Corona LIVE UPDATE | वर्धा : आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचेंवर जमावबंदी, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
#Coronavirus ने जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीननंतर कोविड19 च्या प्रादुर्भावाने इटली, स्पेन, अमेरिका, इंग्लंडसह जगभरातील अनेक देशात हजारो बळी गेले आहेत.कोरोनाने भारतात देखील तीन हजाराच्या वर आकडा गेला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाविषयी सर्व महत्वाचे अपडेट आपल्याला या लाईव्ह ब्लॉगमध्ये मिळतील.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 05 Apr 2020 11:39 PM

पार्श्वभूमी
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी 229 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 62 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी...More
नवी दिल्ली : देशामध्ये कोरोनाचा संसंर्ग झालेल्यांची संख्या तीन हजारांवर पोहोचली आहे. त्यापैकी 229 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. तर 62 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. मागील 24 तासांमध्ये 328 नवी रूग्ण समोर आले आहेत. महाराष्ट्रात 490, केरळमध्ये 295, तामिळनाडूमध्ये 411, दिल्लीमध्ये 219, आंध्र प्रदेशमध्ये 164, राजस्थानमध्ये 179, तेलंगणामध्ये 127, कर्नाटकामध्ये 121, उत्तरप्रदेशमध्ये 174, मध्यप्रदेशात 154रूग्ण आढळून आले आहेत.दरम्यान आज, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रात्री 9 वाजता घरातील लाईट्स बंद करायच्या आहेत. मोदी म्हणाले होते की, आपल्या घरातील सर्व लाईट्स बंद करून मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची टॉर्च लावा. यावेळी चारी दिशांना दिव्यांचा झगमगाट होईल. यावेळी हा प्रकाश आपल्याला देशातील कुणीही एकटे नसल्याचा संदेश देईल. मात्र हे करत असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन देखील आपल्याला करायचं आहे, असं मोदी म्हणाले होते.आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार दिल्लीत झालेल्या धार्मिक प्रकरणाच्या चौकशीदरम्यान, 9000 लोकांना ट्रॅक करण्यात आलं आहे. या लोकांचा संबंध तब्लिकींशी होता. यामध्ये 1306 विदेशी नागरिक आहेत. तर दिल्लीत शोधण्यात आलेल्या 2500 लोकांपैकी 250 विदेशी नागरिकांचा समावेश होता. यापैकी 1804 लोकांना कॉरन्टाईन करण्यात आलं आहे. कोरोनाटी लक्षणं असलेल्या 334 लोकांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील 24 तासांमध्ये 12 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.देशात कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र आणि सर्वच राज्य सरकारांकडून योग्य ती पावलं उचलली जात आहेत. देशात कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 14 एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे.
वर्धा : आर्वीचे भाजप आमदार दादाराव केचेंवर गुन्हा दाखल, जमावबंदी, शासनाच्या आदेशाचे उल्लंघन, साथरोग नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188, 269 अन्वये गुन्हा दाखल, वाढदिवसानिमित्त केचे यांच्या घरापुढं धान्य घेण्यासाठी लोकांची गर्दी