Corona LIVE UPDATE | शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना क्वॉरंटाईन करण्याची मागणी

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील तीन हजाराच्या वर आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 04 Apr 2020 09:13 PM
सोलापूर : विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांवर सोलापूर पोलिसांची रात्री देखील कारवाई, एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 200 पेक्षा अधिक वाहनांवर कारवाई, फौजदार चावडी पोलीस स्थानकाच्या हद्दीत 60 पेक्षा जास्त वाहनांवर कारवाई
Corona Update | कोल्हापुरात खासगी रुग्णालये करणार मोफत उपचार, सीपीआर कोरोनासाठी राखीव ठेवल्यानं अन्य उपचार सीपीआरप्रमाणे मोफत करणार, कोल्हापुरातील खासगी रुग्णालयांनी उचलला सीपीआर रुग्णालयाचा भार, राज्यातल्या खासगी रुग्णालयांनी प्रेरणा घ्यावी असा उपक्रम, सीपीआरच्या क्षमतेनंतर कोरोनासाठी डॉ. डी वाय पाटील रुग्णालय देणार सेवा
बीड जिल्ह्यातील व्हॉट्सअॅप ग्रुपवर फक्त अॅडमिनला पोस्ट पाठवण्याची परवानगी, ग्रुप मेंबर्सना पोस्ट फॉरवर्ड करण्यास मज्जाव, मरकसला गेलेल्या व्यक्तींच्या पोस्ट आणि धार्मिक तेढ निर्माण होऊ नयेत म्हणून बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांचे आदेश
नवी मुंबईत आज तीन कोरोना पाॅझिटिव्ह रूग्ण वाढले, नेरूळ येथील तिघे कोरोना पाॅझिटिव्ह, दिल्लीवरून आलेल्या फिलिफिन्स नागरिकामुळे शहरात 22 जणांना कोरोनाची लागण, नवी मुंबईत एकूण 25 कोरोना पाॅझिटीव्ह रूग्ण
लॉकडाऊनमुळे तीन महिन्यांचे लाईटबिल शासनाने माफ करावे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मागणी
लातूरमध्ये कोरोनाचे आठ रुग्ण; विशेष म्हणजे लातूरमध्ये आढळून आलेल्या आठही बाधीत रुग्णांत कोरोनाची कसलीही लक्षणे नव्हती.
हा लढा मानवता आणि विज्ञानवादाच्या दृष्टीकोनातून जिंकण्यासाठी विज्ञानाच्या कसोटीवर निर्णय घ्यावे लागतील. पुरोगामी महाराष्ट्रातली जनता सुज्ञ आहे; यापूर्वीही अनेक संकटं महाराष्ट्रानं परतवून लावली आहेत. आपण सर्वजण एकजुटीनं, शहाणपणानं घरातंच थांबून कोरोनाचं संकट परतवून लावूया : अजित पवार
जयदत्त क्षीरसागर यांना क्वॉरंटाईन करण्याची मागणी. शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर त्यांच्या चालकासोबत बीडमध्ये आज आले आहेत. जयदत्त क्षीरसागर हे 100 पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या मुंबईतून बीडकडे आले आहेत. म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी करून क्वॉरंटाईन करावे अशी मागणी राष्ट्रवादीच्या पाच नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
अंबरनाथ शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला आहे. यानंतर पोलीस आणि पालिका प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून हा रुग्ण राहत असलेला संपूर्ण परिसर सील केला आहे.
नागपुरात पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीची घरात शिरून गळा चिरून हत्या. हत्या करणारा आरोपी नुकतंच कोरोनामुळे पेरोल वर सुटला होता. सुशीला मुळे ( 52 वर्ष ) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव. मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी नवीन गोटागोडे नावाच्या आरोपीने घरात शिरून सुशीला यांची तीक्ष्ण हत्याराने गळा चिरून हत्या केली.
राज्यात कोरोना विषाणूचे महासंकट असताना गृह खात्याने केलाय अजब प्रकार. अशा गडबडीच्या वेळी आणि कोणाचं लक्ष नसल्याची वेळ साधत गृहखात्याने काढलेत दोन अधिकाऱ्याच्या बदलीचे आदेश. तीन महिन्यापूर्वी एसीपी सतीश गोवेकर यांच्याकडे दिली होती महिला पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे हत्याकांडाच्या तपासाची सूत्रे. मात्र, आज अचानक त्यांची बदली पुण्याला करण्यात आली. त्याठिकाणी एसीपी विनोद चव्हाण यांची नियुक्ती केली गेली. कारण मात्र गुलदस्त्यात आहे. एसीपी विनोद चव्हाण हे अश्विनी बिंद्रे हत्याकांडातील मुख्य आरोपी अभय कुरुंदकर आणि त्यांचा भाऊ एसीपी संजय कुरुंदकर यांचा बॅचमेंट आहे.
अमेरिकेपाठोपाठ भारतातही आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक सूचना घराबाहेर पडताना मास्क (homemade mask) किंवा रुमाल वापरा
कोरोना संदर्भात दोन समाजात तेढ निर्माण होणारी पोस्ट व्हाट्सअपवर पोस्ट केल्याप्रकरणी मालेगाव मध्ये दोघा तरुणावर गुन्हा दाखल.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र संचारबंदी व जमावबंदीलागू असताना बुलडाणा जिल्ह्यात कुठेही आठवडी बाजार भरणार नाही अशा प्रकारचे जिल्हाधिकारी यांच्या आदेश असतानादेखील या आदेशाला न जुमानता मेहकर तालुक्यातील जानेफळ इथं मोठ्या प्रमाणात आठवडी बाजारामध्ये नागरिकांनी गर्दी केली होती तर सदर गर्दी ही संबंधित व्यापार्‍याच्या निष्काळजीपणामुळे झाल्याची माहिती मिळताच संबंधित उपविभागीय अधिकारी यांनी तात्काळ जानेफळ येथील तलाठी यांना माहिती देऊन या संबंधित व्यापारावर कारवाईचे आदेश दिले व त्यांच्या आदेशावरून तलाठी यांनी जानेफळ पोलीस स्टेशनला 19 व्यापारीच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आलेत.
सोलापूर :
मॉर्निंगवाक आणि विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांना सोलापूर पोलिसांचा दणका,

गुन्हे शाखेतर्फे सकाळी एकदम 84 लोकांवर कारवाई
,
33 मोटरसायकल व 2 रिक्षा पोलिसांच्या ताब्यात
सोलापूरात आज देखील बँकासमोर मोठी गर्दी

, जनधन खात्यातील मदतनिधी तसेच विविध योजना आणि पगार काढण्यासाठी लोकांच्या रांगा

, सोशल डिस्टन्सिंग मेन्टन करताना बँक कर्मचाऱ्यांची कसरत,

मात्र गर्दीमुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
कोरोना पसरवण्याचे विकृत चाळे करण्याऱ्यांना गोळ्या घाला : राज ठाकरे
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी एका रुग्ण कोरोनामुक्त झालाय. थोड्याच वेळात त्याला डिस्चार्ज दिला जाणार आहे. आता शहरात एकूण 15 पैकी 12 रुग्ण आधीच कोरोनामुक्त झालेत. हा रुग्ण फिलिपिन्सहुन आलेल्या तरुणाच्या भाऊ असून, तो त्याच्या संपर्कात आला होता. भावाचा दोन दिवसांपूर्वी डिस्चार्ज झाला आहे.
पालघर जिल्हा पोलीस दलाकडून अत्यावश्यक सेवेसाठी दिलेली वाहने सोडून विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या वाहनचालकांवर 177 गुन्हे दाखल करून 1045 वाहने जप्त करण्यात आलेली आहेत.
पिंपरी - डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी व पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय यांच्यात नुकत्याच झालेल्या सामंजस्य करारानुसार आत्ता यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय हे केवळ कोरोना बाधित रुग्णांवर पूर्ण क्षमतेने उपचार करणार असून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय नॉन कोविड रुग्णांवर उपचार करणार आहेत.

“ आयुक्तांच्या निर्देशानुसार कोरोना बाधितांवर वाय सी एम रुग्णालय कार्यरत असून इतर रुग्णांच्या उपचारांबाबत निर्णय घेणे फार महत्त्वाचे होते त्या अनुषंगाने डॉ.डी.वाय.पाटील विद्यपीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्याशी संवाद साधून त्यांनी इतर रुग्णांच्या उपचाराबाबत सकारात्मक सहमती देऊन डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय हे इतर आजारावरील रुग्णांवर उपचार करणार आहेत.” अशी माहिती डॉ राजेंद्र वाबळे (अधिष्ठाता, पदव्युत्तर संस्था यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, पिंपरी) यांनी दिली.
मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचे कठोर आदेश,
मुंबईत कोणत्याही धर्माचे पाचपेक्षा अधिक लोक प्रार्थना,पूजा,नमाज करायला एकत्र आले तर कारवाई करा
,
मुंबई पोलिसांना दिले आदेश
केशरी कार्ड धारकांना रेशनिंगवर धान्य देण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता, लॉकडाऊनच्या काळात लोकांना धान्य मिळावे म्हणून केशरी कार्ड धारकांना धान्य देण्याबाबत शरद पवारांनी केली होती मागणी, याशिवाय राज्यातील धान्य साठा आणि लॉकडाऊनचा कालावधी याबाबत शरद पवारांनी केली छगन भुजबळ यांच्याशी चर्चा
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 537 वर,
मुंबई 28, ठाणे जिल्हा आणि इतर महापालिका क्षेत्र 15 अमरावती 1,
पुणे 2
पिंपरी चिंचवड 1 नवे रुग्ण
अमेरिकेपाठोपाठ भारतातही आरोग्य मंत्रालयाची मार्गदर्शक सूचना घराबाहेर पडताना मास्क (homemade mask) किंवा रुमाल वापरा
वसईत मरकज कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्याबद्दल पोलिसांचं अभिनंदन : राज ठाकरे
दिवे लावून परिणाम होणार असेल तर लावावेत मोदींच्या भाषणात आशेचा किरण दिसायला हवा होता : राज ठाकरे
लोकांमधील संभ्रम सरकराने दूर करावा : राज ठाकरे
लॉकडाऊन लोकांनी गांभीर्याने घ्यावा : राज ठाकरे

कोल्हापूर : विजेचा दाब वाढल्याने केर्ले येथील दोन ट्रान्स्फ़ॉर्मरला आग, आगीत सुमारे एक कोटीचं नुकसान, शुक्रवारची घटना, कोल्हापूर पालिका आणि प्रतिभानगर अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात
अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीला, पांढरे कार्ड धारकांप्रमाणेच केशरी केशरी कार्ड धारकांना लाभ मिळावा या मागणीसाठी दुपारी 12 वाजता सिल्व्हर ओक येथे भेट घेणार, या आधी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे दिला होता प्रस्ताव
रत्नागिरीमध्ये मिरकजला गेलेला व्यक्ति कोरोनाबाधित असल्याचे रिपोर्ट आल्यानंतर आता जिल्हा प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. ही व्यक्ती राहत असलेला राजीवडा परिसर दीड किमीपर्यंत हा सील करण्यात आला आहे. एन्ट्री पॉईंट, एक्झिट पॉईंट ठिकाणी पोलीस तैनात आहेत. नगरपालिकेकडून देखील आता या ठिकाणच्या गल्लीबोळात जात त्याबाबत अधिक काळजी घ्या असं आवाहन केले जात आहे. आरोग्य सेविका देखील आता घराघरामध्ये जात नोंद करत आहेत. 18 मार्च रोजी हा व्यक्ती रत्नागिरीमध्ये आला होता. त्यामुळे याच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाला ट्रेस करत त्याची तपासणी देखील केली जाणार आहे. दरम्यान ऐरवी गजबजलेला हा परिसर आता मात्र इतर दिवशांची तुलना करता शांत आहे.
कोरोना बाधित देशातील राष्ट्रप्रमुख पत्रकार परिषद घेऊन जनतेच्या प्रश्नांना उत्तरं देतात; नरेंद्र मोदी एक पत्रकार परिषद का घेत नाहीत? : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

'कोरोनाबद्दल #PMModi यांचा टाळी, थाळी व दिवाळी कार्यक्रम दुर्दैवी आहे. जगातील इतर नेते, राष्ट्राध्यक्ष आणि शासन प्रमुख, हे स्वत: दररोज पत्रकार परिषदा घेऊन विचारलेल्या जनतेच्या प्रश्नांची उत्तरे देतात, पण मोदींनी मात्र एवढ्या गंभीर संकटात देखील एकही पत्रकार परिषद घेतली नाही', असं ट्वीट करत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदींवर थेट इशारा साधला आहे.
कोरोनासंदर्भात काल मेयो रुग्णालयात झालेल्या चाचणीमध्ये मरकजमधून परतलेल्या 15 जणांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे.

मरकजमधून नागपूरला परतलेल्या उर्वरित लोकांच्या चाचणीचा निकाल आज येणं अपेक्षित आहे.
'जोतिबा डोंगरावर मानाच्या सासनकाठ्या देखील घेऊन येऊ नका', सासनकाठ्या धारकांना फोन करून दिल्या सूचना,
7 तारखेची जोतिबाची चैत्र यात्रा रद्द केलीय, मात्र यात्रेच्या दिवशी सासनकाठ्या येण्याची होती शक्यता
,
6 पासून 8 तारखेपर्यंत जोतिबा डोंगरावर 100 टक्के लॉकडाऊन राहणार
,
कोरोना संकट दूर झाल्यावर जोतिबा फेस्टिव्हल करण्याचा मानस
कोल्हापुरकरांसाठी दिलासादायक बातमी आहे. आठ दिवसात कोरोनाचा एकही नवीन रुग्ण आढळला नाही. काल 32 व्यक्तींचे कोरोना तपासणी रिपोर्ट आले असून ते सर्व रिपोर्ट्स निगेटिव्ह आले आहेत. तर आधीच्या कोरोना बाधित दोन्ही रुग्णांची प्रकृती स्थिर आहे.

पार्श्वभूमी

नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी 229 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 62 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात 490, केरळमध्ये 295, तामिळनाडूमध्ये 411, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 164, राजस्थानमध्ये 179, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 174, मध्यप्रदेशात 154रूग्ण आढळून आले आहेत.

आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी यासंदर्भात माहिती दिली, दिल्लीत झालेल्या धार्मिक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, 9000 लोकांना ट्रॅक करण्यात आलं आहे. या लोकांचा संबंध तब्लिकींशी होता. यामध्ये 1306 विदेशी नागरिक आहेत. तर दिल्लीत शोधण्यात आलेल्या 2500 लोकांपैकी 250 विदेशी नागरिकांचा समावेश होता. यापैकी 1804 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कोरोनाटी लक्षणं असलेल्या 334 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील 24 तासांमध्ये 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.