coronavirus LIVE UPDATES | पुण्यातील अनेक भागांमध्ये हलक्या पावसाच्या सरी

#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत.कोरोनाने भारतात देखील सहा हजाराच्या जवळपास हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 11 Apr 2020 09:35 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. काल दिवसभरात राज्यात 210 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. परिणामी राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 1574 झाली आहे. तर, आज 13 जणांचा बळी गेला...More

दिवा विभागात आजपर्यंत रुग्ण आढळलेला नव्हता. मात्र, आज पहिल्या रुग्णाची नोंद झाली. तर ढोकाळी येथे राहणाऱ्या पिता (59) पुत्रांना (41) covid-19 ची बाधा झाली. त्यापैकी एक वैद्यकीय अधिकारी म्हणून होते कार्यरत आहेत. एक धक्कादायक बाब म्हणजे दोन पोलीस अधिकाऱ्यांना देखील covid-19 ची बाधा झालीय. त्यातील एक मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत (यांची नोंद नाशिकमध्ये आहे ) तर दुसरे ठाणे नगर पोलिस स्टेशन मध्ये कार्यरत आहेत. यामुळे डॉक्टर आणि नर्स यांच्यानंतर पोलिसी पेशात देखील covid-19 शिरकाव झाल्याचे निष्पन्न झालंय. सोबत कळवा पारसिक नगर येथे आणखीन एका नवीन रुग्णाची (37) भर, तसेच मुंब्र्यात राहणाऱ्या एका १६ वर्षांच्या मुलाला देखील covid-19 ची बाधा.