Coronavirus in Maharashtra Live Updates | राज्यात आज 2091 नवे कोरोनाबाधित, 97 जणांचा मृत्यू

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात सोमवारी (25 मे) कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मुंबई, पुण्यासह आता मालेगाव आणि औरंगाबाद ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. या शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 May 2020 07:25 AM

नागपूर : काल संध्याकाळी आणखी 1 कोरोना बाधित रुग्ण आढळला आहे.

नागपुरात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 433 झाली आहे.

संध्याकाळी पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हावरापेठ परिसरातला आहे.

नागपुरात आतापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तर काल पर्यंत 344 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आता नागपुरात केवळ 89 रुग्णांवर उपचार सुरु.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 2091 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 54,758 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 97 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1168 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यात काल रात्री 9 वाजल्यापासून तर आज संध्याकाळी 4 वाजेपर्यंत नवीन 150 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, दोघांचा मृत्यू, पुणे जिल्ह्यात एकूण मृतांचा आकडा 282 वर तर पुणे जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6303 वर
सोलापुरात मागील 24 तासात 16 रुग्णांचे कोरोना अहवाल पॉसिटिव्ह, तर आज आणखी 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू, सोलापूरमधील एकूण कोरोनाबधितांची संख्या 624 वर, तर आतापर्यंत 63 जणांचा मृत्यू
मुंबई : धारावी आणि शिवडी या परिसरातील परप्रांतीय मजूर मोठ्या संख्येने मुंबईतून बाहेर जाण्यासाठी सीएसएमटी येथे दाखल, एसटी महामंडळाच्या बसेस तसेच बीएमसीच्या बसमधून मोठ्या प्रमाणात या नागरिकांना सीएसएमटी परिसरात सोडवलं जात आहे, कोणत्याही पद्धतीचं सोशल डिस्टन्सिंग न पाळता केवळ आपला जीव वाचवण्यासाठी हे परप्रांतीय मजूर मुंबई सोडून बाहेर जात आहेत.
नाशिकमध्ये दिवसभरात 15 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, नाशिक शहरात 10, सिन्नर 3 तर जिल्हा बाहेरील दोघांचा समावेश, दोघांचा मृत्यू, एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, नाशिकमध्ये एकूण रुग्ण संख्या 999, तर 57 रुग्णांचा मृत्यू, 735 कोरोनामुक्त
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी 14 जणांना कोरोनाची लागण, जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 175 वर, जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 112 झाली, आतापर्यंत 63 जण कोरोनामुक्त तर 5 जणांचा मृत्यू
राज्याला कर्जबाजारी करण्याचा पाच वर्षे उद्योग केला त्यांनी कर्ज काढण्याचा सल्ला देवू नये, नवाब मलिकांची देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
नांदेड : उमरी तालुक्यात नव्याने चार रुग्ण आढळले, कोरोनाबाधितांची संख्या 137 वर पोहोचली, आतापर्यंत सात जणांचा मृत्यू, 79 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज तर 51 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
कोल्हापूर : सुनावणीसाठी पुण्याहून कोल्हापूरला आलेल्या वकील आणि त्याचा चालकावर गुन्हा दाखल, जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणीसाठी विनापरवाना आल्याचे उघड झाल्याने पोलिसांकडून गुन्हा दाखल, आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतंर्गत कारवाई
राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील 2003 ते 2019 पर्यंतच्या पदांना मंजुरी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी राज्यातील अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी लॉकडाऊनच्या काळात घर बसल्या आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात केली आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून तरी सरकारने आमचं म्हणणं ऐकून घेऊन आमच्या सर्व मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने केली आहे. आम्हाला सध्या रस्त्यावर उतरून आंदोलन करता येतं नाही. सध्याच्या परिस्थितीत दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागावेत. यामध्ये अडचणी येऊ नयेत यासाठी आम्ही घर बसल्या आत्मक्लेश आंदोलन करत असल्याची प्रतिक्रिया महासंघाचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी दिली आहे.
कोरोनाच्या भीतीमुळे प्रवासाकडे प्रवाशांनी पाठ फिरवल्याने एसटीचा तोटा वाढत चालल्यानंतर आता पंढरपुरात १०० बसेस माल वाहतूक करण्यासाठी सज्ज ठेवण्यात आल्या असून या बसेसमधून शेतीमाल , लघु उद्योजक यांनी मालवाहतुकीसाठी संपर्क साधण्याचे आवाहन पंढरपूर आगर व्यवस्थापक यांनी केले आहे . यासाठी एसटी देखील बाजारभाव एवढाच दर आकारणार असून गरज भासल्यास बसेस मधील सीट देखील काढली जाणार आहेत . सध्या खाजगी ट्रान्सपोर्ट मधील चालक निघून गेल्याने याचा फायदा एसटी महामंडळाला मिळू शकणार असल्याने आपला माल आता लालपरीतून वाहतूक करण्याची विनंती केली जात आहे .
सोलापूर : काल संध्याकाळनंतर 13 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, एकाचा मृत्यू, एकूण बधितांची संख्या 621 तर एकूण मृतांची संख्या 59 झाली तर 277 जणांनी केली कोरोनावर मात
गडचिरोली जिल्ह्यात आणखी एका रुग्णाची भर पडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज दुपारी आणखी एका रुग्णाचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.त्यामुळे कोरोना बाधितांचा संख्या 26 वर पोहचली आहे. आज सापडलेला 1 रुग्ण मुलचेरा तालुक्यातील असून मुंबई वरून आल्याची आरोग्य विभागाने माहिती दिली आहे.
नागपूर : आज 3 कोरोना बाधित रुग्ण आढळले, नागपुरात एकूण कोरोना बाधित रुग्ण संख्या 432 झाली आहे. आज पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये एक मोमीनपुरा परिसरातून असून दुसरा टिपू सुलतान चौक परिसरातला आहे. नागपुरात आतापर्यंत 8 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल पर्यंत 330 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
कोविड 19 विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंधासाठी राज्य शासन करीत असलेल्या उपाययोजनांच्या सद्यस्थितीची माहिती देण्यासाठी मुख्य सचिव अजोय मेहता, प्रधान सचिव, आरोग्य प्रदीप व्यास आणि मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल आज सायंकाळी 5 वाजता ॲानलाईन संवाद साधणार
अकोल्यात आणखी 13 नव्या रूग्णांमध्ये वाढ, जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या 428 वर गेली आहे. तर आतापर्यंत जिल्ह्यात 26 जणांचा म्रूत्यू झाला असून 251 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. सध्या 151 रूग्णांवर उपचार सुरू आहेत
पुणे : कोरोनाबाधित महिलेने दिला कोरोनामुक्त बाळाला जन्म!, कोरोनाबाधित असलेल्या एका महिलेने कोरोनामुक्त बाळाला जन्म दिला आहे. बाळाची तब्येत ठणठणीत असून पुणे महापालिकेच्या सोनावणे रुग्णालयात संबंधित महिलेची प्रसूती करण्यात आली. महापालिकेचे सोनावणे रुग्णालय हे कोरोनाबाधित गर्भवती महिलांसाठी खास राखून ठेवलेले रुग्णालय आहे. यात गरोदर महिलांची विशेष काळजी घेतली जात आहे.
धुळे जिल्ह्यात रात्री उशिरा आणखी एक कोरोना बाधित आढळला असून जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या 116 वर गेली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज 22 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, कोरोनाबाधितांची एकूण  संख्या 1327वर तर आतापर्यंत 55 रुग्णांचा मृत्यू, 770 रुग्ण बरे
रत्नागिरी : सलग तीन दिवस जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पोहोचला 161वर, होम क्वारन्टाईन असणाऱ्यांची संख्या 70 हजारावर; तर संस्थात्मक क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 213 वर पोहोचली आहे.

दारू पिण्याच्या बहाण्याने बोलावून गोळी झाडणाऱ्या दोघा आरोपींना मुंब्रा पोलिसांनी अवघ्या सहा तासात अटक केली आहे. अक्षय पाटील आणि दीपेश उर्फ मामा असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ही घटना रविवारी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दिवा स्मशानभूमी परिसरात घडली, अशी माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली.
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती उद्यापासून तीन दिवस राहणार बंद, शेतमालाशी संबंधित सर्व व्यवहार राहणार बंद, बाजार समितीमध्ये वावर असणाऱ्या दोघांना कोरोनाची लागण झाल्याने समितीचा निर्णय

नागपुरात आज कोरोनाचे 3 रुग्ण आढळले, त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या 426 वर, आज एका कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू, एकूण मृतांची संख्या 8 झाली, तर दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 329 रुग्ण कोरोनामुक्त
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा चारशेच्या दिशेनं, आज दिवसभरात 37 रुग्णांची वाढ, एकूण आकडा 378 वर पोहचला, तर आनंदाची बातमी म्हणजे आज जिल्ह्यातील 6 जण झाले कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल करण्याच्या हालचाली वेगात असून आता मद्यविक्रीला देखील परवानगी देण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात कँनटेन्मेन्ट व बफर झोन वगळून इतरत्र सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत मद्यविक्री करता येणार आहे.

मद्यविक्री सीलबंद स्वरूपातच करता येणार असून दुकानासमोर 5 पेक्षा अधिक व्यक्ती जमणार नाहीत याची काळजी घ्यावी लागणार आहे,

असे आदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी काढले असून हे आदेश 26 मे पासून लागू राहणार आहेत.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2436 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 52,667 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यातील कोरोना बाधितांचा आकडा 2436 ने वाढला असून राज्यातील एकूण रुग्णसंख्या 52,667 आहे. तर दिवसभरात सर्वाधिक 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आज 1186 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, सर्व वैद्यकीय सेवा, रुग्णालय लष्कराच्या ताब्यात द्या; नारायण राणे यांचा सरकारवर हल्लाबोल, कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी, अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी या सरकारकडे कोणतीही उपाययोजना नाही, मुंबईत दिवसेंदिवस राज्यात रूग्ण वाढत चाललेत मात्र महापालिका प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव, योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या राज्यात काय करावं हा त्यांचा प्रश्न, मनसेच्या भूमिकेवर बोलू इच्छित नाही - नारायण राणे
ही मदत नाही आडमुठेपणा आहे, अशा शब्दात राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्यावर टीका केली आहे. एक दिवस आधीची मजुरांची यादी आम्ही देतो. सरसकट 157 गाड्यांसाठी मजुरांची यादी मागणं ही रेल्वेखात्याची आडमुठेपणाची भूमिका आहे. दुसऱ्या दिवशी किती ट्रेन येणार, त्यानुसार यादी देतो. यादीत पण बदल होतात. ही मदत नाही आडमुठेपणा आहे, हे बरोबर नाही, असं थोरात म्हणाले.
श्रीनगर : देश कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या व्हायरसशी लढा देत असतानाच, सीमेवर मात्र जवान देशाच्या शुत्रूंना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी बडगाम जिल्ह्यात झालेल्या यशस्वी मोहिमेनंतर आता कुलगाम जिल्ह्यातील मोहिम फत्ते करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आलं आहे. आज (सोमवारी) कुलगाम जिल्ह्यातील हांजीपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही चकमक सुरु झाली असून सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
श्रीनगर : देश कोरोना व्हायरससारख्या जीवघेण्या व्हायरसशी लढा देत असतानाच, सीमेवर मात्र जवान देशाच्या शुत्रूंना रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काही दिवसांपूर्वी बडगाम जिल्ह्यात झालेल्या यशस्वी मोहिमेनंतर आता कुलगाम जिल्ह्यातील मोहिम फत्ते करण्यात भारतीय सुरक्षा दलांना यश आलं आहे. आज (सोमवारी) कुलगाम जिल्ह्यातील हांजीपोरा भागात दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली असून या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला असल्याची माहिती मिळत आहे. आज पहाटे ही चकमक सुरु झाली असून सध्या या भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी खासदार प्रफुल पटेल हे देखील उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना लॅब तपासणीचा मार्ग आता मोकळा झाला असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दाखवलेल्या हिरव्या कंदीलानंतर आता लॅब तपासणीला रविवारपासून सुरूवात झाली आहे. पुढील 15 दिवसात कोरोनाची लॅब ही जिल्हा रूग्णालयात उभारली जाणार आहे. त्यानंतर मात्र मिरज किंवा जिल्हा बाहेर स्वॅब तपासणीकरता पाठवण्यातचा मार्ग मोकळा होणार आहे. मिरजला जाणारे स्वब मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्याकरता तेथील प्रशासनानं असमर्थता दर्शवली होती. त्यावरून जिल्हा प्रशासनासमोर स्वब तपासणीचा मोठा प्रश्न उभा राहिला होता. पण, आता मात्र हा प्रश्न देखील मार्गी लागला आहे. दरम्यान, याच मुद्यावरून विरोधकांनी शिवसेना आमदार आणि खासदारांवर देखील टीका केली होती. जिल्ह्यात लॅब उभारली जावी याकरता खासदार विनायक राऊत आणि उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी जोरदार प्रयत्न केले होते.
अहमदनगर : मुंबईहून जिल्ह्यात आलेल्या 5 जणांना कोरोनाची लागण झाली असून
नगर तालुक्यातील 2 तर अकोले, श्रीरामपूर आणि पारनेर तालुक्यातील प्रत्येकी 1 व्यक्ती कोरोना बाधित असल्याचं आढळून आलं आहे.
हे सर्व मुंबई येथून नगर जिल्ह्यात आले होते.

आतापर्यंत जिल्ह्यातील

कोरोना बाधितांचा आकडा 96 वर पोहोचला असून 56 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
हिंगोलीत कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येचा परिणाम बस सेवेवर झाला आहे. जिल्हांतर्गत एसटी सेवा सुरु झाली असली तरी कोरोनाच्या भीतीने बस स्थानकं ओस पडली आहेत.
पुण्यातील मार्केटयार्डमधील भुसार विभाग आजपासून झालं आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 5 या वेळेत सुरु राहणार आहे. तर फळे भाजीपाला विभागाबाबत बैठक होऊन लवकरच निर्णय होणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 19 तारखेपासून भुसार विभाग बंद होता. मार्केट यार्ड मधील 8 व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर मार्केट अनिश्चित काळापर्यंत बंद राहणार असा निर्णय घेण्यात आला होता. परंतु प्रशासनासोबत व्यापाऱ्यांच्या बैठका झाल्या आणि काही नियम अटी लागू करून आजपासून पुण्यातील भुसार मार्केट सुरू करण्यात आलेला आहे. खरंतर या मार्केट मार्फत पुणे शहर आणि संपूर्ण जिल्ह्यामध्ये अन्नधान्याचा पुरवठा केला जातो त्यामुळे या मार्केटमध्ये नेहमी मोठी गर्दी असते. मार्केट यार्ड मध्ये मोजक्याच गाड्या आतमध्ये सोडण्यात येणार आहेत.
अमरावतीत सहा जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये चार पुरुष तर दोन महिलांचा समावेश आहे. 3 वर्षीय मुलगा आणि 4 वर्षांच्या मुलीलाही कोरोनाची लागण झाली आहे. अमरावतीमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 170 वर पोहोचली आहे. त्यापैकी 76 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 79 जणांवर सध्या उपचार सुरु आहेत. आतापर्यंत 15 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

अकोल्यात कोरोना रूग्णांनी पार केला चारशेचा आकडा, आज 9 नवे रूग्ण आढळले असून जिल्ह्यातील रूग्णसंख्या 406 वर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 251 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अकोल्यात सध्या 131 रूग्णांवर उपचार सुरू आहे
मालेगावमध्ये ईद निमित्ताने 2000 पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असून, नागरिकांनी सहकार्य करत आपल्या घरात नमाज पठण केले.

अकोल्यात कोरोना रूग्णांनी पार केला चारशेचा आकडा, आज 9 नवे रूग्ण आढळले असून जिल्ह्यातील रूग्णसंख्या 406 वर गेली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 24 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 251 रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. अकोल्यात सध्या 131 रूग्णांवर उपचार सुरू आहे
बारामती तालुक्यातील लोणी भापकर मध्ये कोरोनाचा नवा रुग्ण आढळला आहे. बारामतीत कोरोनाग्रस्तांची संख्या 15 वर, तर आतापर्यंत बारामती तालुक्यात सहा रुग्ण बरे झाले असून सात रुग्णांवर उपचार सुरू आहे. तर दोघांचा मृत्यू झाला आहे
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबादेतही मुस्लिम बांधवांनी ईदचा नमाज घरीच अदा केला. खर तर यापूर्वी प्रत्येक वर्षी औरंगाबादेत ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे.शहरातील इदगाह मैदानात सार्वजनिक नमजाचे पठण होत होते.पण इतिहासात पाहिल्यांदाच ईदची नमाज घरीच अदा करण्याची वेळ कोरोनामुळे आली आहे. यावर्षी ईदही साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता औरंगाबादेतही मुस्लिम बांधवांनी ईदचा नमाज घरीच अदा केला. खर तर यापूर्वी प्रत्येक वर्षी औरंगाबादेत ईद मोठ्या उत्साहात साजरी केली जात असे.शहरातील इदगाह मैदानात सार्वजनिक नमजाचे पठण होत होते.पण इतिहासात पाहिल्यांदाच ईदची नमाज घरीच अदा करण्याची वेळ कोरोनामुळे आली आहे. यावर्षी ईदही साध्या पद्धतीने साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मुस्लीम बांधवांचा पवित्र असा रमजान महिना आज संपला. मात्र यंदाच्या ईदवर कोरोनाचे सावट आहे. अशा परिस्थितीत दरवर्षी परभणीच्या ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज अदा केली जाते, मात्र यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वत्रच खबरदारी घेतली जात आहे पाथरी येथे राष्ट्रवादीचे आमदार बाबाजाणी दुराणी यांनी जास्त गर्दी न करता सोशल डिस्टनसिंग ठेवून शहरातील मोजक्याच मुस्लिम बांधवांना घेऊन आपल्या घरासमोर ही नमाज अदा केली. यावेळी जगभरात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजलीही वाहण्यात आली. याशिवाय सर्वांच्या आरोग्यासाठी प्रार्थना ही करण्यात आली आहे.
जालन्यात एका रात्रीतून 10 कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्याचा आकडा 71 वर, 10 नवीन रुग्णांपैकी 6 महिला आणि 4 पुरुषांचा समावेश. आतापर्यंत उपचारानंतर 15 जणांना डिस्चार्ज.
वाशिम कारंजा तालुक्यातील ग्राम पारवा कोव्हर येथील शेतकर्यां ने दोन एकरवरील पपईवर फिरवला नांगर, कोरोनामुळे वाहतूक बंद झाल्याने पपईला घेण्याकरीता व्यापारी नसल्याने गजानन एकनार या शेतकऱ्याने पपईवर ट्रॅक्टरच्या मदतीने नांगर फिरवला .
आज बीड जिल्ह्यातील सहा रुग्ण कोरोना बाधित आढळले. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या झाली 47 झाली आहे.
अहमदनगर : विद्युत तारेला चिकटून दोन अल्पवयीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू, कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभार हद्दीतील घटना, सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणी घडली घटना
ठाकरे सरकार मधील अजून एक मंत्री कोरोना बाधित. काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्र्याला कोरोनाची लागण. रुग्णालयात उपचार सुरू. जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अजून एक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह.
नाशिक जिल्ह्यात आज नवीन 14 कोरोना पॉझिटीव्ह. शहरातील 12 तर ग्रामीण मधील दोघांचा समावेश. जिल्हातील कोरोनाग्रस्ताची संख्या 950 वर. सध्या नाशिक शहर 88, मालेगाव मनपा 696, नाशिक ग्रामीण 127, जिल्ह्याबाहेरील 39 अशी रुग्णांची संख्या आहे.
राज्यात पहिल्यांदा एकाच दिवशी 3000 हून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळले, आज राज्यात एकूण 3041 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, राज्याने 50 हजार रुग्णांचा टप्पा ओलांडला, एकूण रुग्णसंख्या 50231 वर, तर आज 1196 रुग्ण कोरोनामुक्त

जेजुरी : खंडोबाच्या दर्शनाला येणाऱ्या नवविवाहित जोडप्यांवर कारवाई होणार, गाडी जप्त करण्याचा पोलिसांचा इशारा, राज्याच्या विविध भागातून काही भाविक व नवविवाहित जोडपी खाजगी वाहनाने जेजुरीत येत असल्याने पोलिसांचा निर्णय
पुणे :
कोणतीही परवानगी न काढता मुंबईहून इंदापूर तालुक्यात आलेले 4 जण कोरोना पॉझिटिव्ह, तीन नातेवाईकांवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औरंगाबादसाठी दिलासादायक बातमी आहे. कोरोनावर उपचार घेणाऱ्या रुग्णांपेक्षा कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक झाली आहे. आज मिनी घाटी रुग्णालयातून एकाच वेळी सत्तावीस रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर इतर रुग्णालयातून आणखी तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असे 31 रुग्ण आज कोरोनामुक्त झाले. त्यामुळे औरंगाबादेत कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या 683 वर जाऊन पोहोचलेली आहे.
पुण्यात उद्यापासून भुसार बाजार सुरू होणार. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी मार्केट यार्डमधील भुसार बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आज भुसार व्यापाऱ्यांच्या बैठकीत बाजार सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑनलाइन व्यवहारांना अधिक प्राधान्य दिले जाणार आहे. शिवाय गर्दी आटोक्यात ठेवण्यासाठी मर्यादित आवक मागविली जाणार आहे.
राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार, आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, महाराष्ट्राचं अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष, पुढच्या 15 दिवसात आपल्या देशाचं खरं चित्र समोर येणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
संकटाचा काळ आहे कुणीही राजकारण करु नये, अडचणीच्यावेळी राजकारण करणं हे माझ्या संस्कृतीत नाही, महाराष्ट्राचा संपूर्ण विश्वास आमच्यावर आहे
राज्यातील जनतेलाही आपल्या घरी जाता येणार, आम्हाला सर्व सुरळीत करायचं आहे, पण कोरोनाला टाळून करायचं आहे, महाराष्ट्राचं अर्थचक्र कसं चालणार यावर लक्ष, पुढच्या 15 दिवसात आपल्या देशाचं खरं चित्र समोर येणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्याला पुन्हा एकदा रक्त पुरवठ्याची गरज, ज्यांना रक्तदान करायचं, त्यांनी पुढे यावं, रक्तदान करावं : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात अनेक मैदानं, सभागृह आम्ही सज्ज ठेवली आहेत, तर मे अखेरीस 13 ते 14 हजार बेड्स उपलब्ध करुन देणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
राज्यात आत्तापर्यंत साडे तीन लाख कोरोना चाचण्या झाल्या असून आता प्रत्यक्षात राज्यात 33 हजार 786 पॉझिटिव्ह रुग्ण आहेत : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
कोरोनाच्या गुणाकाराला कोणतीही मर्यादा नाही, मेच्या अखेरीस राज्यात दीड लाख असतील असा अंदाज होता, पण तुम्ही शिस्त पाळल्याने आकडे आटोक्यात आले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून मुस्लिम समाजातील बांधवांना ईदच्या शुभेच्छा, ईद घरात बसून साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचं आवाहन
पालघर जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आलेख वाढताच, पालघर ग्रामीणमध्ये गेल्या तीन दिवसात तीन रुग्ण वाढले, पालघर ग्रामीणमध्ये रुग्ण संख्या 64 वर तर तीघांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 532 वर पोचली असून 20 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय तर 250 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत.
मुंबईत अधिकचे 10 हजार बेड बनवण्याची तयारी सुरू, मंत्री अस्लम शेख यांची माहिती, मेहबूब स्टुडिओ इथे हजार बेड होतील, ना.म.जोशी मार्ग येथील महापालिका पार्किंग इथे देखील व्यवस्था करण्यात येईल, बीकेसी, रिलायन्स जिओ इथे देखील व्यवस्था करण्यात येणार आहे, असं शेख यांनी सांगितलं

मुंबई , पुणे आणि महाराष्ट्रातील रेड झोन मध्ये ऑनलाईन सर्व्हिसेस सुरु करण्याला महाराष्ट्र सरकारनं परवानगी दिलीय.मात्र, या निर्णयाचा मुंबईतील व्यापारी संघटनेनं विरोध केलाय.

फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वेलफेअर असोशिएशन चे अध्यक्ष विरेन शहा यांनी या निर्णयामुळे दुकानदारांचा आणखी मोठा तोटा होणार असल्यातं म्हटलंय.
बीड शहरातील पेठ बीड भागात तिहेरी हत्याकांड, एका महिलेसह दोन मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. सदरील महिलेच्या डोक्यात भारदार वस्तूचा मारा करत तिची हत्याकरण्यात आली आहे. तर लेकरांना पाण्यात बुडवून जीवंत मारल्याचे सांगण्यात येत आहे. बीड शहरात हत्याकांड घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. मृत महिलेचा पती चौकशीसाठी पोलिसांच्या ताब्यात
पुणे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताच, काल रात्रीपासून जिल्ह्यात नवीन 59 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या नवीन रुग्णांमुळे पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 5 हजार 485 इतकी झाली आहे.
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यात होम क्वारंटाईनवरुन झालेल्या वादातून दोघांचा मृत्यू झाला आहे. लातूर जिल्ह्यातल्या बोलेगाव येथील ही घटना आहे. विद्यमान बरमदे हा व्यक्ती बाहेरगावातून काही दिवसांपूर्वी गावात आला. सुरक्षिततेच्या दृष्टीने गावातील तरुण त्याने विलगीकरणात राहावं म्हणून ध़डपडत होते. त्यातील शत्रुघ्न पाटील या तरुणाने त्याला घरातच क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला. पण पुढे त्याचं वादात रुपांतर झालं. त्यात विद्यमान आणि इतर लोकांनी शत्रुघ्न पाटीलच्या वडील आणि पुतण्याला बेदम मारहाण केली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. कासार सिरशी पोलिस पुढील तपास करत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दुपारी 1.30 वाजता महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करणार आहेत. कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना मुख्यमंत्री काय महत्वाची घोषणा करणार याकडे लक्ष लागून आहे.

नांदेडमध्ये मठाधिपती शिवाचार्यांसह आणखी एकाची हत्या करण्यात आली आहे. बालब्रह्मचारी शिवाचार्य निर्वाणरुद्र यांची मठातच हत्या करण्यात आली. चिंचाळा गावच्या भगवान शिंदे यांचा मृतदेह मठातल्या बाथरुममध्ये सापडला. आज पहाटे 3 वाजता हे दुहेरी हत्याकांड झाल्याची माहिती आहे. दरम्यान, साईनाथ लिंगाडे याच्यावर हत्येचा आरोप आहे. सध्या तो जामिनावर बाहेर आहे. संशयित आरोपी साईनाथविरोधात तक्रार देऊनही पोलिसांनी ती गांभीर्यानं घेतली नाही, असा आरोप नागठाणा ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे हत्येच्या आरोपीला अटक होईपर्यंत दोन्ही मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली आहे.
पुणे जिल्ह्यात काल रात्रीपासून नवीन 59 कोरोना बाधित रुग्णांची नोंद, पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 5485, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 2902 वर
जालना : जालन्यात कोरोनाच्या नवीन 6 रुग्णांची भर, यापैकी 3 अंबड तालुक्यातील तर 3 जालना शहरातील; जालन्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 60 वर तर आत्तापर्यंत 13 जणांना डिस्चार्ज
चंद्रपूर : फूड पॅकेट मिळविण्यासाठी प्रवाशांमध्ये हाणामारी, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर रेल्वे स्टेशन मँगलोर-लखनऊ श्रमिक स्पेशल ट्रेनमधील घटना, बल्लारपूर रेल्वे स्टेशन वर 72 प्रवाश्यासाठी जेवण देण्यात आले होते, पण डब्ब्यात क्षमतेत जास्त प्रवासी असल्यामुळे हाणामारी झाल्याचं समोर आलं आहे. मँगलोरमधून रेल्वे पोलीस पैसे घेऊन जास्त प्रवासी चढवत असल्याचा आणि त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे
कोकणातील पारंपरिक लोककला असलेली दशावतार लोककलेला कोरोनामुळे देश लॉकडाऊन झाल्याने फटका बसला आणि सध्या दशावतार लोककलेचे नाट्य प्रयोग बंद पडले आहेत. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात विलागिकरण कक्षात असलेल्या व्यक्ती आपल्या अंगातील कलागुणांना वाव देताना पाहायला मिळत आहेत. विलागिकरण कक्षात विरंगुळा करतानाचा हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे व्हिडीओ मालवण तालुक्यातील कांदळगाव गावातील ओझर शाळेच्या विलागिकरण कक्षात असलेल्या व्यक्तींनी केलेले आहेत. मालवणी माणूस दशावतारापासून दूर राहू शकत नाही याचं हे उदाहरण आहे. सध्या विलागिकरण कक्षात विरंगुळा म्हणून लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह उपयोग करून दशावतार नाटक, टिकटॉक व्हिडीओ करत स्वत:चा विरंगुळा करतानाचे व्हिडीओ व्हायरल होत आहेत.
औरंगाबादमध्ये 28 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले. औरंगाबाद जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 1276, आतापर्यंत 48 रुग्णांचा मृत्यू तर 582 रुग्ण बरे होऊन घरी
जळगाव जिल्ह्यात कोरोना संशयित म्हणून स्वॅब घेतलेल्या व्यक्तीपैकी आज दिवसभरात 673 व्यक्तींचे नमुना तपासणी अहवाल प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 626 अहवाल निगेटिव्ह तर 47 पॉझिटिव्ह आले. जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 428 झाली. पैकी 179 रुग्णांनी कोरोनावर मात केली तर 47 व्यक्तीचा मृत्यू झाला.
हिंगोलीत पुन्हा 44 जणांचे तपासणी रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने खळबळ, जिल्ह्यातील पहिल्यांदाच रुग्ण संख्येत एवढी मोठी वाढ, सद्या जिल्ह्यातील रुग्ण संख्या ही 151 वर पोहचली आहे. त्यापैकी 89 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सद्यस्थितीत 62 रुग्ण उपचार घेत आहेत. मुंबई व इतर ठिकाणावरून गावी परतनाऱ्या लोकांमुळे ही संख्या झपाट्याने वाढत आहे.
गृहमंत्री अनिल देशमुख यांचा विमान वाहतुकीला विरोध, मध्यरात्री ट्विट करून केली टीका, रेड झोन मधील विमानतळ अशा परिस्थिती मध्ये सुरू करणे अत्यंत धोकादायक आहे. स्वॅब शिवाय प्रवाशांचे नुसतं थर्मल स्कॅनिंग चा काय फायदा? सध्या रिक्षा, टॅक्सी, बस सेवा मोठ्या प्रमाणात चालविणे शक्य नाही. पॉझिटिव्ह प्रवाशाला रेड झोन मध्ये आणून तेथील धोका वाढविणे हे चुकीचे आहे, असं अनिल देशमुखांचं मत
औरंगाबाद : भाजप खासदार भागवत कराड यांच्या मुलाचा भाजपच्या कार्यकर्त्यावर हल्ला, कुणाल मराठे नावाच्या कार्यकर्त्याच्या घरात घुसून मारहाण, कोटला कॉलनी येथील घटना
मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल, मारहाणीचे कारण कळू शकले नाही
ठाण्यात कोरोनाचा वाढता प्रभाव बघून राज्य सरकारची आणखीन एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती, रणजीत कुमार सध्या माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक आहेत.त्यांची ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना मदत करण्यासाठी नियुक्ती, महापालिका आयुक्तांना असलेले सर्व अधिकार रणजीत कुमार यांना देखील असणार आहेत.
राज्यात आज नवीन 2608 कोरोना रुग्णांची वाढ. दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण आढळण्याचा सलग सातवा दिवस. 17 मे पासून दोन हजार पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत.
सातारा जिल्हात रात्रीत 40 रुग्ण वाढल्यानंतर आणखी सहा रुग्णांची भर. गेल्या 24 तासांत 46 बाधित वाढले. सातारा जिल्ह्यातील आता कोरोना बाधितांचा आकडा 247 झाला आहे. पचार घेऊन घरी गेलेली संख्या 114 इतकी आहे. तर आजपर्यंत सहा कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला.
शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा धोका वाढत चाललाय. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात या विषाणूचा उपचारासाठी काय उपाययोजना करायच्या याचे संशोधन करण्यासाठी व कम्युनिटी स्प्रेडचा अभ्यास करणाऱ्या आयसीएमआरच्या डॉक्टरांनी बीड जिल्ह्यातून रक्त नमुने तपासले आहेत. आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च पुणे शाखेच्या चौघांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील एकूण दहा ठिकाणच्या ठरावीक लोकांचे रक्त नमुने घेतले आहेत.
गडचिंचले साधू हत्याकांडानंतर तत्कालीन पालघरचे पोलीस अधीक्षक गौरव सिंग यांना सक्तीच्या रजेवर पाठविल्यानंतर दत्तात्रय शिंदे हे सध्या कार्यकारी संचालक महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लि. मुंबई याठिकाणी कार्यरत आहेत. त्यांची पालघरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी दोन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ. औरंगाबाद कोरोनाबाधितांची एकूण संख्या 1243 वर. या वाढलेल्या रुग्णांमध्ये औरंगाबाद शहरातील राजाबाजार आणि एन-4 गणेश नगरातील प्रत्येकी एका पुरूष रुग्णाचा समावेश आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील बैठकीत महाराष्ट्रातील परिस्थितीचा आढावा घेतला गेला. विशेषतः मुंबई, ठाण्यात काय उपाययोजना केल्या याची चर्चा झाली, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. मजुरांना घरी जाण्यासाठी अधिकच्या गाड्या मिळाव्या मागणी केंद्राकडे केली, पण ट्रेन मिळत नाहीत. मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन मिळावी या संदर्भात निर्णय करणे आवश्यक आहे. यासाठी पुन्हा आम्ही मागणी करत आहोत. याबाबत शरद पवार हे रेलवे मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलत आहेत, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.
पंकजा मुंडे यांनी 3 जून रोजी मुंबईहून बीडला जाण्याची शासनाकडे परवानगी मागितली, गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतीदिनानिमित्त जाण्यासाठी मागितली परवानगी
'राजकारणातून निवृत्ती घेत आहे, माझी उत्तराधिकारी पत्नी असेल', केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंचे जावई आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांची घोषणा
मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आढावा बैठक सुरु, बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये बैठक, बैठकीला मंत्री जयंत पाटील, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव अजोय मेहता उपस्थित
मुंबई :राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात थोड्याच वेळात सुरु होणार आढावा बैठक, बाळासाहेब ठाकरे स्मारकामध्ये होणार बैठक
बीड : शहरी भागासोबतच ग्रामीण भागात सुद्धा कोरोनाचा धोका वाढत चाललाय. अशा परिस्थितीमध्ये भविष्यात या विषाणूच्या उपचारासाठी काय उपाययोजना करायच्या याचे संशोधन करण्यासाठी व कम्युनिटी स्प्रेडचा अभ्यास करणासाठी आयसीएमआरच्या डॉक्टरांनी बीड जिल्ह्यातून रक्त नमुने तपासले आहेत.

आयसीएमआर म्हणजेच इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च पुणे शाखेच्या चौघांच्या पथकाने बीड जिल्ह्यातील एकूण दहा ठिकाणच्या ठराविक लोकांचे रक्त नमुने घेतले आहेत.
पुणे : पुण्यात कोरोनाबाधित डॉक्टरचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू, घोरपडी परिसरातील 56 वर्षे डॉक्टरचा रूग्णालयात उपचार सुरू होते, काल (शुक्रवारी ) सायंकाळी ससून रुग्णालयात डॉक्टरचा मृत्यू झाला, या डॉक्टरकडे उपचारासाठी आलेला रुग्ण कोरोनाबाधित निष्पन्न झाला होता.
अकोल्यात आणखी 7 नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 362 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 211 जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 23 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या 128 आहे.
चंद्रपूर : मुंबईत कार्यरत असलेली पण मूळची चंद्रपुरातील 21 वर्षीय नर्सला कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईच्या नामांकित हॉस्पिटलमध्ये काम केल्यावर तिथेच 22 दिवस क्वारंटाईन झाली होती. 16 मे रोजी शहरात स्वतःच्या घरी परतली. पण 20 मे रोजी लक्षणे वाटू लागल्याने स्वतःच सामान्य रुग्णालयात दाखल झाली. तिथे स्वॅब घेतल्यावर आज तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 13 झाली आहे. शहरातील बाबूपेठ भागातील तिच्या घराजवळचा भाग कोरोना प्रतिबंधित क्षेत्र जाहीर होण्याची शक्यता आहे.
सोलापूर शहर पोलिसात आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शहर पोलीस दलातील कर्मचाऱ्याचा गुरुवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाल्याचं काल आलेल्या अहवालात सांगण्यात आलं आहे. अशी माहिती पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी दिली. याआधी शहर पोलीस दलातील एका सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक असलेल्या अधिकाऱ्याचा कोरोनामुळे जीव गेला आहे. त्यामुळे आतापर्यंत सोलापुरातील दोघां पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आता पर्यंत शहर पोलीस दलातील एकूण 15 कर्मचारी कोरोना बाधित आहेत. यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. ते तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी डिस्चार्ज देण्यात आला आहे. उर्वरित 10 जणांवर उपचार सुरू आहेत.
हिंगोलीमध्ये नव्याने 6 कोरोना रुग्णांची भर पडली आहे. यात औंढा तालुक्यातील एक तर वसमत तालुक्यातील पाच रुग्णांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण मुंबई येथून आपल्या गावी आले होते. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 107 वर पोहोचली आहे. त्यापैकी 89 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीला 18 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु असून सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे.
आयसीएमआरचं एक पथक आज नांदेडमध्ये येणार, जुन्या नांदेड भागातील काही लोकांचे रक्ताचे नमुने घेतले जाणार, कोरोनाचा अभ्यास करण्यासाठी नमुने घेणार
गोंदिया - मागील चोवीस तासात 5 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 35 वर गेली आहे. केवळ तीन दिवसात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत दोन अंकी वाढ झाली.
धुळे- शुक्रवारी जिल्ह्यातील तब्बल 21 जणांचे रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. जिल्हा रुग्णालय धुळे येथील चार आणि हिरे रुग्णालयातील 17 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पोस्ट ऑफिसमधील तीन कर्मचारी तसेच शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
धुळे- शुक्रवारी जिल्ह्यातील तब्बल 21 जणांचे रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले. जिल्हा रुग्णालय धुळे येथील चार आणि हिरे रुग्णालयातील 17 जण पॉझिटिव्ह आढळले. जिल्ह्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 102 वर पोहोचली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पोस्ट ऑफिसमधील तीन कर्मचारी तसेच शिरपूर तालुक्यातील भाटपुरा येथील 48 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 मधील उर्वरित पात्र लाभार्थ्यांना लाभ देणे तूर्तास शक्य नाही,

कोरोना व्हायरसचा शेतकरी कर्जमुक्ती योजनेवर परिणाम, बळीराजा संकटात, सरकारचा निर्णय
जिल्ह्यात रात्री नवीन दोन कोरोना रुग्णांची वाढ, जिल्ह्यात एकूण 54 रुग्ण, आजवर 11 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज, रात्री आढळलेल्या दोनपैकी एक खाजगी रुग्णालयाचा कर्मचारी, तर दुसरा हिवरा काबली गावाच्या व्यक्ती
सातारा : साताऱ्यात एका रात्रीत 40 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह, सातारा जिल्ह्यात 241 बाधित रूग्ण, आजपर्यंत कोरोनाचे पाच बळी, शल्य चिकित्सक अमोद गडीकर यांची माहिती
परभणीत आणखी दोन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. जिंतुर तालुक्यातील सावंगी भांबळेमधील एक तर परभणीतील एक जण कोरोनाबाधित असल्याचं समोर आलं. हे दोन्ही रुग्ण मुंबईहून आल्याचं समजतं. दरम्यान जिल्ह्यातील रुग्ण संख्या 21 वर पोहोचल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
नाशिक : सोमवारपासून विमानसेवा सुरू होण्याची शक्यता, नाशिक-अहमदाबाद विमानसेवेसाठी बुकिंग सुरू, लॉकडाऊन नंतर 25 तारखेला पहिलं उड्डाण होऊ शकतं, 1 जून पासून हैदराबाद, पुणे विमानसेवा सुरू होण्याची शक्यता, हैदराबाद, पुण्यासाठी अद्याप बुकिंग नाही, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत विमानसेवा सुरू करण्याची तयारी
औरंगाबादमध्ये 23 नवे कोरोनाबाधित वाढले, सहा महिला आणि 17 पुरूष रुग्णांचा समावेश, जिल्ह्यात 1241 कोरोनाबाधित. 46 रुग्णांचा मृत्यू तर 580 रुग्ण बरे होऊन घरी
मुख्यमंत्री आणि पंतप्रधान साहाय्यता निधीला प्रत्येकी 50 लाखांची मदत केल्यानंतर नाणीज येथील नरेंद्र महाराज संस्थानाने पोलीस दलालाही मदतीचा हात पुढे केला आहे. या संस्थानाने रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांच्याकडे 10 लाखांचा चेक सुपूर्द केला. या निधीतून जिल्ह्यातील पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या कुटुंबासाठी मास्क, सॅनिटायझर आणि हात मोजे अशा साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. यातून जवळपास 1500 पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांना हे साहित्य दिले जाणार आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. कारण काल जिल्ह्यात सात जणांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 132 वर पोहोचला आहे. गुहागर, दापोली, रत्नागिरीमध्ये प्रत्येकी 2 जणांना तर संगमेश्वरमध्ये एकाला कोरोनाची लागण झाली आहे. यातील समाधानाची बाब म्हणजे आतापर्यंत 37 कोरोनामुक्त झाले आहेत. तर चार जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दरम्यान, कालपासून जिल्ह्यातील काही अटी आणि नियमांसह सर्व प्रकारची दुकानं सुरु झाली असून जिल्हावासियांची जबाबदारी आता वाढली आहे.
सोलापूर शहर पोलिसात आणखी एका कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू झाला. याआधी शहर पोलीस दलातील एका उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे जीव गेला होता. त्यांच्याच संपर्कातील असलेल्या या पोलीस कर्मचाऱ्याचा गुरुवारी रात्री मृत्यू झाला. आतापर्यंत शहर पोलीस दलातील एकूण 15 कर्मचारी कोरोनाबाधित असून त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला तिघांन डिस्चार्ज मिळाला आहे. तर उर्वरित 10 जणांवर उपचार सुरु आहेत.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Updates:  राज्यात सोमवारी (25 मे) कोरोनाच्या तब्बल 2436 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 52,667 वर गेली आहे. या पैकी सध्या राज्यात 35,178 अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, सोमवारी राज्यात 60 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 38 जण मुंबई, पुण्यात 11, नवी मुंबईमध्ये 3, ठाणे, औरंगाबाद प्रत्येकी 2, सोलापूर, कल्याण डोंबिवली , रत्नागिरीमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 1695 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 1186 कोरोनाबाधित रुग्णांना सोमवारी डिस्चार्ज देण्यात आला आहे.


राज्यात सोमवारपर्यंत पाठवण्यात आलेल्या 3 लाख 78 हजार 555 नमुन्यांपैकी 52,667 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 30 हजार 247 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 35 हजार 479 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आतापर्यंत 15,786 कोरोना बाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.