Coronavirus in Maharashtra Live Update | मुंबईत येत्या आठ तारखेपासून बेस्ट बस सेवा पूर्ववत होणार

राज्यात शुक्रवारी ( 05 जून ) 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होण्याचा वेग राज्यात वाढताना दिसत आहे. शुक्रवारी कोरोनाचे नवीन 2436 नवे रुग्णांची नोंद झाल्याने राज्यातील कोरोना संक्रमितांचा आकडा 80 हजार 229 इतका झाला आहे. पैकी सध्या 42 हजार 215 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 Jun 2020 06:21 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात शुक्रवारी ( 05 जून ) 1475 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 35 हजार 156 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे...More


मुंबईत 8 जून पासून बेस्ट पूर्ववत होणार आहे. अत्यावश्यक सेवांसोबतच इतर नागरिकांसाठीही बेस्ट सुरु होणार आहे.

राज्य शासनाच्या मिशन बिगीन अगेन मधील तीन टप्प्यातील नियमावलीनुसार पुढील वर्गातील व्यक्ती बेस्टनं प्रवास करु शकणार आहे.

1. अत्यावश्यक सेवांचे कर्मचारी (आधीही प्रवास करत होते)
2. सरकारी कार्यालयातील कर्मचारी
3. खाजगी कार्यालयातील कर्मचारी
4. दुकानदार
5. प्लंबर, इलेक्ट्रीशिअन अशा सुविधा देणाऱ्या कामगार वर्गाला प्रवास करता येणार आहे.

एका सीट वर एक प्रवासी अशा रितीने 30 प्रवासी बेस्टमधून प्रवास करतील

तर 5 प्रवाशांना उभं राहून प्रवास करण्याची परवानगी असणार आहे.