LIVE UPDATES | राधानगरी धरणाचा पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा उघडला

डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला सात वर्षे पूर्ण, सीबीआयच्या तपासावर कुटुंबियांची नाराजी दिलासादायक! कोरोना रुग्ण बरे होण्यात ठाणे शहर देशात दुसऱ्या, तर राज्यात पहिल्या क्रमांकावर सरकारी नोकरींसाठी आता देशभरात एकच सामायिक परीक्षा होणार! मोदी सरकारचा निर्णय कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडी या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 20 Aug 2020 09:56 PM
गृहमंत्री अनिल देशमुखांना केस संदर्भात ब्रिफिंग केलं आहे, पुढील तपासाबाबत माहिती दिली आहे : मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांची एबीपी माझाला माहिती.
राधानगरी धरणाचा पुन्हा एक स्वयंचलित दरवाजा उघडला. सहा नंबरच्या दरवाजातून भोगावती नदीत पाण्याचा विसर्ग. राधानगरी धरणातून एकूण 2828 क्यूसेक पाण्याचा विसर्ग
कोल्हापुरात संभाजी बिडी बंडल विक्रीला संभाजी ब्रिगेडचा विरोध. पुण्याहून माल घेऊन आलेली गाडी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी अडवली. कार्यकर्त्यांच्या आक्षेपानंतर विकलेला माल परत घेतला.
राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात मंत्री आता जनता दरबार घेणार, 31 ऑगस्टपासून मंत्री जनता दरबाराला सुरुवात, पक्षाने ठरवले वेळापत्रक, सोमवारी जितेंद्र आव्हाड आणि नवाब मलिक, मंगळवारी छगन भुजबळ, राजेंद्र शिंगणे, बाळासाहेब पाटील, बुधवारी अजित पवार,राजेश टोपे,दत्तात्रेय भरणे आणि प्राजक्त तनपुरे, गुरुवारी हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे,दिलीप वळसे पाटील, शुक्रवारी अनिल देशमुख, अदिती तटकरे, संजय बनसोडे
नाहीतर मुंबईतील गुन्हेगारांना आता लंडनमध्ये पळून जाण्याची आवश्यकता राहणार नाही, सुशांत सिंह प्रकरणावरून दोन राज्यातील पोलिसांतले संबंध अधिक ताणू नयेत - ज्येष्ठ कायदेतज्ञ ॲड. उज्जवल निकम. सुशांत सिंह प्रकरणात आता मुंबई पोलिसांच्या हाती काहीच नाही, रिमांड, आरोपपत्र, खटला सारं काही पाटना, बिहारमध्ये. मात्र, हा निकाल इतर प्रकरणांत उदाहरण म्हणून लागू राहणार नाही, हे सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलेलं असल्यानं पुन्हा असा पेच प्रसंग उद्भवण्याची शक्यता कमी - ॲड. उज्ज्वल निकम.
मागच्या दोन दिवसांपासून बीड जिल्ह्यातील पाच शहरांमध्ये अँटीजण टेस्ट करून घेतल्या जात आहेत. परळी शहरांमध्ये बसस्थानकामध्ये आज पावसामध्ये भिजत लोकांनी रांगा लावून अँटीजण टेस्ट करून घेतल्या. विशेष म्हणजे आजपासून काही बसेस सुरु झाल्यामुळे प्रवासी बसस्थानकामध्ये येत होते. तर रांगेत असलेल्या प्रवाशांनी कुणी छत्रीखाली तर पावसातच रांगेत उभे होते.
मंत्री नितीन राऊत यांना उत्तरप्रदेशच्या आझमगड सीमेवर
यूपी सरकारने थांबवलंय , तिथल्या एका दलित सरपंचाची हत्या झाली म्हणून त्याच्या कुटुंबीयांना भेटायला गेले होते राऊत
सुशांत प्रकरणी महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात पुन्हा रिव्हिव्ह याचिका दाखल करणार नाही. मुंबई पोलीस सीबीआयला सहकार्य करणार असल्याची माहिती आहे.
बीड जिल्ह्यामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी तीन पट पाऊस पडला आहे त्यामुळे जिल्ह्यातील लहान मोठ्या प्रकल्पात मोठ्या प्रमाणात पाणी पाहायला मिळत आहे मात्र लातूर उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्यातील मोठ्या शहरांची तहान ज्या मांजरा धरणावर अवलंबून आहे ते मांजरा धरण मात्र अद्याप मृतसाठ्यातच आहे. गत चार वर्षात यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यात मान्सूनचे वेळेवर आगमन झाले. जोरदार पावसामुळे जिल्ह्यातील लघु,मध्यम व मोठ्या अशा एकुण 144 पैकी 37 प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश नद्याही दुथडी भरुन वाहू लागल्या आहेत. वार्षिक सरासरीच्या तुलनेत जिल्ह्यात 67.51 टक्के पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे माजलगावच्या मोठ्या प्रकल्पातील पाणीसाठाही वाढला आहे.
बीड: निमोनिया झालेल्या रुग्णाचा मृत्यू,

संतप्त नातेवाईकांनी केली रुग्णालयाची तोडफोड,

डायलसीसीस मशीनही फोडल्या,

तोडफोडीचे दृश्य सीसीटीव्हीत कैद ,

डॉ . मनोज मुंडे रुग्णालयातील प्रकार,

रुग्ण निमोनिया कोरोना सदृश्य असल्याची माहिती,

नातेवाईकांनी तोडफोड करून मृतदेह पळवून नेला,

मृतदेहावर केले परस्पर अंत्यसंस्कार
बुलढाणा : खामगाव पंचायत समितीसह जिल्हा परिषद बांधकाम विभाग खामगाव दोन्ही कार्यालय सोमवारपर्यंत बंद करण्यात आले आहे. जिल्हा परिषद बांधकाम मध्ये क्लार्क महिला करोना पोसिटीव्ही निघाल्याने सोमवार पासून कार्यालय बंद करन्यता आले आहे. अधिकारी यांचेसह 8 कर्मचारी आयसोलेशन मध्ये ठेवण्यात आले. खामगाव पंचायत समिती सभापती गाडीचा ड्रायव्हर पोसिटीव्ह निघाल्याने सोमवार पर्यंत पंचायत समिती आणि ड्रायव्हरच्या संपर्कातील सर्व कर्मचारी विलागिकरण करण्यात आले, जिल्हा परिषद बांधकाम कार्यालय 8 दिवस तर खामगाव पंचायत समिती कार्यलय 4 दिवस बंद आहेत.138 गावाचा कारभार असलेल्या दोन मोठे कार्यालय बंदची जिल्ह्यातील पहिली घटना आहे.
कोल्हापूर - राधानगरी धरणाचे स्वयंचलित सर्व दरवाजे झाले बंद,

सुरू असलेले दोन दरवाजे रात्री उशिरा बंद झाले,

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी,

पंचगंगा नदीची पाणी पातळी देखील कमी होण्यास सुरुवात,

सध्या पंचगंगेची पाणी पातळी 41 फूट इतकी
धुळे : जिल्ह्यातील सोनगीर येथील ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ कल्पेश वाघ (वय ४० वर्ष ) यांचे आज कोरोनाने नाशिक येथे निधन झाले. तीन दिवसांपूर्वीच त्यांचे कोरोनाचे निदान झाले होते, नंतर धुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे उपचार सुरू होते माञ काल त्यांची तब्येत अधिक खालावल्याने त्यांना नाशिक येथे हलवण्यात आलं होतं. काल (मंगळवारी) धुळ्यातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ.चुडामण पाटील यांचा कोरोना मुळे पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असतांना मृत्यू झाला .दोन दिवसांत धुळे जिल्ह्यात दोन डॉक्टरांचा कोरोना मुळे मृत्यू झाला.
औरंगाबाद एमजीएम रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण. रुग्णाच्या नातेवाईकांनी केली मारहाण. रुग्ण दगावल्याने केली मारहाण. रात्रीची घटना..आयसीयूची केली तोडफोड. तोडफोड करणाऱ्यांच्या विरोधात सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा .
लालपरी गेल्या पाच महिन्यानंतर पहिल्यांदाच अंतर जिल्हा धावण्यासाठी स्थानकात आल्या मात्र प्रवाशांच्या अल्प प्रतिसादामुळे रिकाम्या बसेस सोडायची वेळ येत आहे .
पुणे : पिंपरी चिंचवडमध्ये एकाची हत्या झाली असून तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. वाकड पोलीस स्टेशन हद्दीत 8 वाजता ही घटना घडली. शुभम नखाते असं मयताचे नाव आहे. मयत नखातेवर पॉस्कोचा एक गुन्हा दाखल आहे. त्याची तिघांनी तापकीर चौकात गाठून हत्या केलीये. कारण अद्याप समोर आलेलं नाहीये. वाकड पोलीस अटक केलेल्या तिघांकडे चौकशी करत आहेत.
डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला आज सात वर्षं पुर्ण होतायत. या प्रकरणाचा तपास सी बी आय कडे सोपवण्यात आल्यानंतर देखील दाभोलकरांच्या हत्येचा कट रचनारे मास्टरमाईंड सापडलेले नाहीत आणि या प्रकरणाचा तपासही अद्याप पूर्ण झालेला नाही. त्याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मोजक्या कार्यकर्त्यांनी डॉक्टर दाभोलकरांची ज्या महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर हत्या झाली तिथं निदर्शनं केली.
कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर राज्यातील जीम बंद करण्यात आल्या आहेत. परंतु, आता अनलॉकची प्रक्रिया सुरु असल्याने जीम पुन्हा सुरु करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री राज्यातील अनेक जीम चालकांनी यामध्ये मोठी गुंतवणूक केली आहे, असे ट्वीट करत खासदार सुप्रिया सुळे यांनी जीम सुरु करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
सुप्रीम कोर्टाने सुशांत प्रकरणी तपास सीबीआयला दिल्यानंतर गृहमंत्र्यांनी संघराज्य पद्धतीबाबत प्रश्न उपस्थित केले. याबाबत घटना तज्ञांनी आपली मतं मांडावी, विचार मंथन करावे अस गृहमंत्री म्हणाले. तसेच अनिल परब यांनी देखील राज्य सरकारचे अधिकार आहेत. घटनातज्ञांनी याचा अभ्यास करावा, अस म्हंटलय. एकूणच सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संघराज्य पद्धतीला धक्का बसल्याचे मत अप्रत्यक्षरीत्या राज्य सरकारने मांडले आहे.
प्रशांत भूषण यांच्यावरील कारवाई प्रकरणी बार काऊंसिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचं सरन्यायाधीशांना पत्र. सर्वोच्च न्यायालय आणि भारतीय न्यायव्यवस्थेची प्रतिमा मलिन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईची मागणी. 1 लाख 75 हजार सभासद संख्या असलेल्या संघटनेनं एकमुखानं घेतला निर्णय.
राज्यात एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यातील वाहतुकीला परवानगी, फक्त एसटी बसला परवानगी, एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात एसटीने प्रवास करता येणार
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेवरून विरोधकांचे आंदोलन. अडचणीचे प्रश्न विचारणार म्हणून सभा ऑनलाईन घेतल्याचा विरोधकांचा आरोप. कोरोनाच्या संकटात खरेदी व्यवहारात घोटाळा झाल्याचा विरोधकांचा आरोप. जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन.
दक्षिण काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमधील चकमकीत 1 दहशतवादी ठार. ऑपरेशन अद्याप सुरू आ, जम्मू-काश्मीर पोलिसांची माहिती.
चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, ओटिटि उद्योग यांच्याशी सहयोगी असलेल्या ६५ वर्षांवरील कलाकार/क्रू सदस्यांना कोवीड-19 च्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती पूर्ण काळजी घेऊन चित्रीकरण करण्यास परवानगी देण्यात येत असल्याची माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी दिली.
बारामती : अष्टविनायकातील अग्रस्थान मोरगावच्या मयूरेश्वर मंदिरातील भाद्रपद यात्रा रद्द करण्यात आली. मोरगांव येथील भाद्रपद यात्रा उत्सव भाद्रपद शुद्ध प्रतीपदा ते भाद्रपद शुद्ध पंचमी दरम्यान साजरा करण्यात येतो. यात्रा काळात दरवर्षी सर्व धर्मीयांना मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने श्रींचा मुख्य गाभारा खुला करण्यात येतो. यानिमित्ताने श्रींना जलस्नान घालण्याची पर्वणी साधता येते. मात्र कोरोना या विषाणूजन्य आजाराच्या वाढत्या फैलावामुळे मयुरेश्वर मंदिर बंद आहे.
पुण्यातील जम्बो हॉस्पिटल वेळेत सुरु होत नसल्याबद्दल पुण्याचे खासदार गिरीश बापट ज्या ठिकाणी हे हॉस्पिटल उभारलं जाणार आहे तिथं संध्याकाळी पाच वाजता पोहोचून धरणे आंदोलन करणार आहेत.
राज्यात जीम सुरु करण्याची मागणी तीव्र होताना दिसून येत आहे. सोलापुरातील एका जीम चालकाने मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकांऱ्याकडे जिम सुरु करण्याची मागणी केली आहे. प्रदीप घोंगडे असे या जिम चालकाचे नाव आहे. गेल्या सहा महिन्यांपासून जिम बंद आहे. त्यामुळे जिमचा भाडा, कौंटुबिक खर्च, बँकेचे लोन इत्यांदीचा खर्च कसा भागवायचा असा सवाल प्रदीप याने उपस्थित केला आहे. अशीच जर उपासमार सुरु राहिली तर कुटुंबाला जगणे देखील अवघड होऊन बसेल. राज्यात दारु विक्री, पान टपरी. चहाची दुकाने सुरु होऊ शकतात, सरकार अशा गोष्टींना प्राध्यान देऊ शकते तर आमच्यावर अन्याय का असा सवाल प्रदीप यांने मुख्यमंत्र्याना केलेल्या निवदेनात उपस्थित केला आहे. त्याने हे निवदेन फेसबुकवर देखील पोस्ट केले आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ तोडगा काढून जिम सुरु करण्यात यावे अन्यथा कुटुंबियाच्या जीवाला काही बरं वाईट झाल्यास त्याला जबाबदार सरकार असेल असा इशारा देखील दिला आहे.
2019 मध्ये ऑगस्ट महिन्यात आलेल्या महापुराने कृष्णा नदी काठी राहणाऱ्याना धडकी भरली होती. त्यामुळे यंदा पाणी पातळी वाढल्याने नदी काठच्या लोकांची धडधड पुन्हा वाढली आहे. कृष्णामाई, यंदा कोपू नकोस, असे मनोमनी कृष्णेला विनवणी करुन हात जोडणारी आजीबाई एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात कैद झाली आहे. आयर्विन पुलावरुन जाताना या आजीबाई बराच वेळ नदीकडे हात जोडून उभ्या राहिल्या. अधून-मधून नदीला वाकून नमस्कार करत यंदा तुझा प्रकोप होऊ देऊ नकोस, अशी विनवणी केली.

जन्माला येताच कोरोनाग्रस्त झालेल्या बाळाने व्हेंटिलेटरच्या सहाय्याने कोरोनाच्या विरुद्ध दिलेला लढा यशस्वी ठरला. जन्मल्यानंतर तब्बल 22 दिवस व्हेंटिलेटरवर राहिलेले हे बाळ आता पूर्णपणे कोरोनामुक्त झालं आहे. मुदतीआधी जन्म झालेल्या या बाळाला आईपासून कोरोनाची लागण झाली होती. पुण्यातील हे बाळ आहे. भारती हॉस्पिटलमध्ये या प्रीमॅच्युअर बाळाचा जन्म झाला. बाळाला श्वसनाचा त्रास होत असल्याने शिशू अतिदक्षता विभागात ठेवण्यात आलं होतं. पुढे हे बाळ कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं आणि त्याला न्यूमोनिया झाल्याचही समोर आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न सुरू ठेवताना अनेक थेरपींचा उपचारासाठी आधार घेतला. जन्मल्यानंतर 25व्या दिवशी बाळाचा व्हेंटिलेटर काढण्यात आला आणि ते स्वतः श्वास घेऊ लागले. त्यानंतर 35 व्या दिवशी बाळाला त्याच्या आईसोबत घरी सोडण्यात आलं.
शरद पवार यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र, सहकारी बँकांमध्ये होणाऱ्या हस्तक्षेपावर चिंता व्यक्त
उस्मानाबाद : जिल्ह्याची छाती अभिमानाने फुलून यावी असा अभिमानास्पद कर्तृत्वाचा तुरा मराठवाड्याच्या वाट्याला आला आहे. भारतीय महिला खोखो संघाची कर्णधार सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोत्तम अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. पाच लाख रुपये आणि पदक असं या पुरस्काराचे स्वरूप आहे. अर्जुन पुरस्कार पटकविणारी सारिका ही बहुधा मराठवाड्यातील पहिली महिला क्रिडापटू आहे.
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील 106 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. कोरोनाबधित रुग्णांची संख्या 19258 एवढी झाली आहे. त्यापैकी 14452 बरे झाले तर 602 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 4204 जणांवर उपचार सुरु आहेत.
सोलापूर : आलमट्टी धरणातून मागील 2 दिवसांपासून 2 लाख 50 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यामुळे 114 टीएमसीवर पोहोचलेला पाणी साठा आता 98 टीएमसीवर येऊन पोहोचला आहे. सकाळी 9 वाजेपर्यंत धरणात 98.298 टीएमसी इतका पाणी साठा होता. आलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123 टीएमसी इतकी आहे. धरणात इनफ्लो मोठ्या प्रमाणात होतोय. सकाळी 2 लाख 7 हजार क्यूसेकने पाण्याचा इनफ्लो सुरू होता. तर 2 लाख 50 हजार क्यूएक्सने विसर्ग करण्यात आला.
सांगली : सध्या कोयना धरणात 91.42 टीएमसी पाणीसाठा आहे. सकाळी 11 वाजता सध्याचा असणारा 54629 विसर्ग कमी करून एकूण विसर्ग 30000 क्यूसेक असेल. टेडियल गेट 10 फुटावरून 5 फुटावर असतील.
मावळ तालुक्यातील कुंडमळ्यात एक तरुण वाहून गेलाय. पर्यटन बंदी झुगारून वर्षाविहाराला जाणं त्याच्या जीवावर बेतलंय. वाहून जाण्याच्या आधी काही मिनिटांपूर्वी त्याने एक फोटोही काढला होता. त्यानंतर चप्पल धुण्यासाठी तो पाण्याजवळ गेला आणि तोल जाऊन पाण्यात पडला. पाण्याचा प्रवाह खूप असल्याने तो वाहून गेला. सोबत आलेल्या दोन मित्रांच्या ही नजरेबाहेर गेला. तबरेज पटेल असं त्याचं नाव असून तो पिंपरी चिंचवडच्या खराळवाडीत सध्या रहायला आहे. काल सायंकाळी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी त्याचा शोध घेतला पण तो आढळला नाही. आज एनडीआएफचे पथक पुन्हा शोध घेत आहे.
सांगली जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर कायम आहे. मंगळवारी दिवसभरात तब्बल 19 जणांचा मृत्यू झाला आहे.तर तब्बल 311 जणांना कोरोना लागण झाले आहे.यामध्ये सांगली महापालिका क्षेत्रातील 124 जणांचा समावेश आहे.तर 230 जण कोरोना मुक्त झाले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एक्टिव कोरोणा रुग्णांची संख्या 3,020 झाली आहे,आणि एकूण आकडा हा 7 हजार 075 झाला आहे.तर आता पर्यंत 3,806 जण कोरोना मुक्त झाले असून आज अखेर 249 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.तर उपचार घेणाऱ्या पैकी 306 जण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

देशाचा मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील 17 दिवसांत मुंबईचा मृत्यूदर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला मुदतवाढ देण्यात आली आहे. 1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ दिली आहे. या योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळावा यासाठी 22 मे रोजी योजना विस्तारित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र 31 जुलै, 2020 ला योजनेची मुदत संपुष्टात आली होती. कोरोनासह इतरही रुग्णांना आरोग्य हमी आणि आर्थिक दिलासा मिळावा यासाठी या योजनेला दिली मुदतवाढ.

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेला मुदतवाढ,

कोरोनाच्या वाढत्या प्रदूर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा निर्णय,

1 ऑगस्ट ते 31 ऑक्टोबर या पुढील तीन महिन्यांच्या कालावधीसाठी दिली मुदतवाढ,

या योजनेचा लाभ राज्यातील सर्व नागरिकांना सर्व अंगीकृत रुग्णालयांमध्ये मिळावा यासाठी 22 मे रोजी योजना विस्तारित करण्याचा घेण्यात आला होता निर्णय,

मात्र 31 जुलै, 2020 ला योजनेची मुदत संपुष्टात आली होती,

कोरोनासह इतरही रुग्णांना आरोग्य हमी आणि आर्थिक दिलासा मिळाचा यासाठी या योजनेला दिली मुदतवाढ,
नागपूर येथील धंतोली रुग्णालयातील डॉक्टर सुषमा( बीएएमएस) आणि पती प्रोफेसर धिरज राणे (रायसोनी कॉलेज ऑफ इंजीनिअरिंग ) यांनी आपल्या दोन चिमुकल्यांसह आत्महत्या केली. मोठा मुलगा ध्रुव 11 वर्षाचा असून आणि मुलगी वन्न्या 6 वर्षाची आहे. आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.
Kolhapur Rain Update | कोल्हापूर जिल्ह्यात सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी, पंचगंगा नदीची पातळी 40 फूट 10 इंच इतकी, पातळी वाढण्याचा वेग कमी, राधानगरी तालुक्यात दुपारपासून पावसाची रिमझिम, धरणाचे अजून दोन दरवाजे उघडलेलेच
भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी आज नाविन्यपूर्ण कृती (एआरआयआयए) 2020 च्या अटल रँकिंगची घोषणा केली. यात देशपातळीवर पुण्याचे सीओईपी पहिल्या क्रमांकावर नांदेडचे गुरूगोविंदसिंह महाविद्यालया चौथ्या आणि मुंबईचे व्हिजीटीआय पाचव्या क्रमांकांवर आले आहे. आयआयटी मुंबईचा आयआयटी रॅकिंग मध्ये दुसरा क्रमांक आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत यूजीसी विरोधातील सुनावणी अद्याप सर्वोच्च न्यायालयात सुरु आहे.

अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत यूजीसी विरोधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे. यूजीसी परीक्षेसाठी नियम सांगू शकते, पण परीक्षा घेण्यासंदर्भात त्यांना सर्वाधिकार नाहीत, असं घटनापीठाचा हवाला देत अरविंद दातार यांनी कोर्टाला सांगितले. त्यावर न्यायमूर्तींनी घटनापीठाचा तो निर्णय मेडिकल कॉलेज संदर्भात होता असं सांगितलं. अरविंद दातार म्हणाले, पण त्या निकालाचा या ठिकाणचा संबंध मी दाखवू शकतो. त्यावर न्यायमूर्ती भूषण म्हणाले की, परीक्षा न घेण्याचा निर्णय डिझास्टर मॅनेजमेंट अंतर्गत येतो का हा सुद्धा इथे प्रश्न आहे. तर यामुळे परीक्षांचा दर्जा सुद्धा खालावणार नाही का? असा सवालही न्यायमूर्ती सुभाष रेड्डी यांनी उपस्थित केला. त्यावर दातार यांनी आयआयटीचे उदाहरण दिलं. यावर

न्यायमूर्ती म्हणाले, यात आयआयटीशी संबंध नाही. त्यावर दातार म्हणाले की, फक्त मी एवढेच सांगू इच्छितो की, जर एखादी केंद्रीय, प्रतिष्ठित संस्था हे करू शकते. तर हे का नाही करू शकत?
आदित्य ठाकरे यांना ओळखत नाही, त्यांना कधी भेटलेही नाही, रिया चक्रवर्तीची पत्राद्वारे माहिती, सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबीयांनी केलेले आरोप खोटे असल्याचाही दावा
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत यूजीसी विरोधातील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात सुरु झाली आहे.
यवतमाळ : पूस धरण ओव्हरफ्लो झाले असून धरणाच्या संरक्षक भिंतीच्या आतल्या बाजूला काही स्टंटबाज उंचावरून उड्या मारत असल्याचा व्हिडिओ पुढे आला आहे. पुसद तालुक्यातील हे पूस धरण असून येथील पाणी पातळी सततच्या पावसाने वाढली आहे त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. अशावेळी आपल्या जीवाची पर्वा न करता काही तरुण उंचावरून या धरणात उड्या मारत आहेत. या भागात कुठलीही सुरक्षा यंत्रणा नाही त्यामुळेच स्टंटबाज येथे जोखीम घेत जीवाची पर्वा न करता पाण्यात उड्या मारतांना दिसत आहे त्यामुळे याभागात सुरक्षा रक्षक असणे आता आवश्यक झाले आहे.
सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीजवळ पोचल्याने सांगलीहुन- इस्लामपूर-पलूस मार्गाकडे वाहतूक होणाऱ्या कर्नाळ रोडवर पाणी आले आहे. त्यामुळे बायपास शिवशंभो चौकातून सांगलीकडे येणारा मार्ग बंद करण्यात आल्याने या मार्गावरील वाहतूक बायपास मार्गे वळवण्यात आली आहे.पोलिसांनी हा रोड बॅरिकेट्स लावून बंद केला आहे.
बीड : यावर्षी सार्वजनिक स्वरूपामध्ये गणेश उत्सव करता येणार नसला तरी घरगुती स्वरूपामध्ये तो साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यासाठी गणेशमूर्तींची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना गाड्यावर मुर्त्या ठेवून घरोघरी आणि गल्लीत जाऊन विकण्यासाठी परवानगी जिल्हा प्रशासनाने दिली आहे. मात्र यासाठी गणेश मूर्ती विक्रेत्यांना अँटिजन टेस्ट करून घेणं सक्तीचे करण्यात आले आहे. बीड जिल्ह्यात कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात आल्या असून, या कालावधीत मूर्ती घडवणारे आणि मूर्ती विक्रेते यांना फिरत्या गाड्यावर घरोघरी जाऊन मातीचे तयार केलेले बैल, गणेश मूर्ती विकण्यासाठी लॉकडाऊन कालावधीमध्ये 22 ऑगस्ट पर्यंत सूट देण्यात आली आहे.
केंद्र सरकारच्या वतीने ईडब्ल्यूएस आरक्षण देण्यात आलं आहे. हे आरक्षण प्रकरण पाच न्यायमूर्ती खडपीठ कडे वर्ग करण्यात आला आहे .आंध्र प्रदेश सरकारच्या वतीने आरक्षण देण्यात आलं होतं, हे आरक्षण देखील पाच न्यायमूर्तीकडे वर्ग करण्यात आले आहे .देशातील बहुचर्चित तामिळनाडू आरक्षण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यामुळे मराठा आरक्षणाबाबत घाई करण्यात कुठलेही कारण नाही. असं म्हणत विनोद पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात आंध्रप्रदेश, ईडब्ल्यूएस तामिळनाडु, आरक्षणा सोबत मराठा आरक्षण ऐकलं जावे असा विनंती अर्ज केला आहे.
काकोळे गावाजवळ असलेलं हे जीआयपी धरण रेल्वेच्या मालकीचं असून तिथून कोळशाच्या इंजिनाला लागणारं पाणी पुरवलं जायचं. मात्र कोळशाची इंजिनं बंद झाल्यावर अनेक वर्ष हे धरण दुर्लक्षित होतं. काही वर्षांपूर्वी या धरणाच्या बाजूला रेल्वेनं रेल नीरचा प्रकल्प उभारला. यातून रेल्वेला मोठा फायदा होत असतानाही दुसरीकडे या धरणाच्या डागडुजीकडे मात्र रेल्वेनं दुर्लक्ष केलंय. या धरणाचा बांध मागील अनेक वर्षांपासून कमकुवत बनला असून त्यातून बाजूच्या शेतांमध्ये पाण्याची गळती होतेय. पाण्याच्या दाबामुळे मागील वर्षी हा बांध एका कोपऱ्यात फुटला होता, ज्यामुळे शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. मात्र तरीही रेल्वेनं तात्पुरती डागडुजी करून या भिंतीच्या धोकादायक अवस्थेकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष केलंय. धरणाची ही भिंत फुटल्यास आसपासच्या शेतीचं मोठं नुकसान होण्याची भीती असून अंबरनाथच्या नागरी वस्तीलाही काही प्रमाणात धोका आहे. मात्र याबाबत रेल्वेकडे वारंवार पाठपुरावा करूनही रेल्वे प्रशासन याकडे लक्ष देत नसल्याची तक्रार स्थानिक करतायत. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना होण्याची वाट रेल्वे पाहतेय का? असा प्रश्न उपस्थित झालाय.
पालघर : पालघर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस होत असून ग्रामीण तालुक्यांत ही पावसाने दमदार हजेरी लावली होती. आजही पावसाचा जोर कायम असून ग्रामीण भागातील छोट्या मोठ्या धरणांतील पाणी साठा ही पूर्ण झाला असून सर्व धरण भरली आहेत. जव्हार तालुक्यतील डोमवीरा प्रकल्पाचे खडखड धरण ही पूर्ण भरले असून ओव्हरफ्लो झाले आहे. त्यामुळे या सर्व धरणाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांची तहान भागणार आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात, काल रात्री उशिरा दिल्लीतील एम्समध्ये अमित शाहांना दाखल केलं
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा रुग्णालयात, काल रात्री उशिरा दिल्लीतील एम्समध्ये अमित शाहांना दाखल केलं
पंढरपूर : एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल रात्री 11.35 वाजता दुःखद निधन झाले. सुधाकरपंत परिचारक यांचा अंत्यविधी पुणे येथील वैकुंठभूमीत आज सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांना सहकाराचे डॉक्टर म्हणून ओळखले जात असे.
पंढरपूर : एसटी महामंडळाचे माजी अध्यक्ष आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचा कोरोना उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. पुणे येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल रात्री 11.35 वाजता दुःखद निधन झाले. सुधाकरपंत परिचारक यांचा अंत्यविधी पुणे येथील वैकुंठभूमीत आज सकाळी 10 वाजता करण्यात येणार आहे. परिचारक हे पाच वेळा पंढरपूरचे आमदार होते. शरद पवार यांचे निकटवर्तीय असलेल्या परिचारक यांना सहकाराचे डॉक्टर म्हणून ओळखले जात असे.

दिल्ली : देशभरातील विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकांमध्ये देशातील कोरोना परिस्थितीचा दाखल देत, यूजीसीच्या नव्या गाईडलाईन्सला आव्हान देण्यात आलं आहे. नव्या गाईडलाईन्सनुसार यूजीसीने सर्व विद्यापीठांनी 30 सप्टेंबरपर्यंत परीक्षा पूर्ण करण्यास सांगितलं आहे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करुनच नव्या गाईडलाईन्ल जारी केल्याचं यूजीसीने म्हटलं आहे. ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने परीक्षेचा पर्याय दिला जात आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने सुप्रीम कोर्टात सांगितलं की, आम्ही शिक्षण मंत्रालयाच्या आग्रहावर अंतिम वर्षाच्या परीक्षांचं आयोजन करण्यासाठी शैक्षणिक संस्था उघडण्यास परवानगी दिली आहे. यूजीसीच्या नव्या गाईडलाईननुसार त्यांना परीक्षेच्या आयोजनासाठी 'अनलॉक 3'च्या नियमावलीतून सूट दिली जात आहे.
पालघर : भिवंडी वाड़ा मनोर या 32 किलोमीटर महामार्गाची अक्षरशः चाळणं झाली आहे. या महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांची मालिका सुरूच असून गेल्या काही वर्षापासून अपघातात अनेक बळी गेले आहेत. यासाठी अनेक आंदोलन होऊनही अद्याप रस्त्याच्या दुरुस्तीकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक आणि वाहन चालकांकडून होतोय.
दिल्ली : कोरोना आणि लॉकडाऊनमुळे दोन ते साडेपाच कोटी नोकऱ्या जाण्याचा अंदाज पर्यटन मंत्रालयाने वर्तवला आहे. पर्यटन मंत्रालयाचं संसदीय स्थायी समितीच्या बैठकीत प्रेझेंटेशन सादर केलं. यामध्ये कोरोनामुळे किमान 72 हजार कोटी आणि जास्तीत जास्त 1.60 लाख कोटी रुपयांचं नुकसान होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. दरम्यान पर्यटन क्षेत्रात अद्यापही अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे.
परभणी : येलदरी धरण क्षेत्रात पडत असलेला पाऊस त्याचप्रमाणे खडकपुर्णा धरणातून सुरू असलेल्या पाण्याचा विसर्ग यामुळे येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे दीड मीटरने उघडण्यात आले आहेत. यातून तब्बल 68 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग हा पूर्णा नदीत करण्यात आला आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्याला जोडणारा येलदरी येथील पूल पाण्याखाली गेलेला आहे. मराठवाड्यातून विदर्भ अशी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. रात्री साडे नऊ वाजल्यापासून ही वाहतूक पूर्ण बंद आहे पूर्णा नदी पात्राची पातळीही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाच्या वतीने सर्व गावांना अतिसतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.

बुलढाणा : जिल्हयात आज पावसाने उघड़ीप दिली असली तरी काल झालेल्या मूसळधार पावसाने जिल्ह्यात काही गावात हाहाकार माजवला आहे. अनेक गावात नदीच पाणा शिरल्याने अनेक कुटुंब विस्थापित करावी लागली आहे. नदयाना पूर आल्याने पुराच पाणी पुलावरुन वाहत असल्याने बुलढाणा जिल्हयातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यातले प्रशासनालासुद्धा मदत करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत,. बुलढाणा शहराला लागून असलेले यळगाव धरण भरले असल्याने या शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.

बुलढाणा : जिल्हयात आज पावसाने उघड़ीप दिली असली तरी काल झालेल्या मूसळधार पावसाने जिल्ह्यात काही गावात हाहाकार माजवला आहे. अनेक गावात नदीच पाणा शिरल्याने अनेक कुटुंब विस्थापित करावी लागली आहे. नदयाना पूर आल्याने पुराच पाणी पुलावरुन वाहत असल्याने बुलढाणा जिल्हयातील अनेक मार्ग बंद पडले आहेत. त्यातले प्रशासनालासुद्धा मदत करण्यात अडथळे निर्माण झाले आहेत,. बुलढाणा शहराला लागून असलेले यळगाव धरण भरले असल्याने या शहराचा पाणी प्रश्न मिटला आहे.
सांगली : कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे. आयर्विन पुलावर 38 फूट पाणी पातळी पोहोचली असून 40 फूट नदीची इशारा पातळी आहे. सध्या पावसाचा कमी झालेला जोर पाहता सांगलीत आयर्विन पूलाजवळ जास्तीत जास्त पाणी पातळी 41 फूट होऊन पातळी स्थिर होण्याची शक्यता आहे. चांदोली धरण क्षेत्रातील पाऊस कमी झाल्याने धरणातील विसर्ग 14486 क्यूसेकवरुन 12264 क्यूसेक इतका कमी करण्यात आला आहे. तरीही पावसाची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेची सूचना देण्यात आली आहे.
कोयना धरणातील विसर्ग स्थिर असून त्यामध्ये सद्यस्थितीत कोणतीही वाढ होण्याची शक्यता नाही.आयर्विन पूल सांगली येथे उद्या जास्तीत जास्त पाणी पातळी ४१'००" होऊन पाणी पातळी स्थिर होण्याची संभावना आहे.एकूणच पुढील ४८ तासात जास्तीत जास्त ४-५ फूट वाढ होऊन पाणी पातळी स्थिर होऊन उतरायला सुरुवात होईल अशी शक्यता वर्तविण्यात येते.
कोल्हापूर : पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली, पाणी पातळी 39 फूट 9 इंच इतकी, जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद, 4256 क्यूसेक पाण्याचा विसर्ग तर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला
नागपूरचे व्यापारी महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या विरोधात, सर्व व्यापारी संघटनांनी एकत्र येऊन 19 तारखेला बंद पुकारला, वेगवेगळे एनओसी घेतल्यावर व्यापारांचे लायसन्स घेऊन मगच व्यापार करता येईल अशी ऑर्डर मुंढे यांनी काढली, त्याविरोधात हा बंद आहे
बीड जिल्ह्यात कोरोना रुग्णाच्या दिवसेन दिवस भर पडताना पाहायला मिळतेय. मागच्या 24 तासात 108 जण कोरोना बाधित झालेत तर 129 जणं कोरोना मुक्त झाले आहेच. तर दिवसभरात कोरोनामुळे पाच रुग्णांचा उपचार सुरु असताना मृत्यू झालाय..
कोरोना बाधित नव्या 108 रुग्णात बीड तालुक्यात सर्वाधिक 40 तर अंबाजोगाईत 5, परळी 9, आष्टी 16, गेवराई 2, शिरुर 4, केज 16, माजलगाव 9. धारुर 3 आणि वडवणी तालुक्यातील 4 रुग्णांचा समावेश आहे. यासह जिल्ह्यात आतापर्यंत 2682 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. मात्र, योग्य उपचारानंतर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासा देणारे आहे. सोमवारी आणखी 129 रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 1243 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
धुळ्याचे महापौर चंद्रकांत सोनार यांचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं खबरदारी चा उपाय म्हणून उद्या महानगर पालिका नागरिकांसाठी बंद राहणार आहे . महानगर पालिकेची इमारत निर्जंतुकीकरण करण्याचं कामं तात्काळ करण्यात आलंय, उद्या देखील महानगर पालिकेच्या इमारतीत निर्जंतुकीकरण करण्यात येणार असल्यानं महानगर पालिकेचं कामकाज उद्या बंद राहणार आहे .धुळे शहर , जिल्ह्यात कोरोना चा प्रादुर्भाव गुणाकार पध्दतीने वाढत आहे.धुळे शहरातील कोरोना बाधितांची संख्या २हजार ७९१ वर गेलीय, तर धुळे शहरात आतापर्यंत ८५कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झालाय .धुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या ५ हजार ६१९ वर गेलीय, तर जिल्ह्यात आतापर्यंत १७३ कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय
पुण्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणापाठोपाठ पानशेत धरण देखील आज शंभर टक्के भरलं. त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता पानशेत धरणातून दोन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलीय. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री त्यामधे वाढ होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या चार धरणांपैकी खडकवासला आणि पानशेत ही दोन धरणं शंभर टक्के भरलीयत तर वरसगाव 84 टक्के तर टेमघर 81 टक्के भरलयं . या चार धरणांची पाणी साठवण्यासाठी एकुण क्षमता 29 टी एम सी असुन सध्या या चार धरणांमधे मिळून 25. 82 टी एम सी इतका पाणीसाठा झालाय.
पुण्याला पाणीपुरवठा करणार्या खडकवासला धरणापाठोपाठ पानशेत धरण देखील आज शंभर टक्के भरलं. त्यामुळे आज संध्याकाळी सात वाजता पानशेत धरणातून दोन हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आलीय. पावसाचा जोर कायम राहिल्यास रात्री त्यामधे वाढ होण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग सुरुच आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्या चार धरणांपैकी खडकवासला आणि पानशेत ही दोन धरणं शंभर टक्के भरलीयत तर वरसगाव 84 टक्के तर टेमघर 81 टक्के भरलयं . या चार धरणांची पाणी साठवण्यासाठी एकुण क्षमता 29 टी एम सी असुन सध्या या चार धरणांमधे मिळून 25. 82 टी एम सी इतका पाणीसाठा झालाय.
कोकण मध्य महाराष्ट्र घाट माथ्यावर येत्या ४८ तासात अतिमुसळधार पावसाची शक्यता .. कोयना, राधानगरी परिसरात सुरू असलेला पाऊस आणखी दोन दिवस असाच सुरू राहिल अशी माहिती आयएमडी ने दिलाय ...
कोल्हापूर, सांगली, पुण्यातही घाटमाथ्यावर अति मुसळधार पावसाची शक्यता
२१ तारखे पर्यंत कोकण मध्य महाराष्ट्रात पाऊस जोरदार असेल ...
२५ तारखेपर्यंत महाराष्ट्रात उत्तम पाऊस होईल...
प्रख्यात दिग्दर्शक, लेखक आणि अभिनेता निशिकांत कामत यांचे निधन
पुणे - पुण्याचे नवे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, नवलकिशोर राम यांची पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती, त्यांच्या जागी जिल्हाधिकारी म्हणून डॉ राजेश देशमुख यांची नियुक्ती
सोलापूर -

सोलापूरात स्वाभिमानी संघटनेच्या वतीने दुधाच्या दर आणि अनुदान संदर्भात मोर्चा,

काही वेळात होणार मोर्चाला सुरुवात, आंदोलनस्थळी पोलिसांचा बंदोबस्त, कार्यकर्ते दाखल होण्यासाठी सुरुवात,

'आत्महत्या करून मारण्यापेक्षा, रस्त्यावर उतरू, पोलिसांच्या बंदुकीच्या गोळीने जीव गेला तरी चालेल',

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांची तीव्र प्रतिक्रिया

'नगरला 20 ऑगस्टला मोर्चा होणार, मागण्या मान्य न झाल्यास कायदा हातात घेणार'
शरद पवार यांच्या घरात अजून 6 जण कोरोना पॉझिटिव्ह, आतापर्यंत एकूण 12 जणांना कोरोनाची लागण, दोन वाहनचालक पॉझिटिव्ह

सोलापूर - सोलापुरात मराठा समन्वय समितीच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात,

समितीच्यावतीने सुरु होते जागरण गोंधळ आंदोलन,

छत्रपती संभाजीराजे चौकात मराठा आरक्षणाच्या मागणीसह विविध मागण्यासांठी आंदोलन,
वाशिम : शिरपूर येथे गेल्या पाच दिवसांत 42 कोरोनाबाधित रुग्ण झाल्याचे निदान झाले आहे. अचानक एवढ्या मोठ्या संख्येत कोरोना रुग्ण बाधित झाल्याने गावात खळबळ उडाली आहे. शिरपूर येथील लोक वस्ती अतिशय दाट असल्याने गावात रुग्ण वाढीची भीती गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. अधिक रुग्ण वाढू नये म्हणून कोरोना दक्षता समिती, व्यापारी संघटना, गावकऱ्यांनी सोमवार ते गुरुवार चार दिवस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अत्यावश्यकल सेवा म्हणून दवाखाने, मेडिकल आणि कृषी व्यवसाय यांची दुकाने निर्धारित वेळेपुरती उघडी ठेवण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील 12 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18801 एवढी झाली आहे. त्यापैकी 13884 बरे झाले तर 589 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4328 जणांवर उपचार सुरु आहेत.
पालघर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून धरण क्षेत्रात ही चांगला पाऊस आहे. त्यामुळे सुर्या प्रकल्पच्या धामणी धरणाचे तीन दरवाजे आज 70 मीटर पर्यंत उघडण्यात आले असून धामणी धरणातून 7241.37 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. तर धामणी आणि कवडास मिळून सध्या 12047 क्यूसेक पाण्याच्या विसर्ग सुर्या नदीद्वारे करण्यात आला असून नदी काठावरील गावना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नद्या पुन्हा एकदा दुथडी भरून वाहत आहेत. तर पंचगंगा नदीचे पाणी दुसऱ्यांदा पात्राबाहेर पडलंय. जिल्ह्यातील एकूण 76 बंधारे पाण्याखाली गेले असून राधानगरी धरणातून 7000 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी 36 फूट 9 इंच इतकी असून पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी ही 43 फूट इतकी आहे.
सिल्व्हर ओकवरील दोन जणांना कोरोनाची लागण, शरद पवारांच्या ताफ्यातील सुरक्षारक्षक पॉझिटिव्ह, एकूण सहा जणांची कोरोना चाचणी, कोणीही पवारांच्या संपर्कात नव्हते, रॅपिड अँटिजन टेस्टमध्ये आढळले कोरोना पॉझिटिव्ह, सिल्व्हर ओकवरील इतर सर्व कर्मचारी आणि पवारांच्या पीए यांचीही कोरोना चाचणी, त्यांचे रिपोर्ट येणं बाकी, शरद पवार पुढील काही दिवस कुणालाही भेटणार नसल्याची शक्यता
आलमट्टी धरणातून अद्याप ही पाण्याचा मोठा विसर्ग सुरू आहे. कृष्णा नदीतून येणाऱ्या पाण्याचा फ्लो वाढल्याने धरणातून विसर्ग ही मोठा आहे. सकाळी प्राप्त झालेल्या आकडेवारीनुसार धरणात 1 लाख 23 हजार क्यूसेकने पाण्याचा इन्फ्लो सूरु आहे. तर 2 लाख 20 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मागील काही दिवसांपासून 1 लाख 80 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. काल संध्याकाळी हा विसर्ग वाढवून 2 लाख 20 हजार क्यूसेकने वाढवण्यात आला. आता सकाळीदेखील 2 लाख 20 हजार क्यूसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे धरण साठ्यात घट देखील झाली आहे. काल संध्याकाळी जवळपास 114 tmc पाण्याचा साठा होता. मात्र विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने धरणात आता 110 tmc इतका साठा आहे. आलमट्टी धरणाची एकूण क्षमता 123 tmc इतकी आहे.
पिंपरी चिंचवड शहर आणि मावळ तालुक्यावर वरुणराजाने चांगलीच कृपा दृष्टी दाखवली आहे. शहराची तहान भागावणाऱ्या अन शेतकऱ्यांचा तारणहार ठरणाऱ्या पवना धरण परिसरात गेल्या 24 तासात 108 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. धरणक्षेत्रात आजपर्यंत 1153 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे, त्यामुळे सध्या 72.53 टक्के पाणीसाठा उपलब्ध झालाय. गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल 2000 मिलिमीटर पावसाची नोंद ही कमीच आहे. त्यामुळं धरण 100 टक्के भरायची अजून प्रतीक्षा करावीच लागणार आहे. तिकडे लोणावळ्यात ही 56 मिलिमीटर पावसाची नोंद झालीये. सलग तीन दिवस 100पेक्षाअधिक मिलिमीटर कोसळलेल्या पावसाने लोणावळ्यात मात्र थोडा आखडता हात घेतलेला आहे.
परभणीतील येलदरी वसाहत आणि पूर्णा प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस पडत असल्यामुळे येलदरी धरण 100 टक्के भरले आहे तसेच धरणात पाण्याची पातळी वाढल्यामुळे धरण प्रशासनाने दिनांक 17 ऑगस्ट रोजी रात्री 1:15 वाजता येलदरी धरणाचे सर्व 10 दरवाजे अर्धा मीटरने उघडून 16800 क्यूसेकने पाण्याचा पूर्णा नदीत विसर्ग सुरु केला आहे. त्यामुळे येलदरी धरणाखालील पूर्णा नदीला पूर आला असून नदी काठच्या गावातील नागरिकांनी सतर्क राहण्याचा ईशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे आज चौथ्या सोमवारी मुख्य शिवलिंगावर विविध रंगबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती आणि महाभिषेक ही पार पडला. श्रावण महिन्यातील आज शेवटचा म्हणजेच चौथा सोमवार आहे. लॉकडाऊनमुळं यंदा भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात भिमाशंकर परिसर भक्तांविना ओस पडला आहे. दरवर्षी श्रावण महिन्यांत लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकर येथे हजेरी लावतात.
बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भिमाशंकर येथे आज चौथ्या सोमवारी मुख्य शिवलिंगावर विविध रंगबेरंगी फुलांनी सजावट करण्यात आलेली आहे. पाच पुजाऱ्यांच्या उपस्थितीत महाआरती आणि महाभिषेक ही पार पडला. श्रावण महिन्यातील आज शेवटचा म्हणजेच चौथा सोमवार आहे. लॉकडाऊनमुळं यंदा भिमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आलेले आहे. इतिहासात पहिल्यांदाच श्रावण मासात भिमाशंकर परिसर भक्तांविना ओस पडला आहे. दरवर्षी श्रावण महिन्यांत लाखोंच्या संख्येने भाविक भिमाशंकर येथे हजेरी लावतात.
कोयना धरणातून पाणी सोडल्यामुळे कृष्णा नदीची पाणी पातळी वाढली. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 31.7 फुटांवर गेली आहे. तर कृष्णेचं पाणी शहरातील सूर्यवंशी प्लॉटमधील चार घरात पाणी शिरले आहे. त्यामुळे
सूर्यवंशी प्लॉटमधील 10 कुटुंबातील 40 लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे.
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे. 20 ऑगस्टपर्यंत दक्षिण कोकणात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत.
किनवट हिमायतनगर रस्त्यावरील खैरगाव तांडा नदीवरील तात्पुरता पूल पुराच्या पाण्याने वाहून गेला. वाहतूक बंद
माजी खासदार निलेश राणे यांना कोरोनाची लागण, कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वॉरंटाईन केले आहे, गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी, असं निलेश राणेंनी म्हटलं
महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांच्या आढावा बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, नाशिकच्या तुपसाखरे लॉन्समध्ये आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांची गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचं पालन न झाल्याचं थोरात यांनीही केलं मान्य
छत्तीसगढ राज्यातील नक्षलग्रस्त सुकमा जिल्ह्यात तैनात असलेल्या सीआरपीएफच्या जवानांनी माणुसकीचा उत्तम उदाहरण देत DRG ( District Reserve Guard) च्या जवानांचा मृतदेह घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढली. सुकमा जिल्ह्यातील भेज्जी रहिवासी डीआरजी जवानाची काल रात्री अपघाती निधलं झाले. त्याने उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला. त्यानंतर त्याचा मृतदेह त्याच्या गावी घेऊन जायचा होता. मात्र, वाटेत आलेल्या इंजरम नदीला पूर आल्याने तब्बल दोन तास मृतदेह वाटेत अडकून होता. सीआरपीएफच्या जवानांनी मृतदेह खांद्यावर घेऊन प्रचंड पुराच्या प्रवाहातून वाट काढत त्या जवानाचा मृतदेह नदी पलीकडे पोहचवला. सीआरपीएफच्या 219 चे द्वितीय कामन्डेंड मोहन बिश्ट यांनी जवानांसोबत खांदा देत संपूर्ण नदी पार केली. ह्या कठीण परिस्थितीत मृतदेह सुरक्षित पाण्याच्या प्रवाहातून पार करून दिल्याबद्दल मृत्यू जवानाच्या परिवाराने सीआरपीएफचे धन्यवाद मानले.
Kolhapur Breaking | राधानगरी तालुक्यात मुसळधार पाऊस, राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडले
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यापाठोपाठ पार्थ पवारही पुण्याकडे रवाना. पुण्यातून मुंबईला जाण्याची शक्यता. कालच्या बैठकीनंतर पार्थ पवार बारामतीतच मुक्कामी होते.
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी वयाच्या 78 व्या वर्षी शिवनेरी किल्ला सर केला. हा गड माझ्यासाठी मोठा नाही. पाऊस असला तरी मी पायीच चढणार, मला हेलिकॉप्टरची गरज नाही. असं म्हणत एका दमात ते ही अवघ्या 50 मिनिटांत राज्यपालांनी शिवजन्मस्थळ गाठलं. जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन आरती ही केली. राज्यपालांच्या सोबतीला स्थानिक आमदार अतुल बेनके उपस्थित होते. महाराजांचे विचार अंमलात आणणारा खरा शिवभक्त असल्याचं राज्यपाल बेनके यांच्याकडे म्हणाले. ते केवळ महाराज नव्हे तर एक अवतार होते. असे अवतार जिथं जन्म घेतात ती भूमी पवित्र असते. म्हणून याठिकाणी येण्याचं मी ठरवलेलं होतं. असं बेनके यांच्याकडे मनमोकळेपणाने बोलले.
मंदिरं आणि धार्मिक स्थळं लोकांसाठी खुली करायला पाहिजेत, असं माझंही म्हणणं आहे. कारण त्या भागात असलेल्या अनेक व्यावसायिकांची रोजीरोटी त्यावर अवलंबून आहे. लोकांच्या धार्मिक भावनाही असतात. त्यामुळं याबाबत मी जरूर पाठपुरावा करील, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची मागणी.
पुणे - शरद पवार यांचा बारामती दौरा रद्द, शरद पवार यांचा बारामती दौरा अचानक रद्द झाल्यानं चर्चांना उधाण, शरद पवार बारामती ऐवजी मुंबईला रवाना
राज साहेब मला माफ करा.. आमच्या येथे पैसा आणि जात या दोन गोष्टी वर राजकारण आहे. दोन्ही माझ्या जवळ नाही." जय महाराष्ट्र.. जय राज साहेब.. जय मनसे; सुसाईड नोट लिहून महाराष्ट्र नवनिर्माण सैनिकानी आत्महत्या, किनवट येथील धक्कादायक घटना
सांगली महापालिकेकडून संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर शहरातील नदी काठच्या भागातील नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देण्यास सुरुवात
बारामती - पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी झाली बैठक. बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार यांची झाली संयुक्तिक चर्चा, पार्थ यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी केले प्रयत्न, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात काल रात्री झाली बैठक, विश्वसनिय सूत्रांची माहिती.
अकोला जिल्ह्यात आढळले कोरोनाचे 14 नवे रूग्ण, जिल्ह्यातील रूग्णांचा आकडा 3242 वर, तर अकोल्यातील कोरोना मृतांचा आकडा 134 वर, सध्या 474 रूग्णांवर उपचार सुरू
पुणेकरांसाठी खूशखबर... पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील पीएमपीएल बस सेवा पुढील आठवड्यात सुरू होणार, पाच महिन्यानंतर पीएमपीएल रस्त्यावर धावणार, 22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता, पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू करण्याचा पीएमपीएल प्रशासनाचा निर्णय, यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे पीएमपीएल प्रशासनानं बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती, यासंदर्भात पालकमंत्री अजित पवार यांनी तत्त्वतः मान्यता दिली आहे, त्यामुळे 22 तारखेला गणेश चतुर्थीला पीएमपीएलचा श्री गणेशा होण्याची शक्यता
पालघर : पालघर जिल्ह्यात काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. धरण क्षेत्रातही चांगला पाऊस होत असल्याने जिल्ह्यातील सर्वात मोठी पाणी क्षमता असलेले सुर्या प्रकल्पाचे धामणी धरण 96.22% भरलं असून , आज दुपारी 12 वाजता धरणाची तीन गेट दिड फुटाने ओपन करण्यात येणार आहेत. त्यामुळे नदी काठावरील गावाना सतर्क राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. परंतू कोणताही धोका नसल्याचा सुर्या प्रकल्पा कडून सांगण्यात आलं आहे
कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातील आलमट्टी धरणातून देखील मागील काही दिवसांपासून पाण्याचा सतत विसर्ग केला जातोय. जवळपास 8 दिवसापासून 1 लाख 80 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू होता. आज सकाळी 8 वाजता देखील 1 लाख 50 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर 1 लाख 19 हजार क्यूसेकने पाण्याचा इन्फ्लो सुरू आहे.
जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या पावसामुळे भामरागड तालुका मुख्यालयाला लागून असलेल्या पर्लकोटा नदीला पूर आला आहे. पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ झाली असून पुराचा पाणी शहरात प्रवेश केला आहे. त्यामुळे अनेक घरे पाण्याखाली आले आहेत. मध्यरात्री 3 वाजेच्या दरम्यान पुराचा पाणी शहरात शिरायला सुरुवात झाल्याने प्रशासन आणि नागरिकांची धावपळ उडाली. पाण्याखाली आलेल्या अनेक घरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून संपूर्ण शहराला सतर्क राहण्याचे आव्हान प्रशासनाने केलं आहे.

कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला, पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राच्या बाहेर,

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 33 फूट इतकी, इशारा पातळीच्या दिशेनं वाटचाल,

राधानगरी धरणाचे पुन्हा 3 स्वयंचलित दरवाजे उघडले, 5684 क्यूसेक पाण्याचा विसर्ग,

कोल्हापूर जिल्ह्यातील एकूण 58 बंधारे पुन्हा पाण्याखाली
औरंगाबाद जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18661 एवढी झाली आहे. त्यापैकी 13642 बरे झाले तर 582 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4437 जणांवर उपचार सुरु .
सध्या कोयना धरणातून सकाळी 8.30 वाजल्यापासून 25604 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु आहे. त्यात वाढ करून सकाळी 11.00 वाजल्यापासून कोयना धरणातून एकूण 35000 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात करण्यात येणार आहे. तर दुपारी 2.00 वाजता एकूण विसर्ग 40000 क्यूसेक्स करण्यात येईल. यामुळ कोयना आणि कृष्णा नदीकाठच्या लोकांनी खबरदारीच्या सूचना कोयना धरण प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत.
पुरंदर आणि धरण परिसरात चांगला पाऊस गेल्या काही दिवसात पडल्याने कऱ्हा नदीवर असलेलं नाझरे धरण 100 टक्के भरले असून, यातून कऱ्हा नदीत 1900 क्यूसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येतो आहे. त्यामुळे नदी काठच्या गावाना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरलेलं भंडारदरा धरण ओव्हरफ्लो, 11 टीएमसी क्षमतेच धरण तांत्रिक दृष्ट्या झाले ओव्हरफ्लो, धरणातील साठा 10 हजार 400 दशलक्ष घनफुटांवर, गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रात 250 मिमी पावसाची नोंद
सातारा- गेल्या चोवीस तासात कोयना धरणात 5 टीएमसी पाण्याची आवक,
कोयनेचे दरवाजे 4 फुटांवर,
25600 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू,
कोयना महाबळेश्वरात पाऊसाचा जोर कायम,
कोयना धरणात 90.57 टीएमसी पाणी साठा
सातारा- गेल्या चोवीस तासात कोयना धरणात 5 टीएमसी पाण्याची आवक,
कोयनेचे दरवाजे 4 फुटांवर,
25600 टीएमसी पाण्याचा विसर्ग सुरू,
कोयना महाबळेश्वरात पाऊसाचा जोर कायम,
कोयना धरणात 90.57 टीएमसी पाणी साठा
मुंबईसह ठाणे, रायगड, पालघरमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून ऑरेंज अर्लट जारी; कोकण, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रातल्या नद्यांच्या पाणीपातळीत वाढ
थंड हवेचे ठिकाण असलेल्या लोणावळ्यात पावसाची कृपादृष्टी सुरूच आहे. गेल्या 24 तासात पावसाने तुफान हजेरी लावत 124 मिलिमीटर पावसाची नोंद केली. यंदाच्या मोसमातील ही उच्चांकी गाठलेली आहे. काल 101 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. एक जूनपासून 2739 मिलिमीटर पाऊस कोसळला आहे. पण गेल्या वर्षी आजच्याच तारखेपर्यंत 5033 मिलिमीटर इतका पाऊस बरसला होता.
औरंगाबाद कोरोनामुळे 14 वर्षीय मुलीचा मृत्यू .घाटी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू. 9 ऑगस्टला उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी सहा वाजता मृत्यू .औरंगाबाद कोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींची संख्या 579 वर. या मुलीला कुठलाही दुसरा आजार नव्हता..
पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे यांची कोरोनावर मात, करोनाची दुसरी टेस्ट निगेटिव्ह, हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेऊन मतदार संघात परतणार
गडचिरोली: जिल्ह्यात सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भामरागडच्या पर्लकोटा नदीला पूर, भामरागड शहरात पुराचं शिरलं, अनेक घरे पाण्याखाली, मध्यरात्री 3 वाजल्याच्या दरम्यान पुराचं पाणी शहरात प्रवेश करायला सुरुवात, भामरागड शहराच्या मुख्य चौकापर्यंत पुराचं पाणी, मध्यरात्री प्रशासन आणि नागरिकांची धावपळ, पाण्याखाली आलेल्या घरातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी आयपीएल खेळत राहणार आहे.
जगभरातील क्रिकेट चाहत्यांना दुसरा धक्का बसणार आहे. कारण, महेंद्र सिंह धोनी पाठोपाठ आता फलंदाज सुरेश रैनाने देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधून निवृत्ती घोषित केली आहे.
उरण येथील सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा, साडेसहा तोळ्याचं सोन्याचं गंठण महिलेला परत दिले. रस्त्यात मिळालेल्या पाकीटात सापडले सुमारे 3 लाख रुपयांचे गंठण. सफाई कामगाराच्या घरात भावाचं लग्न होतं. तर त्याची पत्नी भाकरी बनविण्याचे काम करते.

महेंद्रसिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

महेंद्रसिंह धोनी पाठोपाठ सुरेश रैनाची पण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
बलात्काराचा गुन्हा मागे घेत नसल्याने चक्क पीडित महिलेच्या 10 वर्षीय मुलीला पेटवल्याची घटना पारनेर तालुक्यातील वाघुंडे गावात घडली आहे. आदिवासी समाजातील 26 वर्षीय महिलेवर बलात्कार करण्यात आला होता. याबाबत पोलीस ठाण्यात दाखल केलेला गुन्हा मागे घेत नसल्याने आरोपीने थेट पीडितेच्या 10 वर्षीय मुलीला पेट्रोल टाकून पेटवले. या घटनेत मुलगी गंभीर जखमी असून उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. सुपा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.
चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. एकूण 9438 क्युसेक्स विसर्ग सुरु. सांगली जिल्ह्यात आज दिवसभर पाऊस. कृष्णा नदीची पाणी पातळी पुन्हा वाढून 19 फुटांवर पोहचली.
कोयनेत भूकंप, 10.20 वाजता कोयना परिसरात भूकंपाचा धक्का, कोयनेसह पाटण परिसर हादरले
श्रीनिवास पवार यांच्या घरी केवळ पार्थ पवारच जाणार, अजित पवार आणि सुनेत्र पवार जाणार नाहीत, पार्थ यांच्या काकू शर्मिला पवार यांची माहिती
सातारा : कोयना पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस, कोयनेचे सहा वक्र दरवाजे 11 वाजता उघडण्याचा निर्णय, 10 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करणार, पाऊस थांबल्याने काल दरवाजे उघडले नाही, सध्या कोयना धरणात 86 टीएमसी पाणी साठा
ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण, मंत्री बाळासाहेब पाटील कोरोनाबाधित, सोशल माध्यमावर पोस्ट करत दिली माहिती
सातारा : उरमोडी धरणाचे चार दरवाजे उघडले, 5800 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू,पाऊसाचा जोर वाढल्यामुळे निर्णय, नदीलगतच्या ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा
हिंगोली : यावर्षी दहावी आणि बारावी मध्ये नापास झालेल्या व एटीकेटी पास झालेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या परीक्षा या ऑक्टोबरमध्ये घेतल्या जाणार असल्याची एक्सक्लुझिव्ह माहिती हिंगोली मध्ये एबीपी माझाशी बोलताना शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे .
भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या वाहनाला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर अपघात. गाडीचे नुकसान. सर्व सुखरूप. कोणालाही गंभीर इजा नाही.
गायक एस.पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती खालावली. त्यांना आयसीयूत हालवण्यात आलं असून, व्हेंटिलेटर लावण्यात आला आहे. चेन्नईच्या एमजीएम रुग्णालयाने तसं मेडिकल बुलेटिन जारी केलं आहे.
महाराष्ट्रातील 14 पोलीस अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार जाहीर
नागपूरचे 'पंच तारांकित' हॉस्पिटल सेवन स्टारला तुकाराम मुंडेंचा दणका. कोविडच्या केसेसमध्ये जास्त पैसे घेतले म्हणून 5 लाख दंड आणि 6.66 लाख रुग्णांना वापस देण्याचा आदेश काढला आहे.
पोलीसांच्या बदल्यांनी 15 ॲागस्टपर्यंत दिलेली मुदतवाढ राज्यपालांच्या आदेशानुसास 5 सप्टेंबर वाढविण्यात आली आहे.
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी : युवासेनेच्या बाजूने शाम दिवाण यांचा युक्तिवाद - यूजीसीच्या गाईडलाईन्स या मार्गदर्शक आहेत, त्या बंधनकारक नाहीत. स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन स्थानिक यंत्रणाच हा निर्णय घेतील.
डोंबिवली ते शीळ फाटा मार्गावर दररोज सकाळ संध्याकाळ मोठी वाहतूक कोंडी होत असून यामुळे वाहनचालक अक्षरशः त्रासून गेलेत. रस्त्याची कामं, खड्डे, वाहतूक पोलिसांची अनुपस्थिती, नियोजनशून्य कारभार यामुळे या मार्गावर दररोज अक्षरशः तासनतास वाहतूक कोंडी होत असते. याच वाहतूक कोंडीतून एबीपी माझाच्या प्रतिनिधीने प्रवास करत वार्तांकन केलं. यावेळी शीळफाटा ते काटई नाका हे अवघं 6 किलोमीटरचं अंतर पार करण्यासाठी आम्हाला तब्बल 50 मिनिटं लागली. याच वाहतूक कोंडीत रुग्णवाहिकाही अडकून पडल्याचं पाहायला मिळालं. या सगळ्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी काहीतरी तातडीच्या आणि ठोस उपायोजना करण्याची आवश्यकता असून त्यासाठी प्रशासकीय आणि राजकीय इच्छाशक्तीही तितकीच गरजेची आहे.
आज युवक काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी '20 लाख करोड का हिसाब दो' या मागणीसाठी मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. मात्र आज सकाळपासूनच भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी काँग्रेसचं आंदोलन परतवून लावण्यासाठी भाजप कार्यालयासमोर मोठं शक्तिप्रदर्शन केलं. काँग्रेस कार्यकर्ते जमण्याआधीच भाजपचे आंदोलन सुरू झाले. पंतप्रधान मोदींच्या 'आत्मनिर्भर भारत' च्या घोषणा देत महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवला. इतकंच नाही तर काँग्रेस कार्यकर्ते आलं तर तंगड्या तोडून परत पाठवू असा इशाराही भाजप नेत्यांकडून देण्यात आला. तसेच जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. या संपूर्ण परिसरात तणावाचं वातावरण असल्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
कोकण रेल्वेच्या मार्गावर गणेशोत्सवासाठी स्पेशल गाड्यांची घोषणा ,

14 ऑगस्टला सुटणार पहिली गाडी,

14 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर पर्यंत सुटणाऱ्या 162 गाड्यांची घोषणा,

81 अप तर 81 डाऊन गाड्यांची घोषणा,

लवकर जाहीर होईल अधिकृत वेळापत्रक
मुंबई - विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची बिहार निवडणूक प्रभारी वर्णी लागण्याची शक्यता,

केंद्रीय नेतृत्वाकडून फडणवीस यांना मोठी जबाबदारी देण्याची तयारी,

ऑक्टोबर महिन्यात बिहारच्या विधानसभेचा कार्यकाळ पूर्ण होऊ निवडणूका लागण्याची शक्यता,

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बिहार निवडणुकीला विशेष महत्व,

तर सुशांत सिंघ राजपूत प्रकरणही बिहार निवडणुकीतील कळीचा मुद्दा बनण्याची शक्यता ,

त्या अनुषंगाने महाराष्ट्रातील नेतृत्वाला बिहार निवडणूक प्रभारी पद देण्याचा केंद्रीय नेतृत्वाचा विचार.
गडचिरोली : भामरागड तालुक्यात कोठी इथं नक्षल्यांचा पोलीसांवर हल्ला, हल्ल्यात एक जवान शहीद तर एक गंभीर जखमी, दुष्यांत नंदेश्वर शहीद, तर दिनेश भोसले झाले जखमी, कोठी पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस जवान गावातील दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते, त्याचवेळी झाडल्या गोळ्या, नक्षल्यांच्या ऍक्शन टीमने हल्ला केल्याची माहिती, हल्ल्यानंतर पळून गेले नक्षली
यश दुबे या विद्यार्थ्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी यांचा युक्तिवाद - अनेक विद्यार्थी परगावी अडकले आहेत, परीक्षेसाठी ते पोहोचणार कसे? शिवाय शहरातल्या विद्यार्थ्यांनाही अजून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरु झाली नसल्याने समस्या आहेत. गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्स एकीकडे वाढत्या केसेसचा दाखला देतात आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी नाही. वर्गात शिकवल्यानंतर परीक्षा घेतल्या जातात. वर्ग झाले नाहीत आणि आता परीक्षांचा आग्रह धरला जातोय.
कोल्हापुरात पुन्हा एकदा काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने
,
मोदींनी जाहीर केलेलं आत्मनिर्भर पॅकेज का दिलं नाही असा सवाल
,
सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांचे कार्यकर्ते आमने सामने
पार्थ पवार कुटुंबातील सगळ्यांशी चर्चा करुन निर्णय घेणार, सर्व काका आणि आत्यांशी बोलणार
सुप्रीम कोर्टात यूजीसीच्या सुनावणीला सुरूवात, सुरुवातीला यश दुबे या विद्यार्थ्यांच्या वतीने अभिषेक मनु सिंघवी युक्तिवाद करत आहेत , अनेक विद्यार्थी परगावी अडकले आहेत... परीक्षेसाठी ते पोहोचणार कसे? शिवाय शहरातल्या विद्यार्थ्यांनाही अजून सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू झाली नसल्याने समस्या आहेत. गृहमंत्रालयाच्या गाईडलाईन्स एकीकडे वाढत्या केसेसचा दाखला देतात आणि दुसरीकडे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी नाही, वर्गात शिकवल्यानंतर परीक्षा घेतल्या जातात... वर्ग झाले नाहीत आणि आता परीक्षांचा आग्रह धरला जातोय - अभिषेक मनु सिंघवी
वसई : वसई विरारमध्ये पावसाची रिपरिप सुरू आहे. कालपासून वसई विरार नालासोपाऱ्यात अधून मधून उघडझाप करीत पाऊस पडत आहे. मागच्या 24 तासात वसई तालुक्यात 36 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर जून पासून आजपर्यंत 1897 मिलिमीटर एवढा पाऊस पडला आहे.
गडचिरोली : भामरागड तालुक्यात कोठी इथं नक्षल्यांचा पोलीसांवर हल्ला, हल्ल्यात एक जवान शहीद तर एक गंभीर जखमी, दुष्यांत नंदेश्वर शहीद, तर दिनेश भोसले झाले जखमी, कोठी पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस जवान गावातील दुकानात सामान घेण्यासाठी गेले होते, त्याचवेळी झाडल्या गोळ्या, नक्षल्यांच्या ऍक्शन टीमने हल्ला केल्याची माहिती, हल्ल्यानंतर पळून गेले नक्षली
अंतिम वर्षांच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणीला सुरुवात, कोरोना काळात विद्यापीठाच्या अंतिम वर्षांच्या परीक्षा घेण्याच्या यूजीसीच्या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात युवासेनेची याचिका
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील रहिवासी असलेला राजरत्न तायडे हा 34 वर्षीय तरुण तामिळनाडूतील एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहे. काही दिवसासाठी तो आपल्या गावी आला होता,काल दुपार पासून तो आपली कार घेऊन घरातून निघाला होता. कार हतनूर गावाजवळ असलेल्या तापी नदीच्या पुलावर उभी करून त्याने तापी नदीत उडी मारल्याचे सांगण्यात येत आहे. नदीला सध्या पूर सुरू असल्याने त्याचा मृतदेह अद्याप पर्यंत सापडला नसल्यानं त्याचा मृतदेह शोधण्याचा काम सुरू आहे. कौटुंबिक वादातून ही आत्महत्या केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे या घटने संदर्भात पोलिसात अद्याप कोणतीही नोंद नाही.
पुण्यातील कात्रज बोगद्याजवळ एका बिबट्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.
नाशिक- होम क्वारंटाईन केलेल्या कोरोना पॉझिटीव्ह रुग्णासह त्याच्या वडिलांना शेजारच्यांनी घरात घुसून लाथाबुक्या आणि दगडाने केली मारहाण, पॉझिटीव्ह रिपोर्ट येऊनही तुम्ही घरात कसे राहतात असे म्हणून केली मारहाण, घटनेत रुग्णासह त्याचे वडील जखमी ,
सिडको परिसरातील काल सकाळची घटना, संध्याकाळी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, पोलिसांनी तीन आरोपींना ठोकल्या बेड्या
मुंबईतील कुर्ला नेहरुनगर येथील वत्सलाताईनगरमधील एका चाळीतील तीन मजली घराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली असून यात आतापर्यंत आठ जण ढिगाऱ्याखाली येऊन गंभीर जखमी झाले. जखमींमधील एकाचा सायन रुग्णालयात मृत्यू झाला आहे. जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले असून अधिक तपास सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास नेहरुनगर येथील वत्सलाताई नाईक नगर गल्ली नंबर 6 चेंबूर येथे चंद्रभागा शिरसागर यांच्या घराच्या तीन मजली घरातील दुसऱ्या मजल्याचे दुरुस्तीचे काम सुरु होते. दरम्यान काम सुरु असताना अचानक घरावरील स्लॅब कोसळल्याने आठ जण जखमी झाले. या घटनेत कुटुंबातील 60 वर्षीय प्रभू खंदारे यांचा सायन रुग्णालयात उपचारदरम्यान मृत्यू झाला. तर जखमीत बांधकाम कारणारे कामगार आयुब शेख, संजय भोसले, गौतम गायकवाड, शाहरुख अब्रार शेख, रतनलाल शिंगाडे यांच्यासह क्षीरसागर यांचा नातू आरव शिरसागर, हे गंभीर जखमी झाले आहेत.
भाजप आमदार कालिदास कोळंबकर यांना कोरोनाची लागण,

काल परळच्या ग्लोबल रुग्णालयात केले दाखल,

सौम्य लक्षणं आढळली असून पुढील उपचार सुरू करण्यात आला आहे.,
सांगली जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. प्रामुख्याने आटपाडी आणि जत या भागात डाळिंब क्षेत्र मोठया प्रमाणावर आहे. लॉकडाऊन काळात डाळिंब एक्स्पोर्ट न होऊ शकल्याने मोठा तोटा शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. आता ढगाळ वातावरण रिमझिम पाऊस व हवेतील आद्रता यामुळे डाळिंबावर तेल्या , कुजव्या , डांबरी टिपका रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे हजारो हेक्टर परिसरातील डाळिंब क्षेत्राला याचा फटका बसला असून या रोगामुळे डाळिंब झाडावरतीच कुजून जात आहे.
मुंबईमध्ये बोगस क्लिनअप मार्शलची लूट एबीपी माझा ने दाखवली होती. पूर्व द्रुतगती मार्गावर गोदरेज कंपनी जवळ दोन जणांना लुटत असताना एबीपी माझाचे पत्रकार प्रशांत बढे यांनी त्यांना रोखून त्यांचे कृत्य समोर आणले होते. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. आज अखेर या दोन्ही तोतयांना विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सुफियांन नाखवा आणि विक्रम कुटे अशी त्यांची नावे आहेत. यातील सुफियांन हा दिव्याचा रहाणार असून या अगोदर विविध वॉर्ड मध्ये क्लिन अप मार्शलचे काम करायचा तर विक्रम नेमके काय काम करत होता याचा पोलीस तपास करीत आहेत.
कुर्ला नेहरूनगर येथील वत्सलाताईनगर मधील एका चाळीतील तीन मजली घराचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली असून या घटनेत आतापर्यंत 8 जण ढिगाऱ्याखाली येवून गंभीर जखमी झाल्याची माहीती मिळाली आहे. जखमी मधील एकाचा सायन रूग्णालयात मृत्यू झाला आहे .
जखमींना राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी अग्निशमक दल दाखल झाले असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. मिळालेल्या माहिती नुसार, काल सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास नेहरू नगर येथील वत्सलाताई नाईक नगर गल्ली नंबर 6 चेंबूर येथे चंद्रभागा क्षीरसागर यांच्या घराच्या तीन मजली घरातील दुसऱ्या मजल्याचे दुरुस्तीचे काम सुरू होते. दरम्यान काम सुरू असताना अचानक घरावरील स्लॅब कोसळल्याने आठ जण जखमी झाले आहे. या घटनेत कुटुंबातील प्रभू खंदारे(६०) यांचा सायन रूग्णालयात उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. तर जखमीत बांधकाम कारणारे कामगार आयुब शेख, संजय भोसले, गौतम गायकवाड, शाहरुख अब्रार शेख, रतनलाल शिंगाडे यांच्या सहीत क्षीरसागर यांचा नातू आरव क्षीरसागर हे गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
सातारा - साताऱ्याच्या पश्चिम भागात पाऊसाचा जोर वाढला असून कोयना धरणात झपाट्याने वाढ होताना पहायला मिळत आहे. सध्या कोयना धरणात 80 टीएमसी पेक्षा जास्त पाणी साठा झाल्यामुळे आज 11 वाजल्यापासून कोयना धरणाच्या पायथा विद्युतगृहातून 2100 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. तर कोयना धऱणात हळू हळू पाण्याची आवकही वाढत चालली असून कालच्या पाऊसाचा परिणाम आज पाहायला मिळणार आहे. कोयना धरणात सुमारे एक लाख क्युसेक्स पेक्षा जास्त पाणी कोयना धरणात यायला सुरवात होईल असे सांगितले जात आहे. त्यामुळे कोयनेचे सहा वक्र दरवाजे कोणत्याही क्षणी उघडले जाणार असल्याचे कोयना प्रशासनाने कळवले असून कोयना नदी काठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. त्याचबरोबर वीर धरणातूनही पाणी विसर्ग वाढवण्यात आला असून वीर धरणातून 23 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरु केला आहे. त्याचबरोबर धोम धरणाच्या वरच्या बाजूला म्हणजेच क्षेत्र महाबळेश्वरच्या पायथ्याला असलेल्या बलकवडी धरणातून धोम धरणात पाणी सोडण्यास सुरवात केली आहे. त्याचबरोबर उरमोडी धरणातूनही पाण्याचा वसर्ग सुरु करण्यात आला आहे.

पार्श्वभूमी

कोरोना काळात कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवलं पाहिजे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या सूचना


राज्यात सुरू असलेल्या महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून कोरोना रुग्णांना मोफत उपचार मिळतील यासाठी जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी विशेष लक्ष देण्याची आवश्यकता आहे. तालुकास्तरावर रुग्णवाहिका उपलब्ध राहतील याकडे जिल्हाधिकऱ्यांनी लक्ष घालावे. लवकर निदानासाठी काही जिल्ह्यांमध्ये कॉण्टॅक्ट ट्रेसिंग वाढवण्याची गरज असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. चाचण्यांची क्षमता पुरेशी असून त्याचा पूर्णपणे वापर करण्याचे आवाहन आरोग्मंत्र्यांनी केले. कोरोना काळात ट्रेसिंग वाढवलं पाहिजे अशा सूचना काही जिल्ह्यांना देण्यात आल्या आहेत. एक कोरोन बाधित रुग्ण संबंधित कमीत कमी 15 लोकांचे ट्रेसिंग केले पाहिजे, या राज्य सरकारच्या सूचना आहेत. मात्र खालील जिल्ह्यात कमी ट्रेसिंग होत आहे.


मुंबईत कोरोनाच्या चाचण्या वाढवा, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


देशाचा मृत्यूदर 1.92 टक्क्यांवर आहे. मात्र, मुंबईतील ऑगस्टमधील 17 दिवसांत मुंबईचा मृत्यूदर 5.40 टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज आहे. ही मागणी करणारे आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, सातत्याने आग्रह करून सुद्धा मुंबईत चाचण्यांची संख्या मर्यादित ठेवण्याचे कारण आता कळेनासे झाले आहे. मुंबईतील मृत्यूदर सातत्याने वाढत असल्यानेच पुन्हा एकदा आग्रह आहे की, मुंबईत चाचण्यांची संख्या तातडीने वाढविण्यात यावी. जुलै महिन्यात मुंबईमध्ये प्रतिदिन 6574 चाचण्या करण्यात आल्या आणि या महिन्याचा मृत्यूदर हा 4.91 टक्के इतका होता. ऑगस्ट महिन्यात आतापर्यंत प्रतिदिन 7009 चाचण्या करण्यात आल्या. या 17 दिवसांचा मृत्यूदर हा 5.40 टक्के इतका झाला आहे. मुंबईची एकूणच लोकसंख्या पाहता प्रतिदिन 7000 चाचण्या ही संख्या अतिशय कमी आहे. देशाचा मृत्यूदर आता 1.92 टक्क्यांवर आला आहे, असे असताना मुंबईचा मृत्यूदर सातत्याने 5 टक्क्यांच्या वर असणे हे अतिशय चिंताजनक आहे.


सांगलीतील पूर परिस्थिती रोखण्यासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटीलांकडून कोयना धरणाची पाहणी


सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीतील पाणी पातळी इशारा पातळी जवळ आली आहे. सध्या पाऊस ओसरला जरी असला तरी पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे जर पुन्हा कोयना धरणातून विसर्ग वाढवला गेला तर सांगलीत पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कोयना धरणाची पाहणी केली.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.