राज्यात रविवारी कोरोनाच्या 3390 नवीन रुग्णांची नोंद झाली असून सध्या राज्यात 53 हजार 17 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आज 1632 रुग्णांना घरी सोडण्यात आले. आतापर्यंत घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 50 हजार 978 झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. तर एकाच दिवशी 120 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंतचा मृतांचा आकडा 3950 वर पोहोचला आहे. राज्यात 120 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी मुंबईत 69, ठाणे 4, उल्हासनगर 5, पालघर 1, वसई-विरार 1, पुणे 11, सोलापूर 3, नाशिक 3, जळगाव 11, रत्नागिरी 1, औरंगाबाद 7, उस्मानाबाद 2, अकोला येथे 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 01 Jan 1970 05:30 AM

पार्श्वभूमी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.