- मुख्यपृष्ठ
-
बातम्या
-
महाराष्ट्र
Coronavirus in Maharashtra Live Update | एकाच दिवशी 8381 कोरोना बाधितांना डिस्चार्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे
Coronavirus in Maharashtra Live Update | एकाच दिवशी 8381 कोरोना बाधितांना डिस्चार्ज -आरोग्यमंत्री राजेश टोपे
Coronavirus in Maharashtra Live Updates : राज्यात गुरुवारी (28 मे) कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 698 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31.26 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
29 May 2020 08:23 PM
सोलापूर जिल्हा कारागृहात 34 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह. 27 कैदी आणि 7 कर्मचाऱ्यांना कोरनाची लागण. काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या संपर्कातील 45 जणांचे अहवाल तपासणीसाठी घेण्यात आले होते.
कोरोनाशी यशस्वी लढा देऊन बरे झालेल्या रुग्णांच्या संख्येने आज उच्चांक गाठला. एकाच दिवशी ८३८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून त्यातील सर्वाधीक ७३५८ रुग्ण मुंबई महापालिका क्षेत्रातील आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण बरे होऊन घरी सोडण्याची ही पहिलीच वेळ आहे. आतापर्यंत राज्यभरात २६ हजार ९९७ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची उचलबांगडी, आयुक्त दीपक तावरे यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संचालकपदी नियुक्ती, तर वखार महामंडळचे संचालक पी. शिवशंकर यांची सोलापूर मनपा आयुक्तपदी नियुक्ती
देशावर कोरोना संकट आहे आणि देवेंद्र फडणवीस राजकारण करत आहेत, सत्ता कुणाचीही असू द्या संकटकाळात सरकारबरोबर असणं गरजेचं असतं, आधी हुशार होते आताच काय असं झालंय कळत नाही, बोलण्यात तारतम्य नाही, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांची टीका
सोलापूर महानगरपालिका आयुक्तांची उचलबांगडी. आयुक्त दीपक तावरे यांची महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ संचालक पदी नियुक्ती. तर वखार महामंडळचे संचालक पी. शिवशंकर यांची सोलापूर मनपा आयुक्त पदी नियुक्ती. पी. शिवशंकर हे वखार महामंडळाच्या संचालकपदाच्या आधी परभणीचे जिल्हाधिकारी होते.
आषाढी वारी संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीत मोठा निर्णय, यावर्षी कोणतीही दिंडी निघणार नाही, मुख्य पादुका फक्त पादुका थेट जातील, पादुका घेऊन जाण्यासाठी हेलिकॉप्टर, विमान किंवा एसटी यापैकी परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाणार
बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा, वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना ६० हजारांच्या ऐवजी ७५ हजार
सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या 24 तासात 21 कोरोना बाधित रुग्णांची भर. आज दुपारी आठ जणांचे अहवाल पॉजिटीव्ह. परिणामी जिल्ह्यातील कोरोना पॉजिटीव्ह रुग्णांची संख्या 38 झालीय. आता नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये कणकवली तालुक्यातील हरकूळचे 3, वैभववाडीचे 2 व सावंतवाडीचे 3 रुग्णांचा समावेश आहे.
मुंबईतल्या धारावी इथं खास कोवीड रूग्णांसाठी 190 बेडचे जम्बो फॅसिलिटी सेंटर माहिम नेचर पार्कच्या मैदानात उभं केलं जातंय. येत्या आठवड्यात ते कार्यान्वित होणार असल्यानं आता धारावीतील कोवीड रूग्णांवर याच ठिकाणी उपचार करण्याची सोय निर्माण झालीय. तसंच या कोवीड केअर सेंटरमध्ये ऑक्सिजनयुक्त बेडही असणारेत. धारावीत रूग्णवाढीचा दर कमी झाला असला तरी कोरोनाचे संकट मात्र कायम आहे, त्यामुळं लक्षणे नसलेल्यांसाठी अशा प्रकारचे जम्बो फॅसिलिटी सेंटर उपयोगी ठरणार असल्याचे मत शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी व्यक्त केलंय.
कुख्यात डॉन अरूण गवळीला 5 दिवसात नागपूर मध्यवर्ती कारागृहात शरण येण्याचे नागपूर हायकोर्टाचे आदेश, गवळीने 24 तासांत मुंबई प्रशासनाकडे नागपूर प्रवास करण्याची परवानगी मागावी, ती परवानगी 1 दिवसात मंजूर करावी, त्यानंतर तीन दिवसात गवळीने नागपूर गाठावे, असा आदेश हायकोर्टाने दिला. यापुढे पॅरोलला मुदतवाढ देण्याबाबत कोणतीही याचिका स्वीकारली जाणार नाही, असे हायकोर्टाने स्पष्ट केले आहे.
सोलापूर :
ग्रामपंचायतीतच शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मद्य पार्टी, बार्शी तालुक्यातील वैराग ग्रामपंचायतीतील धक्कादायक प्रकार,
ग्रामविकास अधिकारी, कार्यालयीन अधीक्षक, बांधकाम अभियंता आणि कर्मचारी मद्य पार्टीत सामील,
ग्रामपंचायत सदस्य अरुण सावंत यांनी केली पोलखोल,
जिल्ह्यात दारुबंदी असताना शासकीय अधिकारी कार्यालयातच पित होते दारु
कलर्स टीव्हीवर लवकरच सलमान खानचा नवा शो येणार. हाऊस ऑफ भाईजान्स असं या शोचं नाव आहे. या शो मध्ये सलमान पनवेलमध्ये कसा क्वारंटाईन आहे. तो पनवेलच्या फार्म हाऊसवर काय करतो ही माहिती येणार. तारीख अद्याप अनिश्चित. सलमानने आपली तीन गाणी फार्म हाऊसवर शूट केली आहेत. तर एक सॅनिटायझरही बाजारात आणला आहे.
अहमदनगरमध्ये जुळ्या मुलांना जन्म देणाऱ्या कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असताना आज सकाळी महिलेचा मृत्यू झाला. कालच या महिलेने जुळ्या मुलांना दिला होता. प्रसुतीनंतर महिलेला आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. ही महिला मुंबईहून नगर तालुक्यातील निंबलक इथे आली होती. त्यानंतर तपासणीत ही महिला कोरोनाबधित असल्याचे स्पष्ट झालं होतं.
वाशिममधील कोरोनाबाधित रुग्णाचा सेवाग्राम रुग्णालयात आज पहाटे दोन ते अडीचच्या सुमारास मृत्यू झाला. 63 वर्षीय हा रुग्ण 8 मे रोजी उपचारांसाठी रुग्णालयात दाखल झाला होता, 10 मे रोजी त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती गंभीर होती.
नाशिकच्या कॉलेज रोड परिसरात बिबट्या, वनविभाग आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल, बिबट्याला शोधण्याचं कार्य सुरू, बिबट्याचा एका महिलेवर हल्ला
एक वर्षापूर्वी लग्न झालेल्या नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह विहिरीत आढळून आल्याने बीडच्या गेवराईमध्ये एकच खळबळ उडाली. गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी तांडा येथे राहणाऱ्या सुनील बाबासाहेब चव्हाण (वय 21) व मनिषा सुनिल चव्हाण (वय 20 वर्षे) रा.चव्हाणवाडी तांडा ता गेवराई जि.बीड अशी विहीरीत मृतदेह आढळलेल्या नवविवाहित दाम्पत्याची नावे आहेत. या दोघांचा विवाह एका वर्षापूर्वी झाला होता. दरम्यान गुरुवारी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास या दोन्ही नवविवाहित दाम्पत्याचे मृतदेह गावा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीत तरंगताना ग्रामस्थांच्या निदर्शनास आले.
मुंबई : शिवाजी मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान उपाध्यक्ष शशी भालेकर यांचे निधन, ते 81 वर्षाचे होते, गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.
रायगड :मुंबई गोवा महामार्गावर हमरापूर ब्रीजवर भीषण अपघात, अपघातात एकाचा मृत्यू तर तीन गंभीर जखमी, तीन वर्षाची लहान मुलगी सुखरुप, कोकणातून मुंबईला जाताना झाला अपघात, सर्वजण सिंधुदुर्ग कुडाळ येथील रहिवाशी
सोलापूर : सोलापुरात काल संध्याकाळनंतर आज पुन्हा 74 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 800 पार, एकूण बाधितांचा आकडा 822 वर, आतापर्यंत 321 रुग्ण कोरोनातून मुक्त, उर्वरित 429 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबादमध्ये रात्रीतून 46 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. परिणामी कोरोनाबाधितांचा आकडा 1453 वर पोहोचला आहे. यामध्ये 14 महिला आणि 32 पुरुषांच्या समावेश आहे. आतापर्यंत 901 रुग्ण कोरोना मुक्त झाले असून 484 अॅक्टिव्ह रुग्णावर उपचार सुरु आहे. दरम्यान आतापर्यंत 68 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लॉकडाऊनच्या काळात रिक्षा व्यवसायालाही फटका बसला. हीच बाब लक्षात घेत रत्नागिरीमध्ये पॅजो कंपनीच्या वतीने साई ऑटो एजन्सीच्या माध्यमातून अॅपे रिक्षाधारकांना मदतीचा हात देण्यात आला. यावेळी 60 रिक्षा चालकांना जीवनावश्यक वस्तूंचं वाटप करण्यात आले. शिवाय, सॅनिटायझर देखील या रिक्षा चालकांना यावेळी देण्यात आलं. यावेळी रिक्षा चालकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 436 वर पोहोचली आहे. काल एका दिवसात 34 पॉझिटिव्ह रुग्णांनी नोंद झाली. यातएका महिला डॉक्टरचाही समावेश आहे. आतापर्यंत एकूण 49 जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची आषाढी वारी कशी पार पाडायची हे ठरवण्यासाठी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत बैठक बोलावण्यात आलीय. दुपारी तीन वाजता पुण्यात होणाऱ्या बैठकीला आळंदी, देहू आणि सोपानकाका संस्थानचे विश्वस्त त्याचबरोबर पंढरपूर मंदिर समितीचे विश्वस्त हजर असणार आहेत. त्याचबरोबर पुण्याचे विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्त, पुणे ग्रामीणचे पोलिस आयुक्त उपस्थित असणार आहेत.
औरंगाबादमध्ये सहा दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे जन्मानंतर त्याचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. 23 मे रोजी एका महिलेची औरंगाबाद घाटी रुग्णालयात प्रसुती झाली. होती. घाटीतील नवजात शिशु विभागाकडून बाळावर उपचार सुरु असून त्याची प्रकृती स्थिर आहे. 14 दिवसांनी पुन्हा तपासणी केली जाईल, अशी माहिती स्त्रीरोग आणि प्रसुतीशास्त्र विभाग प्रमुख श्रीनिवास गडाप्पा यांनी दिली. दरम्यान बाळाला कोरोनाची लागण कशी झाली याचा अभ्यास सुरु आहे. घाटी रुग्णालयात कोरोनाबाधित 21 महिलांच्या प्रसुती झाल्या, पण बाळ पॉझिटिव्ह येण्याची पहिलीच केस आहे.
गोंदिया जिल्ह्यात काल (28 मे) दिवसभरात नऊ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्ह्याची रुग्ण संख्या 59 वर पोहोचली आहे. तीन जण कोरोनामुक्त झाले असून 56 अॅक्टिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा. लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी राज्य सरकारांची मते जाणून घेतली.
तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धती विरोधात भाजपनंतर आता काँग्रेसची नाराजी. कंटेनमेंट झोन आणि क्वॉरंटाईन सेंटर मधील नागरिक आवश्यक गरजांपासूनही वंचित. दंडुकेशाहीचा वापर होत असल्यामुळे कंटेनमेंट झोन आणि क्वॉरंटाईन सेंटर मधील नागरिकांचे हाल होत असल्याचा आरोप. काँग्रेस नगरसेवकांवर महापालिकेने गुन्हा नोंदविल्याने सर्वपक्षीय नगरसेवक नाराज. भाजप-काँग्रेसची मुंढे विरोधात संयुक्त पत्रकार परिषद.
कोरोनामुळे सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यातून होणारी सर्व प्रकारची प्रवासी वाहतूक कर्नाटकनं थांबवली आहे. महाराष्ट्र, गुजरात, तामिळनाडू, मध्य प्रदेश आणि राजस्थान या राज्यातून रेल्वे, विमान आणि इतर वाहनातून होणारी वाहतूक रद्द केली आहे.
पुणे जिल्ह्यात काल रात्री नऊ वाजल्यापासून तर आत्ता चार वाजेपर्यंत 236 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद. तर 5 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2598 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 59,546 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 698 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
अभिनेत्री अश्विनी भावे यांनी चार महिन्यांसाठी 200 रंगभूमी कर्मचाऱ्यांचा खर्च उचलला आहे. त्यासाठी त्यांनी 20 लाख रूपये मराठी नाटक समूह या ग्रुपला दिले आहेत. यात प्रशांत दामले, पुरुषोत्तम बेर्डे, ह्रषिकेश जोशी आदी मंडळी आहेत. दरमहा पाच लाख असे चार महिन्यांचे 20 लाख रूपये अश्विनी भावे देणार आहे.
पुणे मार्केट यार्डातील मुख्य फळ आणि भाजीपाला मार्केट 50 दिवसानंतर 31 मेपासून सुरू होणार, 30 तारखेला रात्री पासून शेतमाल येण्यास सुरुवात होणार आणि पहाटे पाच वाजता मुख्य बाजारातील मार्केट सुरु होईल
धुळे जिल्ह्यातील आणखी चार रूग्णांना कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. विंचूर येथील मृत व्यक्तीचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत. तर धुळे शहरातील तिघांना कोरोनाची लागण झाली आहे. जुने धुळे भागातील सुभाष नगर, गुरूदत्त कॉलनी येथील 59 वर्षीय पुरूष तसेच देवपुरातील ग.द.माळी सोसायटीमधील 42 वर्षीय पुरूषाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेत.
महाराष्ट्र राज्यातील राज्य महामार्ग व प्रमुख जिल्हा रस्ते ४५० किलोमीटर (कि.मी.) विकास करण्यासाठी एशियन डेव्हलपमेंट बँक (एडीबी) आणि भारत सरकारने आज १७७ दशलक्ष डॉलर्स कर्जावर स्वाक्षरी केली.
महाराष्ट्र राज्य रस्ते सुधार प्रोजेक्टच्या स्वाक्षार्या करणारे श्री समीर कुमार खरे, अतिरिक्त सचिव (फंड बँक आणि एडीबी), वित्त मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने भारत सरकारसाठी स्वाक्षरी केली आणि एडीबीचे कंट्री डायरेक्टर केनिची योकोयामा हे होते.
कर्जाच्या करारावर स्वाक्षरी झाल्यानंतर खरे म्हणाले की या प्रकल्पातून राज्यातील ग्रामीण भाग आणि शहरी केंद्रांमधील संपर्क सुधारला जाईल. ग्रामीण भागातील लोक बाजारपेठ, रोजगाराच्या संधी व सेवांमध्ये अधिक चांगल्या वापरू शकतील. सुधारित गतिशीलता राज्यातील प्रमुख शहरी केंद्रांच्या बाहेरील विकासाची आणि रोजगाराच्या संधींचा विस्तार करेल आणि अशा प्रकारे विकासातली असमानता कमी करेल. सुरक्षा उपायांनाही या प्रकल्पातून बळकटी मिळेल. अधिक माहिती देताना श्री. योकोयामा म्हणाले की मालमत्तेची गुणवत्ता व सेवा पातळी टिकवून ठेवण्यासाठी कंत्राटदारांना ५ वर्षांच्या कामगिरीवर आधारित देखभाल जबाबदारी निश्चित करून रस्ते देखभाल प्रणालीचे अद्ययावत करणे हे या प्रकल्पाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
पूर्ववैमनस्यातून झालेल्या भांडणात येरवडा कारागृहातून पॅरोलवर सुटलेल्या आरोपीची काही तासात टोळक्याने तीक्ष्ण हत्याराने वार करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना काल रात्री येरवड्यात घडली.
कोल्हापूर : अनुस्कुरा घाटातील शेतामध्ये सापडला पुरातन खजिना, विनायक पाटील यांच्या शेतात पुरातन खजिना, काजूची लागवड करत असताना जमिनीत सापडलं एक मडके, मडक्यात आहेत 716 जुनी नाणी, शेकडो वर्षांपूर्वीची नाणी सापडल्याने पाटील कुटुंबीयांनी जिल्हा प्रशासनाला कळवली माहिती, तहसीलदार, प्रांत, कृषी अधिकाऱ्यांनी शेतात येऊन केला पंचनामा, पाटील कुटुंबीयांनी कोणताही मोह न बाळगता ही राष्ट्रीय संपत्ती असल्याने सर्वच्या सर्व नाणी केली प्रशासनाला सुपूर्द
परभणीतील एका हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर धाड टाकून पोलिसांनी तब्बल 11 प्रतिष्ठित व्यापाऱ्यांसह, भाजप नगरसेविकेच्या मुलाला अटक केली आहे. या सर्वांकडून तब्बल 8 लाखांचा मुद्देमाल जप्त केलाय. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ही कारवाई केलीय.
औरंगाबादमध्ये रात्रीतून नवे 35 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, औरंगाबादेत एकूण 1397 कोरोनाबाधित रुग्ण, 11पुरुष आणि 14 महिलांचा समावेश, कोरोनामुळे आतापर्यंत 64 रुग्णांचा मृत्यू, तर 867 जण कोरोना मुक्त
बीड शहरामध्ये कोरणा बाधित रुग्ण तीन हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आला होता म्हणून शहरातील सुपरिचित असे तीन हॉस्पिटल प्रशासनाने सील केले आहेत. या रुग्णाच्या संपर्कामध्ये आलेल्या तीन हॉस्पिटलमधील एकूण रुग्ण आणि कर्मचारी असे साडेतीनशे जणांना क्वॉरंटाईन करण्यात आल आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने यापुढे निर्णय घेतला की बीड शहर पुढच्या आठ दिवस 100% बंद राहणार आहे..
सोलापूर : सोलापुरात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 700 पार, काल संध्याकाळनंतर आज सकाळी आणखी 42 रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह, सोलापुरातील कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला 709 वर, आज प्राप्त अहवालात एका पुरुषाचा मृत्यू देखील झाल्याचे निष्पन्न, मृत्यूचा एकूण आकडा पोहोचला 67 वर, आतापर्यंत 311 रुग्णांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, उर्वरित 331 रुग्णांवर उपचार सुरू
परराज्यातील मजुरांना त्यांच्या राज्यात पोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सोय करण्यात आली आहे.बेळगावातून देखील बिहारचे मजूर आपल्या गावी जाऊन पोहोचले पण उत्तर प्रदेशमधील मजूरांना मात्र तिकिटाचे पैसे भरून देखील दहा दिवसांपासून पेडॉलमध्ये उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडील पैसेही संपले आहेत,पैसे भरून देखील रेल्वेची व्यवस्था केली जात नाही. त्यामुळे या मजुरांनी संताप व्यक्त केला आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेला आता रोजगार नसल्यामुळे पैसे हातात नाहीत.अकराशे रुपये तिकिटासाठी दिले पण अधिकारी आपली जबाबदारी झटकत आहेत.पैसे नसल्यामुळे खायचे काय असा प्रश्न आहे.आम्हाला उपाशी झोपावे लागत आहे असे उत्तर प्रदेशच्या मजुरांनी सांगितले.आम्हाला लवकरात लवकर आमच्या गावी पोचवा अशी मागणी मजूर करत आहेत.
कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 402 रुग्ण, तर 4 जणांचा मृत्यू, आतापर्यंत 39 जण झाले कोरोनामुक्त, सर्वाधिक रुग्ण शाहूवाडी तालुक्यात, त्यापाठोपाठ भुदरगड तालुक्याचा नंबर
अमरावतीत आज सकाळी 4 जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला असून यामध्ये दोन पुरुष आणि दोन महिलांना कोरोनाची लागण झाली आहे.
अमरावतीत कोरोना रुग्णांची संख्या 190वर पोहचली आहे. तर त्यातील 15 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तसेच 88 रुग्ण
बरे होऊन घरी गेले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात देखील आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. बुधवारी रात्री जिल्ह्यात नव्या 12 कोरोना रूग्णांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा हा आता 195वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांच्या संख्येचा विचार करता यातील सर्वाधिक रूग्ण हे जिल्ह्या बाहेरून आलेले आहेत. आजरोजी जिल्ह्यात एकूण अॅक्टिव रूग्णांची संख्या ही 114 झाली आहे. तर 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नव्याने आढळून आलेले रूग्ण हे रत्नागिरी, कळंबणी आणि राजापूर येथील आहेत.
अमरावतीत कोविड रुग्णालयातील अव्यवस्थेचा चिरफाड करणारा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका कोरोनाबाधीत अंगणवाडी सेविकेने हा व्हिडीओ काढून तेथील गंभीर परिस्थीती मांडली आहे.
रुग्णांना सकाळी 8 वाजता मिळणारा चहा मिळतो 11 वाजता, तर दुपारी 12 वाजता मिळणारे जेवण दुपारी 3 वाजता आणि रात्री 8 वाजता मिळणारे जेवण रात्री 10 किंवा 11 वाजता देण्यात येत असल्याचे कोरोना बाधित महिलेने म्हटलं आहे.
कोविड रुग्णालयात रुग्णांसोबत एखाद्या बहिष्कृत व्यक्तीप्रमाणे व्यवहार करण्यात येत असून येथे तैनात डॉक्टर आणि परिचारिका गोळ्या आणि औषधी अंगावर फेकून निघून जात असल्याचे कोरोना बाधित महिलेने म्हटले आहे.
मराठवाड्यात कोरोनाचे 2042 रुग्ण असून त्यापैकी सर्वाधिक रुग्ण औरंगाबादमध्ये आहेत. काल (27 मे) एका दिवसात सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घाटीत तीन, खासगी रुग्णालयात तीन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये पाच पुरुष आणि एका महिलेचा सामावेश आहे.
रायगड
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण कोरोना बाधीतांचा आकडा 900 वर पोहोचला आहे.
यापैकी 505 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला असून 354 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
हिंगोलीच्या वसमत येथील हट्टा गावात काही जण शेतात मागील काही दिवसापासून क्वॉरन्टाईन होते. तुम्ही गावात का आले या कारणावरुन काल दुपारी काही गावकऱ्यांनी गर्भवतीसह तिच्या पतीला बेदम मारहाण केली. या प्रकरणी हट्टा पोलीस स्थानकात महिलेच्या तक्रारीवरुन 9 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसात परस्परविरोधी गुन्हा दाखल आहे. रात्री उशिरा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल काहीवेळ हट्टा गावांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
अहमदनगर जिल्ह्यात आणखी 5 जणांना कोरोनाची लागण, अहमदनगर जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील कोरोनाबाधित व्यक्तींची एकूण संख्या 99 वर,
साताऱ्यात दिवसभरात कोरोनाचा पाचवा बळी. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा 14 वर. 24 तासात 86 नवीन रूग्ण. एकूण बाधित रुग्णसंख्या 422 झाली आहे. तर, 126 रूग्ण बरे होऊन घरी गेले.
शिर्डी : क्वॉरंटाईन असलेल्या अपंग मुलाला मारहाण, अकोले तालुक्यातील वाघापूर गावातील धक्कादायक घटना, तलाठ्यानेच अमानुष मारहाण, तलाठी राजेंद्र पवार याचं कृत्य, अपंग मुलगा चेंबूर या ठिकाणाहून आलेला असल्याची माहिती, क्वॉरंटाईन असलेला मुलगा बाहेर आल्यानंतर केली मारहाण
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2190 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 56,948 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
लातुरात पाण्यावरून दोन गटात तलवार- कोयत्याने हाणामारी, पाच जण जखमी, 9 जणांवर गुन्हा दाखल
अकोल्यातील कोरोना बाधितांनी 500 चा आकडा गाठला. संध्याकाळी आणखी 42 नवे रूग्ण आढळले . दिवसभरातील एकूण रूग्णसंख्या 72 वर गेली आहे. जिल्ह्याची एकूण रूग्णसंख्या 507 वर पोहचली आहे . आतापर्यंत 28 रूग्णांचा कोरोनामूळे मृत्यू. 26 रूग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 315 रूग्ण झालेत कोरोनामुक्त झाले. सध्या 164 रूग्णांवर उपचार सुरू आहे.
येस बँक घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या वाधवान बंधूंचा जेलमधील मुक्काम वाढला. कपिल आणि धीरज वाधवान यांना 11 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचा निर्णय.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2190 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 56,948 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 105 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 964 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबईला हळूहळू पूर्वपदावर आणण्यास प्राधान्य; शहराची परिस्थिती सांगणारे सर्व व्हिडीओ फेक; पालकमंत्री अस्लम शेख यांचा दावा
भरधाव वेगात दुचाकी दुभाजकावर आदळून भीषण अपघात,
दुचाकी चालकासह तीन तरुणांचा मृत्यू, अहमदनगर-पुणे रोडवरील सुपा टोलनाका चौकातील घटना
राज्यात कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात एकत्रित काम सुरू : बाळासाहेब थोरात
भरधाव वेगात दुचाकी दुभाजकावर आदळून भीषण अपघात,
दुचाकी चालकासह तीन तरुणांचा मृत्यू, अहमदनगर-पुणे रोडवरील सुपा टोलनाका चौकातील घटना
विरोधी पक्षाकडून सहकार्याची अपेक्षा असताना त्यांनी सरकारला बदनाम करण्याची मोहीम उघडली आहे, त्यांचं सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे. : थोरात
काल देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या समोर गोष्टी ठेवून असं चित्र उभं केले की केंद्र सरकार भरघोस मदत देऊनसुद्धा महाराष्ट्र सरकार अपयशी ठरत आहे. लोकांची दिशाभूल होऊ नये म्हणून मी सत्य परिस्थिती समोर मांडतोय : अनिल परब
विरोधीपक्षाने उणीदुणी काढण्यापेक्षा केंद्राकडून मदत आणून दिली असती, तर आम्ही अभिनंदन केलं असतं : अनिल परब
सोशल डिस्टन्सिंगचे पालन न करणारे दुकानं, आस्थापना तातडीनं बंद केल्या जातील; नाशिकचे महापौर सतीश कुलकर्णी यांचे आदेश. शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने निर्णय.
उस्मानाबाद जिल्ह्यात 64 वर्षांचा व्यक्ती मरण पावला. हा व्यक्ती कोरोना पॉझिट्व्ह नव्हता. त्याची बायको पॉझिटिव्ह होती. तो परंडा रूग्णालयात उपचार घेत आहेत. मृताला दम्याचा आजार होता. दोन दिवसांपूर्वी हा व्यक्ती मरण पावला. त्यानंतर दोन दिवस वडिलांचा मतदेह ताब्यात घ्यायला मुलाने नकार दिला. मुलाने परंडा पोलिसांत आपण मृतदेहावर अत्यंस्कार करू शकत नाही, असे लिहून दिले. आज दोन दिवस वाट पाहून उस्मानाबाद पालिकेतल्या चार कर्मचाऱ्यांनी अंत्यसंस्कार केले.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या प्रकृती सुधारनेसाठी नांदेडमध्ये महामृत्युंजय अनुष्ठान करण्यात येत आहे. अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईहून नांदेडला परतल्यानंतर रविवारी अशोक चव्हाण यांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. सोमवारी चव्हाण उपचारासाठी मुंबईतील ब्रिचकॅडी रुग्णालयात पोहोचले. चव्हाणांना कोरोनाची लागण झाल्याने अनेकजण त्यांच्या प्रकृती सुधारणेसाठी प्रार्थना करत आहेत. चव्हांणांची प्रकृती सध्या एकदम चांगली आहे. त्यांना कोणताही त्रास नाही. दरम्यान चव्हाण कोरोनातून पूर्णपणे बरे व्हावे यासाठी नांदेडमध्ये शौर्य परशुराम प्रतिष्ठानच्या पुरोहितानी 3 दिवसाच्या महामृत्युंजय अनुष्ठानचे आयोजन केले आहे. 3 दिवस दररोज 2 तास हे अनुष्ठान होणार आहे. 8 पुरोहित हे अनुष्ठान करत आहेत.
पुण्यातील कोरोना रुग्णांना खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार मिळत नसल्याचा आरोप अनेकजण करतायत. पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांनी देखील हे मान्य केलंय. त्यावर उपाय म्हणून खाजगी हॉस्पिटल्समधील व्हेंटीलेटर्स आणि ऑक्सीजनची सोय असलेले आठशे बेड ताब्यात घ्यायचं महापालिकेने ठरवलंय. कुठल्या हॉस्पिटलमध्ये किती बेड उपलब्ध आहेत हे लोकांना समजावं यासाठी ऑनलाईन डॅशबोर्ड उपलब्ध करुन दिला जाणार आहे. त्याचबरोबर शासनाच्या विविध योजनांमधून खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांचा खर्च केला जाईल असंही महापालिका आयुक्तांनी म्हटलं आहे.
लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात मजुरांना त्यांच्या गावी पाठवले जात आहे. रत्नागिरीतून देखील 1 हजार मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये एका विषेश ट्रेननं पाठवले जाणार आहे. संध्याकाळी 6 वाजता ही ट्रेन रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरून सुटणार आहे. यावेळी आपल्या गावी जाण्यासाठी शेकडो मजूर रत्नागिरीतील शिवाजी स्टेडियमवर गोळा झाले होते. त्यांची नोंदणी करत त्यांना गावी पाठवले जाणार आहे.
ट्रेनची वाट बघणाऱ्या 58 वर्षीय विद्योत्मा शुक्ला हिचा सनसिटी मैदानात मृत्यू झाला होता. आजही येथून ट्रेन सुटतील अशी भाबडी आशा घेवून, श्रमिक मजूर येथे मोठ्या प्रमाणात जमले होते. मात्र आज एकही ट्रेन येथून सुटणार नव्हती. पोलिसांनी श्रमिकांना घरी जाण्याचे आवहान ही केले. मात्र काही मजूर रस्त्याच्या किनाऱ्यावर दुपारपर्यंत उभे होते. पुन्हा काही अनुचित घटना होवू नये यासाठी पोलिसांनी परिवहन बसमधून त्यांना त्यांच्या घरी सोडलं. यावेळी वसई, विरार, नालासोपारा, 0नायगांव येथे जवळपास 10 बसेस सोडण्यात आल्या.
आज महाविकास आघाडीची एकत्र पत्रकार परिषद, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील आणि अनिल परब घेणार एकत्र पत्रकार परिषद, देवेंद्र फडणवीस यांना महाविकास आघाडी देणार उत्तर
पावसाळी अधिवेशन ऑनलाईन होणार?, येणारं पावसाळी अधिवेशन ऑनलाईन करण्यावर विचार सुरु, मुंबई कन्टेंन्मेन्ट झोन असल्यामुळे पावसाळी अधिवेशनावर कोरोनाचा सावट,
कोरोनाच्या काळात सगळे आमदार एकत्र आल्यानं प्रादुर्भाव वाढू शकतो, त्यासाठी सुरु आहे उपाययोजना.
आॅनलाईन किंवा कालावधी कमी करुन अधिवेशन पार पाडण्यावर भर, येत्या 22 जूनपासून पावसाळी अधिवेशनाला होणार सुरुवात,
अधिवेशन कसं होणार? याची आमदारांमध्ये चर्चा सुरु, विधानसभा, विधानपरिषद आमदार आणि कर्मचारी एकत्र कसे आणायचे यावर सुरु आहेत खलबतं
पंढरपूर शहरात कोविडसाठी रुग्णालय ठरविण्याचा पेच दिवसेंदिवस वाढत चालला असून उपजिल्हा रुग्णालयाच्या परिसरातील झोपडपट्टीत राहणाऱ्या 8 ते 10 हजार नागरिकांनी हे रुग्णालय शहराबाहेरील 65 एकर परिसरात करण्याची भूमिका घेतल्याने आता प्रशासन समोरील पेच वाढला आहे. यापूर्वी शहरातील खाजगी रुग्णालयात हे हॉस्पिटल करण्याचा प्रयत्न केल्यावर शहरातील समाजसेवकांनी यास विरोध दर्शवत कोरोनाग्रस्ताला येथे ठेवण्यास विरोध दर्शवला होता. यानंतर प्रशासनाने चंद्रभागा तीरावर असलेल्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयास कोविड हॉस्पिटल बनविण्याचा प्रयत्न सुरु केल्यावर काल सायंकाळ पासून या भागातील नागरिकांनी यास तीव्र विरोध दर्शविला आहे. हे रुग्णालय तालुक्यातील सर्वसामान्य गरीब रुग्णांच्या उपचारासाठी असताना याला कोविड बनवू नये तसेच या रुग्णालयाच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी असल्याने येथील शेकडो नागरिकांच्या जीवास धोका होईल अशी भीती येथील नागरिकांना वाटत आहे. यात्रा काळात भाविकांसाठी निवासासाठी असलेले 65 एकर भाग शहरापासून दूर असून येथे रहिवासी वस्ती नसल्याने यालाच कोविड हॉस्पिटल बनविण्याची मागणी जोर धरू लागली आहे .
नागपूर: आज सकाळी 8 कोरोना रुग्ण वाढले, नागपुरात एकूण रुग्ण संख्या 441 झाली, आज एका कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9 झाली, तर आतापर्यंत 345 रुग्ण पूर्ण बरे होऊन घरी परतले आहेत
वाशीम जिल्ह्यात कोरोना बाधित आज अजून एका रुग्णाचा मृत्यू झाला. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची संख्या दोन झाली आहे. मुंबईवरून आलेल्या 6 रूग्णांपैकी एकूणच वाशीम जिल्ह्यातील उपचार घेणाऱ्या कोरोना 8 रुग्णाच्या तुलनेत विचार केला तर 25 टक्के कोरोनाचा मृत्यू दर आहे.
सातारा : साताऱ्यात आज तीन रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू, आजपर्यंत साताऱ्यात 12 कोरोना बाधितांचा मृत्यू, गेल्या 24 तासात कोरोनाचे नवीन 52 रुग्ण, जिल्ह्यात आतापर्यंत 394 कोरोना बाधित रुग्ण, तर 126 रुग्ण बरे होऊन घरी गेले
सांगली जिल्ह्यात मुंबईहून आलेले आणखी चार जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. खानापूर तालुक्यातील 57 वर्षीय महिला आणि 33 वर्षीय पुरुष, आंबेगाव तालुक्यातील 36 वर्षीय पुरुष तर कवठेमहांकाळ तालुक्यातील आठ वर्षीय मुलीचा समावेश आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अनुसुचित जमाती आणि इतर पारंपारिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ या कायद्यामध्ये महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित क्षेत्रासंदर्भात काही सुधारणा केल्या आहेत.
भारतीय संविधानाच्या पाचव्या अनुसुचीमधील प्राप्त अधिकारांचा वापर करुन राज्यपालांनी दिनांक १८ मे २०२० रोजी एका अधिसूचनेव्दारे उपरोक्त कायदयाच्या कलम ६ मध्ये या सुधारणा केल्या आहेत.
वन हक्क कायद्याअंतर्गत गठीत करण्यात आलेल्या जिल्हा स्तरीय समितीकडून वैयक्तिक किंवा सामुदायिक वनहक्काचे दावे नामंजूर झाले आहेत अशा आदिवासी बांधवांना या अधिसूचनेमुळे समितीच्या आदेशाविरोधात दाद मागता येणार आहे. सदर अधिसूचना राज्यातील पेसा क्षेत्राकरीता लागू असेल.
नव्या अधिसुचनेनुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विभागीय स्तरीय समित्या गठीत करण्यात आल्या असून सदर समित्यांकडे जिल्हा समितीच्या निर्णयांच्या विरोधात अपील करता येणार आहे.
जिल्हा स्तरीय समिती कडून वैयक्तिक व सामुदायिक वनहक्कांचे दावे मोठ्या प्रमाणात नामंजूर करण्यात येत असल्याचे राज्यपालांचे निदर्शनास आले होते. मात्र जिल्हा समितीच्या निर्णयाविरुद्ध अपील करण्याची सदर कायद्यात कुठलीही तरतूद नव्हती. अधिसूचनेमुळे बाधित आदिवासींना दिलासा मिळणार आहे.
राज्यपालांच्या अधिसूचनेची प्रत सोबत जोडली आहे तसेच सर्वसाधारण माहितीसाठी सदर अधिसूचना राजभवनाच्या संकेतस्थळावर देखील उपलब्ध करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरुन चर्चा, 'कोरोनाच्या संकटात काँग्रेस पूर्णपणे ठाकरे सरकारच्या पाठिशी', राहुल गांधींकडून मुख्यमंत्र्यांना आश्वासन दिल्याची माहिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी गुळदुवे गावात मुंबईतील मालाड भागातून काल आपल्या मूळ गावी आल्यावर गावातील शाळेत क्वॉरंटाईन करण्यात आले होते. त्याचसोबत त्याची पत्नी, मुलगा गावी आले होते. रात्री अचानक त्या युवकाला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने उपचारासाठी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात येत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. हा युवक जेव्हा गावी आला त्यावेळी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी करून त्याला गुळदुवे येथील शाळेत क्वारंटाईन करण्यात आले होते. मृत व्यक्तिचा स्वॅब नमुना घेऊन तपासणीसाठी पाठवला असून त्याचा रिपोर्ट आल्यावर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. खबरदारीचा उपाय म्हणून आज मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात या युवकाची तपासणी केल्याने हे आरोग्य केंद्रही बंद ठेवण्यात येणार आहे.
केंद्राच्या धर्तीवर राज्य सरकारने पॅकेज जाहीर करावे , राज्य सरकार मध्ये कुरबुरी सुरू असतानाच काँग्रेसच्या माजी आमदारांची मागणी, रिक्षा टॅक्सी चालक पिवळे रेशनकार्ड धारकांना कमीत कमी 5 हजार रुपये आर्थिक मदत द्यावी, काँग्रेसचे माजी आमदार जयप्रकाश छाजेड यांची मागणी, माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख खावटी योजना सुरू करावी, राहुल गांधी यांनी गोरगरिबांना 10 हजार द्या अशी मागणी केंद्राकडे केली असताना राज्य सरकारने 5 हजार द्यावेत अशी मागणी त्यांनी केली.
भूम तालुक्यातील वंजारवाडी पं स गणाचे शिवसेनेचे सदस्य बाजीराव तांबे यांची राजकीय वैमनस्यातून हत्या, भूम तालुक्यातील देवळाली ग्रामपंचायत समोर घटना, तांबे माजी आमदार ज्ञानेश्वर पाटीलांचे कट्टर समर्थक, हत्येप्रकरणी बाजीराव तांबे यांच्या चुलत भावासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल, एक जण अटकेत
आज महाविकास आघाडीची बैठक, बैठकीला काँग्रेसकडून बाळासाहेब थोरात,वर्षा गायकवाड,अस्लम शेख, राष्ट्रवादीकडून अजित पवार,जयंत पाटील शिवसेनेकडून एकनाथ शिंदे आणि अनिल परब उपस्थित राहणार
पुणे : पुण्यात काल रात्रभरात 49 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील कोरोनाबाधितांची संख्या 6529 तर आत्तापर्यंत 289 कोरोना बाधितांचा मृत्यू
नाशिक महापालिकेची महासभा इतिहासात पहिल्यांदाच होणार ऑनलाईन, कोरोनाचा संसर्ग होण्याच्या शक्यतेने नगरसेवकांनी एकत्र येण्याचे टाळले, मागील आठवड्यात कालिदास कलामंदिर नाट्यगृहात होणार होती सभा, शिवसेनेने विरोध केल्यानं महासभा झाली होती स्थगित, 29 मे रोजी होणार ऑनलाईन महासभा
सोलापूर : खासगी रुग्णालय सुरू आहेत की नाही याची तपासणी करण्यासाठी भरारी पथकं, यापूर्वी प्रशासनाने हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय सेवा सुरू ठेवण्याचे दिले होते आदेश, काही रुग्णालयं बंद असल्याची तक्रार येत होत्या, त्यानंतर आरोग्य विभागाने नोटीस बजावल्या, या नोटीसचा खुलासा करताना अनेकांनी हॉस्पिटल सुरू असल्याचे सांगितले, त्यामुळे रिअॅलिटी चेक करण्यासाठी भरारी पथकाची नेमणूक, 5 सदस्यीय भरारी पथक आरोग्य अधिकाऱ्याच्या नियंत्रणात पथक सोलापूर शहरात तपासणी करणार, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
सोलापूर : काल संध्याकाळनंतर आज सकाळी आलेल्या अहवालात आणखी 29 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर एका महिलेचा मृत्यू, सोलापुरात एकूण बाधितांची संख्या पोहोचली 653 वर तर आतापर्यंत 64 जणांनी गमावला आपला जीव, आतापर्यंत 279 रुग्ण बरे होऊन घरी परतले
मुंबई : लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनवर राजस्थानमधील नागरिकांची गर्दी, राजस्थानला जायला ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांचा संताप, राजस्थानला जाण्यासाठी ट्रेन उपलब्ध होणार आहेत अशी माहिती मिळाल्यामुळे हे नागरिक आपल्या भाड्याच्या रूम सोडून गावी जाण्यासाठी टर्मिनसवर झाले दाखल, आता ट्रेन उपलब्ध नसल्यामुळे नेमकं कुठं जायचं? असा प्रश्न नागरिकांसमोर
औरंगाबाद : जिल्ह्यात आज 30 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, 9 महिला आणि 21 पुरुष रुग्णांचा समावेश, जिल्ह्यात कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1360 वर, आतापर्यंत एकूण 58 रुग्णांचा मृत्यू तर 781 रुग्णांना डिस्चार्ज
तळकोकणातील वेंगुर्ले परिसरातील बागायतदारांचा आंबा एसटीच्या माध्यमातून नाशिकच्या पंचवटी मार्केटला रवाना झाला आहे. बागेतुन काढलेला आंबा थेट बागेतून एसटी बसने मार्केटमध्ये नेला जात असल्याने या वाहतुकीला चांगला प्रतिसाद लाभत आहे. या उपक्रमाचा लाभ अन्य आंबा शेतकरी, बागायतदार आणि व्यावसायिक यांनी घ्यावा, असे आवाहन वेंगुर्ले एसटी आगार प्रमुख जी. एस. चव्हाण यांनी केले आहे. नाशिक येथे जाणाऱ्या आंबा पेट्यांसाठी आंबा उत्पादक शेतकरी, बागायतदार यांनी एसटीच्या विविध वाहनांबाबत इच्छुकता दर्शवली आहे. त्यानुसार एसटीचे सिंधुदुर्ग विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी मार्गदर्शन व नियोजन करून वाहने उपलब्ध करुन दिली. आंब्याच्या पेट्या घेऊन नाशिक येथे बस रवाना झाली.
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा तिसरा बळी
गेला असून गडहिंग्लज तालुक्यातील 55 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.
काल संध्याकाळी मृत्यू झाल्यानंतर रात्री उशिरा स्वब पॉझिटिव्ह आला
.
मृत व्यक्ती हा मुंबईतून कोल्हापूर जिल्ह्यात आला होता.
तर काल रात्री 5 नव्या कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद
झाली आहे. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 383 वर पोहचला आहे.
बीड : महाबीजचे सोयाबीन बियाणे महागले, 30 किलोच्या बॅग मागे 360 रुपयाने वाढ, 1890 रुपयांची बॅग आता 2250 रुपयाला मिळणार, राज्यात सर्वाधिक पेऱ्यात सोयाबीन पीक येते, राज्यात चाळीस लाख हेक्टर सोयाबीन चे क्षेत्र आहे. उत्पादन खर्च वाढल्याचे कारण सांगत केली दरवाढ
परिवहन आणि संसदीय कार्य मंत्री अनिल परब यांची आज दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या आकड्यांची सत्य स्थिती सांगणार असल्याची माहिती
नागपूर : काल संध्याकाळी आणखी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.
नागपुरात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 433 झाली आहे.
संध्याकाळी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हावरापेठ परिसरातला आहे.
नागपुरात आतापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
तर काल पर्यंत 344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता नागपुरात केवळ 89 रुग्णांवर उपचार सुरु.
रत्नागिरीत एकाच दिवशी 22 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. कामथेमधील 6, राजापूरमधील 8, रत्नागिरीमधील 6 आणि संगमेश्वर येथील 2 रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 183 वर पोहोचली आहे. यातील 67 कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सध्या 111 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाला आहे.
साताऱ्यात रात्रीत कोरोनाचे 52 रुग्ण वाढले असून दोन कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये एक जण वाई आसले तर दुसरा पाटण येथील आहे. साताऱ्यात कोरोनामुळे आतापर्यंत 11 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 394 असून 126 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहे.
मुंबईच्या सायन रुग्णालयातील 1 महिना सहा दिवसाचं बाळ कोरोनामुक्त झालं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून या बाळाला निरोप दिला.
पार्श्वभूमी
Coronavirus in Maharashtra : राज्यात गुरुवारी (28 मे) कोरोनाच्या तब्बल 2598 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 59,546 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 38,939 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान, राज्यात काल 85 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1982 जणांचा मृत्यू झाला आहे. 698 कोरोनाबाधित रुग्णांना काल डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्याचा रुग्ण बरे होण्याचं प्रमाण 31.26 टक्के आहे. तर राज्यातील मृत्यू दर 3.32 टक्के आहे.
काल झालेल्या 85 मृत्यूंपैकी 37 मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत. तर उर्वरित मृत्यू हे 15 ते 25 मे या कालावधीतील आहे. या कालावधीत झालेल्या 48 मृत्यूपैकी मुंबई 22, सोलापूर 5, अकोला 4, औरंगाबाद 3, सातारा 3, ठाणे 3, वसई विरार 3, जळगाव, नांदेड, नवी मुंबई, पुणे, रायगडमधील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.
आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 19 हजार 417 नमुन्यांपैकी 59,546 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 6 लाख 12 हजार 745 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 122 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.
काल झालेल्या मृत्यूंपैकी 60 पुरुष तर 25 महिला आहेत. त्यातील 45 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 31 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 9 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 105 रुग्णांपैकी 45 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.