एबीपी माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 मार्च 2020 | सोमवार

  1. सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी तसंच धार्मिक उत्सव बंद करा, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचे निर्देश https://bit.ly/2IRju6M


 

  1. कोरोनामुळे घरी कॉरंटाईन केलेल्यांच्या हातावर शिक्का मारणार https://bit.ly/38TKGfJ ग्रामपंचायत, नगरपालिकांच्या निवडणुका तीन महिन्यांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय,  शाळा आणि महाविद्यालय आता संपूर्ण राज्यभरात बंद, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती https://bit.ly/2WcVIKu


 

  1. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व विद्यापीठे,महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद, महाविद्यालय विद्यापीठांच्या नियोजित परीक्षा 31 मार्च नंतर होणार, तर दहावी-बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार https://bit.ly/2QhloC0

  2. राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 39 वर, मुंबई, नवी मुंबई, यवतमाळमध्ये सापडले पाच नवे रुग्ण, विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याचं सरकारसमोर आव्हान https://bit.ly/2QjO1P0

  3. कोरोना व्हायरस रोखण्यासाठी अमेरिकेत रुग्णांवर परीक्षण सुरु, वर्षअखेर वॅक्सिन उपलब्ध होण्याची शक्यता https://bit.ly/2TToVIL तर इटलीमध्ये 24 तासांत तब्बल 368 रुग्णांचा मृत्यू https://bit.ly/2xI3kdM

  4. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे-पिंपरी चिंचवडमध्येही जमावबंदी, जिल्हा प्रशासनाचा निर्णय तर मुंबईतील पब्स आणि डिस्को बंद करण्याचे सरकारचे आदेश https://bit.ly/38Q0DDT

  5. पिंपरीत रुग्णालयातून पळून गेलेल्या कोरोना संशयिताला पकडण्यात प्रशासनाला यश, मित्राच्या घरातून संबंधित तरुण ताब्यात, घटनेचा व्हिडीओ समोर https://bit.ly/2IPhYSD

  6. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हायकोर्टात विनाकारण गर्दी करू नका, मुंबई उच्च न्यायालयाच्या प्रभारी मुख्य न्यायमूर्तींचे आदेश; तर आठवडाभर केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होणार https://bit.ly/2Qk2z13

  7. कमलनाथ सरकारची आजची अग्निपरीक्षा टळली, मध्यप्रदेश विधानसभा 26 मार्चपर्यंत स्थगित, कमलनाथ सरकारला दिलासा, दुसरीकडे बहुमत चाचणी करण्याची मागणी करत भाजपची सुप्रीम कोर्टात याचिका https://bit.ly/2vo83jR

  8. कोरोनाच्या भीतीने मुंबई शेअर बाजार पुन्हा गडगडला, सेन्सेक्स दोन हजार अंकांनी घसरला तर निफ्टीतही 500 अंकांची घसरण, कोट्यवधींचं नुकसान https://bit.ly/2WjGdjJ


 

कोरोना विशेष : सावधान : तुमच्या फोनद्वारे कोरोनाची लागण होऊ शकते, म्हणून सतत स्वच्छ करा मोबाईल फोन : https://bit.ly/38VZkDj

युट्यूब चॅनल - https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम - https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक - https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर - https://twitter.com/abpmajhatv

हॅलो अॅप -  http://m.helo-app.com/al/mUfSswxex

Android/iOS App ABPLIVE  -  https://goo.gl/enxBRK