाद महामार्गावर विरार हद्दीत भीषण अपघात झाला आहे. यात 4 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व प्रवाशी सध्या देशात संचार बंदी सुरू असल्याने आपल्या घरी गुजरातच्या दिशेने जात असताना गुजरातकडील हद्द बंद असल्याने त्यांना परत पाठवण्यात आले होते. परत वसईच्या दिशेने येत असताना महामार्गावरील विरार हद्दीत भारोल परिसरात एका भरधाव वेगाने येणाऱ्या टेम्पोने यांना जोरदार धडक दिली आहे. या अपघातातील 2 जणांची ओळख पटली असून 5 जणांची मात्र ओळख पटली नाही.
कोरोना आपत्तीसाठी मदत म्हणून महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी मुख्यमंत्री निधीत एक दिवसाचा पगार देणार आहेत. राज्यातील जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी, पंचायत समितीतील आरोग्य कर्मचारी आणि इतर कर्मचरी असे एकूण सात लाखांच्या आसपास कर्मचारी 1 दिवसाचा पगार देणार आहे. त्यांच्या पगारातून सुमारे 100 कोटींच्य वर रक्कम जमा होणार आहे. कोरोनाला रोखण्यासाठी उभारल्या जाणाऱ्या रुग्णालयात अत्यावश्यक सामग्रीसाठी हा पैसा खर्च करण्याची विनंती महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी समन्वय समिती करणार मुख्यमंत्र्यांना करणार आहे.
कोरोनाव्हायरसच्या धास्तीने वृद्ध महिलेची आत्महत्या, तीन दिवसांपूर्वी शिये पुलावरून पंचगंगा नदीत घेतली होती उडी, गुरुवारी सायंकाळी सापडला मृतदेह, मालुताई आवळे असे या वृद्ध व्यक्तीचे नाव, वृद्ध माणसांना जास्त धोका असल्याच्या चिंतेने आत्महत्या केल्याची नातेवाईकांची माहिती
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी 5 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची पहिली टेस्ट निगेटिव्ह आलेली आहे. काल कोरोनामुक्त तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.. त्यापैकी एका रुग्णाच्या घरातील चार बाधितांची टेस्ट आज निगेटिव्ह आली. तर थायलंडहून आलेल्या एका तरुणाची देखील टेस्ट निगेटिव्ह आली. या 5 रुग्णांना 14 मार्चला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. आज या रुग्णांचे दुसरे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार आहेत.

पार्श्वभूमी

मुंबई : आज मुंबईतील एका खासगी रुग्णालयात एका 85 वर्षीय डॉक्टरांचा संशयित कोरोना आजाराने मृत्यू झाला. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यांचे निदान खासगी प्रयोगशाळेत झालेले असल्याने त्याबाबत खातरजमा करण्यात येत आहे. शहरातील हिंदुजा रुग्णलयात त्यांच्यावर उपचार सुरू होती. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे. यात मुंबईत सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.


आज मुंबईत एका 85 वर्षीय डॉक्टरचा संशयित कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, त्यांच्या कोरोनाचे निदान खासगी प्रयोगशाळेत झाल्याने त्यासंदर्भात अद्याप अधिकॉत माहिती मिळालेली नाही. त्यांचे दोन नातेवाईक नुकतेच इंग्लंडहून परतलेले आहेत. त्यामुळे त्यांना कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता आहे. मात्र, या रुग्णाला मधुमेह होता. तसेच त्यांना पेसमेकरही होता. त्यामुळे नक्की मृत्यू कशामुळे झाला याची पुष्टी झालेली नाही.


अनाधिकृत मार्गाचा वापर करून प्रवास करू नका : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. आज दिवसभरात एकाच दिवसात 12 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली आहे. आज कोल्हापुरात दोन नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले. राज्यात कोरोनाग्रस्तांची सर्वाधिक संख्या पश्चिम महाराष्ट्रात आहे. यात मुंबईतील लोकसंख्या दोन कोटींच्या घरात आहे. त्यामुळे मुंबईत कम्युनिटी ट्रान्समिशन जर चुकून झालं तर खूप गंभीर परिस्थिती निर्माण होईल. आज मुंबईत सर्वाधिक 51 कोरोना रुग्णांची संख्या आहे. दरम्यान, देशातही हा आकडा वेगाने वाढताना दिसत आहे. आज घडीला देशात 863 जण कोरोनाचे पॉझिटिव्ह आहेत. तर, आतापर्यंत 17 जणांचा यात बळी गेलाय. दिलायसादायक बाब म्हणजे यातील 73 जण पूर्णपणे बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. महाराष्ट्रातही मुंबई, पुणे, औरंगाबाद शहरातील कोरोनाचे रुग्ण पूर्णपणे ठणठणीत झाले आहे.


केरळमध्ये होम कॉरंटाईन असलेल्या IAS अधिकाऱ्याचे पलायन केल्याने निलंबन


अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका
जीवनावश्यक वस्तू मिळाव्यात म्हणून सरकारनं धाडसी निर्णय घेतला आहे. आता जीवनावश्यक वस्तुंची दुकानं 24 तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, काही गोष्टी बघून मला धक्काच बसला. लोक जिथे अडकले आहेत. त्यांची व्यवस्था केली जात आहे. मात्र, काही जण ट्रक आणि टँकरमधून प्रवास करत आहे. गावी जाण्यासाठी जीव धोक्यात घालून अनधिकृत मार्गाने प्रवास करू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.


Coronavirus Update | सांगलीत सौदी अरेबियातून परतलेल्या चार जणांमुळे इतरांना लागण



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.