LIVE UPDATES | तंत्रशिक्षणातील प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्ट पासून
मुंबईत मुसळधार : अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडा; मुख्यमंत्र्यांचे मुंबईकरांना आवाहन राममंदिर भूमिपूजनाचा उत्साह सातासमुद्रापार, न्यूयॉर्कच्या टाईम्स स्क्वेअरवर झळकले भगवान राम आणि राममंदिराचे फोटो Maharashtra Rain | मुंबई, कोकणासह राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसामुळे दाणादाण Ram Mandir | श्री रामाचं मंदिर हे आधुनिक संस्कृतीचं प्रतीक बनेल : नरेंद्र मोदी कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
06 Aug 2020 10:24 PM
वर्ष 2020-21 करता तंत्रशिक्षणातील (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्ट 2020 ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत
वर्ष 2020-21 करता तंत्रशिक्षणातील (पॉलिटेक्निक) प्रथम वर्ष पदविका अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया 10 ऑगस्ट 2020 ते 25 ऑगस्ट 2020 या कालावधीत राबविण्यात येणार आहे : उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत
औरंगाबाद 19 वर्षीय तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एका संशयिताची आत्महत्या. खवल्या डोंगरांवरून उडी घेत आत्महत्या. मंगळवारी मित्रा सोबत फिरायला गेलेल्या तरुणीच्या मित्राला मारहाण करत केला होता अत्याचार. संशयिताची आत्महत्या मोबाईल कॅमेरात कैद. आरोपीचा भाऊ पोलिसांना शरण येण्यास सांगत असतानाच घेतली उडी.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी सीबीआयने 6 आरोपींविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. यात रिया चक्रवर्ती, तिचे वडील, आई, भाऊ, सॅम्युअल मिरांडा आणि श्रुती मोदी यांचा समावेश आहे. गुजरात केडरचे आयपीएस सहसंचालक मनोज शशीधर यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीने चौकशी सुरू केली आहे.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.
अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण, खासदार नवनीत राणा यांच्या 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलासह कुटुंबातील 10 जणांचा अहवाल आला होता पॉझिटिव्ह
पिंपरी चिंचवडमधील कोरोना रुग्णांवर उपचार करणारं आणि नेहमीच वादात असणाऱ्या आदित्य बिर्ला रुग्णालयात नर्सिंग स्टाफने कामबंद आंदोलन पुकारलेले आहे. विना पीपीई किट, अथवा निकृष्ट दर्जाचे पीपीई किट त्यांना दिले जातायेत. वर 25 हुन अधिक स्टाफ कोरोना पॉझिटिव्ह झाल्यानंतर त्यांच्यावर योग्यवेळी उपचार झाला नसल्याचा, तसेच एका खोलीत अनेकांना कॉरंटाईन केलं जातंय, तसेच आयसीयूमध्ये मर्यादेपेक्षा अधिक रुग्णांवर उपचार केले जातायेत असे आरोप स्टाफकडून केले जातायेत. ओव्हर टाइम करायला लाऊन ही पगारवाढ दिली जात नाही. ज्या हॉस्टेलमध्ये हा स्टाफ तिथं त्यांना निकृष्ट दर्जाचे ते ही अवेळी जेवण दिलं जातंय. वर समस्या मांडल्या तर 24 तासात राजीनामा देण्याच्या धमक्या दिल्या जातायेत. आज आंदोलन केलं तेंव्हा ही बाऊन्सरद्वारे धमकवण्यात आलेलं आहे. त्यांना काम करायचं नाही हा त्यांचा हक्क आहे. आम्ही कोणाला ही जबरदस्तीने काम करायला भाग पाडणार नाही. रुग्णालय प्रशासन लवकरच पर्यायी व्यवस्था उभारत आहे. असं रुग्णालयाच्या मुख्याधिकारी रेखा दुबे यांनी स्पष्टीकरण दिलंय.
शालेय शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन व गूगल यांच्यामार्फत राज्यातील शाळांसाठी गूगल क्लासरूम प्रकल्पाचे उद्घाटन : मुख्यमंत्री कार्यालय
यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून मार्च, एप्रिल आणि मे या तीन महिन्यात जेवढे मृत्यू झालेत. त्याहुन अधिक मृत्यू हे मागील वर्षी याच तीन महिन्यात नोंद झाले होते. यावरुन सरकार आकडे लपवतय हे दिसतंय : प्रकाश आंबेडकर
कोरोनाच्या काळात सोलापूरच्या कोविड कंट्रोल रूमला सनियंत्रण अधिकारी म्हणून कार्यरत असलेले धनराज पांडे यांची पालिकेच्या उपायुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. धनराज पांडे हे स्थानिक निधी लेखा परीक्षक, सोलापूर येथे सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते. प्रशासकीय बदली नियमानुसार यंदाच्या वर्षी त्यांची बदली होणे अपेक्षित होते. मात्र, सोलापूरात कोरोना काळात सोलापूर शहरात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्यामुळे त्यांना पालिकेच्या उपायुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आजच सोलापुर महापालिकेला शासनाचा हा आदेश प्राप्त झाला आहे. पांडे यांनी आजपर्यँत नागपूर जिल्हा परिषद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे तसेच मुंबई येथे लेखा व कोषागारे कार्यालय या ठिकाणी कार्य केले आहे.
पुणे जिल्ह्यातील कापुरहोळ गावात एका सोन्या-चांदीच्या दुकानांत घुसून दरोडेखोरांनी गोळीबार करत लुटमार करण्याचा प्रयत्न केला. या गोळीबारात कोणी जखमी झालेले नाही.
मुंबई : गणेश उत्सवात चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी एसटी महामंडळाच्या वतीने सेवा सुरू, परळ, कुर्ला, मुंबई सेंट्रल या बसस्थानकावरून दिनांक 5 ऑगस्ट ते 12 ऑगस्ट या दरम्यान ग्रुप बुकिंग आणि मागेल त्याला एसटी ही योजना सुरू, महामंडळाच्या वतीने मागेल त्या गावाला एसटी देण्यास सुरुवात,
एका एसटीमध्ये 22 प्रवासी क्षमता,
संगणकीय आरक्षण, समूह आरक्षण ही सेवा सुरू
औरंगाबाद जिल्ह्यातील 49 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले, त्यामुळे जिल्ह्यतील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या 15540 एवढी झाली आहे, त्यापैकी 11521 बरे झाले तर 503 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3516 जणांवर उपचार सुरु
अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण - बिहार पोलिसांचं पथक मुंबईतून पाटण्याला परतणार,
पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी मात्र मुंबईतच राहणार
कहानी घर घर की, लेफ्ट राईट लेफ्ट, इस प्यार को क्या नाम दू आदी मालिकांत झळकलेला अभिनेता समीर शर्मा यांची घरी आत्महत्या.
बीड जिल्ह्यात बुधवारी पहिल्यांदाच एकाच दिवशी तब्बल 108 कोरोनाबाधित रूग्ण, यात सर्वाधिक 35 रूग्ण गेवराई तालुक्यातील आहेत. काल दिवसभरात आरोग्य विभागाने केलेल्या रॅपिड अॅन्टिजेंट टेस्टमध्ये 28 तर तपासणीला पाठवलेल्या स्वॅबमध्ये 7 अशा एकूण 35 रूग्णांचा समावेश आहे. याशिवाय परळी तालुक्यात 29, बीडमध्ये 14, अंबाजोगाई, माजलगाव प्रत्येकी 6 आणि धारूर व पाटोदा तालुक्यात प्रत्येकी 1 तसेच आष्टी तालुक्यात 5 रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील एकूण बाधीत रूग्णांची संख्या 1141 इतकी झाली आहे.
शिक्षकांच्या प्रशासकीय बदल्या रद्द झाल्या. आता केवळ विनंती बदल्या होणार आहेत. ऑफलाईन बदल्यातून आर्थिक व्यव्हार होतील, अशी शिक्षक संघटनांची भूमिका होती. एबीपी माझाने ह्याचा पाठपुरावा केला होता.
रायगड जिल्ह्यातील उरण येथील जेएनपीटी बंदरातील तीन क्रेनस कोसळल्या. जहाजातून कंटेनर उतरविण्यासाठी वापरल्या जातात क्रेन्स.
रायगड जिल्ह्यातील उरण येथील जेएनपीटी बंदरातील तीन क्रेनस कोसळल्या. जहाजातून कंटेनर उतरविण्यासाठी वापरल्या जातात क्रेन्स.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण सीबीआयकडे सोपवलं, बिहार सरकारच्या शिफारशीला केंद्र सरकारची मान्यता
सोलापूर शहरात दुकानांसाठी लावण्यात आलेले सम विषम नियम रद्द
शहरातील सर्व प्रकारचे बाजार, बाजरपेठ क्षेत्रातील दोन्ही बाजूंची दुकाने सुरू करता येणार
सोमवार ते शनिवार पर्यंत सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत दुकाने सुरू ठेवण्यास परवानगी तर रविवारी दुकाने बंद ठेवण्याचे आदेश
दूध विक्री करणारे दुकाने, डेअरी, अत्यावश्यक आठवड्यातील सर्व दिवस सुरू राहणार
सलून, स्पा, मटण विक्री यांची दुकाने पूर्वी दिलेल्या आदेशाप्रमाणे रविवारी सुरू राहणार
मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांचे सुधारित आदेश
अहमदनगर - शिवसेना उपनेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचं निधन झालं. ते 70 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली. अनिल राठोड यांनी नगर मतदारसंघात 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केलं होतं. मात्र गेल्या वर्षापासून अनिल राठोड हे आजारी होते. त्यातच त्यांना कोरोनाचीही लागण झाली होती.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. राजापूर येथील अर्जुना नदीवरील ब्रिज हा जुना अर्थात जुना आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक बांधकांम विभागानं याबाबतचं पत्र पोलीस स्टेशनला दिलं असून त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे किमान तूर्तास तरी मुंबई - गोवा महामार्गावरील राजापूर येथे वाहनांना पुढे जाण्यास बंदी करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना कोरोनाची लागण
उद्यापासुन पुण्यातील दुकानं सुरु ठेवण्यासाठी घालण्यात आलेलं पी 1 आणि पी 2 चे बंधन उठवण्यात येणार. उद्यापासून पुण्यात दोन्ही बाजूंची दुकानं एकाचवेळी सुरू ठेवता येणार. लॉकडाऊन शिथिल करताना गर्दी टाळण्यासाठी पुण्यात दुकानं सुरू ठेवण्यासाठी पी 1 आणि पी 2 ची मर्यादा घालून देण्यात आली होती . उद्यापासून पुण्यातील मॉल, शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि हॉटेल्स देखील आवश्यक ती खबरदारी घेऊन उघडण्यास परवानगी देण्यात आलीय.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सरकार कोणाला तरी वाचवण्यासाठी चौकशीत टाळाटाळ करत आहे. अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
सुशांत सिंग राजपूत प्रकरणात सरकार कोणाला तरी वाचवण्यासाठी चौकशीत टाळाटाळ करत आहे. अनेक गोष्टी लपवल्या जात आहेत, असा आरोप खासदार नारायण राणे यांनी केला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना 10 दिवस क्वॉरंटाईन राहावं लागणार. तर 12 ऑगस्टनंतर जे कोकणात जातील त्यांना कोरोना टेस्ट करावी लागेल, ती निगेटिव आली तर जाऊ शकतात; सरकारकडून नियमावली जाहीर.
सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणात केवळ वातावरण तयार करण्यासाठी युवा नेत्यांचे नाव घ्यायचे आणि प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र सुरु आहे. या गोष्टीचा आदित्य ठाकरे यांच्याशी संबंध नाही, ज्यांना वाटतं त्यांनी पुरावे द्यावेत : अनिल परब
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली. पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती. आदेश निघाल्यापासुन नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्याची सूचना, परंतु एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली झाली आहे. पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आदेश निघाल्यापासून नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आलंय. परंतु एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता आहे.
पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची बदली. पुण्याहून थेट दिल्लीला पंतप्रधान कार्यालयात उपसचिव म्हणून नियुक्ती. आदेश निघाल्यापासुन नवल किशोर राम यांना तीन आठवड्याच्या आत पुणे जिल्ह्याधिकारी पदावरुन कार्यमुक्त करण्यास सांगण्यात आलंय. परंतु, एका आठवड्याच्या आतच राम दिल्लीत उपसचिव म्हणून पदभार स्वीकारण्याची शक्यता.
भारतीय नाट्यसृष्टीचे द्रोणाचार्य अल्काझी यांचे निधनभारतीय नाट्यक्षेत्राचे प्रवर्तक अब्राहिम अल्काझी यांचे दिल्ली येथे ह्रदय विकाराच्या धक्क्याने निधन. ते 95 वर्षांचे होते. 1940 नंतरच्या दोन दशकात प्रयोगशील नाट्यकर्मी म्हणून अल्काझी यांनी आपली ओळख निर्माण केली. 1950 मध्ये त्यांना बीबीसी ब्रॉडकास्टिंग अॅवॉर्डने गौरवण्यात आले. 1962 ते 1977 अशी 15 वर्षं ते राष्ट्रीय नाट्य विद्यालय अर्थात एनएसडीचे संचालक राहिले. या काळात, अनेक नाट्यकर्मी विद्यार्थ्यांना त्यांनी नाटकाचे धडे दिले. यात नासिरुद्दीन शाह, रोहिणी हट्टंगडी, ओम पुरी, ज्योती सुभाष, बी. जयश्री आदींचा समावेश होतो. त्यांचे नाट्यक्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवण्यात आले.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या दिवशी शहरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संपूर्ण देशवासियांसह सोलापूरकरही प्रतीक्षेत होते. हा सर्व हिंदू बांधवांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून शहरातील सर्व मंदिरे उघडी करून तेथे प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवून पूजा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी केली आहे.
बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अयोध्येत राम मंदिराचे भूमिपूजन होत आहे. या दिवशी शहरातील मंदिरे उघडण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनासाठी संपूर्ण देशवासियांसह सोलापूरकरही प्रतीक्षेत होते. हा सर्व हिंदू बांधवांच्या अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे सर्व नियमांचे पालन करून शहरातील सर्व मंदिरे उघडी करून तेथे प्रभू श्रीरामाची प्रतिमा ठेवून पूजा करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आ. सुभाष देशमुख यांनी केली आहे.
उपमुख्यमंत्री तसंच अर्थमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 550 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचे पगार लवकरच होतील, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली.
गडचिरोली : गडचिरोली क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांचे बनावट फेसबुक खाते उघडून फसवणूक करण्यात आली आहे. एका भामट्याने जिल्ह्यातील काही नागरिकांकडे मोठ्या रकमा मागितल्या आहेत. नागरिकांनी खासदार नेते यांच्याकडे विचारणा केल्यावर प्रकार पुढे आला. खासदार नेते यांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि सायबर सेलला तक्रार केली असून आपली बदनामी करण्याचा हा डाव असल्याची खासदार नेते यांनी माहिती दिली आहे. नागरिक आणि कार्यकर्ते यांनी सावध राहण्याचे आवाहन केले आहे. खोटे फेसबुक खाते उघडणाऱ्या भामट्याला पकडण्याचे गडचिरोली पोलिसांपुढे आव्हान आहे.
सुशांतसिंह राजपूत केसमध्ये करण जोहरचं नाव आल्याने नेटफ्लिक्सने करण जोहरचं नाव गुंजन सक्सेनाच्या क्रेडिट लिस्टमधून वगळलं. म्हणूनच ट्रेलरमध्ये तूर्त कुणाचीच नावं नाहीत. आतरराष्ट्रीय ओटीटी प्लॅटफॉर्मवर सुशांतच्या मृत्यूच्या केसचा मोठा परिणाम झाला आहे.
यूपीएससीचा अंतिम निकाल जाहीर, प्रदीप सिंह देशात अव्वल, जतिन किशोर दुसरा तर प्रतिभा वर्मा तिसऱ्या क्रमांकावर. अभिषेक सराफ महाराष्ट्रातून पहिला. अंधत्वावर मात करत पुण्याचा जयंत मंकले यूपीएससीत 143 वा
पुणे : वाढीव विजदराच्या विरोधात भारतीय जनता पक्षांकडून आज पुण्यातील महावितरणच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. यावेळी उर्जा मंत्र्यांसाठी वीजबीलांचा हार भाजपकडून भेट म्हणून महावितरणच्या कार्यालयात देण्यात आला. सरकारने वीजेचा दर मीटर प्रेमाने आकाराने अशी मागणी भारतीय जनता पक्षांकडून करण्यात आली आहे.
लॉकडाऊनमुळे राज्यातील लालपरी ठप्प आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नात मोठी घट झाली आहे. त्यामुळे मागील चार महिन्यांपासून एसटीतील कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीयेत. त्यामुळे एका वाहतूक निरीक्षकावर रस्त्यावर बसून भाजी विकण्याची वेळ आली आहे. मुळचे बार्शी इथले रहिवासी असलेले योगेश कुलकर्णी करमाळा तालुक्यात एसटी महामंडळात वाहतुक निरीक्षक म्हणून कार्य़रत आहेत. मात्र चार महिन्यांपासून पगार नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. त्यात त्यांच्या वडीलांचा काही दिवसांपूर्वी अपघात झाल्याने त्यांना वारंवार मुळगावी बार्शीला जावे लागते. बार्शी-करमाळा प्रवासासाठी लागणारा खर्च करण्यासाठी देखील पैसे उपलब्ध नसल्याने कुटुंबाचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे मित्रांच्या साहाय्याने आपण हा व्यवसाय सुरु केल्याची माहिती योगेश कुलकर्णी यांनी दिली. राज्यशासनाने यावर काही तर मार्ग काढून लवकरात लवकर पगार करावा अशी मागणी देखील वाहतुक निरीक्षक योगेश कुलकर्णी यांनी केली.
गोंदिया वैद्यकीय महाविद्यायातून दोन महिला रुग्णांना नागपूर येथील वैदकीय महाविद्यालयात अॅम्ब्युलन्सने नेत असताना अॅम्बुलंसमधील ऑक्सिन संपल्याने एका महिलेचा गोंदियापासून 30 किलो मीटर अंतरावर आक्सिजन अभावी मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेला गोंदिया आणत पुन्हा नागपुरात उपचारा करिता पाठविले या दोन्ही महिलांना काल रात्री श्वसनाचा त्रास जाणवत असल्याने गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले होते. दोन्ही महिलांचे स्वॅब नमुने कोरोना चाचणी करिता पाठविले आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील 98 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना बधित रुग्णांची संख्या 14 हजार 992 वर पोहोचली आहे. त्यापैकी 11 हजार 229 रुग्ण बरे झाले आहेत. तर 487 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3276 जणांवर उपचार सुरु आहेत.
नाशिकमध्ये कोरोना संशयित महिलेचा मृत्यू झाल्याने संतप्त रुग्णाच्या नातेवाईकांनी डॉक्टरला मारहाण केली. सिडको परिसरातील ग्लोबल हॉस्पिटलचे डॉक्टर दिनेश पाटील यांना मारहाण करण्यात आली. तसंच इतर डॉक्टर आणि नर्स यांनाही शिवीगाळ केल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. काल संध्याकाळी सहा वाजता ही घटना आहे. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तीन आरोपींवर महाराष्ट्र वैद्यकीय सेवा अधिनियम कायदा तसंच मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिघेही आरोपींना अटक केली आहे. उपचार केलेल्या कागदपत्रांची वारंवार डॉक्टरकडे मागणी करुनही ते न मिळाल्याचं नातेवाईकांचं म्हणणं आहे.
परभणी : जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या 720 वर पोहोचली असून आजपर्यंत 40 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 395 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतेलआहेत, तर 285 जणांवर उपचार सुरु आहेत.
सातारा : कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधितांमध्ये अधिकाधिक नागरिक सौम्य लक्षणे असलेली आहेत. अशा नागरिकांना इथून पुढे नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोय उपलब्ध असेल तर घरीच वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आज जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिशय सूक्ष्म नियमावली सुरु करण्यात आली आहे. ही नियमावली तयार करण्यासाठी प्रशासनातील अधिकाऱ्यांसह साताऱ्यातील व्यावसायिक माज्जीद कच्छी आणि त्यांच्या टीमने सामाजिक बांधलकीतून योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या सर्वांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. ही नियमावली एक आदर्श नियमावली ठरेल याचा अतिशय चांगला परिणाम होईल. जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात आजपासून म्हणजे 4 ऑगस्ट पासून शाळा सुरु होणार नाहीत. पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी शाळा सुरु करण्याची घोषणा केली होती. शाळा सुरू करण्यासंदर्भात अपेक्षेनुसार तयारी नसल्याचे आणि 15 ऑगस्ट नंतर याबाबत आढावा घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
अयोध्येच्या भूमीपूजनाचे निमंत्रण कोणालाच नाही, मी सर्व कारसेवांना उपस्थित होतो, त्यामुळे जाता आलं असतं तर आनंद झाला असता, पण आम्ही आंनदी आहोत. पण पंतप्रधान सगळ्यांचे प्रतिनिधी म्हणून भूमिपूजन करत आहेत, अयोध्येत मंदिराच स्वप्न पूर्ण होत आहे : देवेंद्र फडणवीस
पाच ऑगस्टपासून महापालिका क्षेत्रातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूची सर्व दुकाने सुरू होणार; मुंबई महापालिकेचा आदेश. दारूची दुकानं पण सुरू होणार असल्याची माहिती.
भाजपच्या शिष्टमंडळाने सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबत राज्य सरकारविरोधात राज्यपालांकडे भूमिका मांडली.
शरद पवार यांचे राजकीय विरोधक असलेले साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांनी तब्बल 17 वर्षानंतर पवार यांच्यासोबत स्नेहभोजन केले. मुंबई येथील सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी ही भेट झाली. 2004 सालची लोकसभा निवडणूक शरद पवार यांच्याविरोधात भाजपमधून जाचक यांनी लढवली होती. त्यानंतर सातत्याने जाचक हे पवारांचे तीव्र विरोधक म्हणून परिचित होते. पवार व जाचक यांचे राजकीय ऋणानुबंध जुळले. इंदापूर तालुक्यातील छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक यामुळे सोपी झाली. प्रमुख विरोधक असलेले जाचक पवारांच्या गळाला लागल्याची चर्चा यामुळे सुरू झाली आहे.
डोंबिवली एमआयडीसीच्या फेज दोनमध्ये अंबर कंपनी आहे. या कंपनीत आज संध्याकाळी सव्वापाचच्या दरम्यान मोठा स्फोट झाला. या स्फोटाची तीव्रता इतकी होती, की आजूबाजूचा संपूर्ण परीसर हादरून गेला. या स्फोटामुळे अंबर कंपनीसह आजूबाजूच्या दोन कंपन्यांचंही मोठं नुकसान झालं. सुदैवाने आज या कंपनीला सुट्टी असल्यामुळे कुणालाही इजा झालेली नाही. या स्फोटाचा हादरा आणि त्यानंतर पसरलेल्या केमिकलच्या वासामुळे या भागातल्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली आणि नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. याच कंपनीच्या बाजूला असलेला रस्ता काही महिन्यांपूर्वी प्रदूषणामुळे गुलाबी झाला होता. तर याच परिसरातल्या मेट्रोपोलिटन कंपनीलाही फेब्रुवारी महिन्यात भीषण आग लागली होती. यानंतर आज पुन्हा झालेल्या स्फोटामुळे डोंबिवली एमआयडीसीतल्या या जीवघेण्या केमिकल कंपन्या स्थलांतरित करण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे.
आमदार रवी राणा यांच्या आई-वडिलांनंतर आता मुलांनाही कोरोनाची लागण झाली आहे. खासदार नवनीत राणा यांची 7 वर्षीय मुलगी आणि 4 वर्षीय मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आमदार रवी राणा यांच्या आई-वडीलांसह मुलगा, मुलगी यांच्यासह कुटुंबातील 10 जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यात रविवारी दोन ऑगस्ट रोजी जिल्ह्यात 280 कोरोना बाधित आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 1570 इतकी झाली आहे. यात उस्मानाबाद तालुक्यात 77 , तुळजापूर तालुक्यात 60, उमरगा तालुक्यात 74, परंडा 31, कळंब तालुक्यात 7, वाशी तालुक्यात 16 भूम तालुक्यात 10 तर लोहारा तालुक्यात 5 एकूण असे सर्व मिळून 280 रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या 1570 झाली असून आजपर्यंत 57 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला आहे, तर 516 रुग्णांवर यशस्वी उपचार झाल्याने त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली असून 997 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचं पहिलं निमंत्रण इक्बाल अन्सारी यांना, अन्सारी हे अयोध्या खटल्यातील पक्षकार
नारळी पौर्णिमानिमित्त पद्मशाली समाजाचे कुलदैवत असलेल्या मार्कंडेय महामुनींंची रथयात्रा यंदाच्या वर्षी रद्द करण्यात आली आहे. दरवर्षी सोलापुरात नारळी पोर्णिमेला मार्कंडेय मंदिरात भव्य उत्सव साजरा करण्यात येत असतो. पहाटे 3 वाजल्यापासून रुद्राभिषेक आणि आरतीने या उत्सवाला सुरुवात होते. तर सकाळी 11 च्या सुमारास भव्य अशी रथयात्रा निघत असते. हजारो पद्मशाली समाजातील बांधव या रथयात्रेत सहभागी होत असतात. साधारण 12 तास ही रथयात्रा शहरातल्या विविध परिसरातून रात्री मंदिर परिसरात परतत असते. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेकडो वर्षांची ही परंपरा खंडित झाली आहे. मात्र असं असलं तरी नित्योपचार सुरळीत पार पडले. आरती, होम हवन, रुद्राभिषेक इत्यादी विधी दरवरर्षी प्रमाणे ठरलेल्या वेळेत पार पडल्या. सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर श्रीकांचना यन्नम, महापालिकेचे विरोधी पक्षनेते महेश कोठे यांच्यासह काही प्रमुख मंडळीच्या उपस्थितीत विधी पार पडल्या. भाविकांना मात्र यंदा मंदिराच्या बाहेरुनच दर्शन घेऊन परतावं लागत आहे.
देशांतर्गत प्रवास केल्याने पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय कुमार क्वॉरन्टाईन, मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण
सातारा - कोल्हापूर -पुणे जाणारा ट्रक घुसला पोलिसांच्या चेकनाक्यात, पुणे - बेंगलोर महामार्गावरची घटना, सांगली-सातारा चेकपोस्टवर घुसला ट्रक, ई पास तपासणी करणारे वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक, आणि पोलिस होते घटनास्थळी, कराड जवळील मालखेड येथील घटना
सातारा - कोल्हापूर -पुणे जाणारा ट्रक घुसला पोलिसांच्या चेकनाक्यात, पुणे - बेंगलोर महामार्गावरची घटना, सांगली-सातारा चेकपोस्टवर घुसला ट्रक, ई पास तपासणी करणारे वैद्यकीय कर्मचारी, शिक्षक, आणि पोलिस होते घटनास्थळी, कराड जवळील मालखेड येथील घटना
ठाणे-नाशिक महामार्गावरील खाडीत कंटेनर कोसळला. खारेगावच्या हद्दीतील खाडीत हा कंटेनर कोसळला. भरधाव वेगाने ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या कंटेनरवरील चालकाचा ताबा सुटल्याने अपघात झाला. पहाटे पाच वाजता पुलाचा कठडा तोडून कंटेनर खाडीत कोसळला. अग्निशमन दल आणि पोलिसांनी बोटीच्या साहाय्याने शोध मोहीम सुरु केली आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 27 जुलै रोजी राम मंदिरासाठी देणगी दिल्याचं पत्रात नमूद केलं आहे. राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं मोठं योगदान असल्याचं पत्रात लिहिलं आहे. तसंच माझीही प्रभू रामावर श्रद्धा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय आरटीजीएस क्रमांक आणि बॅंकेची माहिती या पत्रात लिहिली आहे.
6 जुलै रोजी सुधारित युजीसी गाईडलाइन्समध्ये सप्टेंबरअखेरीस विद्यापीठाच्या अंतिम वर्ष परीक्षा घेण्याच्या निर्णयाविरोधात देशभरातील विद्यार्थी, युवसेनेसोबत आता प्राध्यापक सुद्धा याला विरोध करत परीक्षा नको म्हणताना पाहायल मिळतं आहे. प्राध्यापक संघटना महाराष्ट्र फेडरेशन ऑफ युनिव्हर्सिटी कॉलेज टीचर्स ऑर्गनायझेशन अर्थात एमफुक्टो या प्राध्यापक संघटनेने सर्वोच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल केली आहे. आता परीक्षा नको अशी भूूमिका मांडली आहे.सद्यस्थितीत राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना परीक्षा घेणे शक्य नाही. जवळपास 11 लाख विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल. अनेक विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांना परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी दूरचा प्रवास करावा लागेल. एका परीक्षा कक्षात 40 विद्यार्थी असतात. सद्यस्थितीत अंतराच्या निकषांचा विचार करता 20 विद्यार्थ्यांना वर्गात बसवावे लागेल. त्यानुसार 60 ते 70 हजार प्राध्यापकांना पर्यवेक्षक म्हणून काम करावे लागेल. प्राध्यापकांच्या 50 टक्के जागा रिक्त आहेत. मोबाईल फोनवरुन परीक्षा घेता येऊ शकत नाही. त्यामुळे ऑनलाईन परीक्षा घ्यायची झाल्यास विद्यार्थ्यांकडे सुविधा नाही, अस एम एमफुकटो संघटनेचे म्हणणे आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या पत्नी अनघा जोशी यांचं अल्पशा आजाराने निधन झालं. काल म्हणजेच 2 ऑगस्ट रोजी रात्री अकराच्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 75 वर्षांच्या होत्या.
अयोध्येत शिवसेना दीपोत्सव साजरा करणार, राम मंदिर आणि शिवसेना जुनं नातं राहिलंय, राममंदिराच्या भूमिपूजनाच्या पुर्वसंध्येला शिवसैनिक लक्ष्मण किल्ल्यावर दिपोत्सव साजरा करणार, मुंबई आणि काही स्थानिक शिवसैनिक लक्ष्मण किल्यावर दिवे लावणार, शिवसैनिक अयोध्येकडे रवाना, दीपोत्सवाची तयारी सुरु, याआधी उद्धव ठाकरे अयोध्येत तीन वेळा येऊन गेले आहेत, लक्ष्मण किल्ल्यावर एकूण 492 दिवे लावून साजरा करणार आनंद
91 वर्षाचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी कोरोनावर मात केली. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात ते उपचार घेत होते. त्यांची 17 दिवसांनंतर करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. 91 वर्षे वय, मधुमेह, कोरोनाची लागण झाल्याने सर्वांना चिंता होती. खुद्द डॉ. निलंगेकरांनी आपल्याला काही होणार नाही, असे सांगितले होते.
नवी दिल्ली : कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. “मला कोरोनाची लागण झाली आहे. माझी तब्ब्येत स्थिर आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालो आहे. त्यामुळे माझ्या संपर्कात जे कोणी आले असतील, त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करावं,” असे आवाहन कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांनी केले आहे.
औरंगाबाद जिल्ह्यातील 87 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14640 एवढी झाली आहे. त्यापैकी 10901 बरे झाले तर 484 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3255 जणांवर उपचार सुरु आहेत.
सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलिसांवर केल्या जाणाऱ्या आरोप-प्रत्यारोपावरून दिग्दर्शक केदार शिंदे संतापले. ट्वीट करून व्यक्त केला संताप...
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींच्या पत्नी अनघा जोशींचं निधन, गेले अनेक दिवस त्या आजारी होत्या, 75व्या वर्षी राहत्या घरी घेतला अखेरचा श्वास
हिंगोली : श्रावणातील आज दुसरा श्रावणी सोमवार निमित्त हिंगोलीच्या औंढा नागनाथ येथील आठवे ज्योतिर्लिंग नागेश दारुकावणे येथे आज श्री प्रभू दुग्धाभिषेक घालून महापूजा पार पडली. देवस्थानचे व्यवस्थापक व मंदिर पुजारी पुरोहित या मोजक्याच लोकांमध्ये महापूजा संपन्न झाली. देशावरील कोरोनाच संकट लवकरात लवकर दूर होऊ दे ! या देशातील बळीराजाला सुख-समृद्धी येऊ दे ! अशी या देवस्थानचे देवस्थानचे मुख्य पुजारी तुळजा दास भोपी व देवस्थानचे व्यवस्थापक शंकर काळे यांनी केली आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी देखील मंदिर परिसरात भाविका विना शुकशुकाट पसरला होता. परिसरातील भाविक मंदिराच्या दोनशे मीटर अंतरावर कळसाचे दर्शन घेऊन माघारी परतत होते.
नागपुरमध्ये काल रात्री 235 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असून 9 जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 5895 वर पोहोचला आहे.
माजी खासदार संजय काकडे यांच्या विरोधात सख्ख्या मेव्हण्याच्या तक्रारीनंतर जीवे मारण्याचा गुन्हा दाखल. संजय काकडे यांच्याबरोबर त्यांच्या पत्नी उषा काकडे यांच्यावरही गुन्हा दाखल. उषा काकडे यांचे सख्खे बंधु युवराज झाले हे अनेक वर्षांपासून संजय काकडे यांचे व्यवसायिक भागीदार आहेत. या भागीदारीतुन दोघांमध्ये वाद होऊन संजय काकडे यांनी ऑगस्ट 2018 मधे घरी बोलावून जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार युवराज ढमाले यांनी दिल्यानंतर संजय काकडे यांच्या विरोधात पुण्यातील चतुश्रुंगी पोलिस स्टेशन मधे गुन्हा नोंद करण्यात आलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्त, महासंचालक आणि मुख्य सचिवांची बोलावली तातडीची बैठक, अनेक विषयांवर होणार चर्चा, सुशांतसिंग राजपूतवरही चर्चा होण्याची शक्यता, थोड्याच वेळात सुरु होणार वर्षा बंगल्यावर बैठक
ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन कोरोनामुक्त, अमिताभ बच्चन यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आल्याची अभिषेक बच्चन यांची माहिती
#BreakingNews | केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना कोरोनाची लागण, अमित शाह यांनी स्वत: ट्वीट करुन दिली माहिती
मंत्री जितेंद्र आव्हाडांचा नाशिक दौरा, कोरोनामुक्त महाराष्ट्र घडो हिच श्रीराम चरणी प्रार्थना केली. प्रभू श्रीराम चंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या नाशिक भूमीचाच मी सुपुत्र, माझा जन्म नाशिकचा. लहानपणापासून काळाराम मंदिर माझ्या तोंडपाठ असल्याची आव्हाडांची प्रतिक्रिया. यावेळी आव्हाड म्हणाले, श्रीराम कोणाच्या सातबारावर नाही, तो सातबारा कोणाच्या मालकीचा नाही. रामाच्या नावावर राजकारण करणे वेगळं आणि भक्ती वेगळं. त्यांना वाटतय म्हणून ते भूमिपूजन करताय. गेल्या 40 वर्ष भाजपने रामाच्या नावावर राजकारण केलं. अख्ख्या जगाला हे माहितीय, राम नाव घेऊन त्यांनी पाणी विकलं, विटा विकल्या. सत्ता मिळवण्यासाठी जे जे करता येईल ते त्यांनी रामाच्या नावावर केलं.
बडनेरा स्वॅब प्रकरण : राजकीय वातावरण अजून तापण्याची शक्यता, खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या आरोप-प्रत्यारोपात आता भाजपची उडी, भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ अमरावतीत दाखल, दुपारी 3.30 वाजता भाजप कार्यालयात पत्रकार परिषद होणार
धुळे जिल्ह्यात शनिवारी दिवसभरात सहा कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झालाय. तर एकाच दिवसात कोरोनाच्या 122 नव्या रुग्णांची नोंद झालीय. सध्या जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 3 हजार 336 वर पोह्चली आहे. एकाच दिवसांत 6 मृत्यू झालेल्या कोरोना बाधीत रुग्णांमध्ये जिल्ह्यातील तीन महिला, तीन पुरुषांचा समावेश आहे. एकाच दिवसात मृत्यू दर, तसेच रुग्ण संख्येचे प्रमाण वाढल्यानं ही बाब धुळे जिल्ह्यासाठी चिंता वाढवणारी आहे .
औरंगाबाद- जायकवाडी धरणाची पाणी पातळी 52 टक्के, जायकवाडी धरणाची सकाळी 6 वाजताची स्थिती, जायकवाडी धरणात 15602क्युसेकची आवक,
गणेशोत्सावासाठी चाकरमानी कोकणात निघाले, मुंबई-गोवा मार्गावर रत्नागिरीच्या चिपळून तर सिंधुदुर्गातील खारेपाटण तपासणी नाक्यावर गर्दी
औरंगाबाद जिल्ह्यातील 76 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधित रुग्णांची संख्या 14403 एवढी झाली आहे. त्यापैकी 10601 बरे झाले तर 478 जणांचा मृत्यू झाला असल्याने सध्या 3324 जणांवर उपचार सुरु .
बीड जिल्ह्यात दिवसभरात सर्वाधिक 83 पॉझिटिव्ह रुग्णांची भर, जिल्ह्यात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. काल यामध्ये तब्बल 50 रुग्णांची भर पडल्याने कोरोनाचा आकडा कालच 785 वर जावून पोहचला होता आज त्यात पुन्हा 83 पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली तर रात्री एका 73 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आजपर्यंत 31 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
जगात कोरोनाबाधितांची संख्या एक कोटी 80 लाखांवर त्यातील एक कोटी 13 लाख बरे झाले, सध्या 60 लाख अॅक्टिव केसेस ,
जगात मागील 24 तासात 2.46 लाख नवीन कोरोनाबाधित तर 5365 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू, आतापर्यंत एकूण 6 लाख 87 हजार मृत्यू,
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पुन्हा एकदा दाट धुक्याची चादर पसरली आहे. आज सकाळी पडलेल्या धुक्यामुळे 10 फुटा पलीकडे काहीच दिसत नव्हते. रस्त्यावर चालत असताना वाहन धारकांना लाईट लावून वाहन चालविण्याची वेळ आली होती. सलग दुसऱ्यांनदा पडलेल्या दाट धुक्यात गाव रस्ते, शिवार आणि शहर हरवून गेले होते. दाट धुक्यामुळे पिकांची फुलगळ होऊन पिकांवर बुरशीजन्य आजाराचा धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचबरोबर शेतकरीवर्गात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वी पडलेल्या धुक्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन उडीद, मूग, कपाशी, झेंडू इतर पिकांवर महागड्या फवारणीचा सामना करावा लागला. आज पडलेल धुक देखील शेतकऱ्यांना चिंतेत टाकणार आहे.
गडचिरोली : नगरविकास मंत्री आणि गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आज महाराष्ट्र -तेलंगणा सीमेवरील असलेल्या वादग्रस्त मेडीगड्डा सिंचन प्रकल्पाला भेट देण्याची शक्यता.
मुंबई : आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शरदाताई टोपे यांचे बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन, जालन्यातील अंबड तालुक्यातील कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना येथे उद्या सायंकाळी 04:00 वाजता अंत्यरसंस्कार होणार
#BreakingNews भिवंडी शहरातील टावरे कंपाऊंड परिसरात पोलीस हवलदार प्रफुल्ल दळवी यांच्यावर हल्ला, दोघां युवकात हाणामारी सुरू असताना मध्यस्ती करण्यासाठी गेले होत प्रफुल्ल दळवी, भोईवडा पोलिस ठाण्याच्या अंतर्गत घटना,दळवी उपचारासाठी रुग्णालयात दाखल
सदाभाऊ खोत यांचं आंदोलन फसलं,आंदोलनाचा फज्जा उडाला,
शेतकऱ्यांचा सहभाग नव्हता त्यामुळेच ते पिसाळले आहेत,
आंदोलन केंद्र सरकार विरोधात आहे की राज्य सरकार विरोधात की राजू शेट्टी विरोधात आहे ते आधी ठरवा,
प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा आलेल्या अपयशाला कोणाला तरी जबाबदार धरण्यासाठी भ्रमिष्ठासारखं बोलले असावेत,
माझी तीनशे एकर जमीन दाखवून द्या, ती विकुन कडकनाथ मधील लोकांचे पैसे परत करतो, राजू शेट्टी यांचे आरोप
राज्यसभेचे खासदार समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंह यांचे सिंगापूरमध्ये निधन. त्यांच्यावर सिंगापूर येथे उपचार सुरू होते
ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांना दोन दिवस सोमवारपर्यंत पोलिस कोठडी, ठाणे कोर्टाने सुनावली कोठडी, ठाणे आणि पालघर जिल्हा मनसे अध्यक्ष अविनाश जाधव यांच्यावर ठाणे आणि पालघर येथे डझनभर केसेस असल्याने काल 31 तारखेला त्यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली होती.
दिंडोरीत खासदार भारती पवार दूध दरवाढीच्या आंदोलनात सहभागी, आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले, खासदार भारती पवार,आमदार देवयानी फरांदे, आमदार राहुल ढिकले यांच्यासह 15 ते 20 कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे सीरम इनस्टिट्युटकडून विकसित करण्यात येत असलेल्या कोरोनावरील लसीची महीती घेण्यासठी सीरम इनस्टिट्युटमध्ये गेले होते. सीरम इनस्टिट्युटच्या मुख्य कार्यालयाला भेट दिल्यानंतर शरद पवार हे सीरम इनस्टीट्युटच्या मांजरी येथील प्रकल्पाला भेट देण्यासाठी पोहचले आहेत.
इंदापूर : राज्यमंत्र्यांनी अपघात ग्रस्ताला दिली स्वत:ची गाडी, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अपघात ग्रस्ताला स्वत:ची गाडी देऊन दवाखान्यात पाठवले, भरणे दुचाकीवर घरी गेले. दत्तात्रय भरणे यांच्या गाडीतून एका अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयात नेण्यासाठी मदत झाल्यानं रुग्णाचे प्राण वाचले आहेत. भरणे यांच्या गाडीतून इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे अपघातामध्ये जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं. जखमी व्यक्तीवर वेळेत उपचार झाल्यानं त्याच्या जीवाचा धोका टळला आहे.
सोलापूर : भाजपा आणि रयत्न क्रांती शेतकरी संघटना व इतर घटक पक्षाच्या वतीने वाघोली ता. मोहोळ येथे दूध दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या सरकारला सद्बुद्धी येऊदे असे साकडे घालत महादेवाच्या पिंडीवर दुग्धाभिषेक घालूनआंदोलनाला सुरुवात झाली.
शिर्डी : दुधाला दर वाढवून देण्याची मागणी, आज जिल्ह्यात विविध ठिकाणी दूध दर वाढीसाठी आंदोलने, अकोले येथे किसान सभेच्या नेतृत्वाखाली दगडाला दुधाचा अभिषेक,
डाॅ अजित नवलेंसह अनेक जण आंदोलनात सहभागी,
अनेक गावात संघर्ष समितीचे चावडीवर आंदोलन
औरंगाबाद- दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्यभर शेतकरी आंदोलन करत आहे.औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील डोनगाव मध्येही दूध उत्पादक शेतकऱ्यांना आंदोलन केले. सरकारमध्ये असलेल्या तीन पक्षांच्या नावाची फलक लावत,दगड ठेवून प्रतिकात्मक आंदोलन केलं. गावातील मंदिरातील गणपतीला देखील सरकारला सद्बुद्धी मिळावी म्हणून दुग्धाभिषेक केला. या गावातील लोक आज दुधाचा खवा बनवून सर्वसामान्य व्यक्तीला देणार आहेत.
भाजपची केंद्र सरकार विरोधात आंदोलन करण्याची हिंमत नाही, भाजप आणि सहयोगी पक्षांचे हे राजकीय आंदोलन, हिंमत असेल तर केंद्र सरकार विरोधात आंदोलन करा, आमचं आंदोलन हे राज्य आणि केंद्र सरकार विरोधातील होतं, दूध पावडर आयात बंदीची मागणी यांनी केंद्राकडे करावी, शेतकऱ्यांबद्दल यांना कळवळा नाही, हे राजकीय आंदोलन आहे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांचा आरोप
दुधाला अनुदान द्यावे या मागणीसाठी भाजप आघाडीच्या वतीने आज सुरू केलेल्या दूध आंदोलनाला शुभारंभ माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे आज सकाळी 7 वाजता सुरुवात झाली. संत नामदेव पायरी येथे दुधाचा अभिषेक करून नंतर चंद्रभागेच्या दुधाचा अभिषेक घालण्यात आला.
शिर्डी : पुणतांबा येथे दुध आंदोलन,
शेतकरी संपातील नेत्यांनी केले आंदोलन,
बळीराजाच्या मुर्तीला दुधाचा अभिषेक,
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी,
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे आंदोलन,
दुधाला दर वाढवून देण्याची मागणी
शिर्डी : पुणतांबा येथे दुध आंदोलन,
शेतकरी संपातील नेत्यांनी केले आंदोलन,
बळीराजाच्या मुर्तीला दुधाचा अभिषेक,
सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी,
अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा येथे आंदोलन,
दुधाला दर वाढवून देण्याची मागणी
'हे आंधळे , मुके आणि बहिऱ्याचे सरकार' म्हणत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी नामदेव पायरी येथे केले दूध आंदोलन
अकोल्यात मध्यरात्रीपासूनच भाजपच्या दूध आंदोलनाला सुरूवात, मध्यरात्री दुधांच्या गाड्या अडवल्या. पहाटे 5 वाजेपासून शहरातील जठारपेठ चौकात आमदार रणधीर सावरकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन सुरू, दूध विक्री थांबवली.
पंढरपूर मंगळवेढा रोडवर टायर पेटवून दूध आंदोलनाला सुरुवात, रयत क्रांती संघटना आक्रमक
महायुतीच्या दूध आंदोलनाची पहिली ठिणगी सांगली जिल्ह्यामध्ये रात्री पडली. रयत क्रांती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आष्टा आणि तासगाव याठिकाणी दुध वाहतूक रोखत दूध रस्त्यावर ओतले आहे.यावेळी दुधाचा एक टँकर फोडण्यात आला. दूध दरवाढीच्या मागणीसाठी रयत क्रांती संघटनेचे संस्थापक व माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी महायुतीच्या माध्यमातून १ ऑगस्ट रोजी राज्यव्यापी दूध बंद आंदोलनाची हाक दिली आहे. इस्लामपूर शहरात दूधगाड्या अडवून गरीबांना दूध वाटण्यात आले.
पार्श्वभूमी
राममंदिर भूमीपूजनाच्या सोहळ्यासाठी अयोध्यानगरी सज्ज
आपण जशी दिवाळी साजरी करतो तसं सध्या अयोध्येत वातावरण पाहायला मिळतंय. घरांना रंगेबीरंग कलर, साफसफाई, दुकानांमध्ये गर्दी तसेच प्रत्येक जण या भूमिपूजनाच्या मुर्हुतावर आनंद साजरा करण्यासाठी मिठाईच्या दुकानांकडे रांग लावतोय. अयोध्येत पंतप्रधान नरेद्र मोदींच्या पोस्टरबरोबर सगळीकडे भगवे झेंडे फडकताना दिसत आहेत. तसेच जो तो रामभक्त आपल्या गाडीवर किंवा घरावर प्रभू रामचं, हनुमानाचं चित्र असलेला झेंडा लावताना मग्न आहे.
माझ्या हृदयाच्या जवळचं स्वप्न पूर्ण होतंय : लालकृष्ण अडवाणी
अयोध्येतील राममंदिर भूमीपूजनाला काही तास उरलेले असताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची प्रतिक्रिया आली आहे. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न पूर्ण होत आहे, असं लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं आहे. राममंदिर आंदोलनातील लालकृष्ण अडवाणी प्रमुख चेहरा होते. लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटलं की, जीवनात काही स्वप्न पूर्ण व्हायला खूप वेळ लागतो. माझ्या हृदयाच्या जवळील एक स्वप्न होतं, ते पूर्ण होत आहे. अयोध्या येथे राम जन्मभूमीवर नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं भूमिपूजन होत आहे. निश्चित हे माझ्याच नाही देशातील करोडो लोकांसाठी हा ऐतिहासिक क्षण आहे.
शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य होणार नाही : आदित्य ठाकरे
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू केले आहे. सुशांतच्याआत्महत्येप्रकरणी व्यक्तिशः माझ्यावर तसेच ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एक प्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे, अशी प्रतिक्रिया युवासेना अध्यक्ष आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी ट्वीट करत दिली आहे. तसेच शिवसेनेच्या व ठाकरे कुटुंबाच्या प्रतिष्ठेस तडा जाईल असे कृत्य माझ्या हातून कदापि होणार नाही, असेही ते म्हणाले.
सुशांत सिंह राजपूतची आत्महत्या नाही तर हत्या : नारायण राणे
अभिनेता सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या नव्हे तर त्याची हत्या झाली आहे, असा दावा राज्यसभेचे खासदार नारायण राणे यांनी केलं आहे. सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात महाराष्ट्र सरकार कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. मुंबई येथील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सुशांतची आत्महत्या नसून ही हत्याच आहे. पोलीस योग्य दिशेनं तपास करत नाही. याप्रकरणी पाटणामध्ये एफआयआर दाखल झाली. मात्र मुंबई पोलिसांनी अजून एफआयआर दाखल केली नाही. गेल्या 50 दिवसांत मुंबई पोलिसांनी आरोपींचा शोध का लावला नाही,’ असा सवाल देखील नारायण राणेंनी उपस्थित केला. या प्रकरणाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचीही टीका त्यांनी केली.