- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
Coronavirus in Maharashtra Live Update | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 90 हजारांवर ; आज 1663 रुग्ण कोरोनामुक्त
Coronavirus in Maharashtra Live Update | महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा 90 हजारांवर ; आज 1663 रुग्ण कोरोनामुक्त
Coronavirus Live Update : राज्यात सोमवारी (8 जून) 1661 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 40,975 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. सोमवारी कोरोनाच्या 2553 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 88 हजार 528 इतका झाला आहे. त्यापैकी सध्या 44 हजार 374 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील बाधित रुग्णांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
09 Jun 2020 11:06 PM
धुळे जिल्ह्यात 21 रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह , जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 315 वर
LIVE UPDATE | राज्य सरकारचा चक्रीवादळग्रस्तांना दिलासा, एनडीआरएफच्या नियमांपेक्षा जास्त मदत करणार, नुकसान झालेल्यांना 10 हजार रोख रक्कम देणार, पूर्ण नष्ट झालेल्या घराला दीड लाखांची मदत मिळणार, यापूर्वी 95 हजार मिळत होते : विजय वडेट्टीवार
शिर्डी : नायब तहसीलदार विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, परवानगी न घेता जिल्हा बंदीचं उल्लंघन केल्याचा गुन्हा दाखल, कालच आढळले होते कोरोना पॉझिटिव्ह, सध्या पूणे येथे उपचार सुरू, 8 दिवसापूर्वी परवानगी न घेता गेले होते पुण्याला, सहायक पोलीस उप निरीक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2259 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 90,787 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 120 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1663 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
4 जूनच्या मुंबई नागपूर इंडिगोमधून आलेली एक व्यक्ती पॉझिटिव्ह निघाली. या आधी ही चंद्रपूर जिल्यात राहणारी एक मुंबई रिटर्न व्यक्ती पॉझिटिव्ह आली होती. ही दुसरी व्यक्ती ही चंद्रपूर जिल्यातील ब्राह्मपुरीची आहे. आता टेस्ट रिझल्ट पॉझिटिव्ह आल्यामुळे या विमानातीन जे इतर 161 लोक आले होते. ते वेगवेगळ्या जिल्यातील होते. त्यांना संपर्क करणे सुरू आहे.
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद गरजू नाट्यकर्मींना करणार 1 कोटी 20 लाखांची मदत
केली. या मदतीचा लाभ 50 व्यवस्थापक, 30 बुकिंग क्लार्क, 150 कलाकार, 30 निर्माते तसेच आठशेहून अधिक रंगमंच कामगार, डोअर किपर, बुकींग क्लार्क यांना होणार आहे.
सोलापूर ग्रामीण भागात समाधानकारक बातमी, आज प्राप्त झालेले ग्रामीण भागातील सर्व अहवाल निगेटिव्ह, कोणाचाही कोरोनामुळे मृत्यू नाही, आतापर्यंत सोलापूर शहर वगळून ग्रामीण भागातील 82 जण कोरोनाबाधित, आज 2 रुग्णांना डिस्चार्ज, आतापर्यंत 33 रुग्णांनी केली कोरोनावर मात, उर्वरित 43 जणांवर उपचार सुरू
अहमदनगर : जिल्ह्यात 6 नवीन रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहेत.
संगमनेर शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे.
राहाता तालुक्यातील दोघेजण कोरोना बाधित आहेत,
तर नगर शहरातील माळीवाडा येथील 69 वर्षीय व्यक्ती कोरोना बाधित आढळून आली आहे. त्यामुळे
अहमदनगर जिल्ह्याची रुग्ण संख्या 223 वर पोहचली आहे.
आर्सेनिक अल्बम 30 च्या जादा गोळ्या न दिल्याच्या रागातून आशा स्वयंसेविकेला बेदम मारहाण केल्याची घटना कोल्हापूरमध्ये घडली आहे. करवीर तालुक्यातील खाटांगळे इथे महिला ग्रामपंचायत सदस्यासह कुटुंबीयांकडून आशा स्वयंसेविकेला मारहाण झाली. या प्रकरणी करवीर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे. या चौघांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आशा गट प्रवर्तक युनियनने काम बंद आंदोलन सुरु केलं आहे.
पालघर ग्रामीणमध्ये कोरोनाचा कहर सुरुच आहे. आज पुन्हा नवीन 13 रुग्ण आढळून आले आहेत. ग्रामीणचा आकडा 193 वर पोहोचला असून आत्तापर्यंत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 78 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून 109 जणांवर उपचार सुरु आहेत.पालघर जिल्ह्यात कोरोना बाबतची चिंता दिवसेंदिवस वाढत असून कोरोना बाधितांचा आकडा 1301 वर पोचला असून वसई विरार महानगर पालिका क्षेत्रासह पालघर ग्रामीणच्याही चिंतेत भर पडली आहे. तर आत्तापर्यंत 44 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 696 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे सध्या 561 जणांवर उपचार सुरु आहेत.
पालघर जिल्हयातील प्राथमिक, माध्यमिक शाळा तसेच आश्रमशाळा सुरु करण्याबाबत शिक्षणाधिकारी ( प्राथमिक / माध्यमिक ) यांनी मुख्यालयात उपस्थित असलेल्या शिक्षकांचा आढावा घ्यावा, विद्यार्थ्यांना पाठयपुस्तकांचे वाटप वेळेत करावे. टप्पानिहाय शाळा सुरु करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यात येणार आहे. सर्व शाळांचे आणि आवारांचे निर्जंतुकीकरण करण्याबाबत संबंधिताना सूचना देण्यात आल्या असल्याचं जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले. शाळा सुरु झाल्यांनतर विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणीकरिता थर्मल स्कॅनर उपलब्ध करुन घेणे, हॅन्ड वॉश स्टेशन तयार करण्याबाबत इत्यादी सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्याचप्रमाणे शाळा सुरु झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांनी सॅनिटायझर, मास्क वापर करण्याविषयी शाळांना सूचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी सांगितले.
शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या कोरोनाग्रस्त वृद्धाचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर आढळल्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर आणि आरोग्य समितीचे अध्यक्ष अमेय घोले दुपारी 12 वाजता शताब्दी रुग्णालयात जाणार आहेत.
वसई-विरार : गेल्या 24 तासांत 94 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 32 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.
94 जणांनी एकाच वेळी कोरोनावर मात करण्याची 12 आठवड्यातील दुसरी घटना आहे.
वसई विरार क्षेत्रात आजरोजी 1108 एवढे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी 38 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 619 जणांनी कोरोनावर मात केली आहे. उर्वरित 451 जण सध्या कोरोनावर उपचार घेत आहेत.
नालासोपारा पूर्व 30, नालासोपारा पश्चिम 07, विरार पूर्व 28, विरार पश्चिम 10, वसई पूर्व 09, वसई पश्चिम 08 , नायगाव पश्चिम 02 अशा 94 जणांनी 24 तासात कोरोनावर मात केली आहे.
मुंबई : शताब्दी रुग्णालयातून बेपत्ता झालेल्या 80 वर्षीय आजोबांचा मृतदेह बोरिवली स्टेशनवर सापडला. काल पहाटेपासून हे आजोबा बेपत्ता होते. कोरोना पॉझिटिव्ह असल्याने त्यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु होते. रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे आजोबांचा जीव गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 72 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यात 26 महिला आणि 46 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2141 झाली आहे. त्यापैकी 1253 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 108 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सध्या 780 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
औरंगाबाद : औरंगाबादमध्ये एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाने रुग्णालयातून पळ काढला. गणेश नगर येथील 38 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णावर घाटीतील आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. त्याने आज सकाळी साडेसहाच्या सुमारास धूम ठोकली. प्रवेशद्वारावर सुरक्षा रक्षक असताना त्यांना चकवा देऊन कोरोनाबाधित रुग्ण पळून गेल्याने एकच खळबळ उडाली आहे. या रुग्णाविरोधात बेगमपुरा पोलिसांत तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरु आहे.
यवतमाळ : महागाव इथल्या कोविड सेंटरमध्ये क्वॉरन्टाईन असलेल्या काही जणांच्या डान्सचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. क्वॉरन्टाईन असलेल्या चौघांनी डॉन चित्रपटातील खईके पान बनारस वाला या गाण्यावर डान्स केला. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सगळ्यांना धारेवर धरलं. आता त्यांच्यावर काय कारवाई होते हे पाहणे महत्त्वाचं आहे. दरम्यान महागावमधल्या एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आल्याने 52 जणांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे.
नागपूर : नागपुरात रात्रभरात 21 कोरोनाबाधित रुग्ण वाढले. यापैकी बहुतांश रुग्ण कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या नाईक तलाव परिसरातील आहेत. त्यामुळे नागपूरमधील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 739 झाली आहे. त्यापैक 493 रुग्ण बरे झाले आहेत तर 12 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
नाशिक : नाशिक जिल्ह्यात रात्रभरात 10 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामध्ये नाशिक शहरातील 7 तर मालेगावातील तिघांचा समावेश आहे. दरम्यान नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात 52 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून दोघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1640 वर पोहोचली आहे. त्यापैकी 1066 जण कोरोनामुक्त झाले असून 475 जणांवर सध्या उपाचार सुरु आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात 99 जणांचा मृत्यू झाला आहे.
सोलापुरात 24 तासात 33 कोरोबाधित रुग्णांची नोंद, आतापर्यंत 1221 जणांना कोरोनाची लागण, दिलासादायक बाब 24 तासात 55 रुग्ण कोरोनामुक्त तर आतापर्यंत 694 रुग्णांची कोरोनावर मात, उर्वरित 412 रुग्णांवर उपचार सुरू, आज 8 जणांचा मृत्यू तर आतापर्यत 115 जणांचा मृत्यू
पुण्यातील औंध-बाणेर रस्त्यावरील परिहार चौकात नऊ दुकाने चोरट्यांनी एका रात्रीतून फोडली, हजारो रुपयांचा ऐवज लंपास, एका किराणा मालाच्या दुकानातून गल्ल्यात ठेवलेले 27,500 रुपयांची रोकड आणि इतर माल असा 54500 रुपयांचा मुद्देमाल लांबवला, चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
आनंदाची बातमी, उस्मानाबाद जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नाही
कोल्हापूर जिल्ह्यात आज नवीन 4 कोरोनाचे रुग्ण, एकूण संख्या 684 वर पोहचली, आतापर्यंत 472 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज, तर आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, जिल्ह्यात एकूण 204 रुग्णांवर उपचार सुरू
शेतकऱ्यांना पिक कर्ज मिळत नाही अशी तक्रार आली नाही पाहिजे, राष्ट्रीयकृत बँकांच्या प्रत्येक शाखांपर्यंत शासनाचे निर्देश पोहचावा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2553 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 88,528 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 109 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कोल्हापूर : राज्य सरकारचा आदेश येत नाही तोपर्यंत अंबाबाईचे मंदिर भक्तांसाठी उघडले जाणार नाही, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांची माहिती, आदेश आल्यानंतर सोशल डिस्टनसिंगचे पालन करून भक्तांना आत सोडणार, स्थानिक भाविकांसाठी आणि बाहेरील भाविकांसाठी वेगळी रांग असेल, टप्प्याटप्प्याने भाविकांना आत सोडलं जाणार- महेश जाधव, 18 मार्चपासून अंबाबाईचे मंदिर भक्तांसाठी बंद आहे
फरार नीरव मोदीच्या संपत्तीच्या जप्तीचे आदेश मुंबई विशेष न्यायालयाने दिले आहेत. आर्थिक गुन्हेगार कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात येणार आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2553 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 88,528 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 109 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1661 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नाशिक : दिवसभरात जिल्ह्यात 25 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर दोघांचा मृत्यू, मालेगावात 17, नाशिक शहर 4 तर नाशिक ग्रामीणमध्ये 4 रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1613 तर 1066 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 99 मृत्यू
बीड : पहिल्या कोरोना विषाणू चाचणीसाठी स्वॅब तपासणी प्रयोगशाळा अंबाजोगाईतील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सुरु, आज या प्रयोगशाळेचे उद्घाटन बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते पार पडलं, विशेष म्हणजे कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटनच्या कार्यक्रमावेळी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कार्यक्रमाला धनंजय मुंडे, बीडचे जिल्हाधिकारी राहुल रेखावर आणि हॉस्पिटलचे डीनसोबतच आमदार संजय दौंड हजर
सिंधुदुर्ग : तळकोकणात गडगडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी, दोन दिवस विश्रांतीनंतर आज दुपारपासून पुन्हा पावसाला सुरुवात, जिल्ह्यात 1 जूनपासून आतापर्यंत 241 मिमी पाऊस पडला असून सर्वाधिक पाऊस देवगड तालुक्यात पडला असल्याची हवामान विभागाची माहिती, जिल्ह्यात 8 ते 12 जूनपर्यंत गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याचा हवामान विभागाच अंदाज
अकोल्यात हरिहरपेठमध्ये मंगेश यादव नामक युवकाची हत्या केली. अकोला शहर पुन्हा एकाच्या खूनाने हादरले. अकोला शहरातील जुने शहर हरिहरपेठ येथील शितळामाता मंदिराजवळ सटका नाल्याच्यावर मंगेश यादव नामक इसमाची हत्या करण्यात आली. हत्या करणारे आरोपी फरार झाले असून हत्येचे नेमके कारण समजू शकले नाही. पुढील तपास जुने शहर पोलीस करीत आहे.
'निसर्ग' चक्रीवादळाने कोकणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून या नुकसानीच्या पाहणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार हे दोन दिवस कोकण दौरा करणार आहेत.
दिनांक ९ जून रोजी रायगड आणि १० जूनला रत्नागिरी जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन संपूर्ण माहिती जाणून घेणार आहेत.
लॉकडाऊनमध्ये एसटी महामंडळाने अत्यावश्यक सेवा म्हणून आपली सेवा बजावलेली आहे. यामध्ये प्रामुख्याने मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेसाठी काम करणाऱ्या लोकांसाठी एसटी महामंडळाने आपली सेवा दिलेली आहे. आजपासून लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता मिळत असल्यामुळे सरकारी तसेच खाजगी क्षेत्रातील 15 टक्के कर्मचारी आपल्या कार्यालयांमध्ये कामासाठी रुजू होत आहेत. या कर्मचाऱ्यांना आपल्या कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचता यावं यासाठी एसटी महामंडळानं 250 अधिक गाड्या रस्त्यावर उतरवल्या आहेत. आज सकाळपासून मुंबईसह इतर जिल्ह्यांमध्ये या एसटी बसेस धावत असून त्यांना कर्मचाऱ्यांकडून ही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे बंद होती. ती आजपासून सुरु झाले आहेत. शहराचे ग्रामदैवत असलेल्या गणपती मंदिर आजपासून भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. आज सकाळपासून मंदिरात भाविक दर्शनासाठी येत होते. योग्य अंतर ठेवत काळजी घेत आजपासून दर्शन सुरू करण्यात आले आहे. गेल्या तीन महिन्यापासून सुनं असलेली मंदिरे गजबजू लागले आहेत. मंदिराच्या बाहेर फुल विक्रेते आणि नारळ विक्रेत्यांचे दुकाने ही आज पासून सुरु झाले आहेत.
साताऱ्यात आज 10 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 631 झाली असून त्यापैकी 331 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
दहशत पसरवण्याच्या हेतूने एका टोळक्याने पुण्यातील बिबवेवाडी परिसरात रस्त्यांवर पार्क केलेल्या वाहनांची तोडफोड केली. रविवारी (7 जून) रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. बिबवेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी चार अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बिबवेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बकुळानगर परिसरात सार्वजनिक रस्त्यांवर ही वाहने पार्क केली होती. रविवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या काही टोळक्याने लाकडी दांडक्याने या वाहनांची तोडफोड करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये दोन दुचाकी, ऑटोरिक्षा, आणि ओम्नी व्हॅनचे नुकसान झाले आहे.
लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले असून अनेक सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी दिसून येत आहे. एकीकडे मुंबई लोकल बंद असताना खाजगी वाहन काढण्याशिवाय या कर्मचाऱ्यांकडे पर्याय उरला नाही. बेस्ट बसेस देखील सुरू झाल्या आहेत. मात्र त्यात मोजकेच प्रवासी घेत असल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर दिसून येत आहेत. ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी अशा शहरातून मुंबईला येण्यासाठी मुलुंडच्या आनंदनगर टोल नाक्यावर देखील वाहनांच्या रांगा आज सकाळपासून बघायला मिळत आहे. यावेळी नियमांचे पालन करण्याचे सरकारकडून आवाहन करण्यात आले आहे.
पुणे मेट्रोच्या येरवड्यातील लेबर कॅम्पमधील 17 कामगार कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. 400 कामगार राहण्याची क्षमता असलेला येरवडा लेबर कॅम्पमध्ये आता सध्या 70 जणं राहत होते. त्यातील 17 कामगार पाॅझीटीव्ह आले आहेत. त्यांना पालिकेच्या विविध क्वारंटाऊन सेंटरमध्ये एडमीट केलं आहे. यातील 1 वगळता बाकी सगळे असिम्पटोमॅटीक आहेत. हे 17 कामगार धरुन त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण 69 जणांच्या टेस्ट करण्यात आल्या. यातील 43 जणांच्या टेस्ट निगेटिव्ह आल्या आहेत. बाकीचे रिझल्ट यायचे आहेत. पुणे मेट्रोचे एकुण 16 लेबर कॅम्प आहेत. यामध्ये आत्ता 880 कामगार राहत आहे. लाॅकडाऊनच्या आधी 2843 कामगार होते. श्रमिक ट्रेन सुरु झाल्यावर अनेक कामगार आपआपल्या गावी परतले आहेत.
पुण्यात रात्रभरात 37 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील रुग्णांची संख्या 9574 पोहोचली असून आतापर्यंत 415 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमरावती जिल्ह्यात आज सकाळी दोन रुग्णांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या दोन्हीही महिला आहेत. जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 281 वर पोहोचला आहे. त्यापैकी 185 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 80 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत 16 रुग्णांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 45 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, यामध्ये 18 महिला आणि 27 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2065 वर. यापैकी 1224 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी. 104 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू. 737 रुग्णांवर उपचार सुरू .
नाशिक : रात्री प्राप्त झालेल्या अहवालात मालेगावात 3 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात 71 कोरोनाग्रस्त आणि 4 मृत्यूंची नोंद झाली आहे. दुसरीकडे नाशिक शहरात काल 61 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 1588 झाली आहे. यामध्ये नाशिक शहर 427, नाशिक ग्रामीण 260, मालेगाव 837, जिल्ह्या बाहेरील 64 जणांचा समावेश आहे. यापैकी 1046 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर सध्या 445 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान आतापर्यंत 97 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
कोरोनाव्हायरसमुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आलेली मंदिरे तब्बल 73 दिवसांनी भक्तांना दर्शनासाठी उघडण्यात आली आहेत. दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बेळगावातील कपिलेश्वर मंदिरात सोमवार असल्यामुळे सकाळपासून भाविकांनी दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावली होती. सनई, चौघडा वादनामुळे वातावरणात प्रसन्नता निर्माण झाली. मंदिराच्या प्रवेशद्वारात सुरक्षा रक्षक तैनात करुन मंदिरात येणाऱ्या भाविकांना हॅन्ड सॅनिटायझर देण्यात येत आहे. थर्मल स्क्रीनिंग करुन भक्तांना मंदिरात प्रवेश दिला जात आहे. मंदिरात फुले, फळे, नारळ, कापूर, उदबत्ती नेण्यास भक्तांना मनाई करण्यात आली आहे. मंदिरात येणाऱ्या भक्तांनी सोशल डिस्टन्सिंग आणि अन्य नियमांचे पालन करण्याचे आवाहन मंदिरातर्फे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील मंदिरे सोमवारपासून उघडली असली तरी सौंदत्ती यल्लमा आणि रायबाग तालुक्यातील मायक्का चिंचली देवस्थान 30 जूनपर्यंत बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
औरंगाबादच्या हर्सूल जेलमधील 29 कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांपैकी 2 कैदी पळाले आहेत. कीलेअर्क कोविड सेंटरमधील रुमच्या मागच्या खिडकीचे गज वाकवून काल रात्री उशिरा या कैद्यांनी पलायन केलं. या प्रकरणी जेल प्रशासनाकडून बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सोनू सूदने घेतली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट, चांगल्या कामासाठी माझ्या कायम शुभेच्छा म्हणत उद्धव ठाकरेंकडून शाबासकी, असंच काम करत राहण्यासाठी दिल्या शुभेच्छा, त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासोबत सोनू सूदची चर्चा
नाशिकमध्ये दिवसभरात 56 रुग्णांना कोरोनाची लागण, रुग्णसंख्या 1573 वर, नाशिक शहरातील आकडा 400 पार, तर नाशिक ग्रामीणमध्ये 260, मालेगावमध्ये 834, जिल्ह्याबाहेरील 64 रुग्ण, एकूण 1046 रुग्ण कोरोनामुक्त, तर 97 जणांना आतापर्यंत मृत्यू
नागपुरात आज पारडी परिसरात आठवडी बाजारात कुख्यात गुंड बाल्या वंजारीची सर्वांच्या देखत हत्या. संध्याकाळी बाजारात गर्दी असताना घटना घडल्याने गोंधळ. बाल्या वंजारीला मारल्यानंतर आरोपी तिथेच उभा राहिला. पोलिसांकडून अटक. जुन्या वैमनस्यातून हत्या झाल्याचा प्राथमिक संशय.
आज राज्यात 3007 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 91 रुग्णांचा मृत्यू, तर दिलासादायक बाब म्हणजे आज 1924 रुग्ण कोरोनामुक्त, तर आतापर्यंत एकूण 39,314 कोरोनाबाधित रुण बरे झाले, सध्या 43591 रुग्णांवर उपचार सुरु
कोरोना व्हायरस चाचणी अहवाल चुकीचा देणाऱ्या खासगी लॅबला नोटीस, थायरो केअर लॅबला ठाणे महानगरपालिका क्षेत्रात चाचण्या न करण्याचे महापालिका अतिरिक्त आयुक्तांचे आदेश,
औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दोन हजार पार, जिल्ह्यात आज 70 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, 31 महिला आणि 39 पुरुष रुग्णांचा समावेश, कोरोनाबाधितांची संख्या 2020 झाली असून यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले, तर 103 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, सध्या 737 रुग्णांवर उपचार सुरू
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी पुण्यात ज्या ठिकाणी विदेशी मालाची होळी केली होती. त्याच ठिकाणी चिनी मालाची होळी करून चीनचा निषेध करण्यात येणार आहे. भारतात कोरोना व्हायरस संसर्ग पसरण्यास चीन जबाबदार आहे. त्यामुळे चिनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. त्या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने हा निर्णय घेतला आहे..त्यानुसार उद्या दुपारी सावरकर स्मारक येथे चिनी मालाची होळी करण्यात येणार आहे.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह. माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आरपीएफच्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा. तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील एकाचा अहवाल कोरोना पॉसिटिव्ह. ग्रामीण भागातील आतापर्यंत 79 जणांचे अहवाल कोरोना पॉसिटिव्ह, तर 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू झालाय. आतापर्यंत 6 रुग्णांना डिस्चार्ज, उर्वरित 68 रुग्णांवर उपचार सुरू.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज 7 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथील आरपीएफच्या 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, तर दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील एकाला कोरोनाची लागण, ग्रामीण भागातील रुग्णांची संख्या 79 वर, तर 6 जणांचा आतापर्यंत मृत्यू, आतापर्यंत 6 रुग्णांना डिस्चार्ज, उर्वरित 68 रुग्णांवर उपचार सुरू
हिंगोलीतील इसापूर धरण क्षेत्रात मोरगव्हाण येथे पोहायला गेलेली तीन मुले पाण्यात बुडाली. तिन्ही मुलांचे मृतदेह सापडले आहेत. तिन्ही मुले उच्चशिक्षित असून एकाचा शोध सुरू आहे.
गोंदिया जिल्ह्यातील कवलेवाडा गावाजवळ असलेल्या नदीमध्ये अंघोळीला गेले असताना खोल पाण्याचा अंदाज न आल्याने दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला तर एक बचावला. मृत मुले ही तिरोडा तालुक्यातील काचेवानी येथील रेल्वे वसाहती मधील रहिवासी आहेत.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षांचे वेळा पत्रक जाहीर, 15 जुलै पासून होणार परीक्षा, उन्हाळी सत्राच्या लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, विद्यापीठाच्या www.muhs.ac.in संकेतस्थळावर वेळापत्रक
औरंगाबाद : कुत्र्याला मोटरसायकलला बांधून फरफटत नेणारे क्रांतीचौक पोलिसांच्या ताब्यात, गांधीनगरमध्ये राहणाऱ्या दोघे जणांना घेतले ताब्यात, घरच्या लोकांना कुत्रा चावला म्हणून नेले फरफटत
नागपूर : आयुक्त तुकाराम मुंढेंविरोधात तक्रार, मनीष मेश्राम नावाच्या व्यक्तीची गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार, रजवाडा सभागृहात 200 च्या वर लोकांची बैठक घेतली, कोरोना काळाच्या आदेशांचं पालन न केल्याची तक्रार
औरंगाबादेत उच्च रक्तदाब, तब्बल 120 किलो वजन आणि मधुमेह या व्याधींनी ग्रस्त कोरोनाबधित महिलेने कोरोनावर मात केली आहे.औरंगाबादच्या बेगमपुरा भागातील रहिवाशी असलेल्या या वृद्ध महिलेला सुरुवातीला ताप, सर्दी, खोकल्यासोबतच श्वसनाचा त्रास होत होता. या 60 वर्षीय महिलेला शहरातील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
तब्बल दोन आठवडे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. त्यांनी कोरोनावर मात केली . एमजीएमच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने संबंधित वृद्धेला डिस्चार्ज दिला.
यवतमाळ जिल्ह्यात आज तीन व्यक्तीचे कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण संख्या 157 गेली असून जिल्ह्यात सध्या 44 रुग्णांवर उपचार सुरु आहे. आतापर्यंत 111 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे.
जालना जिल्ह्यात 14 रुग्णांची वाढ झाली असून, एकूण आकडा 199 वर पोहचला आहे. आजपर्यंत 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, तर आजवर 88 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांची संख्या दोन हजार पार, जिल्ह्यात आज सकाळी 64 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 27 महिला आणि 37 पुरुष रुग्णांचा समावेश, कोरोनाबाधितांची संख्या एकूण 2014 झाली आहे. यापैकी 1184 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून 99 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू, 731 रुग्णांवर उपचार सुरू
आजपासून घरोघरी जाऊन पेपर पोहोचवण्यास सुरुवात झाली परंतु अजूनही मुंबईतील सोसायटयांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यामुळे अनेक सोसायट्यांमधील नागरिक ज्यांना पेपर हवे आहेत. ते सोसायटीच्या गेट वर येऊन पेपर घेत आहेत. परंतु पेपर विक्रेत्यांकडून मात्र नागरिकांनी निश्चित होऊन पेपर घ्यावेत असं आवाहन करण्यात येतं आहे. कारण पेपर येतानाचं पूर्णपणे सॅनिटाईझ होऊन येतं असतो. यासोबतच आम्ही देखील पूर्ण खबरदारी घेऊन पेपर घरपोच पोहचवण्यासाठी प्रयत्न करत आहोत अस विक्रेत्यांचं म्हणणं आहे
सोलापूर : महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी सोलापुरातील विडी उद्योग सुरू करण्याचा आदेश दिले होते. सोलापूर शहरातील विविध भागातील विडी उद्योग सुरू करताना कामगारांसाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात यावे असे आवाहन महापालिका आयुक्त यांनी केले होते. प्रत्येक विडी कामगारच्या घरी जाऊन कच्चा माल पुरवणे तसेच तयार माल आणणे याची संपूर्ण जबाबदारी कारखानदारांची असल्याचे या आदेशात नमूद करण्यात आले होते. सोबतच कर्मचारी यांना हँड ग्लोज, मास्क, सॅनिटीझर इत्यादीचा वापर करण्याचा सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र या अटी जाचक असून पूर्तता करता येणार नाही अशी भूमिका कारखानदारांनी घेतली आहे. त्यामुळे शहरातील कारखाने अद्याप सुरू झालेले नाही. यावर मनपा आयुक्त पी.शिवशंकर यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. लोकांचे रोजगार थांबू नये तसेच त्यांच्या आरोग्याची ही काळजी घेणे महत्वाचे असल्याने हे आदेश देण्यात आले आहेत. मात्र आदेशाचे पालन काही कारखानदार करत नाही आहेत. जर एका दिवसात कारखाने सुरू झाले नाही तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिला आहे.
राज्यभर पसरलेल्या कोरोनाच्या संकटामुळे यंदा आषाढी यात्रेच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करीत प्रशासनाने अगदी मोजक्या वारकर्यात मानाच्या सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना राज्यभरातून एकही वारकऱ्याला या काळात शहरात प्रवेश न देण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक पावले उचलायला सुरुवात केली असून शहरातील भाविकांच्या निवासासाठी असणारे सर्व ४५० मठ , धर्मशाळा , हॉटेल्स व इतर खाजगी ठिकाणांना नोटीस देऊन तपासणीला सुरुवात केली आहे . याशिवाय आता एकही नागरिकाला पंढरपुरात प्रवेशासाठी परवानगी न देण्याचे पात्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे .
राज्यात आतापर्यंत राज्यभरात 37 हजार 390 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. राज्यात काल कोरोनाच्या 2739 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 82 हजार 968 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 600 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
पार्श्वभूमी
Coronavirus in Maharashtra Live Update : राज्यात सोमवारी (8 जून) 1661 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 40,975 हजार 314 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. सोमवारी कोरोनाच्या 2553 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 88 हजार 528 इतका झाला आहे. त्यापैकी सध्या 44 हजार 374 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतील बाधित रुग्णांचा आकडा 50 हजारांवर गेला आहे.
सोमवारी नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 71 पुरुष तर 38 महिला आहेत. सोमवारी नोंद झालेल्या 109 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 59 रुग्ण आहेत तर 44 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 6 जण 40 वर्षांखालील आहे. या 91 रुग्णांपैकी 79 जणांमध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.
आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 5 लाख 64 हजार 331 नमुन्यांपैकी 88,528 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 64 हजार 726 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 760 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.