LIVE UPDATES | लोणावळ्यात सात दिवसांचा लॉकडाऊन घेण्यासाठी प्रस्ताव

- ऐश्वर्या राय बच्चनसह मुलगी आराध्या नानावटी रुग्णालयात भरती- नवी मुंबईत डॉक्टर असल्याचे सांगून रूममध्ये प्रवेश करीत कोरोना सेंटरमध्ये बलात्कार-मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासक, खंडपीठाची राज्य शासनास नोटिस- कोरोना निगेटिव्ह विक्रेत्याकडूनच वाण-सामान खरेदी करा : औरंगाबाद मनपा- कोविड संसर्गाचा कल समजून घेण्यासाठी मुंबईत पालिकेकडून सेरो सर्वेक्षण सुरूकोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 18 Jul 2020 08:30 PM

पार्श्वभूमी

कोरोना व्हायरससह इतर महत्वाच्या घडामोडीचं अपडेट या लाईव्ह ब्लॉगमध्ये...बिग बी अमिताभ बच्चन, अभिनेते अभिषेक यांच्यानंतर आता ऐश्वर्या राय बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्याला देखील नानावटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले...More

पुण्यातील येरवडा कारागृहात पळालेल्या एका आरोपीच्या वाकड पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. सनी पिंटो असं त्याचं नाव आहे. तात्पुरत्या कारागृहातुन 15 जुलैच्या रात्री इतर सहकाऱ्यांसोबत त्याने पळ काढला होता. तिथून तो पिंपरी चिंचवड शहरातील बोट क्लब परिसरात लपून बसला होता. खबऱ्याने दिलेल्या बातमीच्या आधारे वाकड पोलिसांनी सापळा रचत त्याच्या मुसक्या आवळल्या.