LIVE UPDATES |अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला
दिग्गजांचं व्हिजन ठरवणार भवितव्य नव्या महाराष्ट्राचं. #माझामहाराष्ट्रमाझंव्हिजन सकाळी 10 वाजल्यापासूनयंदाचा गणेशोत्ससव कसा साजरा कराल? मुंबई महापालिकेच्या सुधारित मार्गदर्शक सूचनाRam Mandir | राममंदिर भूमिपूजनाला योगी आदित्यनाथ वगळता एकाही मुख्यमंत्र्याला निमंत्रण नाहीकोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम Last Updated: 31 Jul 2020 07:42 PM
पार्श्वभूमी
मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार, राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारीकेंद्र सरकारने अनलॉक- 3 च्या गाईडलाईन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा...More
मॉल्स, शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्टपासून सुरू होणार, राज्य सरकारच्या गाईडलाईन्स जारीकेंद्र सरकारने अनलॉक- 3 च्या गाईडलाईन जारी केल्यानंतर राज्य सरकारनेही गाईडलाईन जारी केल्या आहेत. कंटेनमेंट झोनमध्ये 31 ऑगस्टपर्यंत लॉकडाउन वाढवण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. मिशन बिगीन अगेन अंतर्गत अनेक निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. नव्या गाईडलाईनमध्ये महत्त्वाची बाब म्हणजे मॉल्स आणि शॉपिंग कॉम्प्लेक्स 5 ऑगस्ट पासून सुरू होणार आहेत. मात्र सकाळी 9 ते संध्याकाळी 7 वाजेदरम्यान मॉल्स आणि शॉपिंग कॉम्पेक्स सुरु राहणार आहेत. मॉल्समधील थिएटर मात्र सुरू होणार नाहीत. फूड मॉलमधील हॉटेल्स फक्त घरपोच जेवण देऊ शकतील..मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज पुणे दौरा, कोरोनाविषयक उपयाययोजनांचा आढावा घेणार पुण्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुण्याचा दौरा करणार आहेत. पुण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री दौरा करुन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. मुख्यमंत्री आज दिवसभर पुण्यात असतील. राज्यावर कोरोनाचं संकट असूनही मुख्यमंत्री मातोश्रीचा उंबरठा ओलांडत नसल्याची टीका विरोधकांकडून वारंवार होत आहे. शिवाय पुण्यावर अन्याय होत असल्याची टीकाही विरोधक करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वाचा समजला जात आहे.सुशांत सिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी अंकिता लोखंडेची चौकशी होणारबिहार पोलिस आता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणात सुशांतची माजी प्रेयसी अंकिता लोखंडेची चौकशी करणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अंकितानेच सुशांत आणि रिया यांच्यात सुरू असलेल्या तणावाची माहिती सुशांतच्या कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतरच सुशांतच्या मृत्यू प्रकरणात रिया कनेक्शनची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी मुंबई पोलिसांकडे केली होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सर्वसामान्य गरीब माणसाचे घराचे स्वप्न साकार करण्यासाठी राज्यातील प्रमुख शहरांमध्ये व महानगरपालिका क्षेत्रात झोपडपट्टी पुनर्वसन योजना लागू करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईतील सह्याद्री अतिथी गृह येथे झालेल्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाच्या बैठकीत घेण्यात आला.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्य शासनाचा मोठा निर्णय, आणीबाणीच्या विरोधात कारावास भोगलेल्यांचा गौरव करण्याचे धोरण रद्द, ,कोविड-19 या संसर्गजन्य रोगाच्या प्रादुर्भावामुळे वित्तीय वर्षात कर आणि करेतर उत्पन्नातील अपेक्षित महसुलात घट झाल्याने राज्याच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. हे लक्षात घेऊन 1975 ते 77 या कालावधीत लोकशाही करता लढा देणाऱ्या व्यक्तीचा सन्मान गौरव करणे राज्य सरकारने बंद केले. आणीबाणीच्या काळामध्ये ज्या व्यक्तींनी बंदिवास सोसला अशा व्यक्तींचा सन्मान गौरव करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय घेतला होता. राज्यात भाजपा सरकारच्या काळात ह्या निर्णयाची अमलबजावणी सुरू झाली होती. परंतु नव्या सरकारने कोविडमुळे आणीबाणीच्या काळात बंदिवास भोगलेल्यांना गौरव न करण्याचं ठरवलं आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत मुंबई उच्च न्यायालयातील सुनावणी 8 ऑगस्टपर्यंत तहकूब,
प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यानं हायकोर्टाचा तूर्तास सुनावणीस नकार,
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत तहकूब, 7 ऑगस्टपर्यंत याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यानं हायकोर्टाचा तूर्तास सुनावणीस नकार,
सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी 10 ऑगस्टपर्यंत तहकूब, 7 ऑगस्टपर्यंत याचिकाकर्त्यांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अंतिम वर्गाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला होणार. केंद्रीय गृहमंत्रालयाचं याबाबतचं म्हणणं मांडण्यासाठी कोर्टाने वेळ वाढवून दिला. तोपर्यंत यूजीसीच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणीही फेटाळली, अंतरिम आदेश देणार नाही असं कोर्टाचं म्हणणं.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सातारा - कोरोना बाधित रुग्ण आणायला गेलेल्या गाड्यांवर जमावाची दगडफेक, महाबळेश्वरातील रांजनवाडी येथील घटना, तीन गाड्यांची तोडफोड, दगडफेक आणि हातात काठ्यांनी जमावाचा हल्ला, घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विजेच्या धक्क्याने अवघ्या 33 वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा नातेवाईकांचा आरोप
मागील 5-6 महिन्यापासून विजेचे खांब शेतात पडून होते, तक्रार देऊन देखील कोणतीही कारवाई न केल्याने प्रकार घडल्याचा आरोप
दक्षिण सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगा गावातील दुर्दैवी घटना

औरंगाबादच्या एन 3 भागात ईडीचा छापा, 62 लाख रोख आणि 7 किलो सोनं जप्त, परदेशी चलन विनिमय घोटाळाअंतर्गत माहितीच्या आधारावर छापे, फेमा कायद्याअंतर्गत 3 ठिकाणी छापे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अमरावतीच्या बडनेराच्या मोदी हॉस्पिटलची तोडफोड,
कोरोना संशयित 24 वर्षीय मुलीचा गुप्तागांतील स्वॅब घेतल्याचे प्रकरण,
ज्या बडनेराच्या हॉस्पिटलमध्ये मुलीचा चुकीच्या पद्धतीने स्वॅब घेण्यात आला होता, त्या मोदी हॉस्पिटलची शिवसेना आणि MIMच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली,
कार्यकर्त्यांनी रुग्णालयाची दारे, खुर्च्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली, या ठिकाणी आता पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे

परभणी : सलग तीन वर्ष कापूस पिकांचे नुकसान करणाऱ्या गुलाबी बोण्ड अळीचा यंदाही मराठवाड्यात मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव आढळून आलाय. ज्या शेतकऱ्यांनी जून महिन्यात कापसाची लागवड केली आहेत. त्या कापसाला फुले लागली आहेत. मात्र तिथे गुलाबी बोण्ड अळीचा प्रादुर्भाव आढळून आलाय.परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पथकाने जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर भेट देऊन या प्रादुर्भावाची पाहणी केली असून शेतकऱ्यांना याच्या सामुहिक व्यवस्थापन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
आत्महत्येच्या उद्देशाने मुंबईतील बोरिवली नॅशनल पार्क इथल्या नदीत उडी मारलेल्या महिलेचा जीव एका पोलिसाने वाचवला. आज सकाळी साडे अकराच्या सुमारास एका महिलेने नदीत उडी मारली, अशी माहिती कस्तुरबा पोलीस स्टेशनला मिळाली. त्यानंतर पोलीस हवालदार अभिमान मोरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पाऊस पडल्याने नदीचा प्रवाह देखील जोरात होता. महिलेला वेळीच मदत मिळाली नाही तर बरंवाईट होऊ शकतं. ही बाब लक्षात घेऊन अभिमान मोरे यांनी थेट नदीत उडी मारली आणि महिलेला सुखरुप बाहेर काढलं. या सर्व घटनेचा व्हिडीओ तिथे उपस्थित लोकांनी काढल्याने अभिमान मोरेंच्या धडाकेबाज कामगिरी जगासमोर आली. संबंधित महिला सुखरुप असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीतील पुण्यातील लोकप्रतिनिधींच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. पुण्यातील कोरोनाविषयक उपाययोजनांचा आढावा बैठकीत घेतला जाणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक- घरात क्रिकेट खेळत असतांना दोन वर्षाच्या चिमुकल्याचा खाली पडून दुर्दैवी मृत्यू, गौरव देवरे असं चिमुरड्याचं नाव, बाल्कनीतून तोल गेल्याने खाली पडला होता, सातपुरच्या शिवाजीनगर परिसरातील काल सायंकाळची घटना, गंगापूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्यातील कौन्सिल हॉलमध्ये बैठकीसाठी दाखल, स्वतः गाडी चालवत मुख्यमंत्री ठाकरे कौन्सिल हॉलमध्ये
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
बुलढाणा जिल्ह्यात कोरोनाने आपले हातपाय पसरले असून दररोज रुग्णसंख्येत वाढ होत आहे. अशामध्ये नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतांना पॉझिटिव्ह रुग्णांचा खामगावच्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये एन्जॉय करतानाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हि़डीओमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गाणे गाताना दिसत आहे. या व्हिडीओमुळे एक प्रकारचा उत्साह आणि या रोगापासून घाबरण्याचे कारण नसल्याचा संदेश जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वाशिम : जिल्ह्यात काल रात्री अनेक भागात जोरदार पाऊस बरसला दरम्यान शेलू बाजार इथं पावसामुळे पूर आला आहे. यामुळे मुख्य चौकापरिसरात चांगलं पाणी साचलं होत अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. अनेकांना रात्र जागून काढावी लागली आहे. शासकीय यंत्रनेने तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिकमध्ये गॅस गिझरमध्ये शॉर्ट सर्किट होऊन स्फोट झाला. यामध्ये 58 वर्षीय सुरेखा रत्नपारखी या महिलेचा मृत्यू झाला. सातपूर परिसरात ही धक्कादायक घटना घडली. 16 जुलै रोजी सकाळी सुरेखा आपल्या राहत्या घरात बाथरुममध्ये गेल्या असता त्यांनी गॅस गिझर सुरु करताच गिझरचा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की स्लॅबचा काही भाग कोसळला, दरवाजाचाही काही भाग तुटला. या दुर्घटनेत 63 टक्के भाजल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. काल संध्याकाळी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात सुरु होणाऱ्या मिशन बिगीन अगेनच्या पुढील टप्प्यात इनडोअर जिम,व्यायामशाळा बंदच राहणार आहेत. केवळ बाह्य (आऊटडोअर) जिम्नॅस्टिक्सना सुरक्षित अंतर आणि स्वच्छतेचे नियम पाळून 5 ऑगस्टपासून सुरु ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे असे राज्य शासनाने स्पष्ट केले आहे
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13662 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9680 बरे झाले असून 464 जणांचा मृत्यू झाला. तर 3518 जणांवर उपचार सुरु आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्याचे खासदार गिरीश बापट यांनी लवासामधे कोविड सेंटर उभारावे अशी मागणी काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे केली होती. लवासामधील हॉस्पिटलचा उपयोग कोव्हीड सेंटर म्हणून करावा अशी बापटांची मागणी आहे. मात्र प्रशासनाने लवासात कोव्हीड सेंटर उभारायला तयारी दाखवलेली नाही. प्रशासनाच्या मते पाण्यापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या लवासावात संपर्क आणि दळणवळणाची साधणं नाहीत. त्याचबरोबर मुळशी तालुक्यातील कोरोना रुग्णांची सोय हिंजवडी मधील कोरोना सेंटरमधे करण्यात येतेय. आर्थिक दिवाळखोरीत निघाल्यानंतर हा प्रकल्प उभारण्यासाठी लवासाला कर्ज देणार्या सहा बॅकांचे नियंत्रण आहे. या बॅकाकडून एका रिझोल्यल्युशन ऑफिसरची नेमणूक करण्यात आली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरुच, रात्रीतून 36 नव्या कोरोना बाधितांची नोंद, काल दिवसभरात तब्बल 606 जणांना लागण तर 12 कोरोना बाधितांचा मृत्यू, नाशिक शहरात काल 381 रुग्णांची वाढ तर कोरोनाचे 11 बळी, जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या झाली 13263 , मृतांचा आकडा 484 वर,आतापर्यंत 10280 रुग्ण कोरोनामुक्त, सध्या 2499 रुग्णांवर उपचार सुरु
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबादच्या कन्नड आणि सिल्लोड तालुक्यामध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला. कन्नड तालुक्यातील अंबाडी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे यामुळे शिवना नदीला पूर आला आहे. अंधानेर ते वडणेरसर इतर गावांचा संपर्क तुटला आहे. अंधानेर ते वडनेर हा रस्ता देखील वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मकरंदपूर नदीला देखील पूर आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
कोल्हापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर महापालिकेनं आरक्षित केलेलं एक खासगी हॉस्पिटल माहेश्वरी समाजाने आरक्षित केल्याचं पत्रक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला कोल्हापुरातील मराठा समाजाने कडाडून विरोध केला असून, जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना अनेक नागरिकांना रुग्णालयांमध्ये जागा मिळत नाही. अशा वेळी एखाद्या समाजाने खासगी रुग्णालय आरक्षित करून ठेवणे कितपत योग्य आहे असा सवाल केला जातोय? या पत्रकात स्पष्टपणे सांगण्यात आलंय की, हे रुग्णालय केवळ माहेश्वरी समाजासाठी आरक्षित असेल असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकाराला मराठा समाजाने विरोध केला असून जर संबधित नागरिकांवर कारवाई झाली नाही तर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
देशाचं नवं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर
- 10+2 ऐवजी 5+3+3+4 अशी शैक्षणिक व्यवस्था
- सहावीपासून व्यावसायिक शिक्षणाचा समावेश सुरु होणार
- पाचवीपर्यंत शक्यतो मातृभाषेतच शिकवलं जावं
- विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकासाचं रिपोर्टकार्ड तिहेरी- विद्यार्थी स्वत:चं मूल्यांकन करणार, त्याचे मित्रही मूल्यांकन करणार आणि शिक्षकही करणार
- शाळेतून बाहेर पडताना विद्यार्थ्याला किमान एक व्यावसायिक कौशल्य प्राप्त व्हायला हवं असं शिक्षण

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सकाळी नऊ वाजता पुणे दौऱ्याला जाणार आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे मुख्यमंत्री पुणे दौरा करणार आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री फिरत नाही विरोधकांच्या टीकेला उत्तर मिळणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
यवतमाळ : धक्कादायक... यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील कोविड सेन्टर मधून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पळाला. मारेगावच्या चिंधुजी पुरके आश्रमशाळामध्ये कोविड सेन्टर असून तेथेच तालुक्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना ठेवण्यात येते.
कुंभा गावातील हा रुग्ण असून त्याला शोधण्यासाठी प्रशासन लागले कामाला आहे.
कुंभा गावातील हा रुग्ण असून त्याला शोधण्यासाठी प्रशासन लागले कामाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अकोला : अखेर महाबीज नमले. राज्यभरातील शेतकऱ्यांना बेगस सोयाबीन बियाण्यांची परतावा रक्कम देणे सुरु झालं आहे. राज्यभरातील तक्रारदार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार. 'एबीपी माझा'नं यासंदर्भात केला सातत्यानं पाठपुरावा. राज्यभरातील परताव्यासंदर्भात आज सरकार घेणार आढावा.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
लखनौ : बहुचर्चित बाबरी मशीद प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या लखनौ स्थित विशेष सीबीआय न्यायालयाने मंगळवारी शिवसेना नेते सतीश प्रधान यांची साक्ष नोंदविली आहे. प्रस्तुत प्रकरणात ते 31वे आरोपी आहेत. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यातून सतीश प्रधान यांचा जबाब नोंदविण्यात आला आहे. बाबरी मशीद विध्वंस करण्यात आपणास विनाकारण गोवण्यात आले असून मी निर्दोष आहे, असे सतीश प्रधान यांनी सांगितले. दरम्यान, विशेष न्यायाधीश एस. के. यादव यांनी 32वे आरोपी ओमप्रकाश पांडे यांची फाईल विभक्त करण्यात आली आहे. पांडे सध्या फरार आहे. 15 ते 16 वर्षांपूर्वीच ओमप्रकाश घर सोडून संन्यासी बनला, अशी माहिती त्याच्या कुटुंबियांनी न्यायालयात दिली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यात रात्रभरात 330 कोरोना पॉझिटीव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर पुण्यातील एकूण रुग्ण संख्या 75730 वर पोहोचली आहे. आतापर्यंत एकूण 1792 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
परभणी जिल्ह्यासह आता शहरातही वाढत्या रुग्णसंख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. रुग्णसंख्या 572 वर पोहोचली असून 25 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर
आजपर्यंत 263 जण कोरोनामुक्त झाले असून 284 जणांवर उपचार सुरु आहेत.
आजपर्यंत 263 जण कोरोनामुक्त झाले असून 284 जणांवर उपचार सुरु आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद जिल्ह्यातील 71 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत 13, 440 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 9338 बरे झाले, 462 जणांचा मृत्यू झाला तर 3640 जणांवर उपचार सुरु आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तोंडवळी येथील माळरानावर बिबट्याचे दर्शन स्थानिक ग्रामस्थांना झाले. विशेष म्हणजे म्हैशीच्या समोरच्या पट्ट्यातून जाणार्या या बिबट्याने तिच्यावर कोणताही हल्ला केला नाही. हा व्हीडीओे सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने प्रकार उघड झाला. या बिबट्याचे गेल्या काही महीन्यात सातत्याने या भागात अनेक ग्रामस्थांना दर्शन झालेले आहे. त्या बिबट्याने कोणावरही आता पर्यत हल्ला केेलेला नाही. तोंडवळी येथे वाघेश्वराचे मंदीर आहे. या मंदीरामध्ये यापुर्वी अनेकदा अनेक वाघ-बिबटे यांनी दर्शन ग्रामस्थांना दिले आहे. मात्र कोणावरही हल्ला केलेला नाही. त्यामुळे अधुन मधुन दिसणार्या या बिबट्यामुळे गावात कोणतेही भितीचे वातावरण नाही, असे सरपंच आबा कांदळकर यांनी मत व्यक्त केले.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
पुण्यातील कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे येत्या काही दिवसांत पुणे दौऱ्यावर जाण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवर या दौऱ्याची चर्चा सुरु आहे, मात्र त्याची तारीख आणि रुपरेषा अद्याप ठरायची आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढताना दिसत आहे. रात्री उशिरा आलेल्या अहवालांनुसार आणखी 30 कोरोनाबाधितांची भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा आता 1691 इतकी झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत 1102 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून मृत्यूचा आकडा हा आता 57 झाला आहे. कोरोनाची संख्या वाढत असताना जिल्ह्यात कन्टेनमेंन्ट झोनची संख्या आता 198 झाली आहे. चिपळूण तालुक्यात सर्वाधिक म्हणजेच 82 गावांमध्ये कंन्टेनमेंन्ट झोन आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची खासगी रुग्णालयातील बिलासंदर्भात तक्रारी येत होत्या. काही ठिकाणी अवाजवी शुल्क आकारुन रुग्णांना नाहक त्रास दिल्या जात असल्याच्या तक्रारी आल्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ऑडिटर नेमण्याचे आदेश दिले आहे. सोलापुरातील खासगी रुग्णालयातही अशाच पद्धतीने ऑडिटर नेमण्यात आले आहेत. मात्र एवढ्यावर न थांबता रुग्णांना स्वत:चे बिल स्वत: तपासता यावेत यासाठी रुग्णालयांच्या बाहेर फ्लेक्स लावण्यात आले आहेत. या मोठ्या डिजिटल फ्लेक्सवर खासगी रुग्णालय किती शुल्क आकारु शकतात. त्या शुल्कात कोणकोणत्या सुविधा उपलब्ध आहेत, कोणत्या तपासणीचे शुल्क रुग्णालयांना आकारण्याचे अधिकार नाहीत किंवा आहेत या विषयी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हे सर्व डिजिटल फ्लेक्स रुग्णांच्या सहज नजरेस पडतील अशा ठिकाणी लावण्यात आले आहेत. यासोबत येत्या एक-दोन दिवसात महात्मा फुले जन आरोग्यसंदर्भातही अशाच पद्धतीने मोठे बॅनर खासगी रुग्णालयांमध्ये लावणार असल्याची माहिती सोलापूरच्या कोविड कंट्रोल रुमचे सनियंत्रण अधिकारी धनराज पांडे यांनी दिली.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
वसई : मुंबई अहमदाबाद महामार्गावर वसई हद्दीत चालू पोलो कारला भीषण आग लागली होती. आगीत कार पूर्ण जाळून खाक झाली आहे. मात्र कोणतीही जीवित हानी नाही. महामार्गावरील किनारा हॉटेलच्या समोर काल रात्री पावणे दहाच्या सुमारास ही घटना घडली आहे. चालू गाडीत इंजिन मध्ये शॉट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याचा प्रथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. स्थानिक नागरिक आणि इतर वाहनधारकांच्या मदतीने आग विझविण्यात यश आलं होतं. मुंबई हून वसई च्या दिशेने कार येत होती.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राष्ट्रवादीने विधानपरिषदेतील मुख्य प्रतोद म्हणून आमदार शशिकांत शिंदे यांची नियुक्ती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
Corona Update | राज्यात आज 7717 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर आज 10333 रुग्ण कोरोनामुक्त, आजपर्यंत 232277 रुग्णांनी कोरोनावर मात, आज 282 रुग्णांचा मृत्यू, सध्या 144694 रुग्णांवर उपचार सुरु
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चंद्रपुर : कोरोना काळात अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आशा सेविकांचा रक्षाबंधनाच्या दिवशी जिल्हा प्रशासनाच्या वतीने होणार गौरव... ११०० रुपये रोख आणि ४०० रुपयांची साडी-चोळी देऊन करणार सत्कार, जिल्ह्यात जवळपास २४०० आशा सेविकांचा होणार सत्कार, पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची घोषणा
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
#Breaking पावसाळी अधिवेशन पुन्हा एकदा पुढे ढकलले, कोरोना संकटामुळे महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्ट ऐवजी 7 सप्टेंबरपासून सुरू होणार..
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
BIG BREANING | दहावीचा निकाल उदया जाहीर होणार, उद्या दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल पाहता येणार
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
तळकोकणातील कुडाळ तालुक्यातील सह्याद्रीच्या कड्यावर, नारूर गावच्या माथ्यावर असलेला रांगणागडावर अनेकजण पार्टी करण्यासाठी जातात. दारु, पाण्याचे बॉटल, प्लास्टिक कचरा गडावर टाकून देतात. मात्र शिवप्रेमी ग्रुपने याठिकाणी जाऊन साफसफाई केली. सर्व कचरा गोळा करून विल्हेवाट लावली. शिवप्रेमी गड उतरत असताना मात्र त्यांना गडाच्या पायथ्याशी वनविभागाने वनक्षेत्रात बांधलेल्या पर्यटन निवारा शेडमध्ये अनेकजण दारू पिऊन पार्टी करत असताना या शिवप्रेमीनी त्यांना पकडले. त्यांनतर दारू ओतायला लावली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पर्यटन स्थळ बंद असताना अशा गड, किल्यावर तसेच वनक्षेत्रात मध्यपी जाऊन धिंगाणा घातलं असताना याकडे स्थानिक प्रशासन तसेच वनविभागाचा लक्ष नसल्याने स्थानिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : निसर्ग चक्रीवादळामुळे कोकणची अपरिमित हानी झाली. यावेळी संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर असल्याचं राज्य सरकारनं स्पष्ट केलं. पण, नुकसानग्रस्तांना मदत देताना मात्र सरकारकडून कोकणवासियायंची चेष्टा केल्याचं दिसून येत आहे. कारण, निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील बागायती नष्ट झाली. आंबा, काजू, नारळ, पोफळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या. पण, यावेळी मदत देताना मात्र सरकारकडून कोकणवासियांची चेष्टा केल्याचं सध्याचं चित्र दिसून येत आहे. कारण, नारळाच्या झाडामागे 250 तर सुपारीच्या झाडामागे 50 रूपये देण्याचा जीआर सरकारनं काढला आहे. त्यामुळे या प्रश्नावर आता भाजप आक्रमक झाली आहे. यावेळी रत्नागिरीच्या दैऱ्यावर असलेले भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद यांनी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी यांच्याकडे नारळाचे, सुपारीचे प्रत्येकी एक झाड देत 250 आणि 50 रूपयाचे पाकीट देखील दिले. हे पाकीट आणि झाड तुम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवा असं लाड यांनी जिल्हाधिकारी यांना सांगितले. शिवाय गणेशोत्सवावर देखील लवकर निर्णय घेण्याची मागणी त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
खारघर सेक्टर 21 मध्ये असलेल्या अॅपल मेडिकल शाॅपमध्ये चक्क 16 कर्मचारी कोरोना पाॅझीटीव्ह आले आहेत. खारघरमधील सर्वात मोठे मेडिकल शाॅपपैकी हे एक शाॅप आहे. अॅपल मेडेकल शाॅपमध्ये काम करणारे 16 पैकी 13 कर्मचारी एकाच ठिकाणी रहात होते. एकाच रूममध्ये राहणे आणि शाॅपमध्ये काम केल्यामुळे सर्वच 16 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. पनवेल महानगर पालिकेने हे मेडिकल सध्या सिल केले असून सर्व कामगारांवर उपचार सुरु करण्यात आले आहेत. खारघर मधील रहिवाशी मोठ्या संख्येने या अॅपल मेडिकल मधून औषधे विकत घेत असल्याने कामगारांचा कोरोना संसर्ग लोकांना होण्याची भिती निर्माण झाली आहे. दरम्यान या ठिकाणच्या नगरसेविका लिना गरड यांनी शाॅप सुरू करून बसलेल्या सर्वांचीच कोरोना टेस्ट करण्याची मागणी केली आहे. लाॅकडाऊन उठल्यामुळे सर्वच दुकाने सुरु झाल्याने दुकानदारास कोरोना झाल्यास त्याचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू शकतो . त्यामुळे पनवेल मनपा आयुक्तांनी दुकाने , शाॅप कामगार , मालक यांना अंटीजन टेस्ट केल्या शिवाय शाॅप उघडण्याची परवानगी देवू नये असे मागणी लिना गरड यांनी पनवेल आयुक्तांकडे केली आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
भंडारा : रामटेक ते गोंदिया राज्यमार्गावर नवनिर्मित सिमेंट रस्त्याचे काम बारब्रिज प्रोजेक्ट लिमिटेड रायपुर या कंपनीला कंत्राट दिले असून रस्त्याचे काम सुरू आहे, तर याच रस्त्यावर वैनगंगा नदी पात्रात माडगी जवळ नवीन पुलाचे बांधकाम सुरू असून आज सकाळी 8 : 30 ला पुलाच्या पिल्लरचे काम सुरू असताना अचानक पिल्लर खचला आहे, यात चार जण जख्मी असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे, तर या संदर्भात कंपनीची संपर्क केले असताना कंपनीचे प्रोजेक्ट मनिजर यांनी उडवाउडवीची उत्तर दिली आहे, तर आज या पुलाच्या पिल्लर खचल्याने बारब्रिक कंपनीच्या गुणवत्तेवर प्रश्न चिन्ह निर्माण होत आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नालासोपारा : वसई विरारमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागली आहे. आज सकाळ पासून रिमझिम पाऊस पडत होता. अधून मधून पावसाची जोरदार इंट्री होत आहे. संपूर्ण ढगाळ वातावरण असून, हवेत गारवा पसरला आहे. नालासोपारा पूर्व सयुंक्त नगर येथील ही दृश्य आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
दोन दिवसांपूर्वी फेसबुकच्या माध्यमातून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि मध्यप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांचा फोटो वापरुन फेसबुक पोस्ट करणाऱ्यावर बारामती पहिला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ABVP चे कार्यकर्ते वैभव सोलनकर यांनी या विषयी फिर्याद दाखल केली आहे. पुजा झोळ या फेसबुक अकाऊंटवरून ही पोस्ट करण्यात आली आहे. यावर बारामती तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार, एकत्र आलो तरी निवडणुका मात्र आम्ही वेगळ्याच लढणार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
नागपूरच्या गिल्लूरकर मल्टीस्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये भारत बायोटेक निर्मित कोवॅक्सिनची मानवी चाचणी सुरु झाली आहे. काल तिघांना लस देण्यात आली असून आज आणखी चार जणांना कोवॅक्सिन दिली जाणार आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
अष्टविनायक गणपतींपैकी ओझरच्या विघ्नहर गणपती मंदिरात चोरी झाली आहे. मूर्तीवरील सोन्याचा मुलामा दिलेली छत्री आणि एक दान पेटी चोरट्यांनी लंपास केली. मध्यरात्री दोनच्या सुमारास ही घटना घडली असून आज सकाळी चोरी झाल्याचं लक्षात आलं. ओतूर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून दोन चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. लॉकडाऊनमुळे 24 मार्चपासून मंदिर बंदच आहे. त्यामुळे मूर्तीचे सर्व दागिने मंदिर समितीने बँकेत ठेवले होते, तसेच दानपेटी ही रिकामी केलेली होती. त्यामुळे हे दागिने आणि रक्कम सुरक्षित राहिली. मात्र पुरातन छत्री मात्र चोरीला गेली आहे. तर दानपेटी मंदिरापासून काही अंतरावर सापडली आहे. यात सुमारे एक हजार रुपये असावेत असा अंदाज मंदिर समितीने व्यक्त केला आहे. ही चोरी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याआधारे पोलीस शोध घेत आहेत.

सांगोला तालुक्यातील महुद गावाचा कोरोनाग्रस्त डॉक्टर मिरज येथे उपचार घेताना प्रशासनाला न काळावताच घरी आला. त्याच्या घरच्यांनी त्याचे स्वागत केले मात्र प्रशासनाने थेट क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रवानगी केली. मात्र आता या डॉक्टराच्या संपर्कात आलेल्यांचे स्वाब घेण्यात आले आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
विजेच्या वाढीव बिलाबाबत तक्रार आल्याने उपमुख्यमंत्री अजित पवार आढावा बैठक घेणार आहेत. या बैठकीला ऊर्जा मंत्री नितीन राऊत, अनिल परब, वर्षा गायकवाड, जितेंद्र आव्हाड आणि वीज कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
औरंगाबाद जिल्ह्यातील 67 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांचा आकडा 13319 वर पोहोचला आहे. त्यापैकी 8953 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 449 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3917 जणांवर उपचार सुरु आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
चंद्रपूर : चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष मनोहर पाऊनकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी एस.एन. दुबे पोलिसांना शरण आले आहेत. अनुकंपा तत्त्वावरील 24 लोकांच्या भरती बाबत अध्यक्ष आणि सीईओ यांची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरु आहे. आज या दोघांना न्यायालयासमोर हजर केलं जाण्याची शक्यता आहे. मूळचे काँग्रेसचे असलेले मनोहर पाऊनकर हे सध्या शिवसेनेत आहेत.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रत्नागिरी : ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात रक्षाबंधन आलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील न्यू इंग्लिश स्कुल व तुकाराम पुंडलिक शेट्ये कनिष्ठ महाविद्यालयच्या विद्यार्थीनींनी सीमेवरच्या जवानांसाठी राख्या पाठवल्या आहेत. मागील 22 वर्षापासून हा उपक्रम राबवला जात आहे. यंदा जवानांसाठी 1 हजार राख्या पाठवण्यात आल्यात. शाळा बंद असली तरी सर्व मुलींकडून या राख्या गोळा करत त्या पाठवल्या गेल्यात. यावेळी शिक्षक आणि परिसरातील नागरिक देखील हजर होते.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
महाबळेश्वर : काल रात्रीत 134 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. सातारा जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 3337 वर पोहोचला आहे. तर आजपर्यंत उपचार घेऊन 1798 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 114 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
= liveblogState.currentOffset ? 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow hidden' : 'uk-card uk-card-default uk-card-body uk-padding-small _box_shadow'">
रायगड : जिल्ह्यातील रोहा येथील तांबडी गावातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या करणाऱ्या नराधम तरुणास अवघ्या बारा तासात अटक करण्यात आली आहे. शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास रोहा तालुक्यातील तांबडी येथील 15 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही शेतावर गेलेल्या आजोबांना आणण्यासाठी स्कुटी गाडीवर गेली होती. परंतु, रात्री उशिरापर्यंत ती घरी न परतल्याने तिच्या नातेवाईकांनी तिचा शोध घेण्याचा प्रयत्न केला तिचा मृतदेह हा गावापासून काही अंतरावर असलेल्या दोनशे फूट खोल दरीत विवस्त्र अवस्थेत आढळून आला .
- मुख्यपृष्ठ
- बातम्या
- महाराष्ट्र
- LIVE UPDATES |अंतिम वर्षाच्या परीक्षांबाबत सुप्रीम कोर्टातली सुनावणी आता 10 ऑगस्टला