LIVE UPDATES | महाविकास आघाडीत नियुक्त्यांवरून पुन्हा नाराजी

-Amarnat Yatra | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाची अमरनाथ यात्रा रद्द-विरोधी पक्षनेत्यांच्या बैठकीला शासकीय अधिकाऱ्यांनी उपस्थित राहू नये, राज्य सरकारचा जीआर-Corona Vaccine | ...तर डिसेंबर महिन्यात कोरोनाची लस लोकांना उपलब्ध होऊ शकते, सीरम इन्स्टिट्युटचा दावा-IPL 2020 | आयपीएलच्या 13 व्या सीजनचं दुबईत होणार आयोजन-Corona Update | ॲक्टिव्ह केसेसमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर, ठाणे दुसऱ्या तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावरकोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jul 2020 07:37 PM

पार्श्वभूमी

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...कोरोनाव्हायरस लस बनविण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. ऑक्सफर्ड विद्यापीठ मागच्या काही महिन्यांपासून संपूर्ण जगाला त्रस्त करुन सोडणाऱ्या कोरोना व्हायरस विरोधात...More

हिंगोली : जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून उघडीप दिलेल्या पावसाने शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या पिकांना दिलासा मिळाला आहे. मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह अचानक जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने घराबाहेर पडलेल्यांची धांदल उडाली आहे.