LIVE UPDATES | पक्षप्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर

आयुष मंत्री श्रीपद नाइक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला करीनाची इन्स्टाग्राम पोस्ट, करीना-सैफ पुन्हा आई-बाबा बनणार! काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हार्ट अटॅकने निधन राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय, 13 सप्टेंबरऐवजी 20 सप्टेंबरला परीक्षा कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 13 Aug 2020 07:33 PM
केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि त्यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांचा वाद आता विकोपाला गेलाय. हर्षवर्धन जाधव यांनी रावसाहेब दानवे यांच्या मुलगी संजना यांच्यापासून घटस्फोट घेण्यासाठी फॅमिली कोर्टात दावा केला असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबरोबरच मला रावसाहेब दानवे आणि मुलगी संजना यांनी आत्महत्येस प्रवृत्त केलं, त्याचे पुरावे देखील मी दिलेले आहेत. त्यांनी मानसिक आणि सामाजिक त्रास दिला आहे. माझ्या घरी लेडीज कॉन्स्टेबल रावसाहेब दानवे यांनी ठेवल्या आहेत आणि मी घरी गेलो तर त्या माझ्यावर गुन्हा दाखल करतील असं मला सांगितलं जातं. माझ्या या भूमिकेनंतर रावसाहेब दानवे मोठ्या त्वेषाने अंगावर येतील. या बरोबरच माझ्याकडे पुरावे आहेत ते मी जर मीडियाला दिले तर रावसाहेब दानवे आणि संजना यांना समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, असे देखील हर्षवर्धन यांनी म्हटले आहे. याबरोबरच यापुढे मला कोणीही रावसाहेब दानवे यांचे जावई म्हणू नये असं त्यांनी आहे.
हिंगोली जिल्ह्यात जिल्ह्यात पावसाचा जोर कायम सकाळपासून पावसाची रिपरिप सुरूच, आज सलग तिसरा दिवस सूर्यदर्शन नाही
पक्षप्रमुख शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांना भेटण्यासाठी पार्थ पवार सिल्व्हर ओकवर पोहचले.
खासदार नवनीत राणा यांना श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे वॉकहार्ट हॉस्पिटलच्या वैद्यकीय सल्ल्यानुसार तात्काळ मुंबईला नेण्याचा निर्णय, अॅम्बुलन्सद्वारे नवनीत राणांसह आमदार रवी राणा मुंबईकडे रवाना, लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार पुढील उपचार
पुणे शहरात आज सकाळपासून संततधार पाऊस सुरू असल्याने, शहराला पाणी पुरवठा चार ही धरणात पाणी साठ्यात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळे खडकवासला धरणातून 11 हजार 700 क्युसेक पाण्याचा मुठा नदी पात्रात विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नदीपात्रा लगत राहणार्‍या नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.
लॉकडाऊनमध्ये अदानी इलेक्ट्रिसिटी तर्फे आलेल्या भरमसाठ बिलाने नागरिक हवालदिलं झाले आहेत.या भरमसाठ बिलच्या विरोधात आज शिवसेनेने अदानी इलेक्टरीसीटी च्या चेंबूर येथील कार्यालया समोर आंदोलन केले. कोरोना ह्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या टाळेबंदी व संचारबंदीमुळे गेले 4 महिन्यांपासून नोकरी, व्यवसाय यासारखे छोटे-मोठे उद्योगधंदे संपूर्ण बंद होते. अशा परिस्थितीत अदानी इलेक्ट्रिसिटी ह्या वीज पुरवठा कंपनीने वीज रिडींग न घेता नागरिकांना सरासरी भरमसाठ वाढीव लाईट बिल देण्यात आली. या विरोधात चलो -चेंबूर असे आवाहन शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी केले होते.याला शिवसैनिकांनी मोठा प्रतिसाद देत या आंदोलनात ते सहभागी झाले.या वेळी शिवसैनिकांनी अदानी च्या वीज बिलांची होळी करत जोरदार घोषणाबाजी केली.सध्या आम्ही अदानी च्या अधिकाऱ्यांच्या कानात जाऊन जनतेच्या समस्या सांगितल्या आहेत.तरी देखील त्यांनी जर या बाबत उपाय केले नाही तर कानाखाली मारून समजवू अशी प्रतिक्रिया या वेळी शिवसेना आमदार लांडे यांनी दिली.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर एस टी परिवहन महामंडळाची बस आणि इको ओमनी कार यांच्यात अपघात होऊन भीषण आग लागली. इको कार आणि एस टी बसच्या अपघातानंतर बस आणि कारने पेट घेतला. वरई फाट्याजवळ हा भीषण अपघात घडला. सी.एन.जी. इको कारला धडक दिल्याने अपघात होऊन बसने पेट घेतला. अपघातात बस आणि कार पूर्णपणे जळून खाक झाली. दरम्यान मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
खासदार सुप्रिया सुळे अजित पवारांच्या भेटीसाठी मंत्रालयात, भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट
कोकणात जाणाऱ्या नागरिकांना गणेशोत्सव सुरू होण्याच्या २ दिवस अगोदर व परतीच्या प्रवासात २ दिवस टोलमधून सवलत मिळणार. नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानक,आरटीओ कार्यालयात आपला वाहन क्रमांक,वाहन मालकाचे नाव व प्रवास तारीख नमूद केल्यास तात्काळ टोल माफी स्टिकर देण्याचा निर्णय घेण्यात आला,
एमएसआरएडिसी एकनाथ शिंदे यांची माहिती

पीडब्ल्युडी, एमएसआरडीसी, आरटीओ तसेच पोलीस गणेशोत्सवादरम्यान एकमेकांत समन्वय ठेवून गणेशोत्सव साजरा करण्याकरिता गावी जाणाऱ्या नागरिकांना सर्वोतोपरी सहकार्य करण्यासंदर्भातील सूचना बैठकीदरम्यान दिल्या.
आज पहाटे नाशिक शहरातील दोन ज्वेलरी शॉप फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कोरोनाबाबत सर्व खबरदारी घेत चोरटे पीपीई किट घालून आल्याच सिसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झालं आहे. जेलरोड भागातील तेजस्वी ज्वेलर्स आणि काठे गल्लीतिल मोहिनीराज ज्वेलरी शॉप फोडण्याचा प्रयत्न या चोरट्यांकडून करण्यात आला आहे. जेलरोड येथील स्थानिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे चोरांचा डाव फसला आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु आहे.
पर्युषण काळात जैन मंदिरात जाऊन प्रार्थनेची परवानगी देण्यास राज्य सरकारचा नकार, समूह संसर्गाचा धोका असल्याने कोरोना काळात मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र येण्याची परवानगी देणं शक्य नाही. 15 ते 23 ऑगस्ट दरम्यान चालणाऱ्या पर्युषण काळात जैन प्रार्थना स्थळं वापरु देण्याची परवानगी मागत हायकोर्टात याचिका, मुंबई उच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यांना कोणताही दिलासा देण्यास नकार, याचिकेची पुढील सुनावणी सप्टेंबरपर्यंत तहकूब

सांगली- मिरजेचे भाजपचे विद्यमान आमदार सुरेश खाडे यांना कोरोनाची लागण,

सुरेश खाडे यांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना देखील कोरोनाची लागण,

खाडे यांच्या कुटूंबातील एकूण 8 जणांना लागण झाल्याची मनपा उपायुक्तांची माहिती,
कोल्हापूर : दुधाला अनुदान द्या नाहीतर आमची जनावरं तुम्ही सांभाळा,

दुधाच्या दरासाठी राजू शेट्टी पुन्हा एकदा आक्रमक,

सोलापूरमध्ये 17 ऑगस्टला जनावरांसह मोर्चा काढणार,

21 तारखेच्या आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याचा आरोप
पंढरपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा कार्याध्यक्ष राजू बापू पाटील यांचा कोरोनाने मृत्यू , पंढरपूर तालुक्यातील भोसे गावाचे रहिवासी होते . कोरोनामुळे काही दिवसांपूर्वी त्यांचे लहान बंधू महेश यांचेही निधन झाले होते. सोलापूरमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते . शरद पवारांचे अतिशय निकटवर्तीय कुटुंब म्हणून सोलापूर जिल्ह्यात ओळख
कोरोना बाधीत रुग्णाच्या संपर्कात आलेले तसेच नवीन संशयित लोकांचे स्वॅब तपासणी केली असता आज बीड जिल्ह्यात 115 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत आज 658 जणांची तपासणी केली असता 543 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आढळून आले आहेत

बीड,40, अंबाजोगाई 9, परळी 15, केज14 , धारूर 5, माजलगाव 21, शिरूर ,4, पाटोदा 1 , गेवराई 6,वडवणी 1

सध्या बीड जिल्ह्यात 2137 कोरोना बाधीत रुग्णांची नोंद झाली आहे तर 908 जण बरे होऊन घरी गेले आहेत 1229 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत
गोंदीया जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे एकाच घरातील दोघांचा मृत्यू मृतकामध्ये पिता पुत्राचा समावेश दोन्ही मृतक तिरोडा तालुक्यातील काल रात्री मुलाचा नागपुरात मृत्यू तर वडिलांचा आज सकाळी गोंदीयातील कारनटाईम सेंटर मध्ये मृत्यू
मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या 42 व्यक्तींच्या नातेवाईकांस एसटी महामंडळात नोकरी देणार. सरकारने कबूल केलेल्या पैशांपैकी उर्वरित रक्कमही देण्याचा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय.
मुंबई शहर बेटावरील उपकरप्राप्त इमारतीत राहणाऱ्या लाखो रहिवाशांना इमारत पुनर्विकासाबाबत दिलासा म्हाडा अधिनियमात सुधारणा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील सिल्वर ओकला पोहोचले.
ठाणे : ठाण्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली असून आतापर्यंत 40 ते 50 मिलिमीटर इतका पाऊस बरसला आहे. हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी करून या पावसाबाबत आधीच सुचित केले होते. त्यानुसार मुसळधार पाऊस बरसायला आता सुरुवात झाली आहे. तीन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून नागरिकांनी अलर्ट राहण्याचे आवाहन ठाणे महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे.
शरद पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देण्यास पार्थ पवार यांचा नकार. मला यावर काही बोलायचं नाही असं पार्थ पवार यांनी केलं स्पष्ट
एमपीएससीकडून घेण्यात येणारी राज्यसेवा पूर्व परीक्षा 13 सप्टेंबर ऐवजी 20 सप्टेंबरला

13 सप्टेंबरला NEET परीक्षा देशभरात होत असल्याने दोन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यास उपकेंद्रांची उपलब्द्धता व इतर प्रशाकासकीय अडचणीमुळे राज्यसेवा पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून, आता 20 सप्टेंबर रोजी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यात बैठक सुरू,

वाय बी चव्हाण सेंटरला सुरू आहे बैठक,

सुशांतसिंह प्रकरणावर सुरू आहे चर्चा
मीरारोड : घोडबंदर रोडवर आज सकाळी ८ च्या सुमारास ठाण्याहून काशीमीऱ्याच्या दिशेने येणाऱ्या टीएमटी बसचे ब्रेक फेल झाल्याने बस डिवाइडर वर चढल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक काशिमिरा वाहतूक शाखेचे पोलीस, स्थानिक पोलीस तसेच ठाणे परिवहन अधिकारी देखील घटना स्थळी हजर झाले होते. क्रेनच्या मदतीने बस डिवाइडर वरुन काढण्यात आली आहे. बसचा अपघात कोणत्या कारणाने झाला हे अद्याप स्पष्ट सांगण्यात आले नसून, त्याचा तपास करून मगच अपघाताचे योग्य ते कारण समजेल अशी माहिती घटना स्थळी हजर असणाऱ्या वाहतूक पोलीसां कडून देण्यात आली आहे.
विरार : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर आज दहिकला उत्सव साजरा न करण्याचा निर्णय पालघर जिल्हा दहीहंडी समन्वय समिती ने घेतला आहे. तसेच पालघर जिल्हा दहीहंडी समन्वय समिती यांच्या माध्यमातून आज पालघर जिल्ह्यातील 100 गोविंदा पथक आणि महिला गोविंदा पथकांनी हा उत्सव साजरा न करता. रक्तदान शिबिर आयोजीत केलं आहे. या रक्तदान शिबीरात “साथिया ब्लड बॅंक यांनी या उपक्रमाला पाठिंबा दिला. प्रत्येक गोंविदा पथकातील 15 व त्या पेक्षा जास्त युवकांनी आज रक्तदान केलं आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज राज्य सरकारच्या विरोधात महाराष्ट्रात डफली आंदोलनाचे आव्हान करण्यात आले असल्याने भिवंडी शहरातील बस स्थानकात डफली वाजवत वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली . या दरम्यान बस स्थानकात जोरजोरात घोषणाबाजी देखील करण्यात आली, दुसऱ्या राज्यातून महाराष्ट्रात येण्यासाठी ट्रेन सेवा सुरू आहे मात्र महाराष्ट्रात एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी बस सेवा का सुरू नाही , गोरगरिबांना आपल्या जिल्ह्यात जाण्यासाठी खाजगी वाहनांसाठी 5 ते 10 हजार मोजावे लागत असल्याने सरकारचं हे लॉकडाऊन पूर्णतः फेल ठरलं आहे त्यामुळे लवकरात लवकर बस ,इतर सर्व वाहतूक सुरू करावे तसेच लावण्यात आलेलं लोकडाऊन हटवण्याची मागणी देखील आंदोलकांनी यावेळी केली आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावलेल्या मान्यवरांची पद्म पुरस्कारासाठी शिफारस करण्याचे केंद्र सरकारने राज्य सरकारला निर्देश दिले आहेत. 26 जानेवारी 2019 रोजी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी मान्यवरांच्या नावाची शिफारस केंद्र शासनाकडे करण्यासाठी राज्याचे समिती गठित समितीच्या अध्यक्षपदी पहिल्यांदा आमदार झाले आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची निवड करण्यात आली आहे. याशिवाय समितीमध्ये सुभाष देसाई, सुनील केदार, अमित देशमुख, उदय सामंत, धनंजय मुंडे, आदिती तटकरे, दत्तात्रय भरणे, याशिवाय प्रधान सचिव व मुख्य राजशिष्टाचार अधिकारी सदस्य यांचा समावेश आहे.
रत्नागिरी : विना टेस्ट कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांकरता आजचा दिवस महत्त्वाचा. कारण यापुढे कोकणात येणाऱ्या चाकरान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक असणार आहे. शिवाय, सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासनानं काही नवे नियम देखील जारी केलेत. सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण या चेक नाक्यावर चाकरमान्यांची नोंदणी करत त्यांना पुढे सोडलं जात आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील सहा प्रमुख शहर पुढचे दहा दिवसासाठी पूर्णतः बंद असणार आहेत. आज बीड शहर तसेच माजलगाव आष्टी केज परळी आणि अंबाजोगाई शहर पूर्णतः बंद आहेत. आज या सहा शहरातील पोलीस बंदोबस्त ही वाढवण्यात आला आहे. आतापर्यंत जे लॉकडाऊन बीड जिल्ह्यामध्ये झाले त्या लॉकडाऊनच्या काळामध्ये किमान किराणा दुकान भाजीपाला दुकान आणि मेडिकल स्टोअर चालू असायची. या लॉकडाऊन अंतर्गत मात्र पुढचे दहा दिवस भाजीपाला आणि किराणा दुकान पूर्णतः बंद असणार आहेत. विशेष म्हणजे मेडिकल स्टोअर जे हॉस्पिटलला लागून आहेत त्याच मेडिकल स्टोअर उघडण्याची मुभा या काळात देण्यात आली आहे.
बुलढाणा : जिल्हयातील पाडळी येथे कुत्री मागे लागल्यामुळे जीवाच्या आकांताने सैरावैरा पळत असताना शेतातील तुडुंब पाण्याने भरलेल्या विहिरित पडून दोन हरणांचा दुर्दैवी मृत्यु झाला. शेतकऱ्यांने तात्काळ वन विभागाला व रेस्क्यू टीम ला फोन करून माहिती दिली पण वन अधिकारी किंवा कर्मचारी वेळेत न पोहचल्याने दोन हरिनाना आपला जीव गमवावा लागला.
पिंपरी चिंचवडमध्ये टॅटू वरून एका तरुणाचा खून झाल्याचं तपासात समोर आलंय. 8 ऑगस्टला घडलेल्या हत्येत सात आरोपींना अटक केल्यानंतर तपासात हे कारण समोर आलंय. गुन्हेगारी पार्श्वभूमीचे मयूर मडकेची मंगेश मोरे ने हत्या केलीये. दोघांच्या नाव आणि आडनावात MM येत असल्याने दोघांनी तसे टॅटू काढले. यावरून दहा वर्षाच्या मैत्रीत फूट पडली. गेली महिनाभर सुरू असलेल्या वादाचे पडसाद थेट हत्येत झाले. यातून मयूर मडकेची हत्या केल्याचं मंगेश मोरेसह सात आरोपींनी कबुली दिली. मात्र प्रकरण इथेच थांबलेलं नसून सोशल मीडियावर 'वेट ऍण्ड वॉच' असे मेसेज मयूर मडकेचे साथीदार फिरवत आहेत.
वारकरी संप्रदायाच्या मागण्यांकडे या हिरण्यकश्यपू सरकारने दुर्लक्ष केल्याने आता 31 ऑगस्ट रोजी चलो पंढरपूर आंदोलन करीत 1 लाख वारकरी पंढरपूरमध्ये पोचणार असल्याची घोषणा विश्व वारकरी सेनेने केली आहे.
क्रिकेटमध्ये करिअर करता आले नाही म्हणून मुंबईत एका तरुणाने आत्महत्या केली. मुंबईतील मालाड पूर्वेत 27 वर्षाच्या सिटी क्रिकेटर करण तिवारी या तरुणाने सोमवारी रात्री आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. कोरोनामुळे करिअरमध्ये आयपीएल किंवा मोठ्या मॅचमध्ये खेळायची संधी हुकल्याने करण तिवारीनी आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या तरुणाने शेवटचा फोन राजस्थानमध्ये असलेल्या आपल्या मित्राला केला होता. मी मानसिक तणावात असून मी आत्महत्या करत असल्याचं त्याने मित्राला सांगितलं. यानंतर मित्राने लगेच करणच्या बहिणीला सांगितलं. हे कळताच करणच्या बहिणीने आईला हा प्रकार सांगितला. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. आईने घराचं दारं उघडलं आणि समोर करणचा मृतदेह होता. पुढील तपास कुरार पोलिस करत आहेत.
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चार धरणांपैकी खडकवासला धरण 100 टक्के भरले आहे. त्यामुळे मुठा नदीच्या पात्रात 500 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास या विसर्गात वाढ होवू शकते अशी माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
जून आणि जुलैत पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाला नव्हता, त्यामुळे पुणेकरांसमोर पाणीकपातीचे संकट उभे होते. मात्र मागील आठवड्यात झालेल्या पावसाने खडकवासला पूर्ण भरले असून या चार धरणात मिळून 64 टक्के पाणीसाठा झाला आहे. पुढील चार दिवस या भागात पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून धरणे भरली तर या भागातील शेतीचाही प्रश्न सुटणार आहे
कोरोना काळात घरगुती वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सूट मिळणार, याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येण्याची दाट शक्यता, युनिटच्या वापरानुसार वीज बिलात सवलत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता, ऊर्जा विभाग आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता
कोरोना काळात घरगुती वीज ग्राहकांना आलेल्या वाढीव वीज बिलात सूट मिळणार, याबाबत आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव येण्याची दाट शक्यता, युनिटच्या वापरानुसार वीज बिलात सवलत देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न, 10 ते 30 टक्क्यांपर्यंत वीज बिलात सवलत मिळण्याची शक्यता, ऊर्जा विभाग आज मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्याची शक्यता
विजापूरहून बेंगलोर जाणाऱ्या बसला आग, पाच जणांचा होरपळून मृत्यू,

कर्नाटकामधील केआरहल्ली गावाजवळची घटना, कुक्केरी श्री ट्रॅव्हल्स कंपनीची बस,

काल रात्री 9 वाजता ही बस विजापूरहून बंगलोर निघाली होती,

एकूण 29 जण या बस मधून प्रवास करत होते, आगीचं कारण अस्पष्ट
औरंगाबाद जिल्ह्यातील 108 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 17412 एवढी झाली आहे. त्यापैकी 12833 बरे झाले तर 562 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 4017 जणांवर उपचार सुरु .
गोंदीया : गोंदीया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्याअंतर्गत येणाऱ्या ददलकुही गावच्या रस्त्यावर घातपात घालण्यासाठी नक्षलवाद्यांनी पेरुन ठेवलेली स्फोटके पोलिसानी केली जप्त केली आहेत. त्यामुळे मोठा घातपात टळला.
बीड जिल्ह्यात काल दिवसभरात एकूण 614 अहवालांपैकी 90 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 520 जणांचे अहवाल निगेटिव्ह असून 4 बाकी आहेत. अंबाजोगाई तालुक्यात 8, परळी-20, केज-10, बीड-28, धारुर-3, माजलगाव-5, शिरुर-4, पाटोदा-1, आष्टी-6 तर गेवराई तालुक्यात 5 असे एकूण 90 जणांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्ण संख्या 2 हजार 138 झाली आहे. यात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 805 आहे. तर 51 जणांचे मृत्यू झाले असून 1 हजार 282 इतके उपचाराखालील रुग्ण आहेत.
डी एस कुलकर्णी यांची मुलगी अश्विनी देशपांडे यांचं तीन ऑगस्टला रात्री दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. त्यांचे पती संजय देशपांडे यांच्या सांगण्यानुसार त्या मागील सहा वर्षांपासून किडनीच्या विकाराने त्रस्त होत्या. त्याचबरोबर त्यांना मधुमेहाचाही त्रास होता. त्यासाठी त्यांच्यावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती. तीन ऑगस्टला रात्री त्यांचा मृत्यू झाल्यानंतर डी एस केंना तुरुंगात असल्याने अंत्यविधीला उपस्थितीत राहता आलं नाही. त्यामुळे 16 ऑगस्टला असलेल्या तेराव्याला उपस्थितीत राहता यावं यासाठी तात्पुरता जामीन मिळावा यासाठी डी एस केंनी अर्ज केला होता तो मंजुर झालाय.
#SushantSinghRajpoot सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरण, रिया चक्रवर्तीच्या याचिकेवर सुनावणी पूर्ण, न्यायालयाने निर्णय राखून ठेवला

सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं वयाच्या 70 व्या निधन झालं आहे. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रुग्णालयताचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
सुप्रसिद्ध शायर राहत इंदौरी यांचं वयाच्या 70 व्या निधन झालं आहे. राहत इंदौरी यांना कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची लागण झाल्याचं समोर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आलं होतं. रुग्णालयताचं त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मातोश्री निवासस्थानी शिवबंधन बांधून शिवसेना पक्ष प्रवेश केला. यावेळी सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.
कोरोनावरील जगातील पहिली लस बनवल्याचा रशियाचा दावा, अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची घोषणा
कोरोनावरील जगातील पहिली लस बनवल्याचा रशियाचा दावा, अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांची घोषणा
वाढीव वीज बिलाविरोधात मनसेने पुण्यात आंदोलन केलं,
शिरुरमध्ये महावितरणचे कार्यालय फोडले. मागील अनेक महिन्यापासून सर्वसामान्य नागरिक वाढीव वीज बिलामुळे त्रस्त झाले आहेत. याचा निषेध करण्यासाठी मनसेने हे आंदोलन केलं. मनसेच्या चार ते पाच पदाधिकाऱ्यांनी महावितरणचे कार्यालय फोडले. शिरुर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
कोविड सेंटर मधील बेपत्ता रुग्णाचा मृतदेहच रस्त्यावर आढळून आल्याची घटना जळगाव शहरातील अमळनेर शहरात घडली असून या घटनेने आरोग्य यंत्रणेची लखतरे वेशीवर टांगली गेल्याचे पाहायला मिळत आहे. कोरोनाची लक्षणे आढळून आल्याने केलेल्या तपासणीत सुनील वानखेडे हे पॉझिटिव्ह आल्याने त्यांना नऊ ऑगष्ट रोजी अमळनेर शहरातील ग्रामीण रुग्णलयात असलेल्या कोविड सेंटर मध्ये भरती करण्यात आले होते,24 तास उपचार सुरू असतानाच सुनील वानखेडे हे कोविड रुग्णालयातुन सकाळ पासून बेपत्ता झाल्याचे लक्षात आल्याने प्रशासनाच्या वतीने पोलिसात बेपत्ता असल्याची नोंद करण्यात आली होती.
तिरुपती : लॉकडाऊनचे निबंध शिथिल झाल्यावर तिरुमला तिरुपती देवस्थान भाविकांना 11 जून रोजी दर्शनासाठी खुले केल्यापासून देवस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांचा कोरोनाने मृत्यू झाला आहेश तर अन्य 743 कर्मचाऱ्यांना या विषाणूची लागण झाली आहे. देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल कुमारसिंग यांनी ही माहिती देताना सांगितले की, गेल्या महिनाभरात देवस्थानच्या एकूण 743 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 402 कर्मचारी पूर्णपणे बरे होऊन पुन्हा कामावर रुजू झाले आहेत, तर बाकीच्या 338
कर्मचाऱ्यांवर उपचार सुरु आहेत. यासाठी देवस्थानची श्रीनिवासम, विष्णु निवास व माधवम ही विश्रामगृहे कोविड-19 केंद्रे म्हणून वापरण्यात येत आहेत. सिंग म्हणाले की, जुलै महिन्यात देशभरातून आलेल्या 2.38 लाख भाविकांनी दर्शन घेतले.भाविकांसाठी रोजचा कोटा नऊ हजारांचा आहे. शनिवारी 8 ऑगस्ट
रोजी सुमारे 8500 भाविक दर्शनासाठी आले. येथे देशभरातून भाविक दर्शनाला येतात.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात सकाळ मराठा समाजाने कर्जत बंदची हाक दिली आहे. आज सकाळपासून कर्जत मध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आलाय. खोटा अट्रोसिटीचा गुन्हा दाखल केल्याने हा बंद पुकारण्यात आलाय. लक्ष्मण निकात आणि सचिन शेटे यांच्यात रस्त्याच्या कारणावरून वाद झाले होते. मात्र या वादातून सचिन शेटे यांनी कर्जत पोलिस ठाण्यात तक्रार दिल्याने लक्ष्मण निकात, लहू निकात यांसह तीन जनांविरोधात अट्रोसिटीचा गुन्हा दाखक करण्यात आला. दाखल केलेला गुन्हा खोटा असल्याचा आरोप करत सकाळ मराठा समाजाने कर्जत बंदची हाक दिली. त्याचप्रमाणे दाखल केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे अशी देखील मागणी केली आहे.
बुलढाणा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने गणपती उत्सव कसा साजरा करावा त्याविषयी सूचना जारी केल्या आहेत, त्याच पद्धतीने सार्वजनिक गणेश उत्सव साजरा करण्याची परवानगी जिल्हा प्रशासनाने द्यावी अन्यथा अन्नत्याग आंदोलन करण्याचा इशारा मलकापूर येथील अनेक गणेश मंडळांनी दिला आहे. यामुळे जिल्हा प्रशासन आणि गणेश मंडळ हा वाद वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई मनसे कार्यकर्त्यांनी MSEB चं कार्यालय फोडले, अवाजवी बिल वाढीची हंडी मनसेने फोडली, वाशीच्या सेक्टर 17 येथील MSEB कार्यालयाची तोडफोड, राज ठाकरे यांनी वाढीव वीज बिलाबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले होते, पत्रात मनसे झटका देईल, अशा इशारा दिला होता, नागपूरच्या घटनेनंतर नवी मुंबईतही उद्रेक
पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून यवतमाळ जिल्ह्यातील मांगली - मार्किं 2 येथील कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यासाठी विनंती केली आहे.

पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांना पत्र लिहून यवतमाळ जिल्ह्यातील मांगली - मार्किं 2 येथील कोळसा खाणीचा लिलाव थांबविण्यासाठी विनंती केली आहे.

केरळमधील विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले कॅप्टन दीपक साठे यांच्या पार्थिवावर आज मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याचं पार्थिव चांदिवली इथल्या निवासस्थानी आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात विक्रोळी टागोरनगर येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. केरळमधील कोझिकोड इथल्या विमानतळावर शुक्रवारी झालेल्या अपघातात कॅप्टन दीपक साठे यांचा मृत्यू झाला होता. साठे हे मुंबईचे रहिवासी होते. त्यांचे पार्थिव रविवारी मुंबईत आणून वांद्र्यातील भाभा रुग्णालयात ठेवण्यात आले होते.
हिंगोली जिल्ह्यात काल सकाळपासून पावसाची रीपरीप सुरु आहे. जिल्ह्यात काल दिवसभर कधी मुसळधार तर कधी हलक्या सरी कोसळल्या. रात्रभर देखील पावसाची रिपरिप सुरू होती. झडीच्या स्वरूपाचे वातावरण असल्याने कालपासून शेतकऱ्याची शेतातील कामे खोळंबली आहेत. आजही दिवसभर पाऊस राहण्याचा अंदाज आहे.
कोल्हापुरातील जिल्हा शल्य चिकित्सक मुख्यालय इचलकरंजीमध्ये हलवलं

इचलकरंजीमधील कोरोनाचा प्रसार आटोक्यात आणावा आणि रुग्णांबाबत हलगर्जीपणा होऊ नये म्हणून निर्णय

इचलकरंजीमधील आयजीएम रुग्णालयातील कारभाराची माझाने दाखवली होती बातमी

वाढदिवस साजरा करण्याबरोबर रुग्णालयाच्या मांडल्या होत्या समस्या

स्थानिक आमदार प्रकाश आवाडे यांनी आयजीएम रुग्णालयाच्या कारभाराचा पाढा काल आरोग्यमंत्र्यांसमोर मांडला
खासदार नवनीत राणा यांना सहा दिवस आधी कोरोनाची लागण झाली. परंतु आज अचानक त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यामुळे पुढील उपचारासाठी त्यांना नागपूर येथे पाठविण्याचा निर्णय..

खासदार नवनीत राणा नागपूर कडे रवाना, नागपूर येथील वोकार्ट हॉस्पिटलमध्ये पुढील उपचार होणार..

तज्ञ डॉक्टरांची चमू खासदार नवनीत रवी राणा यांचे प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे...
राज्यात अंतरजिल्हा १८९० शिक्षकांच्या अंतरजिल्हा बदली. उद्या सकाळी प्रत्येक जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदलीची यादी ॲानलाईन जाहिर होईल. ॲाफलाईन बदल्यांना विरोध झाल्याने बदल्या झाल्या नाहीत. अंतर जिल्हा ॲानलाईन बदल्या झाल्यात
साई बाबा संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी के. एच. बगाटे यांची नियुक्ती...
बगाटे उद्या स्वीकारणार पदभार...
बगाटे हे सध्या रत्नागिरी जिल्हापरिषदेचे सीईओ म्हणून कार्यरत होते...
साई संस्थानचे चौथे सीईओ म्हणून स्वीकारणार पदभार...
अरुण डोंगरे यांच्या बदलीनंतर साई संस्थांनचे मुख्य कार्यकारी अधिकारी पद होते रिक्त
पोलिस कर्मचाऱ्यांच्या उपचारासाठीच्या "महाराष्ट्र पोलीस आरोग्य व कुटुंब कल्याण योजना" नागपुरातील २७ रुग्णालयांमध्ये कार्यरत..

त्यापैकी फक्त २ रुग्णालयांमध्येच कोरोनावरील उपचाराची परवानगी..

त्यामुळे कोरोना बाधित पोलीस कर्मचारी व कुटुंबियांच्या उपचारात अडचणी..

पोलिसांनी महापालिका आयुक्त मुंढे यांच्याकडे महाराष्ट्र पोलीस आरोग्य व कुटुंब कल्याण योजनेतील उर्वरित रुग्णालयात कोरोना उपचाराची परवानगी मागितली..

मात्र, मनपाने अद्याप परवानगी दिलेली नसल्याने नागपुरात पुन्हा एकदा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध पोलीस असा वाद निर्माण होण्याची शक्यता..
यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा शहरात कोरोनामुळे लागू केलेले प्रतिबंधित क्षेत्र हटवावे अशी मागणी करीत शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन सुरू केले आहे. शहरातील मेन लाईन बाजारपेठेत बिरसा मुंडा चौकात तिवारींनी अचानक हे आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पांढरकवडा परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भाग प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहे.
यवतमाळ जिल्ह्याच्या पांढरकवडा शहरात कोरोनामुळे लागू केलेले प्रतिबंधित क्षेत्र हटवावे अशी मागणी करीत शेतकरी स्वावलंबन मिशन चे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी रस्त्याच्या मधोमध झोपून आंदोलन सुरू केले आहे. शहरातील मेन लाईन बाजारपेठेत बिरसा मुंडा चौकात तिवारींनी अचानक हे आंदोलन सुरू केल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली आहे. पांढरकवडा परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे शहरातील अनेक भाग प्रशासनाच्या वतीने सील करण्यात आले आहे.
पुण्यातील खेडच्या तहसीलदारांच्या बदलीवरून आता सत्ताधारी राष्ट्रवादी आणि शिवसेनेत जुंपली आहे. राष्ट्रवादीचे आमदार दिलीप मोहितेंनी तहसीलदार सुचित्रा आमलेंच्या पती पासून जीवाला धोका असल्याची तक्रार दिली. तहसीलदार या कार्यक्षम अधिकारी आहेत आणि आमदारांना असे अधिकारी पचनी पडत नाहीत. पण आम्ही त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही. असं म्हणत शिवसेनेचे माजी आमदार सुरेश गोरेंनी मोहितेंवर निशाणा साधलाय. राज्य पातळीवर महाविकासआघाडीत एकजूट दिसत असली तरी स्थानिक पातळीवर मात्र तिघांची तोंड तीन दिशेला आहेत. हे तहसीलदार आमलेंच्या बदलीवरून पुन्हा एकदा समोर आलं.
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्याविरोधात अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा भाऊ अब्रुनुकसानीचा दावा ठोकणार, सामनातील आरोपांवरुन भाजप आमदार नीरज सिंह मानहानीचा दावा ठोकणार
रत्नागिरी जिल्ह्यात देखील सध्या पावसाचा जोर पाहायाला मिळत आहे. रविवार रात्रीपासून जिल्ह्यात सध्या सरींवर पाऊस कोसळत आहे. दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर पावसानं पुन्हा एकदा बॅटींग सुरू केली आहे. मागील आठवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांना पूर आला होता. शिवाय, जनजीवन देखील विस्कळीत झालं होतं. ही सारी परिस्थिती पाहता सध्याचा पावसाचा जोर आणि हवामान खात्याचा अंदाज पाहता नागरिकांनी सतर्कतेचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
मुंबईत पश्चिम द्रुतगती महामार्गावर आज पुन्हा द बर्निंग कारचा थरार पहायला मिळाला. मालाड इथे एका स्कॉर्पिओ कारमध्ये आज दुपारी तीनच्या सुमारास अचानक आग लागली. धावत्या गाडीत ही आग लागली होती. बघता बघता संपूर्ण गाडीने पेट घेतला. गाडीत लागलेली आग भडकली आणि धूर खूप येतोय हे लक्षात आल्यावर गाडीतील महिला चालकाने चतुराई दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला नेली आणि गाडी सोडून लांब पळून गेली. तात्काळ अग्निशमन दलाला फोन केला. तोच काही वेळात अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी गाडीला लागलेली आग विझवली. मात्र या महिलेच्या डोळ्यादेखत तिची गाडी पूर्णत: जळून खाक झाली. दरम्यान गाडीला लागलेल्या आगीमुळे पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहकूत कोंडी झाली होती.
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना करोनाची लागण झाली आहे. प्रणव मुखर्जी यांनी स्वत: ट्विट करत ही माहिती दिली आहे
महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची आज बैठक, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होणार,
महामंडळ वाटप, राज्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या अशा विविध विषयांवर होणार चर्चा, मुख्यमंत्री ठाकरे समवेत अजित पवार, बाळासाहेब थोरात यांच्यासह महाविकास आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित असण्याची शक्यता
विद्यापीठाची अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करण्याबाबत याचिकांवर सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 14 ऑगस्ट रोजी होणार. महाराष्ट्र, दिल्ली सरकारच्या प्रतिज्ञापत्रावर उत्तरासाठी यूजीसीने वेळ मागून घेतला.
महाराष्ट्राच्या कोरोना मृत्यूदर मध्ये सतत चढउतार होत आहेत. राज्यातील मृत्यूदर 1 टक्क्याच्या आत आणण्याचे धोरण आहे असे राज्यातले मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री सांगत असले तरी मृत्यू दर कमी बोलताना दिसत नाही. आजच्या आकडेवारी नूसार राज्याचा मृत्यूदर देशाच्या दरापेक्षा दीडपटीन अधिक आहे. सध्या हा दर 3 पुर्णांक 45 टक्के आहे. कांही दिवसांपूर्वी हा दर 3 पुर्णांक 28 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे. कोरोनाचा आपल्या जीवनात समावेश होवून पाच महिने होत आलेत. राज्यात आतापर्यंत 17 हजार 757 मृत्यू झालेत. हे देशात सर्वात जास्त आहेत. देशांतल्या पहिल्या 10 राज्यांतल्या महाराष्ट्र वगळता इतर 9 राज्यांच्या मृत्यूची जेवढी बेरीज होती तेवढे मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. पहिल्या 9 पैकी महाराष्ट्र वगळता इतर 8 राज्यात मिळून 16 हजार 143 मृत्यू झाले आहेत.
महाराष्ट्राच्या कोरोना मृत्यूदर मध्ये सतत चढउतार होत आहेत. राज्यातील मृत्यूदर 1 टक्क्याच्या आत आणण्याचे धोरण आहे असे राज्यातले मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री सांगत असले तरी मृत्यू दर कमी बोलताना दिसत नाही. आजच्या आकडेवारी नूसार राज्याचा मृत्यूदर देशाच्या दरापेक्षा दीडपटीन अधिक आहे. सध्या हा दर 3 पुर्णांक 45 टक्के आहे. कांही दिवसांपूर्वी हा दर 3 पुर्णांक 28 टक्क्यांपर्यंत खाली आला होता. आज पुन्हा त्यात वाढ झाली आहे. कोरोनाचा आपल्या जीवनात समावेश होवून पाच महिने होत आलेत. राज्यात आतापर्यंत 17 हजार 757 मृत्यू झालेत. हे देशात सर्वात जास्त आहेत. देशांतल्या पहिल्या 10 राज्यांतल्या महाराष्ट्र वगळता इतर 9 राज्यांच्या मृत्यूची जेवढी बेरीज होती तेवढे मृत्यू एकट्या महाराष्ट्रात झाले आहेत. पहिल्या 9 पैकी महाराष्ट्र वगळता इतर 8 राज्यात मिळून 16 हजार 143 मृत्यू झाले आहेत.
मुहूर्ताविना रखडलेल्या रत्नागिरीतील कोविड रूग्णालयाचे अखेर रविवारी ई लोकार्पण करण्यात आले. यावेळी रत्नागिरी जिल्हयाचे पाकलमंत्री अनिल परब, उदय सामंत, खासदार विनायक राऊत देखील व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून जोडले गेले होते. रत्नागिरीतील महिला रूग्णालयात कोविड करता 107 बेड्स उपलब्ध करण्यात आले आहेत. कोणत्याना कोणत्या कारणास्तव मागील 4 ते 5 दिवसांपासून या रूग्णालयाचे लोकार्पण पुढे ढकलले जात होते. त्याला अखेर रविवारी मुहूर्त मिळाला.
राष्ट्रवादीचे 12 आमदार भाजपात जाणार अशी अफवा विरोधक पसरवत असून ही खोटी व निव्वळ अफवा आहे.विशेष म्हणजे भाजपाचे आमदारच राष्ट्रवादीत यायला इच्छूक आहेत अशी माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे 12 आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची अफवा काही जण पसरवत आहेत. ही चर्चा बिनबुडाची आहे. उलट निवडणुकीआधी भाजपमध्ये गेलेले आमदार राष्ट्रवादीत परतण्यासाठी उत्सुक असून यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. लवकरच यावर निर्णय घेऊन सार्वजनिक केली जाईल, अशी माहिती राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी दिली.
नाशिक पुणे दरम्यान रेल्वे मार्गाच्या कामाला लवकरच सुरवात होऊन देशातील पहिली हाय स्पीड रेल्वे धावणार आहे, 16 हजार कोटी रुपयांच्यां या प्रस्तावाला केंद्र सरकारची तत्वता मान्यता मिळालीय, केंद्र सरकार 20 टक्के राज्य सरकार 20 टक्के आणि वित्तीय संस्था 60 टक्के गुंतवणूक करणार आहे.
सांगलीच्या कृष्णा नदी पात्रात पोहणाऱ्याची संख्या कमी नाही. यातील आयर्विन पुलावरून उड्या मारत पोहण्याचा आनंद लुटणाऱ्याचा अंदाज काही वेगळाच असतो. मागील वर्षी पूरपरिस्थिती निर्माण होण्याच्या अगोदर आयर्विन पुलावरून मारल्या जाणाऱ्या हनुमान उडी, विमानं उडी या चर्चेचा विषय बनल्या होत्या. यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने नदी पात्रात पोहणाऱ्याची सांख्य जास्त आहे. त्यामुळे यंदा देखील
कृष्णा नदी मध्ये आयर्विन पुलावरून हनुमान उडी, विमान उडीचा थरार पाहायला मिळत आहे. अशा पध्दतीने उड्या मारण्यामध्ये तरुण तर आहेतच त्याशिवाय तरुणी देखील आहेत आणि काही वयोवृद्ध देखील आहेत. त्यामुळे साध्य सांगलीत अनेकांच्या सोशल मिडीयावर या नदी पात्रातील उड्याचे स्टेट्स पाहायला मिळतात.
उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात प्रेस बाजार असून इथे लग्नपत्रिका आणि इतर छपाईची कामं करणारी शेकडो दुकानं आहेत. इथल्या रोशन प्रिंटिंग नावाच्या दुकानाला रात्री साडेदहाच्या सुमारास आगा लागली. दुकानात कागदी साहित्य असल्यानं काही वेळातच दुकानाचे आगीनं संपूर्ण तीन मजले कवेत घेतले. यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत संपूर्ण रात्रभर ही आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र सकाळ झाली तरीही ही आग पूर्णपणे विझलेली नसून सध्या कुलिंगचं काम सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली आहे.
मनगुत्ती येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 8 दिवसामध्ये प्रतिष्ठापना करणेचा निर्णय प्रशासनाने घेतल्याने आजचे शिवसेनेचे आंदोलन स्थगित करणेत आले आहे.
नाशिक जिल्ह्यातल्या ठेंगोड्यात बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला यश आलं. वनविभागानं लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या अडकला. गेल्या काही दिवसांपासून या भागात बिबट्याची दहशत पसरली होती. रात्री बेरात्री बिबट्याकडून शेतकऱ्यांनी घराबाहेर बांधलेल्या जनावरांवर, पाळीव कुत्र्यांवर हल्ले करून त्यांना फस्त करण्याचा सपाटा सुरू होता. त्यामुळे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं. मात्र बिबट्याला पकडण्यासाठी एका शेतकऱ्याच्या गोठ्याजवळ लावलेल्या पिंजऱ्यात काल रात्री हा बिबट्या जेरबंद झाल्यानं ग्रामस्थांनी सुटकेचा निःश्वास सोडलाय.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातल्या अकरा सदस्यांना कोरोनाची बाधा. सर्व जणांची तब्येत चांगली. ठाकूर विधानपरिषद सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात सहा सदस्य कोरोनाबाधित होते. काल रात्री सूजितसिंहसह आणखी पाच सदस्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
भाजपाचे प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांच्यासह कुटुंबातल्या अकरा सदस्यांना कोरोनाची बाधा. सर्व जणांची तब्येत चांगली. ठाकूर विधानपरिषद सदस्य आहेत. गेल्या आठवड्यात सहा सदस्य कोरोनाबाधित होते. काल रात्री सूजितसिंहसह आणखी पाच सदस्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
हिंगोली : श्रावण मासातील आज तिसऱ्या श्रावण सोमवारी तीर्थक्षेत्र ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे औंढा नागनाथ येथे प्रभू महादेवाला पुष्प शृंगार घालयण्यात आला आहे. देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार आणि पुजारी, पुरोहित यांनी महापूजा केली. कोरोनामुळे यावर्षी भाविकांना मंदिरात जाऊन मात्र दर्शन घेता येत नसल्याने भाविक कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी तीन वाजता पासून पावसाने सर्वदूर हजेरी लावली आहे. कुठे मुसळधार तर कुठे झडीच्या स्वरूपात रीपरीप सुरु आहे.जिल्ह्याच्या काही भागात मागील दोन आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यामुळे, पिके धोक्यात आली होती. परंतु पुन्हा पावसाच्या आगमनाने पिकांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काल सकाळपासूनच हिंगोली जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते.
गणपती उत्सवासाठी आज कोकणात 70 बसेस रवाना होतील. आज अखेर 8000 लोकांनी गणपती उत्सवाला कोकणात जाण्यासाठी आरक्षण केली आहे. तसेच आतापर्यंत 30 बसेस गट आरक्षणासाठी(ग्रुप बुकिंग) नोंदवल्या गेलेल्या आहेत. एसटी पीआरओ.
यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यातील म्हैसदोडका गावात 3 वर्षाच्या मुलासह आईची विहरीत उडी घेऊन आत्महत्या. मोनाली लक्ष्मण पारखी (वय 29) जय लक्ष्मण पारखी (वय 3) असे मृतकांची नावे आहेत, कारण अद्याप अस्पष्ट.
शैक्षणिक वर्ष 2020-21 करीता तंत्रशिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्ट 2020 ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी राज्यामध्ये अभियांत्रिकी पदविका प्रवेशासाठी 336 सुविधा केंद्रांची व बारावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांसाठी 242 सुविधा केंद्रांची निवड केलेली आहे. कोविड -19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेसाठी, गर्दी टाळण्याचे दृष्टीने गतवर्षीप्रमाणे वरील पैकी सुविधा केंद्रास भेट देऊन कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी करणे या पद्धती सोबतच ई-स्क्रूटनीची संकल्पना राबविणार येणार आहे. याद्वारे अर्जदारास प्रत्यक्ष सुविधा केंद्रास भेट देण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरण्यापासून संस्थेत प्रवेश निश्चिती करण्यापर्यतची सर्व प्रक्रिया ते स्वतः ऑनलाईन पद्धतीने करू शकतील. प्रवेशासंबंधी सुविधा केंद्रांची यादी आणि e-Scrutiny  पद्धतीची माहिती ,अर्ज भरण्यासाठी आवश्यक ती माहिती , हेल्पलाईन क्रमांक इत्यादी सविस्तर माहिती http://www.dtemaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
परभणी मनपा परिसरात पुन्हा लॉक डाऊन करण्यात आले आहे. आज मध्यरात्री पासुन 14 ऑगस्टपर्यंत संचारबंदीचे आदेश जिल्हाधिकारी यांनी काढले. केवळ अत्यावश्यक सेवांसाठी मुभा देण्यात आली आहे. या संचारबंदीच्या काळात कुणीही घराबाहेर न निघण्याच आवाहन करण्यात आले आहे.
चंद्रपूर येथील चिमणीच्या पायथ्याशी असलेल्या 22 प्रकल्पग्रस्त आंदोलकांना CISF नी ताब्यात घेतले. सर्व आंदोलकांना बसमध्ये बसवून विज प्रकल्पाच्या बाहेर सोडण्यात आले आहे. चिमणीवर बसलेले 7 आंदोलक यामुळे अधिकच आक्रमक झाले आहे. आता चिमणीच्या खाली CISF आणि चिमणीवर 7 आंदोलक अशी स्थिती आहे. वीज केंद्र प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनाचा आज 5 वा दिवस आहे.
कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन. 8 दिवसात शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर 9 व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार. पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय.
गणपती उत्सवासाठी आज 70 बसेस रवाना होतील. आज अखेर 8000 लोकांनी गणपती उत्सवाला कोकणात जाण्यासाठी आरक्षण केली आहे. तसेच आतापर्यंत 30 बसेस गट आरक्षणासाठी(ग्रुप बुकिंग) नोंदवल्या गेलेल्या आहेत. एसटी पीआरओ.
रत्नागिरी - दाभोळ खाडीत मच्छिमारी बोट बुडाली, अंजनवेल लाईट हाऊसच्या समोर समुद्रात मच्छिमारांची बुडाली बोट, बोटीवर 8 खलाशी असल्याची माहिती, 6 जण पोहत किनाऱ्यावर आले तर उर्वरित दोघांना इतर बोटीच्या साहाय्याने वाचवण्यात यश
औरंगाबादमध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात आंदोलन सुरू आहे. आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे. आंदोलन करताना सरकारला जाग यावी म्हणून जागरण गोंधळ आंदोलन केलं. सरकारने आश्वासन देऊनही अनेक मागण्या अजूनही पूर्ण केल्या नाहीत.सरकारसोबत चर्चा झाल्यानंतर त्यांनी 5 तारखेपर्यंत मागण्या पूर्ण करू असे आश्वासन दिले होते मात्र ते ही पूर्ण केलं नाही म्हणून आता आंदोलनाशिवाय पर्याय उरला नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे, आंदोलनात जे हुतात्मा झाले त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला नाही, दाखल झालेले गुन्हे अजून मागे घेतले नाहीत अशा पद्धतीच्या त्यांच्या मागण्या आहेत आणि या मागण्यांसाठी आता आंदोलन सुरु राहणार असल्याचे मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी सांगितले आहे
कोल्हापूरकरांचा धोका तूर्तास टळला,

पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीच्या खाली उतरली,

सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 42 फूट 10 इंच,

जिल्ह्यातील एकूण 67 बंधारे अजूनही पाण्याखाली
कोल्हापूर - शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याप्रकरणी मनगुत्तीमध्ये तणावाचे वातावरण,

चौकाचौकात गावकऱ्यांची गर्दी, रोडवर ठिय्या आंदोलन,

शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याचे कर्नाटक आणि महाराष्ट्रात पडसाद,

उद्यापर्यंत पुतळा पूर्ववत बसवण्याचे अल्टिमेटम,
पिंपरी चिंचवडच्या अष्टविनायक सोसायटीत गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यामध्ये एकाचा मृत्यू झाला असून 11 जखमी आहे. दिघीच्या महादेव नगर कॉलनीमध्ये सकाळी ही घटना घडली. स्फोटानंतर संबंधित आणि शेजारच्या फ्लॅटमधील अंतर्गत भिंती कोसळल्या. त्यामुळे जखमींची संख्या वाढली. परिस्थिती नियंत्रणात असल्याची अग्निशमन विभागाची माहिती.

भंडारा : गोंदीया, भंडारा जिल्ह्यात तसेच बाजुला असलेल्या मध्यप्रदेशात मिगील दोन दिवसापासून सुरु असलेल्या पावसामुळे वैनगंगा नदीच्या पात्रात वाढ झाली आहे. त्यामुळे खूर्ध धरणाचे 11 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले असून जिल्हा प्रशाशनातर्फे नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
बीड : परळीकडून वाळू घेऊन अंबाजोगाईच्या दिशेने निघालेल्या भरधाव वेगातील टिप्परने दिलेल्या धडकेत तीन तरुण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात अंबाजोगाई-परळी रोडवरील काळवीट तांडा परिसरात रात्री 9.30 वाजता झाला. मयत तिघेही तरुण परळी तालुक्यातील वानटाकळी येथील आहेत. या अपघात इतका विचित्र होता की यात गाडीवरील तिघांचा जागीच मृत्यू झाला. पप्पू महादेव गायके (37), पप्पू जनार्धन गायके (30), विट्ठल मुंजा गायके (32) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
वाघाची दहशत असलेल्या गावातील 18 लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांढरकवडा तालुक्यातील कोब्बई- अंधारवाडी -कोपामांडवी गावात वन कर्मचारी यांच्याशी गावकऱ्यांनी गैरवर्तन तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण केला त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तीन गावात वाघ शेत शिवारात येत असल्याने आणि गावकऱ्यांच्या पाळीव प्राण्यांवर हल्ले करीत असल्याने गावकऱ्यांमध्ये रोष आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिकच घट्ट होताना पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे प्रशासनाकडून अँटीजण टेस्टिंग वाढवल्याने एकाच दिवसात बीड जिल्ह्यात 203 रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गेल्या 24 तासात तब्बल 203 रुग्णांची भर जिल्ह्यात पडलीय. यामुळं जिल्हात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहेत. बीड जिल्ह्यातील एकूण आकडा आता 1581 वर गेलाय..
Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक, आज 12,822 रुग्णांची नोंद, आज 11,081 रुग्ण कोरोनामुक्त, आतापर्यंत 3,38,362 रुग्णांची कोरोनावर मात, आज 275 रुग्णांचा मृत्यू

राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा बंद करण्यात आला असून आता केवळ एक दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळी सध्या 43 फूट 6 इंच इतकी आहे. जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात गोळ्या घालून युवकाची हत्या झाली. त्या प्रकरणात 2 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे, सध्या परिस्थिती शांत पण तणावपूर्ण आहे. जुना बस स्टँड परिसरात आज दुपारी सूरज बहुरिया या युवकाची हत्या झाली होती. कारमध्ये बसून जात असलेल्या सूरज बहुरिया वर गोळ्या झाडण्यात आल्या.
केंद्रीय मंत्री अर्जुन मेघवाल यांना कोरोनाची लागण झाली आहे. सध्या ते एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.
बॉलिवूड अभिनेते संजय दत्त यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
16 वर्षीय बलात्कार पीडित युवतीची आत्महत्या. युवतीने लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे प्रकरणाला फुटली वाचा. नागभीड तालुक्यातील कसर्ला येथील दुर्दैवी घटना. 16 वर्षीय युवतीवर काल संध्याकाळी म्हणजे 7 ऑगस्टला दोन युवकांनी अत्याचार केला. व्यथित झालेल्या पीडित युवतीने विहिरीत उडी मारून जीवन संपवले. विहिरीत आज मृतदेह सापडल्यावर पोलिसांच्या हाती सुसाईड नोट लागली. मृतक युवतीच्या सुसाईड नोटवरून पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले आहे.
सोलापूरतल्या मुरारजी पेठ येथे दुमजली इमारतीची भिंत कोसळली, स्मार्ट सिटीअंतर्गत विकास काम सुरू असताना खोदकाम सुरू असताना भिंत कोसळल्याची माहिती, अडकलेल्या 3 मजुरांना शासकीय रुग्णालयात हलवलं, तर आणखी काही मजूर अडकल्याचा अंदाज

,घटनास्थळी पोलीस, स्थानिक नगरसेवक, अग्निशमन दल दाखल
वर्धा जिल्ह्यातील गिरड परीसरात सुरू असलेल्या दारू विक्रीला व अवैध धंद्यावर आळा घालण्याच्या मागणीसाठी 78 वर्षीय आजोबांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं. बबन दाबणे असं आंदोलन करणाऱ्या वृद्ध आजोबांचं नाव आहे. एक तासानंतर पोलिसांसह गावकऱ्यांच्या मदतीने आंदोलकला खाली उतरविण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला होता. शेवटी एका तासानंतर गावातील नागरिक व पोलिसांच्या मध्यस्थीने बबन दाबणे यांना खाली उतरविण्यात आले.
वर्धा जिल्ह्यातील गिरड परीसरात सुरू असलेल्या दारू विक्रीला व अवैध धंद्यावर आळा घालण्याच्या मागणीसाठी 78 वर्षीय आजोबांनी जलकुंभावर चढून आंदोलन केलं. बबन दाबणे असं आंदोलन करणाऱ्या वृद्ध आजोबांचं नाव आहे. एक तासानंतर पोलिसांसह गावकऱ्यांच्या मदतीने आंदोलकला खाली उतरविण्यात आले. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत खाली उतरणार नाही, असा पवित्रा घेतला होता. शेवटी एका तासानंतर गावातील नागरिक व पोलिसांच्या मध्यस्थीने बबन दाबणे यांना खाली उतरविण्यात आले.
चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात गोळ्या घालून युवकाची हत्या. जुना बस स्टँड परिसरातील घटना, सूरज बहुरिया असे मृतक युवकाचे नाव, कारमध्ये बसून जात असलेल्या सूरज बहुरिया वर झाडण्यात आल्या गोळ्या. बल्लारपूर शहरात प्रचंड तणाव.
पालघर - वापी मधील शक्ती बायोनिक्स केमिकल कंपनीला भीषण आग, आगीच्या मोठ्या ज्वाळा, स्थानिक अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी, आगीचे कारण अस्पष्ट, सर्व कामगार सुरक्षित असल्याची माहिती
गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने राधानगरी तालुक्यातील दूध गंगासागर धरण पूर्ण क्षमतेने भरलंय. धरणाचे कृत्रिम पाच दरवाजे उघडले असून सध्या धरणातून 4200 क्यूसेकचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. त्यामुळे दूधगंगा नदीच्या पात्रात वाढ होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 24 मिलिमीटर पावसाची नोंद झाली दूधगंगा धरणाच्या पाण्याची पातळी 642 मीटर आहे. सध्या धरणाचा पाणीसाठा 21 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून सध्या धरणात 84 टक्के पाणीसाठा झाला. सध्या याठिकाणी पावसाचा जोर कमी -जास्त आहे.
कोल्हापूर - बेळगावच्या मनगुती इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पुन्हा उभा करा,

अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसून पुतळा उभा करतील,

गडहिंग्लज तालुक्यातील नूलच्या शिवभक्तांचा कर्नाटक सरकारला इशारा
सोलापूर :

किरीट सोमय्यांना कोणी गंभीरपणे घेत नाही, तुम्ही देखील घेऊ नका,
महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी किरीट सोमय्यांवर टीका,

महावितरणच्या वीज बिल संदर्भात लोकांच्या तक्रारी आहेत, सरकार त्यावर विचार करत आहे,

भरमसाठ बिलसंदर्भात भाजप नेते किरीट सोमया यांनी केले होते आरोप
बुलडाणा - बुलडाण्याचे कॉंग्रेस नेते आणि माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ कोरोना पॉझिटिव्ह, स्वतः फेसबुकद्वारे दिली माहिती, काल रात्री त्यांना ताप आल्याने केली कोरोना चाचणी
'सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण आद्यार सीबीआयकडे गेलेलं नाही. प्रकरण सुप्रीम कोर्टात आहे. 11 तारखेला यासंदर्भात निकाल येईल. मुंबई पोलिसांचा तपास योग्य पद्धतीने सुरु आहे. मुंबई पोलीस या प्रकरणाचा योग्य पद्धतीने तपास करण्यास सक्षम आहेत. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे सोपवण्यास कोणतंही कारण नाही', अशी प्रतिक्रीया गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
सोलापूर -
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात , महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर सोलापुरात दाखल,

कोरोना आढावा बैठकीच्या आधी सुरू आहे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक,

एक तासापासून सुरू आहे काँग्रेस कार्यकर्त्यांची बैठक,

शहर आणि ग्रामीणच्या काँग्रेस पदाधिकाऱ्यांची संघटनात्मक बैठक
औरंगाबाद जिल्ह्यातील 130 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. कोरोनाबधित रुग्णांची संख्या 16243 एवढी झाली आहे. त्यापैकी 11960 बरे झाले तर 526 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3757 जणांवर उपचार सुरु आहेत.
नाशिक जिल्हयातील ग्रामिण भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून,जिल्हयाच्या बागलाण तालूक्यातील नामपूर येथील व्यावसायिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले तर त्यांच्या संपर्कातील नऊ रुग्ण बाधित आढळून आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून नामपूर ग्रामपंचायती तर्फे तीन दिवसाचा बंद ठेवण्यात आलाय.या बंद मधून बँक,मेडिकल,गॅस वितरण,वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले.
राधानगरी धरणाचा आणखी एक स्वयंचलित दरवाजा बंद,

राधानगरी धरणाचे रात्रीपासून एकूण दोन दरवाजे झाले बंद
,
धरण क्षेत्रातही पावसाचा जोर काहीसा कमी
,
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत संथ गतीने घट
दुष्काळी परभणी जिल्ह्याला यंदा वरून राजाने मोठा दिलासा दिलाय मृग नक्षत्रापासूनच जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय,यावर्षी पहिल्यांदाच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्या पर्यंत जुन ते सप्टेंबरच्या एकुण सरासरीच्या 60.09% एवढा पाऊस सर्वत्र झालाय त्यामुळे प्रकल्प ही भरत आहेत.गोदावरी वरील 4 ही उच्च पातळी बंधारे भरल्यानंतर येलदरी प्रकल्प 92%,भरलाय,लोअर दुधना प्रकल्प 40% एवढा भरलाय तर करपरा मध्यम प्रकल्प ही 85% एवढा भरला असल्याने पिण्याच्या पाण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मार्गी लागलाय येणाऱ्या काळात असाच पाऊस सुरू राहील तर जिल्ह्यातील बहुतांश प्रकल्पातुन विविध नदीपत्रामध्ये पाणी सोडावे लागणार आहे.पुर्णा,गोदावरी नदीच्या काठावरील गावांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत.
बीड जिल्ह्यात काल दिवसभरात तब्बल 113 जणांना कोरोनाची लागण झालीय..

विशेष म्हणजे या 113 रुग्णांपैकी 44 जण हे नवीन रुग्ण आहेत..ज्या रुग्णांचा कोणतीही प्रवासाची किंवा सहवासाची नोंद सध्यातरी नाही..

आज पासून 3 दिवस बीड शहरातील बाजारपेठा बंद असणार असून व्यापारी , भाजी विक्रेते , फळ विक्रेते , कापड दुकानदार , किराणा दुकानदार , दूध विक्रेते , पत्रकार , पोलीस यांच्यासह ज्या व्यावसायिकांचा अनेकांशी दररोज संपर्क येतो , त्यांची अँटीजन तपासणी बीड शहरातील 6 ठिकाणी होणार आहे..

दरम्यान बीड जिल्ह्यातून कोरोनग्रस्तांचा आकडा 1378 वर गेलाय..
गणेश भक्तांसाठी खुशखबर, गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या सोडणार, राज्य सरकारने लिहिले रेल्वे खात्याला पत्र, तिकीट बुकिंगनुसार गाड्या सोडल्या जाणार, आरक्षित तिकीट हाच ई पास असणार
गणेश भक्तांसाठी खुश खबर! गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येणार आहे. राज्य सरकारने रेल्वे खात्याला पत्र लिहिले. तिकीट बुकिंगनुसार गाड्या सोडल्या जाणार आहे. आरक्षित तिकीट हाच इ पास असणार आहे. रेल्वेने राज्य सरकारला विचारणा केली होती. राज्य सरकारने गाड्यांसाठी हिरवा कंदील दिला आहे.
2021 चा टी 20 क्रिकेट वर्ल्डकप भारतात होणार आहे. तर 2022 चा टी20 वर्ल्डकप हा ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे. ICC च्या बोर्ड मीटिंगमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय. याअगोदर ऑस्ट्रेलियात होणारा 2020 सालचा टी 20 वर्ल्ड कप रद्द करण्यात आला होता. तर 2022 चा टी 20 वर्ल्डकप भारतात होणार होता.

भारतीय हॉकी संघातील चार खेळाडूंना कोरोनाची लागण, कर्णधार मनप्रीत सिंग, सुरेंद्र कुमार, जसकरण सिंग आणि वरुन कुमार यांना कोरोनाची लागण, बंगळुरु येथे पार पडलेल्या राष्ट्रीय हॉकी शिबीरात सहभागी होऊन परतल्यानंतर चारही खेळाडूंचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह
औरंगाबाद दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाले .उपचार अर्धवट सोडून पळाले रुग्ण.कीलेअर्क आणि एमजीएम कोविड सेंटर मधून पळाले रुग्ण.बेगमपुरा आणि सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद...
विजेच्या तीव्र धक्क्याने चरायला गेलेल्या पाच जनावरांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास वाड़ा तालुक्यातील वडवली येथे घडली. या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. यात पाच म्हशींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला,,, या मध्ये शेतक-याचे 2 लाखांहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणा मुळेच हा अपघात झाल्याचा आरोप शेतकऱ्याने केला आहे.
सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी रिया चक्रवर्ती ईडी कार्यालयात हजर, आर्थिक व्यवहाराप्रकरणी चौकशी होणार
100 वीजबिले एक नमुना म्हणून आणली, राज्यातील 20 ठिकाणाहून मागवली आहे. सरासरी बिलं द्यायची हा या सरकारचा घोषित केलेला निर्णय मात्र, प्रत्यक्षात वेगळेच आहे. 3 ते 10 पट बिलं वाढली आहेत. महावितरणला 20 हजार कोटी पाहिजे होते, म्हणून मंत्रालयात हा कट शिजला आणि ही बिलं पाठवली. महावितरणकडे कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाहीत, वीज खरेदी करायला पैसे नाहीत. त्यामुळे त्यांनी असं कारस्थान रचले; भाजप नेते किरिट सोमय्या यांचा आरोप.
महाराष्ट्रातील वाघांचा नसबंदीचा प्रस्ताव मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेटाळलांय. चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांची वाढती संख्या नियंत्रणात आणण्यासाठी नसबंदीचा प्रस्ताव मानद वन्यजीव रक्षकांनी मांडला होता. त्याला आज मुख्यमंत्री आणि वनमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत फेटाळण्यात आलांय. नसबंदी हा शेवटचा पर्याय असू शकत नाही. त्यामुळे यावर समिती बसवून सखोल अभ्यास करून अहवाल मांडवा अशा सूचना वन खात्याला देण्यात आल्या आहेत.
केंद्रीय आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी विशेषत: मुंबईमध्ये ज्या पद्धतीने कोविडचा मुकाबला करण्यात येत आहे त्याविषयी समाधान व्यक्त केले आणि सांगितले की मुंबई तसेच महाराष्ट्राने आणखी काही उपाययोजनांच्या अंमलबाजावणीकडे बारकाईने लक्ष दिले तर कोविड मुकाबल्याच्या बाबतीत संपूर्ण देशासाठी महाराष्ट्र एक उदाहरण निर्माण करू शकतो . आज दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातील सर्व विभागीय आयुक्त, पालिका आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्यासमवेत बैठक सुरू असून यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची प्रमुख उपस्थिती आहे.
विज केंद्र प्रकल्पग्रस्त आंदोलक आणि सरकार यांच्यातील बैठक अनिर्णित. आंदोलक अजूनही चिमणीवर. आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत आधी आंदोलकांनी टॉवर खाली उतरावे नंतरच पुढील चर्चा करू, अशी सरकारने अट टाकली. पण प्रकल्पग्रस्तांनी आधी निर्णय घ्या मग उतरू अशी भूमिका घेतली.
पाटण्याचो पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांच्यापाठोपाठ सीबीआयचे अधिकारी दिल्लीहून मुंबईत आल्यास क्वॉरन्टाईन होण्याची शक्यता
वीज केंद्र प्रकल्पग्रस्त आंदोलक आणि सरकार यांच्यातील बैठक अनिर्णित. आंदोलक अजूनही चिमणीवर. आज नागपूर येथे झालेल्या बैठकीत आधी आंदोलकांनी टॉवर खाली उतरावे नंतरच पुढील चर्चा करू, अशी सरकारने अट टाकली. पण प्रकल्पग्रस्तांनी आधी निर्णय घ्या मग उतरू अशी भूमिका घेतली. प्रकल्पग्रस्तांच्या या भूमिकेमुळे ऊर्जा मंत्री नितीन राऊत संतापले आणि मीटिंग सोडून निघून गेले. सध्या प्रकल्पग्रस्तांचे 5 प्रतिनिधी नागपूर येथील ऊर्जा अतिथीगृह येथे थांबून आहे. इकडे CISF ने चिमणीवरून आंदोलकांना खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले आहे, त्यामुळे परिसरात तणाव. सुमारे 140 मीटर उंचीवर बुधवार सकाळी 8.30 वाजता पासून आंदोलन करत आहेत. 5 पुरुष आणि 2 महिला प्रकल्पग्रस्त (चिमणी ची एकूण उंची 275 मीटर). चंद्रपूर जिल्ह्यात चंद्रपुर थर्मल पॉवर स्टेशनमुळे 561 प्रकल्पग्रस्त असून पूर्वपरीक्षा न घेता थेट नोकरीत समाविष्ट करण्याची त्यांची मागणी आहे.
1 सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने शाळा सुरु करण्याचा केंद्र सरकारचा विचार, महिनाअखेरीस अनलॉकसंदर्भात नियमावली जाहीर होण्याची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहेत. रात्री उशिरा प्राप्त झालेल्या अहवालानुसार 48 नवे कोरोना रूग्ण आढळले असून एकूण कोरोनाबाधितांची संख्या 2064 झाली आहे. आतापर्यंत 1371 रूग्ण बरे असून 68 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. चाकरमान्यांची संख्या देखील आता वाढत असून होम क्वारंटाईन असणाऱ्यांची संख्या 29 हजार 707 झाली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 15870 एवढी झाली आहे. त्यापैकी 11676 बरे झाले तर 513 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3681 जणांवर उपचार सुरु .
बीड जिल्ह्यात बुधवार पाठोपाठ गुरुवारी देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. आज आलेल्या रिपोर्टमध्ये गेवराई शहरातील 14 रुग्ण, परळीचे 31, बीडचे 33 तर अंबाजोगाई शहरासह तालुक्यातील 124 रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या पंधरा वीस दिवसापासून कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे .विशेषतः बीड, परळी, गेवराई, अंबाजोगाई या शहरात रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. बुधवारी तब्बल 108 रुग्ण सापडल्याने खळबळ उडाली होती, गुरुवारी देखील पुन्हा एकदा पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. बीड जिल्ह्याची पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आता 1269 झाली आहे. त्यात 574 रुग्ण बरे झाले आहेत.
नाशिक : नांदगाव तालुक्यातील वखारी गावात कुटुंबातील चौघांची हत्या, पती-पत्नीसह मुलगा आणि मुलगी यांचा अज्ञाताकडून खून, हत्येचं कारण अस्पष्ट, पोलीस घटनास्थळी दाखल
उपमुख्यमंत्री अजित पवार पिंपरीच्या दौऱ्यावर असून 11:30 वाजता जम्बो कोविड केअर सेंटर कामाची पाहणी करणार आहेत.
धुळे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात आठ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तर एकाच दिवसात कोरोनाच्या 148 नव्या रुग्णांची नोंद झालीय. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 907 वर पोहोचली आहे. तर धुळे शहरातील कोरोनाबाधितांची संख्या 2 हजार 65 वर गेली आहे. गुरुवारी दिवसभरात मृत्यू झालेल्या आठ कोरोना बाधित रुग्णांमध्ये जिल्ह्यातील सहा पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे . गेल्या सहा दिवसात धुळे जिल्ह्यात 26 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. एकाच दिवसात मृत्यू दर, तसेच रुग्ण संख्येचे प्रमाण वाढल्यानं ही बाब धुळे जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी आहे .

पार्श्वभूमी

आयुष मंत्री श्रीपद नाइक कोरोना पॉझिटिव्ह; संपर्कात आलेल्यांना चाचणी करण्याचा सल्ला


आयुर्वेदाशी संबंधित केंद्रीय आयुष खात्याचे मंत्री श्रीपाद नाईक कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निदान झालंय. श्रीपाद नाईक यांनी स्वतः ट्वीट करुन ही माहिती दिली. नाईक मोदी सरकारमधील तिसरे मंत्री आहेत ज्यांना COVID 19 चं संक्रमण झालं आहे. याअगोदर गृहमंत्री अमित शाह आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. हे दोन्ही नेते रुग्णलयात भरती आहेत. दरम्यान, लक्षणं नसल्याने नाईक यांना होम आयसोलेशनमध्ये राहण्यास सांगण्यात आले आहे.


करीनाची इन्स्टाग्राम पोस्ट, करीना-सैफ पुन्हा आई-बाबा बनणार!


बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि अभिनेता सैफ अली खान पुन्हा एकदा आई-बाबा बनणार असल्याच्या बातमीवर शिक्कामोर्तब झालं आहे. मीडियामध्ये करीनाच्या प्रेग्नंसीबाबत अनेक शक्यता वर्तवण्यात जात होत्या. शिवाय सैफ आणि करीनानेही यावर मौन बाळगलं होतं. परंतु आता खुद्द सैफ आणि करिनाने प्रेग्नंट असल्याच्या वृत्तावर मोहर लावली आहे. करिनाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर दुसरा छोटा पाहुणा येणार असल्याची गुडन्यूज शेअर केली आहे. “आम्हाला हे सांगताना अत्यंत आनंद होत आहे की आमच्या कुटुंबात आणखी एक चिमुकला पाहुणा येणार आहे. तुम्हा सर्वांच्या शुभेच्छांसाठी आणि प्रेमासाठी खूप धन्यवाद”, असं सैफ व करीनाने म्हटलंय.


काँग्रेस प्रवक्ते राजीव त्यागी यांचं हार्ट अटॅकने निधन


 काँग्रेसचे प्रवक्ते राजीव त्यागी यांचं ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. काँग्रेसचे आक्रमक प्रवक्ते म्हणून राजीव त्यागी यांची ओळख होती. टिव्हीवरील चर्चासत्रांमध्ये ते नेहमीच काँग्रेसची भूमिका भक्कमपणे मांडण्यासाठी प्रसिद्ध होते. राजीव त्यागी यांच्या निधनानंतर काँग्रेसने ट्वीट करुन दुःख व्यक्त केले. 'राजीव त्यागी यांच्या आकस्मिक निधनाने मोठं दुःख झालं, ते एक कट्टर काँग्रेसी आणि एक सच्चा देशभक्त होते.'',


 

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.