Coronavirus Maharashtra Live Updates | नाशिकमध्ये 4 नवे कोरोनाग्रस्त, जिल्हातील एकूण रुग्णांची संख्या 382 वर

Coronavirus in Maharashtra Live : राज्यात रविवारी (3 मे) कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे काल 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील दोन शहरं मुंबई आणि पुणे ही कोरोना व्हायरसची हॉटस्पॉट बनली आहेत. दोन्ही शहरात कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून हा सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे. कोरोना व्हायरसविषयी सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडी आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 05 May 2020 09:52 AM
नाशिक जिल्ह्यातील 5 जणांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात
4 नवीन रुग्ण असून एकाची दुसरी चाचणी ही पॉझिटिव्ह आली आहे.
नाशिक शहर, येवला, सटाणा, सिन्नर, मालेगांव मधील प्रत्येकी एक रुग्ण आहे. नाशिक
जिल्ह्यात आतापर्यंत रूग्णसंख्या 382 झाली असून त्यापैकी 25 जण
कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत 12 जणांचा
मृत्यू झाला आहे.
नाशिक शहरातील एकूण 51 दारू दुकान मालकांवर गुन्हे दाखल
करण्यात आले आहेत. शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन न करणे, आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आणि साथरोग अधिनियम कायद्यानुसार पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
सोशल डिस्टंन्सिंग, गर्दी न होता एकावेळी दुकानासमोर 5 नागरिक उभे राहतील अशी व्यवस्था करणं, अशा अनेक नियमांचे झाले उल्लंघन झालं आहे.
बीड जिल्ह्यात सकाळी सात ते साडे नऊपर्यंत संचारबंदी शिथिल करण्यात येते. तिसऱ्या टप्प्यात करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी अंशतः काही प्रमाणात सूट दिली आहे. दरम्यान कोरोना बाबत नागरिक अजूनही गंभीर नसल्याचं दिसून आलं. परळी शहरातील मोंढा मार्केट, राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक तसेच बँका बाहेर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा उडल्याचं दिसून आलं. एरवी असलेल्या गर्दीपेक्षा आज अधिक वर्दळ पहायला मिळाली.
कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीत काही नवे सामाजिक बदल स्वीकारण्याची वेळ आली आहे. कोरोना व्हायरसमुळे मार्च आणि एप्रिल या महिन्यात मिळून लग्नाच्या जवळपास 44 तिथी होत्या. या मुर्हुर्तावर बुकिंग करण्यात आलेले मंगल कार्यालय रद्द झाली आहेत. एका अंदाजानुसार महाराष्ट्र मधील सुमारे दोन लाखांहून अधिक लग्न पुढे ढकलण्यात आली आहेत. त्यामुळे मंगल कार्यालया बरोबरच लग्न ह्या सोहळ्याची निगडीत असलेले अनेक घटक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. आता ग्रीन झोनमध्ये आणि उर्वरित झोनमध्ये सुद्धा काही अटींसह राज्यसरकारनं लग्नाला परवानगी दिली आहे. त्यामुळे केवळ गोरज मुहूर्तावरतीच लग्न, धुमधडाक्यात लग्न या गोष्टी टाळून नव्या सामाजिक बदलांमध्ये आपल्या सोयीच्या तारखांना लग्नाचा योग जुळून आणणं शक्य आहे का? याचा विचार करण्याची वेळ आली आहे.
पिंपरी-चिंचवडमध्ये

कंटेन्मेंट झोन सोडून शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

घरोघरी वितरण सकाळी 7 ते 10 या दरम्यान करावे, तसेच यासाठी

वृत्तपत्र घेणाऱ्याची संमती असावी

, वृत्तपत्र वितरण करणाऱ्याने मास्क घालावा, सॅनिटायझर वापरावा
,
सोसायटीने घरी वितरणाला परवानगी दिली नाही, तर सोसायटीच्या कार्यालयात वितरण करावे. अशा नियमांचे पालन करत वृत्तपत्र वितरणाला परवानगी देण्यात आली आहे.
सातारा जिल्हा शासकिय रुग्णालयात दोघांचा मृत्यू झाला आहे.
कोरोना संशयीत म्हणून या दोघांना रुग्णालयात दाखल
केले होते. दोघांचे स्वॅब घेऊन पाठवले, आज या दोघांचा रिपोट येणं अपेक्षित
आहे. यातील एक रुगण 3 तारखेला उपचारासाठी रूग्णालयात दाखल झाला होता, तर दुसऱ्या रूग्णाला काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दोघांनाही श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती सिव्हिल सर्जननी दिली आहे. यातील एक सातारा तालुक्यातील गाव लोणी येथील, तर सातारा दुसरा फलटण तालुक्याती आहे.
पुण्यात कंटेनमेंट झोन वगळता शहरात वृत्तपत्र वितरणाला सशर्त परवानगी, ग्राहकाच्या संमतीने घरोघरी वितरण सकाळी 7 ते 10 या दरम्यान करावे, वृत्तपत्र वितरण करणाऱ्याने मास्क आणि सॅनिटायझर वापरावे, सोसायटीने घरी वितरणाला परवानगी दिली नाही तर सोसायटीच्या कार्यालयात वितरण करावे, पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांच्या सूचना
राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागांवर कुणाची वर्णी लागणार? राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन जांगासांठी अनेकजण इच्छुक. अमोल मिटकरी, महेश तपासे, नजिब मुल्ला, रुपाली चाकणकरांसह, हेमंत टकले आणि शशिकांत शिंदे यांचही नाव चर्चेत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी तीन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. आज एक रुग्ण शहरातील तर दोन शहराबाहेरील रुग्णांना कोरोनाची लागण. आत्तापर्यंत शहरातील 124 तर शहराबाहेरील उपचारासाठी दाखल 9 असे एकूण 133 रुग्ण कोरोना बाधित. आज दोन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत शहरातील रुग्णालयातून 55 तसेच शहराबाहेरील रुग्णालयातून 2 असे एकूण 57 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, शहरातील 3 आणि शहराबाहेरील 2 असे एकूण 5 मृत्यूची नोंद आहे.
सोलापुरात कोरोना बाधितांची 135 वर, आज दिवसभरात 7 जणांचे अहवाल पॉसिटिव्ह, तर दोघांचा मृत्यू, आतापर्यंत 8 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
वसई विरार क्षेत्रात आज दिवसभरात 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढले आहेत. तर एकाच दिवसात 15 जण कोरोनामुक्त झाले आहेत. कोरोनामुक्त रुग्णांची संख्या वाढली असल्याने वसई विरार नालासोपाराकरांसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.
नाशिकमधील डॉक्टरला कोरोनाची लागण, खाजगी दवाखान्यात कोरोना बाधित रुग्णावर उपचार करताना झाली लागण, नाशिकची कोरोनाबधितांची संख्या 17 तर 3 जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका हद्दीत आज कोरोनाचे 18 नवे रुग्ण आढळले. यासह केडीएमसीची एकूण कोरोना रुग्णसंख्या 213 वर, आज आढळलेल्या 18 रुग्णांपैकी 10 रुग्ण हे पूर्वीच्या कोरोनाबाधित रुग्णांचे निकट सहवासित आहेत, तर 4 रुग्ण हे मुंबई आणि नवी मुंबई पोलीस दलाचे कर्मचारी आहेत.
महसूलात घट झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम, राज्य सरकारकडून कठोर उपापयोजना करण्याचा निर्णय, आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण, औषधी द्रव्य विभाग वगळता इतर विभागांच्या नव्या भरतीवर बंदी, सर्व विभागांचा नवे बांधकाम हाती न घेण्याच्या सूचना
कोल्हापुरात दारूसाठी नंबर लावण्यावरुन तळीरामांमध्ये हाणामारी झाली. कोल्हापुरातील सुशील वाईन्स समोर ही घटना घडली. ईन शॉप उघडताच तळीरामांचा धीर सुटल्याने ही घडल्याचे बोलले जात आहे.
आजपासून देशभरातील तिसऱ्या लॉकडाऊनला सुरुवात झाली आहे. त्यामुळे राज्यभरात विविध ठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीयांना आपापल्या राज्यात सोडवण्याच्या दृष्टीने प्रशासनाने पाऊले उचलली आहेत. अशा नागरिकांची यादी तयार करण्याचे काम पोलिसांना देण्यात आले आहे. त्यामुळे नावनोंदणी करण्यासाठी वारजेतील उड्डाणपुलाजवळ उत्तरप्रदेशच्या नागरिकांनी गर्दी केली होती. परंतु अचानक मोठ्या संख्येने गर्दी जमल्यामुळे गर्दीला आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी जमावाला पंगावले. त्यानंतर काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. काही वेळानंतर या सर्व परप्रांतीय नागरिकांना एका मोकळ्या शेडमध्ये घेऊन जात या सर्व नागरिकांची नावे नोंदवून घेण्यास सुरुवात केली अशी माहिती पोलीस अधिकारी अशोक कदम यांनी दिली.
फरासखाना पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस फौजदार दिलीप पोपट लोंढे हे कोरोना बाधित असल्याने भारती हॉस्पिटल धनकवडी येथे उपचार घेत होते. त्यांचा आज दुपारच्या सुमारास मृत्यू झाला.
परराज्यातील मजुरांना रेल्वेने जाण्यासाठी राज्य सरकारने कंबर कसली आहे. सरकार, रेल्वे, महापालिका आयुक्तांची आज बैठक झाली. जे मजूर जाणार त्यांच्यासाठी महापालिकेच्या स्थानिक शाळेत कॅम्प लागणार आहे. तिथे मेडिकल सर्टिफिकेट देण्यात येतील. त्यासाठी मजुरांना पैसे द्यावे लागणार नाहीत. एका गाडीत 1200 प्रवासी जाणार आहे. त्यांना मास्क, पाणी आणि जेवण देणार आहे. इतकंच नाहीतर ज्यांना खासगी गाडी, टॅक्सीमधून जाण्याची इच्छा आहे त्यांना पण परवानगी दिली जाणार आहे. दरम्यान सगळ्यांची कोरोना चाचणी करुन त्यांना पाठवण्याची अट उत्तर प्रदेश आणि कर्नाटक सरकारने घातली होती. परंतु राज्याने या अटींवर आक्षेप नोंदवला आहे. या संदर्भा उत्तर प्रदेश आणि कर्नाटकशी चर्चा सुरु आहे.
वरळी परिसरात लवकरच कोरोनाबाधितांचा आकडा 1000 चा टप्पा गाठणार आहे. हा भारतातील उच्चांक असेल. तरीही ठाकरे सरकार याला वरळी पॅटर्न म्हणत आहे, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.
वरळी परिसरात लवकरच कोरोनाबाधितांचा आकडा 1000 चा टप्पा गाठणार आहे. हा भारतातील उच्चांक असेल. तरीही ठाकरे सरकार याला वरळी पॅटर्न म्हणत आहे, अशी टीका भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली.
विधान परिषद निवडणूकीसाठी शिवसेनेकडून दोन नावं जाहीर करण्यात आली आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि नीलम गोऱ्हे यांची नावं निश्चित करण्यात आली आहेत.

मागील बारा तासात पुण्यातील ससून रुग्णालयात 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात मृतांचा आकडा 115 वर गेला आहे.

सकाळपासून नवीन 31 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 2082 वर पोहोचली आहे.
नागपुरात कोरोनाची लागण झालेले दोन रुग्ण आढळले आहेत. डोबीनगर आणि मोमीनपुरा परिसरातील हे दोन कोरोना पॉझिटिव्ह आहे. नागपुरातील कोरोनाग्रस्तांची संख्या 153 वर पोहोचली आहे.


पुण्यातील दुकानं उघडण्यास परवानगी दिली असली तरी जोपर्यंत स्थानिक पोलिस स्टेशनचे अधिकारी व्यापार्यांना परवानगी देणार नाहीत तोपर्यंत पुणे जिल्हा रिटेल व्यापारी संघाने घेतलाय. त्यामुळे पुण्यातील बहुतांश दुकानं आज बंदचं आहेत.
नागपुरात कोरोनाचे दोन रुग्ण नव्याने आढळले. डोबीनगर आणि मोमीनपुरा परिसरातील हे रुग्ण आहे.

नागपुरातील कोरोनाबाधितांचा आकडा 153 वर गेला आहे.
जळगावात लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांना नियमाच्या अधीन राहून आणि शासनाची परवानगी घेऊन घरी जाण्याची मुभा दिली आहे. मात्र, अनेकजण कोणतीही परवानगी न घेता आपल्या गावाकडे जात असल्याचे आढळून येत असल्याने अशा मजुरांच्या गाड्या अडवून त्यांना आरोग्य तपासणीसाठी शासकीय महाविद्यालयात आणले जात आहे. सोमवारी सकाळी शेकडो मजूर शासकीय रुग्णालयात आपली आरोग्य तपासणी करण्यासाठी आल्याने, या ठिकाणी सोशल डिस्टनसिंगचा पूर्णपणे फज्जा उडाल्याचे पाहायला मिळाले आहे. या मजुरांची आरोग्य तपासणी आणि त्यांच्या गर्दीवर नियंत्रण मिळविणे ही शासकीय महाविद्यालयाच्या दृष्टीने मोठी डोकं दुखी ठरली आहे.
केंद्र व राज्य शासनाने अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मूळगावी पोहोचवण्यासाठी विशेष ट्रेन आणि बस सेवा सुरु केली असली तरी मोठ्या प्रमाणावर मजुरांना अजून ही शेकडो किलोमीटरचा प्रवास पायी किंवा सायकल ने करावा लागत आहे. कर्नाटक मधील गुलबर्गा येथून उत्तरप्रदेश मधील हरदोई असा तब्ब्ल दीड हजार किलोमीटरचा प्रवास पायी आणि सायकलने करणारे तीन मजूर नागपुरात कोणतेही साहाय्य न मिळाल्यामुळे पुन्हा सायकलने उत्तरप्रदेशाकडे रवाना झाले.

गुलबर्गा ते नांदेड असा पायी प्रवास केल्यानंतर नांदेड मध्ये एका दानशूर व्यक्तीने तीन सायकली दिल्या. नांदेड ते नागपूर सायकल ने आले..
नागपूरात प्रशासन त्यांची बस किंवा ट्रेनने पुढे जाण्याची व्यवस्था करेल अशी त्यांची अपेक्षा होती.मात्र, त्यासाठी अनेक दिवस वाट पहावी लागेल असे कळल्यावर तिघे पुन्हा सायकल ने उत्तरप्रदेशासाठी रवाना झाले.
परप्रांतीय मजुरांना त्यांच्या मुळगावी जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी आता रत्नागिरी जिल्ह्यात देखील अनेक रूग्णालयांमध्ये मजुरांच्या लांबच लांब रांगा लागण्याचं चित्र आहे. आतापर्यंत उत्तरप्रदेश, बिहार, मध्य प्रदेशसह इतर राज्यातील जवळपास 60 ते 70 हजार मजूर या जिल्ह्यात आहेत. त्यापैकी 40 हजार मजुरांनी गावी जाण्याच्या परवानगीकरता अर्ज केले आहेत. रत्नागिरी जिल्हा रूग्णालयात देखील शेकडो मजूरांनी सध्या आरोग्य तपासणीकरता रांग लावल्याचं चित्र दिसून आलं. दरम्यान, या मजुरांना कसं पाठवले जाणार आहे हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
नागपूर महानगरपालिका क्षेत्र आणि नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगर पालिका क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्हा ऑरेंज झोनमध्ये राहतील. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या भूमिकेतून आदेश काढले आहेत.

त्यामुळे नागपूर जिल्ह्यात नागपूर महापालिका क्षेत्र आणि कन्हान नगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित सर्व भागात ऑरेंज जोनसाठी लागू सवलती लागू राहणार आहे.

नागपूर महानगरपालिका क्षेत्र आणि नागपूर जिल्ह्यातील कन्हान नगरपालिका क्षेत्र वगळून उर्वरित नागपूर जिल्हयात जवळपास ऑरेंज जोन सारख्याच सवलती उपलब्ध राहतील. नागपूरचे जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष या भूमिकेतून आदेश काढले आहेत.
कराड येथे 2 रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे.
सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा 79 वर गेला आहे. आतापर्यंत 9 रूग्ण बरे झाले

असून दोघांचा मृत्यू झाला आहे.
साताऱ्यातील कराडमध्ये 2 रुग्णांचे रिपोट पॉझेटिव्ह आले असून
सातारा जिल्ह्यात एकूण 79 कोरोना बाधित आहेत.


आजपर्यंत 9 रूग्ण बरे झाले आहेत, तर

दोघांचा मृत्यू झाला आहे.
अकोल्यात कोरोनाचे आणखी नऊ नवे रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील रुग्णांची संख्या 64 वर पोहोचली आहे. अकोल्यात आतापर्यंत सहा जणांचे मृत्यू झाले असून 13 जण रोगमुक्त होऊन घरी परतले आहेत.
तळकोकणात काल झालेल्या चक्रीवादळासह अवकाळी पाऊसामुळे झाड कोसळुन नुकसान झालय. आंबोली, चौकुळ, गेळे गावात वायंगणी भातशेतीच नुकसान झाल. कुडाळ तालुक्यातील माणगाव खोर्यात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला आहे. अनेक घरांचे कौले, पत्रे वादळामुळे उडून गेले. तर काही ठिकाणी झाड कोसळली आहेत. ग्रामीण भागात विज पुरवठाही खंडीत झाला. घरांच झालेल नुकसानीचे पंचनामे सुरु आहेत.

अकोल्यात कोरोनाचे आणखी 9 नवे रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 64 वर गेली आहे. पहिल्यांदाच एक रूग्ण अंत्री बाळापूर या खेड्यात आढळला. आतापर्यंत अकोल्यात सहा जणांचे मृत्यू झाले असून 13 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
चेंबूर कॅम्प परिसरात वाइन शॉप बाहेर तुफान गर्दी झाली आहे. गर्दीवर गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. नियमांचं पालन करण्यासाठी लाऊड स्पीकरवरून पोलिसांनी सूचनाही दिल्या.
चाकण एमआयडीसीच्या कंपन्यांमधील काम आज सुरु होण्याची चिन्ह नाहीत. काल परवानगी मिळाल्याने कर्मचाऱ्यापर्यंत तो संदेश पोहचला नाही. तसेच कर्मचाऱ्यांमधील भीती ही दूर करावी लागणार आहे. त्यासाठी कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कंपन्यांना उपाययोजना कराव्या लागणार आहेत. तेव्हा पुढील 2 ते 3 दिवस काम सुरु होण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.
नवी मुंबईत दारू विक्रीस आयुक्त आण्णासाहेब मिसाळ यांच्याकडून विरोध करण्यात आला आहे.
रेड झोन मध्ये दारू विक्रीस सरकारने परवानगी दिली असली तरी नवी मुंबईत विरोध केला आहे.

शहराची कोरोना संख्या 314 असल्याने खबरदारीसाठी दारू विक्री करण्यास आयुक्तांचा विरोध आहे.

अंबरनाथमध्ये वाईन शॉपबाहेर नागरिकांची मोठी गर्दी, दुकानं उघडण्यासाठी सकाळी 10 ची वेळ असताना दारु विकत घेण्यासाठी लोक 6 वाजल्यापासूनच दुकानाबाहेर रांगेत
पालघर जिल्हा सध्या रेड झोन मध्ये आहे. जरी राज्य सरकारने दारू विक्री परवानगी दिली असली तरी
अजूनही पालघर जिल्हा ग्रामीणसाठी जिल्हाधिकारी यांचे आदेश नसल्याने अजूनही दारूची दुकान उघडली गेलेली नाहीत. तरीही अनेक ठिकाणच्या दारू दुकांना समोर दारू घेण्यासाठी लोकांनी सकाळ पासून रांगा लावलेल्या पाहायला मिळतात.
सांगलीत दारु खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांचा हिरमोड झला आहे. वाईन शॉप मालकाने अद्याप दुकानं सुरू करण्याची ऑर्डर त्याच्यापर्यंत पोहचली नाही, असं सांगत दुकान उघडण्यास नकार दिला. 12 वाजेपर्यत दारू दुकाने उघडण्याचे लेखी आदेश जिल्हा प्रशासनाकडून मिळतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काल राज्यसरकारने सोशल डिस्टनिंग पाळण्याबरोबरच एका वेळी पाचपेक्षा अधिक ग्राहक दुकानात असणार नाहीत या अटीवर काँटेन्मेन्ट कोरोना झोन वगळता इतर ठिकाणी मद्यविक्री सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र याबाबत जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडून अद्याप कुठलाच आदेश न आल्याने बोईसर मधील वाईनशॉप बंद आहेत. त्यामुळे अगदी सकाळपासूनच वाईन शॉपच्या बाहेर रांगेत उभा असलेल्या तळीरामांच्या पदरी निराशाच आली आहे.
लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यात मोठी शिथिलता, पुण्यात वाईन शॉपबाहेर मद्यप्रेमींच्या रांगा
सोमवारी सकाळी मद्य दुकाने उघडली त्यावेळी दुकानासमोर मोठी गर्दी पाहायला मिळाली. सकाळी दुकान उघडल्यावर पहिल्या ग्राहकाला ग्राहक देवो भव म्हणून हार घालून स्वागत करून शुभारंभ केला.तळीरामांनी मध्यरात्रीपासून दुकानासमोर आपला नंबर लावून ठेवला होता. सोशल डिस्टनसिंगसाठी आखण्यात आलेल्या चौकोनात अनेकांनी आपल्या पिशव्या ठेवून नंबर लावून आपण बाजूला थांबले होते. दुकानाचा दरवाजा उघडायच्या वेळेला मात्र तळीराम आपली पिशवी ठेवलेल्या जागेवर जावून उभारले. यापूर्वी रेशन दुकानासमोर ग्राहक आपली पिशवी चौकोनात ठेवून उन्हाच्या तापापासून बचाव करण्यासाठी सावलीत उभे राहिलेले पाहायला मिळाले पण मद्यापींनी मात्र सकाळी दारू खरेदी करण्यासाठी मध्यरात्रीपासून नंबर लावला होता.
औरंगाबाद शहरात जीवनावश्यक वस्तू वगळता कुठलेही दुकान उघडणार नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी उदय चौधरी यांनी दिली. औरंगाबाद रेड झोनमध्ये असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला.
जिल्हा प्रशासनाने नाशिक जिल्ह्याच्या रेड आणि ऑरेंज आशा दोन झोनमध्ये वर्गवारी केली आहे. 9 तालुके ऑरेंज झोनमध्ये आहेत, तर नाशिकशहर, मालेगावसह 6 तालुके रेड झोनमध्ये आहेत. त्यावर भाजपाने आक्षेप घेतला आहे. नाशिकला रेड झोनमधून ऑरेंज झोनमध्ये परिवर्तित करावे अशी मागणी भाजपने केली आहे. जेणे करून शहरातील व्यववहार सुरळीत सुरू होतील, मंदावलेल्या अर्थव्यवस्थेला गती मिळेल, मालेगावच्या वाढत्या रुग्णसंखेमुळे नाशिककडे बघण्याचा दृष्टिकोण बदलला आहे, अशी भाजपची धारणा आहे. तर केंद्र सरकारच्या आधिसूचनेच पालन करत असल्याचा मनपासह स्थानिक प्रशासनांचा दावा आहे. गेल्या 21 दिवसांत शहरात कोरोंना बाधित रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे शहर रेडझोन मध्ये आहे. शहरात थोडे निर्बंध असल्यामुळे कोरोंनाचा फैलाव रोखू शकतो असा प्रशासनाला विश्वास आहे.
अकोला जिल्ह्यातील दारूची दुकानं सुरू करण्याचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला नाही. अकोला शहर 4 आणि 5 मेला संपुर्णपणे बंद आहे. उद्या संध्याकाळी जिल्हा प्रशासन 6 तारखेपासून जिल्ह्यातील दारूची दुकानं सुरू करायची की नाही?, याचा निर्णय घेणार आहे.
केंद्र सरकाने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ग्रीन झोन मध्ये समावेश केला असला तरीही जिल्ह्यात एक कोरोना बाधित रुग्ण आहे. जिल्हाधिकारी के. मजूलक्ष्मी यांनी जिल्हा ऑरेंज झोन मध्ये असल्याच स्पष्ट केल. मात्र अधिकृतरित्या माहिती दिलेली नाही. जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात कोणकोणते उद्योग सुरु होणार याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. जिल्हावासीयांमध्ये संभ्रमाची स्थिति आहे. त्यामुळे काही दुकान उघडली तर काही बंद आहेत. ग्रामीण भागात मात्र दुकान उघडलेली पहायला मिळतात.
लॉकडाऊनबाबत राज्य शासनाने जारी केलेल्या नवीन नियमावलीत ऑरेंज झोनमध्ये मद्यविक्रीला परवानगी दिली आहे. मात्र जालना जिल्ह्यात मद्यविक्री बंदच राहिल अशी माहिती जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे घेतली. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून तसंच पुढील काळात जिल्ह्यात बाहेरुन येणाऱ्या नागरिकांचा विचार करता, कोरोनाचं प्रादुर्भाव रोखण्यासाठी दारु दुकाने पुढील आदेशापर्यंत बंदच राहणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीमधील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी देशातील सर्वच भागातील कामगार काम राहतात. धारावीमधून काल (3 मे) रात्री कामगारांना घेऊन पहिली बस राजस्थानला रवाना झाली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत सर्व परवानगीनिशी धारावी पोलिसांनी या कामगारांना रवाना केलं. एका खाजगी बसमधून पहिल्यांदा 20 कामगार राजस्थानला रवाना झाले. धारावी पोलीस ठाण्यातून ही बस रात्री 11 वाजता रवाना झाली. या वेळी धारावी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीमधील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी देशातील सर्वच भागातील कामगार काम राहतात. धारावीमधून काल (3 मे) रात्री कामगारांना घेऊन पहिली बस राजस्थानला रवाना झाली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत सर्व परवानगीनिशी धारावी पोलिसांनी या कामगारांना रवाना केलं. एका खाजगी बसमधून पहिल्यांदा 20 कामगार राजस्थानला रवाना झाले. धारावी पोलीस ठाण्यातून ही बस रात्री 11 वाजता रवाना झाली. या वेळी धारावी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टीमधील कोरोनाबाधितांची संख्या मोठी आहे. या ठिकाणी देशातील सर्वच भागातील कामगार काम राहतात. धारावीमधून काल (3 मे) रात्री कामगारांना घेऊन पहिली बस राजस्थानला रवाना झाली. सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम काटेकोरपणे पाळत सर्व परवानगीनिशी धारावी पोलिसांनी या कामगारांना रवाना केलं. एका खाजगी बसमधून पहिल्यांदा 20 कामगार राजस्थानला रवाना झाले. धारावी पोलीस ठाण्यातून ही बस रात्री 11 वाजता रवाना झाली. या वेळी धारावी पोलीस ठाण्याचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
कोरोनामुळे औरंगाबादमध्ये दहावा मृत्यू झाला आहे. 55 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा रात्री साडेअकराच्या सुमारास घाटीमध्ये मृत्यू झाला. काल दुपारी दोन वाजता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्री दहाच्या सुमारास त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. प्रकृती गंभीर असताना एमआयसीयूमध्ये त्यचाा मृत्यू झाला. घाटीच्या मेडिसीन विभागाने ही माहिती दिली.
पिंपरी चिंचवड शहर रेड झोनमध्ये असल्याने येथील लघुउद्योग कंपन्या बंदच राहतील. तर चाकण एमआयडीसी मधील कंपन्या मात्र सुरू होणार आहेत. पिंपरी, चिंचवड, भोसरी, कुदळवाडीसह अन्य भागात एकूण 11 हजार कंपन्या आहेत. पैकी 150 ते 200 अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कंपन्या वगळता सर्वांना काम सुरू करण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. दुसरीकडे चाकण एमआयडीसी परिसरातील 650 कंपन्या उद्यापासून कामास सुरुवात करतायेत. रेड झोन मधील कामगार वगळता ग्रीन झोनमधील 30 टक्के कर्मचारी कंपनीत काम करू शकतील. अश्या सूचना त्यांना देण्यात आल्यात.
पुणे शहरातील कोरोना संक्रमणशील क्षेत्राची अर्थात कंटेनमेंट झोनची हद्द कमी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतलाय. आतापर्यंत पुणे शहरातील 330 चौरस किलोमीटरचे क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आल्याने सील करण्यात आले होते. मात्र उद्या 4 पासुन यातील 10 चौरस किलोमीटर चे क्षेत्रच कंटेनमेंट झोन म्हणून राहील. त्यामुळे पुणे शहराच्या एकुण क्षेत्रफळाच्या 97 टक्के क्षेत्र कंटेनमेंट झोनमध्ये नसेल. त्यासाठी महापालिकेने ज्या वस्त्यांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त झालाय त्या वस्त्याच सील करण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पुण्यातील 97 टक्के भागात राज्य आणि केंद्र सरकारच्या निर्देशानुसार दुकानं उघडली जाणार आहेत.
कोरोनाचा प्रादुर्भाव ज्या जिल्ह्यांमधे मोठ्या प्रमाणात झालाय. अशा देशातील वीस जिल्ह्यांमधे केंद्र सरकारची आरोग्य पथकं पाठवण्यात येणार आहेत. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि ठाणे जिल्ह्यात अशी पथकं येणार. स्थानिक प्रशासनाला कोरोनाला आळा घालण्यासाठी मदत करण्याच या पथकाचं काम असेल.
रत्नागिरी जिल्ह्यात आणखी दोघांना कोरोनाची लागण, मुंबईहुन आलेले दोघे कोरोनाबाधित, संगमेश्वरमध्ये महिलेला तर मंडणगडमध्ये पुरुषाला झाली कोरोनाची लागण
सोलापुरातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत आज 14 जणांची भर. एकूण कोरोना बाधितांचा आकडा पोहोचला 128 वर तर, 193 जणांचे अहवाल प्रलंबित. एकूण बाधितांपैकी 6 जणांचा मृत्यू झालाय तर, 19 जण कोरोनामुक्त झालेत. उर्वरित 103 रुग्णांवर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज आढळलले सर्व रुग्ण सोलापूर शहर परिसरातील आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी सहा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह. आत्तापर्यंत शहरातील 121 तर शहराबाहेरील उपचारासाठी दाखल 10 असे एकूण 131 कोरोना बाधित आहेत. पैकी शहरातील रुग्णालयातून 50 तर शहराबाहेरील रुग्णालयातून 4 असे एकूण 54 रुग्ण कोरोनामुक्त झालेत. तर, शहरातील 3 आणि शहराबाहेरील 2 असे एकूण 5 मृत्यूची नोंद झाली आहे.
भारतीय नौदलाचे प्रशिक्षण दिलं जाणाऱ्या लोणावळा येथील आयएनएस शिवाजी परिसरात बिबट्या आढळला आहे. त्यामुळं प्रशिक्षण केंद्रात दहशतीचे वातावरण पसरलेलं आहे. एक मे रोजीचा बिबट्याचा वावर सीसीटीव्हीत ही कैद झालाय. याबाबत वनविभागाला माहिती देताच, आयएनएस शिवाजी परिसरात गस्त सुरू करण्यात आल्यात. सध्या साधारण दोन हजाराच्या आसपास जवान, अधिकारी आणि कर्मचारी वर्ग प्रशिक्षण केंद्रात आहेत चार ही बाजूने बंदिस्त असणाऱ्या आयएनएस शिवाजी मध्ये या बिबट्याने कसा प्रवेश केला? हे समजू शकलेलं नाही. आता त्याला जेरबंद करण्यासाठी वनविभाग युद्ध पातळीवर प्रयत्न करतंय.
परभणी जिल्ह्यात 10 में पर्यंत संचारबंदी कायम. केवळ अत्यावश्यक सेवाच राहणार सुरू. किराणा, भाजीपाला, आरोग्य सेवा वगळता सर्व बंद राहणार आहे. दारूची दुकानंही उघडणार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी वाढवले 10 मे पर्यंत मनाई आदेश.
औरंगाबादमध्ये आज 8 कोरोनाबधित रुग्ण आढळले, रुग्णांचा आकडा 281 वर, 24 तासात 38 रुग्णांची भर, कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 25 तर कोरोनामुळे 9 जणांचा मृत्यू
लॉक डाऊनमुळे अडकलेल्या प्रवाशांना राजस्थानला घेऊन जाणारी पहिली बस मुंबईतून रवाना, पहिले 25 प्रवासी राजस्थानला रवाना, सीएसएमटी परिसरातून खाजगी आराम बस मार्गस्थ
डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील याची विटा तहसिलदारांना मारहाण. चंद्रहार पाटील यांच्या अवैधपणे वाळू वाहतूक करणाऱ्या गाड्या जप्त करत विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी साडेसात लाखाचा दंड ठोठावला होता. या वाळू गाड्यावर केलेला दंड कमी करा, ही मागणी अनेक दिवसापासून चंद्रहार पाटील करत होता. मात्र, तहसीलदार यांनी सर्व दंड भरा अशा सूचना दिल्या होत्या. हा राग मनात धरून दुपारच्या सुमारास तहसील आवारातच तहसीलदारांना चंद्रहार पाटील आणि त्याच्या एका साथीदाराने मारहाण केली. विटा तहसीलदार ऋषिकेश शेळके यांनी विटा पोलीस ठाण्यात दिली फिर्याद दिली आहे.
एक महिन्यापासून बेळगावात अडकलेल्या राजस्थान आणि मध्य प्रदेशमधील कामगारांना त्यांच्या गावी पाठवण्यात आले. सहा बसमधून 169 कामगारांना राजस्थान आणि मध्य प्रदेश येथे त्यांच्या गावी जाण्यास परवानगी देण्यात आली.यावेळी त्यांना खाद्यपदार्थ,सॅनिटायझर आणि मास्क देण्यात आले.टाळ्या वाजवून महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना निरोप दिला. राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था चांगली केल्याबद्दल अधिकाऱ्यांना कामगारांनी धन्यवाद दिले. एक महिन्यापूर्वी बंगलोरहून कंटेनर मधून राजस्थान,मध्यप्रदेश,हरियाणा येथे आपल्या गावी निघालेले 253 कामगार आणि कुटुंबीय पोलिसांना सापडले होते. या सगळ्यांना समाज कल्याण खात्याच्या वसतिगृहात ठेवण्यात आले होते. त्यांना रोज अल्पोपहार,भोजनाची व्यवस्था महानगरपालिकेतर्फे करण्यात आली होती. दररोज त्यांची आरोग्य तपासणी देखील केली जात होती.
नांदेड जिल्ह्यात देगलूर नाका भागातील महिलेचा खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील हा तिसरा बळी आहे. 60 वर्षीय महिलेला दम्याचा देखील होता आजार होता. सकाळी अहवाल महिलेचा अहवाल आला होता.
औरंगाबाद घाटी रुग्णालयात कोरोना पॉझिटिव्ह महिलेची नैसर्गिक प्रसूती, बाळ सुखरूप, बाजीपुरा इंदिरानगर येथील 28 वर्षीय कोरोना पॉझिटिव्ह महिलेला कन्यारत्न, औरंगाबाद शहरातील दुसरी घटना, बाळाचे स्बॅब घेतले

नालासोपारा पूर्वेकडील तुलिंज पोलीस ठाण्यासमोर आज पर राज्यात जाणा-या नागरिकांनी गर्दी केली होती. पालघर जिल्हयातील इतर राज्यात जाण्यासाठी तुलिंज पोलीस ठाणयात फॉर्म भेटत आहे, अशी अफवावा पसरली होती. पर राज्यात जाणा-या काही नागरिकांनी तुलिंज पोलीस ठाण्यासमोर एकच गर्दी केली होती.
काल बिलालपाडा संतोष भवन येथून 30 बस गोरखपूर जाणाऱ्या प्रवाशांकरिता पाठविण्यात आल्या होत्या. परंतु हा फक्त पहिला दिवस आहे म्हणून होते. इथून पुढे फक्त ऑनलाइन नोंद केल्यावरच परराज्यात पाठविण्याची सोय केली जाणार असल्याच पोलिसांनी सांगितलं आहे.

जर कोणी जोंनपुर किंवा इतर ठिकाणी जाण्यासाठी बस सोडणार असे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. ती एक अफवा आहे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
नाट्यप्रशिक्षक विनायक दिवेकर यांचे अल्पशा आजाराने निधन
पोलीसांमध्ये कोरोनाचं संक्रमण वाढत चाललंय असताना आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या वरळी मतदारसंघात खबरदारी म्हणून वरळी पोलीस वसाहतीमध्ये कोव्हिड कॅम्पला सुरुवात केलीय. वरळी विभागात मोठ्या संख्येत
पोलीस कुटुंब राहतात, गेल्या काही दिवसांत ४ पोलीस कर्मचा-यांचा मृत्यू झाल्यानं हे कुटुंब चिंतेत आहेत.त्यामुळेच खास पोलिस कुटुंबियांसाठी या कोव्हिड कॅम्पचं आयोजन करण्यात आलंय
गावी परतण्याच्या प्रयत्नात असलेल्या परराज्यातील मजुरांची वांद्र्यातील भाभा रुग्णालयाबाहेर बाहेर झुंबड, अर्जासह मजुरांना मेडिकल सर्टिफिकेट बंधनकारक असल्याने शासकीय रुग्णलयाबाहेर हे मजूर पहाटेपासूनच रांगा लावून उभे आहेत. मोठ्या प्रमाणात मजुरांची गर्दी झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. मात्र पोलिसांकडून जमलेल्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
नागपूर : पोलीस वाहनाच्या समोर आलेल्या रानडुकराला वाचवण्याच्या प्रयत्नात अपघात होऊन एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी पोलीस ठाण्याच्या वाहनाला पहाटे भीषण अपघात, या घटनेत वाहनचालक पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला असून तिघे पोलीस जखमी, खुशाल शेबोकर असे मृत झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव
IFSC मुद्द्यावरून दोन माजी मुख्यमंत्री ट्विटर वर भिडले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केला की, मुंबईत आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र करण्यासाठी उच्चस्तरिय समितीने 2007 अहवाल दिला होता. 2014 पर्यंत केंद्र किंवा राज्य सरकारने कारवाई केली नाही. त्याला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उत्तर दिले आहे की दिशाभूल करणारी वक्तव्य करण्याआधी रिपोर्ट वाचावा
नागपूर : परमात्मा एक सेवक मंडळ, वर्धमाननगर, नागपूर येथे ठेवण्यात आलेले राजस्थान मधील नागौर येथील 51 नागरिक शासनाच्या परवानगी नंतर 2 बसेसमधून राजस्थानला रवाना झाले, काल रात्री पोलीस आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी त्यांना तपासणी करून राजस्थानला पाठविले
पंजाब राज्यातील लुधियाना येथील कपूरतला येथील प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमधील 200 विद्यार्थी आज महाराष्ट्रातील नाशिक येथे येत आहेत. त्यात 25 मुली आहेत.
कोल्हापूर : चंदगड तालुक्यातील काजिर्णे गावाजवळील शेतामध्ये गव्यांचा कळप, काल दुपारी दोनच्या दरम्यान 12 गवे शेतकऱ्यांना आढळून आले,

काजू बागेत असलेल्या शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण,

ऊस, मिरची, मका या पिकांचे नुकसान या गव्यांकडून केले जात आहे.
बाधित क्षेत्रातून बेकायदेशीरपणे नाशिक शहरात आलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. नाशिक महापालिका या नागरिकांवर कायदेशीर कारवाई
करणार आहे. काल जळगावच्या भडगावहून दुधाच्या टँकरमधून छुप्या मार्गाने नाशिक शहरात आलेल्या व्यक्तीला कोरोनाची लागण
झाली आहे. हॉटस्पॉट मालेगावातून नाशिक शहरात आलेली महिला कोरोना बाधित
आढळली असून आणखी दोन रुग्णांचीही अशीच ट्रॅव्हल हिस्ट्री असण्याची शक्यता महापालिकेने वर्तवली आहे. जिल्हा बंदी असतांनाही नाशिकमध्ये नागरिक दाखल होत असल्याने पोलिसांच्या कारभारावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
उत्तर प्रदेशमध्ये पीलीभीतमध्ये गजरौला क्षेत्रात येणाऱ्या जरा गावात एका वाघाने रेस्कू टिमवर हल्ला केला. यात तीनजण जखमी झाले असून त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नागपुरात एकूण कोरोना बाधितांचा आकडा 150 वर पोहोचला आहे. शुक्रवार रात्रीपासून आज रात्री अशा 24 तासात 11 नवे रुग्नाची भर पडली आहे.
लातूर जिल्ह्यातील देऊलवाडी या गावातील बालाजी गटाटे यांची शेती आहे. या शेतीत आज जेसीबी आणून काही कामे सुरू होती. त्यात तळ्यातील माती काढण्यात येत होती. यावेळी त्याची चार मुले ही सोबत होती. याची माहिती त्याच्या भावकिस लागली. त्यामुळे दहा ते पंधरा लोकांनी हातात काठी कुऱ्हाडी घेऊन या पाच लोकांना बेदम मारहाण केली. या घटनेत बालाजी गटाटे यांचा एक मुलगा रुद्रप्पा गटाटे वय 29 ठार झाला. तर बालाजी गटाटे हे त्याच्या इतर तीन मुलांसह जबर जखमी झाली आहेत. यातील तीन लोकांना लातूरला उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर उर्वरित दोन लोकांवर उदगीर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत व्यक्तीचे पोस्टमार्टम करण्यात आले असून या बाबत वाढवणा पोलिसात गुन्हा दाखल झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. यात एकूण अकरा लोकाविरोधात तक्रार देण्यात आली असल्याची माहिती आहे.
कोरोनाविरोधातील राज्यसरकारच्या लढ्याला बळकटी देण्यासाठी ठाणे परिवहन कर्मचारी सहकारी पतसंस्थेने 1 लाख 51 हजारांची मदत मुख्यमंञी सहाय्यता निधीला केली. पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर जांगळे यांनी या मदतीचा धनादेश ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार राजाराम तवटे यांना सुपूर्त केला. यावेळी सचिव भास्कर पवार, संचालक दिलीप चिकणे, कैलास पवार, व्यवस्थापक दीपक दळवी उपस्थित होते. यासोबत पतसंस्था संचालकांनी संस्थेचा मासिक वैयक्तिक सभाभत्ता मुख्यमंञी सहाय्यता निधीला प्रदान केला. राज्याचे मुख्यमंञी उध्दव ठाकरे कोरोना विरोधातील लढ्यात उतरले आहेत. त्यामुळे या कार्यात ठाणे परिवहन कर्मचारी सहकारी पतसंस्थेचाही वाटा असावा, म्हणूनच ही मदत केल्याचे पतसंस्थेचे अध्यक्ष मनोहर जांगळे यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात आज दिवसभरात 97 नवीन कोरोना बाधित रुग्णांची वाढ. तर, दिवसभरात 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील मृतांचा आकडा 103 वर गेल्याय. पुणे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या आताच्या घडीला 1912 झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळून इतर भागांमधे बांधकामांना परवानगी.
आज राज्यात 790 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले, यासह राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 12,296 वर पोहोचला आहे, आतापर्यंत 2000 रुग्ण बरे झाले आहेत, तर आज 36 जणांचा मृत्यू झाला
पालघर जिल्ह्यात दुपारनंतर 6 रुग्ण वाढले. जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 176 वर. पैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून 72 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 2673 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 333 जणांचे अहवाल प्राप्त होण बाकी आहेत.
परभणी शहरातील विकास नगर भागात राहणाऱ्या एका सावत्र मुलाने घरगुती कलहातून बापाचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. विकास नगर भागात राहणाऱ्या युसुफ खान पठाण यांचे आणि त्यांचा सावत्र मुलगा मेनू खान पठाण यांच्यात अनेक दिवसांपासून वाद होत होते. याच वादातून आज मेनू खान याने वडील युसूफ खान यांच्यावर चाकूने अनेक वार केले ज्यात त्यांचा मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. जारावंडी जंगलातील सिनभट्टी क्षेत्रात दुपारच्या सुमारास झालेल्या या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाली. तिचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलाय. चकमकीनंतर सी-60 कमांडोचा कॉम्बिन्ग ऑपरेशन सुरूच.
हिंगोलीमध्ये आज पुन्हा 6 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 52 वर, एसआरपीएफच्या 5 जवानांसह एका 45 वर्षीय व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह
औरंगाबादेत दिवसभरात 28 कोरोना बाधीत रुग्ण रुग्ण वाढले आहेत. परिणामी कोरोना बाधितांची संख्या आता 244 झाली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सुंदरराव कुलकर्णी यांनी ही माहिती दिली.
पुण्यातील कात्रज भागात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे सेवा ठप्प करण्यात आलीये. याच संधीचा फायदा घेत रेल्वे विभागाकडून लोहमार्गाची डागडुजी सुरुये. पण त्याचवेळी कामगारांकडून सोशल डिस्टनसिंगला हरताळ फासला जातोय तर काही कामगार विनामास्क काम करताना दिसून आले. हे चित्र होतं पिंपरी चिंचवडमधील कासारवाडी गेटजवळ. इथं लोहमार्गाच्या स्क्रिनिंगचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. लॉकडाऊन उठण्यापूर्वी ही कामं पूर्ण करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करणे ही महत्वाचं आहे. पण रेल्वे विभागाकडून याकडे दुर्लक्ष होताना दिसतंय. त्यामुळे या कामगारांना तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वसई विरार क्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुगणाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. आज 9 नवे कोरोना रुग्ण वाढले असून, कोरोना पॉझिटिव्हची संख्या 143 झाली आहे. त्यात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर 57 जण कोरोना मुक्त झाले आहेत.
बीड जिल्ह्यात कोरोणाचा एक रुग्ण आढळून आला होता मात्र त्याचेही तिसरी टेस्ट निगेटिव्ह आल्यानंतर आता बीड जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे. प्रशासनाकडून प्रत्येक गोष्टीची खबरदारी घेतली जाते. याचाच एक भाग म्हणून परळी रेल्वे स्टेशनमध्ये आता एका रेल्वेला विलगीकरण कोच बनवण्यात आला आहे. यासाठी परळी रेल्वे स्थानकांमध्ये एका डब्यामध्ये किमान चाळीस रुग्ण राहू शकतील अशी व्यवस्था यामध्ये करण्यात आलेली आहे. यासाठी लागणारा बेड असेल टॉयलेट्स असतील याची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
- पुण्यातुन ज्यांना बाहेर जायचंय अशांसाठी पुणे जिल्ह्याधिकारी कार्यालयाने तेरा तहसीलदार कार्यालयांचे फोन नंबर आणि ई मेल आय डी जाहीर केलेत. परंतु त्या नंबर्सवर प्रतिसाद मिळत नसल्याने काही लोकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गर्दी केली होती. जिल्हाधिकारी कार्यालयात बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलिसांनी या लोकांना संबंधित तहसीलदार कार्यालयांचे नंबर असलेली यादी दिली आणि त्यांना पांगवण्याचा प्रयत्न केला.
परभणी : कोटा येथून आणलेल्या विद्यार्थ्यांना एमआयडीसीमधील हॉटेलमध्ये ठेवण्यास स्थानिक उद्योजकांचा विरोध, 36 विद्यार्थी हॉटेलमध्ये, विद्यार्थ्यांमधून कुणी पॉसिटिव्ह आले तर एमआयडीसी बंद होण्याची भीती
नांदेड : गुरुद्वारा, लंगर साहिब आणि संपूर्ण परिसर सील करण्याची प्रक्रिया सुरू, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ सचिन खाल्लाळ यांची माहिती, पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांच्या संपर्कातील लोकांची तपासणी होणार, झोनमध्ये कडक निर्बंध
पालघर : पालघर जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊन ही संख्या 170 वर पोहोचली, यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला असून 59 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर आतापर्यंत 2691 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असून 188 रिपोर्ट प्रतीक्षेत आहेत. पालघर ग्रामीण मध्ये कोरोना बाधितांची संख्या 27 झाली असून पैकी दोघांचा मृत्यू झाला आहे तर 2 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. काल एका दिवसात 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
अकोल्यात कोरोनाचे सहा नवीन रूग्ण, जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 38 वर, काल रात्री एका 79 वर्षीय रूग्णाचा मृत्यू. शहरातील मृतांची संख्या चारवर. आज सापडलेल्या रूग्णांमध्ये खाजगी रूग्णालयातील एका डॉक्टरसह रूग्णालयात काम करणाऱ्या चार कर्मचाऱ्यांचा समावेश.
मनमाड : आतापर्यंत कोरोना मुक्त असलेल्या मनमाड शहरात कोरोनाचा शिरकाव, मनमाड येथील 48 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, सदर महिला मालेगाव येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची आई, पोलीस कर्मचाऱ्याचा रिपोर्ट आधीच आला आहे पॉझिटिव्ह, काही दिवसांपूर्वी सदर पोलीस कर्मचारी मनमाड येथे आईला भेटून गेला होता, महिलेवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू
जळगाव येथील कोविड रूग्णालयात स्वॅब घेतलेल्या संशयित कोरोना व्यक्तींपैकी दोन व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले आहे. या दोन्ही व्यक्तींचे तपासणी अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत.

या दोन्ही व्यक्ती भुसावळच्या असून यात 42 वर्षीय पुरूष व 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 43 इतकी झाली आहे. अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने दिली आहे.
सातारा : सातारा जिल्हा कारागृहातील दोन संशयीत आरोपींना कोरोनाची लागण, दोघांनाही केले जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल, रात्रीत दोन आरोपींसह पाच पॉझिटिव्ह रुग्ण वाढले, सातारा जिल्हात आता 74 कोरोना बाधित रुग्ण
नाशिकहून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी विशेष ट्रेन रवाना झाली आहे.
847 लोक उत्तर भारतीयांना घेऊन नाशिकरोड रेल्वे स्थानकाहुन सकाळी साडे दहा वाजता ट्रेन निघाली आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी हिरवा झेंडा दाखवून उत्तर भारतीयांना निरोप दिला. ऐतिहासिक क्षणी सर्वांनी टाळ्या वाजवून भारत माता की च्या घोषणा देत साजरा केला. काल भोपाळला 341 लोक रवाना झाल्यानंतर आज लखनौला रेल्वे गेली आहे.
चंद्रपूरच्या निर्माणाधिन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या बांधकाम स्थळी असलेल्या उत्तर प्रदेश-बिहार-बंगालमधील 1500 बांधकाम मजुरांचा रस्त्यावर ठिय्या. शापोरजी-पालनजी कंपनीकडे बांधकाम कंत्राट आहे. लॉकडाऊन दरम्यान काम आहे बंद असून मजूर तिथेच अडकले आहेत. दरम्यान, या काळात कंपनीने पैसे किंवा रेशन न दिल्याचं कामगारांनी सांगितलं आहे. संतापलेल्या कामगारांनी काही काळासाठी महामार्ग अडविण्याचा प्रयत्न केला आहे. तर 'गावाला जाऊ द्या' अशी भूमिका कामगारांनी घेतली आहे. सदर प्रकाराची माहिती मिळताच पोलीस-तहसीलदार घटनास्थळी दाखल झाले आहेत.
नाशिकहून उत्तरप्रदेशला जाण्यासाठी ट्रेन रवाना होणार आहे. लॉकडाऊनमुळे अडकलेले
847 लोक आपल्या घरी जाणार
आहेत. काल भोपाळला 341 लोक रवाना झाली होती.
आत्तापर्यंत कोरोनामुक्त असलेल्या मनमाड शहरात ही कोरोनाचा शिरकाव झाला आहे.

मनमाड येथील 48 वर्षीय महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह महिला

मालेगाव येथे कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याची आई आहे. पॉझिटिव्ह

पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट आधीच पॉझिटिव्ह आला आहे. पॉझिटिव्ह असलेला पोलीस कर्मचारी

काही दिवसांपूर्वी मनमाड येथे आईला भेट देऊन गेला होता.

महिलेवर नाशिक येथील
रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पुण्यात कोणत्या क्षेत्रिय कार्यालय परिसरात किती कोरोनाबधित रुग्ण? (1 मे 2020)
भवानी पेठ : 325
ढोले पाटील रोड : 246
शिवाजीनगर-घोले रोड : 227
येरवडा : 171
कसबा-विश्रामबाग : 151
धनकवडी-सहकारनगर : 121
वानवडी-रामटेकडी : 90
बिबवेवाडी : 55
हडपसर-मुंढवा : 54
नगर रोड : 42
कोंढवा : 28
सिंहगड रोड : 11
वारजे-कर्वेनगर : 9
औंध-बाणेर : 4
कोथरुड-बावधन : 3
नाशिक जिल्ह्यात 19 नवे पॉझिटीव्ह रूग्ण आढळून आले आहेत.
मालेगाव 7, नाशिक शहर 6 इतर जिल्ह्याच्या विविध भागातील 1 सरकारी डॉक्टर आणि एका मेडिकल ऑफिसरला लागण झाली आहे.
जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तिनशे पार गेला असून
जिल्ह्यात एकूण 318 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर मालेगावचा आकडा आता 282 वर पोहोचला आहे.
औरंगाबादमध्ये कोरोना बाधितांचा आकडा दोनशे पार गेला आहे. औरंगाबादेत 22 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे औरंगाबादमधील कोरोना बाधीतांची एकूण संख्या 238 वर पोहोचली आहे.
कोटा (राजस्थान) येथे शिक्षणासाठी गेलेल्या परंतु लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी राज्य परिवहनच्या (एसटी) 72 बसेस पाठविण्यात आल्या होत्या. गुरूवारी या बसेसचा परतीच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 97 विद्यार्थ्यांचा समावेश असून शुक्रवारी रात्री हे विद्यार्थी पुण्यात दाखल झाले. यावेळी स्वारगेट पोलिसांनी त्याचं खाऊचे पॅकेट देऊन स्वागत केलं आहे. पुण्यात आल्यानंतर मनपा आरोग्य कर्मचाऱ्यांनी त्याची तपासणी केली आणि या विद्यार्थ्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
चंद्रपूर शहराच्या आसपास मोठे जंगल आहे आणि सध्या लॉकडाऊनमुळे शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर वाहनांची गर्दी नाही. त्यामुळे शहरात वन्यजीवांचा संचार होऊ लागला आहे. आज पहाटेच्या सुमारास चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती भागात अस्वल फिरताना आढळून आलं. जटपुरा गेट हे चंद्रपूर शहरातील मध्यवर्ती केंद्र आहे. यासह रामनगर आणि सध्या आदर्श पेट्रोल पंप शास्त्रीनगर या भागात अस्वल मुक्तपणे वावर करत होतं. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक, अधिकारी आणि वन्यजीव संस्थेच्या सदस्यांनी घटनास्थळी धाव घेतली. अतिशय बिकट परिस्थितीत या अस्वलीला 2 डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आले आणि सध्या वनविभागाच्या ट्रान्झिस्ट ट्रीटमेंट सेंटर येथे ठेवण्यात आले आहे.
नांदेडमध्ये कोरोनाचे 20 नवे रुग्ण आढळून आले आहेत. नांदेडमध्ये सध्या एकूण 24 कोरोना बाधित रूग्ण आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव आमखी वाढू नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे. सर्व विभागप्रमुख बैठकीला हजर असणार आहेत. आतापर्यंत शहरात कोरोनामुळे दोघांचा मृत्यू झाला असून एकूण 24 रुग्णांवर आता उपचार सुरू आहेत.
सांगलीतील कवठेमहांकाळ तालुक्यातील दुधेभावी मधील कोरोना पॉझिटिव्ह पती-पत्नीच्या
संपर्कात आलेल्या एका 17 वर्षीय मुलीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. आली

कुपवाडमधील वाघमोडेनगरमध्ये ही मुलगी राहत होती. त्यामुळे

सांगली, मिरज , कुपवाड महापालिका क्षेत्रात कोरोनाचा पुन्हा धोका वाढला असल्याचं दिसून येत आहे. सध्या सांगली जिल्ह्यात एकूण 33 कोरोना बाधित आहेत. त्यापैकी 26 जण कोरोनामुक्त झाले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर सध्या 6 रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
जालन्यात 5 रुग्णांचे कोरोनाचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये 4 एसआरपीएफच्या जवानांचा समावेश आहे. तर उर्वरित एक परतूर शहरातील रहिवाशी आहे. मालेगाव येथे बंदोबस्तावरून आलेल्या 4 जवानांना क्वॉरंटाईन करण्यात आलं होतं. तर एक जण मुंबईमधून रूग्णवाहिकेने जालन्यातील परतूर येथे आला होता. सध्या जालन्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा 6 वर गेला असून यापूर्वी दोन महिला कोरोनामुक्त झाल्या आहेत.

पार्श्वभूमी

Coronavirus in Maharashtra Live Updates: राज्यात रविवारी (3 मे) कोरोनाच्या 678 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 12,974 झाली असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दिलासादायक बाब म्हणजे काल 115 रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आतापर्यंत एकूण 2115 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला.


राज्यात पाठविण्यात आलेल्या 1 लाख 70 हजार 139 नमुन्यांपैकी 1 लाख 56 हजार 078 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 12 हजार 974 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 1 लाख 81 हजार 382 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 13 हजार 158 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.


नागपुरातून 1200 मजुरांना घेऊन विशेष 'श्रमिक' एक्स्प्रेस उत्तर प्रदेशला रवाना


राज्यात काल 27 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण संख्या 548 झाली आहे. या मृत्यूपैकी मुंबईमधील 21, पुण्यातील 4 आणि नवी मुंबईतील एक आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी 16 पुरुष तर 11 महिला आहेत. 27 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 14 रुग्ण आहेत. तर 10 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर तीनजण 40 वर्षांखालील आहे.


राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील: (कंसात मृत्यूंची आकडेवारी)


मुंबई महानगरपालिका: 8800 (343)
ठाणे: 60 (२) 
ठाणे मनपा: 488 (७)
नवी मुंबई मनपा: 216 (4)
कल्याण डोंबिवली मनपा: 212 (3)
उल्हासनगर मनपा: 4
भिवंडी निजामपूर मनपा: 21 (1)
मीरा भाईंदर मनपा: 141 (2)
पालघर: 44 (1)
वसई विरार मनपा: 152 (3)
रायगड: 30 (1)
पनवेल मनपा: 55 (2)
नाशिक: 12
नाशिक मनपा: 43
मालेगाव मनपा: 229 (12)
अहमदनगर: 27 (2)
अहमदनगर मनपा: 16
धुळे: 8 (2)
धुळे मनपा: 20 (1)
जळगाव: 34 (11)
जळगाव मनपा: 12 (1)
नंदूरबार: 12 (1)
नाशिक मंडळ एकूण: 413 (30)
पुणे: 81 (4)
पुणे मनपा: 1243 (99)
पिंपरी चिंचवड मनपा: 72 (3)
सोलापूर: 7
सोलापूर मनपा: 109 (6)
सातारा: 37 (2)
पुणे मंडळ एकूण: 1549 (114)
कोल्हापूर: 10
कोल्हापूर मनपा: 6
सांगली: 29
सांगली मिरज कुपवाड मनपा:१ (१)
सिंधुदुर्ग: 3 (1)
रत्नागिरी: 11 (1)
कोल्हापूर मंडळ एकूण: 61 (3)
औरंगाबाद: 5
औरंगाबाद मनपा: 239 (8)
जालना: 8
हिंगोली: 42
परभणी: 1 (1)
परभणी मनपा: 2
औरंगाबाद मंडळ एकूण: 297 (10)
लातूर: 12 (1)
लातूर मनपा: ०
उस्मानाबाद: 3 
बीड: 1
नांदेड: 0
नांदेड मनपा: 31
लातूर मंडळ एकूण: 47 (2)
अकोला: 12 (1)
अकोला मनपा: 50
अमरावती: 3 (1)
अमरावती मनपा: 31 (9)
यवतमाळ: 79
बुलढाणा: 21 (1)
वाशिम: 2
अकोला मंडळ एकूण: 198 (12)
नागपूर: 6
नागपूर मनपा: 146 (2)
वर्धा: 0
भंडारा: 1
गोंदिया: 0
चंद्रपूर: 0
चंद्रपूर मनपा: 4
गडचिरोली: 0
नागपूर मंडळ एकूण: 158 (2)
इतर राज्ये: 28 (4)
एकूण: 12974 (548)


(टीप - ही माहिती कोरोना पोर्टलवरील आय सी एम आरने दिलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या माहितीनुसार तयार करण्यात आलेली आहे.)

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.