Coronavirus in Maharashtra Live Updates | राज्यात आज 2940 नवे कोरोनाबाधित, 63 जणांचा मृत्यू ; कोरोनाबाधितांची संख्या 44,582

Advertisement

Coronavirus in Maharashtra Live : राज्यात गुरुवारी (21 मे) कोरोनाच्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41,642 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, राज्यात काल 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1408 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 May 2020 08:11 PM
इंदापूरला

मुंबईहून आलेल्या माय-लेकाला कोरोनाची लागण झाली आहे.
इंदापूर तालुक्यात आणखी दोन रुग्णाना कोरोनाची लागण झाली आहे.
हे दोन्ही रुग्ण मुंबईहून इंदापूर तालुक्यातील पोंदकूलवाडी या ठिकाणी आले होते.
यात 42 वर्षाच्या महिला व 22 वर्षाच्या युवकाचा समावेश आहे.
इंदापूर तालुक्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 वर गेला असून यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्या दोघांच्या 11 जण संपर्कात आले असून सर्वांचे स्वॅब घेतले आहे.
Continues below advertisement
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2940 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 44,582 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 63 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 857 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात गुरुवारी (21 मे) कोरोनाच्या तब्बल 2345 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 41,642 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 28,454 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, राज्यात काल 64 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या मृत्यूपैकी 41 जण मुंबई, मालेगाव 9, पुण्यात 7, औरंगाबाद 3, नवी मुंबईमध्ये 2, पिंपरी चिंचवड आणि सोलापूर शहरातील प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. राज्यात आतापर्यंत 1454 जणांचा मृत्यू झाला आहे. काल 1408 कोरोनाबाधित रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.


 


राज्यात आतापर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 68 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनाकरता निगेटिव्ह आले आहेत; तर 41,642 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4 लाख 37 हजार 304 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 26 हजार 865 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 11,726 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.


 


काल झालेल्या मृत्यूंपैकी 36 पुरुष तर 28 महिला आहेत. त्यातील 31 जण हे 60 वर्षापुढील वयोगटातील आहे. 29 रुग्ण हे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. 4 रुग्ण 40 वर्षाखालील आहे. 64 रुग्णांपैकी 38 जणांना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अति जोखमीचे आजार आहेत.

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.