Coronavirus in Maharashtra Live Update | आरोग्यमंत्री जळगाव दौऱ्यावर, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आणि मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर दौरा

Coronavirus in Maharashtra Live Update : महाराष्ट्रात मंगळवारी (2 जून) 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, आज कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Jun 2020 11:25 PM
धुळे शहरात आणखी सहा रुग्ण पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 177 वर
नागपूर : आज कोरोनाचे 16 रुग्ण वाढले असून कोरोना रुग्णांची संख्या 599 झाली आहे.

आज सकाळी पॉझिटिव्ह आढळलेले सर्व 16 रुग्ण आधीच संस्थात्मक विलगीकरण कक्षात दाखल होते.

आता सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

नागपूरात आतापर्यंत 11 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून

400 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त ही झाले आहेत.
जळगाव जिल्ह्यातील कोरोनाबाधितांच्या वाढती संख्या आणि मृत्यूदराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे हे आज जळगावच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि आमदार-खासदार यांच्यासोबत त्यांनी आढावा बैठकीचं आयोजन केलं आहे. बैठक सुरु होण्यापूर्वी जिल्ह्यातील अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी त्यांना निवेदन देण्यासाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी निवेदनाचा अक्षरशः पाऊस पडला.
नांदेडमध्ये आज प्राप्त झालेल्या 101 अहवालांपैकी 89 जण कोरोना निगेटिव्ह आहेत. तर दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांमध्ये 41 वर्षांची महिला आणि 21 वर्षांच्या तरुणाचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 154 पोहोचली असून 126 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर उर्वरित 20 जणांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत आठ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात आज आणखी 36 नवे कोरोना रूग्ण आढळले. जिल्ह्याची रूग्णसंख्या 663 वर पोहोचली आहे. आतापर्यंत कोरोना मृतांची संख्या 34 वर पोहोचली असून 462 रूग्ण आतापर्यंत झालेत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 167 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
साताऱ्यात 15 जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 571 वर पोहोचला आहे. त्यापैकी 223 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. साताऱ्यात आतापर्यंत 24 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
अमरावतीत आज सकाळी चार जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये तीन महिला तर एक पुरुषाचा समावेश आहे. त्यामुळे अमरावतीमधील कोरोना रुग्णांची संख्या 253 वर पोहोचली आहे. त्यापैकी 146 जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर 96 जणांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 15 आहे.
नाशिक जिल्ह्यात काल दिवसभरात 38 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून दोघांचा मृत्यू झाला. कोरोनाची लागण झालेल्या 38 पैकी 21 जण शहरातील आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 1293 झाली आहे. मालेगाव 786, नाशिक शहर 250, नाशिक ग्रामीण 197, जिल्ह्याबाहेरील 60 रुग्ण आहेत. आतापर्यंत 872 रुग्ण बरे झाले झाले असून 346 रुग्णावर उपचार सुरु आहेत. तर जिल्ह्यातील मृतांचा आकडा 75 आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 47 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. औरंगाबादमधील कोरोनाबाधितांची संख्या 1696 वर पोहोचली आहे. यापैकी 1085 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 526 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 85 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
सोलापुरात आज सकाळी प्राप्त झालेल्या 156 अहवालांपैकी 116 जण कोरोना निगेटिव्ह असून 40 जण पॉझिटिव्ह आहेत. जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1080वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 90 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 447 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर उर्वरित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
हिंगोली जिल्ह्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस, गेल्या दोन दिवसापासून जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण, आज शेनगाव, वसमत, औंढा, हिंगोली, तालुक्यातील काही भागात पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, गेल्या दोन दिवसात झालेल्या वादळी वाऱ्याने झाडांचे, विद्युत पोल, घरांचे प्रचंड नुकसान
देशातल्या श्रीमंत देवस्थानापैकी एक असलेल्या साईबाबा संस्थानने अत्यावश्यक सेवा देणाऱ्या आपल्याकडील कंत्राटी कर्मचार्यांची 40% पगार कपात केली आहे. अगोदरच तुटपुंज्या पगारावर जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफसह सुरक्षा कर्मचारी यामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत.
मुंबई नागपूर इंडिगो विमानात आलेला व्यक्ती चंद्रपूरच्या राजुऱ्यात काल पॉझिटिव्ह निघाली होती. त्यामुळे इंडिगो फ्लाईटच्या त्या पूर्ण कृला क्वॉरंटाईन करायला प्रशासनाने निरोप दिला आहे. तसेच त्या विमानात असलेल्या 190 यात्रेकरूंना ही स्वतःला क्वॉरंटाईन करण्याचे संदेश गेले आहेत. रुग्ण हा 5 दिवस आधी आला होरा, पॉझिटिव्ह निघाला, त्यामुळे 5 दिवसांत बराच क्रू आणि लोक संपर्कात आले असू शकतात.
राज्य सरकारच्या विनंतीनंतर केरळने 100 जणांची एक टीम महाराष्ट्रात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 50 जणांची पहिली टीम मुंबईत पोहोचली आहे. त्यामुळे कोरोना विरोधातील लढ्यात आता महाराष्ट्रातील डॉक्टरांना केरळमधल्या डॉक्टर्स आणि नर्सेसची मदत होईल. केरळच्या डॉक्टर आणि परिचारिकांचे पहिले पथक सेव्हन हिल्स रुग्णालयात पोहोचल्याची माहिती केरळचे आरोग्यमंत्री थॉमस इसाक यांनी दिली. आणखी 50 डॉक्टर्स आणि परिचारिकांचे पथकही लवकरच मुंबईत दाखल होणार आहे.
महाराष्ट्रातल्या 162 निवासी डाॅक्टरांना कोरोनाची बाधा झाली आहे. मार्ड या निवासी डाॅक्टरांच्या संघटनेने ही माहिती संकलित केली आहे. कोरोना पाॅझीटिव्ह झालेले सर्व निवासी डाॅक्टर पुन्हा कामावर रूजू झाले आहेत. राज्यभरातील 18 वैद्यकीय महाविद्यालये आणि रुग्णालयात सुमारे 4 हजार 500 निवासी डॉक्टर कार्यरत आहेत. एमएआरडीकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत 152 निवासी डॉक्टरांना संसर्ग झाला आहे. किंग एडवर्ड मेमोरियल हॉस्पिटलमध्ये 30 लोकमान्य टिळक महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयात 65 आणि जेजे हॉस्पिटलमध्ये 35 आणि नायर रुग्णालयात 22 जणांना संसर्ग झाला आहे. याव्यतिरिक्त, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, कळवा येथे आठ आणि औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सोलापूर येथील डॉ. वैशंपायन मेमोरियल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रत्येकी एक प्रकरण आहे.
औरंगाबादमध्ये कोरोनामुळे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. शहागंज भागातील 54 वर्षीय पुरुष आणि गौतमनगर पिसादेवी भागातील 69 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. आतापर्यंत कोरोनामुळे 81 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सातारा जिल्ह्यातील पोलिसअधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबई सातारा महामार्गावरुन येणाऱ्यांची तपासणी करणाऱ्या पथकात संबंधित अधिकारी कार्यरत होते.
अकोल्यात आज आणखी आढळले 22 नवे कोरोना रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्याची रूग्णसंख्या 627 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 34 रुग्णांचा मृत्यू झाला असून 442 रूग्ण आतापर्यंत झालेत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 151 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या निकालाच्या निर्णयानंतर माजी शालेय शिक्षण मंत्री आणि भाजप आमदार आशिष शेलार यांनी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र दिल्यानंतर आशिष शेलार आज राज्यपाल यांची भेट घेण्यासाठी राजभवनावर जाणार आहे. विद्यापीठाच्या अंतिम वर्ष अंतिम सत्र परीक्षेबाबत सरकारने घेतलेल्या निर्णयात एटीऐटी आणि इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नावर चर्चा करणार आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक अट या निर्णयाने साधला जाणार का? यावर राज्यपालशी चर्चा करणार आहेत.
कोरोनामुळे शेतकरी आधीच डबघाईस आला असताना त्यात काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतात विद्युत पुरवठा करणारे 30 ते 40 पोल पडल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. सध्या शेतात हळद लागवडी साठी, कपाशीला पाणी देण्यासाठी आणि जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी अडचण निर्माण झाली आहे. पडलेल्या विद्युत पोलचा पंचमनाम न झाल्याने सेनगाव तालुक्यातील दाताडा बुद्रुक शिवारातील शेतकऱ्यांनी शेताच्या बांधावर काळ्या फिती लावून महावितरण विरोधात सकाळपासून आंदोलन सुरू केल आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यातून केली जात आहे. लॉकडाऊनचे सर्व नियम पळत मोजक्याच शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभाग घेतला.
सावंगी मेघे येथे उपचार घेत असलेली अमरावतीच्या धामणगाव मधील कोरोना बाधित युवती कोरोनामुक्त झाली होती. मात्र मेंदूज्वर आणि इतर आजारावर उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अजय डवले यांनी दिली.
जालना जिल्ह्यात कोरोनामुळे दुसरा मृत्यू झाला आहे. शहरातील 60 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. तर रात्रीतून 25 कोरोनाबाधित रुग्णांचीही वाढ झाली आहे. जालन्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 153 वर पोहोचली असून तर आजपर्यंत 49 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुण्यात रात्रभरात 31 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7857 झाली असून आतापर्यंत 4729 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर पुण्यात 345 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे
यवतमाळमध्ये संस्थांत्मक विलगीकरण कक्षात भरती असलेल्या 17 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या 17 पैकी 13 जण एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 145 झाली असून त्यामधील 106 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 36 आहे. तर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 3 आहे.
नांदेडमध्ये आज 52 जणांचे कोरोनाचे अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 47 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले असून दोन बालकं कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं आहे. कोरोनाबाधित वृद्ध दाम्पत्याच्या संपर्कात आल्याने या मुलांना लागण झाली. यामध्ये 7 वर्षांची मुलगी आणि 4 वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 151 झाली आहे. त्यापैकी 120 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. तर 23 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.
धुळे शहरात आणखी तीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. यामुळे धुळे शहरातील कोरोनाबाधित रुग्ण संख्या 107 वर पोहोचली आहे. तर धुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 167 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 83 जण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. अॅक्टिव्ह केसेस संख्या 64 आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 55 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये 24 महिला आणि 31 पुरुष रुग्णांचा समावेश आहे. यामुळे औरंगाबादमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 1642 वर पोहोचली आहे. यापैकी 1049 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 514 आहे. आतापर्यंत 79 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
परभणीत आज 4 कोरोनाबाधित रुग्णांची भर, मानवत तालुक्यातील 3 तर जिंतुर तालुक्यातील 1 जण कोरोनाबाधित, जिल्ह्यातील एकुण रुग्णसंख्या 86 वर, 25 जण कोरोनामुक्त तर 2 जणांचा मृत्यू,सध्या 59 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयाच्या सुरक्षारक्षकांनी एका व्यक्तीला मारहाण केली आहे. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे, हे सुरक्षारक्षक त्या माणसाला काठीने मारताना दिसत आहे. याबाबत घाटी प्रशासनाने त्या चारही सुरक्षारक्षकांना तातडीने निलंबित केलेले आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिलेले आहेत. मारहाण का झाली याबाबत एक समिती बनविण्यात आलेली आहे ती समिती उद्यापर्यंत या प्रकरणाची चौकशी करणार आहे.
विदर्भातील सर्व कोरोना योध्यांची चाचणी करण्याचे हायकोर्टाचे निर्देश. प्रत्येक कोरोना योद्ध्याचं आयुष्य मोलाचं आहे, त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबियांच्याही आरोग्याचा विचार व्हायला हवा. चाचणीबाबत आयसीएमआरच्या नियमावलीचा दाखला देत प्रशासन मांडत असलेल्या भूमिकेशी आम्ही सहमत नाही, असं हायकोर्टाने म्हटलं आहे.
बुलडाण्यात आज 8 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, जिल्ह्यातील रुग्णसंख्या आता 67 वर, कोरोनामुळे आतापर्यंत तिघांचा मृत्यू, एकूण 33 जणांना डिस्चार्ज
साताऱ्यात आज दिवसभरात पाच कोरोना संशयीतांचा मृत्यू. यातील एकाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असून चार जनांचे अहवाल प्रलंबित आहेत. तर आज दिवसभरात नवीन 22 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 538 वर. आजपर्यंत 179 रुग्ण बरे होऊन घरी सोडले.
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी सुरू असलेली शटल सर्विस विद्याविहार स्टेशनवर मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी रोखून धरली. गाडीमध्ये चढायला देखील जागा नसल्याने शटल थांबवून ठेवली. आधी लोकल सुरू करण्यात आली होती. त्याlदेखील कर्मचाऱ्यांची गर्दी होत असल्यामुळे त्याजागी शटल पुन्हा सुरू करण्यात आली होती. मात्र, या शटलच्या डब्यांमध्ये देखील उभे राहायला जागा नसल्याने सोशल डिस्टन्स कसे पाळणार? असा प्रश्न कर्मचारी विचारत आहे.
कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयातील कंत्राटी कामगारांचे सरकार विरोधात अनोखं आंदोलन. 30 कर्मचाऱ्यांनी रक्तदान करत राज्य सरकारचं मागण्यांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न. आरोग्य विभागात नोकर भरती करताना आमच्या कामाचा आणि शिक्षणाचा प्रथम विचार करण्याची मागणी.
राज्यातील सर्व शाळांना मराठी हा विषय सक्तीचा. पहिली व सहावी इयत्तेतील विद्यार्थ्यांना या शैक्षणिक वर्षांपासून (2020-21) मराठी भाषा सक्तीची असणार आहे.
पुण्यातील तुळशीबाग आजपासून सुरु करण्यात येईल असं सांगण्यात आलं होतं. पण पालिकेकडून आज अधिकृत परवानगी न मिळाल्यामुळे आज तुळशीबाग सुरु झाली नाही. आज संध्याकाळपर्यंत जर परवानगी मिळाली तर उद्यापासून तुळबागमधली दुकानं आळीपाळीने सुरु होतील, अशी माहिती तुळशीबाग व्यापारी महासंघाचे सचिव संजीव फडतरे यांनी दिली. तुळशीबागमधली सगळी दुकानं सुरु होणार नाहीत. दररोज 50 दुकानं आणि 50 स्टाॅल्स अशी एकूण 100 दुकानं रोज उघडण्याचा प्रस्ताव तुळशीबाग व्यापारी महासंघाने पालिकेकडे दिला आहे. यावेळी ग्राहकांची गर्दी होऊ नये म्हणून एका वेळेस एकाच ग्राहकाला दुकानात प्रवेश देणार असल्याचं महासंघाकडून सांगण्यात आलं आहे.
कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठीचे कोविड रुग्णालय शहराबाहेरील 65 एकर क्षेत्रात उभारण्याचा निर्णय आज नगरपालिकेच्या विशेष सभेत घेण्यात आला. अभूतपूर्व गोंधळात ह सभा झाली. हे हॉस्पटल उभारण्यावरुन दोन आमदारांमध्ये बराच कलगीतुरा रंगला होता. अखेर आज नगरपालिकेने हे हॉस्पिटल शहराबाहेर उभारुन नागरिकांच्या आरोग्याचे रक्षण करण्याचा निर्णय घेतला. अजून काही महिने कोरोनासोबतच जगावे लागणार असल्याने याची जागा शहराबाहेर निश्चित करण्यात आली आहे. या हॉस्पिटलसाठी अंदाजे 60 लाखांचा खर्च अपेक्षित असून 50 बेडचे हे हॉस्पिटल एक ते दीड महिन्यात उभारण्यात येणार आहे. आता यासाठी राज्य सरकार आमदार, खासदार निधी आणि नगरपालिकेचा निधी असा एकत्रित खर्च करण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. आज रोजी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा 287 झाला आहे. दिवसेंदिवस होणारी वाढ लक्षात घेता आता कुवारबांव येेथील सामाजिक न्याय भवन येथे नवे कोविड केअर सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यानंतर त्यांची कॅटेगरी केली जाते. जे रुग्ण कोरोनाबाधित होतील, ज्या रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह येतील पण त्यांना कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे, अशा रुग्णांना या नवीन कोविड केअर सेंटर दाखल केले जाणार आहे. या नव्या कोविड रुग्णालयात चार डॉक्टरांची नेमणूक केली असून चार स्टाफ नर्स देखील नियुक्त केल्या आहेत. शिवाय, अन्य स्टाफदेखील तात्काळ दिला आहे.

नागपूरमध्ये आज सकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये 13 कोरोनाबाधित रुग्ण वाढले आहेत. त्यामुळे एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 553 झाली आहे. हे सर्व रुग्ण आधीच संस्थात्मक विलगिकरण केंद्रात होते
नागपुरात आतापर्यंत 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून 390 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पालघर जिल्ह्यात कोरोनाचा आलेख वाढत आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज नवीन आठ रुग्ण वाढले. डहाणू,बोईसर,पालघर मध्ये नवीन रुग्ण आढळले आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आकडा 855 वर पोचला असून आत्ता पर्यंत 29 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 340 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 486 जणांवर उपचार सुरू आहेत. पालघर ग्रामीण मध्ये आज आठ नवीन रुग्ण वाढले असून संख्या 103 वर पोचली असून आत्ता पर्यंत 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 48 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे तर 52 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्यात रात्रभरात 55 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे पुण्यातील रुग्णांची संख्या 7805 पोहोचली आहेत. त्यापैकी 4502 जण कोरोनामुक्त झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत 337 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

अमरावतीत आज सकाळी 8 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सहा पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. अमरावतीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या 226 वर गेली आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे. 124
बरे होऊन घरी गेले आहेत.
नांदेड जिल्ह्यात कोरोनाचे तीन नव्याने रुग्ण आढळले. देगलूर नाका भागातील दोघे तर शिवाजीनगर भागातील एक जण आहे, नांदेडची रुग्णसंख्या 149 वर पोहचली. आजवर आठ जणांचा मृत्यू झाला आहे. तर 103 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे.
काल सायंकाळी तासगाव तालुक्यातील काही भागात मुसळधार पावसाबरोबरच गारपीट झाल्याने द्राक्ष बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षाच्या काड्या मोडून पडाल्या.

तासगाव तालुक्यातील बस्तवडे, गौरगाव, वायफळे येथे गारपीट झाली .

परभणी शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून सर्वत्र रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. शिवाय पहाटेपासून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत यामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांचं किडनीच्या आजारानं निधन झालं आहे. वयाच्या अवघ्या 42 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकाली निधनानं बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.
केरळमधील टीव्हीएम मेडिकल कॉलेजचे उप अधीक्षक संतोष कुमार यांच्या नेतृत्वात 100 डॉक्टर आणि परिचारिकांचे वैद्यकीय पथक महाराष्ट्रात दाखल होणार. कोविड 19 च्या विरोधात मुंबईतील डॉक्टरांना हे पथक मदत करणार आहे. एक पथक आधीच सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पोहोचले हे. सीमा नसलेले डॉक्टर!

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 285 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 337, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7750, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 4502

पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 285 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 8 कोरोनाबाधितांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांची संख्या 337, पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7750, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 4502
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 285 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली. 8 कोरोना बाधीतांचा मृत्यू. एकूण मृतांची संख्या 337. पुणे जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या 7750 वर गेली आहे.
राज्यात आज 1248 रुग्ण कोरोनामुक्त, राज्यात आजपर्यंत एकूण 29329 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले, आज राज्यात 2487 नवीन रुग्णांचे निदान, राज्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
शिवसेना आमदार रमेश कोरगांवकर यांच्या आईचं निधन
नागपूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस
आज लॉकडाऊन शब्द कचरा पेटीत टाकायला मी आलो आहे : मुख्यमंत्री
नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात कोरोनाने घेतला पहिला बळी. सकाळी मृत्यू झालेल्या 62 वर्षीय महिलेचा रिपोर्ट संध्याकाळी पॉझिटिव्ह. नांदगाव शहरात कोरोना बधितांची संख्या 5 असून त्यात एकाचा आज मृत्यू झाला तर 4 रुग्णांवर उपचार सुरू आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज संध्याकाळी साडेआठ वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहे.
अमरावती चिखलदरा तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल टेब्रुंसोडा सर्कल मधिल वस्तापूर या गावात आज दुपारी अचानक चक्री वादळ आणि पाऊस आला. या चक्रीवादळाने येथिल 82 घरांवरचे छते उडालेली आहे. तसेच घरांमधील जिवनावश्यक वस्तू पाण्याने भिजल्या. या चक्री वादळामुळे नुकसान झालेल्या नागरिकांना तात्काळ मदत देण्यात यावी अशी मागणी होत आहे..
केंद्राच्या गाईडलाईन्स नंतर राज्य सरकारकडून मिशन बिगीन अगेन.
लॉकडाऊन 5.0 च्या राज्य सरकारकडून गाईडलाईन्स जारी.
रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत कर्फ्यू.
रेड झोनमध्ये सायकलिंग, जॉगिंग, वॉक करण्याची परवानगी.
30 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढवला असला तरी तीन टप्प्यात नियम शिथिल होत जाणार आहेत.

राज्यात टप्या टप्याने गोष्टी सुरू होणार
रेड झोनमध्ये
जॉगिंग वॉक, बाहेर गार्डन मध्ये जाऊन परवानगी
ग्रुपने जाता येणार नाही.
गॅरेज सुरू होणार, अपॉइंटमेंट घेऊन जावं लागणार
इलेक्ट्रीशीयन, प्लम्बर काम करू शकतात
शासकीय कार्यालय 15% उपस्थितीत सुरू होणार
हे 3 जून पासून सुरू होणार
यवतमाळ शहरालगत असलेल्या MIDC मध्ये गायत्री जिनिंगला भीषण आग. आगीत अंदाजे 500 क्विंटल कापूस जळून खाक. अंदाजे 20 लाखांचे नुकसान झाल्याची माहिती. मजूर काम करत असताना अचानकपणे आग लागली. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू.
शालेय शिक्षण विभाग बैठक महत्त्वाचे मुद्दे
• जून पासून शिक्षण सुरू करावे. शाळा च सुरू कराव्यात असे नाही.
• ऑनलाइन , ऑफलाइन अशा सर्व पद्धतीने शक्य आहे त्या प्रमाणे शिक्षण सुरू व्हावे.
• मुलांचे वर्ष वाया जाऊ देणार नाही.
• शिक्षण हे जीवनावश्यक आहे ते थांबू नये
• ज्या शाळा क्वारंटाईन करण्यासाठी ताब्यात घेतल्या होत्या त्यांचे शासन खर्चाने निर्जंतुकीकरण करून देण्यात येईल
• दुर्गम भागांत जिथे कनेक्टिविटी नाही आणि कोरोनाचा प्रादुर्भाव नाही अशा ठिकाणी सोशल डिस्टंसिंगचे नियम पाळून शाळा सुरू कराव्यात
• ज्या ठिकाणी फिजीकल शाळा सुरू करणे अडचणीचे आहे त्या ठिकाणी इतर पर्याय तसेच ऑनलाइन शिक्षण सुरू करावे
• जूनमध्ये कोणत्याही परिस्थितीत आपले शालेय वर्ष सुरू झालेच पाहिजे. आरोग्याची काळजी घेऊन जिथे शाळा सुरू करता येणे शक्य आहे तिथे त्या सुरू करणे तसेच जिथे ऑनलाईन शक्य आहे तिथे त्या पद्धतीने का होईना पण शिक्षण सुरू झाले पाहिजे.
• कोरोना सारख्या परिस्थितीत शिक्षणाला अडथळा येत नाही हे महाराष्टाने देशाला दाखवून द्यावे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
• गुगल प्लॅटफॉर्मचा प्रायोगिक स्तरावर वापर करावा मात्र स्वतंत्रपणे संगणकीय पद्धती विकसित करून ऑनलाईन शिक्षणाची मजबूत यंत्रणा दीर्घ काळासाठी विकसित करावी असेही ते म्हणाले
• आज त्यांनी व्हीसीद्वारे शालेय शिक्षण विभागाची बैठक घेतली . त्यात मंत्री वर्षा गायकवाड, राज्यमंत्री बच्चू कडू आमदार कपिल पाटील, अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्यासमवेत रघुनाथ माशेलकर, डॉ अनिल पाटील, अनिरुद्ध जाधव तसेच इतर शिक्षण तज्ञही उपस्थित होते
• 10 वर्षांत प्रथमच एखाद्या मुख्यमंत्र्यांनी तब्बल अडीच तीन तास शिक्षण विभागाचे प्रश्न ऐकून घेतले तसेच ते सोडविण्यासाठी आश्वस्त केल्याचे आमदार कपिल पाटील यावेळी म्हणाले.
• या बैठकीत विना अनुदानित संस्थांमधील शिक्षकांचे प्रश्न, शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे यावरही चर्चा झाली.

कोल्हापूर : उष्म्याने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना पावसाने दिला सुखद गारवा,

पावसाचे कोल्हापूरात आगमन,

शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी,

सकाळपासून उष्माने हैराण झालेल्या कोल्हापूरकरांना दिलासा
बीड जिल्ह्यात मागील पंधरा दिवसापासून कोरोनाचे रुग्ण आढळले होते .त्यात माजलगाव तालुक्यातील 15 रुग्णांचा समावेश होता,कवडगाव थडी, सुर्डी, हिवरा आणि नित्रुड येथील 12 जणांचा समावेश होता .या रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यानंतर रविवारी त्यांना सुट्टी देण्यात आली,यातील हिवरा येथील तरुणाची सुट्टी तीन दिवसांपूर्वी झाली होती तर इतर रुग्णांना आज सुट्टी देण्यात आली .टाळ्या वाजवून या रुग्णांचे ग्रामस्थांनी गावात स्वागत केले .
कोरोनाविरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, नर्स व वैद्यकीय कर्मचारी यांच्यासाठी पीपीई किट औषध दुकानांमधून उपलब्ध करून देण्यात आले असून पीपीई किट उपलब्ध असलेल्या राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील औषध दुकानांची यादी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाने जाहीर केली आहे.
पीपीई किटची उपलब्धता प्रत्येक जिल्ह्यात होण्यासाठी जिल्ह्यातील अन्न व औषध प्रशासनचे सहाय्यक आयुक्त (ड्रग्ज) हे यासाठी नोडल अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. पीपीई किटचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी विक्रेते व किट निर्मात्यांशी संपर्क साधण्याचे काम हे सहायक आयुक्त करणार आहेत, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने दिली आहे.
पीपीई किट वितरणामध्ये आणखी औषध दुकानदांना सहभागी होण्याची इच्छा असल्यास त्यांनी आपल्या जिल्ह्यातील सहायक आयुक्त (ड्रग्ज) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन विभागाने केले आहे.
मुंबई : कोरोनामुळे परळच्या राजाचा ऐतिहासिक निर्णय, 23 फुटांऐवजी 3 फुटांची मुर्ती, तसेच वर्गणी नाही, कोणताही गाजावाजा नाही, मंडळाचा निर्णय
सातारा : कॉरंन्टाईन असलेल्या व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या, महाबळेश्वरमधील एमटीडीसीतील कॉरंन्टाईन सेंटरमधील धक्कादायक घटना, आत्महत्येचे कारण अस्पष्ट, महाबळेश्वर पोलिस घटनास्थळी दाखल
उस्मानाबाद जिल्ह्यातली ह्या दोन घटना आहेत. कोरोना बाधित झालेल्या दोन रुग्णाच्या मृत्यूनंतर त्यांचा दफनविधी, अंत्यविधी करण्यास ग्रामस्थांनी विरोध केला. उमरगा तालुक्यातल्या बेडगा मधले एक रुग्ण मयत झाल्यानंतर उमरगा शहर आणि मूळ गावी बेडची येथे अंत्यविधी करण्यास नागरिकांनी विरोध केला. त्यामुळे 11 तासानंतर मयताच्या शेतामध्येच दफनविधी करण्यात आला. दुसरी घटना उस्मानाबाद तालुक्यातील कुंभार इटली आहे. हे साठ वर्षाचे मयत रुग्ण मुंबईहून आले होते. या रुग्णाचे निधन झाल्यानंतर शवविच्छेदनानंतर कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झालं. परंतु गावामधल्या मंडळींनी अंत्यविधी करण्यास गावात नकार दिला. नातलगही अंत्यविधीसाठी आले नाहीत. त्यामुळे मृतदेहावर नगरपालिकेचे कर्मचारी, पोलिस यांनी उस्मानाबाद शहरातल्या कपिलधार स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले.
बृहन्मुंबईतील करोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर आणि नर्सेस यांची आवश्यकता असल्याने त्यांना मानधन तत्वावर कोविड कालावधीसाठी घेण्यात यावे असे निर्देश वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आज दिले.

जे डॉक्टर 45 वर्षापेक्षा कमी आहेत आणि ज्यांना कुठलाही आजार नाही आणि ज्यांनी त्यांची इंटर्नशिप पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे अशा डॉक्टरांना मानधन तत्त्वावर कोविड कालावधीसाठी गरजेनुसार घेण्यात येणार आहे. या डॉक्टरांना दरमहा 80 हजार रुपये मानधन दिले जाईल. डॉक्टरां प्रमाणे फिजिशियन यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे. भूलतज्ञ आणि इंटेन्सिविस्ट यांना दरमहा दोन लाख रुपये मानधन देण्यात येणार आहे.
बृहन्मुंबईतील नर्सेसची कमतरता भरून काढण्यासाठी त्यांनाही मानधन तत्वावर घेण्यात येणार आहे . ज्यांनी बी.एसस्सी. किंवा जी.एन.एम. नर्सिंग कोर्स पूर्ण केला आहे आणि ज्यांच्याकडे रजिस्ट्रेशन आहे त्यांना दरमहा 30 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. डॉक्टर आणि नर्सेस यांना हे मानधन बृहन्मुंबई महानगरपालिके मार्फत देण्यात येणार आहे. पात्र डॉक्टरांनी https://forms.gle/PtCY3SvhvEA43WxV6 या गुगल सीटवर तसेच पात्र नर्सेस यांनी https://forms.gle/81LcWWajq1WNQ6cK8 या गुगल सीटवर अर्ज करावेत असे आवाहनह वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी केले आहे.
केंद्र सरकारने नुकत्याच घेतलेल्या निर्णयामुळे गावांमध्ये स्वयंरोजगार, लघु उद्योगांशी संबंधित मोठ्या शक्यताही निर्माण झाल्या आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मध्ये 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ही दरवाढ 1 जून पासून लागू करण्यात येणार आहे. पेट्रोल आणि डिझेल मधून राज्याला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो आणि त्याच पार्श्वभूमीवर हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आलेला आहे.
कोरोना महामारीच्या काळात, भारतवासीयांनी हे दाखवून दिले आहे की, सेवा आणि त्यागाची कल्पना ही केवळ आमचे आदर्श नाहीत, तर भारताची जीवनशैली आहे : पंतप्रधान नरेंद्र मोदी
अकोला शहरात 1 ते 6 जूनदरम्यान संपूर्ण लॉक डाऊन. 28 मे च्या निर्णयावर पालकमंत्री बच्चू कडूंचं शिक्कामोर्तब. दवाखाने, मेडीकल, कृषी केंद्र यांना सुट देण्यात आली आहे. दुध विक्रेत्यांना सकाळी 7 ते 9 या वेळेत परवानगी दिली आहे. अकोल्यात कोरोनाचा प्रकोप वाढत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला.

औरंगाबादमध्ये 42 कोरोना बाधित रुग्णांची वाढ, यामध्ये18 पुरुष तर 24 महिलांचा समावेश, औरंगाबादेत एकूण 1540 कोरोना बाधित रुग्ण, आतापर्यंत 976 रुग्णांची कोरोनावर मात तर 494 कोरोना बाधितांवर उपचार सुरू, आतापर्यंत कोरोनामुळे 70 रुग्णांचा मृत्यू
पुणे : पुण्यात रात्रभरात 92 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 7557 तर आत्तापर्यंत 329 कोरोना बाधितांचा मृत्यू, तर एकूण 4350 रुग्णांना डिस्चार्ज
सोलापुरात आज सकाळी प्राप्त अहवालातून 26 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न, तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू, सोलापुरातील कोरोनाबधितांचा एकूण आकडा 891 वर पोहोचला, तर आतापर्यंत एकूण कोरोनामुळे 84 जणांचा मृत्यू
ज्येष्ठ सर्वोदयी नेते, स्वातंत्र्यसेनानी ॲड. रामसिंह राजपूत यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. राजपूत यांचं विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात मोठे योगदान होते.

कोरोना संकटाचा सर्वात जास्त त्रास जर कोणाला झाला गरीब, मजूर, कामगार वर्गाला झाला आहे. त्यांचे दु: ख, त्यांचा त्रास , वेदना शब्दात सांगता येणार नाहीत : पंतप्रधान नरेंद्र मोदी
जालना जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे काल जिल्हा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. रात्री उशिरा अहवालात कोरोना असल्याचे निष्पन्न झाले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा पाचवा बळी, तर गडहिंग्लज तालुक्यातील तिसरा बळी, मृत व्यक्ती ही 60 वर्षीय असून 18 मे रोजी मुंबईतून हेब्बाळ या गावी आली होती,जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 562 वर पोहचली,

तर 132 जण आतापर्यंत उपचार घेऊन झाले कोरोनामुक्त
ज्येष्ठ सर्वोदयी नेते, स्वातंत्र्यसेनानी ॲड. रामसिंह राजपूत यांचं वृद्धापकाळाने निधन झाले. राजपूत यांचं विनोबा भावेंच्या भूदान आंदोलनात मोठे योगदान होते.
नाशिक : नाशिकमध्ये बिबट्याची दहशत कायम, अजूनही बिबट्या मोकाटच, आज मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांच्या संख्येत घट, रस्त्यांवर शुकशुकाट,काल ज्या सुयश हॉस्पिटलच्या आवारात बिबट्याचा वावर होता त्या हॉस्पिटलच्या सुरक्षारक्षक आणि कार्मचाऱ्यांमध्ये अजूनही भीतीचे वातावरण, रात्रभर देत होते गस्त, वनविभागाने तात्काळ बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी कर्मचाऱ्यांची मागणी
औरंगाबाद : गंगापूर शहरातील बुलढाणा अर्बनच्या गोदामाला आग, गोदामातीत धान्य जळून खाक,रात्री बारा वाजता लागली आग,अजूनही आग विझवण्याचं काम सुरु
जालना जिल्ह्यात कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. परतूर तालुक्यातील मापेगाव येथील 42 वर्षीय व्यक्तीचा कोरोनामुळे काल जिल्हा रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. रात्री उशिरा अहवालात कोरोना असल्याचे निष्पन्न झाले .
पालघर : वलसाड(गुजरात) जिल्ह्यातील तलवाडा मधील कंपनीला भीषण आग, कंपनीच्या बाजूला पेट्रोल पंप असल्याने लोकांनी व कर्मचाऱ्यांनी भयभीत होऊन काढला पळ, आगीचे कारण अस्पष्ट, अहमदाबाद-मुंबई हायवे जवळील घटना, अजूनही आग सुरूच असून अग्निशमन दलाच्या नऊ गाड्या घटनास्थळी असून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत
पुणे : पुण्यातील गुलटेकडी मुख्य मार्केट यार्डातील फळ आणि भाजीपाला आजपासून सुरू होणार, शनिवारी रात्रीपासून शेतमाल आवक सुरु होती. गेल्या 50 दिवसांपासून फळ आणि भाजीपाला बाजार ठप्प होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना राबवून आता बाजार सुरू झालाय. बाजारात 50 टक्केच व्यापारी कर्मचारी राहतील अशी व्यवस्था केलीय. त्यामुळं सर्वांना आता दररोज भाजीपाला फळं मिळणार आहेत. मार्केट यार्ड प्रशासन, अडते असोसिएशन, कामगार आणि वाहतूक संघटनांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
नागपुरात आज दिवसभरात 13 कोरोना बाधित रुग्ण वाढले. त्यामुळे एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 514 झाली. आज दोन कोरोना बाधित रुग्णांचा रुग्णालयात मृत्यू. त्यापैकी एक कोरोनाची लागण झालेला सीए रोड वरील भिक्षेकरी असून दुसरा रुग्ण लोकमान्य नगर परिसरातला 73 वर्षीय वृद्ध आहे.


शिर्डीत कोरोनाचा शिरकाव, एका महिलेला कोरोनाची लागण, निमगाव येथील भाजीविक्रेत्या महिलेच्या नात्यातील शिर्डीच्या एका महिलेला कोरोनाची लागण, शिर्डी शहर पुढील 14 दिवसांसाठी बंद, अहमदनगर जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा 131 वर
सोलापूरचा उपमहापौर राजेश काळेला अटक करण्यापूर्वीच सोडून देण्याची वेळ पिंपरी चिंचवड पोलिसांवर आलीये. अटकेची प्रक्रिया सुरू असताना काळेला ताप आणि शिंका येऊ लागल्या. काळेने कोरोनाची लक्षणं येत असल्याचं पोलिसांना सांगितले, मग काय पोलीस चक्रावले आणि काळेला नोटीस देऊन सोडण्यात आले. पण खरंच काळेला ताप आणि शिंका आल्या होत्या का? याबाबत शंका उपस्थित केल्या जातायेत. काळेला शुक्रवारी सोलापूर येथून पिंपरी चिंचवड पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. काळेने पिंपरी चिंचवडमधील त्याचा एक फ्लॅट 7 ते 8 जणांना विक्री केलेला आहे. याच प्रकरणाची चौकशी सुरू असताना काळेने हा बहाणा केल्याचं बोललं जातंय.
केंद्र सरकारकडून लॉकडाऊन 5 ची घोषणा, देशभरातील कंटेनमेंट झोनमध्ये 30 जूनपर्यंत लॉकडाऊन, कंटेनमेंट झोन वगळता इतर भागातील धार्मिक स्थळं, हॉटेल 8 जूननंतर सुरु करण्यास परवानगी
महानगरपालिकेच्या 6 विभागांमध्ये कोविड रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी आता 20 दिवसांवर. पूर्ण मुंबईचा रुग्णवाढ दुप्पट होण्याचा सरासरी कालावधी (डबलींग रेट) 13 वरुन आता 16 दिवस झाला आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील (रिकव्हरी रेट) 43 टक्के वाढला आहे.
पुणे जिल्ह्यात काल रात्री नऊ वाजल्यापासून तर आज चार वाजेपर्यंत नवीन 102 कोरोना बाधित रुग्णांची नोंद. तर 3 रुग्णांचा मृत्यू. पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 324 वर. जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 7416.
प्रसिद्ध अभिनेते सोनू सूद यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. स्थलांतरित लोकांना त्यांच्या मूळ राज्यात पोहचविण्यासाठी तसेच लाखो लोकांच्या भोजन व्यवस्थेसाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांची सूद यांनी राज्यपालांना माहिती दिली. राज्यपालांनी सूद यांचे कौतुक करून त्यांना त्यांच्या कार्यात सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

निर्जंतुकीकरणाच्या नावाखाली साध्या पाण्याची फवारणी करणाऱ्याविरुद्ध गुन्हा नोंद, हिमायतनगर पोलीस स्थानकात गुन्हा नोंद, हिमायतनगर सफाई ठेकेदार पल्लवी एंटरप्राइजेस यांच्या विरुद्ध गुन्हा नोंद, फवारणी करत असलेल्या पाण्यात सोडिअम हायपोक्लोराईड आढळून न आल्याचा प्रयोगशाळेने दिला अहवाल, अहवालानुसार फसवणूक आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये गुन्हा नोंद
कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत 536 रुग्ण कोरोना बाधित. आज दुपारपर्यंत 32 नवीन रुग्णांची वाढ. आज अखेर 118 रुग्णांना दिला डिस्चार्ज. तर जिल्ह्यात चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू.
सिल्लोड नगर परिषदेचा महत्त्वपूर्ण निर्णय. सार्वजनिक ठिकाणांवर थुंकणे, मास्क न वापरणाऱ्यांना 300 रुपये दंड. शिवाय वारंवार असे कृत्य करणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर गुन्हा देखील दाखल करणार. सिल्लोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी हा निर्णय घेतला आहे.
वंदे भारत उपक्रमांतर्गत महाराष्ट्रात 26 विमानांच्या माध्यमातून 3459 नागरिक परत आले आहेत. यात मुंबईतील प्रवाशांची संख्या 1137 आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवाशांची संख्या 1572 असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या 750 इतकी आहे. 7 जून 2020 पर्यंत साधारणत: आणखी सहा विमानं येणे अपेक्षित आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात ब्रिटन, सिंगापूर, फिलिपाईन्स, अमेरिका, बांग्लादेश, मलेशिया, कुवेत, इथियोपिया, अफगाणिस्तान, ओमान, दक्षिण अफ्रिका, इंडोनेशिया, नेदरलँड, जपान, श्रीलंका, म्यानमार, टांझानिया या देशातून प्रवासी आले आहेत.
नागपूर महापालिकेत एककलमी कारभार सुरु असल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असा दावा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. नागपूर महापालिकेत एककलमी नव्हे तर शासनाच्या नियमाप्रमाणे आणि कोरोना संदर्भातल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे काम सुरु असल्याचं मुंढे म्हणाले. नागपूर शहरातील कंटेन्मेंट झोन आणि क्वॉरन्टाईन सेंटर संदर्भात अनेक लोकप्रतिनिधी नागरिकांना चुकीची माहिती देत आहेत, असा आरोप तुकाराम मुंढे यांनी केला. कंटेन्मेंट झोनमध्ये 28 दिवस बंधनं ठेवण्याची शासनाच्या सूचना असून त्याप्रमाणे कारभार सुरु आहे. तसंच क्वॉरन्टाईन सेंटरमध्येही नागरिकांची पुरेशी काळजी घेतली जात असल्याचा दावा मुंढे यांनी केला.

परभणी- जिल्ह्यातील बांधकाम करण्यास परवानगी, 70 दिवसानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी दिली बांधकामास मुभा, सकाळी 7 ते 2 या कालावधीत करता येणार बांधकाम, कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठीच्या सर्व उपाययोजना करने बंधनकारक
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी पुन्हा एकदा रावसाहेब दानवे यांच्यावर टीका केली आहे. माझे फोन टॅप होत आहेत. मला कोण फोन करतं, मेसेज करतं याची सगळी माहिती केंद्रीय मंत्र्यांपर्यंत जाते मला कुणीही संपर्क करु नका, नाहीतर अडचणीत याल, असंही जाधव म्हणाले.

अकोल्यात आणखी सात नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 565 वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्या 30 झाली आहे. जिल्ह्यातील 388 रुग्ण आतापर्यंत कोरोनामुक्तक्त झाले असून सध्या 147 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
चंद्रपूर : दारू तस्करांचा पोलीस उपनिरीक्षकांवर हल्ला, रामनगर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक जीवन लाकडे यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत, महाकाली चौक परिसरात आरोपी अमित गुप्ताच्या चारचाकी गाडीतून 4 पेटी देशी दारू जप्त केल्यावर आरोपीने साथीदारांच्या मदतीने केला हल्ला, आरोपी फरार
अमरावतीत आज सकाळी 5 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आला असून जिल्ह्याती कोरोना रुग्णांची संख्या 208 वर गेली आहे. आतापर्यंत 116 जण उपचार घेऊन घरी परतले आहे. तर 15 जणांचा मृत्यू झाला आहे.
अकोला : लॉकडाउनमध्ये बाहेर फिरताना रोखल्याने युवकांडून चक्क पोलिसांनाच धमकी दिल्याचा प्रकार अकोटमध्ये पाहायला मिळाला. या परिसरात दिसल्यास परिणाम भोगयला तयार राहा, हातपाय तोडू अशी धमकी या युवकांनीनी पोलीसांना दिली आहे. अकोट शहर पोलिस स्टेशन हद्दितील शौकत अली चौक परिसरात पेट्रोलिंग करणाऱ्या दोन पोलिसांसोबत रात्री हा प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाचं व्हायरल होत आहे. मात्र, या प्रकरणात अद्यापही कुठल्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नाही.
पुण्यात सिंहगड परिसरात असलेल्या नवले हॉस्पिटलमध्ये डिसेंबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे पगार न मिळाल्याने आज सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.यामध्ये नर्स, हेल्पिंग स्टाफ या आंदोलनात सहभागी झाले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णाचा आकडा रोज वाढत आहे.या हॉस्पिटलमध्ये ८० कोरोनाबाधित रुग्ण उपचार घेत आहेत.तर ६० जण आयसोलेशनमध्ये आहेत. या हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांनी आज आंदोलन सुरु केल्यामुळे रुग्णांची सकाळपासून मोठी गैरसोय होत आहे. लॉकडाऊन काळात कामावर न आलेल्या जवळपास 150 जणांना कामावरुन काढून टाकले आहे. कर्मचाऱ्यांचे गेल्या अनेक महिन्यापासून पगार नसल्याने आश्वासन दिली जात आहेत. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु केलं.
जालना जिल्ह्यात आणखी 5 कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या एकूण 122 वर गेली असून आजवर 32 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सोलापुरात आज सकाळी 45 जणांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह तर नऊ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आता सोलापुरात कोरोनाबाधितांची संख्या 860 झाली आहे. मृतांचा आकडा 78 वर पोहोचला आहे. आतापर्यंत 351 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 500 च्या पार पोहोचली आहे. काल एकाच दिवसात नागपुरात 43 नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 501 झाली आहे. आतापर्यंत 362 जण कोरोनामुक्त झाले असून नऊ जणांचा मृत्यू झाला आहे.
बीड शहरातील संचारबंदी हटवली, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी रात्री दोन वाजता काढले आदेश, आजपासून सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेसहा वाजेपर्यंत सर्व दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
औरंगाबादमध्ये 28 कोरोना बाधित रुग्णाची वाढ, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 1487 वर गेली आहे. आतापर्यंत 937 रुग्णानी कोरोनावर मात केली आहे तर 481 कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे 69 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यात कोरोनाचे आणखी 8 नवे रुग्ण आढळले आहेत. मुंबईहुन आणि मुंबईच्या कोरोना बाधीत रुग्णांच्या संपर्कात आलेल्या आठ जणांचे अहवाल शुक्रवारी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. यात जत तालुक्यातील औंढी येथील 1, खानापूर तालुक्यातील करंजे येथील 1, कडेगाव मधील नेर्ली येथील 1 तर आंबेगाव येथील 2 जण , शिराळयाच्या रेड येथील 1 ,खिरवडे येथील 1 आणि तासगाव मधील कचरेवाडी येथील 1 अशा एकूण ८ जणांचा समावेश
धुळे शहरात आणखी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळले, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 137वर पोहचली असून जिल्ह्यात कोरोना बाधित सर्वाधिक 92 रुग्ण धुळे शहरातील आहेत.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Update : महाराष्ट्रात मंगळवारी (2 जून) 1225 कोरोनाबाधित रुग्णांना यशस्वी उपचारांनंतर घरी सोडण्यात आलंय. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत राज्यभरात 31 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. रुग्ण बरे होऊन घरी जाण्याचं प्रमाण राज्यात वाढताना दिसतंय. दरम्यान, आज कोरोनाचे 2287 नवे रुग्ण दाखल झाले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात 38 हजार 493 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत,अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.


सध्या महाराष्ट्राल आणखी एका संकटाने वेढलं आहे ते म्हणजे निसर्ग चक्रीवादळ, हे वादळ आज मुंबईसह कोकण किनारपट्टीला धडकणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे बीकेसीतील कोविड रुग्णालयातील रुग्णांना हलवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.


कोरोना चाचणीच्या आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 83 हजार 875 नमुन्यांपैकी 72 हजार 30 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. राज्यात 5 लाख 70 हजार 453 लोक होम क्वॉरंटाईन आहेत. तर संस्थात्मक क्वॉरंटाईन (Institutional Quarantine) सुविधांमध्ये 72 हजार 538 खाटा उपलब्ध असून सध्या 35 हजार 097 रुग्ण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये दाखल आहेत.


कोरोनाच्या प्रादुर्भावाने त्रस्त असलेल्या रुग्णांपैकी 103 कोरोनाबाधित रुग्णांच्या काल मृत्यू झाला.


काल नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू


ठाणे जिल्हा - 74 (मुंबई 49, ठाणे शहर 1, नवी मुंबई 4, पनवेल 4, रायगड 6, मीरा भाईंदर- 10),


नाशिक - 2 ( नाशिक 1, अहमदनगर 1)


पुणे - 21 (पुणे 10, सोलापूर 5, सातारा 6)


कोल्हापूर- 3 (सांगली 3, अकोला ३)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.