राज्यातील कोरोनाबाधित रुग्णाची जिल्हानिहाय आकडेवारी
ठाणे मंडळ एकूण
मुंबई महानगरपालिका - 1357 ( मृत्यू - 92)
ठाणे - 11
ठाणे मनपा - 44 (मृत्यू - 3)
नवी मुंबई मनपा - 45 (मृत्यू - 3)
कल्याण डोंबवली मनपा - 46 (मृत्यू - 2)
उल्हासनगर मनपा - 1
भिवंडी निजामपूर मनपा - 1
मीरा भाईंदर मनपा 42 (मृत्यू - 1)
पालघर - 6 (मृत्यू - 1)
वसई विरार मनपा - 22 (मृत्यू - 3)
रायगड - 4
पनवेल मनपा - 8 (मृत्यू - 1)
Corona Update | राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1982 वर, एकट्या मुंबईत 1298 रुग्ण
नाशिक मंडळ
नाशिक - 2
नाशिक मनपा - 1
मालेगाव मनपा - 27 (मृत्यू - 2)
अहमदनगर 10
अहमदनगर मनपा -16
धुळे - 1 (मृत्यू - 1)
जळगाव - 1
जळगाव मनपा - 1 (मृत्यू - 1)
पुणे मंडळ
पुणे - 7
पुणे मनपा -236 (मृत्यू - 30)
पिंपरी चिंचवड मनप - 23
सोलापूर मनपा - 1 (मृत्यू - 1)
सातारा - 6 (मृत्यू - 2)
कोल्हापूर मंडळ
कोल्हापूर - 1
कोल्हापूर मनपा - 5
सांगली - 26
सिंधुदुर्ग - 1
रत्नागिरी - 5 (मृत्यू - 1)
औरंगाबाद मंडळ
औरंगाबाद - 3
औरंगाबाद मनपा - 16 (मृत्यू - 1)
जालना - 1
हिंगोली - 1
लातूर मंडळ
लातूर मनपा- 8
उस्मानाबाद - 4
बीड - 1
अकोला मंडळ
अकोला मनपा - 12
अमरावती मनपा -5 (मृत्यू - 1)
यवतमाळ - 4
बुलढाणा - 13 (मृत्यू - 1)
वाशिम - 1
नागपूर मंडळ
नागपूर - 1
नागपूर मनपा - 27 (मृत्यू - 1)
गोंदिया -1
इतर राज्ये / परदेश - 9 (मृत्यू - 1)
राज्यात कोरोनामुळे 149 जणांचा मृत्यू
कोविड-19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या 149 झाली आहे. राज्यात काल (12 एप्रिल) आज झालेल्या मृत्यूंमध्ये मुंबईत 16, पुण्यातील 3 तर नवी मुंबईतील 2 आणि सोलापूरच्या एका रुग्णाचा समावेश आहे. या मृत्यूंपैकी 13 पुरुष तर 9 महिला आहेत. 22 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत तर 15 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. तर एकजण 40 वर्षांपेक्षा लहान आहे. मृत्यूमुखी पडलेल्या 22 पैकी 20 रुग्णांमध्ये (91 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. यापैकी एकाला मलेरिया देखील होता.
महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी होणार
कोरोना रुग्णसंख्येनुसार महाराष्ट्राची तीन झोनमध्ये विभागणी करण्यात येणार आहे. 15 पेक्षा अधिक रुग्ण असलेल्या जिल्हे रेड झोन, 15 पेक्षा कमी रुग्ण असलेले जिल्हे ऑरेंज आणि एकही रुग्ण नसलेले जिल्हे ग्रीन झोन म्हणजेच हरित पट्टयात समाविष्ट होतील. लॉकडाऊनसंदर्भात रेड झोनमधील जिल्ह्यांना कोणताही दिलासा मिळणार नाही. तर ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जिल्ह्यांमध्ये खबरदारीची उपाययोजना करुन उद्योग आणि व्यवहार सुरु करण्याचे संकेत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहेत. एकंदरीतच देशाता सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात असल्याने सरकार सर्वोतापरी खबरदारी घेत आहे.
कोणते जिल्हे कोणत्या झोनमध्ये?
रेड झोन : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सांगली, नागपूर, औरंगाबाद
ऑरेंज झोन : रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, अहमदनगर, जळगाव, उस्मानाबाद, बीड, जालना, हिंगोली, लातूर, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलडाणा, वाशीम, गोंदिया
ग्रीन झोन : सिंधुदुर्ग, धुळे, नंदूरबार, परभणी, नांदेड, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली
संबंधित बातम्या
- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1895 वर; धारावी, मालेगाव, नागपुरात रुग्णांच्या संख्येत कमालीची वाढ
- राज्यातील विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी! दहावीच्या उर्वरित पेपरसह नववी, अकरावी परीक्षा अखेर रद्द
- मुंबईतील कोरोना हॉटस्पॉटची संख्या सात वर; 50 टक्क्यांहून अधिक रूग्ण सात वार्डमध्येच