LIVE UPDATES | राज्यात आज 7924 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8706 रुग्ण कोरोनामुक्त, आज 227 रुग्णांचा मृत्यू

सिनेमागृहं आणि जिम 1ऑगस्टपासून सुरु होण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रस्ताव राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, उद्धव ठाकरेंचा सल्ला ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Jul 2020 07:54 PM
Corona Update | आज राज्यात 7924 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 8706 रुग्ण कोरोनामुक्त, एकूण 2 लाख 21 हजार 944 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या 1 लाख 47 हजार 592 रुग्णांवर उपचार सुरु, आज 227 रुग्णांचा मृत्यू
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वर्षा बंगल्यावर दाखल... त्यांच्या उपस्थितीत उपमुख्यमंत्री अजीत पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, परीवहन मंत्री अनिल परब, गृहनिर्माण मंत्री जीतेंद्र आव्हाड बैठक सुरू. बैठकीत पोलिसांना सिडकोची ४००० घरं उपलब्धं करून देण्यासाठी आँनलाईन अर्ज मागवण्यासाठी शुभारंभ. तसेच बकरी ईद संदर्भातही चर्चा होण्याची शक्यता.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी फोन करून दिल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी फोन करून दिल्या
वाढदिवसाच्या शुभेच्छा
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कोरोनाबाधित रुग्णाला उपचारासाठी बेड मिळत नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेवकांचे पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून निषेध आंदोलन
पुण्यात दिवसेंदिवस कोरोनाची रुग्ण संख्या वाढत असताना प्रशासनाकडून हव्या तशा सुविधा निर्माण करण्यात आल्या नाहीत. त्यामुळेच रुग्णांना उपचारासाठी  बेड मिळत नसल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. उपचारात हलगर्जीपणा होत असल्याचा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक वसंत मोरे आणि साईनाथ बाबर यांनी पुणे महापालिकेच्या मुख्य इमारतीत बेड टाकून आंदोलन केले. 
पालघर : गेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने डहाणू आणि पालघर तालुक्यातील काही भागात गेल्या एक तासापासून हजेरी लावली असून जिल्ह्यातील काही भागात अजूनही पावसाची हजेरी नाही. आज मनोर,बोईसर ,कासा भागात पाऊस सुरु आहे.
बकरी ईदबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठक बोलावली आहे. ईदच्या वेळी कुर्बानी देण्यावरुन मतमतांतर आहेत.या बैठकीला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि मुंबई महापालिका आयुक्त उपस्थित असतील. आज संध्याकाळी पाच वाजता वाय बी चव्हाण सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे.
चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील सिटी पोलीस स्टेशनच्या हेड कॉन्स्टेबलला कोरोनाची बाधा झाली असून सध्या शहरातील सर्वच पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांची केली जात आहे. कोरोना तपासणी, याच तपासणी दरम्यान हेड कॉन्स्टेबलचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. शिवाजी चौक येथील पोलीस वसाहत इमारतीचा काही भाग सील केला आह. त्यामुळे सिटी पोलीस ठाण्यात निर्जंतुकीकरण अभियान राबविले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासात श्रावणात प्रथमच मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. श्रावण महिन्यात आणि त्यातच सोमवारी या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. जिल्ह्यातील भाविकांबरोबरच जिल्ह्या बाहेरून ही भाविक मोठया संख्येने श्रावण महिन्यात दर्शनासाठी कुणकेश्वरात येत असतात. मात्र प्रशासनाच्या निर्देशानुसार मंदिराचा परिसर बंद करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळापासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथील समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेलं कुणकेश्वर मंदिराच्या इतिहासात श्रावणात प्रथमच मंदिर बंद ठेवण्यात आलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. श्रावण महिन्यात आणि त्यातच सोमवारी या मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी होत असते. जिल्ह्यातील भाविकांबरोबरच जिल्ह्या बाहेरून ही भाविक मोठया संख्येने श्रावण महिन्यात दर्शनासाठी कुणकेश्वरात येत असतात. मात्र प्रशासनाच्या निर्देशानुसार मंदिराचा परिसर बंद करण्यात आला आहे. लॉकडाऊन काळापासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे.
अकोला जिल्ह्यात 26 नवे रूग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा आकडा 2438 वर पोहोचला आहे. तर अकोल्यातील कोरोना मृतांचा आकडा 102 वर पोहोचला आहे. आतापर्यत 1980 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 356 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
मराठा आरक्षण प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तुम्ही नोकर भरती करणार नाही, असं सांगू शकाल का? : सुप्रीम कोर्टाची विचारणा
मराठा आरक्षणाची सुनावणी 1 सप्टेंबर रोजी होणार, महाराष्ट्र सरकारने कोरोना संकटकाळात नोकर भरती न करण्याचा निर्णय घेतला आहे ,त्यामुळे या प्रकरणाची अर्जन्सी नाही असं राज्य सरकारच्यावतीने सांगण्यात आलं. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे प्रकरण करण्यात अडचणी येत असल्याचे मुद्दे कोर्टाने मान्य केले.
कोरोना संकटामुळे सध्या नोकर भरती होत नाही. त्यामुळे हे प्रकरण तातडीने घेण्याची गरज नाही, सरकारी वकिलांकडून कोर्टासमोर युक्तिवाद
वेगवेगळी कागदपत्र सादर करणं हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये अवघड असल्याने सुनावणी प्रत्यक्ष व्हावी - राज्य सरकारच्या बाजूने ज्येष्ठ वकील पटवालिया यांचा युक्तीवाद
भाजप प्रदेश राज्यकार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयातून बैठकीला उपस्थित आहेत. तसेच कार्यकारिणीत विशेष निमंत्रित सदस्य विनोद तावडेही मंचावर उपस्थित आहे. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा दिल्लीतून आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील कोल्हापुरातून व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सहभागी होणार आहे.
अमरावतीत सकाळी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून अमरावतीत कोरोनाबाधितांची संख्या 1736 वर पोहोचली आहे. त्यापैकी 49 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत 1142 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
घराच्या गच्चीवर पतंग उडवत असताना तोल जाऊन दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने परभणीतील शिल्पकला,चित्रकलाकार तरुण अभिजित लगडचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परभणीच्या कला क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जातेय.
शांत आणि संजय नेतृत्त्वाखाली काम करण्याची संधी मिळाली यातच मी माझं भाग्य समजतो, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांचं भावनिक ट्वीट

सांगली जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासन अलर्टवर आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटलच्या आयसीयूमध्ये 200 बेड्सची संख्या तात्काळ वाढवण्याचे निर्देश पालकमंत्री जयंत पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्र्यांनी प्रमुख अधिकाऱ्यांसह बैठक घेतली. कोविड केअर सेंटरमध्ये संशयित रुग्णांना क्वॉरंटाईन केले आहे, अशांना कोविडची कोणतीही लक्षणं आढळल्यास त्यांना तात्काळ कोविड हॉस्पिटलमध्ये भर्ती करुन आवश्यक उपचार द्यावेत, अशा सूचनाही जयंत पाटील यांनी आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज वाढदिवस आहे. त्या निमित्ताने सह्याद्रीचा कडा! हिमालयाकडे कूच करा, अशा मथळ्यासह आज सामनाचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. फक्त सहा महिन्यांच्या काळात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री म्हणून नुसते लोकप्रिय ठरले नाहीत तर देशात अव्वल नंबर पटकावून पुढे आले. गंभीर विषयाचा, शत्रूचा अभ्यास करायचा व मगच घाव घालायचा या पक्क्या तयारीनेच ते मैदानात उतरतात. त्यामुळे त्यांच्या विरोधात उभे ठाकलेले सर्व राजकीय विषाणू उडून धुळीतून वाहत गेले अशा प्रकारे उद्धव ठाकरेंचं कौतुक करण्यात आलं आहे. याआधीही अशाचप्रकारचे संकेत सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आले होते. राम मंदिर, जीएसटी, नोटाबंदी, केंद्रातल्या अनेक निर्णयांवर योग्यवेळी योग्य भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे केंद्रात 19 खासदार आहेत, केंद्रात भाजपसोबत सत्तेत असताना शिवसेनेकडे एक मंत्रीपद होतं. महाराष्ट्रात सध्या महाविकास आघाडीचं सरकार आहे, मुख्यमंत्रीपद सांभाळताना उद्धव ठाकरे हे राष्ट्रीय राजकारणात सक्रीय होणार का? सत्तापालट, कोरोनच्या संकटाशी हिंमतीने तोंड देणारे आणि महान पित्याचा वारसा असणारे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंकडे पाहिलं जातं. त्यामुळे आता पुढे काय काय घडतंय हे पाहावं लागणार आहे.
सांगलीत जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील कोरोना नियंत्रण कक्षाताच मोठ्या संख्येने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे कारोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना आजपासून 29 जुलैपर्यंत वर्क फॉर्म होम करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोरोना नियंत्रण कक्षातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने जिल्हा परिषदेची संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करत औषध फवारणी केली होती. त्याचबरोबर या कक्षातल्या कर्मचारी, अधिकारी यांच्यासह 54 जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आले आहेत. यामुळे कोरोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालये बंद राहणार आहेत.
सांगलीत जिल्हा परिषदेच्या इमारतीमधील कोरोना नियंत्रण कक्षाताच मोठ्या संख्येने कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामुळे कारोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांना आजपासून 29 जुलैपर्यंत वर्क फॉर्म होम करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत. कोरोना नियंत्रण कक्षातील कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर प्रशासनाने जिल्हा परिषदेची संपूर्ण इमारत निर्जंतुकीकरण करत औषध फवारणी केली होती. त्याचबरोबर या कक्षातल्या कर्मचारी, अधिकारी यांच्यासह 54 जणांची स्वॅब चाचणी घेण्यात आले आहेत. यामुळे कोरोना संदर्भात कामकाज करणारे कर्मचारी वगळता जिल्हा परिषदेतील सर्व कार्यालये बंद राहणार आहेत.
पंढरपूर भाजप शहर अध्यक्ष संजय वाईकर यांचं आज निधन झालं. सोलापूरमधील स्पर्श रुग्णालयात पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 18 जुलै रोजी संजय वाईकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याची माहिती आहे.
कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या निवासस्थानावरील शिपायाला कोरोनाची लागण, कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ, या शिपायाच्या संपर्कातील इतर व्यक्तीही क्वॉरन्टाईन, निवासस्थानावरील स्वयंपाकी यांचेही स्वॅब तपासणीसाठी देण्यात आले, मात्र त्यांचे अहवाल निगेटिव्ह
मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात मुसळधार पाऊस, हिंदमाता परिसरात पाणी साचल्याने उड्डाणपुलाखालील वाहतूक बंद
#CoronaUpdate | राज्यात आज 9431 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ, एकूण रुग्णसंख्या 375799 वर, आज 6044 रुग्ण कोरोनामुक्त, तर एकूण 213238 रुग्णांची कोरोनावर मात, राज्यात एकूण 148601 अॅक्टिव्ह रुग्ण
घाटंजी तालुक्यातील भांबोरा गावात आतापर्यंत 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने प्रशासनाने आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने गावातील नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यास सुरुवात केली त्याला गावकऱ्यांनी विरोध केला आणि कंनटोनमेन्ट एरियाचे बेरॅकेट तोडून गोंधळ घातला .
आज आरोग्य पथक आरोग्य तपासणी साठी गेले असता त्यांना गावकऱ्यांनी विरोध केला त्यामुळे पोलिसांना बोलविण्यात आले तिथं या तपासणीस विरोध करणार्यांना व्यक्तीस पोलीसानी ताब्यात घेतले . त्याच वेळी एका तरुणांने विषारी औषध घेण्याचा प्रयत्न केला त्या तरुणास तात्काळ घाटंजीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले .
त्यानंतर गावकऱ्यांनी पुन्हा गोंधळ घालून पोलिसांवर दगडफेक केली यात एक पोलीस शिपाई जखमी झाला त्याच्यावर घाटंजी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहे .
आता गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त भांबोरा गावात तैनात असून परिस्थिती नियंत्रणात आहे .
उदगीर मतदरसंघाचे आमदार आणि पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. कोरोनाची टेस्ट करण्यात आली त्यात रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. मुंबईतील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यात काही दिवसांपूर्वी सर्वाधिक रुग्ण होते. त्यावेळी ते सतत मतदारसंघात ठान माडून बसले होते. रुग्णालयात जाणाऱ्या कोरोना रुग्णांना ते धीर देत होते. या सतत च्या लोकसंपर्कामुळे त्यांना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणाबाबत आजही सरकार गंभीर नाही. फडणवीस अजित पवार सरकारच्या वेळी खुलं मतदान घेण्यासाठी सुप्रीम कोर्टात सरकार जसं गंभीर होते तेवढं ही सरकार गंभीर नाही. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला कळतं की, आरक्षणाचा मुद्दा पाच ज्या न्यायाधीशासमोर मांडला गेला पाहिजे. हे सरकारला पाच महीने का कळलं नाही. मराठा आरक्षणाच्या सुनावणीला 24 तास बाकी आहेत आता तरी सरकारने गंभीर व्हावे असे मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील म्हणाले.
गडहिंग्लज तालुक्यातील गिजवणेमध्ये होम क्वारंटाईन असलेल्या तरुणाची आत्महत्या,

राहुल पाटील असं आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव,

राहुल हा बंगळुरूमधल्या नामांकित कंपनीत होता नोकरीला,

क्वारंटाईन असलेल्या रुममध्येच गळफास घेऊन केली आत्महत्या,

राहुल पाटीलच्या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट
पुणे : पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलचा नर्सिंग स्टाफ रस्त्यावर , चार महिन्यांपासून हॉस्पिटल प्रशासन अन्याय करत असल्याने नर्सिंग स्टाफ आक्रमक, जवळपास तिनशे लोकं हॉस्पिटल समोरील आंदोलनात सहभागी, पगार कमी देणे, कुलिंग टाईम नाही, 12 तास ड्युटी, काम करायची सक्ती, राजीनामा स्वीकारत नाही ,जहांगीर हॉस्पिटल कोव्हीड आणि नॉन कोव्हीड हॉस्पिटल , हॉस्पिटल प्रशासन होस्टेलवर येऊन धमक्या देणे, स्टाफला HR शिवीगाळ करत असल्याचा आरोप

मुख्यमंत्री बी एस येडीयूरप्पा यांना गोकाकच्या जे एम एफ सी न्यायालयाने न्यायालयात हजर राहण्या संबंधी समन्स बजावले आहे. निवडणूक आचारसंहिता भंग प्रकरणी न्यायालयाने हे समन्स बजावले आहे.2019 मध्ये गोकाक पोटनिवडणुकीच्या वेळी बी एस येडीयुरप्पा रमेश जारकीहोळी यांच्या प्रचारासाठी आले होते. त्यावेळी भाषण करताना वीरशैव लिंगायतानी भाजपला मते द्यावीत असे प्रचारसभेत येडीयुरप्पा यांनी आवाहन केले होते.जातीचा वापर करून मते मागीतल्याच्या कारणावरून गोकाक पोलिसात आचारसंहिता भंगाचा गुन्हा नोंदवण्यात आला होता.या प्रकरणी गोकाक पोलिसांनी बी रिपोर्ट न्यायालयात सादर केला होता.पण न्यायालयाने हा बी रिपोर्ट फेटाळून मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांना 1 सप्टेंबर रोजी गोकाक न्यायालयात हजर राहण्या संबंधी समन्स बजावले आहे.
पुण्यात रात्रभरात 92 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 67060 तर आतापर्यंत 1662 कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 41399 वर
औरंगाबाद जिल्ह्यातील 34 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह, त्यामुळे आतापर्यंत 12942 कोरोनाबाधित आढळले आहेत, त्यापैकी 8159 बरे झाले, 437 जणांचा मृत्यू झाला. तर 4346 जणांवर उपचार सुरु आहेत.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील डोणगाव पोलीस स्टेशनमधील एका कर्मचाऱ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने अधिकाऱ्यासह सर्व 36 कर्मचारी क्वारंटाईन करून या पोलीस स्टेशनचा कारभार मेहकरकडे देण्यात आला आहे. तर खामगाव तालुक्यातील पिंपलगाव राजा पोलिस स्टेशन मधील 7 कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने सील करण्यात आले आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डी बी तडवी यांनी ही माहिती दिली आहे.
बीड जिल्ह्यातील कोरोना रुग्णवाढीच्या आकड्याने आज नवा उच्चांक केला. दिवसभरात 69 पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री आलेल्या रिपोर्टमध्ये 37 तर दुपारी 7 आणि आता पुन्हा 25 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत.
राज्यात आज 9251 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, आज 7227 रुग्ण कोरोनामुक्त, तर एकूण 2 लाख 07 हजार 194 रुग्णांची कोरोनावर मात, सध्या राज्यात एकूण 1 लाख 45 हजार 481 अॅक्टिव्ह रुग्ण
मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीच्या अनुषंगाने आज मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी यासंदर्भातील मंत्रीमंडळ उपसमिती सदस्य तसेच मराठा आरक्षण लढ्यातील विविध मान्यवरांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंद्वारे संवाद साधला. न्यायालयीन कामकाजासंदर्भात चर्चा करून सुनावणीसाठी योग्य त्या सूचना मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी दिल्या.

यावेळी उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, समितीचे सदस्य तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार संभाजी राजे छत्रपती, आमदार भाई जगताप, विनायक मेटे, विधी व न्याय विभागाचे सचिव राजेंद्र भागवत यांच्यासह न्यायालयात शासनाची बाजू मांडणारे विधीज्ञ उपस्थित होते.
मराठा आरक्षणाच्या लढ्याशी संबंधित असलेले विविध मान्यवरही यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये सहभागी झाले होते. यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे व उपसमिती अध्यक्ष श्री. चव्हाण यांनी त्यांच्याकडून आरक्षण प्रश्नावर त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. तसेच सुनावणीसंदर्भातील त्यांच्या सूचनाही ऐकून घेतल्या.
यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीसंदर्भात उपस्थितांशी चर्चा केली तसेच पुढील कामकाजासंदर्भात योग्य त्या सूचना केल्या.
2020-21 या वर्षसाठी कोरोनाचा प्रादुर्भाव चा विचार करता 1 ते 12 वी अभयसक्रम 25 टक्के कमी करण्याचा शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
सीबीएसईनंतर आता इयत्ता पहिली ते इयता बारावीचा पाठ्यक्रम 25 टक्के कमी करण्याचा राज्य शालेय शिक्षण विभागातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे.
तीन वर्षीय बालिकेवर अतिप्रसंगाचा प्रयत्न झाल्याचा प्रकार काल दुपारी साडेतीन वाजे दरम्यान बुलडाण्याच्या नांदुरा इथं नांदुरा पंचायत समितीच्या मागील भागात घडलाय यातील नराधमास नागरिकांनी पकडून चोप देत पोलिसांच्या हवाली केले.
होरायझन प्राईम हाॅस्पीटल, घोडबंदर रोड या रूग्णालयाची कोवीड रूग्णालय म्हणून घोषित केलेली मान्यता रद्द करण्यात आली आहे. त्यासोबत रूग्णालयाची नोंदणी देखील एका महिन्यासाठी निलंबित करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डाॅ. विपिन शर्मा यांनी ही कारवाई केली. वाढीव बिले आकारली गेली असल्याने आणि त्यानंतर पालिका प्रशासनाने नोटीस देऊनही रुग्णालय प्रशासनाने उत्तर न दिल्याने पालिकेची कारवाई करण्यात आली.
महापालिकेच्या मुख्य लेखा परिक्षाकांच्या तपासणीत एकूण 56 रुग्णांची बिले अवाजवी असल्याचे उघड झाले आहे. त्यांची एकूण रक्कम 6 लाखांपेक्षा जास्त आहे. सध्या या रुग्णालयांवर 2 पालिका अधिकाऱ्यांचे पथक 24 तास नेमण्यात आले असून, आता उपचार घेत असलेले रुग्ण बरे होईपर्यंत कार्यरत राहील.
कोरोनामुळे मातोश्रीची चिंता वाढली,

मिसेस मुख्यमंत्री रश्मी उद्धव ठाकरे यांच्या एका सुरक्षा रक्षकालाही कोरोना संसर्ग,

हा सुरक्षा रक्षक रश्मी ठाकरे यांच्या सुरक्षेसाठी तैनात होता.
,
दोन आठवड्यापूर्वी तेजस ठाकरे यांच्याही दोन सुरक्षा रक्षकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता.
,
सुरक्षा रक्षकांना कोरोना झाल्यानं मातोश्रीत चिंतेंचं वातावरण
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला वांयगणी कामतवाडी येथील सार्वजनिक विहीरीच्या बोगस कामाची तक्रार येथील ग्रामस्थानी केली होती. त्याची पाहणी करण्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी आले होते. त्यांच्या समवेत वांयगणी सरपंच सुमन कामत व उपसरपंच ही आले होते. माञ सरपंच व उपसरपंचाच्या तोंडाला मास्क नसल्याचं ग्रामस्थानी विचारना केली असता येथील सरपंचानी ग्रामस्थाना उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. आम्ही कोणीही मास्क घालणार नाही. काय करायचे ते करून घ्या अशी उर्मट भाषा सरपंचानी वापरली. यावेळी ग्रामस्थ आक्रमक झाल्यावर सरपंच व अधीका-यांनी तेथून काढतापाय घेतला. कोरोना सारख्या महामारीच्या आजारात गावची जबाबदारी असणा-या गावचे प्रथम नागरीक असणा-या सरपंचानीच सरकारने घालून दिलेल्या नियमांचेच उल्लंघन केले आहे. मास्क न लावता सार्वजनिक ठिकाणी वावरल्यामुळे सरपंच, उपसरपंचावर कारवाई करण्याची लेखी मागणी वांयगणी ग्रामस्थानी वेंगुर्ला तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान कोरोना पॉझिटिव्ह, सर्व सहकाऱ्यांना क्वारंटाईन होण्याच्या सूचना, ट्वीट करुन दिली माहिती
सांगली : बत्तीस शिराळामध्ये यंदा नागपंचमी सणाच्या आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून मोठया प्रमाणावर खबरदारीघेतली गेलीय. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज साजऱ्या होणाऱ्या नागपंचमीला शिराळा मधील अंबामाता मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
मंदिरात फक्त 5 लोकांना पूजेसाठी परवानगी तर पालखी सोहळ्यासाठी 10 लोकांना परवानगी दिली गेलीय. नागपंचमी उत्सवाची शेकडो वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कोरोना व्हायरसच्या पाश्र्वभूमीवर खंडीत झाली आहे.
ICMR च्या 3 नव्या लॅबचं पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोमवारी उद्घाटन, मुंबई-कोलकाता नोएडा येथे प्रस्थापित होणार उच्च क्षमतेच्या टेस्टिंग लॅब.
रायगड जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आली आहे. शुक्रवार मध्यरात्रीपासून लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली आहे. रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिले शिथिलतेचे आदेश दिले आहेत.
पुण्यात रात्रभरात 158 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील कोरोना रुग्णांची संख्या 64232 वर पोहोचली असून आतापर्यंत 1615 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपासून नागपुरात 2 दिवसीय जनता कर्फ्यू ,
सकाळच्या सत्रात रोज च्या तुलनेत रस्त्यांवर कमी गर्दी असून कमी संख्येत लोकं बाहेर दिसून येत आहे,

दूध, कचरा संकलन, पाणी पुरवठा, औषध अशा मोजक्या अत्यावश्यक सेवा वगळून सर्व सेवा व प्रतिष्ठान 2 दिवस बंद ठेवण्याचे पोलिसांचे निर्देश आहेत
कोल्हापूर :

शिवाजी विद्यापीठातील अलगीकरण केंद्रात जेवणात सापडल्या अळ्या,

अलगिकरण केंद्रात सुरू असलेल्या भोंगळ कारभारामुळे तिथे दाखल असलेले त्रस्त,

ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना विचारला जाब,

सोईसुविधा मिळत नसल्याने सोशल डिस्टनसिंगचे नियम बाजूला ठेवत नागरिकांचा उद्रेक

अहमदनगर : कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव , शहजापूर , कुंभारी परिसरात मुसळधार पावसाने नुकसान, आज सायंकाळी आलेल्या पावसाने नुकसान, शेतात पाणी साचल्याने सोयाबीन, मका , ज्वारी , बाजरी या खरिप पिकांना फटका, काही भागात पावसाचे पाणी घरात शिरले, कोपरगाव - झगडेफाटा रस्ता पाण्याखाली
ठाकरे - पवार पॅटर्न भाजपसाठी धोक्याची घंटा, भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांचा भाजपला सतर्कतेचा इशारा, हा पॅटर्न लोकसभा निवडणुकीसाठी राबवला जाणार असल्याचा काकडे यांचा दावा, लोकसभा निवडणुकीत काँग्रेस 15, राष्ट्रवादी 16 आणि शिवसेना 17 असं जागावाटपाचं सूत्र ठरत असल्याची काकडे यांची माहिती



अहमदनगर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट, राळेगणसिद्धी येथे जाऊन घेतली भेट, ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्ती करण्यासंदर्भात केली चर्चा, प्रशासक नियुक्ती प्रक्रियेत पालकमंत्री का? असा सवाल करत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अण्णांनी केले होती नाराजी व्यक्त
















कोल्हापूर - कोविड सेंटरमध्ये युवकाची आत्महत्या, गडहिंग्लज शहरातल्या कोविड सेंटर मधली धक्कादायक घटना, गडहिंग्लज तालुक्यातील लिंगनूर गावच्या युवकांने केली आत्महत्या, कोरोना अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरही युवकाची आत्महत्या, बाथरूममध्ये गळफास घेऊन केली आत्महत्या, डिस्चार्ज मिळण्‍यापूर्वीच तरुणाची आत्महत्या
नागपूर शहरात उद्या आणि परवा जनता कर्फ्यू, नागरिकांनी स्वत: कर्फ्यू पाळण्याचं महापौर संदीप जोशी यांचं आवाहन
आदेश बांदेकर यांच्याकडे सिद्धिविनायक मंदिर न्यासाचं पुन्हा अध्यक्षपद,
बांदेकर यांचा 24 जुलैला तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाला होता,

गेल्या तीन वर्षात आदेश बांदेकर यांनी मंदिरातर्फे राबवले होते चांगले उपक्रम, शहीद सैनिकांच्या विद्यार्थांचा पूर्ण खर्च उचलण्याचा सिद्धिविनायक मंदिराचा उपक्रम चांगला गाजला होता
जय भवानी जय शिवाजी घोषणेवर महाराष्ट्राच्या विधानसभा अध्यक्षांची रोखठोक प्रतिक्रिया,

नियम आहेतच पण सभागृहात जनभावनेचा आदर व्हायला हवा,

नियमा इतकच जनभावना आणि श्रद्धेचे महत्त्व आहे,

छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचंच नव्हे तर देशाचं दैवत,

छत्रपतींचा जय घोष रेकॉर्ड मधून काढून टाकणं हे चुकीचं,

त्यांच्या जयघोषाला सभागृहांमध्ये नियमांचे दाखले आणण्याची गरज नव्हती,

महाराष्ट्रामध्ये विधानसभेचे अधिवेशन ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात करण्याचा विचार,
मंगळवारी कामकाज समितीच्या बैठकीत आराखडा निश्चित करू,

विधानसभा आणि विधान परिषदेचे अधिवेशन वेगवेगळे अधिवेशन करता येईल का यावरही विचार चालू..
अशोक चव्हाण यांच्या नाराजीनंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण यांची चव्हाण यांच्या निवासस्थानी भेट झाली. आम्ही थोडी काळजी घेतली पाहिजे, एकमेकांची काळजी घेतली तर महाविकास आघाडी भक्कम होईल, काम नीट होतील, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.
मराठा आरक्षणाच्या केस मध्ये राज्य सरकारचं मोठं पाऊल,

सुप्रीम कोर्टात सोमवारी होणाऱ्या अंतिम सुनावणी आधी राज्य सरकारची नवी भूमिका,

हे प्रकरण पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सोपवण्याची मागणी,

घटनात्मक विषय असल्याने केसची सविस्तर सुनावणी व्हावी या अपेक्षेने ही मागणी,

याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी अशाच पद्धतीची मागणी केली होती आता राज्य सरकारने ही त्यांची भूमिका पुरस्कृत केली आहे,

सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षणासाठी तीन दिवसांचा कालावधी निश्चित केला आहे सुनावणीला,

पण सोमवारी त्याआधी या मागणीवर आता युक्तिवाद होईल आणि त्यावर केसचं पुढचं भवितव्य ठरेल
अधिकारी मंत्र्यांना न विचारता प्रस्ताव मंजुरीसाठी देत असल्याने सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण नाराज, त्यांच्या खात्याच्या विभाजनाचा प्रस्ताव त्यांना न विचारता मंजुरीसाठी मांडल्यांने अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांकडे व्यक्त केली तीव्र नाराजी, अधिकारी परस्पर प्रस्ताव देत असल्याने चव्हाण संतप्त, गृहीत धरत असल्याची व्यक्त केली भावना
नाशिक : बिबट्या पडला विहिरीत, नाशिकच्या चेहडी गावातील घटना, भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या मध्यरात्री विहिरीत पडल्याचा अंदाज, वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल, बिबट्याला बाहेर काढणायचे प्रयत्न सुरू, 20 दिवसात 3 बिबटे जेरबंद झाल्यानंतर चौथा बिबट्या विहिरीत पडला
नाशिक महानगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्याची बदली, शरद पवार आणि मंत्री राजेश टोपे यांच्या दौऱ्याच्या आधी राजेंद्र त्रंबके यांच्या बदलीचे आदेश,
त्रंबके यांच्याकडे होता प्रभारी पदभार,नाशिक शहरातील कोरोनाच्या संकट वाढत असताना आरोग्य अधिकारी पद प्रभारी असल्याचा मुद्दा आजच्या बैठकीत चर्चिला जाण्याची होती शक्यता , नाशिक मनपाच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदी डॉ बापूसाहेब नागरगोजे यांची नियुक्ती
दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या बीड जिल्ह्यामध्ये मागच्या काही वर्षात पहिल्यांदाच जोरदार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे अगदी जेमतेम दीड महिन्याचा कालावधी मध्येच वडवणी तालुक्यातील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प ओसंडून वाहत आहे.

ऊर्ध्व कुंडलिका धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली असून सध्या ऊर्ध्व कुंडलिका धरणाची सुरुवातीला पाणीपातळी 536.55 मी झाल्यामुळे सुरुवातीला दोन गेट उघडण्यात आले आहेत. गेट नंबर एक आणि गेट नंबर पाच उघडण्यात आले आहेत.

वडवणी तालुक्यात रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे सोनाखोटा येथील उर्ध्व कुंडलिका प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. या धरणातून आता नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आलाय. नदीकाठी असणाऱ्या लगतच्या सर्व गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.
रत्नागिरी : मुंबई-गोवा हायवेवर कंटेनरला अपघात, लांजा तालुक्यातील वेरळ गावाजवळच सकाळी 6.30 वाजताची घटना, दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प, सुदैवाने मोठा अपघात टाळला खासगी बसन पुढे जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर अपघात
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने सोशल मीडियाचे काम युवा भाजप पदाधिकाऱ्यांच्या कंपनीला काम दिले होते.

साकेत गोखले याने ट्विटरवरून याबाबत ट्विट केले.

यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणूक आयोगाकडून याबाबत सत्यशोधन अहवाल मागवला असल्याचे ट्विट वरून माहिती दिली आहे.
महापालिकेचे वैदकीय अधिकारी डॉ प्रवीण गंटावार यांचा अटकपूर्व जामीन आज न्यायालयाने नाकारला आहे. उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती ( अपसंपदा ) प्रकरणी अँटी करप्शन ब्युरोने डॉ. प्रवीण गंटावार यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.

त्यामुळे आज अटकपूर्व जामीन रद्द झाल्यामुळे प्रवीण गंटावार यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

विशेष म्हणजे नागपूर महापालिकेत भाजप नगरसेवक आणि आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यातील वादात डॉ. प्रवीण गंटावार वादाचा केंद्रबिंदू ठरले होते.

डॉ प्रवीण गंटावार तुकाराम मुंढे यांचे खास मर्जीतले अधिकारी असल्याने आता त्यांचा अटकपूर्व जामीन रद्द झाल्यानंतर अँटी करप्शन ब्युरो काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पारंपरिक पिकांसोबत आता कोकणातील शेतकरी इतर पिकांना देखील प्राधान्य देताना दिसत आहे. राजापूर तालुक्यात चारसुत्री तंत्राचा वापर करत सात हेक्टरवर भात, चार हेक्टरवर हळद लागवड करण्यात आली आहे. सहकाराच्या धर्तीवर संघटित झालेल्या राजापूर तालुक्यातील जवळपास अडीचशे महिला बचत गटांनी सात हेक्टरवर भातशेती तर 175 बचत गटांनी चार हेक्टरवर हळदची लागवड केली आहे. यासाठी भातशेतीमध्ये पारंपरिक पद्धतीच्या जोडीला चारसुत्री पद्धतीनं भातलागवड करून आधुनिक शेती पद्धतीचा अवलंब करण्यात आला आहे.
ठाणे महानगपालिकेचे कळवा स्थित छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय हे नेहमीच नको त्या कारणांसाठी प्रसिद्धीच्या झोतात असतं. आज पुन्हा एकदा या रुग्णालयाच्या सुरक्षा यंत्रणेचे वाभाडे निघाले आहेत कारण दोन कोरोना बाधित रुग्णांनी येथून चक्क पळ काढला आहे. या दोन इसमांना कोरोनाच्या चाचणी साठी इस्पितळात आणण्यात आले होते व दोघांचेही रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने दोन्ही रुग्णांनी कोणालाही काही न सांगता तेथून पळ काढलाय. एवढ्या मोठ्या इस्पितळाची सुरक्षा यंत्रणा किती कुचकामी असू शकते याचे ज्वलंत उदाहरण आज पहायला मिळाले. ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संदीप माळवी यांनी देखील ही घटना घडल्याचे मान्य केले असून या दोघांचा तपास पोलीस करत असल्याचे त्यांनी सांगितले.
पिंपरी-चिंचवड : नातवाला धडक दिली म्हणून पंधरा दिवसाच्या वासराला आजोबाने मारहाण केली. कासऱ्याने आणि हाताने मारहाण केल्याचा व्हिडीओ ही समोर आलाय. पिंपरी चिंचवडच्या सांगवीत ही घटना दोन दिवसांपूर्वी घडलेली आहे. मुक्या प्राण्याला निर्दयतेने वागणूक दिल्याप्रकरणी सांगवी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा ही दाखल झालाय. बाळासाहेब वाळूंज असं 61 वर्षीय आजोबांचं नाव आहे. याप्रकरणी प्राणी मित्राने फिर्याद दिलेली आहे. अवघ्या 15 दिवसांच्या वासराला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ प्रर्यक्षदर्शीने चित्रित केल्याने हा प्रकार समोर आला.
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याबाबत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे मात्र सध्याची परिस्थिती लक्षात घेता विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा न घेता अनुकूल वातावरण निर्माण होताच त्या घेण्यात याव्यात अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी कुलगुरू डॉ. दिलीप म्हैसेकर यांना दिल्या
आहेत.
भाजपचे राज्यसभेचे खासदार उदयनराजे भोसले यांनी बुधवारी खासदारकीची शपथ घेतली. उदयनराजे यांनी शपथ घेतल्यानंतर 'जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी' अशी घोषणा दिली. मात्र, राज्यसभेचे सभापती वैंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेत उदयनराजे भोसले यांना समज दिली. या सगळ्या प्रकारानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने नायडूंवर टीका केली. या सगळ्या टीकेनंतर आता वैंकय्या नायडू यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी नेहमीच छत्रपती शिवाजी महाराजांना मानणारा आणि देवी भवानीचा भक्त आहे. रिती-रिवाजानुसार शपथ घेताना कोणत्याही प्रकारच्या घोषणा दिल्या जात नाहीत, याची आठवण मी सदस्यांना करून दिली. कोणताच अनादर केला नाही, असं ट्वीट वैंकय्या नायडूंनी केलं आहे.
शिवाजी महाराज की जय, शिवसेना जिंदाबाद, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, अशा प्रकारची तुफान घोषाबाजी शिवसैनीकांनी अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केली. यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि शिवसैनिक आणि शिवप्रेमी यांनी नुकताच झालेल्या राज्यसभेतील खासदारांच्या शपथविधी वेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतल्यानंतर जय भवानी जय शिवाजी असा उल्लेख केला त्यावर व्यंकय्या नायडू यांनी आक्षेप घेतला. त्यामुळे अमरावती शिवसेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्यंकय्या नायडू आणि भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या पुतळ्याला चपला मारून निषेध केला.
मुलुंड येथील पालिकेच्या म. तु. अग्रवाल रुग्णालय पालिका कर्मचाऱ्यांना योग्य सोयी सुविधा मिळत नसल्याची आरोप तिथल्या कर्मचाऱ्यांनी केला होता.याबाबत आज या कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसेच्या महापालिका युनियनचे अध्यक्ष संदीप देशपांडे तसेच पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांची भेट घेतली. कामगारांना मिळणाऱ्या असुविधांबाबत प्रशासनाला धारेवर धरले तसेच या अत्यंत तुटपुंज्या सुविधा पुरविण्यात तातडीने सुधारणा करण्यास बजावले. कर्मचारी करोनाबाधित झाल्यास, त्यांच्यासाठी तातडीने स्वतंत्र व्यवस्था कींवा विशेष कक्ष करण्यात यावे. या रुग्णालयातील कर्मचारी विजय कुलकर्णी हे कोरोना मुळे बाधित झाले होते, यांना तातडीने व्हेंटिलेटर उपलब्ध न झाल्या कारणाने, काल हॉस्पिटल प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे, त्यांचा मृत्यू झाला याचादेखील जाब विचारण्यात आला. याप्रसंगी त्यांना त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. कर्मचारी वर्गाच्या वतीने मनसे युनियन ने केलेल्या मागण्या प्रशासनाकडून एका आठवड्यात पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन अधिकाऱ्यांनी या वेळी दिले.
मंत्रिमंडळ बैठकीआधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बाळासाहेब स्मारकात अर्धा तास बैठक
उद्दाम वाळू माफियांकडून महिला तहसीलदार वैशाली वाघमारे आणि त्यांच्या पथकावर गाडी घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, तिघांवर गुन्हा दाखल, पंढरपूर शहरातील पाणीपुरवठा केंद्राजवळ सुरु होता बेकायदा वाळू उपसा
ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज कंपन्यांवर केलेल्या अशासकीय सदस्यांच्या नियुक्त्या रद्द, नितीन राऊत यांनी परस्पर केल्या होत्या नियुक्त्या, नियुक्त्यांबाबत राष्ट्रवादी आणि शिवसेनेने व्यक्त केली होती नाराजी, बाळासाहेब थोरात यांनी माझाशी बोलताना केलं होतं मान्य तिन्ही पक्षांनी एकत्र बसून नियुक्त्या केल्या पाहिजे
कोल्हापुरात कोरोनाची लक्षणं नसलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांवर आता घरीच उपचार होणार, खाजगी रुग्णालयांच्या परवानगी आणि देखरेखीखाली उपचार होणार, घरी स्वतंत्र व्यवस्था असली तरच उपचार घेता येणार, कोल्हापूर शहरातील दोघांवर उपचार सुरु झाले, घरी उपचाराचा निर्णय सध्या तरी कोल्हापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रापुरता मर्यादित
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नावाने खंडणी मागणाऱ्याला अटक करण्यात आली आहे. निगडी पोलिसांही कारवाई केली आहे. पुण्यातील हा तरुण असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एका खाजगी रुग्णालयाला फोन करुन त्याने 25 लाखांची खंडणी मागितली होती. चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयातून बोलतोय असंही तो म्हणाला होता. कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी ही रक्कम द्यावी अशी मागणी त्याने केली होती. रुग्णालय प्रशासनाने चंद्रकांत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांच्या नावाचा अज्ञातांनी वापर केल्याचा समोर आलं होतं. आता त्याला अटक करण्यात आली असून, त्याची कसून चौकशी सुरु आहे. तो कोणासाठी काम करतोय? हे तपासात समोर येईल.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं निवासस्थान राजगृहावरील हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपीला मुंबई पोलिसांकडून बेड्या, विशाल मोरे उर्फ विठ्ठल याला कल्याणमधून अटक
बीड जिल्ह्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत रोज भर पडताना पाहायला मिळतेय, मध्यरात्री आलेल्या अहवालानुसार नवीन 27 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले, रुग्णांमध्ये बीड 7, परळी 6, अंबाजोगाई 7, आष्टी 4 , गेवराई 2 आणि धारूर 1 अशा एकूण 27 पॉझिटिव्ह रुग्णांचा समावेश आहे. बीड जिल्ह्यातील एकूण रुग्ण संख्या 451 झाली आहे
हिंगोली जिल्ह्यात आज सकाळी सहा वाजल्यापासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. जोरदार पावसाने पिकांना चांगला दिलासा मिळणार आहे. सोयाबीन व उडीद, मूग पिकांना नुकतीच फुले लागत आहेत. त्यामुळे ऐन मोसमात पडणारा पाऊस पिकांना फायद्याचा आहे.आज सकाळी 6 वाजल्यापासून पावसाने जिल्ह्यात सर्वत्र जोरदार हजेरी लावली आहे. काल सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात जोरदार पावसाने हजेरी लावली होती.
पुणे जिल्ह्यामध्ये कोरोनाचा कहर, गेल्या 24 तासांमध्ये पुणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त म्हणजे 3218 नवीन रुग्णांची नोंद, तर तब्बल 62 कोरोना बधितांचा मृत्यू झालाय, हा देखील आजपर्यंतचा सर्वात मोठा आकडा, जिल्ह्यात आतापर्यंत 1504 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत 59634 रुग्णांची नोंद

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या सध्या दिवसेंदिवस वाढत आहे. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आता कोरोना योद्धा देखील मोठ्या प्रमाणात प्रयत्न करताना दिसत आहेत. दरम्यान, याच कोरोना योद्ध्यांवर हल्ला झाल्याची घटना रत्नागिरी जिल्ह्यामधील राजापूर तालुक्यातील साखरी नाटे येथे घडली आहे. पोलीस आणि आरोग्य कर्मचारी यांच्यावर जवळपास 200 ते 250 जणांच्या जमावानं हल्ला केल्याची माहिती मिळत आहे. या हल्ल्यात एक पोलीस कर्मचारी आणि एक वैद्यकीय कर्मचारी जखमी झाला आहे. साखरी नाटे या भागात कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानं सर्व्हेकरता गेलेल्या आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांशी तेथील नागरिकांची बाचाबाची झाली. त्यानंतर पोलीस देखील तेथे दाखल झाले. यावेळी पोलिसांनी जमावाला शांत राहण्याचे. शिवाय, साऱ्या परिस्थितीचं गांभीर्य देखील सांगितले. पण, जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. यावेळी 200 ते 250 जणांच्या जमावानं थेट हल्ला चढवला. यावेळी जमावानं केलेल्या दगडफेकीत पोलिसांच्या गाडीचे नुकसान झालं. गाडीची काच फुटली. तर, वैद्यकीय विभाग आणि पोलिसांचा एक कर्मचारी जखमी झाल. याप्रकरणात आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, हा सारा प्रकार गंभीर असून घडल्या प्रकाराबद्दल जिल्ह्यातून संतप्त अशा प्रतिक्रिया सध्या पुढे येत आहेत.

पार्श्वभूमी

महत्वाच्या घडामोडी.....


सिनेमागृहं आणि जिम 1ऑगस्टपासून सुरु होण्याची शक्यता, केंद्रीय गृहमंत्रालयाला प्रस्ताव

कोरोनामुळे देशांतील सर्व चित्रपटगृहे आणि मल्टीप्लेक्स बंद आहेत. बॉलिवूडचे सर्व मोठे चित्रपट आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होत आहेत, ज्यामुळे देशातील बड्या थिएटर्स आणि मल्टिप्लेक्सचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ते कधी उघडणार याकडे सगळ्यांच लक्ष आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अनलॉक 3 च्या टप्प्यात अटी-शर्तींसह थिएटर्स आणि मल्टिप्लेक्स सुरु होण्याची शक्यता आहे. कारण माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं तसा प्रस्ताव केंद्रीय गृहमंत्रालयाला पाठवला आहे.

राममंदिराचं व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करा, उद्धव ठाकरेंचा सल्ला

अयोध्येत राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत 5 ऑगस्ट रोजी राममंदिराचं भूमिपूजन होणार आहे. मात्र कोरोनामुळं या भूमिपूजनाला विरोध करत याचिका दाखल करण्यात आली आहे. यात आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ई-भूमिपूजन करण्याचा सल्ला दिलाय. हा आनंदाचा क्षण आहे. अनेकांना तिथं जाण्याची इच्छा असणार. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ई-भूमिपूजन करु शकता, असं मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.


ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्याला कोरोनाची लागण

ठाकरे सरकारमधील आणखी एका मंत्र्यांला कोरोनाची लागण झाली आहे. उदगीरचे मतदासंघाचे आमदार आणि राज्याचे पाणीपुरवठा राज्यमंत्री संजय बनसोडे यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. संजय बनसोडे यांनी गेल्या काही दिवसांपासून तब्येत ठीक नव्हती. मागील काही दिवसांपासून ताप आणि अंगदुखीने ते आजारी होते. त्यानंतर त्यांची कोविड 19 टेस्ट करण्यात आली त्यात त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.