Coronavirus LIVE UPDATE | मुंब्रा विभागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत. कोरोनाने भारतात देखील सहा हजाराच्या जवळपास हा आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
10 Apr 2020 08:49 PM
मुंब्रा विभागात पालिकेच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की; बाधित क्षेत्रात काम तपासणी करायला गेलेल्या महिला कर्मचाऱ्यांना स्थानिकांची धक्काबुक्की केली. मुंब्रा इथे सर्वाधिक रुग्ण आहेत. मात्र, तिथेच स्थानिक लोकांचे पालिका कर्मचाऱ्यांना सहकार्य नाही. आमचे नाव, नंबर का घेता? असे सवाल करत कामात स्थानिकांनी अडथळे आणले. एनपीआरचे काम तर करत नाही ना, असा स्थानिकांना संशय आहे. त्यामुळे अखेर आज पालिकेच्या विनंतीवरून पोलिसांनी 2 जणांच्या विरोधात 353 चा गुन्हा केला दाखल. सोबत साथ रोग नियंत्रण कायद्याच्या भंग प्रकरणी देखील केला गुन्हा दाखल.
यवतमाळमध्ये 33 हजार लोकांना होम कॉरंनटाईन करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केलं आहे. 6 हजार कुटुंबातील हे 33 हजार नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.
यवतमाळमध्ये 33 हजार लोकांना होम कॉरंनटाईन करण्यासाठी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केलं आहे. 6 हजार कुटुंबातील हे 33 हजार नागरिकांना क्वॉरंटाईन करण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश दिला आहे.
ससून रुग्णालयातील 27 वर्षीय कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू. आज सकाळी 10 वाजता मृत्यू. पुण्यातील मृतांचा आकडा 26 वर.
ससून रुग्णालयातील 27 वर्षीय कोरोना बाधित तरुणाचा मृत्यू. हा मृत तरुण अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील रहिवासी आहे. मागील काही दिवसांपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. आज सकाळी 10 वाजता उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. ही व्यक्ती जरी ससून रुग्णालयात मृत झाला तरी याची मोजदाद ही अहमदनगर जिल्ह्यात होईल, अशी माहिती पुणे महानगरपालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिली.
दादरमध्ये तीन नवे रुग्ण,शुश्रूषा रुग्णालय 2 नर्स ,
केळकर मार्गावरील 83 वर्षाचे इसम, एकूण 6 रुग्ण
पुणे शहरात आणखी १५ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यातील ११ जण @PMCCare च्या डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात तर ४ जण ससून रुग्णालयात उपचार घेत आहेत. पुणे शहरातील रुग्णांची संख्या १९० झाली असून जिल्ह्यातील संख्या २२५ झाली आहे.
ही धूळफेक आहे. संबंधित अधिकाऱ्याला निलंबित करा. गुन्हा दाखल करुन कडक शिक्षा करा, आयएएस अधिकारी अशोक खेमका यांचं ट्वीट
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन करुन मुख्यमंत्र्यांच्या सूचना
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सातारा पोलिसांना गुन्हा दाखल करण्याच्या सूचना, सातारा जिल्हा पोलिस अधीक्षकांना फोन करुन मुख्यमंत्र्यांच्या सूचना
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये सध्या भाजीपाला, फळं, अन्न धान्य, कांदा बटाटा यांची विक्री होते. एकीकडे कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाही एपीएमसीत मात्र दररोज अक्षरशः हजारो लोक कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता गर्दी करत असतात. हीच बाब एबीपी माझाने समोर आणल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने एपीएमसीत भरणारा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतलाय. त्यानुसार आता कांदा बटाटा बाजार विद्यापीठ उपकेंद्र मैदानात, फळांचा बाजार वायलेनगर मैदानात भरणार असून मॅक्सी ग्राऊंडमध्ये थेट शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकता येणारेय. शिवाय एपीएमसी मार्केटमध्ये भरणाऱ्या भाजीपाला बाजारात दररोज फक्त ५० व्यापाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना फक्त २ टन भाजीपाला आणता येणारेय. कल्याण एपीएमसीचे सभापती कपिल थळे यांनी ही माहिती दिलीये.
कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये सध्या भाजीपाला, फळं, अन्न धान्य, कांदा बटाटा यांची विक्री होते. एकीकडे कल्याण डोंबिवलीत कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असतानाही एपीएमसीत मात्र दररोज अक्षरशः हजारो लोक कुठल्याही प्रकारच्या सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करता गर्दी करत असतात. हीच बाब एबीपी माझाने समोर आणल्यानंतर एपीएमसी प्रशासनाने एपीएमसीत भरणारा बाजार बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आता कांदा बटाटा बाजार विद्यापीठ उपकेंद्र मैदानात, फळांचा बाजार वायलेनगर मैदानात भरणार असून मॅक्सी ग्राऊंडमध्ये थेट शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल विकता येणारेय. शिवाय एपीएमसी मार्केटमध्ये भरणाऱ्या भाजीपाला बाजारात दररोज फक्त 50 व्यापाऱ्यांनाच प्रवेश दिला जाणार असून त्यांना फक्त 2 टन भाजीपाला आणता येणार आहे. कल्याण एपीएमसीचे सभापती कपिल थळे यांनी ही माहिती दिली आहे.
सोलापूर जिल्ह्यात आजपासून मास्क बंधनकारक , मास्क शिवाय फिरणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार
रत्नागिरीतील पहिल्या कोरोनाबाधित रूग्णाला गुरूवारी संध्याकाळी डिस्चार्ज देण्यात आला. मुळचा गुहागर तालुक्यातील शृंगारतळी गावचा असलेला दुबईहून आलेला 50 वर्षीय इसम हा कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याच्यावर 19 मार्चपासून जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर आता त्याचे दोन्ही कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानं त्याला घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी साखरतर येथील महिला कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर संबंधित महिलेचा संपर्कात आलेल्या 17 जणांचे रिपोर्ट देखील तपासणीकरता पाठवण्यात आले होते. पैकी 10 रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत. यामध्ये महिलेवर आयसीसुमध्ये उपचार करणाऱ्या डॉक्टरांचा देखील समावेश आहे. या साऱ्यांचे रिपोर्ट देखील निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याच्या दृष्टीनं ही महत्त्वाची बाब म्हणावी लागेल.
नागपुरात कोरोना बाधितांचा आकडा सहाने वाढला, काही दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या सतरंजीपुरा येथील व्यक्तीचे नातेवाईक आणि संपर्कातील हे सहा जण, नागपुरात आता कोरोनाबाधितांची संख्या 25 झाली आहे, त्यापैकी 1 मृत्यू झाला आहे
धुळे जिल्ह्याला लागून असलेल्या मालेगांव तसेच महाराष्ट्र - मध्यप्रदेश सीमेवरील धुळे जिल्ह्याजवळील सेंधवा या ठिकाणी कोरोनाचे रुग्ण आढळल्याने जिल्ह्यासाठी ही चिंतेची बाब ठरू पाहत असल्यानं धुळे जिल्हा प्रशासनानं या संदर्भात खबरदारीचे उपाययोजना केली आहे. याचाच एक भाग म्हणून शुक्रवार 10एप्रिलच्या मध्यरात्रीपासून रविवार 12 एप्रिलच्या पहाटे 5 वाजेपर्यंत संपूर्णपणे लॉक डाऊनचे आदेश धुळ्याचे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी जारी केले. या संपूर्ण लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी-विक्री देखील बंद राहणार असल्यानं नागरिकांनी घराबाहेर निघण्याचे धाडस करू नये, अन्यथा त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.
सध्या सुरू असलेल्या लॉक डाऊन काळात भिवंडी परीसरात आगी लागण्याच्या घटना काही थांबण्याचे नाव घेत नाहीत .दोन दिवसां पूर्वी राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत कचरा पेटला असता त्या आगीत नजीकच्या गोदामात साठविलेला कोट्यवधींचा धाग्याचे कोम जळून खाक झाले असतानाच तालुक्यातील कांबे रस्त्यावरील तळवली नाका या ठिकाणी प्लास्टिक रोल साठविलेल्या कारखान्याला रात्री नऊ वाजताच्या सुमारास भीषण आग लागण्याची घटना घडली आहे .
पार्श्वभूमी
मुंबई : जगभरात कोरोनाचा हाहाकार सुरुच असून आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 16 लाख 4 हजारापेक्षा जास्त आहे. तर कोरोनामुळे बळींची संख्या 95 हजार 506 वर पोहोचली आहे. दिलासादायक बाब म्हणजे तीन लाख 57 हजार रुग्ण बरे झाले आहेत, अजुून जवळपास 11लाख 51 हजार लोक कोरोनाबाधित आहेत. त्यातील चार टक्के म्हणजे 49 हजार 151 रुग्ण गंभीर (Serious or Critical)आहेत. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 5865 वर पोहोचला आहे तर कोरोनोमुळे देशात 169 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर 477 लोक कोरोनामुक्त देखील झाले आहेत. भारतात महाराष्ट्रात सर्वाधिक 1135 कोरोनाबाधित आहेत.
अमेरिकेत हाहाकार सुरुच
अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार सुरुच आहे. गेल्या 7दिवसात अमेरिकेत कोरोनाचे तब्बल 10 हजार 601 बळी गेले आहेत. कोरोनामुळे 1 ते 2 लाख बळी जातील असा अंदाज होता मात्र आता अमेरिकेत 60 हजार बळी जातील असा नवा अंदाज टास्क फोर्सने व्यक्त केला आहे. सलग तिसऱ्या दिवशी अमेरिकेत 1900पेक्षा जास्त बळी गेले आहेत. अमेरिकेत कोरोनाने गेल्या चोवीस तासात 1900 बळी गेले आहेत.
80 दिवसांपूर्वी अमेरिकेत पहिला रुग्ण आढळला होता तिथे आता तिथे मृतांचा आकडा 16 हजार 691वर पोहोचला आहे
अमेरिकेत रुग्णांची संख्या चार लाख 68 हजारावर पोहोचली (469565)
न्यूयॉर्क प्रांतात काल 799बळी, तिथे रुग्णांची संख्या 1लाख 62हजार तर एकूण मृतांचा आकडा 7068.
त्या खालोखाल न्यूजर्सीत 1700, मिशिगन मध्ये 1076, लुझियाना 702, कॅलिफोर्निया 559आणि वॉशिंग्टनमध्ये 455लोकांचा बळी या रोगाने घेतलाय.
3 एप्रिल - 1045
4 एप्रिल - 1331
5 एप्रिल – 1165
6 एप्रिल – 1255
7 एप्रिल – 1970
8 एप्रिल – 1935
9 एप्रिल - 1900
गेल्या 7 दिवसात अमेरिकेने तब्बल 10हजार 601लोक गमावले.
स्पेनमध्ये गेल्या चोवीस तासात 655लोक गमावले. एकूण मृतांचा आकडा 15 हजार 447
गेल्या नऊ दिवसात स्पेनने असे 6 हजार 983 लोकं गमावली.
काल इटलीने दिवसभरात इटलीत 610माणसांचा बळी घेतला.
आता इटलीतील एकूण बळींची संख्या 18हजार 279 आहे.
काल रुग्णांची संख्या 4 हजार 204 ने वाढली, इटलीत आता जवळपास 1 लाख 44 हजार रुग्ण आहेत,
9 मार्चपासून इटलीत लॉकडाऊन आहे.
फ्रान्सने काल दिवसभरात 1341 लोक गमावले. तिथे आत्तापर्यंत 12हजार 210 बळी, एकूण रुग्ण 1 लाख 18 हजार
जर्मनीत काल 258 बळी गेले, एकूण बळींची संख्या 2607 पोहोचला आहे.
इंग्लंडमध्ये काल कोरोनाने तिथे 881 लोकांचा जीव घेतला, तिथला बळीचा आकडा 7978 वर पोहोचला आहे.
इराणने काल 4 हजाराचा आकडा ओलांडला. बळींच्या संख्येत काल 117ची भर, एकूण 4110मृत्यू, रुग्णांची संख्या 66220 इतकी आहे.
कोरोनाने हॉलंडमध्ये काल 148 बळी घेतले तिथे एकूण 2396 लोक दगावले आहेत.
बेल्जियममध्ये काल 283 मृत्यूमुखी पडले, एकूण बळींचा आकडा 2523 इतका आहे.
स्वित्झर्लंडमध्ये 948, स्वीडनमध्ये 793, ब्राझील 954, पोर्तुगाल 409, कॅनडात 509, इंडोनेशिया 280, टर्की 908 तर इस्रायलमध्ये 86 बळी गेले आहेत.
दक्षिण कोरियात काल 4 मृतांची भर पडली, एकूण मृतांचा आकडा 204 इतका आहे.
आपला शेजारी पाकिस्तानात रुग्णांची संख्या 4489 वर पोहोचली आहे, तिथे 65 लोकांचा कोरोनाने बळी घेतला आहे.
गेल्या 24 तासात जगभरात कोरोनाच्या रुग्णांमध्ये 85010 तर बळींच्या आकड्यात 7234 ची भर पडली.