LIVE UPDATES | सांगलीचे खासदार संजयकाका पाटील कोरोना पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा नवा उच्चांक; एका दिवसात तब्बल 20 हजार 489 रुग्णांची नोंद पुण्यातील जम्बो रुग्णालयाचा स्टाफ बदलण्याच्या हालचाली सुरू; 120 कर्मचाऱ्यांचा सामूहिक राजीनामा, सूत्रांची माहिती माझा कट्टा | मोदी सरकारने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली : प्रशांत भूषण मी अडकले तर तुम्हाला सगळ्यांना अडकवेन, रियाची आपल्या गॉड फादरला धमकी कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Sep 2020 08:58 PM
सांगलीचे खासदार संजयकाका पाटील कोरोना पॉझिटिव्ह, अनेक बैठका आणि कार्यक्रमास संजयकाका पाटील यांची उपस्थिती मागील काही दिवसापासून होती
चंद्रपूर व बल्लारपूर शहरात गुरुवार ते रविवार जनता संचारबंदी, अत्यावश्यक कामासाठीच बाहेर पडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन, बंदी काळात अत्यावश्यक सेवा-आस्थापने-बँका-MIDC सुरू राहणार, भाजीपाला-किराणा आणि फुटपाथ वरील दुकानं मात्र बंद
विधानपरिषद उपसभापती निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली. विधानपरिषदमध्ये भाजपने सर्व आमदारांना मुंबईत बोलवले आहे, काही आमदार आज अनुपस्थित होते. तर भाजपच्या काही आमदारांना कोरोना झाला असल्याने त्यांना ऑनलाईन मतदान करण्याची परवानगी द्यावी अशी विनंती सभापती करण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी सभापतींना पत्र दिले आहे.
सलग तीन दिवसांपासून,मनमाड,येवला,चांदवड परिसरात पावसाने हजेरी लावली आहे,सतत पडत असलेल्या पावसाने मात्र बळीराजाच्या चिंतेत भर पडतेय,काल झालेल्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचे पीक आडवी झाली,आज पुन्हा दुपार पासून अनेक भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे,त्यामुळे कांदा खराब होण्याची भीती व्यक्त होत आहे
ज्यांना धमकीचे फोन आले आहेत. त्याची क्राईम विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे; , गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणे शरद पवार यांना धमकीचा फोन काल आला होता. भारताबाहेरून हा फोन आल्याची माहिती आहे.
तसेच कंगना रनौत प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील धमकीचे फोन आला. कंगनावर गृहमंत्र्यांनी टिप्पणी केल्यावर हा फोन आला.
मुख्यमंत्र्यांपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, यांनाही धमकीचे फोन, भारताबाहेर फोन आल्याची माहिती, तर कंगना रनौतप्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही धमकीचा फोन कॉल
भाजप उपसभपती पदाची निवडणूक लढवणार असल्याचा निर्णय भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. भाजपकडून भाई गिरकर आणि प्रसाद लाड यांच्या नावाची चर्चा. तर दुसरे उमेदवार शिक्षक आमदार कपिल पाटील यांना सामोपचाराने भाजप पाठींबा देणार असल्याचीही चर्चा. मतविभागणी करत उपसभापती निवडणुकीत जिंकण्याचा भाजपचा प्रयत्न. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज भरण्याची मुदत.
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने केलेल्या आंदोलनानंतर पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अदानी इलेक्ट्रिसिटी ग्रुपचे सीईओ आणि वरिष्ठांशी कृष्णकुंजवर चर्चा केली. लॉकडाऊननंतर अनेकांच्या रोजगार, व्यवसायावर परिणाम झाला असताना, वाढीव बिलामध्ये दिलासा द्यावा आणि तात्काळ सरकारशी बोलून किंवा स्वतः कंपन्यांनी याबाबत निर्णय घ्यावा, असं राज ठाकरे यांनी अदानी ग्रुपला सांगितलं. कोरोना काळात जी बिलं आली आहेत ती खूपच जास्त आहेत. त्यामुळे जनतेचा आक्रोश यापुढे अजून वाढेल. जनतेला बिलात सूट द्या, नाही तर यापुढे जनतेच्या आक्रोशाला सामोरे जावे लागेल असा इशारा देत या मुद्द्यावरुन मनसे लोकांसोबत असेल, असंही राज ठाकरे म्हणाले.
कोरोना वरील लसीच्या मानवी चाचणीचा बेळगावात पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला प्रारंभ झाला आहे. एकूण 179 जणांवर मानवी चाचणी करण्यात आली आहे.
भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सीन लसीच्या चाचणीच्या पहिल्या टप्प्यात बेळगावातील जीवनरेखा हॉस्पिटलमध्ये चार जणांवर मानवी चाचणी करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यातील चाचणी यशस्वी झाली आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील चाचणीला प्रारंभ झाला आहे. झायडस कॅडीला कंपनीच्या लसीच्या चाचणीसाठी बेळगावात 175 स्वयंसेवक पुढे आले आहेत. यामध्ये डॉक्टर, वकील, आरोग्य कर्मचारी आणि आर्थिक सल्लागार अशा व्यावसायिकांचाही समावेश आहे. लस दिल्यानंतर 28 दिवसांनी स्वयंसेवकांना बोलावण्यात येत असून कोरोना विरुद्ध प्रतिकार करण्यासाठी त्यांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्यात की नाही याची तपासणी करण्यात येत आहे.
अभिनेत्री कंगना रानौतच्या पाली हिल परिसरातील कार्यालयाची बीएमसी अधिकाऱ्यांकडून पाहणी, कार्यालय बीएमसीच्या नियमाप्रमाणे बांधलेलं आहे का याचा आढावा, गेल्या अनेक दिवसांपासून कंगना रानौतची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्र पोलीस दलावर ट्विटरमार्फत टीका, या पार्श्वभूमीवर कंगना रानौतची प्रॉपर्टी कायदेशीररित्या वैध आहे का याची बीएमसी अधिकाऱ्यांकडून पाहणी
बॉलिवूड अभिनेत्री कंगनाला गृहमंत्री अमित शहा यांनी 'वाय' दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. कंगनाने वाय सुरक्षा दिल्याबद्दल अमित शहा यांचे आभार मानले आहे.

हिंगोली : काल रात्री वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पावसामुळे हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात उसाचे पीक हे जमीनदोस्त झाले आहे. संपूर्ण उभे पीक ही जमिनीवर आडवी पडल्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान होत आहे.अनेक शेतकऱ्यांचे ऊस हे पुढील महिन्यांमध्ये कापणीला येणार होते परंतु अशातच हे संपूर्ण ऊस हा आडवा पडल्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात आला आहे. वसमत तालुक्यात मोठ्या प्रमाणावर उसाचे क्षेत्र आहे. 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर रात्री काही ठिकाणी हलक्या सरी तर कुठे मुसळधार सरी बरसल्या.
राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, 11 आक्टोबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार, याआधी 20 सप्टेंबर ही तारीख एमपीएससीने जाहीर केली होती, तसंच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 22 नोव्हेंबरला होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबरलाच होणार
राज्यसेवा परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर, 11 आक्टोबरला राज्यसेवा पूर्वपरीक्षा होणार, याआधी 20 सप्टेंबर ही तारीख एमपीएससीने जाहीर केली होती, तसंच महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्वपरीक्षा 22 नोव्हेंबरला होईल, महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्वपरीक्षा 1 नोव्हेंबरलाच होणार
कोर्टात मान्य केलं त्यानुसार विधेयक तयार करा : फडणवीस
विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशाला सुरुवात झाली आहे, कोरोनाच्या नियमांसह विधानसभेचं कामकाज सुरु आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या अध्यक्षतेखाली कामकाजाला सुरुवात झाली आहे.
विधेयक रेटून नेण्याची मुश्रीफ यांना घाई : फडणवीस
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोरही भाजप आमदारांची घोषणाबाजी, अजित पवारांनी घोषणा देणाऱ्या आमदारांशी चर्चा केली
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे विधीमंडळात आल्यानंतर भाजप आमदारांकडून पायऱ्यांवर घोषणाबाजी
विधीमंडळाच्या दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सुरुवात, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक आमदार विधानभवन परिसरात दाखल, अनेकांचे कोरोना अहवान न मिळाल्याने विधानभवनात प्रवेश नाही, आमदारांना लवकर विधानभवनात सोडा, अजित पवार यांची सूचना
माजी खासदार राजू शेट्टी यांना कोरोनाची लागण झाली आहे. डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरामध्येच त्यांच्यावर उपचार सुरू आहे. शेट्टी यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांची आज तपासणी होणार आहे.
कामावर हजार होणार नाही म्हणत सोलापुराकील मार्कण्डेय रुग्णलयासमोर परिचरिकांचे आंदोलन सुरु आहे. सात दिवसाचे रोटेशन आणि वेळेत सुट्टी देण्याची मागणी केली आहे. तसेच परिचारिकांची पदभरती व्हावी, रुग्णसेवा व्यतिरिक्त इतर कामे देण्यात येऊ नये अशी देखील मागणी केली. अनेक रुग्ण हे आयसीयूमध्ये आहेत, परिचारिका खाली आंदोलन करत असल्याने त्यांना मॉनिटर करणारे कोणी नाही त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना काळजी वाटत आहे.
सातारा : कोरोना बाधिताची कृष्णा नदीत उडी मारुन आत्महत्या, वाईतील घोटवडेकर रुग्णालयात घेत होता उपचार, उपचार घ्यायचे नाही असे बाधित वारंवार म्हणत होता, सर्वांना धक्काबुक्की करुन रुग्णालयातून पळ काढून जवळच असलेल्या कृष्णा नदीत उडी मारली, बाहेर काढण्याआधीच बाधिताचा मृत्यू
नागपूरात वेळेवर ऑक्सिजनयुक्त अॅमब्युलन्स न मिळाल्याने कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी रुग्णाच्या वडिलांचा मृत्यूही कोरोनामुळे झाला होता.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला
सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन करावे अशा तीव्र भावना मंत्रिमंडळाने व्यक्त केल्या
यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यासंदर्भात गुन्हे शाखेने कसून तपास सुरू केला आहे अशी माहिती दिली
सांगली जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या पाहता जिल्ह्यात लॉकडाऊन करण्यासाठी व्यापारी संघटना अनुकूल. केंद्र सरकारची परवानगी घेऊन जिल्ह्यात 14 दिवसांचा लॉकडाऊन करावा अशी मागणी व्यापारी संघटना उद्या जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्याकडे करणार आहेत.
बीड : डॉ. सुदाम मुंडेला पाच दिवसांची पोलीस कोठडी, 11 सप्टेंबरपर्यंत पीसीआर, परळी प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांनी सुनावली पोलीस कोठडी
अकोल्याच्या महापौर अर्चना मसने यांना कोरोनाची लागण. काल घेण्यात आली होती कोरोना चाचणी. महापौर मसने राहणार गृह विलगीकरणात.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान 'मातोश्री' उडवून देण्याची धमकी. दुबईहून दाऊद इब्राहिमच्या हस्तकाचा फोन आल्याची माहिती.
चंद्रपूर : चंद्रपुर शहरात छोट्या मालवाहू वाहनाद्वारे येणारा प्रतिबंधीत तंबाखू जप्त, सुमारे 26 लाखांचा सुगंधित तंबाखू-हुक्का तंबाखू जप्त, तंबाखू आणणारे शहरातल्या बंगाली कॅम्प परिसरातील 2 युवक अटकेत, 13 लाखांचे आयशर वाहन देखील ताब्यात
परभणी शहरातील ग्रँड कॉर्नर येथील प्रसिद्ध असलेल्या मदनी हॉटेलला आज सकाळीच भीषण आग लागली. या आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने हॉटेलमध्ये कोणीही नसल्याने कुठलीही जीवितहानी झाली नाही.आगीची माहिती कळताच अग्निशमन दलाने घटनास्थळ पोहोचून आग विझवली. दरम्यान ही आग शॉर्टसर्किटने लागली असल्याचा अंदाज यावेळी व्यक्त करण्यात आला.
डॉ.सुदाम मुंडे वर वेगवेगळ्या 13 कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्भपात कायद्यांतर्गत दुसऱ्यांदा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परळी शहर पोलीस स्टेशनमध्ये डॉक्टर सुदाम मुंडे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्या असून कलम 420,353, 188, 269, 270, 278 419, 175, 179, 504 त्यासोबतच आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम 51 ( b)साथरोग नियंत्रण कायदा शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैद्यकीय गर्भपात कायदा नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sushant Singh Rajput case Live Updates: NCB ऑफिसला जाण्यासाठी घरातून निघाली रिया, आज होणार चौकशी, आज सायंकाळपर्यंत अटक होण्याची शक्यता
Sushant Singh Rajput case Live Updates: रिया चक्रवर्तीला सकाळी 11 वाजेपर्यंत NCB कार्यालयात जावं लागणार, चौकशीसाठी सकाळी बजावला समन्स
कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयातील 17 व्हेंटिलेटर बंद अवस्थेत,

आपत्तीजनक स्थिती असतानाही सीपीआर प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष,

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी घेतली गंभीर दखल,
,
सीपीआर रुग्णालयाचा कारभार चव्हाट्यावर,

तातडीने व्हेंटिलेटर दुरुस्त करून घ्या अन्यथा कारवाई करू- यड्रावकर यांचा इशारा

सुशांत सिंह राजपूत केसमध्ये ड्रग्ज कनेक्शनमध्ये शौविक चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडा एनसीबीच्या रिमांडमध्ये आहेत. यातच एनसीबीच्या टीमनं आज सकाळी रियाच्या घरी जाऊन रिया समन्स दिला आहे. एनसीबीच्या टीमसोबत महिला पोलिस अधिकारी देखील होत्या,.
पर्यटकांसाठी खुशखबर! MTDCचे रिसॉर्ट आजपासून खुली, ऑनलाईन, ऑफलाईन पद्धतीनं करता येणार बुकिंग, कोकणातील रिसॉर्ट, हॉटेल्स खुली करण्याचा निर्णय, शासनाचे सर्व नियम पाळणे पर्यटकांना बंधनकारक
सत्ताधारी आणि विरोधकांचा चहा पानाचा कार्यक्रम रद्द. अधिवेशनाच्या आधी सरकारकडून चहा पानाचे आययोजन केले जाते. या चहापानला विरोधी पक्षाला देखील बोलवले जाते. पण हे चहापान यावर्षी रद्द झाले. राष्ट्रपती निधनामुळे दुखवटा आहे, त्यामुळेही चहापान रद्द.
पुण्यातील हे जम्बो कोविड रुग्णालय सुरू झाल्यापासून सातत्याने चर्चेत आहे. या ठिकाणी रूग्णांवर उपचार होत नसल्याचा आरोप करण्यात येतोय. हे रुग्णालय चालवण्यासाठी पुरेसे डॉक्टरही उपलब्ध नाहीत. अशा परिस्थितीत 25 कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिल्याने या रुग्णालयात पुढील अडचणी आणखी वाढल्या आहेत. याच जम्बो हॉस्पिटलमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचाही मृत्यू झाला होता.
चंद्रपूर : केंद्राने लॉकडाउनला नकार दिल्यानंतर आता जनता कर्फ्युचा उतारा, निश्चीत तारीख ठरवून जनता कर्फ्यु लावण्याची पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा, जिल्ह्यात 3500 कोरोना बाधितांची नोंद, रोज सरासरी 200 रुग्णांची वाढ होत असल्याने प्रशासनाने लॉकडाऊनचा विचारात घेतला होता पर्याय, पण केंद्राने मंजुरी न दिल्यामुळे आता नागरिकांनी जनता कर्फ्युला सहकार्य करून नियम पाळून कोरोना नियंत्रणास मदत करण्याचे पालकमंत्र्यांचे आवाहन
पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील विधानभवन येथे बैठक पार पडली. या बैठकीला पुण्यातील पुणे जिल्ह्यातील आमदार, खासदार आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. रस्त्यांवर थुंकणाऱ्या, मास्क न घालणाऱ्या लोकांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत झालाय. अँन्टीजेन टेस्ट वाढवणार आहोत.
आता वकिलांचे ही आंदोलन.महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र ,गोवा बार कौन्सिलच्या विरोधात आंदोलन. रास्ता रोको आंदोलन.7 तारखेला 11 वाजता जिल्हा न्यायालयाच्या इमारती समोर करणार आंदोलन .जोपर्यंत न्यायालयाचे कामकाज नियमितपणे सुरू होत नाही तो पर्यंत वकिलांना 10 हजार वेतन देण्याची मागणी.
पुण्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट झालाय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी अनेक बैठका घेऊन ही परिस्थिती नियंत्रणात येताना दिसेना. अशातच कोट्यवधी खर्ची घालून, नव्यानं उभारण्यात आलेल्या जंबो कोविड सेंटरमध्ये पत्रकार पांडुरंग रायकर यांचं निधन झालं आणि आरोग्य व्यवस्थेचा उडालेला बोजवारा चव्हाट्यावर आला. मग शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार सूत्र हाती घेताना दिसतायेत. म्हणूनच गुरुवारी शरद पवार अचानक पिंपरी चिंचवड महापालिकेत पोहचले आणि आज केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सोबतच्या बैठकीत दस्तुरखुद्द शरद पवार हजर राहिलेत. साडे अकरा पासून ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत बैठकांचं सत्र सुरू असेल. जिल्ह्यातील अधिकारी, डॉक्टर्स, लोकप्रतिनिधी सोबत चर्चा होईल.
पुणे- पुण्यातील गोळीबार मैदानाजवळ असलेल्या कॅंटोन्मेंट हॉस्पिटलमध्ये आग लागली, अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल, आयसीयूमध्ये लागली आग , A C मध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे आग लागली असावी अशी प्राथमिक माहिती
अभिनेत्री कंगना राणावतने मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत परभणीत शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कंगणा राणावतच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले..

परभणीतील खासदार संजय जाधव यांच्या कार्यालयासमोर शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत कंगणा राणावतच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तिच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.यावेळी या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या.
पुणे- NCP अध्यक्ष खासदार शरद पवार पुण्यातील विधान भवनामध्ये बैठकीसाठी पोहोचले, उपमुख्यमंत्री अजित पवार, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, आरोग्य मंत्री राजेश टोपेही दाखल, काही वेळात बैठकीला सुरुवात
निवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसकर यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दीपक म्हैसकर यांनी विभागीय आयुक्त पुणे म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून पुणे येथील मुख्यालयातून ते कामकाज पाहतील.
निवृत्त सनदी अधिकारी डॉ. दीपक म्हैसकर यांची मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती,

दीपक म्हैसकर यांनी विभागीय आयुक्त पुणे म्हणून जबाबदारी सांभाळली आहे ,

निवृत्तीनंतर मुख्यमंत्र्यांचे सल्लागार म्हणून पुणे येथील मुख्यालयातून ते कामकाज पाहतील,
औरंगाबाद : जायकवाडी धरण भरलं, आज उघडणार 2 दरवाजे, सलग दुसऱ्या वर्षी भरलं धरण, पाटबंधारे विभागाची माहिती
बीड जिल्ह्यातील काल 1024 स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते. त्यामध्ये 176 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले तर 849 निगेटिव्ह आले आहेत. यात सर्वाधिक 46 रिपोर्ट हे बीड मधील असून त्या खालोखाल 23 पॉझिटिव्ह परळीतील आहेत,तर अंबाजोगाईचे 19,अष्टीचे 16,शिरुरचे 11,वडवणीचे 14, गेवराईचे 10, धारूरचे 16 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील एकूण रुग्ण 5109 आहेत. आतापर्यंत 3575 रुग्ण बरे झाले आहेत.तर 131 जणांचा मृत्यू झालाय सध्या 1403 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
कोल्हापूर - राजू शेट्टी यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह मात्र कोरोनाची लक्षणं,

उद्या पुन्हा एकदा स्वब तपासणीसाठी देणार,

संपर्कात असलेल्या नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन,

राजू शेट्टी यांचे स्वीय सहायक पॉझिटिव्ह
हिंगोली : हिंगोली तालुक्यांमध्ये येत असलेल्या इडोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळविल्याची घटना घडली आहे. दानपेटी चोरतानाचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. तोंडाला मास्क व रुमाल बांधल्यामुळे कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती कळू शकली नाहीये. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेत आहे. यापूर्वीही या मंदिरात असाच चोरीचा प्रकार घडला होता. मात्र पूर्वीच्या घटनेचा अद्यापही चोरट्यांचा शोध लागलेला नाहीये.
उजनीवरील दौंडचा पाण्याच्या विसर्ग कमी झाला आहे, पाउस जवळपास बंदच आहे, त्यामुळे उजनी धरणातून भीमा नदीत सोडण्यात येणारा पाण्याच्या विसर्ग कमी करण्यात आला आहे. सध्या फक्त पावर हाऊसमधून 1600 क्यूसेक्सने विसर्ग भीमा नदीत पाणी सोडले जात आहे. अजून पाणी कमी झाले तर तेही बंद करण्यात येईल असे धरण प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते खा. शरद पवार यांनी पुणे शहराला ६ व्हेंटिलेटर एम्ब्युलन्स आणि ५० रेडिमेसिर इंजेक्शन कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी दिले आहेत... पुण्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत शरद पवार यांनी आज पुण्यात बैठक घेऊन कोरोना स्थितीचा आढावा घेतला... या ६ व्हेंटिलेटर एम्ब्युलन्स राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून रुजू केल्या जात आहेत... शिवाय शहराच्या विविध भागात राष्ट्रवादीकडून हेल्पडेस्कही सुरु करण्यात येत आहेत...

कंगना रणौतच्या विरोधात नाशकात आंदोलन, शिवसेना महिला आघाडी आक्रमक, कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडो मारो आंदोलन, कंगनाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन, शिवसेना मध्यवर्ती कार्यालया बाहेर आंदोलन
पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर सरकारला मोठा धक्का! विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांना कोरोनाची लागण.
ठाणे : ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यृहात एक भला मोठा अजगर आज सापडला. या नाट्यगृहाच्या कचऱ्याच्या डब्यात हा अजगर होता. तब्बल 7 ते 8 फुटांचा हा अजगर आहे जो पकडताना मोठी कसरत करावी लागली. त्याला पकडल्यानंतर ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा अजगर सर्पमित्रांन जंगलात सोडण्यासाठी दिला आहे.मात्र हा अजगर नाट्यगृहाच्या आवारात आला कसा हा मोठा प्रश्न आहे.
NEET-JEE परीक्षा संदर्भातील फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली. महाराष्ट्रासह सहा राज्यांनी ही याचिका दाखल केली होती. 17 ऑगस्टला कोर्टाने परीक्षा रोखण्यास नकार दिला होता. यावर फेरविचार याचिका दाखल करण्यात आली होती.
अकोला महापालिकेच्या अमृत योजनेतील कामाच्या विरोधात शिवसेनेचं विरूगिरी आंदोलन. शिवसेना वसाहत भागातील मोबाईल टॉवरवर चढत शिवसेनेचं आंदोलन. पाच शिवसैनिक चढले आहेत टॉवरवर. अनेक ठिकाणी पाईपलाईन खोदून ठेवल्यानं नागरिकांना त्रास होत असल्याचा सेनेचा आरोप.
विदर्भात सोयाबीन पिकाची लागवड जास्त प्रमाणात असते....यावर्षी सततच्या पावसाने सोयाबीन पिकावर अळी चा प्रादुर्भाव जास्त असल्याने व सोयाबीन या पिकाला पोषक वातावरण तैयार होत नसल्याने पिकाची फक्त वाढ जास्त झाली असून सोयाबीन ला शेंग कमी लागली आहे त्यामुळे यावर्षी सोयाबीन च उत्पन्न घटनार असल्याचं चित्र सध्या बघायला मिळत आहे. अशा वेळेस शेतकरयानी घाबरून न जाता वेळेवर अळी नाशक औषधाची फवारणी वारंवार करावी अस अवाहन कृषी अधिकारी यांनी केल आहे.
देशात गेल्या 24 तासांत 83 हजार 341 नवे कोरोनाग्रस्त, मृतांचा आकडा 1 हजार 96, काल 66 हजार 659 रुग्ण कोरोनामुक्त, देशातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 39 लाख 36 हजार 474, देशात 8 लाख 31 हजार 124 अॅक्टिव्ह रुग्ण, देशात एकूण मृतांची संख्या 68 हजार 472 वर

बीड- जोरदार पावसाचा शेतीला फटका, काल सायंकाळी झालेल्या वादळी पावसाने अंबाजोगाई तालुक्यातील देवळा परिसरामध्ये शेतातील पिकाचे मोठे नुकसान केले. विशेष म्हणजे शेतामध्ये उभा असलेला ऊस संपूर्णतः आडवा पडला आहे.
विशेष म्हणजे हा पाऊस सर्वदूर नव्हता पण या पावसामुळे पिकांचं मोठे नुकसान झाले आहे. लातूर बीडच्या सीमेवरच्या ग्रीन बेल्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या परिसरामध्ये काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले आहे
NCB ने सुशांत सिंह राजपूतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. ड्रग्स कनेक्शन प्रकरणात एनसीबीने सकाळपासूनच सर्च ऑपरेशनला सुरुवात केली. त्यानंतर अडीच तासांनी एनसीबीच्या पथकाने त्याला आपल्यासोबत नेलं.

रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीचे ड्रग्ज तस्करांशी संबंध असल्याचं त्यांच्या व्हॉट्सअॅप चॅटमधून उघड झालं आहे. नार्कोटिक्सची दोन पथकं रियाच्या घरी दाखल झाली असून एनसीबीकडून रियाच्या घराची झाडाझडती सुरु आहे. त्यामुळे रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक होण्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे.
अंतिम वर्ष परिक्षेबाबत महत्वाचा निर्णय. 15 ते 30 सप्टेंबर प्रॅक्टिकल परीक्षा होऊ शकतात. तर ऑक्टोबर महिन्यात मुख्य परीक्षा. 31 ऑक्टोबरपर्यंत निकाल लावण्याचा प्रयत्न. विद्यार्थ्यांना घरी बसून परिक्षा देण्यास राज्यपालांची मंजुरी. परीक्षा सोप्या पद्धतीनं होतील, मंत्री उदय सामंत यांची माहिती.
अधिवेशनाच्या आधी सरकारला धक्का; कॅबिनेट मंत्री सुनील केदार यांना कोरोणाची लागण, ब्रिज कॅंडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू
यवतमाळ जिल्ह्याच्या महागाव तालुक्यातील चिल्ली येथे अंगावर वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू. शेतामध्ये नींदन करत असताना घडली घटना. विलास राठोड, असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
अकोल्यात कोरोनाचा प्रकोप दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढतोय. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील सुपर स्पेशालिटी रूग्णालय त्वरीत सुरू करण्याची मागणी जोर धरू लागलीय. या मागणीसाठी आज माजी गृहराज्यमंत्री आणि भाजप आमदार डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केलंय. अकोला पोलीस मुख्यालय परिसरातील या रूग्णालयाचं बांधकाम पुर्ण झालंय. मात्र, रूग्णालयातील पदं सरकारनं न भरल्यानं हे रूग्णालय अद्यापही बंद आहेय. त्यामूळे कोरोना काळात हे रूग्णालय त्वरीत सुरू करण्याची मागणी आमदार डॉ. पाटील यांनी ठाकरे सरकारकडे केलीये.
सांगोला तालुक्यातील कोळा येथे वाळू माफियांना पोलीस अधीक्षक पथकाचा दणका; 1 कोटी 39 लाखाचा मुद्देमाल जप्त.
अकोला : आज 81 नवे रूग्ण आढळलेत आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 4223 वर पोहोचला आहे. जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 159 वर पोहोचला असून आतापर्यंत 3286 रूग्ण रोगमुक्त झाले आहेत. सध्या 778 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
फडणवीस यांच्या काळातील अधिकारी खाल्ल्या मिठाला जागत होते म्हणून बदलले, मंत्री हसन मुश्रीफ यांचं गंभीर वक्तव्य
बेळगाव- पिरनवाडी येथील चौकाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याचा निर्णय शिवप्रेमी आणि संगोळी रायण्णा अभिमानी कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला होता.त्याप्रमाणे शिवप्रेमींनी चौकात छत्रपती शिवाजी महाराज चौक असा फलक उभा केला.यावेळी शिवप्रेमींनी जोरदार घोषणाबाजी केली. पिरनवाडी येथे संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसवण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला होता.पुतळा बसवण्याच्या जागेवरून वाद झाला होता.त्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता.कर्नाटकच्या गृहमंत्र्यांनी याची गंभीर दखल घेऊन कायदा सुव्यवस्था विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक अमरकुमार पांडे यांना बेळगावला पाठवले होते.त्यांनी दोन्ही गटाची बैठक घेऊन संगोळी रायण्णा यांचा पुतळा आहे तेथेच ठेवायचा आणि चौकाला छत्रपती शिवाजी महाराज चौक नाव द्यायचे असा तोडगा काढला होता.त्यानुसार पिरनवाडीत सकाळी शिवप्रेमींनी एकत्र येऊन जेसीबी लावून चौकात नामफलक बसवला.शेकडो शिवप्रेमी यावेळी उपस्थित होते.
गणेश मुर्तींची लगबग संपली की मुर्तीकार देवीच्या मुर्ती तयार करण्यास सुरुवात करतात. त्यामुळे यावेळी कोरोनामुळे देवीच्या मुर्तीची उंची किती असणार? सार्वजनिक नवरात्र उत्सवाचे स्वरूप कसे असणार? याबाबतची स्पष्टता वेळीच मुर्तीकरांना द्या, भाजप आमदार आशिष शेलार यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र.
हिंगोली : हिंगोली पोलिसांनी हिंगोली शहरामध्ये नकली नोटा बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सतरा लाख रुपये रोख रक्कम 16 देवींच्या मूर्ती जप्त केले आहेत. मागील चार दिवसापासून सापळा रचून ही कार्यवाही पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे. एकूण 24 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल आहे. यामध्ये एक महिला व एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे. यामध्ये एक प्रिंटर छपाईची इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. 100, 200, आणि पाचशे रुपयांच्या नोटांच्या यामध्ये समावेश आहे. तपासाअंती यामध्ये मोठ्या टोळीचा पर्दाफाश होण्याची शक्‍यता आहे.
बीड-
बॅंका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत या तक्रारी काही नवीन नाहीत. वारंवार सांगून सुद्धा जर बँकेचे मॅनेजर ऐकत नाहीत, त्यामुळं चक्क त्यांचे पाय ठेवून त्यांच्यावर फुले टाकून सत्कार केला आहे. ही गांधीगिरी भाजपचे विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी केलीय.
उजनी धरण 109.56 टक्के भरले,
धरणात 122.36 टी एम सी पाणीसाठा, सध्या भीमानदीत 4 दरवाज्यातुन 6600 क्यूसेक्स ने पाणी सोडण्यात येत आहे
नागपूर-

दोन शाळकरी मुलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना नरखेड तालुक्यातील अंबाडा येथे ही घडली आहे.

गजानन लक्ष्मण चचान व जगदीश घाटवडे अशी मृत मुलांची नावे आहेत.

सध्या शाळेला सुट्टी असल्याने दोघेही घरची गुरे चारण्यासाठी गावा शेजारील जंगलात जायचे. जंगलाशेजारी मच्छी तलाव आहे. तिथे पोहायला उतरले असता काल संध्याकाळी दोघांचा बुडून मृत्यू झाला आहे.
पावसाळ्याचा पहिल्या दोन महिन्यात नंदुरबार जिल्ह्यात सरासरी ३५टक्के पावसाची तूट होती होती मात्र ऑगस्ट महिन्यात झालेल्या जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील तूट भरून निघाली असून नंदुरबार जिल्ह्यातील सर्वच लघु आणि मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत.अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहेत.जिल्ह्यातील महत्वाच्या नंदुरबार नवापूर शहादा शहरांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे विरचक आणि आंबेबारा प्रकल्पात 100टक्के पाणी साठा झाला आहे त्यामुळे नंदुरबार वासियांना दिलासा मिळाला आहे.नवापूर शहरला पाणी पुरवठा करणाऱ्या रंगवली मध्ये 100टक्के पाणी साठा झाला आसल्याने पाणी टंचाई समस्या मिटली आहे त्याच सोबत धरणात पाणी साठा झाल्याने रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पत्रकार पांडुरंग रायकर मृत्यूप्रकरणाची चौकशी ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता यांनी करावी अशी विनंती पुणे महानगरपालिकाने केली आहे.
LIVE UPDATES | राष्ट्रवादी पक्षाच्या वेल्फेअर ट्रस्टमधून पांडुरंग रायकर यांच्या कुटुंबाला पाच लाखाची मदत जाहीर
मुंबई-नाशिक महामार्गावर ट्राफिक जाम, ठाण्याच्या माजिवडा जंक्शन पासून वाहनांच्या रांगा. नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या रांगा. या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने ट्राफिक जाम झाल्याचा अंदाज.
औरंगाबाद: खासदार इम्तियाज जलील यांना पोलिस आयुक्तालयात नेलं, शहागंज मशीदीबाहेर मोठा बंदोबस्त, खासदार इम्तियाज जलील मशीद उघडण्यासाठी पायी निघाले होते
औरंगाबाद माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांचे आज पहाटे दुःखद निधन. प्रदीर्घ आजराने निधन त्याचं वयाच्या 91 व्या वर्षी निधन झालं. औरंगाबाद शहरातील सिटी केअर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते.रामकृष्ण बाबा दोन वेळेस वैजापूरचे आमदार राहिले आहेत.विनायक सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन आणि सध्या संचालक होते
देशभरात लॉकडाऊन झाल्यानंतर जवळपास महिन्याभरानंतर सोलापुरात पहिला कोरोनाबाधित रुग्ण आढळला. त्यांनंतर सोलापूर शहरात कोरोनाची झपाट्याने वाढ झाली. आरोग्य यंत्रणा पणाला लागली आणि शासकीय रुग्णालयातील ए ब्लॉक कोव्हीड हॉस्पिटल म्हणून जाहीर करण्यात आलं. 120 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता या हॉस्पिटलची होती. मात्र रुग्णांची संख्या वाढल्याने खासगी रुग्णालय उघडणे गरजेचे होते. खासगी रुग्णलाय अधिग्रहित करून देखील सेवा न दिल्याने अनेक कर्मचारी, डॉक्टर यांच्यासह रुग्णालयावर गुन्हे दाखल करण्यात आले. राज्यात सर्वाधिक मृत्युदर असलेल्या शहरांपैकी एक सोलापूर देखील होतं. मात्र आता परिस्थिती सुधारत आहे. जिल्ह्याचा मृत्युदर कमी झाला आहे. राज्यात सर्वाधिक अर्थात 10 टक्क्यांहून अधिक मृ्त्यूदर सोलापरचे होता. मात्र आता मृत्यूदर हे 4 टक्क्यांवर आला आहे. मात्र रुग्ण वाढण्याचे प्रमाण कायम आहे. मागील एका महिन्यात तब्बल 9 हजार 564 रुग्णांची वाढ झाली आहे. तर मृतांच्या संख्येत 287 ने भर पडली आहे. तर दुसरीकडे उपचार करणाऱ्या यंत्रणांवर मोठा ताण आहे. पुरेसे साहित्य आणि मर्यादित डॉक्टर असल्याने ताण वाढला आहे. शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता हे गेल्यामहिन्या भरापासून रजेवर आहेत. त्यामुळे प्रभारी अधिष्ठाता वर काम भागवण्याची वेळ प्रशासनकार अली आहे. दरम्यान कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करताना नॉन कोव्हिड रुग्णांची हेळसांड होत असल्याचा आरोप केला जात आहे. शहराची परिस्थिती जरी नियंत्रणात येत असली तर ग्रामीण भागात वाढणाऱ्या रुग्णांची संख्या आणि मृतांचे आकडे यामुळे आरोग्ययंत्रणांवरचे प्रश्न कायम आहेत.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी याबाबतची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली. आपण जरी कोरोनाबाधित असलो, तरी घरात राहून काम करणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.

कोरोनाची स्थिती दिवसेंदिवस भीषण होत असताना, मुंबईतील चाचण्या वाढवा असा सातत्याने आग्रह करीत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ 14 टक्के अधिक चाचण्या करण्यात आल्या. हीच संख्या राज्याच्या बाबतीत 42 टक्के आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
धुळे-सुरत महामार्गावरील नवापूर शहरातील रंगावली पुलावर सकाळी एक ट्रक आणि टॅकर मध्ये समोरासमोर धडक झाली. यात दुध टॅकर रंगावली पुलावरून अर्धवट अवस्थेत नदीत कोसळला. 25 हजार लिटर दूधने टँकर भरलेले होतो. अपघात होतात टॅकर मधील दुध रंगावली नदीत वाहू लागले. आश्चर्यकारक म्हणजे शेजारील छोटीशी विहिर दुधाने भरून गेली. दुध रस्त्यावर वाहून जात असल्याने आजूबाजूला राहणारे नागरिकांनी दुध घेण्यासाठी महामार्ग धावत घेतली. मिळेल त्या भांड्यात दुध घरी नेले. दुध घेऊन जाण्यासाठी देखील मोठी गर्दी झाली.यावेळी आजूबाजूलाचा नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली.घटनास्थळी तात्काळ नवापूर पोलीसांनी हजेरी लावून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली.
बीड जिल्ह्यात आणखी 117 कोरोनाबाधीत रूग्ण वाढले आहेत..या रूग्णांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात 12 आष्टी 14, बीड 32, धारूर 1, गेवराई 2, केजमध्ये 14, माजलगाव 18, परळीत 15, शिरूरमध्ये 5 तर वडवणी 2 रूग्णाचा समावेश आहे.बीड जिल्ह्यात आता आजपर्यंतच्या एकूण कोरोनाबाधीत रूग्णांची संख्या 4588 झाली आहे. यापैकी 3356 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर 128 रूग्णांचा मृत्यू झाला आहे.सध्या 1104 रुग्णांना उपचार सुरू आहेत.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून पूरग्रस्त पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर, 2 आणि 3 सप्टेंबर दोन दिवसांचा दौरा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना देणार भेटी, पूरग्रस्त भागाचा आणि झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्यापासून पूरग्रस्त पूर्व विदर्भाच्या दौऱ्यावर, 2 आणि 3 सप्टेंबर दोन दिवसांचा दौरा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना देणार भेटी, पूरग्रस्त भागाचा आणि झालेल्या नुकसानीचा घेणार आढावा
नाशिक : माजी रणजीपटू , प्रशिक्षक शेखर गवळी दरीत कोसळले, इगतपुरी तालुक्यात पर्यटनासाठी गेले असता पाय घसरून 200 फूट दरीत कोसळले. सायंकाळपासून शोध सुरू मात्र अद्याप तपास नाही. परिसरात गर्द अंधार असल्यानं बचाव, शोध कार्य थांबवण्यात आलं, उद्या सकाळी पुन्हा शोध घेतला जाणार, जिल्हा प्रशासनाची माहिती
नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुण नदी पात्रात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू, दारणा नदी पात्रात बुडून नरेश कोळी याचा मृत्यू तर वालदेवी नदीत बुडालेल्या अजिंक्य गायधणीचा शोध सुरू
नाशिकमध्ये गणपती विसर्जनादरम्यान दोन तरुण नदी पात्रात बुडाले, एकाचा मृत्यू तर दुसऱ्या तरुणाचा शोध सुरू, दारणा नदी पात्रात बुडून नरेश कोळी याचा मृत्यू तर वालदेवी नदीत बुडालेल्या अजिंक्य गायधणीचा शोध सुरू
वर्षा निवासस्थानी आज सायंकाळी गणपतीचे विसर्जन करण्यात आले. निवासस्थान परिसरात खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम हौदात गणेश मूर्तीचे विधिवत विसर्जन करण्यात आले. विसर्जनापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पत्नी रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी गणपतीची पूजा केली.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे आताच लिंगैक्य झाले आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पा लिंगैक्य झालेत.
राष्ट्रसंत शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे आताच लिंगैक्य झाले आहे. मृत्यूसमयी ते 104 वर्षाचे होते. गेल्या चार दिवसांपासून ते नांदेडला खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. मात्र न्यूमोनिया असल्याने त्यांच्या प्रकृतीने उपचाराला साथ दिली नाही. सोमवारी (31 ऑगस्ट) त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. चार दिवसांपूर्वी ते जिवंत समाधी घेणार आहेत अशी अफवा पसरल्याने हजारो भाविक अहमदपूर इथे जमले होते.त्यातच आज अप्पा लिंगैक्य झालेत.
पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासात देखील सुरुवात होणार,
मध्य रेल्वेने जारी केलेल्या एका पत्रांमधून ही गोष्ट उघड झाली आहे,
त्यासाठी उद्यापासून रेल्वेचे बुकिंग सुरू केले जाणार
पास रद्द केल्यानंतर आता राज्यांतर्गत रेल्वे प्रवासात देखील सुरुवात होणार,
मध्य रेल्वेने जारी केलेल्या एका पत्रांमधून ही गोष्ट उघड झाली आहे,
त्यासाठी उद्यापासून रेल्वेचे बुकिंग सुरू केले जाणार
कोरोनाकाळात कर्जवसुलीवरील स्थगिती दोन वर्षांपर्यंत वाढू शकते, आरबीआयच्या सर्क्युलरचा दाखला देत केंद्र सरकारची सुप्रीम कोर्टात माहिती, मोरेटोरियम दरम्यान ईएमआयवर व्याज न घेण्याच्या मागणीवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी, नवं प्रतिज्ञापत्र पाहिल्यानंतर सुनावणी करण्याची केंद्राची विनंती, प्रतिज्ञापत्रात आपत्कालीन कायद्याअंतर्गत दिलासा देण्याची सरकारची इच्छा, व्याज माफीचे परिणाम यांसारख्या पैलूवर चर्चा केल्याची केंद्राची माहिती. सुनावणी अनेक वेळा टळली आहे, उद्या असं होणार नाही, सुप्रीम कोर्टाचं स्पष्टीकरण
वाशिम : महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन सुरु केले आहे वाशीमच्या जिल्हा सामान्य रुग्णालय समोर हे आंदोलन सुरु केले आहे. पहिला टप्पा म्हणून सर्व कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून मागण्याच्या घोषणा देत आंदोलन सुरु केले. आजपासून सात तारखेपर्यंत हे आंदोलन सुरु असणार आहे. जर शासनाने आंदोलनकर्त्या परिचारिकांच्या मागण्या पूर्ण नाही केल्या तर काम बंद आंदोलन करणार असल्याच या वेळी आंदोलन कर्त्यांनी सांगितलं आहे.
हिंगोली : तालुक्यांमध्ये येत असलेल्या इडोळी गावापासून काही अंतरावर असलेल्या महादेव मंदिरातील दानपेटी चोरट्याने पळविल्याची घटना घडली आहे. दानपेटी चोरतानाचा सर्व प्रकार हा सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये कैद झाला आहे. तोंडाला मास्क व रुमाल बांधल्यामुळे कॅमेऱ्यात कैद झालेली व्यक्ती कळू शकली नाहीये. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलीस सध्या चोरट्याचा शोध घेत आहे. यापूर्वीही या मंदिरात असाच चोरीचा प्रकार घडला होता. मात्र पूर्वीच्या घटनेचा अद्यापही चोरट्यांचा शोध लागलेला नाहीये.
परभणी : जिल्हा कारागृहातील 84 कैद्यांना कोरोनाची लागण झाल्याने यापैकी 16 कैद्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑर्थोबिल्डिंग या ठिकाणी असलेल्या कोरोना कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र या सोळापैकी तीन कैद्यांनी रात्री बाथरुमचे गज वाकवून बेडशीटची साखळी करत फरार झाले आहेत. ही बाब सकाळी उघडकीस आली आहे.सध्या पोलीस या कैद्यांचा शोध घेत आहेत.
विदर्भाच्या पूरग्रस्त भागातील जेईई, नीट परीक्षा पुढे ढकलली जाणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने हा निकाल दिला. आज होत असलेल्या जेईई परीक्षेच्या पार्श्वभूमी तातडीची सुनावणी घेण्यात आली. ज्यात न्यायमूर्ती रवी देशपांडे आणि पुष्प गानेदीवाला यांच्या खंडपीठाने विद्यार्थ्यांना कोणताही दिलासा दिला नाही. ज्या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत, जिथे पूर नाही, जर एखादा विद्यार्थी पोहोचू शकला नाही तर त्याने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत रिप्रेझेन्टेशन करावे,
त्यावर एनटीए निर्णय घेईल, कोणाचेही नुकसान होऊ देणार नाही, पण परीक्षा पुढे नाही, असं नागपूर खंडपीठाने म्हटलं.
पुणे : आज अनंत चतुर्दशी... पुण्यातील मानाचे गणपती आणि प्रमुख गणपती मंडळ मंडपात किंवा मंदिरातच बाप्पांचं विसर्जन करणार आहेत. मानाचा पहिला कसबा गणपतीच्याही विसरजनाची तयारी पुर्ण झाली आहे. उत्सव मंडपातच विसर्जन हौद तयार करण्यात आला आहे.
दरवर्षी ज्या पालखीमधून कसबा गणपतीची मिरवणूक निघते त्या पालखीलाही सजवण्यात आलं आहे.
भंडारा आणि गोंदियामध्ये पूर परिस्थिती बघता नीट आणि जेईईचे विद्यार्थी परीक्षेला येण्यास ग्रामीण भागातून असक्षम. हीच स्तिथी नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोलीची ही आहे. विद्यार्थी परीक्षेला उद्या येऊ शकणार नाही. असा ईमेल उच्च न्यायालयाला पाठवला आहे. त्यावर कोर्टाने आता तातडीची सुनावणी घेतली. या ईमेललाच पी आय एल म्हणून ट्रीट केले, नोटीस बजावल्या आहेत. शासनाला, आज सकाळी सकाळी 8.30 वाजता यावर सुनावणी पार पडणार आहे. विदर्भासाठी तरी परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे.
पंढरपूर : विठ्ठल मंदिर प्रवेश आंदोलन प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांचेसह 12 आंदोलनात सामील झाले नेते व 1 ते दीड हजार आंदोलकांवर पंढरपूर पोलिसांनी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. प्रकाश आंबेडकर, आनंद चंदनशिवे, अरुण बुरघाटे, रेखा ठाकूर, अशोक सोनोणे यांच्यासह आंदोलकांवर हा गुन्हा झाला आहे
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन, साथीचे रोग प्रतिबंध अधिनियम आणि संचारबंदी उल्लंघन केल्याप्रकरणी पंढरपूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
#Breaking JEE आणि NEET परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लोकलमध्ये प्रवासाची परवानगी, परीक्षेचं अॅडमिट कार्ड पाहून स्टेशनमध्ये प्रवेश मिळणार, गृहमंत्रालयाच्या परवानगीनंतर मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून परिपत्रक जारी, सुरक्षेचे सर्व नियम पाळून या विद्यार्थ्यांना प्रवास करण्याची मुभा
पवार कुटुंबाने आज वर्षा निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत या वेळी उपस्थित होते.
पवार कुटुंबाने आज वर्षा निवासस्थानी गणपतीचे दर्शन घेतले. शरद पवार, प्रतिभा पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत या वेळी उपस्थित होते.
नाशिक महापालिकेचे माजी आयुक्त राधाकृष्ण गमे यांची नाशिक विभागीय आयुक्तपदी नियुक्ती, सामान्य प्रशासन विभागाने काढले आदेश, विभागीय आयुक्त राजाराम माने सेवानिवृत्त झाल्याने रिक्त होते पद
जायकवाडी धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यावर जाऊन पोहोचलेला आहे. सध्या वरच्या धरणातून येणारी आवक ही 18 हजार क्‍युसेक एवढी आहे. इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्ष धरण भरेल अशी स्थिती आहे. आज जायकवाडी धरणाचे जलपूजन करण्यात आलं. यावेळी मंत्री संदीपन घुमरे , जिल्हाधिकारी सुनील चव्हाण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे हे सपत्नीक उपस्थित होते...
लातूर - डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जिवंत समाधी घेणार नाहीत,

वारसदार आणि अन्य सर्व बाबी ट्रस्ट च्या घटनेनुसारच होतील,

महाराजांनी नांदेड आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना इन कॅमेरा दिली सविस्तर माहिती,

सूत्रांची माझाला माहिती
उद्यापासून गोव्याच्या सीमा सगळ्यांसाठी खुल्या,कोणत्याही निर्बंधाशिवाय गोव्यात करता येणार प्रवेश,बार आणि रेस्टोरेन्ट देखील उद्यापासून होणार सुरु,अनलॉक 4.0 च्या मार्गदर्शक तत्वांची गोव्यात होणार अंमलबजावणी, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर हे जिवंत समाधी घेणार नाहीत. वारसदार आणि अन्य सर्व बाबी ट्रस्टच्या घटनेनुसारच होतील. महाराजांनी नांदेड आणि लातूर जिल्हाधिकाऱ्यांना इन-कॅमेरा सविस्तर माहिती दिली.
राज्यातील अनलॉक ४ च्या गाईडलाईन्स आज जाहीर होण्याची शक्यता, केंद्राच्या सुचनेनंतर राज्यात ई पास रद्द करण्याबाबत निर्णय राज्य सरकारच्या विचाराधीन, प्रशासनाने ई पास रद्द करण्याबाबत दाखवली तयारी, आज याबाबत गाईडलाईन्स निघण्याची शक्यता, राज्य सरकारी कार्यालयात उपस्थिती वाढवण्याची शक्यता , सध्या 15% हुन 30% उपस्थिती वाढवण्याचा विचार, आज याबाबतही आदेश जारी होण्याची शक्यता , रेस्टॉरंट टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची शक्यता, मेट्रो रेल्वे, जिम, मंदिर आताच सुरू करण्याबाबत सरकारचा विचार नाही
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती पदाधिकारी निवड प्रक्रिया पार पडली,

अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे बीडचे अशोक डक यांची तर उपाध्यक्षपदी काँग्रेसचे पुण्याचे धनंजय वाडकर यांची निवड,

हे दोघेही अनुक्रमे औरंगाबाद आणि पुणे महसूल विभागातून संचालक म्हणून निवडून आले
प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचले, आंबेडकर यांच्यासह मोजक्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता
प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिराच्या पायरीपर्यंत पोहोचले, आंबेडकर यांच्यासह मोजक्या लोकांना मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता
जिल्हाधिकाऱ्यांची वाट पाहत आहोत. मंदिर प्रवेशावर ठाम आहोत : प्रकाश आंबेडकर
मंदिर प्रवेशाबाबत अंतिम निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने आखलेले कोणत्याही नियमांचं उल्लंघन होऊ नये याची काळजी घेण्याची सूचना दिली आहे, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
रत्नागिरी : जिल्ह्यात सध्या मासेमारीवर परिणाम झाल्याचं दिसून येत आहे. वातावरण बदल आणि खलाशांची कमी यामुळे सध्या मच्छिमारांना संकटाचा सामना करावा लागत आहे. अद्याप देखील 50 टक्क्यांपेक्षा देखील जास्त बोटी या किनाऱ्यावर उभ्या असल्याचं चित्र आहे. शिवाय,समुद्रात मच्छिमारीकरता गेलेल्या मच्छिमारांना खूपच कमी प्रमाणात मासे मिळत असल्यानं माशांच्या दरावर देखील सध्या परिणाम झाला आहे. त्यामुळे खवय्यांना देखील मासे मिळण्याकरता समस्या निर्माण होत असल्याचं चित्र आहे.
कारवाई करा, नियम मोडण्यासाठीच आलो आहोत. लोक एकत्र जमली तरी प्रादुर्भाव वाढत नाही हे दाखवण्यासाठी आलोय. मंदिरं खुली करणं ही लोकांची भावना आहे, लोकांच्या भावना बघून सरकारने मंदिरं खुली करावीत : प्रकाश आंबेडकर
प्रकाश आंबेडकर विठ्ठल मंदिराकडे रवाना, मंदिर खुलं करण्यासाठी पंढरपुरात वंचितचं आंदोलन
सोलापूर ते पंढरपूर या मार्गावर पोलिसांची दोन ते तीन ठिकाणी बंदोबस्त, प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल, पंढरपूरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
महाडच्या इमारत दुर्घटनेत बीडच्या उखंडा गावातील तरुण किशोर लोखंडे याने तब्बल 26 तास जेसीबी चालवण्याचे काम केलं होतं. ज्यामुळे दोन जीव देखील वाचले. किशोरच्या या धाडसी कामाचं कौतुक अख्ख्या महाराष्ट्रानं केलं होतं. तो तरुण आज गावी आला, त्यामुळं गावकऱ्यांनी त्याचा सत्कार करून स्वागत केलं आहे. किशोरच्या धाडसी कामगिरीमुळे त्याला शौर्य पुरस्कार देऊन एनडीआरएफमध्ये नौकरी द्यावी. अशी मागणी गावकऱ्यांनी केली असून ग्रामपंचायतने तसा ठराव पास करून याचा प्रस्ताव सरकारकडे पाठविणार असल्याची माहिती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश कवठेकर यांनी दिली.
प्रकाश आंबेडकर 11 वाजेपर्यंत आंदोलनाच्या ठिकाणी पोचणार असून प्रशासन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. आंबेडकर यांना नामदेव पायरीपर्यंत भजन आंदोलनासाठी सोडण्याचा निर्णय होण्याची शक्यता आहे.
पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. बोईसर ,पालघर,डहाणू,वाडा भागात ही संख्या मोठी झाली आहे. ह्या साठी सध्या वेगवेगळ्या विभागतिल प्रतिबंधित क्षेत्रासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आज लॉक डाऊन असताना ही पालघर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी जवळपास 200 शिक्षकांना या बाबतची माहिती देण्यासाठी बोईसर टिमा सभागृह येथे एकत्र बोलविल्याची माहिती शिक्षकांनीच दिली असून या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम शासनच पायदळी तुडवीत असल्याचे चित्र आहे,, शिक्षकांनी मोठी गर्दी केली आहे.
पालघर : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना संक्रमण वेगाने वाढत आहे. बोईसर ,पालघर,डहाणू,वाडा भागात ही संख्या मोठी झाली आहे. ह्या साठी सध्या वेगवेगळ्या विभागतिल प्रतिबंधित क्षेत्रासाठी शिक्षकांची नेमणूक करण्यात येत आहे. त्यामुळे आज लॉक डाऊन असताना ही पालघर पंचायत समितीच्या गट विकास अधिकाऱ्यांनी जवळपास 200 शिक्षकांना या बाबतची माहिती देण्यासाठी बोईसर टिमा सभागृह येथे एकत्र बोलविल्याची माहिती शिक्षकांनीच दिली असून या ठिकाणी कोरोनाचे सर्व नियम शासनच पायदळी तुडवीत असल्याचे चित्र आहे,, शिक्षकांनी मोठी गर्दी केली आहे.
भारत आणि चीन सीमेवर पुन्हा एकदा संघर्ष, लडाखमधील पँगाँग लेकजवळ दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये झटापट,
चिनी सैन्याकडून घुसखोरीचा प्रयत्न, भारताकडून चोख प्रत्युत्तर
प्रकाश आंबेडकर पंढरपुरात दाखल, पंढरपूरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त,आंदोलन स्थळी केवळ 400 ते 500 कार्यकर्ते पोहोचू शकले
पंढरपुरात पोलिसांनी आंदोलकांना रोखलं, शिवाजी चौकात वारकरी, वंचितचे कार्यकर्ते जमले, मोजके वारकरी आणि प्रकाश आंबेडकरांना मंदिरात प्रवेश मिळण्याची शक्यता
सोलापूर -

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडलं,

पंढरपुरात प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे आंदोलन,

तत्पुर्वी सोलापुरातील विठ्ठल मंदिर कार्यकर्त्यांनी उघडलं
पिंपरी चिंचवडमध्ये भरधाव वेगाने धावणाऱ्या टँकरने पादचाऱ्यांना धडक दिली. यात चौघे जखमी झालेत. सांगवी परिसरात ही घटना रविवारच्या रात्री घडली. डिझेलचे हे टँकर असून चालकाच्या अतिताईपणामुळं हा अपघात घडल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात. अपघातानंतर चालक फरार झाला आहे. सांगवी पोलिसांत याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून चालकाचा शोध सुरू आहे.
पंढरपूर - प्रकाश आंबेडकर 11 वाजेपर्यंत पंढरपूर मध्ये पोहोचणार, पोलिसांच्या नाकेबंदीमुळे मोजके वारकरी व वंचित कार्यकर्ते पोहोचू शकले, प्रकाश आंबेडकर यांनी ज्या दोन मागण्या केल्या होत्या त्यात पहिली मोजक्या वारकाऱ्यांसह नामदेव पायरी जवळ भजन करण्यास परवानगी द्यावी किंवा मोजक्या आंदोलकांसह विठ्ठल मंदिरात दर्शनाची परवानगी द्यावी, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आंबेडकर यांना मंदिरात सोडले जाऊ शकते
जायकवाडी धरणातील पाणीसाठा 90 टक्क्यांवर जाऊन पोहोचलेला आहे. सध्या जायकवाडी धरणामध्ये 97 टक्के पाणी साठा झाला तर पाणी सोडता येईल. त्याबरोबरच जर वरच्या धरणातून येणारी आवक एकदम वाढली तरच केव्हाही पाणी सोडलं जाऊ शकतं. सध्या वरच्या धरणातून येणारी आवक ही 18 हजार क्‍युसेक एवढी आहे. असं असलं तरी इतिहासात पहिल्यांदाच सलग दोन वर्ष धरण भरणार हे मात्र निश्चित आहे. गतवर्षी 93 टक्के पाणी साठा झाल्यानंतर धरणाचे सहा दरवाजे उघडण्यात आले होते..
सोलापूर - वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते सोलापुरातील विठ्ठल मंदिर उघडत आहेत
सांगली जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी मुंबईतील आरोग्य यंत्रणेची मदत घेतली जाणार आहे. मुंबईतील कोरोना आटोक्यात आल्याने पालकमंत्री जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि मुंबई मनपा आयुक्तकडे तेथील डॉक्टराच्या टीम, यंत्रणा सांगलीला मिळण्याबाबत केली विनंती आहे. रात्री झूम मिटिंगमध्ये पत्रकाराशी संवाद साधताना जयंत पाटील यांनी माहिती दिली. जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढली आणि मृत्यूदर राज्याच्या सरासरी पेक्षा जास्त गेला असल्यामुळे मदत घेतली जाणार आहे.
पुणे- पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील ११ वीच्या आॅनलाईन प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे.

पुणे-पिंपरी चिंचवड क्षेत्रात११ वीच्या आॅनलाईन प्रवेशासाठी ७३,६८५ अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी ६८,०७२ अर्ज पात्र ठरले. पहिल्या गुणवत्ता यादीत ४०,०१३ विद्यार्थ्यांना काॅलेजचं अलाॅटमेंट झालं आहे. १९,५७५ विद्यार्थ्यांना प्रथम पसंतीचं काॅलेज मिळालं आहे.
पूर्व विदर्भात अतिवृष्टीमुळे 148 गाव पुराच्या तडाख्यात. 83 रिलीफ कॅम्प कार्यान्वित.
- नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरुच
- गंगापूर धरण पाणलोट क्षेत्रातही दमदार पाऊस
- गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवणार
- संध्याकाळी 7 वाजता गोदावरी नदीत 2080 क्युसेक्सने होणार विसर्ग
- प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा ईशारा
देशात गेल्या 24 तासात 64 हजार 935 नागरिक कोरोना रोगमुक्त, रुग्ण बरे होण्याचा दर, 76.61 टक्क्यांवर, भारतात आत्तापर्यंत 27 लाख लोकं कोरोनोमुक्त
अकरावी प्रवेशाची मुंबई विभागाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 1,17,520 विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले असून यामध्ये 40, 476 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहे.
यामध्ये पहिल्या पसंतीचे महाविद्यालय -
आर्टससाठी - 5957 विद्यार्थ्यांना, कॉमर्ससाठी -18,109 विद्यार्थ्यांना, सायन्ससाठी - 15,626 विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय पहिल्या गुणवत्ता यादीत मिळाले आहे.

पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश घेणे बंधनकारक असून हा प्रवेश 3 सप्टेंबर 5 वाजेपर्यत घ्यायचा आहे.

दहावीचा निकालाची टक्केवारीतील झालेली वाढ बघता यावर्षी मुंबईतील नामवंत कॉलेजचे कट ऑफ सुद्धा नव्वदीपार.
भंडारा गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेशमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली असल्याने भंडारा गोंदिया जिल्ह्यातील नदी काठावरील गावात पाणी शिरलं आहे. तर या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचा सुद्धा नुकसान झाला आहे. भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाने कहर केला आहे, आता जरी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्यातील वैनगंगा, बावनथडी नदीला पूर आला असून गोसेखुर्द धरण, बावनथडी धरण यातील दरवाजे उघडण्यात आली आहे. तरी पाऊस इतका होता कि, नदी काठावरील गावात पाणी शिरलं आहे, तर काही गावात लहान मुलं गावात नाव ( बोट ) चालवताना दिसत आहेत, या पावसामुळे सगळ्यात जास्त फटका हा शेतकऱ्यांना बसला आहे., नदी काठावरील शेती मध्ये पाणीच पाणी दिसत असून शेतीला तलावाचं स्वरूप आल्याचे चित्र सध्यातरी दिसत आहे, त्यामुळे शासनाने लवकर पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत,
चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील लाडज गावाला पुराच्या पाण्याचा विळखा. एनडीआरएफची टीम लाडजसाठी नागपूर वरून रवाना, बेलगांव येथून बोटींच्या मदतीने लोकांना पुराबाहेर काढण्याचे काम सुरू
पुराच्या विळख्यात असलेल्या लाडज गावातून लोकांना एअर लिफ्ट करण्यावर विचार सुरू, चंद्रपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हवाई दलाकडे मागितली मदत, नागपूर येथील ग्रुप कॅप्टन कांचन कुमार यांच्या सोबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी संपर्क झाल्याची दिली माहिती
सोलापूर -

पंढरपूरकडे येणारी एसटी वाहतूक थांबवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश,

सोलापूर जिल्ह्यातील सर्व आगारातून एसटी वाहतूक पंढरपूर कडे रद्द करण्याची निर्देश,

30 ऑगस्टच्या दुपारी 12 पासून उद्या रात्री 12 पर्यंतची वाहतूक थांबनवण्यासाठी आदेश,

विश्व वारकरी सेना आणि वंचिततर्फे होणाऱ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय
पालघर जिल्ह्यात सध्या पावसाचा जोर कायम असून किनारी भागांत वादळी वाऱ्यांसह समुद्राच्या उधाणांना चांगलाच जोर पाहायला मिळतोय. डहाणू तालुक्यातील वाढवण समुद्र किनारी असलेल्या सरूच्या झाडांच्या बागेला ह्याचा चांगलाच फटका बसलेला पाहायला मिळतोय. मोठया उधाणांमुळे आणि वादळी वाऱ्यामुळे येथील 40 ते 50 वर्षांपूर्वीची मोठं-मोठी सरूची झाडे पडली असून, काही झाडे मोठया उधाणांमुळे समुद्रात वाहून गेली असल्याची माहिती स्थनिकांनी दिली.
नागपूर : सिगारदीपवर अडकलेले 25 पैकी 2 व्यक्ती सुरक्षित बाहेर, आमदार आशिष जैस्वाल स्वतः रेस्क्यू मध्ये, मंत्री नितीन राऊतही पोहचले आहेत, तातडीचे पंचनाम्याचे आदेश
भंडारा-गोंदिया जिल्ह्यासह मध्यप्रदेश राज्यात सुरु असलेल्या सतत पावसामुळे वैनगंगा नदीला पूर आला असून हे पुराचे पाणी भंडारा शहरात ही घुसले आहे. भंडारा शहरातील भंडारा ST बस स्थानकात दीड फुट पुराचे पाणी तर ST वर्कशॉपमध्ये पुराचे 1 फुट पुराचे पाणी घुसल्याने ST बस काही अंशी बुडाल्याचं चित्र आहे. त्यामुळे ST ची चाके थांबली आहे. आधीच कोरोना मुळे बंद असलेली ST काही दिवसापूर्वीच जिल्ह्यात सुरु झाली असतांना आता पुराचे पाणी घुसल्याने परत ST ची वाहतूक थांबल्याचे चित्र दिसत आहे
बेळगाव - पोटच्या तीन कोवळ्या मुलांना विष पाजून पित्यानेही आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना कडबरट्टी गावातील डोंगराळ भागात घडली आहे.
मारुती पुजारी हा दवाखान्याला जावून येतो म्हणून तीन लहान मुलांना घेऊन घराबाहेर पडला होता.बराच उशीर झाला तरी रात्री पर्यंत तो घरी परतला नाही.त्यामुळे त्याच्या कुटुंबीयांनी सगळीकडे माणसे पाठवून शोधाशोध सुरू केली.डोंगरावर बकरी चारण्यास नेलेल्या गुराख्यान डोंगरावर चार मृतदेह पडलेले आढळले.त्याची माहिती त्यांनी गावात दिली.ग्रामस्थांनी तेथे जावून पाहिले असता मृतदेह मारुती आणि त्याच्या सहा,चार आणि दोन वर्षांच्या मुलांचे असल्याचे समजले.मृतदेहा शेजारी कीटकनाशकाची बाटली पडलेली होती.मुलांचा विष पाजवून खून करून पित्याने आत्महत्या कशासाठी केली याचे कारण समजू शकले नाही.गोकाक ग्रामीण पोलिसात या प्रकरणाची नोंद झाली आहे.
गडचिरोली: जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील नद्या व नाले ओसंडून वाहत आहेत, अनेक मार्ग बंद झाले आहे. आष्टी-चंद्रपूर- गडचिरोली, गडचिरोली- आरमोरी मार्ग, गडचिरोली -चामोर्शी, आरमोरी-रामाळा, देसाईगंज-लाखांदूर हे मार्ग बंद झाले आहेत. तर नदीकाठी असलेल्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाले आहे सोबतच पुरामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
'कोरोनाकाळात सर्वच सण साधेपणाने साजरे केले, सणांच्या आयोजनात सावधानता बाळगली गेली'
- पंतप्रधान नरेंद्र मोदींची 'मन की बात' लाईव्ह
राज्यात काल दिवसभरात पहिल्यांदाच सर्वाधिक 16 हजार 867 कोरोना बाधितांची नोंद, गेल्या 24 तासात 328 कोरोनाबळी
गडचिरोली : जिल्ह्यात गोसेखुर्द प्रकल्पातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरुन वाहत असून, अनेक मार्ग बंद झाले आहे. आष्टी-चंद्रपूर- गडचिरोली, गडचिरोली-आरमोरी मार्ग, गडचिरोली-चामोर्शी, आरमोरी-रामाळा, देसाईगंज-लाखांदूर हे मार्ग बंद झाले आहेत. तर नदीकाठी असलेल्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने मोठं नुकसान झाले आहे. तर पुरामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
मुंबई, ठाणे, पालघर, रायगडवर पाच ते सहा किलोमीटरचे ढग; हवामान विभागाची माहिती; अतिमुसळधार पावसाचा इशारा
चंद्रपूर : वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने मोठी वाढ होत असल्याने चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी तालुक्यावर त्याचा मोठा परिणाम झाला आहे. वैनगंगा नदीत मिळणारे अनेक नाले डाब मारत असल्यामुळे अनेक गावांत पुराचे पाणी शिरले असून शेकडो हेक्टर भात शेती पाण्याखाली गेली आहे. संपूर्ण रणमोचन गाव जलमय झाले असून गावात बोटी चालवल्या जात आहेत. येथील नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झाल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी आणि मदत पोचवण्यासाठी नाव चालवल्या जात आहेत. पिंपळगाव, आवळगाव इथंलीही घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे.
भंडारा : भंडारा शहरात नागपूर नाक्यावर 3 फुट पाणी, भंडारा-नागपूर जिल्ह्याचा संपर्क तुटला, भंडारा जिल्ह्यातील गोसेखुर्द धरणाचे संपूर्ण 33 दरवाजे 4 मीटर उडण्यात आले असून 26 हजार क्युसेक्स पाण्याच्या विसर्ग सुरु आहे. त्यामुळे गोसेखुर्द धरणाचे बॅक वॉटर भंडारा शहरातील नागपूर नाका परिसरात घुसले असून भोजापूर नाल्यावरुन चार फुट पानी वाहत असल्याने भंडारा-नागपुर मार्ग बंद करण्यात आला आहे.
भाजपच्या घंटानाद आंदोलनानं घंटा फरक पडत नाही, असं म्हणत शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय. मंदिरं खुली करण्यासाठी आज भाजपच्या वतीनं राज्यभरात घंटा नाद आंदोलन करण्यात आलं. मात्र, मंदिरं खुली करनं ही आमचीही भावना आहे. मात्र, प्रथम प्राधान्य हे आरोग्याला द्यावं लागेल. भाजपला मंदिरांशी काही देणंघेणं नसून हे फक्त सरकारच्या द्वेषभावनेतून होतंय. भाजपला फक्त राज्यातलं वातावरन खराब करायचंय आहे. अशा घंटानाद आंदोलनानं घंटा फरक पडत नाही, अशी घणाघाती टीका खोतकर यांनी भाजपवर केलीय.
संदीप सिंह यांनी नरेंद्र मोदी यांच्यावरील 27 भाषेत बायोपिक केला होता. संदीप सिंग याचे भारतीय जनता पार्टी संदर्भात काय संबंध आहेत. संदीप सिंह यांचे संबंध बॉलिवूड आणि ड्रग इंडस्ट्रीशी काय आहेत? याची चौकशी करण्याची अनेक निवेदन आम्हाला मिळाली आहेत. ती निवेदने आम्ही सीबीआयकडे पुढील चौकशीसाठी पाठवत आहोत : गृहमंत्री अनिल देशमुख
मुंबई -

मुंबईतील लेकलसेवा सुरू करा अन्यथा डबेवाल्यांना महीना किमान 3 हजार रूपये अनुदान द्या, मुंबई डबेवाला असोशिएशनची मागणी,

कोराना मुळे १९ मार्च पासुन मुंबईत डबे पोहचवण्याचा व्यवसाय झालाय बंद ,

साडेपाच महीने डबेवाल्यांना रोजगार नसल्यामुळे डबेवाल्यांची आर्थिक स्थिती खालावली,

चाकरमानी करत आहेत डब्यांची मागणी ,
लोकल सेवा सुरु नसल्यामुळे डबे पोहोचवण्यात होताहेत अडथळे
शिवसेना आमदार प्रकाश सुर्वे यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह, मुंबईच्या वॉकहार्ट रुग्णालयात अतिदक्षता विभागात सुर्वे दाखल, प्रकाश सुर्वे हे मागाठणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार
राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांचे दोन उत्तराधिकारी जाहीर झाले आहेत. त्यात अहमदपूरच्या मठासाठी एक आणि हाडोळती येथील मठासाठी एका उत्तराधिकारी जाहीर करण्यात आला आहे. राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या संजीवन समाधीच्या चर्चेने काल दिवसभर वातावरण गोंधळाचं होतं. याच कालावधीत त्याच्या मठाचे दोन उत्तराधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. महाराजांचे वय 104 वर्ष आहे. यातच त्यांनी अन्नत्याग केल्याने उत्तराधिकारी कोण होणार याची चर्चा जोर धरु लागली होती. अहमदपूर येथील मठ, हडोलती मठ शहरालगत असलेला भक्तिस्थळ जे 14 एकर परिसरात आहे, अशी संपूर्ण प्रापर्टी आहे. यावर उत्तराधिकारी रुपात हाडोलती मठाचे उत्तराधिकारी राजकुमार स्वामी आणि अहमदपूर मठासाठी राजेश्वर स्वामी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशक्तपणा असल्यामुळे राष्ट्रसंत डॉ शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्यावर नांदेड इथे उपचार सुरु आहेत.
आज दुपारी दीड वाजता 13 विद्यापीठाच्या कुलगुरूं सोबत बैठक ,

आजच तज्ञांशी चर्चा करणार, उदय सामंत यांची माहिती ,

कोविडच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे आरोग्य जपण्याचा महाराष्ट्र सरकारचा निर्धार,

विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही मानसिक दडपण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करू, उदय सामंत यांची माहिती
मुंबई- बेळगाव जिल्ह्यातील पिरणवाडी गावातील मराठी भाषकांवर कर्नाटक पोलिसांकडून झालेला अन्यायकारक हल्ला प्रकरण,

सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध ,

मंत्री शिंदे यांचे कर्नाटकचे मुख्यमंत्री बी.एस. येडीयुरप्पा यांस खरमरीत पत्र ,

वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज संपूर्ण देशाचे दैवत ,

मराठी भाषक विरुद्ध कन्नड भाषक वाद निर्माण होऊ देऊ नका ,

यापूर्वीच मनगुत्ती घटनेवरून महाराष्ट्रातील शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत ,

पिरणवाडी - मनगुत्ती सारख्या घटना घडवून आणणाऱ्या कन्नड संघटनावर योग्य कार्यवाही करा,

सीमा भाग समन्वयक मंत्री एकनाथ शिंदे यांची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडे मागणी,
मुंबईसह उपनगरांमध्ये सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी सखल भागात साचलं पाणी
हॉलिवूड स्टार चॅडविक बॉसमॅनचं शुक्रवारी निधन झालं. मार्वल स्टूडिओच्या ‘ब्लॅक पँथर’ मध्ये मुख्य भूमिका निभावणाऱ्या चॅडविकचं 43 व्या वर्षी निधन झालं. मागील चार वर्षांपासून तो कँन्सरशी झूंज देत होता.
सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलावली तातडीची बैठक. वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक सुरू आहे. बैठकीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, राज्याचे मुख्य सचिव आणि सल्लागार उपस्थित. परीक्षेची तारीख बदलू शकते. मात्र, परीक्षा रद्द होणार नाही, असा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे.
मुंबईत रविवारी मोहरम मिरवणुकीसाठी हायकोर्टाची सशर्त परवानगी. भेंडी बाजार ते माझगाव कबरीस्तानपर्यंत ट्रकमधून निघणार मिरवणूक. शेवटचे 100 मीटर केवळ पाच भाविकांना ताझिया घेऊन पायी जाण्याची परवानगी.
आरे मधील मेट्रो कारशेड गोरेगाव पहाडी भागात हलवण्याबाबत चर्चा आहे. मेट्रो प्रकल्पाबाबत आज मुख्यमंत्री, मंत्री एकनाथ शिंदे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि मेट्रोच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत मेट्रो प्रकल्पाबाबत चर्चा झाली. आरे येथील मेट्रो कार शेडला आदित्य ठाकरे यांचा विरोध होता. तेथील झाडे तोडल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी कठोर शब्दात टीका केली होती. महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर आरे इथून मेट्रो कारशेड हलवण्याबाबत हालचालींना सुरुवात.
राज्यातील जिम सुरु करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. जिमच्या माध्यमातून कोरोनाचा प्रसार होऊ नये याकरिता मार्गदर्शक तत्वे जिम मालकांनी शासनास सादर करावीत. त्याआधारे जिम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
तब्बल दहा तासाच्या चौकशीनंतर अखेर रिया आणि तिचा भाऊ शोबीक घरी परतले आहेत. मात्र, घरी परतताना हे दोघे इमारती खाली गेले. नंतर पुन्हा सांताक्रूज पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे काही तक्रार करून अखेर ते दोघे घरी गेले.
मुंबई पोर्ट ट्रस्टचे सेवानिवृत्त अध्यक्ष संजय भाटीया यांनी आज राज्याच्या उपलोकायुक्त पदाची शपथ घेतली. राजभवन येथे झालेल्या एका छोटेखानी शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भाटीया यांना पदाची शपथ दिली. राज्यपालांचे प्रधान सचिव संतोष कुमार यांनी भाटीया यांच्या नियुक्तीची अधिसूचना वाचली.
सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयासमोर संभाजी ब्रिगेडची जोरदार निदर्शनं. सहाय्यक कामगार आयुक्त यांची गाडी अडवून रस्त्यावरच बोंब ठोकत मारला ठिय्या. संतप्त कामगारांनी रस्त्यावरच ठिय्या मारत केलं स्वतः मुंडन. लॉकडाऊन मधील कामगारांच्या थकीत वेतनासाठी संभाजी ब्रिगेड आक्रमक. येत्या आठ दिवसात प्रश्न निकाली काढा अन्यथा काळे फासणार, संभाजी ब्रिगेडचा इशारा.
राज्य सरकार मधील मंत्री स्वतःच्या तिजोऱ्या भरत असल्याचा आरोप माझी खासदार राजू शेट्टी यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मातोश्री बाहेर पडत नसून ते दूध प्रश्नाला घेऊन गंभीर नसल्याचा आरोपही राजू शेट्टी यांनी केला आहे. राजू शेट्टींनी आज दूध दरवाढीचा मुद्दा घेऊन भूम शहरातील उप विभागीय कार्यालयावर मोर्चा काढला होता. या वेळी शेतकरी ही मोठ्या प्रमाणात सामील झाले होते.
पुणे जिल्हयातील बारामती तालुक्यात नवे पोलीस उपमुख्यालय असणार आहे. आज सरकारने तसा निर्णय घेतला. बारामतीतल्या राजकीय, शैक्षणिक, औद्योगिक व इतर कारणामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक असणारा मोठ्या प्रमाणावरील बंदोबस्त इतर ठिकाणाहून मागवावा लागतो. पुणे जिल्हयातील दक्षिणेकडील हद्दीपर्यंत बंदोबस्त द्यावा लागल्यास बंदोबस्त पोहचेपर्यंत विलंब लागतो. याचदरम्यान काही अघटीत घडल्यास उपलब्ध मनुष्यबळावर त्याचा विपरित परिणाम होतो. याकरिता ब-हाणपूर ता. बारामती येथे उपमुख्यालय निर्माण झाल्यास कायदा व सुव्यवस्था टिकविण्याकरिता मनुष्यबळ त्वरीत उपलब्ध होवून परिस्थिती सुयोग्यरित्या हाताळता येईल व बंदोबस्त पोहचण्याकरिता लागणारा अनावश्यक वेळ वाचेल, यादृष्टीने मौजे ब-हाणपुर ता. बारामती जिल्हा पुणे येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव संदर्भ क्र.1 येथील पत्रानुसार पोलीस महासंचालक कार्यालयाने सादर केला आहे. यानुसार मौजे ब-हाणपुर, तालुका बारामती, जिल्हा-पुणे येथे पोलीस उपमुख्यालय स्थापन करणेबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्याअनुषंगाने खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे
सार्वजनिक गणेश मंडळासमोर पत्ते खेळतांना पोलिसांचा छापा, पोलिस आल्याची माहिती मिळताच जंगलात पळणाऱ्या एका 24 वर्षीय तरुणाचा विहिरीत पडून मृत्यू, पोलिसांचा छापा पडला म्हणून भाऊ वारल्याची मयत तरुणाच्या भावाची पोलिस अधीक्षकांकडे तक्रार
विरार : विरारच्या अर्नाळा समुद्र किनाऱ्यावर काल झालेल्या गौरी गणपती विसर्जनामुळे तसेच समुद्राने वाहून आणलेला कचरा याने दुर्दशा झाली होती. शासनाने घरा घरात विसर्जन करण्याचे आदेश दिले आहेत. तरीही समुद्र किनारी लोकवस्ती असलेले नागरिक समुद्र किनाऱ्यावरच विसर्जन करतात हे ध्यानी घेऊन “मी जागृत बंदर पाडेकर” या समूहाचे सदस्य रूकेश तांडेल यांनी आपल्या पत्नी आईसह आपल्या नातेवाईक यांना सोबत घेऊन विसर्जनासाठी उपयुक्त होईल एवढ्या किनारी भागाची आज स्वच्छता केली. यावेळी गावातील इतर ज्येष्ठ नागरिकांनी ही त्यांना मोलाची साथ दिली.
रोज राज्यात 15 हजार रुग्ण निघत आहेत. पॉझिटीव्ह रेशो 19 टक्के आहे. तो पाच टक्के असला पाहिजे. राज्यात डेथ रेट हा 40 टक्के आहे.
पुण्यात टेस्टिंग जास्त आहेत पण मुबईत ती स्थिती नाही,त्यामुळे समाधानकारक स्थिती नाही- देवेंद्र फडणवीस
बीड : सासऱ्यानेच सुनेच्या गळ्यावर कुऱ्हाडीने वार करून खून केल्याची घटना रात्री उशिरा अंबाजोगाई तालुक्यातील पट्टीवडगाव येथे घडली आहे.आरोपी सासऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून खुनाचे कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
शीतल अजय लव्हारे (वय २५) मयत महिलेचे नाव आहे. रात्री साडेनऊच्या सुमारास तिचा सासरा बालासाहेब संभाजी लव्हारे याने कुऱ्हाडीने तिच्यावर गळ्यावर वार केले या हल्ल्यात शीतलचा जागीच मृत्यू झाला. तर, शीतलची सासू देखील या घटनेत जखमी झालीय तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर सासरा फरार झाला होता. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. कोणत्या कारना मुळे सुनेला मारले याचा तपास पोलीस करत आहे.
बाणेर येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस,भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत कोव्हिड रुग्णालयाचे उद्घाटन
मास्क न वापरल्यास पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये एक हजार रुपये दंड करण्याचा विचार- अजित पवार. त्यासाठी आजच्या बैठकीत चर्चा
कोकणातून मुंबईला परतण्याकरता आता चाकरमानी एसटीला पसंती देत आहे. कारण रत्नागिरी जिल्ह्यातून मुंबईला जाण्याकरता 900 एसटी बुक झाल्या आहेत. 25 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान या एसटी धावणार आहेत. गणपतीपूर्वी मुंबईहून गावी येण्याकरता कमी प्रतिसाद मिळाला होता. पण आता गावाहून मुंबईला जाण्याकरता मात्र एसटीला पसंती दिली जात आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी सीबीआय रिया चक्रवर्तीची आज चौकशी करणार असून रिया चौकशीसाठी डिआरडीओ गेस्ट हाऊसवर दाखल झाली आहे.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी रिया चक्रवर्ती चौकशीसाठी रवाना झाली आहे. आज सीबीआयकडून तिची चौकशी होणार आहे.
सुशांत सिंह मृत्यू प्रकरणी अखेर रिया चक्रवर्तीची चौकशी होणार आहे. आज सीबीआयच्या पथकाकडून रियाला चौकशीसाठी बोलावण्यात आलं आहे. काल रियाचा भाऊ शोविकची 9 ते 10 तास चौकशी करण्यात आली होती.
पालघर : दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पालघर जिल्ह्यात पहाटेबपासून ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून काही ठिकाणी मुसळधार काही ठिकाणी मध्यम सरी कोसळत आहेत.
मुंबई - आग्रा महामार्गावरील धुळे जिल्ह्यातील नरडाणा जवळ तापी नदीच्या पुलावरून नदीत वाहन कोसळलय. काहींच्या मते कोसळलेलं वाहन ट्रक असण्याची शक्यता आहे. रात्री दीड वाजताची ही घटना आहे. शोध कार्य सुरु करण्यात आलं आहे. सध्या तापी नदी दुथडी भरून वाहत आहे. शिवाय पाण्याची खोली 50 फुटांपेक्षा अधिक असल्यानं शोध कार्य करतांना काही अडचणी येत आहेत.
जगभरात कोरोनाचा कहर सुरुच आहे. गेल्या 24 तासात जगात 2 लाख 63 हजार 333 नवीन कोरोना केसेस समोर आल्या आहेत तर 5 हजार 879 लोकांचा जीव कोरोनामुळं गेला आहे. जगात आता 2 कोटी 46 लाख 5 हजार 876 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात 8 लाख 34 हजार 791 लोकांचा जीव गेलाय तर 1 कोटी 70 लाख 77 हजार 97 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. जगभरात आता 66 लाख 93 हजार 988 अॅक्टिव्ह केसेस आहेत.
कोल्हापूर : कळंबा मध्यवर्ती कारागृहात आणखी 37 कैद्यांना कोरोनाची लागण, कारागृहातील कोरोना बाधित कैद्यांची संख्या 42 वर, दिवसागणिक रुग्ण संख्या वाढत असल्यानं कारागृह प्रशासनाची चिंता वाढली
रंकाळा तलावात गणेश मूर्ती विसर्जन केल्याने एकाला स्थानिकांनी चोपलं,

रंकाळ्यात गणेश मूर्ती विसर्जन करण्यास बंदी असताना केलं विसर्जन,

स्थानिक नागरिकांनी मूर्ती विसर्जन करणाऱ्याला केली मारहाण
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलन कार्यकर्त्यांना मारहाण करणारा पोलिस कर्मचारी अखेर निलंबित करण्यात आले आहे. परीक्षा शुल्क परत करण्यासाठी आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या राजीनाम्याच्या मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी धुळ्यात पालक मंत्री अब्दुल सत्तार यांचं शासकीय वाहन अडवलं होतं. यावेळी पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलनकर्त्यांना हटवून पालकमंत्र्यांचं वाहन मार्गस्थ केलं. विशेष म्हणजे हा सारा प्रकार पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या समोर घडत असतांना पालकमंत्र्यांनी गाडीतून खाली उतरून आंदोलकांचे म्हणणे काय आहे हे जाणून घ्यायची तसदी घेतली नाही. या घटनेचा सर्वच स्तरातून निषेध झाल्यानं अखेर पोलीस विभागानं धुळे शहर पोलीस स्टेशनचा कर्मचारी सी. एस. पाटील याला निलंबित केलंय .
रात्री 9 वाजेच्या सुमारास चेंबूर येथे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर अमर महल पुलाजवळ पुलावरून एक रुग्णवाहिका कोसळली. या रुग्णवाहिकेत एक मृतदेह होता. हा मृतदेह ठाण्याहून मुंबईतल्या जे जे रुग्णालयात नेण्यात येत होता. भरधाव वेगात ही रुग्णवाहिका जात असताना चालकाच नियंत्रण सुटलं आणि ही रुग्णवाहिका पुलाच्या खाली असलेल्या दुकानावर पडली. हे दुकान मजबूत असल्याने पुढील अनर्थ टळला. चालक मात्र व्यवस्थित आहे
बीड - एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलीसांना मिळाली. शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये हा ट्रक थांबवली. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. यावेळी ट्रकमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय
विद्यापीठाच्या अंतिम वर्गाच्या परीक्षा होणार की नाही याचा निर्णय आज होणार आहे. कारण यासंदर्भात दाखल याचिकांवर सुप्रीम कोर्ट आज आपला निकाल देणार आहे. आज सकाळी 10.30 वाजता तीन न्यायमूर्तींचं खंडपीठ याबाबत आपला निकाल देईल. यूजीसीच्या 6 जुलैच्या गाईडलाईन्सनुसार 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा घेण्यास सांगितलं होतं. त्याविरोधात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या गटाच्या याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाल्या होत्या.

पार्श्वभूमी

राज्यात काल कोरोनाबाधित रुग्णसंख्येचा विक्रम; ग्रामीण भागात प्रादुर्भाव वाढतोय


राज्यात काल एका दिवसात आतापर्यंतची सर्वाधिक कोरोना संक्रमित रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज दिवसभरात 19 हजार 218 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली. तर आज नवीन 13 हजार 289 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत एकूण 625773 रुग्ण बरे होऊन रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले आहेत. सध्या राज्यात एकूण 21 हजार 0978 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 72.51% झाले आहे.


राज्यात कोरोना संसर्ग आता झपाट्याने वाढताना दिसत आहे. आज राज्यात विक्रमी कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. आज 19 हजारांहून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याची नोंद झाली. परिणामी राज्यात एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 8 लाख 63 हजार 62 झाली आहे. तर आज 378 कोरोना बाधित रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. त्यामुळे कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 25 हजार 964 इतकी झाली आहे.


अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु: कुलगुरुंच्या अहवालानंतर अंतिम निर्णय


अंतिम वर्ष परीक्षेबाबत कुलगुरू समितीने दिलेल्या अहवालानंतर आणि राज्यपाल, कुलगुरू यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभाग संचालक यांचेकडून शासन परिपत्रक विद्यापीठाच्या कुलगुरूंना पाठवण्यात आले आहेत. या संदर्भात राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. परीक्षा 50 मार्कांची तर वेळ एक तासाची असणार आहे. अंतिम परीक्षा घेऊन निकाल जाहीर करणे ही प्रक्रिया 31ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करुन सगळ्या विद्यापीठांना निकाल जाहीर करावा लागणार आहे, असं उदय सामंत यांनी म्हटलं.


अंतिम वर्षाच्या परीक्षांसाठी तीन पर्यायांचा विचार सुरु आहे. ओपन बूक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस या तीन पर्यायांचा विचार करण्यात येत आहे. या तीन पर्यायांपैकी प्रत्येक विद्यापीठ एक पर्याय निवडणार आहे. प्रॅक्टिकल ऐवजी तोंडी परीक्षा होणार आहे. काल राज्यपालांशी चर्चा झाल्यानंतर आज कुलगुरूंची समिती आपला अहवाल सरकारला सादर करणार आहे. अकादमी कौन्सिलमध्ये जाऊन या अहवालाला परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर परीक्षा आयोगाकडे अहवाल मान्यतेसाठी पाठवावा लागेल.


PUBG च्या जागी येणार भारतीय FAU-G; खिलाडी अक्षय कुमारची घोषणा


तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय असलेला PUBG गेम बंद केल्याने तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी पसरल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र, यासर्वांना नाराज होण्याची गरज नाही. कारण, आता पबजी सारखाच भारतीय गेम लवकरच तरुणांच्या भेटीला येणार असल्याची माहिती बॉलिवूड अभिनेता आणि खिलाडी अक्षय कुमारने दिली आहे. अक्षयने ट्विट करत या गेमची बद्दल लिहलं आहे.


या गेमचे नाव FAU-G असे असून या गेमद्वारे होणाऱ्या कमाईचा 20% निधी हा जवानांना देण्यात येणार असल्याचे अक्षयने आपल्या ट्विटमध्ये लिहलं आहे.


अभिमानाने सांगते मी मराठा आहे, तुम्हाला काय करायचं ते करा; कंगनाचा पलटवार


राज्यातील सत्ताधारी शिवसेना आणि अभिनेत्री कंगना रनौतमधील आरोप-प्रत्यारोप सुरूच आहेत. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या वक्तव्यावर कंगनाने पलटवार केला आहे. महाराष्ट्र कुणाच्याही बापाचा नाही. महाराष्ट्र त्यांचाच आहे ज्यांना मराठीचा अभिमान आहे. अभिमानाने सांगते मी मराठा आहे, माझं तुम्ही काय करणार? असं उत्तर कंगनाने ट्विटरवरुन दिलं आहे.


सिनेसृष्टीच्या शंभर वर्षात मराठा अभिमानावर एकही चित्रपट बनलेला नाही. मुस्लीमांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीमध्ये मी माझे जीवन आणि सिनेकारकीर्द पणाला लावली आहे. शिवाजी महाराज आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यावर चित्रपट बनवला. आज महाराष्ट्राच्या या कंत्राटदारांना विचारा, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय आहे? असं ट्वीट कंगनाने केलं आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.