Coronavirus LIVE UPDATE | मुख्यमंत्र्यांसोबत  राज्यपालांनी घेतला कोरोना आव्हान तयारीचा आढावा

coronavirus चा जगभरात सध्या प्रकोप सुरु आहे. कोरोनामुळे हजारो बळी जात आहेत. जागतिक महामारी घोषित केलेल्या कोविड 19 या आजाराने भारतात देखील हजाराच्या वर आकडा गाठला आहे. कोरोनासंदर्भात सर्व बातम्याचे ताजे अपडेट, सर्व माहिती आपल्याला इथं मिळेल.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 30 Mar 2020 10:47 PM
सोलापूर : संचारबंदीच्या काळात दुकान उघडे ठेवणाऱ्या व्यापाऱ्याकडून पैसे घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे निलंबन, सोलापुरातील औद्योगिक पोलीस चौकी येथे कार्यरत असलेले रोहित दिवसे यांच्यावर कारवाई, पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांचा दणका
पनवेलमध्ये डाॅक्टर महिलेने परदेश दौऱ्याची माहिती लपवली, होम क्वॉरंन्टाईन राहण्याऐवजी हाॅस्पिटलमध्ये जावून रुग्णांवर उपचार केले, डाॅ. स्वरा मोहिते असं डॉक्टर महिलेचं नाव, पनवेल येथील नामांकित मोहिते हाॅस्पिटलमधील घटना, पनवेल मनपा आयुक्त गणेश देशमुख यांचे हाॅस्पिटल सील करण्याचे आदेश
करोना व्हायरसच्या गंभीर संकटाला तोंड देण्याचे दृष्टीने राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचेसह आज राजभवन येथे एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
 
स्थलांतरित लोकांसाठी सुरु करण्यात आलेल्या शिबिरांमध्ये रोगराई पसरू नये यासाठी पुरेशी स्वच्छता ठेवावी, तेथील लोकांच्या निवास, भोजनाची व औषधाची व्यवस्था करावी तसेच कुणीही उपाशी राहणार नाही याची विशेषत्वाने काळजी घ्यावी अशा सूचना राज्यपालांनी यावेळी केल्या. या कामी शासनास सहकार्य करणाऱ्या विविध अशासकीय तसेच सामाजिक संस्थाशी देखील समन्वय राखावा अशी सूचना त्यांनी केली. या संकटाचा मुकाबला करण्यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करावी अशीही सूचना त्यांनी यावेळी केली.
जालना : पोलिसांकडून विनाकारण फिरणाऱ्या 124 वाहनावर दंडात्मक कारवाई तर पोलिसांकडून 12 मोटारसायकली जप्त
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मुंबई तसेच राज्यातील इतर शहरांतील अनेक सोसायट्या व वस्त्या तसेच कॉलनीमध्ये जंतूनाशकांची फवारणी करणे सुरू आहे. परंतु या जंतूनाशकांच्या बेसुमार आणि अवाजवी फवारणीमुळे अपाय होऊ शकतो, त्यामुळे अशी फवारणी करू नये आणि करायची असल्यास संबंधित महानगरपालिका प्रत्यक्ष त्या भागाची तपासणी करून आवश्यकता भासल्यास स्वतः फवारणी करेल असे आज कोरोनासाठी स्थापन केलेल्या नियंत्रण कक्षाच्या बैठकीत ठरले
पोलिसांच्या धास्तीने पळत व्यक्तीला हृदयविकाराचा झटका, 45 वर्षीय उत्तम डोंगे यांचा मृत्यू, बेंबळी रोड साळुंकेनगर येथील घटना
पिंपरी चिंचवड मधील आणखी एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची पहिली टेस्ट ही निगेटिव्ह आलेली आहे. उद्या या रुग्णाचे दुसरे नमुने उद्या सकाळी टेस्टसाठी पाठवले जातील. शहरातील 12 रुग्णांपैकी आत्तापर्यंत 9 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. उद्या या रुग्णाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यास दहावा रुग्ण हा सुरक्षित घरी पोहचेल. हा रुग्ण यूएस हुन आला असून 17 मार्चला त्यास कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं.
मुंबईत जिथे कोरोना पॉझिटीव्ह व्यक्ती आढळले, त्या परिसराची माहिती जीपीएस मॅपिंग करुन कोरोनाबाधित व्यक्ती सापडलेल्या परिसराची माहिती संकेतस्थळावर टाकणार

राज्यमंत्री बच्चू कडू होम क्वॉरंटाईन, बच्चू कडू यांनी पाच दिवसापूर्वीच स्वत:ला होम क्वारंटाईन केल्याची माहिती, ताप असल्यानं करून घेतली होती कोरोनाची तपासणी, तपासणीचा अहवाल निगेटिव्ह
खराब होणारे कंदी पेढे वाया जाऊनये म्हणून दुकानातील पेढे आणि इतर मिठाई भटक्या कुत्र्यांना दिली. साता-यातील राजवाडा परिसरात अनेक मिठाईची दुकाने आहेत. ही दुकाने लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे अनेकांनी दुकाने बंद ठेवली. मात्र आज एका दुकानदाराने दुकान उघडून खराब होत चाललेले पेढे आणि इतर मिठाई कुत्र्यांना खायाला टाकली. भटक्या कुत्र्यांना ही मिठाई टाकून पुण्याचे काम केले असे एका बाजूला बोलले जात असताना दहा दिवसापूर्वी बनवलेल्या पेढ्यामुळे या भटक्या कुत्र्यांना त्रास होऊ शकतो असं मत अनेकांनी व्यक्त केलं.

राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व महाविद्यालयातील प्राध्यापकांना वर्क फ्रॉम होम च्या सूचना देण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये,म्हणून शिकवणीसाठी ऑनलाईन अध्यापन सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यामुळे विध्यार्थ्यांनी काळजी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. सामंत म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉक डाऊन असल्याने या संचारबंदीच्या काळात विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, याकरिता सर्व तंत्रशिक्षण संस्थांमधील कामकाज 'वर्क फ्रॉम होम' या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्यात येत आहे.
पुण्यात कोरोनाचा पहिला बळी गेला असून एका 52 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये या कोरोनाग्रस्त रूग्णावर उपचार सुरू होते.
कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचं दहनच होणार आहे. कोणत्याही धर्माचा असला तरी दफन होणार नाही असा निर्णय मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी घेतला आहे. मृतदेह दफन करायचा असेल तर मुंबईच्या बाहेर जाऊन दफन करायचां आणि याविषयी सगळं बीएमसीला लिहून घेणार आहे. दफन करताना 5 व्यक्तींना परवानगी देण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमधील उधमपूर येथे सैन्यदलात कार्यरत असलेले नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील पिंपर्डे गावातील जवान गौतम रंगराव चव्हाण यांचं कर्तव्यावर असताना हृदय विकाराच्या झटक्याने निधन झालं. या शहीद जवानाचे पार्थिव देह हेलिकॉप्टरने ओझर येथे आणण्यात आला. त्यानंतर ॲम्बुलन्सने मूळ गावी आल्यानंतर त्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या फैरी झाडून अखेरची मानवंदना देण्यात आली. शहीद जवानाच्या अंतयात्रेत ही सोशल डिस्टन्सिंग ठेवण्यात आले होते. जिल्हा प्रशासनाच्या वतीने प्रांताधिकारी चेतन गिरासे उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलिक सपकाळे यांनी पुष्पचक्र अर्पण केले. संचारबंदी आणि कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता शहीद जवानाच्या अंत्ययात्रेत ही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात आले

मुंबईतील वरळी कोळीवाडा परिसरात कोरोना संशयित रुग्ण आढळून आल्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेला आहे. आज सकाळपासून मुंबई महापालिकेचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी या संपूर्ण परिसरात औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करत आहे.
वरळी कोळीवाडा परिसर मुंबई पोलिसांकडनं सील, कोरोनाचे संशयित रूग्ण आढळल्यानं पोलिसांकडून खबरदारीचा उपाय, पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून संपूर्ण परिसराचं सॅनिटायझेशन सुरू,
वरीष्ठ पोलीस अधिकारी, रूग्णवाहिका दाखल
मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांकडून वारंवार दवाखाने सुरू ठवण्याचे आवाहन केले जात असले तरी बहुतांश ठिकाणी डॉक्टर्स दवाखाने उघडायला तयार नाहीत. कारण रुग्णांवर उपचार करत असताना कोरोनाची लागण होऊ नये यासाठी आवश्यक असलेला सेफ्टी ड्रेस किट त्यांच्याकडे उपलब्ध नाही. डॉक्टर्स असोसिएशन हा किट विकत घेण्यासही तयार आहे. मात्र बाजारात या किटचा आधीच तुटवडा आहे. त्यामुळे या डॉक्टर्सना हा किट सरकारने उपलब्ध करून द्यावा जेणेकरून लाखो डॉक्टर्स दवाखाने उघडतील आणि रुग्णांची गौरसोय होणार नाही, अशी आग्रही मागणी भाजप आमदार राम कदम यांनी सरकारकडे केली आहे.
संचारबंदीच्या काळात नागपूर पोलिसांनी आजपासून त्यांच्या कारवाईच्या धोरणात महत्वाचे बदल केले, आजपासून नागपुरात कर्फ्यू पास देणे बंद, नागपूरकरांकडून कर्फ्यू पासेसचा गैरवापर केल्यामुळे निर्णय, आजपासून जप्त होणारे वाहन संचारबंदी संपेपर्यंत परत मिळणार नाही
मुंबईत रेशन दुकानावर तीन महिन्यांचे धान्य मोफत उपलब्ध करुन देण्यात आलं आहे. शिवाय रेशन दुकानाची नंबरसह यादीही जारी करण्यात आलं आहे. ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही त्यांना हा फॉर्म भरुन धान्य मिळेल.

गोवा:गोव्यातील व्हायरोलॉजी प्रयोगशाळेची आयसीएमआर कडून नोंदणी, चाचणी व विलगीकरण यासह इतर सुविधांनी गोवा सज्ज, कोरोना विरोधात पूर्ण ताकदीने लढा सुरूच, आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांचा विश्वास
ठाणे भाजी मंडई एक एप्रिलपासून सेंट्रल मैदानात हलवणार, गर्दी दूर करण्यासाठी पोलिसांचा निर्णय, खास उपयोजना करणार; सध्याच्या भाजी मंडईमध्ये जागा कमी असल्याने योग्य अंतर राखता येत नव्हते, त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला
किर्गिस्तानमध्ये महाराष्ट्रातील 203 विद्यार्थी अडकले, एमबीबीएसचे शिक्षण घेत आहेत विद्यार्थी, नाशिक जिल्ह्यातील 140 विद्यार्थ्यांचा यात समावेश,15 दिवसांपासून हे विद्यार्थी एका हॉस्टेलमध्ये अडकून, भारत सरकारकडून मदतीसाठी विनंती
नवी मुंबई : पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी आपल्या परिवारातील सदस्यांना गावाकडे पाठवू नये, नवी मुंबई पोलीस आयुक्तांचा आदेश, गावाकडे जाताना पोलीस कर्मचाऱ्यांचे परिवार मिळाल्यास त्यांना परवानगी देवू नये,त्यांना पकडून परत घराकडे पाठविण्यात यावे, पोलीस अधिकारी , कर्मचारी गावाकडे परिवाराला जाताना दिसल्यास कारवाई करा, पोलीस आयुक्तांच्या आदेशाने कर्मचारी नाराज, दिवसभर काम करून घरात जाण्यास भिती, आपल्यामुळे परिवाराला धोका पोचू नये, पोलिसांची भावना
पणजी:गोव्यातील गोवा मेडिकल कॉलेज मध्ये काल आढळून आलेल्या कोरोनाग्रस्त रुग्णाने न्यूयॉर्क ते मुंबई आणि 22 मार्च रोजी विस्ताराच्या UK861 विमानाने मुंबई ते गोवा असा प्रवास केला आहे.त्या रुग्णा सोबत ज्यानी प्रवास केला होता आणि जे सध्या गोव्यात आहेत त्यांनी 104 या हेल्पलाइन नंबर वर किंवा 0832-2421810/2225538 या नंबरवर संपर्क साधावा किंवा जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्राला त्वरित भेट द्यावी,असे आवाहन आरोग्य संचालकांतर्फे करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात कोरोनाबाधितांचा आकडा 215 वर पोहोचला आहे. 12 तासात 12 नव्या रुग्णांची भर पडली आहे. पुणे 5, मुंबई 3, नागपूर 2, कोल्हापूर 1 आणि नाशिकमध्ये 1 नवे रुग्ण सापडले आहेत.
कोल्हापूर : कोरोना कक्षातील एक संशयिताचा सीपीआरमध्ये मृत्यू,

मृत संशयित हातकणंगले तालुक्यातील
,
स्वॅब पुण्याला पाठवले, मात्र अहवाल अद्याप नाही
,
अहवाल आल्यानंतरच मृत्यूच नेमकं कारण होणार स्पष्ट
,
कोरोना कक्षात मृत्यू झाल्याने खळबळ
नागपूरमध्ये 2 कोरोना संक्रमित रुग्ण वाढले असून आता कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 16 झाली आहे. नागपूरमधील एक व्यापारी दिल्लीतून नागपूरला आल्यानंतर 25 मार्चला त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं. त्याच्या संपर्कात आलेल्या दोन रुग्णांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आहेत.
पुण्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 39वर पोहोचली असून महाराष्ट्रात एकूण 207 कोरोनाग्रस्त आहेत. पुण्यात आणखी दोन कोरोना बाधित आढळले आहेत. एक पुरूष आणि एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्ही रूग्ण पुण्यातील मार्केट यार्ड परिसरातील रहिवाशी आहेत.
मिरा रोडमध्ये एका रुग्णाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मात्र मिरा रोडच्या खाजगी लॅबचा रिपोर्ट असून कस्तुरबा रुग्णालयाकडून तपासणी अहवाल येणं बाकी आहे. रुग्ण काल स्वतःहून मुंबईच्या कोकीळाबेन रुग्णालयात दाखल झाला होता. सध्या याच हॉस्पिटल्समध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत. हा रुग्ण गेल्या काही दिवसापासून कर्करोग आणि मधुमेहामुळे त्रस्त होता. आठ दिवसापूर्वी त्याला निमोनिया झाल्यामुळे मिरा रोडच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णात करोनाची लक्षणंही दिसून आली. त्यामुळे रुग्णालयाकडून रुग्णाची कॉवीड -19 तपासणी करण्यात आली. त्या अहवालात रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आला. मात्र आता कस्तुरबा रुग्णालयाचा अहवाल येण बाकी आहे. त्या रुग्णाच्या पाच कुटुंबियांना ही कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांचीही कोरोनाची चाचणी करण्यात येणार आहे. पॉझिटीव्ह आढळ्यास त्यांना कस्तुरबात दाखल करण्यात येणार आहे. तर रिपोर्ट निगेटिव्ह आढळल्यास त्यांना होम कोरन्टाईन करण्यात येणार असल्याचं मिरा भाईंदर महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी सांगितलं आहे.

पार्श्वभूमी

बुलडाणा : कोरोनाचे संकट आता शहरातून खेड्यापर्यंत पोहचलं आहे. बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात आयसोलेशन कक्षामध्ये शनिवारी सकाळी ठेवण्यात आलेल्या एका 46 वर्षीय व्यक्तीचा अवघ्या तासाभरातच उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बुलडाणा शहरातीलच एका खासगी रुग्णालयामध्ये गेल्या तीन दिवसांपूर्वी त्याच्यावर उपचार होते सुरू. त्याचा निमोनिया अधिक वाढत गेला. त्यामुळे त्याची प्रकृती ढासळली होती. परिणामी राज्यात आतापर्यंत बळींची संख्या आठ झाली आहे.

प्रकृती खालवल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले होते. येथे तो आयसोलेशनमध्ये असतानाच तासाभरात त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी खबरदारीची उपाययोजना म्हणून त्याचे स्वॅब नमुने तातडीने नागपूर येथे विषाणू तपासणी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल आज आला असून तो रुग्ण पॉझिटिव्ह निघाला होता. याअगोदर एका 40 वर्षीय महिलेचा मुंबईत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. काल शनिवारी या माहिलेला छातीत दुखू लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी तिचा मृत्यू झाला आहे. या महिलेची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे रिपोर्टमध्ये स्पष्ट झाले आहे. मुंबईत आतापर्यंत कोरोनानं 5 बळी घेतले आहेत. तर मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातून मुंबईत उपचारासाठी आलेल्यांपैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

CoronaUpdate | ही आणीबाणीची स्थिती, कोरोनाविरोधातील लढाईत सर्वजण एकवटल्याचं समाधान : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्यात कोरोना संक्रमितांचा आकडा वाढतोय
महाराष्ट्र राज्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 196 झाली आहे. यामध्ये मुंबई व ठाणे परिसर 107, पुणे 37, नागपूर 13, अहमदनगर 03, रत्नागिरी 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03, मिरज 25, सातारा 02, सिंधुदुर्ग 01, कोल्हापूर 01, जळगाव 01, बुलढाणा 01असा तपशील आहे. राज्यातील मुंबई 14, पुणे 15, नागपूर 01, औरंगाबाद 01, यवतमाळ 03 असे 34 सदस्य बरे होऊन रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. आत्ता 155 जणांवर उपचार सुरू आहेत. तर, देशात कोरोना बाधितांच्या संख्येने हजारचा टप्पा पूर्ण केला आहे. देशात आत्ताच्या घडीला 1050 कोरोनाचे रुग्ण आहेत. यात सर्वाधिक 196 महाराष्ट्रात आहे. त्याखालोखाल केरळमध्ये 182 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून केंद्र सरकारने देशात लॉकडाऊन जाहीर केलं आहे. यातून अत्यावश्यक सेवांना वगळ्यात आलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.