coronavirus LIVE UPDATES |सीबीआय पथकाचा पाठलाग चुकवण्यासाठी वाधवान पळाले?

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील पाच हजाराच्या वर आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 09 Apr 2020 11:01 PM
वाधवान कुटुंबातील 23 लोकांना
खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्याची
परवानगी कशी मिळाली याची
चौकशी करणार
असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख ट्विट करून दिली आहे.
Live Update | वाधवानप्रकरणी नवा ट्विस्ट समोर येत आहे. सीबीआयच्या समन्समुळे वाधवान ब्रदर्स महाबळेश्वरला पळाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

वाधवान कुटुंबियांना महाबळेश्वरात जाण्यासाठी थेट गृहखात्याच्या विशेष सचिवांनी पत्र दिल्याचं समोर आलं. ज्यामध्ये या कुटुंबातल्या 23 जणांना प्रवासादरम्यान कुठेही अडवू नका अशा स्पष्ट सूचना होत्या. एबीपी माझाच्या हाती लागलेल्या या पत्रामध्ये गृह खात्याचे विशेष सचिव अमिताभ गुप्ता यांचं नाव आहे. त्यांच्याच लेटर हेडवरुन हे पत्र जारी करण्यात आलंय. शिवाय या पत्रावर त्यांची सही देखील आहे.

एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला, फळ आणि कांदा बटाटा मार्केट येत्या शनिवार (11 एप्रिल) पासून बंद करण्याचा निर्णय एपीएमसी प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.

व्यापारी आणि माथाडी कामगारांना शनिवार(11 एप्रिल) पासून मार्केट बंद करण्याचे एपीएमसी प्रशासनाने आदेश दिले आहेत. कोरोना व्हायरस संसर्ग पसरू नये यासाठी एपीएमसी प्रशासनाचा निर्णय
घेण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पुढील आदेश येईपर्यंत एपीएमसी मार्केट बंद ठेवणार आहे.
नवी मुंबई : एपीएमसी मार्केटमधील भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा मार्केट येत्या शनिवारपासून बंद, गर्दी टाळण्यासाठी एपीएमसी प्रशासनाकडून निर्णय, व्यापारी आणि माथाडी कामगारांना शनिवारपासून मार्केट बंद करण्याचे एपीएमसी प्रशासनाचे आदेश
देशात आतापर्यंत 169 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू, आरोग्य मंत्रालयाच्या 10 पथकांना 9 राज्यांमध्ये पाठवलं, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती
मुंबईतील उच्चभ्रूंच्या सात गाड्या महाबळेश्वरात. सात गाड्यांसह 23 जण मुंबईतून महाबळेश्वरमध्ये एका बंगल्यात. मंत्रालयातील खास पत्रातून हे सर्वजन महाबळेश्वरात. महाबळेश्वर प्रशासकीय यंत्रणेकडून तपासणी. सर्व 23 जणांना पाचगणीतील रुग्णालयात भरती केलं आहे. सर्वांवर 188 प्रमाणे गुन्हे दाखल केले जाणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुखांनी दिलीय.
काळसेकर हॅास्पीटलमधील पीआर एक्स्युकेटिव्हच्या क्लोज संपर्कात असलेल्या पाच जणांची कोरोना चाचणी पॅाझिटिव्ह. मुंब्रा इथे आणखीन 5 जण कोरोना पोजिटिव्ह. आधीच 3 जण पोजिटिव्ह होते, त्यात एकाचा मृत्यू झालाय. यापेक्षा भयानक म्हणजे एका 6 वर्ष्याच्या मुलीला कोरोनाची लागण. कळवा इथेच ही मुलगी राहते. तिच्या घरातल्या लोकांना देखील केले क्वॉरंटाईन. त्यामुळे ठाण्यात एकूण 31 कोरोनाबाधित.


वाधवान कुटुंबातील 23 लोकांना
खंडाळा ते महाबळेश्वरला जाण्याची
परवानगी कशी मिळाली याची
चौकशी करणार
असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख ट्विट करून दिली आहे.
अहमदनगर मध्ये आज सायंकाळी 6 वाजल्यापासून सकाळी 6 पर्यंत अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. अहमदनगर चे जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी हा निर्णय घेतलाय. शब्बे ए बारात च्या पार्श्वभूमीवर आणि कोरोनाचा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतलाय.
पुण्यात आणखीन एका रुग्णाचा मृत्यू; आजच्या दिवसातील तिसऱ्या बळी. पुण्यात आजपर्यंत 21 जणांचा मृत्यू.

बेळगाव जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या दहा झाली. निजामुद्दीन तबलक धर्मसभेला जावून आलेल्या व्यक्तीमुळे त्याच्या परिवारातील आई, वडील आणि भावाला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे प्रशासन आणि आरोग्य विभागाची धास्ती वाढली आहे.

नवी मुंबईत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून नेरूळ येथे एक कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला आहे .

शहरातील कोरोना पॉझिटीव्ह संख्या पोचली 31 वर गेली आहे.
धारावीत कोरोनामुळे तिसरा बळी; सत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला, लोकांनी सोशल डिस्टन्स पाळलं नाही तर सैन्यात दाखल करावं लागेल असा इशारा सरकारने दिला होता. कोरोनाच्या संकटात सोशल डिस्टन्ससाठी सैन्याची मदत घ्यावी लागेल का नाही हे आत्ताच सांगता येत नाही. मात्र औरंगाबादेत. सर्वसामान्य लोकांच्या मदतीला सैन्य धावून आले आहे. सैन्यदलाच्या वतीने गरजू लोकांची एक वेळची भूक भागावी म्हणून जेवणाचे पॅकेट देण्यात येत आहेत. एका सेवाभावी संस्थेच्या वतीने ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत लवकरच धान्यांच्या किट देखील सैन्य यांच्यावतीने गरजू लोकांना देण्यात येणार आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव राज्यपाल नियुक्त आमदार पदासाठी सुचवण्यात आलं आहे. कॅबिनेटमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्यपालांकडून नियुक्त केल्या जाणाऱ्या दोन जागा आहेत, त्यातील रिक्त असलेल्या एका जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये पोलिसांना मारहाण, बाहेर फिरणाऱ्याला विचारणा केल्यानंतर पोलिसांचीच काठी घेऊन केली मारहाण, औरंगाबाद येथे अण्णाभाऊ साठे चौकातील प्रकार
कांदिवली डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयांत करोना विलगीकरण कक्षाची दुरावस्था.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागलेल्या संचारबंदी दरम्यान विनाकारण फिरणाऱ्या 20 लोकांवर वणी पोलिसांनी कारवाई केली होती .
या कारवाईमध्ये 20 लोकांना वणी प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी यांनी 2000 रु दंड आणि दंड न भरल्यास 10 दिवस कारावासाची शिक्षा सुनावली आहे. महाराष्ट्रातील ही पहिली मोठी कारवाई असून एका वेळी 20 लोकांना दंडची शिक्षा सुनावली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील येरमाळा येथील राज्यात प्रसिद्ध आराध्य दैवत म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री येडेश्वरी देवीची पिढ्यानपिढ्या चालत आलेली चैत्र पौर्णिमा यात्रा यंदा कोरोना विषाणूंच्या संवसर्गामुळे रद्द झाली आहे.बुधवारी चैत्र पौर्णिमा यात्रा रद्द झाल्याने यात्रेनिमित्त होणारे पुजा, महाआरती आदी धार्मिक विधी येथील पुजारी मंडळींनीच केले.१८ मार्च रोजी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले होते.शासनाच्या सामाजिक विलगीकरणाच्या नियमानुसार मोजक्याच मानकरी,पुजाऱ्यांच्या उपस्थित देवीचे धार्मिक विधी करण्यात आले.
राज्यपाल नियुक्त दोन जागांपैकी एका जागेवर उद्धव ठाकरे यांच्या नावाची शिफारस, आजची कॅबिनेट बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित
नवी मुंबई : एपीएमसी मधील कांदा बटाटा मार्केट सोमवारपासून बंद होणार, कांदा बटाटा व्यापारी वर्गाचा निर्णय,
पुढील तीन दिवस मुंबई, उपनगरात माल पोचविल्यानंतर सोमवारपासून लाॅकडाऊन राहील तोपर्यंत मार्केट बंद राहणार

मुंबई महापालिका ई-वॉर्डच्या सहाय्यक आयुक्त अलका ससाणे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी मृदुला अंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अलका ससाणे यांच्या भागातील वोकहार्ट रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तिथल्या 53 कर्मचाऱ्यांना (33 नर्स आणि 20 इतर कर्मचारी) कोरोनाची लागण झाली. सहाय्यक आयुक्तांनी वेळीच कन्टेन्मेंट झोन केला नाही यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात आढळले 162 रुग्ण आढळले असून एकट्या मुंबईतच तब्बल 143 रुग्ण वाढले आहेत.
पुणे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या २० वर गेली असून त्यातील एक बारामती तर उरलेले पुणे महापालिका हद्दीतील मृत्यू आहेत. तर शहरात १६८, पिंपरी चिंचवड २२, ग्रामीण १४ अशी एकूण २०४ रुग्ण संख्या नोंदवली गेली आहे.-
बारामतीत कोरोनाचा पाहिला बळी गेला आहे.
बारामतीतील भाजीविक्रेत्या कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. त्याचा
आज पहाटे झाला मृत्यू झाला आहे.
संबधित व्यक्तिस अर्धांगवायूचा त्रास होता,
संबंधित व्यक्तीच्या कुटुंबातील मुलगा, सून आणि दोन नातींनाही कोरोनाची लागण झाली आहे.
सोशल मिडीयात कोरोनाबाबत चूकीची माहिती देणे, अफवा पसरवणे यासोबतच वादग्रस्त पोस्ट केल्या प्रकरणी नाशिक शहरात आत्तापर्यंत 3 तर नाशिक ग्रामीणमध्ये 10 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, एकूण 15 जणांना अटक करण्यात आली आहे.
बारामती : बारामतीत कोरोनाचा पाहिला बळी, बारामतीतील भाजीविक्रेत्या कोरोना बाधिताचा मृत्यू, संबंधित व्यक्तीस अर्धांगवायूचा होता त्रास, त्यांच्याच कुटुंबातील मुलगा, सुन व दोन नातींना देखील झालीय कोरोनाची लागण
भाटिया हॉस्पिटल पालिकेने तात्पुरत बंद केलं. या रुग्णालयात तीन रुग्ण इतर उपचारासाठी दाखल झाले ,पण ते कोरोना पॉझिटिव्ह आले आहे. रुग्णालयात कोरोनाची उपचाराची सुविधा नाही. तीन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रुग्णांच्या संपर्कात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या तपासणीचे आदेश देण्यात आले आहेत.
रुग्णालयात कोरोनाची उपचाराची सुविधा नाही ,
राज्यातील येरवडा, आर्थर रोड, भायखळा, कल्याण आणि ठाणे कारागृहात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या कारागृहातील कर्मचाऱ्यांना कोणत्याही कारणास्तव कारागृहाच्या बाहेर न येण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कैदी आणि कर्मचार्यांसाठी आवश्यक असलेल्या वस्तुंचा आधीच कारागृहात साठा करून ठेवण्यात आल्याचा कारागृह प्रशासनाने दावा केला आहे.
पुण्यात आणखीन दोन रुग्णांचा मृत्यू
कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आणखी एकजण कोरोना पॉझिटिव्ह

आढळला आहे. शाहूवाडी तालुक्यातील
कूचत येथील्या 34 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

संबंधित तरुण दिल्लीमधील तब्लिगी जमातीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिला होता,

कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे तीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता मास्क घालणं सक्तीचं केल्यानंतर बहुसंख्य नागरिक मास्क घालून बाहेर पडताना दिसत आहेत. सध्या दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा मुंबईत आकडा वाढत चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी नागरिकांना अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडतेवेळी मास्क घालणं सक्तीचं केलं आहे. जर सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालता कोणी आढळल्यास त्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे देखील आदेश दिले आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असताना सावंतवाडी शहरात विनाकारण फिरणाऱ्या दुकाची स्वरांना पोलीसांनी उठाबश्या काढायला लावल्या. वारंवार आवाहन करून सुध्दा लॉकडाऊनच्या काळात शहरात बिनदिक्कत दुचाकी घेवून फिरणार्‍या तरुणांच्या विरोधात सावंतवाडी पोलिसांनी काल रात्री अशा प्रकारे फिरणार्‍या युवकांना पकडुन त्यांनी उठाबश्या काढण्यास लावल्या.
मुंबईत लवकरच रॅपिड टेस्टिंग होणार आहे. रॅपिड टेस्टसाठी केंद्र सरकारने अखेरीस परवानगी दिल्याने मुंबई महापालिका दक्षिण कोरियामधून एक लाख किट्स विकत घेणार आहे. ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंगला मुंबईत सुरुवात होईल. रॅपिड टेस्टमुळे एखाद्याला इन्फेक्शन झालं आहे का याची माहिती मिळते. इन्फेक्शन झालं असल्यास त्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाऊ शकते.
मुंबईतील वरळी हा सर्वात मोठा हॉटस्पॉट असताना सुद्धा सकळी वरळी नाक्यावर लोकांची सामान भाजीपाला खरेदीसाठी झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं.

लोक एकत्र येऊन सकळी सामान खरेदी करत आहेत. एकीकडे कंटेन्मेंट झोन असलेल्या आणि 100 पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या भागात लोक मात्र रोजच्या सारखे रस्त्यावर गर्दी करताना पाहायला मिळाले.

भीती असली तरी पोटाचा काय करायचं? प्रशासन घरपोच काहीच पोहचवत नसल्याने बाहेर यावच लागणार, अशा लोकांच्या प्रतिक्रिया आहेत.
मुंबईतील केईएम रुग्णालयातील एका 47 वर्षीय डॉक्टरला कोरोनाची लागण झाली आहे. हा डॉक्टर वरळीतील रहिवासी आहे.
नंदुरबार शहरात संचार बंदीच्या काळात मोठ्या प्रमाणात नागरिक मॉर्निंग वॉकला बाहेर पडत असल्याचे चित्र होते .शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संजय नंदवलकर गेल्या तीन दिवसापासून नागरिकांना घराबाहेर पडू नका असे आवाहन करत आहेत. नागरिकांना बाहेर पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने आज शहर पोलिसांनी तीन वेगवेगळी पथक तयार करून सकाळी मॉर्निंग वॉकला फिरणार्‍या पन्नास जणांना ताब्यात घेतले आहे. यात शहरातील उच्च शिक्षित नागरिकांचा समावेश आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व नागरिकांना पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या मैदानात ठेवण्यात आले असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. संचार बंदीच्या काळात संचार बंदीचे उल्लंघन करणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नसल्याचा इशारा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी यावेळी दिला.
बीड जिल्ह्यामध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अडीच तासाचा अवधी ठेवण्यात आला आहे. मात्र या दरम्यान खरेदीसाठी जाणाऱ्या लोकांनी आपले वाहन घेऊन रस्त्यावर यायचे नाही, असे आदेश प्रशासनाने दिल्यानंतर सुद्धा आज लोक गाड्या घेऊन रस्त्यावर आले. बीड शहरातील सुभाष रोड या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर असं दृश्य पाहायला मिळालं. खरेदीसाठी लोक पुन्हा गाड्या घेऊन रस्त्यावर आले, अशा सगळ्यांच्या गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत. विशेष म्हणजे बीड शहरातील वेगवेगळ्या भागांमध्ये जवळपास 200 मोटरसायकली पोलिसांनी जप्त केल्या आहेत. काल रात्रीच या सूचनांचं लोकांनी पालन करावं म्हणून बीड शहरामध्ये पोलिसांनी रूट मार्च केला होता. मात्र लोक या सूचना पाळायला तयार नाहीत असेच दृश्य आज बीडमध्ये पाहायला मिळालं.
मुंबईत रॅपिड टेस्टिंग होणार, मुंबई महापालिकेने कंबर कसली, रॅपिड टेस्टसाठी अखेरीस केंद्र सरकारची परवानगी, मुंबई महापालिका साऊथ कोरिया मधून 1 लाख किट्स विकत घेणार
ते किट्स आले की रॅपिड टेस्टिंग मुंबईत सुरू होणार,

रॅपिड टेस्टमुळे एखाद्या व्यक्तीच्या शरीरात इन्फेक्शन झालं आहे का याची माहिती मिळते
लातूरच्या विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय विज्ञान संस्थेत उपचार घेत असलेल्या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची फेरतपासणी करण्यात आली. त्यातील तीन जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्याचबरोबर या आठ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 25 जणांचे अहवालही निगेटिव्ह आले आहेत. उर्वरीत पाच जणांचे रिपोर्टही लवकरच निगेटिव्ह येतील आणि लातूरचा कोरोना रुग्णांचा आकडा शून्यावर येईल, असा आशावाद वैद्यकीय उपचार करणाऱ्या पथकाने व्यक्त केला आहे.
संचारबंदीचं उल्लंघन करुन मॉर्निंग वॉकला गेलेल्या 50 जणांना नंदुरबार शहर पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये उच्चशिक्षित नागरिकांचा समावेश आहे.
कोरोना व्हायरससंदर्भात व्हॉट्सअॅप ग्रुपवर वादग्रस्त पोस्ट टाकणं तरुणाला महागात पडलं आहे. एका 32 वर्षीय तरुणाविरोधात नाशिकच्या सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणाने 'सर्व पक्षीय मित्र सातपूर' या ग्रुपवर दोन धर्मांमध्ये तेढ निर्माण होणारा मेसेज पोस्ट केला होता. दरम्यान ग्रुप अॅडमीनवरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यांवर सायबर पोलिसांची करडी नजर आहे.
यवतमाळ येथील पॉझिटिव्ह नागरिकाचे वास्तव्य असलेला शहरातील गुलमोहर पार्क आणि मोमीनपुरा भाग प्रशासनाने पूर्णपणे शटडाऊन केला आहे. येथील सर्व दुकाने, संपूर्ण परिसर पूर्णपणे बंद करण्यात आला असून त्यासाठी पोलिस विभागाला पुढील आदेश होईपर्यंत 500 होमगार्डची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
पालघर :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजपासून पालघर जिल्ह्यात प्रशासनाकडून कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. आजपासून जिल्ह्यातील सर्व पेट्रोल पंपांवर फक्त अत्यावश्यक वाहनांनाच पेट्रोल डिझल मिळणार आहे,,तर जिल्ह्यातील सर्वच शहरात अनावश्यक फिरणाऱ्या वाहनांवर कारवाई करून जप्त करण्यात येणार आहेत.

औरंगाबादमध्ये कोरोनासह 'सारी'चे संकट, अकरा दिवसात सारीने दहा जणांचे बळी, कोरोनाबाधितांची संख्या औरंगाबादेत चिंतेचा विषय ठरत असतानाच सारीचे (सिव्हीअरली अ‍ॅक्युट रेस्पिरेटरी इलनेस) संकट, शहरातील सारीच्या 23 रूग्णांवर घाटीरुग्णालयामध्ये उपचार सुरू, सारीच्या रूग्णांमध्ये कोरोनासारखीच लक्षणे,
रूग्णाला सर्दी, ताप, खोकला येतो. त्याला श्वास घ्यायला त्रास होतो.हे एक प्रकारचे इन्फेक्शन असते. ते विषाणूंमुळे किंवा साथीमुळे अशा दोन्ही प्रकारचे असू शकते. तर कोरोनाचे इन्फेक्शन हे केवळ साथीच्या स्वरूपाचे आहे. त्यामुळे सारीचा रूग्ण हा कोरोनाही असू शकतो.ही शक्यता विचारात घेऊन सारीच्या सर्व रूग्णांचे स्वॅब तपासण्यात येत आहे.
अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

निधन झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील 24 जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांना पॉझिटिव्ह रूग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत.

कोविड रूग्णालयात काल सोमवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या नागरिकाचा अहवाल प्रलंबित आहे.
बुलडाण्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. जिल्ह्यात आज पुन्हा तीन नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे बुलडाण्यात कोरोनाबाधितांची संख्या आता 15 वर पोहोचली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आजचे पॉझिटिव्ह रुग्ण हे दिल्लीच्या निजामुद्दीन मरकज इथून परतलेल्या लोकांच्या संपर्कातील आहेत.
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग आता वेगाने होताना दिसत आहे. मंगळवारी राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हजारच्या पार गेला. तर, आज तब्बल एकाच दिवसात 117 नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. परिणामी राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 1135 झाला आहे. कोरोनामुक्त झाल्याने 120 जणांना आज घरी सोडण्यात आले. दरम्यान, पुण्यात आज पुण्यात तीन जणांचा मृत्यू झाला. मागील मागील 24 तासात शहरात आठ जणांचा बळी कोरोनामुळे गेला आहे. पुण्यात एकूण मृतांचा आकडा 16 वर गेला आहे. अद्याप राज्यात तिसऱ्या स्टेजचा संसर्ग सुरु झाली नसल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

राज्यात कोरोनाचा विषाणू वेगाने पसरत आहे. मागील आठवड्यात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या वाढली आहे. यात मुंबईत कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या वर केलीय. त्याखालोखाल पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत. मुंबई आणि पुणे शहरात काही ठिकाणं हॉटस्पॉट म्हणून घोषीत करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील असलेले भाग आता सील करण्यास सुरुवात केली आहे. ज्या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. अशी ठिकाणं आता प्रशासनाकडून सील करण्यात येत आहे.

अजित डोवाल यांना भेटल्यावर मर्कजचे मौलाना कुठे पळाले, गृहमंत्री अनिल देशमुखांचा केंद्राला सवाल

राज्यात तिसरी स्टेज नाही
राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची तिसरी स्टेज राज्यात सुरु झाल्याची शंका व्यक्त केली जात आहे. राज्यात जरी वेगाने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी ही तिसरी स्टेज नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. पहिल्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह असतात. तर, दुसऱ्या स्टेजमध्ये बाहेरुन आलेल्या लोकांमुळे स्थानिकांना याची लागण होण्यास सुरुवात होते. तर, तिसऱ्या स्टेजमध्ये कोरोनाची लागण कम्युनिटीमध्ये पसरते, असे ह्या संसर्गाचे प्रकार समजले जातात.

वडिलांच्या अंत्यविधीसाठी पुण्यातील याचिकाकर्त्याला आसामपर्यंत जाण्याची हायकोर्टाकडून परवानगी

सोशल डिस्टन्स पाळा
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वेगाने वाढू नये म्हणून प्रशासनाकडून वारंवार सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितलं जात आहे. मात्र, तरीही लोक विनाकारण रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. भाजी मंडई असेल किंवा अन्य ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळण्यास सांगितले जात आहे. मात्र, काही लोक अद्यापही याचे अनुकरण करताना दिसत नाही. त्यामुळे परिणामी आम्हाला कठोर व्हावं लागेल, असं सरकारकडून सांगण्यात येत आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन सरकारकडून करण्यात आलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.