Coronavirus LIVE Update | 18 जानेवारीपासून 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवा : केंद्र सरकार

कोरोना व्हायरसमुळे सध्या जगभरात चिंतेचे वातावरण आहे. रोज शेकडो लोग याचे शिकार होत आहेत. भारतात देखील या रोगाने आपले पाय पसरले आहेत. कोरोनासंदर्भात प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 27 Mar 2020 09:28 PM
केंद्र सरकारचे आदेश : 18 जानेवारीपासून 23 मार्चपर्यंत परदेशातून आलेल्या सर्वांना निरीक्षणाखाली ठेवा. 18 जानेवारीपासून जवळपास 15 लाख लोक भारतात आलेत. बाहेरुन आलेल्या लोकांमुळंच कोरानाचा जास्त धोका. त्यामुळं सर्वांना निरीक्षणाखाली ठेवण्याचे केंद्राचे आदेश. जिल्हा प्रशासनाबरोबर सहाय्य घेऊन कारवाई करण्याचे आदेश.
सिंधुदुर्ग : कोकणात 28, 29 व 30 मार्च 2020 रोजी मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.
कोरोनाची लक्षणे असतील तर लपवू नका; घाबरुन जाण्याचं कारण नाही, हा आजार पूर्णपणे बरा होता : मुख्यमंत्री
खासगी डॉक्टरांनी ओपीडी बंद करू नये, गावाकडे नागरिकांना तुमची गरज आहे : मुख्यमंत्री
गर्दी टाळा...कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं जनतेला आवाहन...
कोल्हापुरातील येथील कोरोनाग्रस्त तरुणाचा महालक्ष्मी एक्सप्रेसच्या जनरल डब्यातून प्रवास. 21 मार्चला संबंधित तरुण पुण्यातून महालक्ष्मी एक्सप्रेसने कोल्हापुरात बहिणीकडे आला. पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाची धक्कादायक माहिती.
जालना शहरासह अंबड, घनसावंगी तालुक्यात अवकाळी पाऊस, घनसावंगी तालुक्यातील अनेक गावांत वादळी वाऱ्यासह गारपीट. तालुक्यातील रांजणी, गुरूपिंप्री, अवलगाव, शिंदेवडगाव येथे पावसाशिवाय गारांचा पाऊस.
विदेशातून आलेला केरळमधील आएएएस अधिकारी कॉरंटाईन असताना पळून गेल्याने निलंबित
देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता 3 मे 2020 रोजी देशभरात होणारी मेडिकल प्रवेशासाठीची NEET 2020 परीक्षा पुढे ढकण्याचा निर्णय मनुष्यबळ विकास मंत्रालायकडून घेण्यात आला आहे.
सांगलीतील इस्लामपुरातील एका कुटुंबातील 23 सदस्यांपैकी 19 जणांना कोरोनाची लागण; ज यात्रेवरून परत आलेल्या चौघही कोरोना पॉझिटिव्ह
ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉनसन यांना कोरोना विषाणूची लागण
सांगलीत कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यात आणखी 12 जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे सांगली जिल्ह्यातील रुग्णाची संख्या 23 वर गेली आहे. विशेष म्हणजे हे 12 जण इस्लामपूरमधील कोरोनाची लागण झालेल्या कुटुंबातीलच आहेत.
कोरोनाबाधितांवर उपचार करण्यासाठी प्रत्येक जिल्हा मुख्यालयात रुग्णालयाची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या रुग्णालयात १०० बेड आणि २५ व्हेंटिलेटरची सोय असेल.
होम कोरोन्टाईन असलेल्या लोकांना बाहेर फिरू देऊ नये असे सांगणाऱ्या युवकाला काही जणांनी मारहाण केली. त्यानंतर तेथे गेलेल्या पोलिस पथकावर बारामती शहरातील काही जणांनी जोरदार हल्ला चढवला.

याच्यामध्ये पोलीस निरीक्षक यांच्यासह तीन अधिकारी व सहा कर्मचारी जखमी झाले आहेत. अनेकांच्या हाताला जोरदार मार लागला असून अनेकांच्या डोक्यात काठ्या घालण्यात आल्या आहेत तर काही जणांना दगडाने देखील मारहाण करण्यात आलेली आहे.
राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 153 वर गेला आहे. मुंबईत 5 तर वाशीमध्ये 1 नवा रूग्ण आढळला आहे.
पुण्यानंतर पिंपरी चिंचवडमधील पहिले तिन्ही रुग्ण हे कोरोनामुक्त झालेत. त्यांचा दुसरा अहवाल देखील निगेटिव्ह आलाय. काल त्यांची दुसऱ्यांदा चाचणी घेण्यासाठी नमुने पाठवले होते. आज त्यांना डिस्चार्ज दिला जाईल. या तिन्ही रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं 11 मार्चला सिद्ध झालं होतं. हे तिन्ही रुग्ण पुण्यातून डिस्चार्ज झालेल्या दाम्पत्यासोबतच दुबईला गेले होते.
कोल्हापुरातील खासगी रुग्णालये ताब्यात घ्या, असा आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचे दोन रुग्ण आढळल्यावर यंत्रणा अधिक सतर्क झाली. परिणामी पोलिसांकडून आजपासून कायद्याची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
पुणे महापालिकेकडून नागरिकांना आजपासून घराजवळ भाजीपाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील वेगवेगळ्या 115 भागांमधे भाजीपाला विक्री केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या वेगवेगळ्या भागांमधे असलेल्या क्षेत्रीय कार्यालंयात संयोजकांची नेमणूक करण्यात आलीय. त्यांचे मोबाईल नंबर त्या भागातील लोकांना पोहचवण्यात आलेत आणि महापालिकेच्या वेबसाईटवर देखील उपलब्ध करून देण्यात आलेत. महापालिका उपलब्ध करुन देण्यात येणारा हा भाजीपाला शेतकर्यांकडून थेट करण्यात येणार असल्यानं तो नेहमीच्या किमतीत उपलब्ध असेल असा दावा महापालिकेकडून करण्यात येतोय.
औरंगाबाद : पुण्याहून आलेला तरुण गावात का फिरतो? यामुळे दोन गटात तुफान राडा, औरंगाबादपैठण तालुक्यातील सोनवाडी गावात घडली घटना, पुण्यावरून आलेल्या तरुणाने कोरोना तपासणी न केल्यामुळे राडा, तरुण तपासणी न करताच गावात फिरत असल्यामुळे दोन गटात झालेल्या मारहाणीत तीन जण गंभीर जखमी, पैठण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पनवेलमधील पहिल्या कोरोना पाॅझिटिव्ह रूग्णाला डिस्चार्ज

पार्श्वभूमी

मुंबई : राज्यात कोरोनामुळे मृतांचा आकडा पाचवर गेला आहे. राज्यात काल कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. वाशीतील एका खासगी रुग्णालयात एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. तर मुंबईच्या कस्तुरबा रुग्णालयातही एका 65 वर्षीय महिलेचा मृत्यूू झाला आहे.


कस्तुरबामध्ये दाखल झालेल्या महिलेला डायबिटीज आणि उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ लागल्याने दाखल करण्यात आलं होतं. त्यात तिचा उपाचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या तपासणी अहवालात तिला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.


गोवंडी येथील मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा त्रास असणारी एक 65 वर्षीय महिला टंडन हॉस्पिटल, डी वाय पाटील हॉस्पिटल अशा दोन रुग्णालयांतून होऊन वाशी येथील खासगी हॉस्पिटल येथे दाखल झाली होती. या महिलेची स्थिती अत्यंत गंभीर होती. उपचारादरम्यान तिचा 24 मार्च रोजी रात्री मृत्यू झाला. मृत महिला करोना बाधित असल्याचे प्रयोगशाळा अहवालावरुन स्पष्ट झालं आहे. तिच्या परदेश प्रवासाबाबत अथवा इतर संपर्काबाबत माहिती घेण्यात येत आहे.


आज कोरोनाचे तीन नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गुरूवार संध्याकाळपर्यंत राज्यातील एकूण करोना बाधित रुग्णांची संख्या 125 झाली आहे. मुंबई, सिंधुदुर्ग आणि नागपूर येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. दरम्यान, राज्यात आज एकूण 269 जण विविध रुग्णालयात भरती झाले आहेत, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.


आजच्या नवीन बाधित रुग्णांपैकी सिंधुदुर्गचा रुग्ण हा एका करोना बाधित रुग्णाचा सहवासित असून त्याने या रुग्णासोबत एकाच डब्यातून रेल्वे प्रवास केल्याचे समजते. नागपूरच्या बाधित रुग्णाने दिल्ली येथे प्रवास केला होता, पण त्याने परदेश प्रवास केल्याचे स्पष्ट झालेले नाही.

राज्यातील जिल्हा आणि महापालिकानिहाय रुग्णांची आकडेवारी




    • मुंबई - 49





    • पिंपरी चिंचवड - 12





    • पुणे - 18





    • सांगली - 9





    • नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली - 6





    • नागपूर - 5





    • यवतमाळ - 4





    • अहमदनगर - 3





    • ठाणे - 3





    • सातारा - 2





    • पनवेल - 2





    • उल्हासनगर - 1





    • औरंगाबाद -1





    • रत्नागिरी - 1





    • वसई-विरार - 1





    • पुणे ग्रामीण - 1





    • सिंधुदुर्ग - 1





    • मृत्यू - 4



गेल्या 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 3243 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 2750 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत, तर 125 जण पॉझिटिव्ह आले आहेत. नवीन कोरोना विषाणू आजार प्रतिबंध व नियंत्रण पूर्वतयारी म्हणून राज्यात सर्व जिल्हा रुग्णालये तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विलगीकरण स्थापन करण्यात आले आहेत.


संबंधित बातम्या :  

 

 

Coronavirus | दहावीचा उर्वरित एक पेपर लांबणीवर; 31 मार्चनंतर परीक्षेची तारीख जाहीर होणार

 

आरोग्य कर्मचाऱ्यांना 50 लाखांचं कवच, गरिबांना 1.70 कोटींचं पॅकेज : अर्थमंत्री

Coronavirus | राज्यातील 15 रूग्ण कोरोनामुक्त; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती


Corona helpline numbers | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील हेल्पलाइन क्रमांकांची यादी जारी


Coronavirus | कोरोनाचा महाराष्ट्रात चौथा बळी; वाशीमध्ये 65 वर्षीय महिलेचा मृत्यू


Coronavirus | कोरोनाविरूद्धच्या लढाईत बळ देणारा व्हिडीओ; नागपुरमधील कोरोनाग्रस्ताचा अनुभव



- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.